Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

क
कोंबडी प्रेमी
Fri, 07/21/2017 - 14:17
🗣 445 प्रतिसाद
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
143577 वाचन

💬 प्रतिसाद (445)
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 10:55 नवीन
वेल, तुम्हाला वेळ नाही, रस नाही हा भाग वेगळा, पण याच विषयावर तिची मूल्य (असह्य) वेगळी आहेत म्हणून त्या क्लिप्स पाहूच शकत असणार्‍या बायका पाहून मनोरंजन झालं. डोळ्यासमोर एक क्लिप तरळलि. ======================= आपल्या आजूबाजूचे लोक हे एका विशिष्ट प्रमाणाच्या पुढे तार्कीक, बुद्धिमान, सुशिक्षित, रॅशनल, अनालीटिकल, नैतिक, मॅनर्ड, शिष्ट, इ इ असावे हा काय दुराग्रह आहे? इतकं सगळं असलं तरच आम्ही तुम्हाला एंटरटेन करणार, नाहितर नाही. अरे काय प्रयोगशाळेत बसला आहात का जीवन जगत आहात? तुमची लेकरं पण तुम्हाला एखादं इल्लॉजिकल विधानं म्हणाली तर त्याला कल्प्नाविश्वात रमू न देता लगोलग करेक्ट करता कि काय? चिल्ड्रेन आरे सपोज्ड टू बी अबसर्ड टू सम एक्सटेंट. People are supposed to be illogical, irrational, absurd, idiosyncratic, clumsy, ill-mannered, illiterate, unethical, immoral, negative, etc. We should allow people to have these qualities and should still entertain them till a threshold. हि थ्रेशोल्ड अगदी खूप खाली आणणं चूक असावं. ================ व्यक्तिची तर्कशक्ती, बुद्धिमत्ता इ इ हे त्याला किती एंटरटेन करायचं याचे कसे निकष होऊ शकतात? माझ्या मते हे रेसिझम, जातियवाद यांच्यासारखंचं क्रूर आहे. कारण तर्कबुद्धी इ इ ईश्वरदत्त असतात ( किंवा नैसर्गिक, जे काय सोयिचं), हातात नसतात माणसाच्या. त्यामुळे या निकषांवर लोकांना कमी लेखणं, कमि सन्मान देणं, आदर न करणं, इ इ क्रूर असावं. त्यामुळे विचार न स्वीकारणं इ इ योग्यच आहे, पण नुसतं ऐकायचं म्हटलं तर शिसारी? ================ या प्रतिसादाशी कंसिस्टंट राहाण्यासाठी, तुमच्या अव्हर्जनची पण थोडीशीस्विकती.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 11:04 नवीन
एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
सुरुवातीलाच बजावतात, एके ठीकाणी नाही. ========================================= स्त्रीवाद्यांना मंचावर गोंधळ घालू नये, किंवा अगदी सभ्य प्रगल्भ वाद ही घालू नये अशी त्यांची इच्छा दिसते. ज्यांना पटेल त्यांना परंपरावादाचे, धर्माचे महत्त्व सांगायचा त्यांचा हेतू दिसतो. स्त्रीवाद्यांसोबत वादाचे, संवादाचे, विवादाचे अनुभव कटू असावेत, कदाचित अयशस्वीही असावते.
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 12:00 नवीन
एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात हे त्यांच्या अनेक क्लिप्स किंवा क्लिप्सचे जे तुकडे फिरत आहेत त्यांच्या पैकी एका तुकड्याच्या सुरुवातीला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ग
गामा पैलवान Mon, 07/24/2017 - 11:17 नवीन
पिराताई,
हे कोण टिकोजीराव लागुन गेलेत लोक जे सांगणार की कुणाच्या भुमिका काय? मी माझं पाहिन की.
माझं मी पाहीन की! यू सेड इट!!! नेमकं हेच हल्लीच्या अनेक जोडप्यांना पाहता येत नाहीये. म्हणूनंच तर ते अपर्णाबाईंकडे जाताहेत. अशा वेळेस बाईंना शून्यातून सुरुवात करावी लागते. एकदम मोठी आकडेमोड करता येत नाही. छोटेछोटे पाढे अगोदर घोटवून घ्यावे लागतात. पाढे म्हणतांना का हा प्रश्न विचारायचा नसतो. ते फक्त पाठ करायचे असतात. ते मन लावून केल्यास हळूहळू एकेक आकडा ओळखीचा होऊ लागतो. मग एकशेएकसष्ट म्हणजे तेवीसची सातपट हे आपोआप उमजू लागतं. क्यालक्युलेट्राची बटनं दाबंत बसायची वेळ येत नाही. अपर्णाबाईंचा सल्ला स्वत:चं स्वत: पाहता येणाऱ्यांसाठी नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 07/24/2017 - 12:43 नवीन
पाढे म्हणतांना का हा प्रश्न विचारायचा नसतो.
चूक. पाढे शिकताना 'का' हा प्रश्न विचारायचाच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ज
जेनी... Tue, 07/25/2017 - 14:22 नवीन
अहो आबा ते पाढे ' म्हणताना ' म्हणतायत .. तुम्ही ' शिकताना ' म्हणताय ... मला तर दोन्ही बरोबर वाटतय ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 11:17 नवीन
काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे.
फार भारी वाक्य वाटतं वाचायला, पण एकदम खोखलं आहे. म्हणजे, उद्या दलितांनी ब्राह्मणांना मारायला सुरुवात केली तर ती सामाजिक प्रतिक्रिया? अशी अतिरेकी प्रतिक्रीया दिसते का आजूबाजूला? स्त्रीयांपेक्षा दलितांवर जास्त तीव्र अन्याय झाले ना? मग ती प्रतिक्रिया तर अजून ठळक दिसायला पाहिजे! पण असं काही होताना दिसत नाही. समाज मंजे काय न्यूटनच्या प्रयोगातली रिजीड वॉल आहे का मॅथेमॅटिकल रिअ‍ॅक्शन द्यायला? रिअ‍ॅक्शन द्यायला हजारो वर्षे का म्हणे लागली? आत्ता काय झालं म्हणे ज्यामुले एकदम रिअ‍ॅक्शन वैगेरे देणं चालू झालं? कशाचा नाईलाज, पापं झाकायला कुठलेही दाखले द्यायचे!
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 12:02 नवीन
ह्या व्यमिश्रतेच्या उत्कलन बिंदू वर आहेत त्यामुळे आपण स्वत: किंवा इतर कुणी जरा इस्कटून सांगितल तर पुढे बोलता येईल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 12:33 नवीन
व्यामिश्रतेच्या उत्कलनबिंदूवरून उतरून सरलतेच्या बाष्पीभवनबिंदूला येऊन सांगतो - ऐतिहासिक सामाजिक अन्यायाची प्रतिक्रिया म्हणून लोक आता वाईट वागत नाहीत. वाईट वागायला आत्ता जिवंत असलेलं कारण असलं पाहिजे. म्हणून त्या प्रकारच्या इतिहासात अन्याय झालेल्या लोकांनी आत्ताची पापं झाकायला इतिहासातल्या अन्यायाचे दाखले देऊ नयेत. उदा. १. आरक्षण आपण "आज" दलितांची स्थिती सुधारावी म्हणून ठेवतो, मागच्या अन्यायाचा बदला म्हणून सवर्णांना नोकर्‍यांवरून काढत नाही. २. मुसलमान राजांनी मागे अन्याय केले म्हणून मुसलमानांना आत्ता बघून घेतले पाहिजे असे आपण म्हणत नाही. "आज" त्यांचं वागणं १९४७ च्या पेक्षा रिस्कि आहे का इतकं पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 11:23 नवीन
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
ज्यांनी क्लिप पाहिलि नाही ते मिसगाईड होतील. मुलाला शब्दही बोलल्या नाहीत असं यांनी का लिहिलं देवं जाणो!! पण समजा नाहीतही तरी फरक पडत नाही. मुलगी म्हणते गरोदरपणात माझी किती पगार बुडते आणि अपर्णाताई म्हणतात असल्या मशिनला मी मूल देणार नाही. या उदाहरणात तुम्ही त्या मशिनच्या विरोधात काहीच न बोलता अपर्णाताईच्या विरोधात बोलता हे देखिल एक नवल आहे.
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 12:07 नवीन
ज्यांनी क्लिप पाहिलि नाही ते मिसगाईड होतील. --त्यांनी क्लिप आधी बघावी मुलाला शब्दही बोलल्या नाहीत असं यांनी का लिहिलं देवं जाणो!! --त्यांनी क्लिप आधी बघावी पण समजा नाहीतही तरी फरक पडत नाही. मुलगी म्हणते गरोदरपणात माझी किती पगार बुडते आणि अपर्णाताई म्हणतात असल्या मशिनला मी मूल देणार नाही. या उदाहरणात तुम्ही त्या मशिनच्या विरोधात काहीच न बोलता अपर्णाताईच्या विरोधात बोलता हे देखिल एक नवल आहे. --म्हणजे ह्यात मशीन ती मुलगी आहे का जोडपे ? माझ्या मते ते जोडपे! ..पण अपर्णाताई अक्कल शिकवतात ती त्या मुलीला ..मातृत्व हे वरदान आहे दिव्य आहे (किंवा ह्याच धर्तीवर चे काहीतरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 13:00 नवीन
मुलगी का जोडपे? जोडपे? जोडपे का कुटुंब? कुटुंब! माझ्यामते त्यांनी जोडप्यांच्या आईबापाला, भाऊ बहिणांना देखिल बोलायला पाहिजे. का नाही? कुटुंब कि समाज? समाज! शेवटची मटेरियालिझम तिने समाजातूनच उचलला. अपर्णाताई, इतक्या लोकांना तिला एकटिला कशा बोलू शकतात! नै का? ===================== काये, तिचं उत्पन्न मुल झाल्यानं बुडणार. असं व्हावं का नाही हा निर्णय नवर्‍याने घेतला असता तरी "निर्णय लादणारा नवरा" म्हणून बडवला गेला असताच. आता बाजूला उभा राहिला म्हणून बडवला जावा अशी अपेक्षा दिसतेय. अपर्णाताईंचं स्पष्ट मत दिसतं कि जग खड्ड्यात जाओ, स्त्रीचं आई होणं सगळ्यात महान आहे. सबब मुलीच्या आई बनण्याच्या इच्छेला विरोध केला असता तरच अपर्णाताई त्याला "बोलल्या" असत्या. पण असं काही नाही ना? ===================== बाय द वे, त्याला काय बोलायला हवं होतं? अरे कशाला मरायला दत्तक घेत आहेस "बायकोच्या गरोदरपणाच्या काळातले पैसे वाचवायला?" हेच ना? नै, म्हणजे यानं हे सिद्ध होईल कि आपण बायकांनी करियर सोडून मुल बघायला पाहिजे असं आपलं मत आहे. असं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी
प
पिशी अबोली Mon, 07/24/2017 - 11:26 नवीन
५ मिनिटांवर ऐकवत नाही यांचं म्हणजे सात्विक ढिन्चॅक पूजा दिसतात या तर!
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Mon, 07/24/2017 - 11:37 नवीन
यांची काही मते पटत नसली तरी एंटरटेनमेंट बघून बघू शकतो. दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय पहिली बाजू समजावून सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 12:46 नवीन
दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय पहिली बाजू समजावून सांगता येत नाही.
प्रतिक्रियांचे इतके बेसिक नियम माहित नसून हेच लोक त्या तथाकथित हजारो बर्षांच्या पिढ्यान पिढ्यांच्या अन्यायाबद्दल बोलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 11:50 नवीन
पहिला भयंकर बोअर आहे. दुसरा ओके. तिसरा ते सातवा किमान एकदा तरी ऐकावेत. डायरेक्ट तिसरा चौथा चालू केला तरी फरक पडत नाही. मी अगोदर ४ ते ७ पाहिले, मग १ ते ३. ======================== बायकांनी अवश्य ऐकावेत. दोन स्त्रीयांमधे काय काय नाती असू शकतात आणि त्या प्रेत्यक नात्यात काय वर्तन असायला पाहिजेत हे असलं कंटेंट एकमेव इथे आहे. ऐकायला लई भारी आहे. तुम्ही या सगळ्या पलिकडचे असाल इ इ तर त्यांचे विनोदमूल्य देखिल चूकवू नये. शिवाय त्या "पुरुषांना अक्कल नसते. ते प्रत्येक गोस्ष्ट बायकांना विचारू करतात." इ इ सांगत होत्या तेव्हा मला तो "मातृ मोड" कामाचा वाटला. त्यांनी सांगितलेलं साला ते पर्स्सनल लाइफ मधे फिट्ट बसतं.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 11:58 नवीन
साला मिसळपाव म्हणजे ब्लॅकहोल आहे. एकदा प्रतिसाद आत गेला मंजे कायमचा गेला. त्यातला आकार उकार देखिल दुरुस्त करता येत नाही. लोकांना कळायचे वांदे.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 07/24/2017 - 12:16 नवीन
हाहाहा! त्या वरील प्रतिसादातील साला बद्दल का? समजून घेतले आम्ही ते सल्ला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
अ
अप्पा जोगळेकर Mon, 07/24/2017 - 12:51 नवीन
काय ठरल मग ?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 07/24/2017 - 13:06 नवीन
इतक्या लवकर? अजून लय किस (खिस) पडायचा बाकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
न
नीलमोहर Mon, 07/24/2017 - 12:55 नवीन
या सगळ्यात कामाचा एकच शब्द दिसला 'भाकरी', विषय निघालाच आहे तर कृपया कुणीतरी छान पापुद्रा सुटलेली पातळ भाकरी कशी करायची याचीही कृती द्या. आणि भाकरी बडवण्याची नको, करण्याची कृति हवी हां प्लीज, धन्यवाद. ती भाकरीच एक (बडवायला) जमत नाही, तीही बाकी कुणासाठी जाऊदे, स्वतःला आवडते म्हणून करायचीय,
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Mon, 07/24/2017 - 14:13 नवीन
मलाही खूप आवडते भाकरी. मी रोजच बदडते भाकरी. तर पापुद्रा सुटलेल्या भाकरीची कृती- पीठ कोमट पाण्यात भिजवावं आणि हाताच्या तळव्यांनी खूप रगडाव म्हणजे छान होते भाकरी आणि पापुद्राही सुटतो तिचा. सॉरी ह कोंबडी धागा वर अवांतर गप्पा सुरु झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
आ
आदूबाळ Mon, 07/24/2017 - 14:19 नवीन
समजा शेगडी (हॉब) नसेल तर कशी करायची याबद्दल काही टिप आहे का? ओव्हनमध्ये होईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
त
त्रिवेणी Mon, 07/24/2017 - 14:38 नवीन
नाही हो हॉब ची कल्पना नाय आम्हा गरिबांना, साधी शेगडी आहे आमच्याकडे आणि ओव्हन मध्ये पापड भाजण्यासारख्या कठीण रेसिपी करते मी फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 07/24/2017 - 14:49 नवीन
नाय हो - हॉब (म्हणजे शेगडी) नैये. हॉट प्लेट आहे. भाकरी भाजायला ज्वाळा लागतील. त्या कुठून आणायच्या याच्या विचारात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
स
सामान्य वाचक Mon, 07/24/2017 - 16:31 नवीन
म्हणजे पोळीसारखी . थेट ज्वाळांवर नाही भाजले तरी होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 07/24/2017 - 17:20 नवीन
पोळीसारखी म्हणजे तेवढी पातळ? नाही हो - भाकरी कशी सणसणीत जाड पायजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
र
रुपी Mon, 07/24/2017 - 21:59 नवीन
आदूबाळ, तुम्ही हे वापरुन बघू शकता. फुलके करण्यासाठीही फार उपयुक्त आहे. सा.वा.नी लिहिलंय तसं पोळीसारखी तव्यावरही भाजू शकता. पातळ करायची गरज नाही. जी बाजू शेगडीवर धरायची असते, ती तव्यावर टाकून सुती कापडाने एकेका भागावर थोडासा दाब देऊन देऊन भाजायची, छान पापुद्रा निघतो भाकरीचा. शिवाय भाकरीचे पीठ दुकानातून आणलेले कधीकधी फार जुने असते, त्याच्या चांगल्या भाकरी होत नाहीत. त्यात थोडेसे गव्हाचे पीठ मिसळायचे आणि भिजवायला गरम पाणी वापरायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पिलीयन रायडर Mon, 07/24/2017 - 22:15 नवीन
ही चर्चा जास्त उपयुक्त आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
A
arunjoshi123 Tue, 07/25/2017 - 08:05 नवीन
भाकरी कशी बनवावी ही चर्चा मराठी लोकांच्या संकेतस्थळावर व्हावी ही गोष्ट लज्जास्पद आहे. माझ्या कोअर अशा मराठी असण्याच्या ओळखींशि भाकरी हा शब्द अगदी केंद्रात येत असावा. ==================== सबब प्रतिसाद नियमित (९५%+) पोळी खाणार्‍या माझ्यासारख्या लोकांना डिवचण्यासाठी दिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आदूबाळ Tue, 07/25/2017 - 08:19 नवीन
तुमचा चष्मा ज्या रंगाचा आहे तसं जग दिसतं, अजो. वरची सगळी चर्चा 'भाकरी बनवणे थापणे 101' या प्रकारचं गाईड नाही. वरच्या सगळ्या माऊल्यांना भाकरी थापता येते याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. चर्चा आहे 'विशिष्ट constraints मध्ये भाकरी कशी थापावी' यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सस्नेह Tue, 07/25/2017 - 08:34 नवीन
भाकरी 'थापणे' नव्हे हो आबा, भाकरी 'बडवणे' !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 07/25/2017 - 08:53 नवीन
बडवणे is derogatory.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Tue, 07/25/2017 - 13:19 नवीन
correct ! त्यांचा हेतू तसाच वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
त
त्रिवेणी Tue, 07/25/2017 - 07:47 नवीन
बघा किती मी अज्ञानी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 13:10 नवीन
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ?
उगंच आपलं काय बी. अपर्णाताईंनी सगळेच पर्न्यूटेशन्स काँबिनेशन्स सांगीतले नाहीत. एकुलता एक मुलगा हि केस कवर केली आहे. एकुलती एक मुलगी हि केस कवरच केली नाही. पण मंजे त्या केस मधे त्या काही "टेरिबल" करत आहेत असा उगंच काय म्हणायचं? तुम्ही असं इंप्रेशन देताय की एकुलत्या एक मुलीच्या केसमधे त्या काहीतरी विचित्र सांगताहेत, जे काही खरं नाही. त्या फक्त त्यांची स्वतःचीच केस सांगत असतात असं लार्जली दिसतं.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 13:21 नवीन
ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
इथे पण तुम्ही अर्धवट माहीती देऊन वाचकांना मिसलिड करत आहात. मुळात खोटे बोलणे हा उद्देश नाही, पण सासू मला फोन करते, खास माझ्याकरिता सवता फोन करते असे इंप्रेशन सुनांना द्यावे, असे त्या म्हणत आहेत. हे इंप्रेशन तिथेच लांब बोल्लून मुलगा घालवेल म्हणून त्याला ऑफिसातून बोलायला सांगतात. हे खोटं बोलणं हार्मलेस आणि बेनेव्होलेंट आहे. घरातल्या सर्व बायकांचे परस्परसंबंध गोड असावेत याकरिता एक पायरी पुढे जावी असं त्या सांगताहेत.
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 14:44 नवीन
हे खोटे बोलणे नाही ? कशासाठी इतके खोटे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
र
रेवती Mon, 07/24/2017 - 15:01 नवीन
हे खरे की खोटे यात पडण्यापेक्षा मुदलातली गोष्ट ही आहे की नव्या सुनांना (जावयांबद्दल वेगळ्या धाग्यावर बोलू) पूर्वीच्या सुनांसारखा त्या घरात रुळायला वर्षानुवर्षाचा वेळ उपलब्ध नसतो. नव्या घरात रुळण्यासाठी हाडाची काडं करायला व स्वत:ला सिद्ध करायलाही वेळ नसतो. दिवस बदललेत. त्यांना रुळण्याची जशी गरज आहे तशी सासरच्या लोकांनाही नव्या सदस्यास रुळवून घेण्याची गरज आहे. याला हात पुढे करणे म्हणतात. पूर्वी नव्या सुनेस महत्व देण्याची गरज भासत नव्हती. सत्रा पोरे व त्यांच्या सत्रा बायका असत. आता एक नाही तर दोन मुलगे आणि त्यांच्या तेवढ्याच बायका! माझ्या वहिन्या नव्या असताना मी फक्त त्यांच्यासाठी त्यांच्या सेलफोनवर बोलत असे. त्यावेळी संभाषणात फक्त त्यांना मह्त्व दिले होते. मी असे करणार हे भावांच्या लग्नाआधीच आईवडिलांना सांगितल्याने त्यांना चुकवून काहीतरी करतिये हा प्रकार नव्हता. खात्रीने सांगते की त्या फार्फार खूष झाल्या. माहेरी एकुलत्या मुली असतात, फारतर आणखी एक बहिण पण त्यांनाही मुलाइतकेच महत्व देऊन वाढवलेले असते. सासरी त्यांना कोणी असे विचारले की बरे वाटते. माझ्या भावावरील प्रेम मला व्यक्त करायचे असल्यास त्याच्या बायको मुलांवर मी ते करू शकते. तीच गिफ्ट, आणखी कोणतीही नाही. आपल्या मुलावरील, मुलीवरील प्रेम त्यांच्या लग्नानंतर व्यक्त करताना आधी त्यांच्या जोडीदाराची दखल घेतल्यास चांगल्या अर्थी फरक पडतो. रामतिर्थकरबाई त्याबद्दलच म्हणतायत. सगळे त्यांनी सांगितलेले फॉलो करायला नको. आपण आपल्याला पटेल असे वळवून घेऊ की! त्या बाईंनीही विचार करायला हवा की आज इतके लोक्स आपल्याला ऐकतायत तर प्रत्येक उदाहरण योग्य शब्दात द्यावे म्हणजे गैरसमज होऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 15:05 नवीन
नि:पक्ष प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 07/24/2017 - 15:45 नवीन
प्रतिसाद आवडला, बहुतांशी सहमत! साधारणपणे हेच सांगायचं प्रयत्न वर करून पहिला. त्यांच्या बोलण्यामागचा उद्देश बदलल्याने त्यांच्या वाक्याचा अर्थ बदलतोय!
काही मते आत्यंतिक वाटली तरी मतितार्थ लक्षात घेऊन अशी मते दुर्लक्ष करणे मी वैयक्तिकरित्या पसंत करेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पिलीयन रायडर Mon, 07/24/2017 - 16:06 नवीन
जगातल्या प्रत्येक गोष्टीतुन एक चांगला अर्थ काढता येतो. हिटलरच्या वागण्यातुनही जाज्वल्य राष्ट्रभक्ती अशीच पाहिली जाऊ शकतेच की. प्रश्न तुम्ही ओव्हरऑल काय सांगताय हा आहे. बाईंचे १००% म्हणणे टाकाऊ आहे असं कुठेय? जगात १००% टाकाऊ काहीच नसते. पण म्हणुन तुम्ही लोक त्या चार दोन मुद्द्यांखाली बाईंचे बाकीचे चुकीचे मुद्दे लपवु नकात ना. अवांतर - जसे टोकाच्या स्त्रीवादाला फेमिनाझी म्हणले जाते, तसे स्त्रियांवर अन्याय झालाच नाही असे म्हणणे. किंवा स्त्रीयांच्या समस्यांबद्दल चर्चा चालु असताना "पण बायका सुद्धा चूक वागतात" असे म्हणुन समस्यांना नाकारण्याचा प्रयत्न करणे, कायद्याचा दुरुपयोग होतो ह्या आरड्या ओरड्याखाली मुदलात कायदा करण्याची वेळ आपल्या देशात आहेच आणि बहुतांश वेळा तो कायदा योग्य कारणासाठी वापरावा लागतोय ह्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणे हया प्रकाराला काय नाव द्यावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 16:18 नवीन
हिटलरच्या वागण्यातुनही जाज्वल्य राष्ट्रभक्ती अशीच पाहिली जाऊ शकतेच की.
तर्कशास्त्राचा प्रथमोल्लेख आपणच केलेलात. हिटलर राष्ट्रवादी होता म्हणून प्रत्येक राष्ट्रवादी हिटलर नसतो असा त्याचा एक नियम आहे. सबब तर्कशास्त्र असे वापरू नये.
यांच्या समस्यांबद्दल चर्चा चालु असताना "पण बायका सुद्धा चूक वागतात" असे म्हणुन समस्यांना नाकारण्याचा प्रयत्न करणे
सॉरी, त्या स्त्रीयांच्या समस्या या विषयाबद्दल बोलतच नाहीत. उलट त्या ज्या विषयावर बोलत आहेत (संस्कृती, कुटुंबव्यवस्था, गृहसौख्य, नाति, इ इ) मधे आपण फुकाच स्त्रीयांच्या समस्या घुसडत आहात.
कायद्याचा दुरुपयोग होतो ह्या आरड्या ओरड्याखाली मुदलात कायदा करण्याची वेळ आपल्या देशात आहेच आणि बहुतांश वेळा तो कायदा योग्य कारणासाठी वापरावा लागतोय
असं अजिबात नाही. कायदा आणि कायद्या दुरुपयोग हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. दोन्हीसाठी लोकांनी बोललं पाहिजे. कायदा निरुपयुक्त आहे असं त्या म्हणत नाहीत. त्यांनी पाहिलेल्या कायद्याच्या दुरुपयोगाच्या केसेस त्या मांडतात आणि अशी दुर्वर्तनं करणार्‍या स्त्रीयांनी ती करू नयेत असं म्हणतात. ==================== आय थिंक पिपल हेअर आर हायली बाय्स्ड इन जजींग हर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 16:22 नवीन
आय थिंक सम पिपल हेअर आर हायली बाय्स्ड इन सपोर्टिंग हर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पिलीयन रायडर Mon, 07/24/2017 - 16:29 नवीन
१. अपर्णाबाईंच्या काही मुद्द्यांमध्ये तथ्य असु शकते, पण म्हणुन त्यांच्या प्रत्येक मुद्द्यात तथ्य असेलच असे नाही. हे ही तर्कशास्त्रच सांगते. २. तो मुद्दा अपर्णाबैंना लागु नव्हताच, आपणच अपर्णाबाईंना मध्येच घुसडत आहात. तस्मात घाई करु नकात. नीट वाचा. ३. पुन्हा एकदा, नीट वाचा. ही दोन्ही वाक्ये प्रतिवाद चालु असताना वारंवार दिसणार्‍या वृत्तीला आहेत. अपर्णाबाईंचा त्याच्याशी संबंध नाही. ह्या (किंवा अशा प्रकारच्या) चर्चेतल्या लोकांचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 16:41 नवीन
आपणही नीट वाचा अशी विनंती, ही उपचर्चा थेट अपर्णाताईंच्या स्वतःच्या (मी ऐकलेल्या, इथे यांनी लेखात कोटलेल्या) विधानावरून झाली आहे. मधे अन्य कोणाचाही उल्लेख नाही. ============ मी इथे "सोशल मीडियावरील जनरल कंटेंटचा" डिफेन्स करत नाहीये. लेखिकेने १००% अपर्णाताईंना क्वोट केलेलं आहे. आणि मी फक्त त्याच विधानांबद्दल बोलतोय जि मी स्वतः ऐकली आहेत त्यांच्या भाषणात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
र
रेवती Mon, 07/24/2017 - 16:15 नवीन
हातोळकरसाहेब, वाक्यातील मर्म जाणून घेऊन बाकीचे दुर्लक्षित करणे योग्य आहे पण त्या बाई जे धडाधड बोलत चालल्यात त्यातून अजूनही जास्त टक्के लोकांना जे समोर बोलतायत तेच खरे वाटायची शक्यता सर्वाधिक आहे. आपलं डोकं लावून त्यातून योग्य अर्थ काढणे, तो आपल्या परिस्थितीला जोडतानाचे बदल करणे वगैरे करत बसत नाहीत. "हां, आता अपर्णाबाई म्हणतायत ना, कर तू भाकरी गोल, नको विंचरूस तू तुझे केस, शिकू नकोस, किंवा शिकलीस तरी घरातच बैस" वगैरे. त्यामुळे वक्त्याने जबाबदारीचे भान ठेवायला हवे. आज आपण बोलतोय ते तसेच्या तसे अप्लाय झाले तर त्यातून त्या कुटुंबाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. एखादे चुकिचे मत घेऊन महिला जर "मी आई आहे, माझे फक्त ऐकायचे" असे सारखे करायला लागली कसे व्हायचे? काही महिन्यांपूर्वी खफवर यांचा विषय निघाला होता. परदेशी राहणार्‍या मुलांवर यांनी असेच तोफगोळे डागले. त्या इतक्या अद्वातद्वा बोलत होत्या की यांच्या भाषणांवर आक्षेप का घेऊ नये? असा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 16:32 नवीन
चला हे संभव आहे असं मानू. ========================================= पण हे पुरोगाम्यांच्या भडक प्रसारामुळं देखिल होत नाही का? म्हणजे यांच्या प्रसाराचे जे संभाव्य दुस्पपरिणाम अविचारी लोकांत संभव आहेत, तेच कडक स्त्रीवाद्यांच्या विचारांचे अतिविचारी लोकांवर होतात. म्हणून स्त्रीवाद थांबवायचा? १. ४० वर्शांपर्यंत लग्न न करणार्‍या करियर महर्षी बायका. २. मला बंधनं नकोतच म्हणून मुक्त संबंध ठेवणार्‍या बायका. ३. मुलाला पाळणाघरातच सडवणार्‍या बायका ४. मला लग्नच नको, मुलेच नको म्हणणार्‍या बायका ५. समानतेच्या हक्कापोटी सगळे संबंध नासवून बसलेल्या बायका ६. जळि स्थळी काष्ठी पाषाणी पुरूषांचे अन्याय पाहणार्‍या बायका ७. नोकरी सोडावी लागेल म्हणून बदली झालेल्या पतिला डच्चू देणार्‍या किंवा कायमचेच दूर राहणार्‍या बायका ८. प्रॉपर्ती विभागायची म्हणून विकायला लावणार्‍या बायका ९. सासरा, सासू वृद्धाश्रमात पाठवणार्‍या बायका १०. नवर्‍याकडून एक किमान सुखासिनता नाही मिळाली तर त्याचे जीवन त्राही करून सोडणार्‍या बायका ही सगळी उत्पत्ती स्त्रीवादाच्या हिरिरिने केलेल्या प्रचाराची नाही का? ओवरड्राइव म्हणा. पण ज्यांचा सदुद्देश असेल त्यांना स्त्रीवादाच्या मूलभूत प्रसारापासून कसे परावृत्त करता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Mon, 07/24/2017 - 18:12 नवीन
असे जर पुरोगाम्यांकडून होत असेल तर त्याही बाबतीत तोच उपाय लागू आहे. डोके चालवा व आपण कुठे थांबणे आवश्यक आहे हे ओळखा. १. त्यांना चाळीस नै चारशे वर्षांपर्यंत लग्न करायचे नाही तर त्यांचा प्रश्न आहे. २. स्त्रीने मुक्त संबंध ठेवताना पुरुष पार्टनर लागतो हे लक्षात घेणे (किंवा उलटही). आता तो अविवाहित व सज्ञान असेल, करियरमुळे आत्ताच लग्न नको असेल, करायचेच नसेल तर ती त्यांची गरज आहे म्हणून सोडून द्या. जर बाईने विवाहित (व त्या अर्थी सुखी) पुरुषाबरोबर गळेपडूपणा केला तर ते वाईटच की! त्या बुवानेही आपले लग्न वाचवण्यासाठी आटापिटा करायला हवा. आज महिला घराबाहेर पडताना रोज स्वसुरक्षेचा विचार करतात. अगदी रस्त्यावरील सुरक्षिततता ते सार्वजनिक वाहनव्यवस्था, हापिसातील सुरक्षितता. तसा पुरुषांना तितक्या टक्के प्रमाणात करावा लागत नाही म्हणून ते अजूनही बर्‍या अवस्थेत आहेत म्हणायला हवे. (वाईट तर आहेच पण तरी त्यातल्यात्यात) ३. आपल्याकडे वर्क फ्रॉम होमचा पर्याय जेंव्हा आणखी वाढेल तेंव्हा थोडेफार सुसह्य होईल पण एका मुलासाठी निदान ४ चर्षे दोन्हीकडील आजी आजोबा, व मुख्य आईवडील यांना काळजी घ्यावी लागते. तब्येतीच्या तक्रारी किंवा आणखी काही गंभीर कारण सोडता तो प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. जर आर्थिक गरज असेल तर नवरा बायकोला पाळणाघराशिवाय इलाज नाही. त्या चार वर्षांनंतर मात्र महिलांनी अर्थार्जनास इच्छा दाखवली तर तिची दखल घेणे याला उपाय नाही. ४. लग्न व मुले नको असणार्‍यांचा तुम्हाला काय त्रास आहे बुवा? ५. एरवी पंचविशीतल्या सुनेच्या एकखांबी आधारावर संसाराचा डोलारा उभे करू पाहणार्‍यांनी जरा काही वर्षे नातेवाईक सांभाळणे, आर्थिक कसरत, मुलेबाळे संगोपन, एवढेच करून पहावे मग जीव घुसमटेल. असे बोलण्यात कश्याला ठेवायचे. आजपासूनच जिज्ञासुंनी सुरुवात करण्यास हरकत नाही. एकट्यानं सगळं सांभाळायचं. बायको करेल की मदत, नाही कोण म्हणतय. यात तिच्याकडील नातेवाकांची मने साम्भाळणे वगैरे राहू द्या, नवर्‍याने आपल्या आईवडिलांची, भावा बहिणींची, काकाकू, मामा मामी अशांची मने सांभाळून पहावित. ६. तिन्हीत्रिकाळ बायकांना पुरुषांचे अन्याय का दिसतात याची प्रत्येकिची वेगळी कारणे असू शकतील व ती कुटुंबाप्रमाणे बदलतील. उदा. कोण म्हणेल नवरा दा रू पिऊन मारतो (त्यावर दुसरी म्हणेल, अगं मारतो तर मारतो, कुंकवाला धनी तरी आहे) तर कोण म्हणेल मला घरात बसवून दोन पोरे अंगावर टाकून हा नोकरीचा टेंभा मिरवतो (दुसरी म्हणेल मलाही असा नवरा मिळायला पाहिजे होता. हितं आम्हाला नोकरीशिवाय इलाज नाही) किंवा असेच काही. माझेच उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या नवर्‍याला स्वभावत:च कमी बोलायला आवडते. एकटीलाच बडबडत रहावे लागते हा माझ्यावर अन्याय आहे राव! मी म्हणते की! (त्यावर मैत्रिण म्हणते बरय बाबा तुझं, आमच्याकडे हा सारखा बडबडत असतो) ७. नवर्‍याला डच्चू मिळत असेल तर त्यांच्यात संसाराचे नाते तयार झाले नाही असे म्हणावे. मग जे झाले ते बरेच झाले. बायको दूर राहते व त्यात तिला काही अडचण नसेल तर पुन्हा तेच! नवर्‍याची तक्रार आहे ना? त्याचा फायदा आहे बायको जवळ राहण्यात, बायकोलाही नवर्‍याचा फायदा आहे असे वाटले पाहिजे. (फायदा- शारिरिक, मानसिक, आर्थिक गरज याशिवाय सहजीवनातील आनंद, सपोर्ट वगैरे अनेक गोष्ती आहेत)तसे नसेल म्हणून ती रहात नसेल. मुलांच्या शाळांचे प्रश्न असतील. नातेवाईकांचा सपोर्ट लांब राहून पुरेसा मिळणार नसेल. असंख्य कारणे असतात. आपल्याला वरवर काहीतरी दिसते व आपण तेच मनात धरून बसतो. ९. हे हे हे. माझ्या आजेसाबा आहेत वृद्धाश्रमात.. मुलाने, सुनेने पाठवलेले नाही. आग्रहाने व आपणहोवून आनंदाने गेल्यात. तब्येत छान आहे व मनसोक्त जगतायत. संसाराचा एका पॉईंटला कंताळा येतो. अगदी सून गरम पोळी पानात वाढत असली तरी एकूणच संसार बघण्याचा कंताळा येतो. हे एक कारण पण आजकाल जागांचे प्रश्न, देखभाल करणार्‍या मनुष्याचे प्रश्न, विचित्र आजारपणे, आपला संसारावरील हक्क न सोडणे वगैरे कारणाने त्यांना जावे लागत असेल. माहित नाही नक्की कारण! कोणाचे काय तर कोणाचे काय........ ८. प्रॉपर्टी का विभागतायत ते कायदेशीर कारण कोणते हे आपण कसे ठरवणार? जोवर सगळे कायदेशीर आहे, डोकी फोडत नाहीयेत तोवर बरेच आहे. एकदा एक घर बांधले, शेती घेतली अमूक खरेदी केली नि तमूक वाढवले असे असले की त्यात पुढच्या पिढीत, त्याच पिढीत बदल होणे हे निसर्गचक्र आहे. बदल हे होणारच! १०. नवर्‍याकडून मिळणारी किमान सुखासिनता हा मोठा विषय आहे. प्रत्येक जोडप्याचा अत्यंत जवळचा व त्यांचाच असलेला. विश्वासू नातेवाईक असतील तर आणि काऊन्सेलर व आणाखी जबाब्दार व्यक्तिंनी सोडवण्याचा. तो व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने ज्याच्यात्याच्यावर सोडून द्यावा. सरसकटीकरण नकोच. ही आपली मर्यादा जर ओळखली तरी बरेच वाद कमी होतील. उदा. काल आम्ही नातेवाईकांना भेटलो. बोलण्याबोलण्यात, लहानसान चेष्टेतून समोरच्या नवराबायकोत (त्यांच्यातच, आमचा संबंध नाही) एकदम एक सिरियस वाक्य आल्यावर आम्ही दोघे (मी व नवरा) गप्प बसलो. ती अशी गोष्ट होती की यापुढे आमच्या ज्येष्ठतेच्या हक्कापेक्षा गप्प राहणे, आवश्यक होते. आम्ही मध्यस्थीही करायला गेलो नाही. दोन मिनिटात संभाषणाची गाडी पुन्हा रुळावर आली. यात लगेच बायकोला "किती तक्रारी करतेस? मोठी पोझीशन असलेला नवरा हवा मग तो प्रवासाला जाणारच, लांब राहणारच" वगैरे ऐकवण्यात अर्थ नाही. त्या दोघांना एकत्र टाईम स्पेंड करायला मिळत नाही हे सत्य आहे. उगीच त्यात पोझिशन वगैरे आणण्यात हाशील नाही. उलट त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे पण आजकालच्या ताण असलेल्या जीवनशैलीमुळे हे होते. काय करणार? आपली मर्यादा ओळखणे. गप्प बसणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 21:45 नवीन
असे जर पुरोगाम्यांकडून होत असेल तर त्याही बाबतीत तोच उपाय लागू आहे.
चला, या संतुलनाबद्दल प्राजंळपणाबद्दल धन्यवाद. ============================ तशी पुढे चर्चेची आवश्यकता नव्हती, पण आपण विस्तारभयापोटी (हा शब्द मी देखिल वापरतो.) एकच उदाहरण घेऊ.
१. त्यांना चाळीस नै चारशे वर्षांपर्यंत लग्न करायचे नाही तर त्यांचा प्रश्न आहे.
कसा काय म्हणे? समजा उद्या त्यांनी चारच वर्षाचे असताना लग्न करायचे ठरवले तर? चाळिस नि ४०० आकडे तितकेच अशास्त्रीय आहेत. मरणोत्तर तसबिरिंच्या (४०० वर्षे वयाच्या कोवळ्या वयात) लग्नाची प्रथा आली तर? भारतीय अर्थव्यवस्थेमधे कोणि ४ रु फक्त दर्वर्षी कमवो वा ४०० लाख कोटी कमवो हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो का? तुम्ही रोज १ मिनिट झोपा नाहीतर २४ तास, तुमच्या मर्जीचा प्रश्न? ======================= ज्या कोण्या महामूर्खाने देशांच्या घटनांमधे महान तत्त्वांच्या यादीत स्वातंत्र्य नावाचे मूल्य सर्वप्रथम म्हणून घातले त्याला आज पश्चात्तापाची पाळी येत असेल. या शब्दाकडे नीट निरखून पाहिल्यास असे लक्षात येते कि, महान असोच, स्वातंत्र्य हे एक मानवी जीबनाचे मूल्य तरी आहे का? ======================== समाजातल्या प्रत्येक व्यक्तिच्या वर्तनाचं सम टोटल समाजवर्तन असतं. प्रत्येकाचंच वर्तन ढळू लागलं तर समाजाचा समतोल बिघडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा