adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
💬 प्रतिसाद
(445)
व
विशुमित
Tue, 07/25/2017 - 12:39
नवीन
बाकी त्यांच्या घरी भाकरी कोण बडवतात ह्याच उत्तर काही दिले नाही कोणी.
कृपया हे वाक्य संपादित करा (काढून टाका).
(अभ्या च्या प्रतिसादातून उपरती )
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 07/25/2017 - 12:39
नवीन
त्यांच्यावर तुमचा विश्वास अजिबात दिसत नाही. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या भाकर्या त्याच बडवतात नि मी ते मानतो.
================
बाकी तुमच्या मतांचा आदर आहेच.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Tue, 07/25/2017 - 13:47
नवीन
त्यांच्या सांगण्यातून स्त्रियांना फायदा होणार नाही असे क्षणभर गृहीत धरू पण त्यांच्या सल्ल्यांमुळे हजारो लोकांचे (तुमचा आकडा कमी केला) संसार कसे मोडले जाऊ शकतात हे जरा लगडून सांगाल का? हाच प्रश्न मी वर पण एके ठिकाणी विचारला होता पण उत्तर मिळाले नाही. बाकी त्यांच्या भाकरी बडवण्यावर मी वर मत मांडले आहे ते पटते का बघा. मला अजोंचे खालील उत्तर पण पटते.
- Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी
Tue, 07/25/2017 - 13:03
नवीन
ह्यातील उसंडू आणि किंचित विनोद समजून घेण्यात आलेला आहे चिंता नसावी.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 07/25/2017 - 11:18
नवीन
आता त्या वकिली करत नाहीत. कोर्टात चालणारा भ्रष्टाचार पाहून त्यांनी प्रॅक्टिस सोडली.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 07/25/2017 - 11:50
नवीन
पण मग भाकर्यांचा कांय?
- बाळोबा रेगे, भाकर्यांची चाळ
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 07/25/2017 - 13:39
नवीन
ह्या बाळोबाला मेल्या शंकाच फार! :प :प
लष्करच्या भाकर्या भरपूर जमतात. त्यामुळे म्हणावा असा प्रॉब्लेम नसतो.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 07/25/2017 - 11:56
नवीन
बाई खूप सेवाभावी काम मोफत करतात हे जवळजवळ सर्वांना माहित आहे. कित्येकांनी त्यांच्या विचारांचा विरोध केलाय, पण कामाची योग्य ती दखल घेतली आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 07/25/2017 - 12:17
नवीन
मला खरंच माहित नव्हतं त्या मोफत सेवाभावी काम करतात त्या. विडिओ ऐकण्यातून सुटले असेल कदाचित. पण तरी मला शंका आहे की मोफत भाषण देत असतील म्हणून. किमान येण्या जाण्याची बिदागी (यासाठी दुसरा शब्द असेल तर कृपया सुचवा) त्या घेत असाव्यात. खात्री करण्यासाठी आमच्या घरातील अखंड हरिनाम सप्ताहाला त्यांना आमंत्रित करण्याचा माझा मानस आहे.
पण त्यांच्या कामाबद्दल मी कुठेही वेगळे मत प्रदर्शन केलेले नाही. तसे कुठे आढळले असेल तर कृपया दाखवून द्या.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 07/25/2017 - 15:07
नवीन
मागे पुढे काय पाहता मग?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 07/25/2017 - 15:18
नवीन
एक नामवंत कीर्तनकार (खरं तर rural stand-up comedy म्हणायला हवे त्यांना) युट्युबवर एका चित्रफितीत "मग मी पैसे घेतले तर/ मला पैसे दिले तर काय बिघडले" अशा आशयाचे प्रवचन झोडताना दिसतात.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 09:39
नवीन
हो, पैसे हे फक्त एम एन सी कंपन्यांच्या अगदी ज्यूनिअर अधिकार्यांनासुद्धा फाईव स्टार लाईफ जोपासायलाच द्यायचे असतात. बाकी कुणाचा पैश्यांवर अधिकार काय?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 07/27/2017 - 08:44
नवीन
एम एन सी मधल्या साऱ्याच जणांचे ध्येय पैसे कमावणे हेच असते. मात्र तुमच्या या प्रतिसादावरुन किर्तनकाराने कीर्तनाच्या नावाखाली स्टॅन्डअप कॉमेडी करुन पैसे कमावणे योग्य आहे असे दिसते. :)
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 07/27/2017 - 08:57
नवीन
किर्तनात उभे राहणे बॅन नाही.
किर्तनात विनोद करणे बॅन नाही.
=================================
आता ध्येयाबद्दल. तुम्हाला स्कोप आणि कंसिडरेशन हा कंसेप्ट माहित असावाच.
एम एन सी मधलया लोकांचे ध्येय (स्कोप) पैसे कमावणे नसते, प्रकल्प (वा तत्सम) पूर्ण करणे हे असते. पैसे हे त्याचे कंसिडरेशन असते.
किर्तनकाराचे* ध्येय हे अध्यात्मिक प्रबोधन असते (विनोद हे हत्यार झाले) आणि पैसे हेच त्याचे कंसिडरेशन असते.
- Log in or register to post comments
स
सुचिता१
Wed, 07/26/2017 - 19:51
नवीन
ह ह पु वा ... काय तर सी न असेल .. कुणी तरी क्लीप पाठवा प्लीज
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 07/25/2017 - 09:51
नवीन
एकंदर विषय, वादविवाद, पूर्व उत्तर पक्ष आदी गोष्टींनी फार दिवसांनी एक जोरकस चर्चा अनुभवतो आहे ...
खुद्द तीर्थंकरबाईंना हे सगळे मतमतांतरे पोचवले तर त्यांना ह्या चर्चेची दखल पुढील भाषणात घ्यावी लागेल असं वाटत .
पण एकंदरीत त्या जरा अति बोलतात आणि अनावश्यक सल्ले देतात हे माझे मत.
त्यांच्या सामाजिक कार्याला किंवा सद्हेतू बाळगून कार्य करण्याला सलाम ...पण ..सनी लीयोनी वर पोलीस क्म्प्लेंत आणि हैट्ट म्हणजे पोलिसांनी संध्याकाळ पर्यंत निर्णय देण्याच वचन वगैरे वाचून भरपूर आश्चर्य वाटले
बाकी चलने दो
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 07/25/2017 - 09:53
नवीन
ते रामतीर्थ अस पाहिजे, तीर्थंकर शब्द कुठून डोक्यात घुसला आणि टंकला गेला देव जाणे ...
सं म तेवढा बदल करून हा प्रतिसाद उडवला तर बर होईल
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 07/25/2017 - 14:23
नवीन
रामतिर्थकर पाहिजे..
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 07/25/2017 - 14:01
नवीन
आज धाडस करून ऐकल्या दोन क्लिप्स, अपर्णाबाईंच्या.
भाषा थोडी रांगडी आहे, शब्द ओबडधोबड आहेत, पण हेतू चांगला वाटला मला.
नाती टिकवणे, कुटुंबव्यवस्था टिकवणे हे खरंच आज गरजेचे झाले आहे. त्या काही कुणा एकाचा कैवार घेतात असे वाटले नाही. सासू आणि सून दोघींनी करायची तडजोड सांगतात. नवरा आणि बायको दोघांनी नाते टिकवण्यासाठी काही करावे असे सांगतात.
कोबीच्या भाजीचा किस्सा आवडला त्यांचा.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Tue, 07/25/2017 - 14:08
नवीन
+१००००. सातही ऐका, नक्की मत बनवायला सोपे जाईल. काही गोष्टी पटणार नाहीत पण काही गोष्टी हृदयाला स्पर्शून जातील. काही ठिकाणी त्यांचा भरून आलेला गळाच त्यांचा हेतू सांगून जाईल (काही लोकांना तेही खोटे वाटेल पण त्याला नाईलाज आहे.)
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 07/25/2017 - 15:04
नवीन
नि:पक्ष मत.
तुमचा प्रतिसाद आवडला (मागच्या प्रतिसादांच्या तुलनेत).
================================================
त्यांचे साती व्हीडीओ मस्त टाईमपास म्हणून ऐकावेत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/25/2017 - 15:30
नवीन
एकंदर प्रतिसाद वाचून मनोरंजन झाले.
आपण लोक स्वतःच्या चष्म्यातून पाहून किती झटकन निवड करून एखाद्याला गुन्हेगार ठरवून मोकळे होतो याचे आश्चर्य आणि गम्मत वाटली.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 07/25/2017 - 15:39
नवीन
बापरे! खुपच पुढे गेला की हा धागा!
१. अपर्णाबै समाजकार्य करतात हे मी सुद्धा ऐकुन आहे. पण त्यातही त्या वकिली करत नाहीत आता आणि कोर्टात लोकांना मदत करतात अशी दोन परस्पर विरोधी विधाने ऐकलेली असल्याने खरे खोटे देव जाणे. तरीही त्यांच्या कार्याचा आदर करुनन सांगते, त्यांची अनेक मते टोकाची आहेत. चांगले कार्य केले म्हणुन हे ही ऐकुन घ्यावे अशी कुणाची अपेक्षा नसावी.
२. त्या काही का हेतुने बोलेनात, इथे लोक त्यांच्या व्हिडीओंचा वापर सुनांना.. बायकोला ऐकवायला वगैरे करत आहेत. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ त्यांच्या डोक्यात काही का असेना, अजुन त्यांच्या बाकी भाषणांमध्ये त्या काही का बोलेनात, जे सध्या सगळीकडे फिरतंय ते "बायकांनो भान ठेवा, नंतर बलात्काराचे मुद्दे लढवताएत, पण आधी भान नको का?" ,"पुरूषांसमोर केस विंचरतात काय.. हात काय वर नेतात.." ,"आजकाल शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही, शिकलेली बायको करायची असेल तर पार्सलची तयारी ठेवा नाही तर स्वतः स्वयंपाक शिका" इ. आहे. ह्यातुन कितीही फिलॉसॉफिकल अर्थ काढायचा म्हणला तरी जो निघायचा तोच अर्थ निघतो.
सार्वजनिक ठिकाणी अशी भाषणे देणार्या वक्त्याला "ह्या भाषणात मी असं बोलले असले तरी माझे भाषण क्रमांक ५ आणि ७ ऐका, मग तुम्हाला मुद्द्यांचा उलगडा होईल" असे म्हणता येत नसते. बरं, विषय समजा आजकालच्या स्त्रिवाद्यांच्या चुका किंवा बायका कसा कायद्याचा गैरफायदा घेतात असा काही असेल तर हे सिलेक्टिव्ह बोलणे समजु शकतो. पण "चला नाती जपुया" असे म्हणुन बायकांना झोडपणे अत्यंत चुकीचे आहे. भाषणाची सुरुवात ऐका - कुटुंबव्यवस्था मरायला टेकलीये म्हणून बोलतेय अशी म्हणुन होते ती बायका कशा कायद्याचा दुरुपयोग करातात, भान सुटतंय, धर्म बुडतोय, बंधनं नाहीत अशा अंगाने होत जाते. भाषणात सरसकटीकरण तर वाक्या वाक्याला आहे. शिकलेल्या, बाहेर जाणार्या बायका (खास करुन आयटी मधल्या) ह्यांच्या विषयी काहीही बोलल्या जातेय. जणु काही सगळ्याच्या सगळ्या आयटी मधल्या पोरी मातृत्व विकायल निघाल्यात. "माझं १५ लाखाचं नुकसान होतं बाळामुळे" हे म्हणणारी बाई भारतात तरी अजुन रेअर केस आहे. बाई एका उदाहरणाला बेमालुमपणे आजकाल आयटीच्या मुली असंच "सर्रास" करत आहेत असं प्रोजेक्ट करत आहेत.
बाहेर काहीही काम करा, त्या कामाच्या जीवावर तुम्ही अधिकाराने लोकांना असे काही सांगता, तेव्हा तुम्ही समाजाची स्त्रियांच्या अनिर्बंध वागण्यामुळे भयानक अधोगती होत आहे चित्र उभे करता आणि अनेक लोक त्याचा सोयीस्करपणे स्त्रियांनी म्हणुनच घरात बसायला हवे असा अर्थ काढु शकतात.
३. भाकरी बडवण्याचा काय तो फायनल प्रतिवाद.
मी मागच्या पानावर त्यांनी नक्की म्हणले आहे ते शब्द न शब्द लिहुन सांगितले आहे. त्यात त्या स्पष्टपणे म्हणत आहेत की "तुम्ही डॉक्टर असा, इंजिनिअर असा, .... अमुक असा...तमुक असा... अंतराळात जा.. पाताळात जा... स्वयंपाक आलाच पाहिजे, घरात आले अन नवरा म्हणला की जेवायला कर तर असं नाही म्हणता येत की भाषण देऊन आलेय, भाकरी करत नाही. नवर्यासमोर वकिली नाही चालत. नवर्यासमोर काही चालत नसतं. हे पक्कं लक्षात ठेवा. " (टाळ्यांचा कडकडाट!)
ह्यात आता लोकांनी मला सांगाच की कसं "केवळ बायकांनी स्वयंपाक करावा" हे सूचित होत नाही. खास करुन हतोळकर. तुम्ही म्हणताय की ह्यात असं कुठे म्हणलंय की नवर्याने मदत करु नये वा नवर्याने स्वयंपाक करु नये. तर हे घ्या. मी तुम्हाला त्या जे म्हणल्यात ते लिहुन दिलंय. मागे तर लिंक पण दिलीये. ती क्लिक कराल तर अगदी ह्याच वाक्याला व्हिडिओ सुरु होईल.
शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही, शिकलेली बायको आणायची असेल तर पार्सलची तयारी ठेवा नाही तर स्वयंपाक शिका , केटरचा स्वयंपाक आणणार आहेत, सुनांना वेळ नाही. - ही सर्व वाक्ये त्या काही कौतुकाने म्हणलेल्या नाहीत. समाजाची कशी अधोगती चालु आहे त्यावर हे भाष्य आहे त्यांचं.
एका भाषणाच्या पहिल्या २० मिनिटात ही रत्ने मला सापडलीत. आणि दुर्दैवाने हेच सतत व्हायरल होत आहे. "आजकाल मुलींना नवरा कसा हवा" ह्यात आयटीच्या मुली मातृत्व विकायला निघाल्यात हे इतकं ड्रामाटिक पद्धतीने सांगत आहेत आणि फेसबुक वर सतत हाच व्हिडीओ शेअर होतोय.
मी एक साधं उदाहरण देऊन थांबते.
माझी एक मैत्रिण आहे. त्यांच्या घरात / जातीत, तीच एक मुलगी आहे जी बाहेर पडुन प्रचंड शिकली. त्यासाठी पुण्याबाहेर राहिली. तिला एक मुलगा आवडायचा खुप. पण जाती बाहेरचा होता. तिने लग्न केले नाही त्याच्याशी. का? तर म्हणाली की जर मी घरच्यांच्या विरोधात जाऊन असं केलं तर माझ्या समाजाचे लोक नक्कीच असं म्हणतील की पोरी जास्त शिकल्या, घराबाहेर गेल्या की हे असं होतं. आणि मग लोक मुलींना तेच उदाहरण देऊन बाहेर जाऊ देणार नाहीत. मला काहीही झालं तरी वडीलांच्या मनाप्रमाणेच लग्न करायला हवं. माझं उदाहरण चुकीच्या कारणाने दिलं जायला नको.
आपला समाज हा असा आहे. आज आयटीतल्या मुलींची क्लिप व्हायरल होतेय. कुठल्या तरी घरात एखाद्या मुलीच्या आयुष्यावर त्याचे पडसाद उमटलेही असतील. बायकांनी भान सोडु नका वाली क्लिप सुद्धा व्हायरल होऊन सुनांच्या व्हॉट्सअॅपवर धडकतेय. ह्यांच्यातलं कुणीही (नसलेला) गर्भितार्थ शोधणार नाही हे मी पैजेवर सांगते. पण बघा त्या बाई काय सांगताएत, हे असं होतं पोरींना डोक्यावर घेतलं की वगैरे सोयीस्कर अर्थ निघताएत हे नक्की.
- Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी
Tue, 07/25/2017 - 16:40
नवीन
पिराताई पुन्हा एकदा १००% सहमत !!!
- Log in or register to post comments
र
रामपुरी
Tue, 07/25/2017 - 16:49
नवीन
" पण बघा त्या बाई काय सांगताएत, हे असं होतं पोरींना डोक्यावर घेतलं की वगैरे सोयीस्कर अर्थ निघताएत हे नक्की."
कुणीतरी एक बाई काहितरी सांगताहेत म्हणून लगेच लोकांची मते बदलतात? भलताच विनोद आहे.
बाकि चालू द्या...
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 07/25/2017 - 17:05
नवीन
छे हो, अशी कोणाची मतं एका सांगण्यात्/ऐकण्यात बदलत नाहीत पण आधीपासून ज्यांची अशीच आहेत त्यांना "बघा बघा, आम्ही हेच म्हणतोय" असा सपोर्ट मिळाल्यागत होतं. आणि दुर्दैवानं अजूनही समाजाचा बराचसा भाग दुसर्या (सोयिस्कर) बाजूला झुकलेला आहे.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Tue, 07/25/2017 - 19:07
नवीन
तुमच्या आणि माझ्या मतांमध्ये खूप अंतर असल्याने असहमतीवर सहमती नोंदवितो. बाकी ते भाषण क्रमांक ५ आणि ७ बघा ह्याचा उल्लेख खटकला. यूट्यूबवर ते तुकड्यात आहे याचा दोष वक्त्यावर फोडण्यात काय अर्थ? स्वैपाक यायलाच हवा आणि नवरा स्वैपाक कर म्हणाल्यावर स्वैपाक करावाच लागतो हि वस्तुस्थिती यातून नवऱ्याने स्वैपाकात मदत करू नये असे त्यांचे मत ध्वनित होत असेल असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. असा तुकड्या तुकड्यात वाक्यांचा अर्थ काढण्यात मला तरी हशील वाटत नाही. पूर्ण विडिओ पाहून त्यांचं स्त्रियांबद्दलचं मत, पुरुषांबद्दलचं मत (हो विडिओ पूर्वग्रह न ठेवता पहिला तर हेहि सापडेल त्यात), स्त्री-पुरुष समानतेबद्दलचं मत पाहून मग स्वतःची मते बनवणं योग्य होईल हा अनाहूत सल्ला! बाकी या पूर्ण विडिओत घेण्यासारखे काही विचार सापडले नसतील हे पाहून आश्चर्य वाटलं! असो! पूर्ण विडिओ आधीच मत न बनवता सलग पहावा, अपर्णाजींच्या काम जाणून घ्यावं मग टोकाची मते जरूर मांडावीत!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 07:38
नवीन
तुम्ही आमचाही (सर्वनामाचं लिंग बरोबर आहे.) अपर्णाताई बनवला असल्यामुळे तुम्ही हे ही इग्नोर करालच, पण तरीही सांगावसं वाटतं कि मनुष्याने आपल्या अज्ञानाचा वन्ही आपल्या पूर्वग्रहदोषाच्या ठिणगिसोबत वापरू नये.
तर तंटा सोडवण्याची खालील प्रकारच्या पद्धती असतातः
१. अमिकेबल सोल्यूशन
२. मेडियेशन
३. आर्बिट्रेशन
४. लिटिगेशन
५. इंटरनॅशनल डिस्प्यूट रिझोल्यूशन
६. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट
यातल्या सर्व सरकारमान्य आहेत. आणि क्रिमिनल केस नसेल तर लिटिगेशन टाळावे (मंजे सरकारची अधिकृत मशिनरी टाळावी) असा सरकारचा आग्रह असतो. अगदी या इतर बर्याच फोरम्सचे अवार्ड्स फायनल आणि बाईंडिंग असावेत आणि त्याविरुद्ध लिटिगेशन बर्याच परिस्थितिंत चालणार नाही असेही सरकार म्हणते. हे सगळे प्रकारे चालवणारे लोक जनरली वकील असतात. बाई आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतात असं त्या स्पष्ट म्हणाल्या आहेत. (पहा, बायस नसल्यामुळं मी किति व्यवस्थित आठवू शकतो.)
=============================
आपल्या विधानाविधानात इतके अज्ञान, बायस आणि समाजशास्त्राच्या तत्त्वांचा अनभ्यास, शिवाय अर्थनिर्णयनाची अतार्किकता ठासून भरली आहे कि कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना आपण अपर्णाताई परंपरावाद्यांना जितक्या मिसलिड करत असतिल त्यापेक्षा जास्त मिसलिड करत आहेत.
===========================
या प्रतिसादाची भाषा उग्र, टिपिकल अजो स्टाईल आहे हे मान्य. बाकी तुम्ही आपल्या मिसळपावच्या एक गोड ताई आहात अशीच कल्पना आहे नि राहिल. ही मतांतरं केवळ तात्विक आहेत. स्त्रीवादी ज्या उग्रतेने मते मांडतात त्यापेक्षा झोंबणार्या उग्रतेने उलट दिशेने लिहिता येते का असा प्रयत्न मी करत असतो. डोल्ट टेक अॅनिथिंग पर्सनली.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 07/26/2017 - 07:57
नवीन
आहहहह, जोशीसाहेब मानले तुम्हाला.
बाकी आपले मतभेद काहीका असेनात, चिकाटी अन मुद्देसूद पणे किल्ला लढवण्याला सलाम.
आपल्याला हे जमत नाही. त्यातल्या त्यात ढीगभर वर्ड सॅलडला हुशारी मानणाऱ्या विरुद्ध प्रतिसादात तुमचे प्रतिसाद प्रचंड कंसिस्टंट आहेत हे मान्य केले आहे. किपीटप.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 08:30
नवीन
१.जालीय संवादांची ही एक त्रुट आहे की आपण "पुरेसा" संवाद करू शकत नाही. माझे प्रतिसाद पाहिले तर सहसा मी प्रतिवादयाच्या फक्त पहिल्या , दुसर्या विधानाचा प्रतिवाद करतो. अन्य सर्व विधानांचा करणं वेळेअभावी अशक्य आहे.
२. समोरचा खरे, प्रामाणिक बोलत आहे असे "माहित असणे", मानणे नव्हे. समोरच्याच्या नि आपल्या प्रभूत्वांची तुलना हा खेळ न खेळता आपल्याला न पटणार्या विधानांवर प्रामाणिक भाष्य करणे.
३. अगदी अपरिहार्य होत नाही तोपावेतो समोरच्याचा व्यक्तित्वाबद्दल भाष्य न करणे. मी जर तुला ढोंगी म्हणालो तर तू माझं काही म्हणणं मान्य करण्याचा स्कोप संपतो. म्हणून तह होईपर्यंत आदर देत राहणे.
४. प्रतिवाद्यांच्या माहीतितून आपली मतं सुधारत, रिफाईन आणि डायल्यूट करत जाणे. मंजे शेवटी आपण खूप तिखट भाजी खाऊ शकत असलो तर त्यांना थोडि लींबू पिळून देणे.
५. योग्य तिच भूमिका घेणे.
६. सगळीकडे एकोळी थूंकून जाणारांस इग्नोर करणे. एकोळे फार धारदार आणि विचारहीन लोक असतात. सुसंवादातून काही शिकायची, शिकवायची त्यांची मानसिकता नसते. म्हणून मुख्य हरिण सोडून झांडांवरून पळणार्या माकडाच्या पाठीमागे न धावणे.
७. समोरच्या व्यक्तिला आपला अपमानच करायचा आहे अशी धारणा नसणे. जालीय आयड्यांच्या भावनांची आपण काही समीकरणे बनवतो. प्रतिसादातले विधान हि सगळी समिकरणे तोडून पाहणे. प्रतिवाद्यांचा नेहमी योग्य तो सन्मान करणे.
८. फार गंभीर न होणे. शैली खेळकर ठेवणे. मी स्वतः फार अशिष्ट लिहितो. ते मला सुधारायला हवं.
९. जालावर आपली एक विशिष्ट प्रतिमा न बनवणे. उदा., लोकांनी तुम्हाला मूर्ख मानलं तर ओके म्हणावं. त्यानं एवढा काही फरक पडत नाही. तुमची लाँग टर्म इमेज तुम्ही आहात तशीच बनणार असते.
१०. आपण आहोत तसे प्रकट व्हावं.
मला वाटतं रफ्लि या गाईडलाईन्स फॉलो कराल तर जमत नाही असं वाटणार नाही.
बाकी जालीय संभाषणकौशल्या या विषयात मी सगळे चढ उतार पाहिलेत असं नाही. बराच पूर्वीचा फ्लॅशिपणा बराच नियंत्रित केला आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 07/27/2017 - 07:30
नवीन
हा प्रतिसाद वाचनखुणांमध्ये साठवून ठेवणार आहे.
४. प्रतिवाद्यांच्या माहीतितून आपली मतं सुधारत, रिफाईन आणि डायल्यूट करत जाणे. मंजे शेवटी आपण खूप तिखट भाजी खाऊ शकत असलो तर त्यांना थोडि लींबू पिळून देणे.
विशेष आवडलं
- Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी
Wed, 07/26/2017 - 08:26
नवीन
डोल्ट टेक अॅनिथिंग पर्सनली आणि कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना हे एकदा टंकल कि वाटेल ते लिहायला मोकळ असतो.
खरे तर सकाळपासून ह्या धाग्याचे भरतवाक्य ऐकू येत होते तथापि तुमचा हा प्रतिसाद वाचून उत्तर देणे भाग आहे.
खरे तर पिरा तैंनी अत्यंत समर्पक प्रतिसाद देऊन मूळ धाग्याची भूमिका व्यवस्थित मांडली आहे, तरीही पुन्हा त्या वाचल्यास बरे होइल.
पहिल्यांदा ऐकतांना कसलाही पूर्वग्रह नसतोच त्यामुळे अज्ञानाचा वन्ही वगैरे शब्दबंबाळपणा हि हौस असू शकते सत्य नाही. पण पुन्हा ऐकतांना आणि अजून ऐकतांना मुळचा झरा कळतोच त्यातही शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते.
असो तर एक बाई २०१७ मध्ये जाहीर रित्या लोकांना विशेषत: स्त्रियांना
-चूल आणि मूल हेच प्रायमरी असल्याची शिकवण देतात (बोट्म लाईन तीच)
-आईच एकवच लागेल आणि मला प्रश्न विचारू नका अशी भम्पक दादागिरी ची भाषा करतात
-नवर्याशी जुळवून घे, पाणी पी असली तद्दन कचखाऊ भूमिका स्वीकारायचा सल्ला देतात
-सासूला नवीन सुनेशी बोलतांना खोट बोलायला उद्युक्त करतात
-स्वतच्या ४८ व्या वर्षी केलेल्या एल एल बी च कौतुक आपणच गाऊन दाखवतात आणि फालतू गहिवर आणतात
-स्वताच्याच मुलाच कौतुक जाहीर पाने करतात का तर त्याने आजीला ज्ञानेश्वरी वाचून दाखवली
-स्वताला पुन्हा पुन्हा बोलवा असे आवाहन करतात
-सनी लीयोनी बद्दल कुठल्यातरी कोपर्यातल्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून त्याचा फोटो छापून आणतात
बर्यापैकी वक्तृत्वावर चार मुद्दे मांडता येतात म्हणून जाहीरपाने हे असले कुचकामी सल्ले देत राहायचे आणि काहीतरी जुनाट विचार लोकांवर लादायचा प्रयत्न करायचे. कशाचा कशाला पत्ता नाही.
त्यांना मुंबई पुणे दिल्ली बंगलोर आदी महानगरातील आयुष्यातील रोजच्या संघर्षाची , (विशेषत: स्त्रियांच्या आणि त्यातही नवीन लग्न झालेल्या मुलींच्या बाबत च्या समस्या ) आणि काडीमात्र जाणीव दिसत नाही आणि अनुभव तर मुळीच वाटत नाही (नवीन लग्न झालेल्या मुलीकडून सासर्यांच्या श्राद्धाचा साग्रसंगीत स्वयपाक ,तो हि एकहाती बहुतेक, अपेक्षित आहे ह्या बैईना) आणि ग्रामीण स्त्रियांना ह्या जुळवून घेण्याचे जे सांगतात त्यात काहीच नवीन नाही (निदान नसाव).
त्यांच्या सामाजिक कार्य आणि तळमळीबद्दल जास्त माहिती नाही पण तरीही असे काही काम करणाऱ्या कुणाचाही करावा तसा मनापासून आदर आहेच. त्यांनी उल्लेख केलेले कायद्याचे गैरवापर हे होत असतीलच पण म्हणून त्याच्या सरसकटीकरण आणि फोफस तत्वज्ञान मांडण्याला आक्षेप आहेत. त्यांची मते आणि विचार ज्यांना मान्य आहेत त्यांनी ते जरूर स्वीकारावेत आणि आपल्या वैयक्तिक परिघात रुजवावेत आणि जमल्यास पुढील पिढीत जोपासावेत.
तथापि आपण जरूर अशा क्रॅक बाईंना सपोर्ट करतांना केवळ विरोधासाठी विरोध करावा आणि त्याचे अपर्णातैन्सार्खेच तत्वज्ञान हि बनवावे मधून मधून आपणच आपल्याच पाठीवर कौतुकाची थाप हि मारून घ्यावी (नंतर तो विनोद होता असहि म्हणता येईल).
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 08:56
नवीन
मान्य. पण बाईंची कोणतीही दोन वाक्ये स्त्रीवाद्यांचे सगळे पूर्वग्रहदोष प्रवण क्षेत्र अॅक्टिवेट करायला पुरेशी आहेत.
फूड आणि सस्टेनेबिलिटी हे खरंच प्रायमरी इश्श्यूज आहेत.
चूक आहे ते. स्त्रीवाद्यांशी वादात हरायची नाचक्की होऊ नये वा वेळ जाऊ नये म्हणून त्या असं करत असाव्यात.
स्त्रीशक्ती बद्दलही बरंच बोलल्यात.
तुमचा आयडी कोंबडि प्रेमी असणं हे माझ्याशी खोटं बोलणं आहे. असो.
जनरली या वयात कमी लोकं शिकतात. आणि स्वतःचं कौतुक असणं, गहिवर येणं हे सामान्य आहे. बाय द वे, तुम्हाला कशाचा गहिवर आल्ता ते सांगा मी त्याला फालतू म्हणून झीडकारून दाखवतो. मंजे काय तुमची मतं चूक?
मग काय बडवायला पाहिजे होता यासाठि अशी अपेक्षा आहे का?
कंपन्या जाहिरातिंनी इतक्या पकवतात म्हणून त्यांचे प्रॉडक्त घेत नाही का तुम्ही? असतात पकाऊ लोक. पण टाळता येत नाहीत.
इस्रोच्या चेअरमने (व्यक्तिगत पातळिवर) प्रक्षेपण निट व्हावे म्हणून (आवश्यक त्या बाबींत काही हलगर्जी न करता) बालाजीची पूजा केली म्हणून देशातल्या अनेक शिकल्या सवरल्या गधड्यांनि रान माजवलं होतं. म्हणून तक्रार कशाची करावी याची अक्कल असण्याचा आग्रह त्यांच्यापासून सुरु करायचं कारण नाही. आणि प्रसिद्धिच्या हौसेत काय चूक आहे? आता तुमच्या मिसइंटरप्रिट करायच्या हौसेत काही चूक नसेल तर त्यांना पण समान अधिकार नको का?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 09:57
नवीन
त्यांच्या समस्यांचा अनुभव का म्हणे असायला पाहिजे? उद्या असंही म्हणाल की त्यांना लॉस अँजिलिस, टोक्यो, मोसूल, लिमा, इ इ जागच्या स्त्रीयांच्या प्रश्नांची कल्पना नाही. काय संबंध आहे. सोलापूरातल्या कंच्यातरी धांदलगावात भाषण द्यायला, त्यांचे प्रश्न सोडवायला मुंबईच्या अनुभवाची अट कशाला?
कौटुंबिक नाती, घरी कष्ट करणे, थोरांचा सम्मान करणे, स्वयंपाक करणे, सांस्कृतिक प्रथा पाळणे (जेणे करून या अपेक्षापूर्तींनंतर संसार नीट चालतील) हे शिकवायला मुंबईची डिग्री कशाला लागते?
प्रत्येक ठिकाणि शहरांचा जीडीपी वाढवायचा अट्टाहास झेपण्यापलिकडचा आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 08:02
नवीन
अहो, ऐकून घेणे या फ्रेजला त्या मेटॅफोरिक अर्थापूर्वी एक लिटरल अर्थ देखिल आहे. तुम्ही लिटरली घ्या ना हो. ऐकणे म्हणजे कानात वायूच्या मेकॅनिकल वेवज जाणे असे घ्या ना. त्या काय तुमच्या सासू आहेत का कि ध्वनिकंपनंही (इतकी मागास असती तर) सहन न व्हावी?
तुम्हाला एक मनःपूर्वक सांगतो, अपर्णाताईंचे व्हिडिओ ऐकताना मला एका गोष्टीचं अतीव दु:ख झालं. काय? ते मंजे मी "वाहिलेला स्त्रीवादी" नाही. असतो तर माझ्यासाठी हा जबर्या कॉमेडी प्रकार राहीला असता नि मी पुनःपुनः पाहीला असता. पण मला त्यांच्या विचारांशी बरीच सिंपथी आहे, म्हणून मी असं हसूच शकत नाही.
दुसरिकडे युट्यूबवर मी बर्याच स्त्रीवाद्यांची पेटलेली भाषणं शांतपणे ऐकतो - त्यांचं विचारप्रसारण आणि माझं मनोरंजन एकत्र होतं. बर्याच प्रबोधनही करून जातात.
===========================
जर तुम्ही बजरंगदली शिवसैनिक आहात तर अकबरुद्दिन ओवैसीचं भाषण शांतपणे ऐकणं (रक्तदाब, हार्टबिट तिच ठेऊन, कोणतेही स्वगत मधेच चालू न करता, किंवा तोंडातनं कोणता प्रशंसाशब्द न आणता.) एक कला नाही का?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 07/25/2017 - 18:11
नवीन
मला काहीही झालं तरी वडीलांच्या मनाप्रमाणेच लग्न करायला हवं. माझं उदाहरण चुकीच्या कारणाने दिलं जायला नको.
आणि समाज भाकरीभोवती गोलगोल फिरतोय किंवा फिरवला जातोय. बॅन करायला हवेत असले विडिओ
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/25/2017 - 19:03
नवीन
...आणि एकदा बॅन केले की तुम्हीच असहिष्णुता आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असे बोलायला मोकळे.
;)
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 07/25/2017 - 19:16
नवीन
सरकारने नव्हे हो समाजाने
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 07/25/2017 - 20:07
नवीन
बर बर,
सांगितलंय सेक्रेटरीला. करतील ते नळ बंद हं.
या आपण.
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 07/25/2017 - 20:17
नवीन
बर आज पुण्यात अंजीराचा काय भाव आहे?
- Log in or register to post comments
अ
अभिदेश
Tue, 07/25/2017 - 22:43
नवीन
नागपूरला जा संत्री खा , वाळ्याचे पडदे लाऊन पडले राहा आरामात.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Wed, 07/26/2017 - 04:26
नवीन
बाकी ह्या धाग्यावर अरुण जोशी साहेबानी फार नेटाने किल्ला लढवला. अगदी संक्षींची आठवण आली.
कोंबडी प्रेमी,
तुम्हाला कोंबडी आवडते असे तुमच्या आयडीवरून वाटते. त्यामुळे हा धागा काढल्याबद्दल तुम्हाला गावरान कोंबडीचा रस्सा आणि ज्वारीची भाकरी (मी थापलेली नाही नाही बडवलेली) बक्षीस देण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी
Wed, 07/26/2017 - 06:07
नवीन
ती ज्वारीची भाकरी पौर्णिमेच्या चंद्रा सारखीच गोलच असावीच लागतेच
इथे पदर खोचून तर्जनी प्रत्येक च वर ठेका देत हलवली आहे अशी कल्पना करावी
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 07/26/2017 - 06:05
नवीन
बर मंग आता कुठल्या कुठल्या गोष्टी पुर्ण झाल्या कि स्त्री मुक्ती झाली असे म्हणायचे?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 07/26/2017 - 06:50
नवीन
एक विचार --
लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालविलेले राज्य
तसेच
स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीने, स्त्रीची, स्त्रीपासून केलेली मुक्ती
- Log in or register to post comments
म
मनिमौ
Wed, 07/26/2017 - 06:51
नवीन
अजून एक व्हिडिओ बघितला. त्यात त्या म्हणाल्या की आजकाल लग्नात वधूला साडी नेसावायला पुरूष असतो. हे त्यांनी कुठे बघितल आहे देव जाणे. माझ्या आणी मित्र मैत्रीणी नातेवाईक ह्या सर्व लोकाकडच्या लग्नात वधूला तयार करणार्या बायकाच होत्या
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 07:45
नवीन
हाय क्लास सोसायट्यांत.
मिडलक्लासांना कशीबशी लग्नाची साडी परवडते, नेसवणारा कसा परवडेल?
http://www.beyondthefringe.in/bridal.html
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Wed, 07/26/2017 - 09:58
नवीन
पोलकी शिवणारे टेलर तर वर्षानु वर्षे पुरुषच आहेत. साड्या नेसवल्या किंवा उतरवल्या तर काय बिघडले.
ती बाई आणि पुरुष बघून घेतील.
अपर्णाताईंचा टेलर स्त्री आहे का ?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 07/26/2017 - 10:23
नवीन
शिवणयंत्र यायच्या अगोदरपासून?
- Log in or register to post comments
व
वीणा३
Wed, 07/26/2017 - 09:11
नवीन
पिरा ताईंच्या शब्दा - शब्दाशी सहमत. माझ्या शेजार-पाजारी आणि नातेवाईकांमध्ये टीव्ही वरच्या सासू - सुनांच्या सिरिअल्स वरून सुद्द्धा घरच्या सुनेला बोलत असल्याची उदाहरणं आहेत. आणि आपल्या समाजात (सगळीकडेच खरं तर , त्या ट्रम्प चे वोटर्स, ते विविध बाबा-बापूंचे शिष्य, एमवे मध्ये अडकलेले ) अनेक कारणांनी प्रचंड भारावून जाणारी माणसं भरपूर आहेत. या लोकांना बरेचदा लॉजिकल विचार करता येत नसतो किंवा करायचा नसतो. किती तरी वेळा बाहेरून आलेल्या मुलीने कुठलाही मत मांडलेलं अगदी शिकलेल्या लोकांना पण आवडत नाही.
कितीतरी घरांमध्ये लहान मुलं ऐकत नसेल, तर पटकन म्हणतात, तो बघ शेजारचा कसा वागतो / किंवा टीव्ही मधला मुलगा बघ किती शहाणा आहे. त्यामागे लॉजिक नसतं, फक्त त्या मुलाने आपलं ऐकावं हि इचछा असते. आणि त्याच वेळी त्या मुलाने आपलं मनापासून ऐकावं म्हणून प्रयत्न करायची, किंवा त्याला समजून घ्यायची तयारी नसते. किंवा अगदी कितीतरी वेळा बॉस फक्त बॉस आहे म्हणून त्याला / त्याच्या बरोबर सांगण्याला नाव ठेवणारी लोक आसपास असतात. तो सांगतोय त्यात लॉजिक आहे, भले ते आपल्या मना प्रमाणे नसलं / आपल्याला जास्त कष्ट पडणार असलं तरीही बरोबर आहे, एवढा सारासार विचार कोणाला करायची इचछा नसते - खरंतर ते सोयीचं पण नसतं. त्यापेक्षा नावं ठेवणं हा अतिशय सोपा पर्याय उपलब्ध असतो
सुनेच्या बाबतीत अगदी शिकलेल्या घरांमध्ये, एरवी स्वभावाला चांगल्या असणाऱ्या माणसांमध्ये सुद्दा हक्क गाजवायची, तिने सगळ्या गोष्टीत आपलं ऐकलं पाहिजे हि वृत्ती उफाळून येते. आणि आजकाल मुलीना माहेरी नीट वागवत असल्यामुळे, अशा वागण्याशी पूर्वी सारखं जुळवून (सोशिक, सहनशील इ इ ) वागण्याची सवय नसते. वेग-वेगळी बघितली तर सासरची माणसं पण वाईट नसतात आणि ती सून पण वाईट नसते. एकूण परिस्तिथि - ज्यात ह्या टीव्ही सिरिअल्स, शेजार पाजारी आणि नात्यातली भोचक मंडळी आणि या अपर्णा ताईंसारखे बाईला आरोपी ठरवणारे (किंवा टोकाचे फेमिनिस्ट ) विडिओ चुकीची मत बनवायला करणीभून बनू शकतात. कारण ते प्रत्येक पार्टी ला स्वतःच्या सोयीने वापरता येतात.
एखाद्याला खरंच घर सावरायचं असेल, तर त्या माणसाने घरातल्या प्रत्येक माणसाकडून चूक होऊ शकते आणि त्यामुळे एक संसार मोडू शकतो हे गृहीत धरून असे विडिओ बनवावेत. पण बरेचदा तुम्हाला टार्गेट ऑडियन्स कुठलाच मिळत नाही कारण तुम्ही सगळ्यांनाच आरसा दाखवता आणि तो कोणालाच बघायचा नसतो. त्यापेक्षा टोकाचं फेमिनिस्ट होणं किंवा अपर्णा ताईंसारखं दुसरं टोक गाठणं सोयीचं पडत.
अवांतर - सासू-सासर्यांना नाव ठेवणाऱ्या / पटत नाही म्हणून घटस्फोट घेणाऱ्या मुलीला (सरसकट) चूक म्हणणाऱ्या पुरुषांपैकी किती लोक स्वतःच्या कंपनीला / बॉस ला शिव्या घालत असतील किंवा छोट्या छोट्या कारणावरून नोकरी सोडत असतील देव जाणे :P .
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »