Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

क
कोंबडी प्रेमी
Fri, 07/21/2017 - 14:17
🗣 445 प्रतिसाद
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
143577 वाचन

💬 प्रतिसाद (445)
द
दीपक११७७ Mon, 07/24/2017 - 12:46 नवीन
पुरुष जसा पत्निवर पैसे उधळतो तसे पत्नि देणार आहेत का त्यांनी कमवलेला पैसा पुरुषांना ते ही त्या चंद्रावर असताना. उलट पुरुष तसा चंद्रावर असला तर भरपुर पैसे देतो बायकोला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
र
रेवती Sun, 07/23/2017 - 22:13 नवीन
भूमिका (= स्टिरिओटाईप्स ) उपलब्ध असणे ही एक चैन आहे. ही नवराबायकोंची चैन नाही. तर त्यांच्या मुलाबाळांची चैन आहे. अत्यंत सहमत पण हे करताना नवराबायकोंनी एकमेकास पूरक ठरले नाही तर मुलांची चैन आईवडिलांना मारक ठरण्याची शक्यता आहे. सुदैवाने तुम्ही उल्लेखलेली चैन मी पुष्कळ केली. त्यावेळी आईवडिलांस काय तारेवरची कसरत करावी लागते ते लक्षात आले नव्हते. आज माझं मूल ही चैन करतय तेंव्हा कंबरमोडी झालिये कारण मी गोल भाकरी थापली नाही किंवा गोल पोळी नाही तरी नवरा त्याजागी उभा राहतो. दोघांना घरातील बाहेरील दोन्ही गोष्ती कराव्या लागतायत. नवर्‍याचे जास्त हाल आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पिलीयन रायडर Mon, 07/24/2017 - 02:07 नवीन
अगं ह्यालाच तर सहजीवन म्हणायचं ना! तू कमी पडतेस तिथे तुझा नवरा घट्ट उभाय, तुझा नवरा नाही तिथे तू ठाम आहेस. मुदलात उपलब्ध भुमिकाच वापरायला हव्यात असं कोण म्हणलंय? स्त्री आणि पुरुषाची त्यांच्या संसारातली भुमिका काय असावी हे ते दोघं ठरवतीलच की. कुणी म्हणेल बाई घर सांभाळेल, पुरुष पैसा आणेल. कुणी म्हणेल बाई कमावेल, पुरुष घर बघेल. कुणी म्हणेल दोघं मिळुन कमवु - दोघं मिळुन भाकर्‍या बडवु! हे कोण टिकोजीराव लागुन गेलेत लोक जे सांगणार की कुणाच्या भुमिका काय? मी माझं पाहिन की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विशुमित Mon, 07/24/2017 - 08:28 नवीन
मला काही सैपाक वगैरे येत नाही. आईने काही शिकवलंच नाही (रोज हेच टोमणे ऐकतो). पण मी जर हाताखाली असेल तर आमची मंडळी २०-३० जणांचा सैपाक सहज बनवते. ऑपेरेशन करताना सर्जनला ते कात्र्या वगैरे देणारा असतो ना तसे काम माझ्याकडे असते. असलं काम माझ्या शिवाय कोणीच चांगले करू शकत नाही ही तिची ठाम धारणा आहे. घरात जेव्नाळीचा काही कार्यक्रम असेल तर सुट्टी काढून थांबवलं जाते. एवढं माझं डिमांड आहे. अशा लय यशस्वी पंगती उठवल्या आहेत. मी हे काम उघड उघड करतो. पहिल्या पहिल्यांदा नातेवाईक/मित्रमंडळी माझ्याच घरी जेवून खाऊन जाताना खोचक बोलायचे पण नंतर समजायला लागले की हे सगळे बैलभाडे आहेत. बाहेर दाखवतात आम्ही किती मर्द मावळे आहोत पण घरात दार लावून केर काढतात आणि अंथरूण पण टाकतात. असो.. अपर्णाबाईंचा (सासूबाई म्हणू का?) ऑडिओ एकदा आमच्या मॅडमला ऐकायला दिला होता. ३-४ मिनिट ऐकल्यानंतर त्यांनी आमच्यापुढे कांदे आणि भाज्या ठेवल्या आणि म्हणाल्या "चिरून ठेवा तो पर्यंत ऑडिओ नीट ऐकते". पुढे काय झाले ते नाही सांगत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अप्पा जोगळेकर Mon, 07/24/2017 - 09:49 नवीन
बाहेर दाखवतात आम्ही किती मर्द मावळे आहोत पण घरात दार लावून केर काढतात आणि अंथरूण पण टाकतात. असो.. केर काढल्याने, अंथरुणे टाकल्याने, स्वयंपाक केल्याने मर्द मावळे पणाला बाधा येते का. खरेतर या गोष्टी सगळ्यांनाच आल्या पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 07/24/2017 - 10:49 नवीन
शहरातलं मला जास्त माहित नाही पण गावाकडे मर्द असली कामे करत नाहीत, अशी वदंता (अफवा) आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
आ
आदूबाळ Mon, 07/24/2017 - 10:02 नवीन
नंतर समजायला लागले की हे सगळे बैलभाडे आहेत.
बैलभाडे म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अभ्या.. Mon, 07/24/2017 - 10:12 नवीन
आमच्याकडे ह्या शब्दाची व्युत्पत्ती बाईलभाडे अशी आहे. बायकोच्या/बाईच्या आज्ञेत असणारा (भाड्या हे प्रेमाचे मित्रसंबोधन) असा. त्याचा बैलगाडीच्या भाड्याशी किंवा बैलाच्या भाड्याशी संबध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 07/24/2017 - 10:21 नवीन
हां! हे जास्त लॉजिकल आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
विशुमित Mon, 07/24/2017 - 10:32 नवीन
टायपो मिस्टेक झाली. बाईल भाडे हाच शब्द बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चिनार Mon, 07/24/2017 - 10:39 नवीन
ते जाऊद्या..पण हा शब्द लयच आवडल्या गेला आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अप्पा जोगळेकर Mon, 07/24/2017 - 12:45 नवीन
जो बायको भाड्याने देतो तो भाड्या असे राजवाडेंच्या पुस्तकात वाचले. म्हणून बाईलभाड्याचा अर्थ मला वेगळाच वाटला. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चष्मेबद्दूर Mon, 07/24/2017 - 16:52 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 07/23/2017 - 17:11 नवीन
काहीही असो. हि बाई नेहमी सर्व स्त्रियांच्या हिटलिस्ट वर असते. जर स्त्रियांची अतिरेकी संघटना असती तर हीचं काय झाल असतं?? :-)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 07/23/2017 - 17:52 नवीन
सगळ्या शस्त्रांच्या कंपन्या बंद पडल्या असत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 07/23/2017 - 21:09 नवीन
ह्या बाईंच काही वेळा खर वाटत. त्यांचं म्हणन बरोब्बर आहे. मुली कितीही पुढे गेल्या तरी घर सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच असते. त्या साठी काही तडजोडी कराव्या लागतात. पण हे आजकालच्या मुलींना समजत नाही. माझ्या काँलेजच्या मुली पाहील्या तर ह्या बाईंच म्हणण मला 100% पटतं. सगळ्या "आर्च्याच" तयार झाल्या तर "परश्यां" नी काय करायचं???
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 07/24/2017 - 01:34 नवीन
मुली कितीही पुढे गेल्या तरी घर सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच असते.
कोण म्हणलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 07/24/2017 - 07:21 नवीन
प्रत्येक गोष्ट कोणीतरी म्हणायलाच पाहिजे का? हे सामाजिक संकेत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
त
त्रिवेणी Mon, 07/24/2017 - 08:32 नवीन
का म्हणे स्त्रीयांची जबाबदारी आहे???? बायकोने कमावलेला पैसा जर गॉड लागतो तर करावं की थोडं संसारासाठी आपणही घरातलं काम. कराव्या की थोड्यातरी तडजोडी नवऱ्याने.आणि एकुणात ज्या पुरुषांना एवढाच इगो प्रॉब्लेम असेल त्यांनी करूनच नाही लग्न. ज्या पुरुषांना बायकोला मदत करण्यात काही कमीपणा वाटत नाही ते करतील लग्न. आणि हजार आरची तयार झाल्या तरी परशा का तयार व्हावा.आरची एक अक्कल नसेल पण परशा तर हवी ना. आता बाकी चालू द्या माझा पहिला आणि शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 07/24/2017 - 12:04 नवीन
घर सांभाळन म्हणजे फक्त घरातली कामे करणं असं का गृहीत धतात तुम्ही. घर सांभाळन्याचा अर्थ नाती सांभाळण हा पण होतो. घरात सासू सासर्यांची अडगळ वाटणेे, वाट्टेल ते बोलणे, वेगळ रहायला जाण, हे काय स्त्रियांच्या सुधारणेचे लक्षण आहे का? आणि ह्याला ज्या स्त्रिया सुधारणा म्हणतात. त्या शिकलेल्या अडाणी म्हटल्या पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
त
त्रिवेणी Mon, 07/24/2017 - 14:04 नवीन
मला आजपर्यत वाटत होतं की सासुच फक्त बोलते. मुळात काय आहे टाळी एका हाताने वाजत नसते. घरात नवीन आलेल्या मुलीला मेरी सुनो पद्धतीने वागवलं की नंतर तीही सुनावेलच. नाती सांभाळणे ही काय फक्त सुनेची मक्तेदारी नाही य. मान दिला तर मान मिळतो. म्हणून प्रत्येकानेच मर्यादेत रहावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
थ
थिटे मास्तर Sun, 07/23/2017 - 21:44 नवीन
आईच घर आणि नवरा ज्यांच्च आवडत क्षेत्र किंबहुना अपेक्षित क्षेत्र असेल त्या लेडी अण्णा हजारे पासुण (ल.लसुण) काय अपेक्षा करू शकतो नाय ? बैल बिचारा काय सहन करत असनार.
  • Log in or register to post comments
थ
थिटे मास्तर Sun, 07/23/2017 - 21:45 नवीन
आईच घर आणि नवरा ज्यांच्च आवडत क्षेत्र किंबहुना अपेक्षित क्षेत्र असेल त्या लेडी अण्णा हजारे पासुण (ल.लसुण) काय अपेक्षा करू शकतो नाय ? बैल बिचारा काय सहन करत असनार.
  • Log in or register to post comments
ए
एमी Mon, 07/24/2017 - 02:52 नवीन
भाकर्या बडवणे हे cheap labour आहे.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Mon, 07/24/2017 - 08:34 नवीन
प्ररश्या आणी आर्ची च्या सिनेमात सुधा आर्ची वेळ पडेल तेव्हा पुढे होऊन परशाची जागा भरून काढतेय.शुन्यातून सुरूवात करून नायक नायिका पुढे नीटनेटका संसार करताना दाखवलेत. ह्यालाच सहजीवन म्हणतात ना? प्रियकराला मार खाण्यापासून वाचवणारी आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणारी पण त्याच वेळी परिस्थिती सुधारण्यासाठी बरोबरीने राबणारी आरची दिसली नाही वाट्टे
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 07/24/2017 - 08:40 नवीन
या धाग्यावरचे पिराताईंचे एकूण एक प्रतिसाद पटले आहेत.
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 09:17 नवीन
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट ...माझे म्हणणे धाग्या पेक्षा पिरा तैं च्या प्रतिसादात जास्त नेमके उतरलेत हे पुन्हा एकदा म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
म
मोदक Mon, 07/24/2017 - 10:28 नवीन
या निमीत्ताने पिरातैंनी स्वतःचा आयडी बदलावा आणि "फ्रंट रायडर" करावा अशी नम्र सुचवणूक. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी
स
सामान्य वाचक Mon, 07/24/2017 - 09:34 नवीन
स्त्रियांवरच अन्याय, पुरुषांवरचा अन्याय हा अपर्णाताईंचा मुद्दा नाहीये, नसावा. (खरे तर त्यांचा मुख्य मुद्दा ' मला परत परत बोलवा' हा आहे, असे वाटले ती क्लिप बघून. पण ते असो.) त्यांचे म्हणणे असे असावे की बायकांची मुख्य आणि अनिवार्य जबाबदारी हि घर सांभाळणे हीच आहे. इथंपर्यंत सग्गळे बरोबरच आहे. पण हि लग्न करणाऱ्या प्रत्येकाची मुख्य आणि अनिवार्य जबादारी आहेच, स्त्री किंवा पुरुष दोघांची. फक्त बायकांची नव्हे. आणि घर सांभाळणे म्हणजे भाकऱ्या करणे, नवरा चिडला कि पाणी पिणे , कायम दुय्यम भूमिका घेणे , हा जो अर्थ आहे , त्याबद्दल कोपरापासून नमस्कार. याच न्यायाने गुलामगिरी ची पद्दत सुद्धा पुनरुज्जीवीत करायला हवी. हे सगळे गुलाम आपल्या हक्काबद्दल जागृत झाले आणि हामेरिका आणि मित्रमंडळी यांच्या कडील मधली शेकडो वर्षांची दैदिप्यमान संस्कृती लयाला गेली. थोर्थोर कुटुंबव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जी फक्त बायकांची, आणि टू बी स्पेसिफिक, सुनांची , आहे, हे मत कुणाला वादग्रस्त आणि चुकिचे वाटत नाही का? बायकांचा कोंडमारा आणि घुसमट करणारी , तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी हि कुटुंबव्यवस्था कशासाठी टिकवावी? ( हेच वाक्य 'बायका' या ठिकाणी ' पुरुष' असे लिहूनही वाचा.) नवरा बायको दोघांनीही सामंजस्याने जबाबदारी वाटून घेऊन संसार करावा, हे बरोबर नाही का? नवऱ्याच्या आई वडिलांचा आदर करावा, जरूर करावा. पण एक माणूस म्हणून त्यांचे वागणे वावगे असेल, तरीही निव्वळ वय झाले म्हणून त्यांच्या वागण्यापुढे मान तुकवावी? ते सुनेला किमान एक माणूस म्हणून आदर देणार नसतील, तर तिने ही तो देण्याची आज्जीबातच गरज नाही. दोघांच्याही आवडीप्रमाणे, कपॅसिटी प्रमाणे आणि इच्छे प्रमाणे कामे वाटून घ्यावीत आणि असल्या सेल्फ प्रोक्लेम्ड बै आणि बुवा ना इग्नोरावे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 16:07 नवीन
आणि घर सांभाळणे म्हणजे भाकऱ्या करणे, नवरा चिडला कि पाणी पिणे , कायम दुय्यम भूमिका घेणे , हा जो अर्थ आहे , त्याबद्दल कोपरापासून नमस्कार.
घर सांभाळणे म्हणजे अन्न न बनवणे, नवरा चिडला कि त्याच्या डोक्यावर पाण्याचा माठ फोडणे आणि कायम आढ्यतापूर्ण भूमिका घेणे असे आहे का?
न्यायाने गुलामगिरी ची पद्दत सुद्धा पुनरुज्जीवीत करायला हवी.
गुलामगिरची पद्धत बदलली आहे, पण गुलामगिरी प्रचंड फोफावली आहे. हो, पण ते असो.
थोर्थोर कुटुंबव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जी फक्त बायकांची, आणि टू बी स्पेसिफिक, सुनांची , आहे, हे मत कुणाला वादग्रस्त आणि चुकिचे वाटत नाही का?
त्या ती बुडवत आहेत अग्रणीपणे, म्हणून त्यांना उद्देशून विधान आहे. त्या फक्तचा तसा अर्थ नाही कि पुरुषांनी बुडवत राहावी आणि बायकांनि वाचवत राहावी.
बायकांचा कोंडमारा आणि घुसमट करणारी , तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी हि कुटुंबव्यवस्था कशासाठी टिकवावी?
वरच्या विधानाप्रमाणे ती सर्वानी टिकवावी. इथे ती नकोच. काही तरी एक स्टँड घ्या. आणि कोणत्या कोंडमारा आणि घुमसट व्हायची म्हणे? माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी? कुठुन उचलल्या ह्या फ्रेजेस? माणूस म्हणून जगायचा अधिकार नाकारणारी व्यवस्था असती एवढ्या ६५ कोटी बायका दिसल्या असत्या का आज? कधि १९७० किंवा १९८० चे सिनेमे पाहिलेत? ते आईचं प्रस्थ (प्रेयसी पेक्षा जास्त) आठवतं? साड्यांचे किती प्रकार आहेत? कांजीवरम, पैठणी, पटोला, कायनू , बायनू.... धोतरांचे किती प्रकार आहेत? लुंग्यांचे किति प्रकार आहेत? म्हणे जगण्याचा अधिकार नाकारणारी ...
नवरा बायको दोघांनीही सामंजस्याने जबाबदारी वाटून घेऊन संसार करावा, हे बरोबर नाही का?
मग ताई काय म्हणत आहेत? सामंजस्य नसावं? जब्बाबदारी फक्त बायकांनी घ्यावी? त्या ज्या केसमधे सामंजस्य नाही तिथे "त्यांचे उपाय" सांगत आहेत. आणि ते किमान ५०% बरोबर आहेत.
पण एक माणूस म्हणून त्यांचे वागणे वावगे असेल, तरीही निव्वळ वय झाले म्हणून त्यांच्या वागण्यापुढे मान तुकवावी? ते सुनेला किमान एक माणूस म्हणून आदर देणार नसतील, तर तिने ही तो देण्याची आज्जीबातच गरज नाही.
पण हे वर्तन योग्य आहे असे आपल्या माय बापाशी भावनिक गुंतवणूक असणार्‍या मूर्ख सेंटिमेंटल नवर्‍याला कसे पटवणार यावरही मार्गदर्शन करा.
दोघांच्याही आवडीप्रमाणे, कपॅसिटी प्रमाणे आणि इच्छे प्रमाणे कामे वाटून घ्यावीत आणि असल्या सेल्फ प्रोक्लेम्ड बै आणि बुवा ना इग्नोरावे.
भावा (ऑर...) ती बाई ट्रबल्ड केसेस बद्दल बोलतेय. जे अलरडी सुखी आहेत त्यांना तिची गरज पडली नाही तर तिला आनंदच आहे. ती एक अत्यंत निस्वार्थ समाजसेविका आहे हे विसरत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक Mon, 07/24/2017 - 18:04 नवीन
घर सांभाळणे म्हणजे अन्न न बनवणे, नवरा चिडला कि त्याच्या डोक्यावर पाण्याचा माठ फोडणे आणि कायम आढ्यतापूर्ण भूमिका घेणे असे आहे का? ----------------------------------------------------------------------------------------- असे कुठे दिसले माझ्या प्रतिसादात? एखादी गोष्ट काळी नाही, असे म्हटले याचा अर्थ ती पांढरी आहे असा होतो का? उगीच वडाची साल पिंपळाला लावू नका. गुलामगिरची पद्धत बदलली आहे, पण गुलामगिरी प्रचंड फोफावली आहे. हो, पण ते असो. ----------------------------- इररेलेव्हन्ट आहे. त्या ती बुडवत आहेत अग्रणीपणे, म्हणून त्यांना उद्देशून विधान आहे. त्या फक्तचा तसा अर्थ नाही कि पुरुषांनी बुडवत राहावी आणि बायकांनि वाचवत राहावी. --------------------------------------------------------------------------------------------------------------------- अर्रर्रर्र, परत तेच. स्त्रियांनी काय संस्कृती बुडवली? आणि संस्कृती म्हणजे नक्की कधीची? ५० वर्षे पूर्वीची, का १००? का २०० कारण या सगळ्या काळात वेगवेगळ्या चालीरीती ( ज्याला लोक संस्कृती म्हणतात) अस्तित्वात होत्या. माणूस म्हणून काही इच्छा आकांक्षा असणे आणि त्या धीटपणे मांडणे, याने संस्कृती बुडत असेल, तर बुडो बापडी. साडी, कुंकू, बांगड्या हि संस्कृती का? नक्की संस्कृती म्हणजे काय अभिप्रेत आहे ते आणि स्त्रिया ती कशी अग्रणीपणे बुडवत आहेत तेही, स्पष्ट लिहा. वरच्या विधानाप्रमाणे ती सर्वानी टिकवावी. इथे ती नकोच. काही तरी एक स्टँड घ्या ती टिकवायची असेल तर दोघांनी , सगळ्यांनी टिकवा. फक्त स्त्री ला चचचच टिकवण्याची गरज, समज आणि इच्छा नसावी. आणि कोणत्या कोंडमारा आणि घुमसट व्हायची म्हणे? माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी? कुठुन उचलल्या ह्या फ्रेजेस? माणूस म्हणून जगायचा अधिकार नाकारणारी व्यवस्था असती एवढ्या ६५ कोटी बायका दिसल्या असत्या का आज? ----------------------------------------------------------------------- उपरोधिक बोलायचे तर बोला. फार मागचा काळ नाही आहे जेंव्हा तुमच्या संस्कृतीमध्ये बायकांना शिकायचा, बाहेर पडायचा , नवऱ्याच्या माघारी धडके कपडे घालण्याचा, धडके खाण्याचा , केस ठेवण्याचा हक्क नव्हता. अजूनही परिस्थिती नॉर्मल ला आली आहे का हो? या वरती काउंटर अटॅक म्हणून ४ केसेस फेकू नका बायकांनी अन्याय केल्याच्या. त्या केसेस मान्य आहेतच, पण याचा अर्थ बाकीच्या ९६ केसेस मध्ये पण दम नाही , असे म्हणू नका. कधि १९७० किंवा १९८० चे सिनेमे पाहिलेत? ते आईचं प्रस्थ (प्रेयसी पेक्षा जास्त) आठवतं? साड्यांचे किती प्रकार आहेत? कांजीवरम, पैठणी, पटोला, कायनू , बायनू.... धोतरांचे किती प्रकार आहेत? लुंग्यांचे किति प्रकार आहेत? म्हणे जगण्याचा अधिकार नाकारणारी ... ------------------------------------------------------------ या वर तर हसण्याशिवाय दुसरे काय करणार? नवरा बायको दोघांनीही सामंजस्याने जबाबदारी वाटून घेऊन संसार करावा, हे बरोबर नाही का? मग ताई काय म्हणत आहेत? सामंजस्य नसावं? जब्बाबदारी फक्त बायकांनी घ्यावी? त्या ज्या केसमधे सामंजस्य नाही तिथे "त्यांचे उपाय" सांगत आहेत. आणि ते किमान ५०% बरोबर आहेत. ------------------------------------------------------------------------------------------------------------------ असे दिसले नाही. पुरुषांनी सुद्धा जबाबदारी घ्यावी, असे मला एकही क्लिप मध्ये दिसले नाही. तुम्हाला कुठे सापडले, ते शेअर करा कृपया पण हे वर्तन योग्य आहे असे आपल्या माय बापाशी भावनिक गुंतवणूक असणार्‍या मूर्ख सेंटिमेंटल नवर्‍याला कसे पटवणार यावरही मार्गदर्शन करा. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- एखादी योग्य गोष्ट करायला जमत नाही, किंवा धाडस नाही,किंवा सध्या मार्ग दिसत नाही, याचा अर्थ अयोग्य गोष्ट सुरु ठेवणे हे योग्य आहे असा होतो का ? आणि या बाईनी पण मूर्ख सेंटिमेंटल नवर्‍यासाठी चार मौक्तिके सांगितली तर बरे. माझा तेव्हडा अधिकार असता, तर मी पण भाषणे दिली असती कि, भावा (ऑर...) ती बाई ट्रबल्ड केसेस बद्दल बोलतेय. जे अलरडी सुखी आहेत त्यांना तिची गरज पडली नाही तर तिला आनंदच आहे. ती एक अत्यंत निस्वार्थ समाजसेविका आहे हे विसरत आहात. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- निस्वार्थी असू शकेल हि. पण ट्रबल्ड केसेस सोडवण्याचा हा मार्ग नाही. सगळी निस्वार्थी माणसे पूजनीय नसतात. स्वतःचा स्वार्थ नसतानाही लोकांना नकळतपणे त्रासात टाकणारी माणसे असतात. एका गालावर थोबाडीत दिली, तर दुसरा गाल पुढे करा. म्हणजे क्लॅशेस होणार नाहीत. असे सोल्युशन आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 21:47 नवीन
मी ना विनोद करत आहे ना तर्कट लढवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
प
पैसा Tue, 07/25/2017 - 05:32 नवीन
हुश्श! आली बै एकदाची संस्कृती! मी कधीपासून वाट बघत होते! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सस्नेह Mon, 07/24/2017 - 09:45 नवीन
Image removed. वरील आणि जालावरील रामतीर्थकर म्याडमच्या क्लिप एकूणच त्यातील अतार्किकता, अट्टाहास, अतिरेकीपणा , 'मी म्हणते...' इ. गोष्टींमुळे पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ पाहवेना हो ! आता क्लिप ऐकलीच नाही, तर त्यावर टिप्पणी करण्याचा नैतिक अधिकार नाही, म्हणून पाssस !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 07/24/2017 - 10:17 नवीन
मी काय म्हणतो. "टाका केस तिज्यायला". एक पिढीच नव्हे तर पिढ्यानपिढ्या होलसेलमदे बिघडवयाची नुक्सानभरपाई मागावी रग्गड. हुवुंदे धुरळा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Mon, 07/24/2017 - 12:22 नवीन
लॉल. या बाईंनी सनी लिओनवर पण केस टाकली आहे https://m.facebook.com/258089797708735/photos/a.262219283962453.1073741828.258089797708735/407403146110732/?type=3&ref=content_filter
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आदूबाळ Mon, 07/24/2017 - 12:44 नवीन
बहुतेक जुन्या संगीत नाटकांसारखं पॉर्नमध्येही पुरुषपार्टीने स्त्रीभूमिका कराव्यात अशी त्यांची मागणी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 14:59 नवीन
हे डोक्यावरून पाणी गेलंय LOL ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांची सनी लिओनच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंद अश्लीलतेच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे सर्वत्रच्या महिला प्रमुखांनी अनुकरण करावे ! सोलापूर, १८ मे ( वार्ता.) - येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अधिवक्त्या सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी अश्लील चित्रपटांतील अभिनेत्री सनी लिओन हिच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक श्री. साळुंखे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सायंकाळपर्यंत यावर निर्णय घेतो, असे आश्वाासन दिले. या वेळी माजी आमदार श्री. शिवशरण (आण्णा) पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी, हिरालाल तिवारी, बापू ढगे, यशपाल चितापुरे, रमेश आवार, सत्यनारायण कनकी, श्याम निमकंटी यासंह २५ जण उपस्थित होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 10:31 नवीन
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले.
हे विधान खालिल गोष्टींची समरी आहे: १ . पारंपारिक भारतीय समाजाबद्दलचे अज्ञान २. आधुनिक पुरोगामी स्त्रीवादी विचारांची हौस ३. जेनेरिक मोघम विधाने चिकित्सा न करता स्वीकारण्याची प्रवॄत्ती. ४. लिंग हा अन्याय करण्याचा आधार असू शकतो ही विचित्र धारणा ५. समाजरिती आणि गुन्हेगारिता आणि विकृती यांच्यातला भेद, त्यांची समाजातली प्रमाणं न पाहण्याची प्रवृत्ती. ६. काय बोलायची फॅशन आहे त्याचा अनंत सोस ७. पुरुषप्रधानता म्हणजे समतेच्या विरोधार्थी शब्द अशी धारणा ८. काम म्हणजे अन्याय नाही हे न कळणे ९. मूलतःच पुरुष जात पिढ्या न पिढ्या विकृत असताना, अचानक कोणत्या गुणसूत्रीय बदलामुळे सुधारली त्याबद्दलचे अज्ञान १०. बायकांनी आत्तापर्यंतच्या पिढ्यांत केलेली जी ऐश आहे तिला एकदम राईट ऑफ करून टाकायचे इतिहासाचे अज्ञान ११. भाषेचे दौर्बल्य वापरुन ९०% वंचना इतर स्त्रीयांनी केली असल्याचे लपवणे, आणि ऑटोमॅटिक डोळ्यासमोर फक्त पुरुष येणे. १२. आपल्या हजारो पिढ्यांच्या आज्ज्या महामूर्ख होत्या असा भ्रम १३. मनुष्यात इतकी बुद्धिमत्ता विकसित झाली नाही कि त्याला आपल्यावर अन्याय होतो आहे हे हजारो वर्षे न कळावे. १४. नक्की कशापासून वंचित ठेवले? लोकांकडे असं काय काय होतं जे त्यांनी लेकिंना आणि बायकांना दिलं नाही? आणि एवढं वंचित ठेऊन जगल्या वाचल्या कशा? अगदी मानवांत ज्या वंशांना वंचित ठेवले गेले ते सगळे नष्ट झाले, मग बायकाच बर्‍या उरल्या? असे संभ्रम सामान्यांत निर्माण करणे. १५. बायकांना वंचित ठेवणे ही पुरुषांची जनुकीय प्रेरणा होती कि अनीश्वरीय द्रव्यवाद होता याची अस्पष्टता. १६. बायकांना वंचित ठेवण्याचे नक्की फायदे पुरुषांना काय काय होतात याची माहीती नसणे. १७. समाज म्हणजे चार बामनाच्या आणि आठ मराठ्याच्या बायका अशी लघुदृष्टी बाकीच्या विधानांबद्दल काय बोलावं! म्हणे तर्काधिष्ठित मांडणि हवी. =========================================== या विधांनाचा टोन माझी प्रेझेंटेशनची स्टाईल आहे. आपल्या व्यक्तित्वाचा आणि संवादातील सहभागाचा आदर आहेच.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 07/24/2017 - 10:44 नवीन
दोनदा वाचली तरी डोक्यावरून गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 10:58 नवीन
मान्य आहे, भयंकर क्लिष्ट मुद्दे आहेत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 07/24/2017 - 11:19 नवीन
कृपया थोडे सोपे करून सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 11:41 नवीन
८. काम म्हणजे अन्याय नाही हे न कळणे
हा मुद्दा घ्या. (सगळेच सांगणं असंभव आहे.) ================= स्त्रीयांना पिढ्यान पिढ्या खूप काम करावे लागत असे (संक्षेप= चूल आणि मूल) आणि हा अन्याय होता असं म्हणलं जातं. पण अन्याय नाही. हे फक्त काम आहे. तुमच्या कडून काम करून घेऊन तुम्हाला पैसेच नाही दिले तर काम देखिल अन्याय ठरतं. पण पुरुषप्रधान एकत्र कुटुंब पद्धतीत ६०-७० पैकी प्रत्येकालाच काम करावे लागे आणि एक कर्ता सोडून कोणालाच पैसे मिळत नसत. म्हणून यात स्त्रीयांचा वेगळा उल्लेख करायची करायची नाही. स्त्रीयांना जशी ही कामे करावीलागतं, तशी पुरुषांना काही कामे करावी लागतच. शेती करणे, पोती उचलणे, बाजारात जाणे, पूजा करणे, इ इ. काम ही वाटून घेतली होती आणि सर्वसाधारणपणे ती सगळ्यांना समान होती. मध्यंतरीच्या काळात लोकांनी शेती सोडून दिली (बर्‍याच) आणि आधुनिक जीवन अवलंबलं (मुलांना शाळेत घालणे, घरात खूप मशिन्स असणे, होम डेलिवरी). म्हणून पुरुषांची कामं संपली आणि बायकांची डबल झाली. ================ पण ह्याचा आणि पिढ्यान पिढ्यांचा काय संबंध? ज्या बाईचा नवरा मे महिन्यात उन्हातान्हात नांगर हानतो, हळदिचे पोतेच्या पोते दिवसभर उचलून पिवळाजर्द पडतो किंवा पावसात चिखलात पेरणी इ इ करतो तिच्या तोंडून "स्त्रीयांवर पिढ्यां पिढ्या अन्याय झाला." हे विधान आणून पहा (काम आणि अन्याय या संदर्भात फक्त).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 07/24/2017 - 12:12 नवीन
तुमचा प्रतिसाद आवडला! सहज आणि सोपा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 12:23 नवीन
धन्यवाद. त्या समरीतले सारे मुद्दे असेच आहेत. त्यांना दिलेली शीर्षकं सुचक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 12:26 नवीन
एक कर्ता सोडून कोणालाच पैसे मिळत नसत ह्या कर्त्याचा वरचष्मा का ? मला वाटत चर्चा थोडी भरकटली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 12:37 नवीन
चर्चा अर्थातच मी प्रचंड भरकटावली आहे. तुमच्या लेखातली जी "पिढ्यान पिढ्यांच्या अन्यायाची" जी गणेशवंदना आहे, केवळ तिच्याबद्दल तो प्रतिसाद आहे. विषयावर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोंबडी प्रेमी
क
कोंबडी प्रेमी Mon, 07/24/2017 - 11:52 नवीन
कै म्हणजे कैच कळले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
य
यशवंत पाटील Mon, 07/24/2017 - 10:48 नवीन
काय खर नाही राव हे. व्हिडो पाहिला. बाजारात कायपण विकता येतं, विकणारा पाहिजे. इकडं काही कमेंटा वाचल्यावर मंग अपर्णामॅडमना काय म्हणुन टाळ्या पडतात हे कळंत. खर म्हणजे पुरुषाला पायजे तितक्या बायका करायची पर्वानगी द्यावी - एक चंद्रावर जायला, एक भाकरी थापायला अशा. रागवल्यावर पाणी प्यायला बी येक वेगळी असू दे लागली तर. पण मंग असच बाईने म्हणलं तर पुरषाने रागेजू नये म्हंजे झालं. जमणारे का ते बघाव ज्याच-त्यान.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 07/24/2017 - 15:10 नवीन
पण मंग असच बाईने म्हणलं तर पुरषाने रागेजू नये म्हंजे झालं. जमणारे का ते बघाव ज्याच-त्यान.
का म्हणे पुरुष रागवतील? असं तुमच्या मनात का आलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंत पाटील
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा