Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

क
कोंबडी प्रेमी
Fri, 07/21/2017 - 14:17
🗣 445 प्रतिसाद
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
143577 वाचन

💬 प्रतिसाद (445)
अ
अत्रे Fri, 07/28/2017 - 06:23 नवीन
तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा.
माझ्या मते कोणतेही सामाजिक बदल जाणूनबुजून + स्टेप-बाय-स्टेप करता येत नाहीत (असल्यास याची उदाहरणे द्यावीत). दोन टाईपचे लोक असतात. एक टाईप - जे नेहमी समाजाचे अनुकरण करतात. दुसरा टाइप - जे स्वत:ला जे चांगलं वाटेल ते करतात - इतर लोकांचा विचार न करता. सामाजिक बदल हे फक्त दुसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांमुळेच शक्य होतात. समजा एका गावात पुरुशांनी टी-शर्ट घालून हिंडण्याची पद्धत नाही. सगळे फुल शर्ट घालून फिरतात. अशा वेळी एक कोणीतरी माणूस ठरवतो - की आज बनियन घालून बाहेर हिंडायचं. लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघतात. काही काळाने अजून काही लोक गरमीमुळे कंटाळून बनियनवर फिरू लागतात. अशा वेळी - असे म्हणून चालत नाही - की त्या माणसाने आधी टी - शर्ट पासून सुरवात करायला हवी होती. मुळात त्या माणसाने बनियन घालायचा निर्णय फक्त स्वत:चा विचार करून घेतलाय. आणि सामाजिक बदलांची सुरवात स्वत:पासूनच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 07/28/2017 - 07:43 नवीन
आणि नंतर टी-शर्ट विरुद्ध बनियन असे दोन समाजगट शेकडो वर्षे भांडत राहतात. त्यांच्या अस्मिता बनतात. त्यांच्या सुसंवादाची संभावनाच शून्य होते. मग दोन पैकी काय चांगलं किंवा दोघांचं कोणतं काँबिनेशन चांगलं इ इ ठरवायचा फोरमच शिल्लक राहत नाही. समाजाचा जो संमती द्यायचा मंच आहे, सिस्टिम आहे त्याला टाळून किंवा त्याच्याशी घर्षण करून जाण्यात बर्‍याच सुधारकांना एक प्रकारची मस्ती येते, विकृत आनंद येतो किंवा इगो आडवा येतो. या व्यक्तिगत घमेंडीचा आणि सुधारणेचा काही संबंध नसतो. हे लोक स्वतः सुधारक असले तरी सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था मुद्दाम म्हणून लोकांवर अन्याय करते आणि लोक तो मूर्खासारखा मान्य करतात अशी धारणा बाळगून असतात. व्यवस्थेशी भांडण करणे हा एकमेव पर्याय असतो अशी बुद्धि सुधारकांमधे का असते ईश्वर जाणो. वारकरी संप्रदायात सर्व जातीचे लोक असणे हे एक हळूहळू दिलेल्या डोसाचे उदाहरण म्हणून मी सांगेन (किती बरोबर आहे याची खात्री नाही.) कोण्या सुधारकाने धमाक्याने सुधारणा केली आणि त्या कलहाची बीजे आज नाहीत याची उदाहरणे आपण देऊ शकता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 07/28/2017 - 07:55 नवीन
समाजाचा जो संमती द्यायचा मंच आहे, सिस्टिम आहे त्याला टाळून किंवा त्याच्याशी घर्षण करून जाण्यात बर्‍याच सुधारकांना एक प्रकारची मस्ती येते, विकृत आनंद येतो किंवा इगो आडवा येतो
शक्य आहे. पण सुधारक (किंवा पहिल्यांदा बदलाची सुरवात करणारे लोक) यांनी समाजाला समजावून सांगायलाच पाहिजे असे कुठे आहे? ते म्हणतात - समाज गेला खड्यात!
वारकरी संप्रदायात सर्व जातीचे लोक असणे हे एक हळूहळू दिलेल्या डोसाचे उदाहरण म्हणून मी सांगेन (किती बरोबर आहे याची खात्री नाही.)
या बाबतीत माहिती नाही, अजून वाचायला आवडेल.
कोण्या सुधारकाने धमाक्याने सुधारणा केली आणि त्या कलहाची बीजे आज नाहीत याची उदाहरणे आपण देऊ शकता का?
नाही. किंबहुना अशा फार कमी गोष्टी असतील ज्यात समाजातल्या सगळ्या लोकांचे एकमत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सूड Wed, 07/26/2017 - 11:41 नवीन
त्या बाई तशाही एरवीच धन्यवाद आहेत.
अभ्याचा प्रतिसाद वाचल्यानंतर हे वाक्य काढून टाकावं ही सा सं ला विनंती त्या खरोखरीच एवढी चांगली कामं करत असतील, तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ठीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पिलीयन रायडर Wed, 07/26/2017 - 14:41 नवीन
केवळ तू प्रतिसाद दिलास म्हणुन उत्तर. तू विपर्यास करुन घेतलास हे पाहुन आश्चर्य जास्त वाटलं. एक तर तू व्हिडीओ पाहिला आहेस का हा प्रश्न पडलाय. बहुदा नाही पाहिलास. त्यामुळे त्या "सगळ्यांना स्वयंपाक आलाच पाहिजे" असं म्हणत नाहीयेत हे तुझ्या लक्षात आलेलं नाही. मी काय लिहीलंय ते सोडा, शहाण्या माणसाने त्यांचे व्हिडीओ पाहिले तर त्याला हे उपदेश "सर्वांना" नाहीत हे पहिल्या २-४ मिनिटात कळेल. दुसरं असं की मला स्वयंपाक येतो, ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ५ वर्षाच्या मुलाला स्वयंपाकघरातला लहान कामांमध्ये सोबत घेतलंय आणि नवरा - वडिल - भाऊ - मेव्हणा इ पुरुष सुद्धा घरात बरोबरीने स्वयंपाक करतात. (दोन्ही आजोबा सुद्धा पुरणपोळ्या करायचे. ) तेव्हा स्वयंपाकाला कमी लेखणे किंवा पुरुषांच्या स्वयंपाकाचे कौतुक असणे, ह्या दोन्ही गोष्टींची मला गरज नाही. बळंच नसते अर्थ काढु नये. प्रश्न केवळ आणि केवळ "बायकांनीच" स्वयंपाक केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे. आता महत्वाचं, हे काही त्यांच्या एकट्याच्या नवर्‍या बद्दल नाही चालु. "नवर्‍या समोर काहीच चालत न स तं. हे पक्कं लक्षात ठेवा" हा जाहिर सल्ला आहे माऊलींचा. म्हणूनच म्हणते, आधी व्हिडीओ पहा. मग बोला. कपड्याविषयी म्हणशील तर कुणीच कुणाला हे सांगु नये. सोप्पंय. तात्पर्य - व्हिडिओ पहावे आणि मग मत व्यक्त करावे. अवांतर - बाई धन्यवाद आहेत ह्याशी सहमत. त्यांचे गहिवर मला नाटकी वाटतात. ४५८ रोज भाषणं देणार्‍याला रोज गहिवरुन येत नसतं किंवा तो ते आयुष्यात पहिल्यांदा बोलत नसतो की त्याला भरुन यावं. ज्यांना ते बघुन उमाळे येत आहेत, ते नक्की कशामुळे येत आहेत ते ज्याचं त्यानी तपासुन घ्यावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 07/26/2017 - 14:50 नवीन
प्रश्न केवळ आणि केवळ "बायकांनीच" स्वयंपाक केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे.
हे असं त्यांचं म्हणणं असेल तर वरचा अख्खा प्रतिसाद बाद आहे. आपल्याला जे काही लागतं खायला ते त्या त्या व्यक्तीला बनवता यायला हवं. ना पुरषांनी सगळं करायचा पत्कर घेतलाय ना बायकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अभ्या.. Wed, 07/26/2017 - 15:14 नवीन
बाद बिद कै नै रे सुडक्या. आम्ही स्वतः शिव्या खाल्लेल्या आहेत त्यांच्या. मुलांचा ग्रुप होता. सकाळी लवकर कार्यक्रम अस्ल्याने त्यांनी विचारले नाष्ता कुणीकुणी केलाय. बरेच जण नकार दिले. एकाने घरी बनवला नाही असे उत्तर दिले. सगळ्यांची सामूहिक हजामत झालेली. लाजा वाटत नाहीत का? तुमची आंघोळ करुन भांग पाडून डिओ मारण्याच्या वेळात आई आक्खा स्वयंपाक करते, तिनेच सर्व रोजच्या रोज करायचा पत्कर घेतलेला नाही, तिच्यासारखी चव जमत नसेल तर मदत करा, भाज्या चिरुन द्या, भांडी घासा, झाडून काढा, आठवड्यातला एखादा दिवस स्वतः सर्व घरासाठी सिंपल नाष्टा तयार करा. नुसती अमेरिकेची स्टाईल कपड्यात बोलण्यात करण्यापेक्षा कामात अमेरिकनांचे अनुकरण करा, स्वावलंबी व्हा, खाल्ली ताटे धुवुन ठेवणे, उचलणे, कपडे धुणे हे व्यवस्थित आणि सर्वांनी केलेच पाहिजे हे उपदेश आम्ही स्वतः ऐकलेले आहेत. स्वयंपाक, घरातील लहानसहान कामे आलीच पाहिजे मग कॉलेजचा मुलगा असो की मुलगी ह्यावर त्या ठाम असतात हे निश्चित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
A
arunjoshi123 Wed, 07/26/2017 - 15:36 नवीन
इथे बर्‍याच बायका बाईंच्या जेन्यूइननेसवरच शंका घेत आहेत. तुझा प्रत्यक्ष अनुभव त्यांचे बायस, अर्थाचा अनर्थ करायच्या पद्धती आणि एक वाट चुकलेला स्त्रीवादी आकस इ इ ना उघडा पाडतो. बेसिकली परंपरावादी लोक जेव्हा काही म्हणायला जातात तेव्हा पुरोगाम्यांची इंद्रिये काम करणं बंद करतात असं म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 07/26/2017 - 18:55 नवीन
अभ्याराव, सोडाहो! तुमचे अनुभव खरे कशावरून? तुमचे हे त्यांच्याबद्दलची उमाळे खोटेही असू शकतात! ;) मी वर एका प्रतिसादात म्हटले होते की त्यांचे गहिवरनेही काहींना खोटे वाटू शकते आणि त्याला नाईलाज आहे, सिद्ध झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
A
arunjoshi123 Wed, 07/26/2017 - 15:28 नवीन
प्रश्न केवळ आणि केवळ "बायकांनीच" स्वयंपाक केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे.
या वाक्यात व्याकरणाच्या जबरदस्त चूका आहेत. १. ते "स्वयंपाक केला पाहिजे" असं नाही - "आला पाहिजे" असं आहे. २. "केवळ आणि केवळ बायकांनीच" असं देखिल बाई अजिबात म्हणालेल्या नाहीत. त्या "सर्व बायकांना" वा "प्रत्येक स्त्रीला" असं म्हणालेल्या आहेत. म्हणून ते सुधारित विधान सर्व स्त्रीयांना स्वयंपाक आलाच पाहिजे असं आहे. मग - १. काही पुरुषांना आला तरी चालेल. २. काही पुरुषांनी केला तरी चालेल. असा अर्थ निघतो. ==================== बाईंनी स्वयंपाकात मदत करणार्‍या नवर्‍यांचं कौतुक केलं आहे. पण अशी अपेक्षा प्रत्येकाकडून ठेऊ नका असं म्हटलं आहे. ==================== काही काही व्यक्तिंची अभिव्यक्त होण्याची इडिओसिंक्रसी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सानझरी Wed, 07/26/2017 - 15:49 नवीन
बाईंनी स्वयंपाकात मदत करणार्‍या नवर्‍यांचं कौतुक केलं आहे. पण अशी अपेक्षा प्रत्येकाकडून ठेऊ नका असं म्हटलं आहे.
लोल, मग प्रत्येक बायकोने स्वयंपाक केलाच पाहिजे हा आग्रह का? अपेक्षा नसतीलच ठेवायच्या तर दोघांनिही नका ठेवू ना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ग
गामा पैलवान Tue, 07/25/2017 - 00:02 नवीन
पिराताई,
मी सिन्सिअरली विचारतेय. स्त्रियांना पुरुषांकडुन काय मिळतं?
मला खरंच माहीत नाही. पण स्त्रियांच्या अपत्यांना एक बाप नक्कीच मिळतो. किंवा मिळावा अशी अपेक्षा तरी असते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 07/25/2017 - 08:41 नवीन
स्त्रियांच्या अपत्यांना एक बाप नक्कीच मिळतो.
पण पुरुषांच्या सर्व अपत्यांना तो मिळतो का (बाप) ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 07/25/2017 - 13:47 नवीन
स्नेहांकिता, तुमचा प्रश्न योग्य आहे. मात्र पिराताईंनी विचारलेला प्रश्न स्त्रियांना काय मिळतं हा होता. त्यामुळे माझं उत्तर स्त्रीपुरुषांच्या अपत्यांना बाप मिळतो असं असलं तरी पिराताईंचा संदर्भ ठळक करण्यासाठी केवळ स्त्रियांचा उल्लेख केला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Tue, 07/25/2017 - 13:56 नवीन
आले लक्षात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोदक Tue, 07/25/2017 - 14:20 नवीन
फाऊल.. फाऊल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Wed, 07/26/2017 - 09:39 नवीन
तुझं काय गेलं रे ? अग्नितैलपुरवठा कमी पडला काय ? विघ्नसंतोषी मेला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 07/26/2017 - 12:17 नवीन
तुम्ही खूपच लवकर मुद्दा मान्य केलात... तोही फार वाद न घालता.. म्हणून मी फाऊलचा लाल झेंडा फडकवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
पुंबा Tue, 07/25/2017 - 06:44 नवीन
अजोंच्या मुद्दा लढवण्याच्या आणि पिराताईंच्या संयत आणि मुद्देसूद प्रतिसाद करण्याच्या कौशल्याला सलाम. बाकी, बाई मुलगी बाहेर कितीही यशस्वी करियर करत असेल तरीही घरकाम, देवधर्म साग्रसंगीत केलंच पाहिजे असे जे आग्रहाने सांगतात ते ऐकणार्‍या(त्यांचेच असे नव्हे अश्या प्रकारे 'संस्कार' करणार्‍या कोणाचेही) मुली सुपरवूमन बनण्याच्या नादात प्रकृतीची वाट लावून घेतात असे वाटते. बाईंचे म्हणणे पटत आजिबात नाही आणि नवरा बायकोने एकमेकाशी, त्यांच्या कुटुंबांशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे. बाईंचं भाषण ऐकूण लोक लगेच बायकांना घरकामाला जुंपतील असे नाही. तेव्हा त्यांना पुरुषांच्या बाजूने लढा द्यायचा आहे तर देऊ द्या, ज्यांना त्यांचे पटत नाही त्यांनी विरोधी बाजू लढवावी. विनोदबुद्धी मात्र भारी आहे बाईंना.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 07/25/2017 - 07:25 नवीन
""""नवरा बायकोने एकमेकाशी, त्यांच्या कुटुंबांशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे.""" ==>> विशेष आवडलं. घरामधील वाद वाढायला त्रयस्थ लोकांचा जास्त हात असतो असे माझे मत आहे. माझेच उदा घायचे तर : मी जन्मापासून माळकरी माणूस. माझी बायको लग्नाआधी एक सोमवार सोडला तर एकादशीलासुद्धा मांसाहार करणारी, पण लग्नानंतर बाहेरच्या लोकांनीच तिच्यावर माळ घालण्यासाठी दबाव आणला. मग आमच्या घरचे पण हुरळले. हा प्रश्न आम्ही दोघांनीच चर्चेने सोडवला. म्हातारी करत होती कुरकुर काही दिवस.बायकोच्या ऐकण्यात गेला वगैरे. मी तिला म्हंटलं लहानपणा पासून बघतोय म्हतारच तुला अंघोळीला पाणी विसणून देतंय. मग गप्प बसली. विषयच बंद ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Tue, 07/25/2017 - 07:30 नवीन
मस्त साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Tue, 07/25/2017 - 07:51 नवीन
नवरा बायकोने एकमेकाशी, त्यांच्या कुटुंबांशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे.
लेट मी रिफ्रेजः गुन्हेगार नि व्हिक्टिम्सनी, त्यांच्या संपत्तीच्या स्टेकहोल्डर्सशी कसे वागायचे हे ठरवण्यात समाजाचा घंटा स्टेक नाही असे वाटते, ते त्यांनीच आपापसात सुसंवादातून ठरवावे असे माझे मत आहे. न्यायपालिका गेली उडत. कायदे गेले उडत. समाज गेला उडत. ==================================== आता थोडं यावरच पुढे - कोणत्याही नात्यातली काही मूळ तत्त्वे समाजातून उचलायची असतात आणि मग त्याचं थोडं थोडं स्वतःच्या चवीप्रमाणे कस्टमायझेशन करायचं असतं. कोणासोबत कसे वागायचे याला बेंचमार्क हवाच. अर्थात हे बेंचमार्क हळूहळू सुधारायचे सध्याला वाईट असले तर. मनुष्यास कोणाशी कसे वागावे याची मूलभूत अक्कल असती तर शाळेत सतत संस्कार करावे लागले नसते. आयुष्यभर सतत लोकांशी कसं वागावं हे शिकावं लागलं नसतं. स्वतःच्या किंवा समाजाच्या एकूण व्यवस्थितिसाठी कसं वागायचं हे शून्यातून ठरवणं हे सामान्यांचं विसरा, अगदी तत्त्ववेत्त्यांना कठीण आहे. आणि असे काही वर्कींग रुल्स बनवायची अक्कल असली तरी बुद्ध्या स्वार्थापोटी बरेच असे चांगले प्रोटोकॉल पाळले जाणार नाहीत. आता हे पहा - "वडिलधार्‍यांशी बाय डिफॉल्ट आदराने वागावे. त्यांचे वर्तन कडक असेल तर अ‍ॅडजस्ट करून घ्यावे" आणि "वडिलधार्‍यांना विशेष वागणूक देऊ नये. त्यांची लायकी असेल तर सन्मान कमवतील." समाज हा मूलतः आणि बहुधा क्रिमिनल नसतो असं मानून चलायचं असेल तर दोन पैकि काय सामाजिक प्रथा असायला हवी? ज्या गोष्टिंना कायद्याचं फ्रेमवर्क नाही त्या गोष्टींना फ्रेमवर्कचीच आवश्यकता नाही हे म्हणणं फार विचित्र आहे हो. अशी फ्रेमवर्क काढून घेतल्याने संसार हे संघर्षपूर्ण झाले आहेत, आपण भांडू नये हे कळेपर्यंत (नशिबाने कधी कळल्यास) कितितरी वर्षे वाया जातात. लहानपणी "बायकोवर हात उचलणाराचे" नाव १-२ महिने गावात गाजत असे. त्या माणसाने पुन्हा तसे केले तर सरळ शेजारी जाउन त्यालाचा ठोकत असे. स्त्रीयांवर हात उचलू नये ही प्रथा. आता शहरात लोकांच्या व्यक्तिगत आयुस्यात ढवळाढवळ करू नये हा संकेत इतका प्रबल झाला आहे कि सामाजिक सुरक्षा नावाचा प्रकार उरलेलाच नाही. मग कोणत्या फ्लॅटमधून काय आवाज येतोय आणि कोणाचा चेहरा किती मूलूल दिसतोय याचेशी आपल्याला देणं घेणं उरलेलं नाही. समाजाचा जो काही आय क्यू आहे, अशिक्षण आहे त्याप्रमाणे समाज पुढारलेल्या लोकांना बरेच मूर्खपणे करणे अपेक्षा करतो. त्या मूर्खपणांत सहभागी नाही झालं तर चिडचिड करतो, मात्र समाजाचं ओरियंटेशनच लोकांना डिस्टर्ब करणे आणि त्यांच्यावर अन्याय करणे असं असतं ही धारणा चूक आहे. सबब सामाजिक अपेक्षा प्रत्येकाच्या जीवनाच्या अभिन्न हिस्सा असायला हव्या.
बाई मुलगी बाहेर कितीही यशस्वी करियर करत असेल तरीही घरकाम, देवधर्म साग्रसंगीत केलंच पाहिजे असे जे आग्रहाने सांगतात ते ऐकणार्‍या(त्यांचेच असे नव्हे अश्या प्रकारे 'संस्कार' करणार्‍या कोणाचेही) मुली सुपरवूमन बनण्याच्या नादात प्रकृतीची वाट लावून घेतात असे वाटते.
समजा कोण्या मुलीची क्षमता सुपरवुमन होण्याची नसेल तर १. बाईंने प्राधान्य दिलेल्या गोष्टी २. स्त्रीमुक्ती गोष्टि पैकी काय प्राधान्य असावं? का? (बाई सुपरवुमन आहेत, त्या तसं म्हणत नाहीत, पण आपण म्हणता तसा प्रभाव मुलींवर त्या निश्चित पाडणार. आणि ते अनिष्ट आहे.)
विनोदबुद्धी मात्र भारी आहे बाईंना.
बघा ना, तेवढं तरी चांगलं बोलायचं बिचारीबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
क
कोंबडी प्रेमी Tue, 07/25/2017 - 08:01 नवीन
( नवरा बायको ) आणि (गुन्हेगार आणि इतर स्टेक होल्डर्स ) हि अनोलोजी ?? उगीच वादे वादे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 07/25/2017 - 08:12 नवीन
काय पण शब्द टाकाहो,, हाव डज दॅट मॅटर? तंटा असला पाहिजे. कोंबडी प्रेमी आणि कोंबडी सेवन प्रेमी असे शब्द टाका. माझं काय जातंय? खाली आहेच उदाहरण माळेचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी
स
सतिश गावडे Tue, 07/25/2017 - 07:06 नवीन
या धाग्याच्या निमित्ताने बरेच दिवस घरी पडून असलेले मंगला सामंत लिखित "स्त्री पर्व" वाचायला सुरुवात केली आहे. Image removed. मातृसत्ताक ते पुरुषप्रधान पद्धती हा मानवजातीचा प्रवास रोचक आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 07/25/2017 - 08:43 नवीन
काय ठरलं मग? कुणी बडवायच्या भाकर्या?
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 07/25/2017 - 08:56 नवीन
भाकरी माहित नाही पण किबोर्ड चांगलाच बडवलाय सर्वांनीच!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 07/25/2017 - 09:06 नवीन
अनाहिता पेक्षा जोशी सरांनी गोल गोल भाकऱ्या (पक्षी किबोर्ड) बडवल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
A
arunjoshi123 Tue, 07/25/2017 - 10:32 नवीन
ज्यांच्यासमोर डोके बडवून घ्यायची पाळी आहे त्यांच्यासमोर फक्त किबोर्ड बडवला आहे. ============================= आपला नवरा सामंजस्याने सगळे प्रश्न, मतभेद मिटवतो म्हणजे जगात सर्वच ठीकाणी ते संभव आहे असा आत्मविश्वास. आपण नवर्‍याला काही इजा केली नाही म्हणजे असा कोणता प्रॉब्लेमच नसतो असा आत्मविश्वास. पडते घेणे (जे देश सुद्धा करतात, कंपन्या करतात) असं काही नसतंच, समता नाहीतर काडिमोड हा अप्रोच हाच खरा अप्रोच. आणि हो, पिढ्यान पिढ्यांचं शोषण ... त्याचा राग आत्ता...उत्तम पिता, भ्राता, पति, मूल असताना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
क
कपिलमुनी Tue, 07/25/2017 - 09:43 नवीन
एका भाषणाच्या वेळी एका महिलेने त्यांना तुम्ही भाषणे देत गावभर हिन्डत असताना तुमच्या घरी कोण भाकर्‍या बडवता ? असा प्रश्न विचारल्यावर बाई जाम पिसाळली होती.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Tue, 07/25/2017 - 09:54 नवीन
आता हे कुठल्या क्लिप मध्ये बघितलं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Tue, 07/25/2017 - 10:21 नवीन
तिच्यापेक्षा क्रॅक स्त्रीवादी स्त्रीया आहेत. पण असो. हे एक रत्न http://indiatoday.intoday.in/story/anyone-who-denies-being-a-feminist-is-an-idiot-twinkle/1/811781.html हे अजून एक रत्न http://www.india.com/news/india/men-do-not-commit-suicide-never-heard-a-single-such-case-says-union-minister-maneka-gandhi-2281808/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
आ
आदूबाळ Tue, 07/25/2017 - 10:25 नवीन
तुम्ही भाषणे देत गावभर हिन्डत असताना तुमच्या घरी कोण भाकर्‍या बडवता ?
लोल! एक नंबर! कोणत्या व्हिड्योत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Tue, 07/25/2017 - 10:37 नवीन
व्हिड्योत असो किंवा नसो पण लॉजिकली पाहिले तर लगातार ४५८ दिवस फिरणाऱ्या आईंच्या घरी भाकरी कोण बडवत असतील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
व
विशुमित Tue, 07/25/2017 - 10:28 नवीन
हायला खरंच की हे बाईंच्या घरातील "भाकरी बडवायचे" डोक्यातच नाही आले. बाईंची (आईंची) भाषण देण्याची फी किती असते कोणाला माहित आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Tue, 07/25/2017 - 10:34 नवीन
बाईंची (आईंची) भाषण देण्याची फी किती असते कोणाला माहित आहे का?
अज्ञानामूलक असा आत्तापर्यंतचा सर्वात लाजिरवाणा प्रतिसाद. बधाई हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 07/25/2017 - 10:45 नवीन
प्रश्न अज्ञानमूलक असेल पण लाजिरवाणा कसा ते नाही कळलं. इथे जेवढे या चर्चे मध्ये सहभागी आहेत त्या पैकी किती जणांना माहित की आई किती फी घेतात किंवा फुकट ज्ञान वाटतात. कीर्तनकार, वक्ते, सेमिनार घेणारे, पोवाडे गाणारे, गोंधळी, नाटककार, एका स्वरात शिवाजी महाराजांवर भाषण देणारे (नितीन , आडनाव विसरलो ) वगैरे सगळे जण समाजप्रबोधन केल्याच्या बदलात पाकिटे घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पुंबा Tue, 07/25/2017 - 10:49 नवीन
फी घेत नाहीत असे ऐकले आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 07/25/2017 - 10:53 नवीन
फी घेत नाहीत हे शक्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Tue, 07/25/2017 - 11:19 नवीन
नाहीत घेत, येण्याजाण्याचा खर्च घेत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
A
arunjoshi123 Tue, 07/25/2017 - 12:08 नवीन
फी घेत नाहीत हे शक्य आहे का?
ज्यांच्यासाठी पेड स्त्रीवादी स्त्रीया हाच निरीक्षण संच आहे त्यांना हे नवल वाटणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अभ्या.. Tue, 07/25/2017 - 12:31 नवीन
अपर्णाबाई रामतीर्थकर व्याख्यानाला आल्यावर फी घेत नाहीत. मानधन दिले तर घेतात पण बर्‍याचदा त्या गावातील अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकतात. गरीब महिलांची कोर्ट प्रकरणे पण त्या फुकटात लढतात. सोलापूर आणि जवळपासच्या जिल्ह्यातील फसवल्या गेलेल्या (अल्पवयीन वगैरे) मुलींचे रिमांडस, गुन्हेगारांवर गुन्हानोंदणी अशा प्रोसीजरमध्ये स्वतः अटेंड राहुन मदत करतात. मुलींनी स्वसंरक्षण करावे आणि शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे कसे याचे, न्याय, कायद्याचे, त्यातील महिलाविषयक तरतूदींचे, सरकारी योजनांचे मार्गदर्शन करतात. कुटुंबातील मतभेद, घटस्फोटासारख्या प्रकरणात समुपदेशक म्हनून काम करतात. पोलीस, कार्यालये अशा ठिकाणी महिलांवर होणार्‍या अत्याचारात महिलांची बाजू मांडतात. त्यांचे पती (स्व. अरुण रामतीर्थकर) दै. सोलापूर तरुण भारतमध्ये कित्येक वर्षे रोखठोक नावाचे सदर सातत्याने लिहित होते. सदैव व्हीलचेअरवर असतानाही त्यांनी प्रखर हिंदुत्ववादी लेखनाचा वसा सोडला नाही. सामाजिक घटना, राजकारण आदि विषयांवर वेगळ्याच अँगलने स्पष्ट आणि सडेतोड लिहायच्या त्यांच्या शैलीसाठी रविवार तरुण भारत प्रसिध्द होता. अगदी शुध्द संघ विचारांचा पाईक असलेला हा लेखक भाजपाच्या चुकाही निरपेक्षपणे दाखवून देत असल्याने संघ परिवारात त्यांच्या मताला भरपूर मान होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
क
कपिलमुनी Tue, 07/25/2017 - 12:52 नवीन
अपर्णाबाई रामतीर्थकर चांगले काम करत आहेत हे वाचून आनंद आणि आदर वाटला! त्यांच्या चांगल्या कामाला _/\_ फक्त त्यांच्या स्त्र्यीयांविषयीच्या जोखडवादी मताला राम राम ! उदडामाजी काळे गोरे ! आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Tue, 07/25/2017 - 13:33 नवीन
आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे.
हांगाश्श्श्शी. यु ट्युबवर आशिष चंचलानी सारखे कित्येक आईबहीणींवर शिव्याचा रतीब घालून ५ - ५ लाख व्ह्युअर्स मिळवतेत. त्याने काही फरक पडत नाही. समाज लावणीने बिघडत नाही की किर्तनाने सुधरत नाही. आपण आपले बघावे चांगले. हैकिनै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
पद्मावति Wed, 07/26/2017 - 11:20 नवीन
अपर्णाबाई रामतीर्थकर चांगले काम करत आहेत हे वाचून आनंद आणि आदर वाटला! त्यांच्या चांगल्या कामाला _/\_ फक्त त्यांच्या स्त्र्यीयांविषयीच्या जोखडवादी मताला राम राम ! अगदी सहमत. त्यांचे समाज कार्य मला माहीत नव्हते. उदडामाजी काळे गोरे ! आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे. +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 07/25/2017 - 14:02 नवीन
अभ्याराव, +१००००. खरंतर मी तुम्ही वर नोंदलेल्या गोष्टीच आधी ऐकल्या होत्या नंतर त्यांची भाषणे ऐकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रन्गि पाउस Tue, 07/25/2017 - 10:51 नवीन
काही क्लिप्स मध्ये त्या स्वत:च मला बोलवा पुन्हा पुन्हा बोलवा असं सांगत आहेत. त्या फुकट येत नसाव्यात ...आणि येऊ हि नव्हे ...कारण घरी भाकरी बडवायला कुणी असो नसो ... चूल पेटती ठेवावी लागेलच ... दुसर एक वाटले म्हणजे हि भाषण देत फिरत असतांना त्या वकिली कधी करतात कोर्टात ? अवघड आहेट प्रश्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 07/25/2017 - 11:16 नवीन
त्या फी घेत नाहीत, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्या फी घेत नाहीत हे त्या भाषणाच्या शेवटी सांगतात! बाकी त्या वकिली केव्हा करतात हा प्रश्न अतार्किक आहे. मला एक सांगावेसे वाटते, त्यांच्या काही अतर्क्य किंवा पुरातन/सनातन विचारांवर आक्षेप असेल तरी त्यांचे काम आणि समाजाचे देणे म्हणून त्यांनी केलेली सेवा याची थोडी माहिती घेऊन टीका करायला हरकत नसावी. वरील एका प्रतिसादात तर त्यांना क्रॅक संबोधले गेले, हे सभ्यपणाच्या कुठल्या निकषांमध्ये बसेल? राहता राहिला प्रश्न (परत एकदा) त्यांच्या घरी भाकऱ्या बडवण्याचा तर मला वाटते सगळा घोळ तिथेच तर आहे. त्या तुम्ही चंद्रावर आहात तर तिथेही भाकऱ्या भडव्या असं सांगायचा प्रयत्न करत नाहीयेत हे न समजण्याइतकं क्लिष्ट आहे का? तुम्ही जेव्हा घरी असाल तेव्हा करा असा त्याचा अर्थ नसतो का? शिवाय रोजच करा, नवऱ्याची मदत घेऊ नका, किंवा एखाद दिवशीही पार्सल मागवू नका हे उप-अर्थ कशाला? मला आता असे वाटू लागले आहे कि इथे बरेच लोक पूर्ण भाषण न बघताच स्वतःला खटकणारे दोन तीन वाक्य शोधून (फॉर द सेक ऑफ डिबेट) मुद्दे मांडत आहेत. शिवाय वरून "भाषण ऐकवले गेलेच नाही" वगैरे पळवाटा. हैला आमी तर ओवेसी बंधूंचं भाषणबी "काय म्हणणं हाये" म्हणून ऐकून घेतो. असो ज्याचा त्याचा दृष्टिकोन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
A
arunjoshi123 Tue, 07/25/2017 - 12:06 नवीन
अगदी अगदी. ================== वाचायला नको, ऐकायला नको. डिटेल जाणून घ्यायला नको. त्यांची प्रेरणा परंपरावाद आहे इतके त्यांना क्रॅक म्हणायला खूप आहे. ==================== अपर्णाताईंनी खरं तर बायकांच्या घरगुती वागण्यावर खूप ताशेरे ओढले आहेत म्हणून ९३५ संसार उध्वस्त न होऊ देणे हे काम कोणी पाहत नाही. शिवाय दुष्ट, क्रिमिनल स्त्रीयांनी देशोधडीला लावलेले पुरुष हा त्यांचा विषय असल्याने "सर्व सुखवस्तू" बायकांना त्यांची विधाने कुठुनही उचलून संदर्भहिनतेने झोडणे गंमतशीर वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
विशुमित Tue, 07/25/2017 - 12:24 नवीन
त्यांनी जरी ९३५ संसार उध्वस्त होण्या पासून वाचवले असले तरी त्यांच्या भाषणांमध्ये ९.३५ कोटी (आकडा काल्पनिक आहे) संसारामध्ये स्फोट घडवण्याचे पोटेन्शियल आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. बाकी त्यांच्या घरी भाकरी कोण बडवतात ह्याच उत्तर काही दिले नाही कोणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा