Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

क
कोंबडी प्रेमी
Fri, 07/21/2017 - 14:17
🗣 445 प्रतिसाद
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
143577 वाचन

💬 प्रतिसाद (445)
S
sagarpdy गुरुवार, 07/27/2017 - 14:55 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
प
पुंबा Fri, 07/28/2017 - 06:05 नवीन
पण म्हणून विरुद्ध भूमिकेचं तुमच्यासमोर झालेलं प्रतिपादन पूर्णतः वाया जात नाही. त्या भूमिकेतली सत्यं मनात घर करतात, आपण लक्षात न घेतलेले बिंदू लक्षात येतातच आणि अजून अभ्यासावयाच्या गोष्टी पूर्वग्रह खिळखिळे करतात. विरोधक तुमच्या मेंदूत एक किडा टाकून गेलेला असतो आणि आपल्या भूमिकेतला बदल आपण आपल्या आत्मसन्मानाची आब राखून विरोधकासमोर कबूल करायचाच नसतो. मात्र विरोधकाने टाकलेल्या मेंदूतल्या किड्याला मालकाच्या कार्याचा भरपूर आनंद मिळत असतो.
वा. आबांचा सल्ला अंमलात आणलात. :) हा परिच्छेद तुफान आवडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 07/28/2017 - 07:17 नवीन
आदूबाळ यांचा आदेश न जुमानण्याइतकी हिम्मत आहे का कोणाची? हा हा हा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/27/2017 - 21:43 नवीन
छान चर्चा आहे. वाईट बियर संपवण्यासाठी उपयुक्त होती. आवडली नाही तरी फुकट कशी घालवणार! चढलेली दारू उतरेल असं चर्चेत काही सापडलं नाही; बेटर लक नेक्स्ट टाईम. बियरमध्ये खूप हॉप्स घातले की चव फार कडवट होते; मला आवडत नाही. ल-चीपो असली तरी वाईन वाईट असू शकतच नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/27/2017 - 23:13 नवीन
चढलेली दारू आजून उतरलेली दिसंत नाहीये, हे प्रतिसादातून कळलं. कीपीटप. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/28/2017 - 23:11 नवीन
ज्या जगातल्या लोकांना अपर्णा रामतीर्थकरांचं भाषण मनापासून किंव मनाविरोधात ऐकणाऱ्यांना, त्या काहीकिंचित स्त्रीवादी असल्याचं लक्षात येत नाही, त्या दूश्ट, दूश्ट, वैट्ट जगात दारू उतरून कसं बरं जगावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Fri, 07/28/2017 - 08:05 नवीन
चढलेली दारू उतरेल असं चर्चेत काही सापडलं नाही
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीची उपयुक्तता आम्हाला माहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ज
जेम्स वांड Fri, 07/28/2017 - 04:49 नवीन
कलम ४९८-ए वर ताजा ताजा निर्णय
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Fri, 07/28/2017 - 06:02 नवीन
हा निर्णय ताजा कुठाय? JULY 2, 2014
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 07/28/2017 - 06:55 नवीन
याच निर्णयाबद्दल टाकायला इकडे आलो होतो. वरील बातमीत तारीख आधीची का दाखवत आहेत कळले नाही. काल बातम्यात पहिली आणि आज इथे आली आहे - http://abpmajha.abplive.in/india/new-delhi-no-arrest-in-dowry-cases-till-charges-are-verified-supreme-court-latest-update-436410
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 07/28/2017 - 07:02 नवीन
एबीपी ने जुनी बातमी रिसायकल केली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 07/28/2017 - 07:22 नवीन
नाही हो, बहुतेक २०१४ ला चेकलिस्ट दिली होती आणि त्यानुसार अटक झाली पाहिजे असं सांगितलं होतं आणि आता दोन्ही बाजूना बोलावून कमिटीतर्फे चौकशी झाल्याशिवाय अटक करू नये असे नमूद करण्यात आले आहे. शिवाय जामीनही होता होईल तेवढा त्याच दिवशी देण्यात यावा असेही नमूद करण्यात आल्याचे दिसते. https://barandbench.com/supreme-court-misuse-section-498/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 07/28/2017 - 08:00 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
A
arunjoshi123 Fri, 07/28/2017 - 08:24 नवीन
१. चोरी आणि हल्ले यानंतर तिसर्‍या क्रमांकावर अटका २. खोट्या केसेस बाकी सर्व गुन्ह्यांपेक्षा सर्वाधिक ३. विदेशात वर्षानुवर्षे राहणार्‍या , काही संबंध नसलेल्या नातेवाईकांना अटका ४. रुग्ण पालकांच्या अटका ५ ..... =================================== अपर्णाताई तुम आगे बढो, ... तुम्ही खरंच आई आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Fri, 07/28/2017 - 07:43 नवीन
या अपर्णा बाई शंकराच्या लिंगाची पूजा करतात का? काय म्हणने आहे ह्याच्या वर त्यांचे. या बाई राष्टीय स्वयंसेवक संघाच्या असाव्यात ,ब्राह्मण समाजात पुन्हा कर्मठपणा यावा म्हणून या सुपारी घेऊन काम करत असाव्यात.एका भाषणात या म्हणतात ,ब्राह्मणाच्या बायका तुम्ही कसे नीटच वागले पाहीजे,बाकीच्या खालच्या जातीचे सोडा म्हणे. पक्की जातीयवादी बाई आहे.काय तर म्हणे हीचा नवरा कट्टर हिंदुत्ववादी आहे,आम्हाला कशाला सांगताय हे? ह्या बाईला तिच्या तरुणपणात कसलेही स्वातंत्र मिळालेले दिसत नाही,त्यामुळे हिच्या मनात खोलवर जखम झाली असावी,आजच्या महीलांना मिळालेले स्वातंत्र बघून हिला एन्वी येत असावी.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 07/28/2017 - 07:52 नवीन
ह्या बाईला तिच्या तरुणपणात कसलेही स्वातंत्र मिळालेले दिसत नाही,त्यामुळे हिच्या मनात खोलवर जखम झाली असावी कशावरून बोलताय हो हे? काही पुरावा वगैरे? का हातात कळफलक आहे म्हणून बडवायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 07/28/2017 - 07:57 नवीन
एका भाषणात या म्हणतात ,ब्राह्मणाच्या बायका तुम्ही कसे नीटच वागले पाहीजे,बाकीच्या खालच्या जातीचे सोडा म्हणे.
कृपया याचा संदर्भ द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
प
पुंबा Fri, 07/28/2017 - 07:58 नवीन
एका भाषणात या म्हणतात ,ब्राह्मणाच्या बायका तुम्ही कसे नीटच वागले पाहीजे,बाकीच्या खालच्या जातीचे सोडा म्हणे.
हे कुठे ऐकलंत? लिंक द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Fri, 07/28/2017 - 09:05 नवीन
एका व्हिडूमध्ये आहे,बहुधा नाशिकमधल्या कार्यक्रमाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Fri, 07/28/2017 - 09:05 नवीन
एका व्हिडूमध्ये आहे,बहुधा नाशिकमधल्या कार्यक्रमाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 Fri, 07/28/2017 - 08:12 नवीन
खालच्या जातीच्या हा अपर्णाताईंचा शब्दप्रयोग चूक आहे. वकील असल्यानं त्यांचेकडून "चूक" म्हणून असं म्हटलं जाणं अपेक्षित नाही. ============================================================== इतर जातींना खालचे मानणारांचा संघाना सपोर्ट आहे हे सत्य असलं तरी ती प्रेरणा संघाची नाही. टॅक्स चोरणारांचा पी चिदंबरम यांस सपोर्ट असे, पण चिदंबरम हे लोकांस टॅक्स चोरा म्हणत असे म्हणणे अन्यायकारक आहे. ============= संघाचे असणे भूषण आहे. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपति, कितितरी मंत्री आणि लोकसेवक संघाचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
म
मोदक Fri, 07/28/2017 - 15:20 नवीन
इतर जातींना खालचे मानणारांचा संघाना सपोर्ट आहे हे सत्य असलं तरी जोशी.. पुरावे वगैरे आहेत का..? का या पण गावगप्पाच..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ग
गामा पैलवान Fri, 07/28/2017 - 14:20 नवीन
टर्बोचार्जड फिलॉसॉफर, १.
या म्हणतात ,ब्राह्मणाच्या बायका तुम्ही कसे नीटच वागले पाहीजे,बाकीच्या खालच्या जातीचे सोडा म्हणे. पक्की जातीयवादी बाई आहे.
मीसुद्धा पक्का जातीयवादी आहे. ब्राह्मण सुधारला तर आख्खा भारत सुधरेल. म्हणूनंच मी नुसता जातीयवादी नाही तर ब्राह्मणजातीयवादी आहे. त्यामुळे अपर्णाबाईंचा जातीयवाद मला माझाच वाटतो. २.
काय तर म्हणे हीचा नवरा कट्टर हिंदुत्ववादी आहे,आम्हाला कशाला सांगताय हे?
तेच तर म्हणतोय मी पण. कशाला ऐकायला जाता अपर्णाबाईंचं ! पण एक सांगू? अपर्णाबाईंचं ऐकून तुमची जी चडफड होते ना, ती बघायला मला ज्याम आवडतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Fri, 07/28/2017 - 18:36 नवीन
खरे म्हणजे हा धागा आटपला गेला ते उचितच झालं पण हे बघितला आणि ह्या त्याचं पंथातल्या आहेत कि काय अस वाटल https://www.facebook.com/chakombarmas/photos/a.234981440228477.1073741831.234553173604637/460071784386107/?type=3&theater#
  • Log in or register to post comments
म
मी कोण Sun, 07/30/2017 - 05:01 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अक्षदा Mon, 05/28/2018 - 23:07 नवीन
गामा, अजो, अभ्या वरील सर्व चर्चा वाचून फार वाईट वाटले. मी बरेच दिवस मिपा सदस्य आहे परंतु र्पतिसाद फार क्वचित दिला असेन. आज लॉगिन करून लिहिण्याचे कारण इतकचं की या मॅडम च्या भाषणाच्या क्लिप्स खरंच अनेक संसार बिघडवण्यास कारण ठरत आहेत आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तुम्ही म्हणता तस ताईंच म्हणणं नसेलही. परंतु अनेक जणांना मी पाहिलं जे ह्या भाषणाच्या क्लिप्स सुनांना त्रास देण्यासाठी करताना. अगदी माझ्या स्वतःच्या नात्यातल्या घरात. त्यामुळे त्या काहीही उद्देशाने सांगत असल्या तरी प्रथम दर्शनी त्यांचा रोख हा शिकलेल्या मुली सुना असच वागतात हे सरसटीकरण आहे. उदाहणादाखल सांगायचं झालं तर माझ्या एका भावाने लव मैरज केले त्याच्या ऑफिच्या जवळच एका ऑफीस मध्ये वहिनी काम करत असे. त्या मुलाच्या आई बाबांना फार काही रुचली नवती मुलगी पण मुलाने तिच्याशीच लग्न करणार असं पक्क सांगितल्यावर आणि नातेवाईकांनी समजल्यावर तयार झाले. पण आल्या दिवसापासून तिच्याबद्दल घरच्यांचं मत काही चांगलं नव्हतच. तिला शेतीतील कामे करायची सवय नव्हती तचेच घरातील कामे स्पीड ने करता येत नसत कारण लग्नाआधी अगदी सराईतपणे ती काही रोज ही सर्व काम करत नव्हती. अर्थातच तिला वेळ लागणार परंतु घरातील लोक काही ना काही कारण घेऊन बोलतच असतं, भावाने सुरुवातीला जाऊदे म्हटले पण नेहमी नेहमी घरच्यांच्या तक्रारी ऐकून त्यानेही तिला दमात घेण्यास सुरू केलं. नंतर नंतर तर त्याने अनेकदा तिच्यावर हात उचलला. सासरे सगळ्यांना असच दाखवत की सून कामे करायला किती नालायक आहे. असच मी एकदा तिथे असताना सुनेच्या सासऱ्यांनी ही अपर्णा ताईंची क्लिप सुरू केली. पूर्ण भाषण ऐकून हसावे की रडावे हेच कळेना. त्या भाषणाचां सासऱ्यांवर पगडा होता की हेच खरे असे म्हणत शिकलेल्या सुना अशाच नालायक कामे नको म्हणणाऱ्या. स्वतच्या सुनेला ऐकवण्या करता नेहमी ती क्लिप वाजवत. कहर म्हणजे स्वतःच्या सुनेने वाढलेले जेवण ही जेवत नसत. घरात इतर कुणी स्त्री नसल्यास शेजारील घरी हाक मारून त्यांच्या सुनेला बोलावून स्वतला जेवण वाढण्यास सांगत. सून तरी किती दिवस सहन करणार. पुढे मुलगा सून वेगळे गेले राहण्यास गेले. यात सुनेची काही चूकच नाही अस मी म्हणत नाही पण ती प्रयत्न करत होती अपेक्षा पूर्ण करायच्या. पण आता ज्या मुलीने कधीच शेती केली नाही तिला लगेच कसं जमेल शेतीत काम करणं. आता भविष्यात ती कशी वागेलं आपल्या सासू सासऱ्यांशी. मी तीच्याजगी असेन तर नक्कीच काही बरी वागणार नाही. खरंच ग्रामीण भागात आता कुठे मुलीच शिक्षण वैगेरे लोक डोक्यात घेत आहेत पण ही असली भाषण ऐकून खरंच त्यांच्यावर परिणाम होतो आहे आणि तो निगेटिव्ह आहे हे नक्की. त्यामुळे कृपया करून ही भाषण योग्य वगैरे पसरवू नका. माझ्या गावात अनेक मुली आहेत ज्यांना दहावी नंतर फार तर एखादा मशीन क्लास करू दिला जातो व लगेच लग्न लावली जातात. खरी परिस्थिती फार भयानक आहे. मी पहिली मुलगी आहे आमच्या घरी जी ग्रज्यूएट होऊन जॉब करत आहे. हे फक्त माझे वडील गावात न राहता कामानिमित्त शहरात राहत आहेत म्हणून. ताई म्हणत आहेत तशा वागणर्या स्त्रियाही असतील की पण त्यामुळे अशा ओपन फोरम मध्ये जे काही वक्तव्य त्या करत आहेत ते योग्य अस मला वाटतं नाही. आताच्या फ्री इंटरनेटच्या जमान्यात ह्या अशा गोष्टी फार लवकर पसरत आहेत. आणि खरंच आपल्या पथ्यावर जे पडत आहे तेही खूप लवकर फेमस होत. ग्रामीण भागात मुलीच शिक्षण लग्नाचं वय या गोष्टीत अजून लोक म्हणावे तितके जागरूक नाहीत. अशात हे म्हणजे अनेक मुलींच्या शिक्षणात अडथळा ठरू शकतो. ही उदाहरणे सुद्धा मी पाहिली आहेत. माझ्या वडिलांच्या फोन मध्ये सुद्धा ही क्लिप त्या नातेवाईकांनी दिली होती. बाबांनी घरी येऊन ती वाजवली माझ्याकडे बागितल. मी मोबाईल उचलून क्लिप डिलीट केली. अजून काय सांगू. माझे उच्च शिक्षण मी कसे घेत आहे मला माहिती. नातेवाईकांनी माझ्या लग्नाचं टूम लावूनही माझ्या वडिलांनी मला जसा सपोर्ट केला तसा सगळ्याच मुलींचे वडील करू शकतील अस नाही. कारण भावकीचा दबाव आजूबाजूची स्थिती काहीही असू शकतील. पण ही भाषण चांगली परिस्थिती निर्माण करत नाहीयेत हे नक्की.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 05/29/2018 - 08:52 नवीन
अक्षदा, अपर्णाबाईंच्या कथनाचा गैरवापर केला तर त्याला अपर्णाबाई जबाबदार नाहीत. उद्या समजा त्या सासऱ्यांनी बंबईसे आया मेरा दोस्त चं गाणं वाजवलं, तर धर्मेंद्रला दोषी ठरवणार का? अपर्णाबाईंनीच सांगून ठेवलंय की त्यांच्या कथनाचा उद्देश मुलींनी ऐकावं हा आहे. बायको नवऱ्याचं मन वळवू शकते. पण बायकांना सांगायला कोणीच नाही. ही समस्या आहे. तुमच्या उदाहरणांत सुनेने नवऱ्याचं मन वळवून वेगळं घर केलं ते योग्यंच आहे. संसार टिकवण्यासाठी टोकाची पावलं उचलावी लागतात. वेगळी चूल मांडून अडचणी कमी झाल्या ना, मग त्याबद्दल अपर्णाबाईचं काहीच म्हणणं नाही. दोघांचा संसार सुखाने झाल्याशी कारण. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षदा
प
पिलीयन रायडर Tue, 05/29/2018 - 16:00 नवीन
कथनाचा गैरवापर असतो तसं मुळातच चुकीचं कथन असू शकत नाही का? नाही म्हणजे फारच गडबडलेलं विधान आहे हे! उलट अति लिटरल होणे हा प्रॉब्लेम आहे बैंचा! (मुलींना मुलासारखं वाढवणे वगैरे..) चर्चा वगैरे नाही करायची, आपली मतं ठाऊक आहेत. फक्त "बायकांना" कुणी काही स्पेसिफिकली सांगायची गरज नाही. जोडप्यांना वगैरे सांगा हवं तर. त्याचा बहुदा फायदा पण होईल आणि फुकट पोरींवरचं मोरल पोलिसिंग जरा कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 05/29/2018 - 16:38 नवीन
पिराताई, नेमकं मॉरल पोलिसिंगच करायचं आहे मुलींवर. (हां, ते फुकट मिळतंय म्हणून काहींना किंमत नसते.) याचं कारण असं की मुलींना सांगणारं कोणीच नाही. मुली आपापल्या नवऱ्यांच्या मागे लागून त्यांच्या गळी आपलं म्हणणं उतरवू शकतात. पण मुलींना सांगणारं कोणीच नाही. मुलींवर जे मॉरल पोलिसिंग होतं अगदी तस्संच मॉरल पोलिसिंग मुलींनी त्यांच्या नवऱ्यांवर करायचं असतं. पण ते थेट नवऱ्यांवर करता नाही येत. ते बायकोच्याच मुखातनं यावं लागतं. नाहीतर नवरे ऐकंत नाहीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 05/29/2018 - 16:42 नवीन
मुलींना सांगणारं कुणीच नाही?!!! असोच! चालू दे तुमचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 गुरुवार, 06/07/2018 - 13:15 नवीन
फक्त "बायकांना" कुणी काही स्पेसिफिकली सांगायची गरज नाही.
बायका, नवरे, सासू, सासरे, मूले, सुना, जावई, व्याही, जावा, नणंदा, दिर, भावजयी, आत्या, मामे, इ इ कोरमची पूर्तता झाल्याशिवाय कोणीही कोणास काहीही सांगू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अक्षदा Wed, 05/30/2018 - 14:21 नवीन
बायकांना सांगायला कोणीच नाही.. उलट सगळ जग काही झालं की बायकांनाच सांगायला येत बाई तुझा नवरा असा तूच त्याच्या मनासारखं वाग वाद घालू नको.. तो बरोबर असो चूक असो येऊन बायकोला मारहाण करत असो. तूच घे बाई सांभाळून तो नवरा आहे तो तसाच वागणार हा सूर असतो. घरगुती लेव्हल ला बघाल तर सर्व नातेवाईक येऊन त्या बाईला च सांगत असतात जाऊदेना तू नीट वाग सांभाळून घे. वरील उदाहरणात देखील सगळ्या नातेवाईकांनी त्या सूनेलाच येऊन सूनवल होत की नीट वाग, सासऱ्यांना वा नवऱ्याला नवते कोणी म्हणले की ती नवीन आहे समजून घ्या. त्यामुळे बायकांना सांगायला कोणीच नाही हा गैरसमज नसावा. सगळ घर बायकांनाच सांगत, नवऱ्याला नाही सांगत. त्याला काही बोलावं आणि त्याने अजून डोक्यात राग घालून काही केलं तर हे वरून पालुपद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पुंबा Tue, 05/29/2018 - 08:54 नवीन
रामतीर्थकरबैंची भाषणे ऐकणार्‍या लोकांमध्ये स्वतंत्र विचार करणार्‍या, कमावणार्‍या स्त्रीविषयी किती घृणा निर्माण होते याचा अनुभव मलादेखिल आला आहे. मुलींना मुळीच कॉलेजमध्ये जाऊ न देता, १८ वर्षे झाली की तिचे लग्न लावून दिले पाहिजे असे दीव्य विचार एका मित्राच्या उच्चपदस्थ वडिलांकडून गेल्या ३-४ वर्षांपुर्वी ऐकायला मिळाले. त्याच्या मागे रामतीर्थकरबैंची भाषणे आहेत असे मित्रांकडून कळले. काही घरात संस्कार म्हणून मुलींना हे व्हिडीओज ऐकवले जातात हेदेखिल ऐकून आहे. आपला अनुभव शेयर केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षदा
अ
अक्षदा Wed, 05/30/2018 - 14:08 नवीन
अगदी अगदी.. हे तर नेहमी होत. चांगलं आहे मुलींनी ऐकल पाहिजे हे पुढे जाऊन ह्या मुली पण अशाच वागल्या तर सासरी आमचं नाव नको जायला की संस्कार केले नाहीत.. अस बरच काही ऐकायला मिळते वर भाषणे ऐकवली जातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 गुरुवार, 06/07/2018 - 13:48 नवीन
त्याच्या मागे रामतीर्थकरबैंची भाषणे आहेत असे मित्रांकडून कळले.
उचलली जीभ लावली टाळाला. ती बाई स्वतः स्वतःच्या शिक्षणाचं बोर मारेस्तोर कौतुक करते. मुलिचे उच्च शिक्षण न होऊ तिचे लग्न करावे असं बाई म्हणाल्याचं कोण्या बाबाला कसं म्हणे ऐकू आलं?? ============================ मूर्ख लोकांनी मूर्ख अर्थ काढलेले वेगळे, पण पुरोगाम्यांना भास होणे आवश्यक आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ए
एमी Wed, 05/30/2018 - 14:48 नवीन
अक्षदा, तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे कौतुक वाटते _/\_ === तू फारच कळवळून प्रतिसाद दिला आहेस इथे पण त्याचा कितपत परिणाम होईल शंकाच आहे :( तुला नाउमेद करत नाहीय पण मराठी आंजावरचा एकंदर अनुभव हा असाच आहे... स्वतःला टॉप ५% म्हणत फिरणारे (जे खरंतर जास्तीजास्त उच्च मध्यम वर्गात येतात) इथले बायका आणि पुरुष. यांच्या शिक्षणात स्त्री असल्याने काही अडचणी येत नाहीत, शिक्षण घेऊनही या बायका आर्थिक स्वतंत्र रहात नाहीत, प्रोमोटही करत नाहीत, ४००००+ पगार - 2bhk - no dustbin असल्या अटी टाकून या लग्न करतात, त्यांना तसे बकरे मिळतातदेखील (कारण त्या बकऱ्यांसाठी आमटीत गुळ पडतो कि नाही हे अतिशय महत्वाचे असते), मग या कसबसे एकाध मुल जन्माला घालतात आणि जगावर उपकार केल्यासारखे 'होममेकर' म्हणून मिरवत फिरतात.... त्यांना स्वतःला "ग्रामीण भागात आता कुठे मुलीच शिक्षण वैगेरे लोक डोक्यात घेत आहेत पण ही असली भाषण ऐकून खरंच त्यांच्यावर परिणाम होतो आहे आणि तो निगेटिव्ह आहे हे नक्की. त्यामुळे कृपया करून ही भाषण योग्य वगैरे पसरवू नका. माझ्या गावात अनेक मुली आहेत ज्यांना दहावी नंतर फार तर एखादा मशीन क्लास करू दिला जातो व लगेच लग्न लावली जातात. खरी परिस्थिती फार भयानक आहे. मी पहिली मुलगी आहे आमच्या घरी जी ग्रज्यूएट होऊन जॉब करत आहे. हे फक्त माझे वडील गावात न राहता कामानिमित्त शहरात राहत आहेत म्हणून. ताई म्हणत आहेत तशा वागणर्या स्त्रियाही असतील की पण त्यामुळे अशा ओपन फोरम मध्ये जे काही वक्तव्य त्या करत आहेत ते योग्य अस मला वाटतं नाही. आताच्या फ्री इंटरनेटच्या जमान्यात ह्या अशा गोष्टी फार लवकर पसरत आहेत. आणि खरंच आपल्या पथ्यावर जे पडत आहे तेही खूप लवकर फेमस होत. ग्रामीण भागात मुलीच शिक्षण लग्नाचं वय या गोष्टीत अजून लोक म्हणावे तितके जागरूक नाहीत. अशात हे म्हणजे अनेक मुलींच्या शिक्षणात अडथळा ठरू शकतो. ही उदाहरणे सुद्धा मी पाहिली आहेत. माझ्या वडिलांच्या फोन मध्ये सुद्धा ही क्लिप त्या नातेवाईकांनी दिली होती. बाबांनी घरी येऊन ती वाजवली माझ्याकडे बागितल. मी मोबाईल उचलून क्लिप डिलीट केली. अजून काय सांगू. माझे उच्च शिक्षण मी कसे घेत आहे मला माहिती. नातेवाईकांनी माझ्या लग्नाचं टूम लावूनही माझ्या वडिलांनी मला जसा सपोर्ट केला तसा सगळ्याच मुलींचे वडील करू शकतील अस नाही. कारण भावकीचा दबाव आजूबाजूची स्थिती काहीही असू शकतील. पण ही भाषण चांगली परिस्थिती निर्माण करत नाहीयेत हे नक्की" हे दिसत नाही, सांगूनही झेपत/लक्षात रहात नाही, पांढरपेशा रामतीर्थंनकर बायका जालावर दिसत राहतात, त्यातल्या काहीजणी स्वतःला स्त्रीवादी समजतात, इतरजन त्यांना आदरणीय स्त्रीवादी म्हणतात, एकंदरच situation is hopeless. मिपा आणि ऐसीलातर मी कधीच उतरून टाकलंय आता थोडीफार भिस्त माबोवर आहे. कारण तिथे स्त्रियांनी आर्थिक स्वतंत्र असणे आणि 'दुसऱ्याच्या' घरी रहायला न जाणे याला aggressive support करणारे काहीजणतरी दिसतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षदा
ए
एमी Tue, 06/05/2018 - 23:46 नवीन
अक्षदा, तू सांगितली आहे साधारण तशीच केस https://www.maayboli.com/node/65776 इथेदेखील दिसतेय. प्रतिसाद वाच. बरेच प्रकार दिसतील. सासूच्या रुपातली रामतीर्थनकर, आईच्या रुपातली रामतीर्थनकर -> हा सगळ्यात डेंजर प्रकार असतो. यांना सगळ्यात पहिल्यांदा दूर ठेवायचं. वरवर पाहता हे आपली फार काळजी करतायत, आपला आनंद यांच्यासाठी महत्वाचा आहे वगैरे गैरसमज होऊ शकतात, होतातच. पण यांच्या सुचवण्यांचा एन्ड रिझल्ट रामतीर्थनकर बाईना जो हवा तोच असतो. एकवेळ सासूच्या रु. रा. परवडली पण हा दुसरा छुपा, न/कळत तेच अजेंडे राबवणारा, स्वघोषित स्त्रीवादी प्रकार जास्त डेंजरस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
ग
गामा पैलवान Wed, 06/06/2018 - 08:58 नवीन
अॅमी, स्वत:चा आनंद स्वत:च शोधता येत असेल तर रामतीर्थकर बाईंची गरज नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
प
पिशी अबोली गुरुवार, 06/07/2018 - 07:24 नवीन
अक्षदाताई, तुम्ही कळवळीने लिहिलेला प्रतिसाद खूप आत पोहोचला. या बाईंनी दिलेले आदर्श मुलींसमोर अगदी सुशिक्षितांना पटतात(शिक्षणाचा विचारांवर काही फरक पडत नाहीच. उलट मागासलेल्या विचारांना मुद्देसूद मुलामे देता येतात बऱ्याचवेळा). आणि स्वतंत्र विचारांच्या आणि कुणावरही कोणत्याच बाबतीत अवलंबून नसलेल्या मुलीला कौतुकापेक्षा बऱ्याचदा अखंड टीकाच सहन करावी लागते. तुम्हाला हे इथले प्रतिसाद वाचून त्रास होणं स्वाभाविक आहे, आणि तुम्ही मांडलेले मुद्दे अतिशय रास्त आहेत. पण जे चित्र तुम्हाला एक स्वतंत्र मुलगी म्हणून वावरताना जगात दिसतं, तेच इंटरनेटवर दिसणार. उलट इथे चेहरा दाखवायचा नसल्याने त्यातून अजून टोकाच्या भूमिका दिसणार हे गृहीत धरून चाला. याचा अर्थ विरोध करू नये असा मुळीच नाही, पण तुमच्या प्रतिसादातून तुम्हाला स्वतंत्र उभं राहण्यासाठी कराव्या लागत असलेल्या संघर्षाची कल्पना आहे म्हणून एवढाच सल्ला, की इथे कळफलक बडवणाऱ्या लोकांचा त्रास करून घेऊ नका. आणि इथे मनोऱ्यात बसलेले लोक तुम्हाला दोन्ही बाजूंना सापडतील. पण तुमची कळकळ ही तुमच्या स्वतःच्या संघर्षातून आलेली आहे, आणि तिला बरोबर-चूक, किंवा किती प्रमाणात बरोबर आणि किती प्रमाणात चूक अशी लेबलं कुणी लावू शकत नाही, एवढं नक्की लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षदा
प
पिशी अबोली गुरुवार, 06/07/2018 - 07:24 नवीन
*मुलींसमोर दिलेले आदर्श
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
श
श्वेता२४ गुरुवार, 06/07/2018 - 10:59 नवीन
अक्षता तुझं म्हणणे अगदी रास्त आहे. बऱ्याचदा लोकंचे जग व वृत्ती दोन्ही संकुचित असतात त्यामुळे अशा लोकांना अनुल्लेखाने मारावे या हेतूनेच मी इतके दिवस या मुद्यावर व्यक्त झाले नव्हते. पिशी अबोलीने जो सल्ला दिला आहे तो अत्यंत रास्त आहे. तुझा प्रतिसाद अत्यंत प्रामाणिक, स्वानुभवातून आलेला असल्याने मला लिहील्याशइवाय राहावलं नाही. बाकी परदु:ख शितळ एवढं लक्षात ठेव. तुझ्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
ग
गामा पैलवान गुरुवार, 06/07/2018 - 14:58 नवीन
श्वेता२४, एक गंमत दाखवतो. वर अॅमीताईंनी माबोवरचा धागा दिलाय ना तो हा आहे : https://www.maayboli.com/node/65776 त्याच्या खालचे पहिले चार प्रतिसाद अपर्णाबाईंचे वाटतील असेच आहेत. शेवटी मर्जी अपनी अपनी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
A
arunjoshi123 गुरुवार, 06/07/2018 - 14:00 नवीन
या बाईंनी दिलेले आदर्श मुलींसमोर अगदी सुशिक्षितांना पटतात(शिक्षणाचा विचारांवर काही फरक पडत नाहीच. उलट मागासलेल्या विचारांना मुद्देसूद मुलामे देता येतात बऱ्याचवेळा).
बाईंचे मुद्दे तुम्हाला पटत नसतील स्वतःस सुशिक्षित मानू नकात आणि इतरांस सुशिक्षित मागास मानू नकात. बाईंनी तथाकथित सुशिक्षित, आधुनिक, शहरी बायकांना दिलेले डोस कडवट असले तरी अत्यावश्यक आहेत. आईच्या अत्यंत लाडागोडात वाढलेल्या सुस्त मुलाला अचानक मिलिटरी स्कूलमध्ये टाकलं तर जसं होतं तसं अपर्णाताईंचं भाष्य ऐकताना तथाकथित शहरी, स्वतंत्र, पाश्चात्य, हिंदू संस्कृतीचा गंड असलेल्या, पुरोगामी, इ इ प्रकारच्या बायकांना होतं. यात आमचं मुद्देसुद मुलामा देण्याचं कौशल्य अजिबात नाही, केस ही बडी जेन्यूइन है जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
A
arunjoshi123 गुरुवार, 06/07/2018 - 13:02 नवीन
तुम्ही म्हणता तस ताईंच म्हणणं नसेलही.
आपण अत्यंत रास्त व्यक्ति आहात. एक वाईट केस प्रत्यक्ष पाहूनही या आपण असं म्हणू शकता. या वाक्यात आपणांस जे म्हणावयाचं ते म्हणू शकण्याची किमान पात्रता या धाग्यावर अनेक दाखवू शकलेले नाहीत. ========================================= अनेक गोष्टींच्या अनेक महान प्रवर्तकांचे आत्मे आज त्यांच्या चळवळींची झालेली गत पाहून रडत असतील. तिथे बाईंचा काय पाड? ======================================= व्हिक्टिमच्या बाजूचे बोल असलेल्या क्लिप्स देखिल बनवता येतील त्यांच्या भाषणातून. ===================================== छोटासा मुद्दा सांगायला बाई १५-२० मिनिटे किमान घेतात. या क्लिप्स वारंवार वाजवणारे लोक गंमतशीर असले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षदा
A
arunjoshi123 गुरुवार, 06/07/2018 - 13:42 नवीन
त्यामुळे कृपया करून ही भाषण योग्य वगैरे पसरवू नका.
अपर्णाताईंचं भाषण योग्यच आहे. या धाग्याचा विषय योग्यतेचा आहे. आणि ही भाषणं पसरणं आवश्यक आहे. एका मूर्खाने घटनेचा अर्थ मूर्खासारखा काढला (उदा घटनेने स्वातंत्र्य दिले आहे म्हणून मी एखाद्याचा खून करायचे स्वातंत्र्य घेत आहे,) तर घटना कॅन्सल करा म्हणणं चूक आहे. ================== त्यांनी क्लिप्स नीट ऐकल्या असतील तर स्त्रीवर हात उगारणे वा घराबाहेरचे अन्न खाणे या बद्दल ताईंचं काय म्हणणं आहे ते क्लिपमधून सासर्‍यांना ऐकवा. ईथल्या स्त्रीवाद्यांत आणि त्या सासर्‍याच्या क्लिपा ऐकण्याच्या पद्धतीत काहीही फरक नाही. ====================== यात नशीबाची किंवा तुमच्या भावाची चूक आहे. त्यानं तिला नंतर शेतकाम येईल असं गृहित धरलं किंवा येणार नाही हे पक्कं माहित असून लग्न केलं. सुनेनं घरातलं काम करावं ही अपेक्षा अजिबात चूकीची नाही. आजकालच्या बायकांना काम हेच अन्याय वाटतो. गावातले आईवडील शेत, गुरे सोडून शहरात जाऊन नवर्‍याने कॅब चालवायची असा त्यांचा हेका चाललेला असतो. अर्थातच आईवडीलांचा याला प्रचंड विरोध असतो म्हणून घरात अस्वस्थता असते. यात बाईंचा काय संबंध? ================================= मिपा सोडून ह्या बाई कोणालाही माहीत असल्याचे पाहिले नाही. इतक्या क्लिप्स व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यात पण ही दिसली नाही. ============================= एकवेळ ग्रामीण भागात, जिथे अगोदरच स्त्रीयांवर क्कमी जास्त अन्याय होतो अशी कल्पना आहे तिथे आपलं म्हणणं बरोबर आहे. पण ज्यांना बाइंचं म्हणणं झोंबतं त्या शहरी बायकांसाठी या व्हिडिओंचा प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षदा
आ
आबा Mon, 06/04/2018 - 18:54 नवीन
मुली शिकू लागल्या की संघीय गोटात अस्वस्थता पसरणार हे नैसर्गीकच आहे.. शिक्षणासारखा बेसीक हक्क सुद्धा मुलींना नसावा असे मत असणार्या महाभागांना आपण प्रिविलेज्ड क्लास मध्ये येतो, आणि आपल्या प्रगती मधे आपले शूण्य कतृत्व आहे.. हे समजण्याची सुतराम शक्यता नाही.. यांच्या मुली-बाळीच पुढे जाउन यांना धडे शिकवतील
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 06/04/2018 - 23:57 नवीन
मुली गेले ७० वर्षं शिकताहेत. संघ गेले ९० वर्षं अस्तित्वात आहे. कसली आलीये डोंबलाची अस्वस्थता! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
म
माहितगार Tue, 06/05/2018 - 07:18 नवीन
श्रीमान गा.पै. कुठे आहात ? मुली भारताला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीच शिकु लागल्या ( स्वातंत्र्यानम्तर प्रमाण वाढले असणारे ह सहाजिक) . सावित्री बाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा १८४८ मध्ये काढली. त्याला आता अदमासे १७० वर्षे झाली असावीत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 06/05/2018 - 08:36 नवीन
माहितगार, अगदी बरोबर बोलत पहा. संघाच्या आधीपासून मुली शिकंत होत्या. त्यामुळे संघाला अस्वस्थता यायचं कारणंच काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
A
arunjoshi123 गुरुवार, 06/07/2018 - 13:05 नवीन
संघीय गोटात अस्वस्थता
आजच संघाचा विटाळ संपला म्हणून इतर सर्व गोटांत मुलखाची अस्वस्थता पसरली आहे. काही मात्र अजून नशेतच दिसताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा