Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

क
कोंबडी प्रेमी
Fri, 07/21/2017 - 14:17
🗣 445 प्रतिसाद
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
143577 वाचन

💬 प्रतिसाद (445)
स
सुबोध खरे गुरुवार, 06/07/2018 - 17:00 नवीन
आबा साहेब मुली शिकू लागल्या की संघीय गोटात अस्वस्थता पसरणार हे नैसर्गीकच आहे.

या विधानाला काही पुरावा का अशीच पुडी सोडली आहे.

तुम्ही पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या एक दोन संघ नेत्यांचे मत पुराण मतवादी असले म्हणजे सगळी संघटना पुराण मतवादी आहे असे म्हणण्यासारखे आहे. सध्या जालावर श्री अशोक गेहलोत या काँग्रेसच्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य फिरत आहे कि धरणाच्या पाण्यातून वीज निर्मिती केली ( पाण्यातील वीज काढून घेतली) तर उरलेल्या निर्जीव पाण्यावर शेती कशी चांगली होणार? हे वक्तव्य पाहून कोणी असे म्हणू लागले कि काँग्रेसचे सगळेच नेते मूर्ख आहेत आणि काँग्रेस हा पुराण मतवादी पक्ष आहे तर त्याला तुम्ही काय म्हणाल? बाकी प्रतिगामीपणा किंवा मूर्ख वक्तव्ये हि कोणत्याच एका पक्षाची मक्तेदारी नाही असे नम्र पणे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
म
मराठी कथालेखक Fri, 06/08/2018 - 12:38 नवीन
श्री अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याविषयीचे वास्तव काहीसे वेगळे आहे. लोकसत्तातील या वृत्तानुसार
खरे तर गेहलोत यांनी केलेले पाण्याविषयीचे विधान हे संघपरिवाराच्या प्रचारकी तंत्राविषयी होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात भाक्रा धरण बांधण्यात आले. त्या वेळी संघ परिवाराने त्याविरोधात प्रचार सुरू केला होता. गेहलोत म्हणाले, ‘मला आठवते, माझ्या बालपणी संघाचे कार्यकर्ते जिथतिथे व्याख्याने देत फिरत होते. ते विचारीत, भाक्रा धरणातील वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यातील वीजच (शक्ती) नष्ट केली जाणार आहे, त्यामुळे असे शक्तीहीन पाणी शेतीसाठी वापरण्यात काय उपयोग?’
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/07/2018 - 16:13 नवीन
अक्षदा यांचा प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 06/08/2018 - 12:19 नवीन
अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी रहदारीचे नियम कडक असलेल्या दिल्लित आंदोलनकारी म्हटलं कि नियम तोडायची मुभा झालेली. मग काय, ३-३ तरुण बिनाहेल्मेट बाइकवर बसून दारू पिउन महिलांना छेडत अण्णांच्या टोप्या घालून त्रास देत असत. त्यांच्याकडे पाहून अण्णांनी आंदोलन बंद करावं वा त्यांचं आंदोलन टिवीवर येणं बंद व्हावं असं वाटल्याचं आठवत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 06/08/2018 - 13:46 नवीन
काळाप्रमाणे मुलींना वाढवताना बदल होत गेले, जसे त्यांना शिकवणे, आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी पाठींबा देणे. पण हे होत असताना मुलांना वाढविण्यात अजिबात बदल केला गेला नाही. जसे मुलांना मुलींची कामे करावयास लावणे, मुलींचे अधिकार मान्य करुन त्याप्रमाणे तडजोड करणे, त्याग करणे इ. याचा परिणाम म्हणून मुलीं शिकतात, नोकरी करतात, घरचीही कामे सांभाळतात. पण पुरुष आधीही फक्त अर्थार्जन करत होते आताही फक्त तेवढेच करु शकतात. (इथे व्यक्त होणारे बहुतेक त्याच पिढीचं प्रतिनिधीत्व करतात.) स्त्री ज्या क्षमतेने घर व करीयर सांभाळी शकते त्याच क्षमतेने संसार सांभाळणारे पुरुष दुर्मिळ असतील. त्यामुळे आता स्त्रियांबरोबर पुरुषांनीही बदल घडवून घेणेच योग्य आहे. मंगळावर/चंद्रावर जाण्याची योग्यता ठेवणाऱ्या स्त्रीच्या नवऱ्याने आता ती नसल्यास स्वत: भाकऱ्या बडवायची तयारी ठेवणे आवश्यक आहे किंवा जेवणाकरीता अन्य पर्याय शोधणे आवश्यक आहे पण स्त्रीला तीच्या करीयरशी तडजोड करण्यास सांगणे अयोग्य आहे. जागतिकीकरण स्वीकारलेच आहे तर परदेशात ज्याप्रमाणे नवराबायको मिळून घरातली कामे करतात, जबाबदाऱ्या वाटून घेतात त्याप्रमाणे भारतातल्या पुरुषांनी वर्षानुवर्ष वागविलेला पुरुषी अहंकार बाजुला ठेवून संसार दोघांचा आहे हे मनात बिंबवून कामे वाटून घेतली तर वाद होण्याचा प्रश्नच येणार नाही. हा समजूतदारपणा सासू सासऱ्यांच्या पातळीवरही यायला हवा . . मुळात खरा प्रश्न स्त्रियांचे शिक्षण किंवा नोकरी हा नसुन पुरुषांनी वर्षानुवर्ष भोगलेले स्त्रियांवरचे वर्चस्व, आयतेपणा ते सोडणार का हा आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 06/08/2018 - 13:55 नवीन
<<<पण हे होत असताना मुलांना वाढविण्यात अजिबात बदल केला गेला नाही.>>> ==>>वरील दिलेल्या सर्व बाबी मध्ये आताची नोकरी करणारी पोरं लग्न झाल्यावर बायकोच्या हाताखाली लगेच ट्रेन होत आहेत. मुलांना अड्जस्ट होयला मुलीं इतका वेळ लागत नाही आजकाल. नवीन सोसयट्यात भाड्याने राहणाऱ्या नवं दाम्पत्यांच्या घरात डोकावून हे अनुभवू शकता. === मला फक्त एवढे कळते स्त्री असो व पुरुष प्रत्येकाला किमान चॉइसस पाहिजेत, बाकी सगळं आपोआप मिळत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
श
श्वेता२४ Fri, 06/08/2018 - 14:40 नवीन
मला तुमचे म्हणणे मान्य आहे. आताची पिढी हळूहळू याला सरावतेय पण तेही शहरात (आपण सोसायट्यांचा उल्लेख केला आणि मीही हे चित्र शहरात किंवा स्त्रीया नोकरी करणाऱ्या कुटुंबातच पाहिले आहे.). हे चित्र सरसकट नाही. आजच्या काळातील मुले पत्नीचा आणि संसारातील जबाबदाऱ्यांचा वाटा उचलण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेत आणि हा बदल नक्कीच सुखावणारा आहे. पण ज्यावेळी ऑफीसमधून घरी येताना नवऱ्याच्याही मनात येईल की उद्या नाश्ता / किंवा भाजीला काय करायचं, मुलांचा अभ्यास, त्यांच्या काही गोष्टी किंवा तत्सम काहीही., आणि घरी गेल्यावर तोही या कामांचा भार उचलेल त्यावेळी खरा समतोल साधला जाईल. सध्याच्या (काही) पुरुषांची प्रगती बायकोला स्वयंपाकात मदत करणे, कधीतरी स्वता काही बनवून तीला खायला घालणे इतपतच आहे.प्रश्न केवळ स्वयंपाक बनविण्यापुरताच नाही इतरही अनेक गोष्टी असतात. आताच्या काही नवऱ्यांना बायकोचा त्रास कळतो व तो दूर करण्यात ते स्वत सहभागी होतात त्यास घरातल्या लोकांचाही पाठींबा असतो. नाहीतर बऱ्याच आयांना आपल्या मुलाने घरात कामे केलेली आवडत नाहीत. हेही नसे थोडके. असा समंजसपणा संसारातल्या प्रत्येकाने दाखवला तर वाद होण्याचा प्रश्नच येणार नाही इतकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Fri, 06/08/2018 - 15:13 नवीन
आताची पिढी हळूहळू याला सरावतेय पण तेही शहरात शहरातही हे प्रमाण १० टक्क्यांच्या वर असेल असे वाटत नाही. खेड्यात तर क्वचितच. अतिउच्च शिक्षित बापही( पी एच डी झालेले) आपल्या मुलीला समान हक्क देताना दिसत नाहीत. मुलगी जास्त शिकली तर लग्नाला त्रास होऊ शकतो हाच विचार यामागे आहे. शिवाय वारसाहक्काने मालमत्ता देताना सुद्धा सुशिक्षित बाप मुलीला फारच क्वचित समान हक्क देताना आढळतात.( दोन मुली किंवा दोन मुलगे असले तर हा प्रश्न येत नाही). आजतागायत जितक्या वारसापत्रांवर मी डॉक्टर म्हणून सही केली आहे तेथे मला हि समानता आढळलेली नाही हे खेदानेच नमूद करावेसे वाटते. मुंबई सारख्या शहरात मुलगा पाहिजे म्हणून दोन मुली असल्यावर तिसऱ्यांदा गरोदर राहणाऱ्या महिला मी दर वर्षी निदान ७५-१०० पाहतो आहे. असे एकही जोडपे मलागेल्या दहा वर्षात दिसलेले नाही ज्यांनी दोन मुलगे असल्यावर मुलीसाठी तिसरे मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे ज्या मुलींना मिळत आहे त्या ते ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करतात अशा फार तर २% असतील आणि उरलेल्या ९८ टक्के मुली या संसारासाठी नवऱ्यासाठी आणि सासू सासर्यांसाठी अविरत कष्टच करताना दिसत आहेत आणि समानता त्यांच्यासाठी सध्यातरी कागदोपत्रीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
व
विशुमित Fri, 06/08/2018 - 15:13 नवीन
आमचं फादर अजून पण आईला अंघोळीला पाणी इस्नून देतं. आता बोला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
प
पिलीयन रायडर Fri, 06/08/2018 - 15:33 नवीन
तुमचं फादर ग्रेट हैत, पण इथे अंघोळ झाल्यावर आपली अंतवस्त्रे सुद्धा तशीच जमिनीवर टाकून निघून येणारे आणि बायकोने ती धुवावीत अशी अपेक्षा असणारे बापये मोप हायेत आमच्या मराठवाड्यात.. *हे तुम्हालाच उद्देशून असे नाही* माझ्या घरात समानता आहे, मी समानतेने वागतो असं म्हणण्याला काही अर्थ नाही. हा प्रश्न वैश्विक आहे. अमेरिकेत बायका समान वेतना साठी लढत आहेतच की. वर अक्षदा ह्यांचे प्रतिसाद अनुभवातून आलेत. मी तर एका उच्छशिक्षित, ब्राह्मण घरात जन्मलेले आहे. मुलगी म्हणून वेगळं वागवणाऱ्या कुणाला कधी भीक घातली नाही. तरीही मी किमान 100 उदाहरणं देऊ शकते जिथे हा प्रयत्न तरी झाला. आणि माझ्या आजूबाजूच्या बायका "उगाच वाद नको" किंवा "अशीच पद्धत असते" म्हणून ते सहन करत राहिल्या. "बायकांनी पुरुषांची बरोबरी करायचीच नसते" हे वाक्य मला उद्देशून एक व्यक्ती म्हणलेली आहे. आता असे विचार असणाऱ्या व्यक्तीच्या हातात बाईंची भाषणे गेली ज्यात "चंद्रावर जा पण घरी येऊन भाकरी बडावावीच लागते, नवऱ्या पुढे काही चालत नाही" हे विचार गेले तर आमच्या सारख्या नवऱ्याला स्वयंपाकघरात धडाधड कामे सांगणाऱ्या बायकांना किती ताप देतील?!! मी एक भीक न घालणारी असेन, मोस्टली बायका "वाद नको" कॅटेगरी मध्ये असतात. असो.. कोळसा उगळवा तेवढा काळा. स्वातंत्र्य ही कुणी दिलेली भीक नसते. त्यामुळे कुणी काय करावं आणि कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जोवर माझ्या वागण्याने इतर कुणाच्या स्वातंत्र्याला बाधा येत नाही तोवर मी माझी मुखात्यार आहे. आणि हे मनाशी ठरवलं की अपराधीपणा न बाळगता वागावं. कुणीही बायकांना येऊन समानता देणार नाहीये. ती देण्याची गोष्ट च नाही. तो हक्क आहे. जो मला (आणि इतरांनाही) आहे हे मानूनच वागायचं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 06/08/2018 - 16:01 नवीन
<<<मी एक भीक न घालणारी असेन, मोस्टली बायका "वाद नको" कॅटेगरी मध्ये असतात.>>> ==>> प्रत्येक पुरुष "घरात मी वाघ आहे" अशाच डिंग्या बाहेर हाकत आला आहे. मोस्टली बायका "वाद नको" कॅटेगरी मध्ये असतात हा खूप मोठा विनोद पचायला जड जात आहे. === मी पहिल्यांदा जेव्हा अपर्णा ताई ना ऐकले होते खरंच खूपच प्रभावित होऊन बायको आणि मातोश्रीना जवळ बसवून ऑडिओ ऐकवला होता. आमच्या आईसाहेब खूप लाडिक म्हणाल्या होत्या, " माझं बाळ आलड आहे ग अजून, नको त्याच जास्त मनाव घेऊ." === ह्या असली भाषण देणाऱ्या ताई, कीर्तनकार आणि टीव्ही मालिकांनी लोकांच्या संसारांचे वाटोळे केले आहे. त्याची अंमलबजावणी करायला महिलाच जास्त अग्रगणी राहिल्या आहेत, हे पण नमूद करू इच्छितो. बाकी बापायांचे कोठे काय चालते घरात??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ग
गामा पैलवान Fri, 06/08/2018 - 16:48 नवीन
विशुमित, तुम्ही म्हणता की अपर्णा बाई संसाराचं वाटोळं करताहेत. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळा आहे. त्यांनी समुपदेशनाद्वारे अनेकांचे संसार सावरलेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पिलीयन रायडर Fri, 06/08/2018 - 18:17 नवीन
अहो ते नवऱ्याचं डोकं खाणं वेगळं हो. नवीन लग्न झालेल्या पोरी बंडखोरी करत नाहीत फारशा. साधा मुद्दा आहे. शहरी भागात नाही पण गावाकडे मुळात हातात पैसा नसलेली बाई किती बंडखोरी करणार? समानता वगैरे सोडा हो. फार दूरच्या गप्पा आहेत त्या. जनरली जे होतंय ते चुकतंय हेच कळत नाही. पुण्यात आमच्या घरात पुरुषांनी आधी जेवणे, उरलं ते बायकांनी खाणे, नोकऱ्या करून सुद्धा स्वयंपाक करून नवऱ्याला हातात ताट देणे टाईप गोष्टी सर्रास घडतात. शिकलेल्या बायकांना त्यात चूक वाटत नाही तर बाकीच्यांचे काय? माझा नवरा स्वयंपाक करतो तर मी किती बोलणी ऐकली आहेत काय सांगावे. ते सोडा, मला अजिबात न ओळखणारे लोक इथे मला आणि माझ्या नवऱ्याला जाम जज करतात इथे. का तर ही इतकी बोलते तर नवरा किती बिचारा असेल! विचार करा एरवी प्रत्येक्ष जगात मी किती बडबड ऐकली असेल. मग माझ्या सारखी व्यक्ती सुद्धा "वाद नको" मोड मध्ये जाऊन चार गोष्टी नजरेआड करते. अहो किरकोळ वाटतील पण नसानसात भिनलेले इतके मुद्दे आहेत की जाऊ दे मरू दे असं होऊन जातं. इथे लोकांना टाईमपास वाटत असेल, पण अक्षदा सारखे कळवळून प्रतिसाद का देतात ते 100% समजू शकते मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गामा पैलवान Fri, 06/08/2018 - 19:20 नवीन
पिराताई, तुमचं लग्न तुम्हीच टिकवलंय ना? मग लोकांना फाट्यावर मारायला काय अडचण पडते तुम्हाला? बाकी अक्षदा जे म्हणतात त्याचा अपर्णाबाईंच्या कथनाशी काहीही संबंध नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 06/08/2018 - 20:01 नवीन
मग मी काय करते असं वाटतं तुम्हाला? बाकी "तुम्हाला" असं वाटतं की संबंध नाही. ते तुमचं मत झालं. आम्ही पुष्कळ जणी तसं मानत नाही आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 06/08/2018 - 22:43 नवीन
पिराताई, एव्हढा लांबलचक प्रतिसाद लिहिलात तो कशासाठी ते कळलं नाही. कोण काय निरर्थक बोलतोय त्यावर इतका मजकूर लिहायचा? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 06:13 नवीन
शिकलेल्या पोरी असल्या दबावाला बळी पडतात त्याच खूप वाईट वाटते. लय टारटूर कार्य लागले तर पोराला आई बापासकट जेलची हवा द्यायची, धमकी द्याची. सरळ होतात. माझ्या ओळखीतील सरळ झालेत. ==== घरात योग्य आणि मुद्देसूद वादाला मुली घाबरतात का तेच कळत नाही ? (एक उपाय सांगतो - लग्न ठरल्यावर फोनवर बोलण्यात वेळ घालवण्या पेक्षा मुलींनी पोरांना मिपा वर अकाउंट खोलून द्यायचं आणि तिथे प्रतिवाद करायला सांगायचं. तो आयुष्यभर चाकोरी सोडायचा प्रयत्न करणारच नाही. केला की आऊट.) ==== <<<पुण्यात आमच्या घरात पुरुषांनी आधी जेवणे, उरलं ते बायकांनी खाणे, नोकऱ्या करून सुद्धा स्वयंपाक करून नवऱ्याला हातात ताट देणे टाईप गोष्टी सर्रास घडतात.>>> ==>> हे असले लाड ठेवायचेच नाहीत. त्यासाठी सुरवातीपासूनच टाईट राहायचा. लग्न झाल्या झाल्या वावर च असा ठेवायचा की आता घरातील एम डी मी च आहे. बुजायचं नाहीच. चान्स च द्यायचा नाही पुढच्यांना. ==== पिरा ताई मी तुमचे प्रतिसाद कित्येक वर्ष वाचत आहे, त्यावर माझे मत झाले आहे की मुलींनी घरात असेच खमकेपणाने राहिले पाहिजे. ====
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 08:38 नवीन
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/grandfathers-granddaughter-pass-with-her-granddaughter/articleshow/64513436.cms अशी कमांड पाहिजे घरात. सर्व जवाबदाऱ्या सांभाळून नातीबरोबर दहावीला बसून पास होऊन दाखवले. कोणाला न लाजता, न बुजता आणि घरातील लोकांनी पण साथ दिली आणि शिक्षण घेण्याची जिद्ध किंवा त्याला चॉईस म्हणा पूर्ण केली. === घरातली सगळी सूत्रे बाई ने हातात घेतली पाहिजेत. प्रपंच नेटका होतो. अशाच स्त्रीला समाज्यात मान मिळत असतो. ताई ने "करून दाखवलं" हे बिरुद पण भेटतं. शोभेच्या भावल्या, इथे बस्स म्हंटले की बसायचे, उठ म्हंटल्यावर उठायचे, अशा मुली आयुष्यभर रडत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
श
श्वेता२४ Sat, 06/09/2018 - 09:07 नवीन
घरातील सर्वांनी सहकार्य केल्याने हे यश मिळविता आले.'' - ध्रुपदा बाई एडके हे त्यांचे वाक्याच पुरेसे बोलके आहे. सर्वांचे एकमेकांना सहकार्य असले की संसारातील असचणींवर हसत मात करता येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 09:19 नवीन
नसते केले सहकार्य तरी ह्या वर्षी नाही तर पुढच्यावर्षी त्या नक्कीच पास झाल्या असत्या. === एकूण एडके काकूंबद्दल वाचल्यावर जाणवते की कुटुंबावरची त्यांची पकड बिलकुल सैल दिसत नाही. सहकार्य न करून जातील कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
प
पुंबा Mon, 06/11/2018 - 07:47 नवीन
अगदी खरं साहेब.. एडके काकी मुळात स्वयंसिद्धा आहेतच. त्यांना 'काय करायचंय म्हातारपणात शिकून' असं कुणी म्हटलं जरी असतं तरी त्यांनी त्याला भिक घातली नसती. पण शिक्षण अर्धवट सोडून लग्न करायला लागलेल्या आणि स्वत:च्या पायावर उभ्या नसलेल्या एखाद्या मुलीला अश्या प्रकारे शिक्षण पूर्ण करायचं म्हटलं तर प्रचंड अडचणी येतात. पुरूषसत्ताक समाजात स्वतंत्र निर्णय घेताना एखाद्या मुलीला आणि त्यात जर ती ग्रामीण भागातली किंवा समाजाच्या निम्न वर्गातून आली असेल तर तीला खूप त्रास होतो. अशी अनेक उदाहरणे जवळच्या वर्तुळात बगहयला मिळाली आहेत. अजो किंवा गामा यांना अपर्णाबाईंच्या व्याख्यानांमुळे प्रतिगामी लोकांना थोडे का होईना बळ मिळते हेच कसे मान्य होत नाही याचे नवल वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 06/11/2018 - 08:11 नवीन
प्रचंड अडचणी प्रत्येकाच्या जीवनात आहेत. === त्रयस्थ माणसांच्या हस्तक्षेपामुळे संसाराला खूप क्षती पोहचते यात वादच नाही. अपर्णाताईंसारखे वक्ते, कीर्तनकार आणि टीव्ही मालिका त्यात सगळ्यात जास्त भर घालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ग
गामा पैलवान Mon, 06/11/2018 - 13:44 नवीन
विशुमित, एकाकी पडलेल्या वयस्कर बाईची हालत कशी वाईट होते हे सांगण्याचा अपर्णाबाईंच्या व्याख्यानांचा हेतू नाही. शिकलेल्या व स्वतंत्र वृत्तीच्या बाईने नवऱ्याशी कसं जुळवून घ्यावं याविषयी ते विवेचन आहे. कुठे तोडावं ते शिकलेल्या मुलीस ते कळणं सोपं असावं. जर तरुणपणी त्या बाईने तडजोड करायला शिकलं नाही तर म्हातारपणी हालत अत्यंत खराब होते. तुम्ही म्हणता ती पुरुषसत्ताक वगैरे भुतं छळायला लागतात. तुम्ही वर उल्लेखलेली समस्या उद्भवू नये अशा हेतूने अपर्णाबाईंची व्याख्यानं आकळायला हवीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 09:24 नवीन
मुली दुसऱ्यांकडून अपेक्षा खूप ठेवतात. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे जेव्हा बंद करतील तेव्हा खरा फेमिनिज्म अस्तित्वात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
प
पिलीयन रायडर Sat, 06/09/2018 - 13:14 नवीन
तेच तर म्हणतेय मी! कुणी तरी येऊन मला स्वातंत्र्य देईल, समानता देईल असं काही नसतं. ते माझं मला लोकांना फाट्यावर मारून मिळवावं लागतं. आणि हो त्यात जास्त कष्ट आहेत, रिस्क आहे, निर्णय घ्यावे लागतात,अवलंबून राहता येत नाही कुणावर. ते ही अनेकांना नको असतं किंवा तितका आत्मविश्वास नसतो. ज्यांना तो असतो, त्या जातात मस्त पुढे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 14:03 नवीन
<<<ते ही अनेकांना नको असतं किंवा तितका आत्मविश्वास नसतो.>> ==>> मग बसा तसेच. जगाला कोसत. (हे स्त्री पुरुष बाल वृद्ध सगळ्यांसाठी लागू आहे) ==== महिन्यापूर्वीचा आमच्या वाडीतील किस्सा सांगतो.. सासू रोज सुनेला घालून पाडून बोलायची. ती बिचारी (?) जास्त प्रतिवाद न करता ऐकून घायची. पण सासूची मजल तिच्यावर हात उचलण्यापर्यंत गेली. ती पण शेजाऱ्यांसमोर. २-४ फटके खाल्यावर सुनेने जे दोन थोबाडीत मारल्या सासूच्या की ती खाली पडून फडतळीवर आदळली. सासूचा हात मोडला. आपण काहीतरी खूप मोठा अपराध केला हे सुनेच्या क्षणार्धात लक्ष्यात आले. आता तीच पोरगी सासूची सेवा करताना मी पाहत आहे. वातावरण एकदम शांत आहे. पण त्याचा इम्पॅक्ट असा झाला आहे की वाडीतील बाकीच्या सासवा रुळावर आल्या आहेत. (आणि सुनांना जोर चढला आहे.) ==== हे असा इंगा दाखवावा लागतो तरच जगात माणूस टिकू शकतो. असो... आता बास करतो.. नाहीतर म्हणाल विशुमितला आज काय कामधंदा दिसत नाही आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रसाद गोडबोले Fri, 06/08/2018 - 17:27 नवीन
हायला अजुन चालु आहे की काथ्याकुट ! भारीच बरेच दिवसांनी मिपाकट्टप्पा मुवींच्या धाग्यांना प्रतिसाद संक्झ्येत हरवु शकेल असा धागा दिसला =)))) चला मग आम्हीही आमच्या मताची पिंक टाकुन जातो ! आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे भारतीय समाजचे क्लस्टरिंग झालेले आहे आणि गेल्या काही वर्षात त्यांच्यातील बाऊंडरीज ठळक होवुन एकदम प्रकर्षाने दिसायला लागल्या आहेत :) आता " एका विशिष्ठ" क्लस्टर ने अपर्णा मॅडमचे सल्ले ऐकावेत , थोडी पडती बाजु घेवुन नाती जपावीत, बायकांनी भाकर्‍या बडावाव्यात , नवर्‍यांनी " बायको इवढे करीयर करुनही केवळ प्रेमाखातर आणि अपर्णा मॅडमने सांगितले म्हणुन भाकर्‍या बडवत आहे " हे पाहुन तिला जमेल तितकी मदत करावी , तिच्या आनंदाच्या ४ गोष्टी कराव्यात ! मध्येच सर्प्राईज म्हणुन तिला छानश्या ट्रिपला न्यावे किंव्वा छानशी साडी किंव्वा दागिना खरेदीला न्यावे किंव्वा अजुन काहीतरी जेणे करुन तिला आनंद होईल असे काही करावे ! सायकॉलॉजीत ज्याला ओफ्हरंट कंडीशनिंग म्हणातत तसे काहीसे ! पॉसिटीव्ह रीइन्फोर्समेन्ट दोघांचेही बिहेवीयर एकमेकांना सुखद होईल :) आणि " दुसर्‍या क्लस्टर" ने , सतत नवर्‍याशी / बायकोशी बरोबरी करत रहावी , तो म्हणला भाकरी कर कि त्याला म्हणावे तु भाजी कर , तो म्हणाला साडी नेस कि त्याला म्हणावे तु धोतर नेस, चान्स मिळेल तेव्हा नवर्‍याशी कचकुन भांडावे , जरा काही बोलाला तर लगेच माहेरी जावे ! :) आणि हो सर्वात महत्वाचे म्हणाजे कृपया आम्हाला तुमचा थोडासा डेटा प्रोव्हाईड करावा ;) आमचे हायपॉथेसीस आहे : H0 : लग्न ही एक अत्यंत टाकाऊ आणि निरर्थक संस्था आहे. सशक्त विवाहसंस्थेचा कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक आर्थिक विकासाशी काडीमात्र संबंध नाही. हे हायपॉथेसीस सिध्द किंव्वा असिध्द करायला आम्हाला डेटा हवा आहे. हा डेटा मिळाल्यास ह्या दोन क्लस्टरमधील लोकांच्या लाँङगटर्म मधील आर्थिक सुबत्तेवरुन योग्य अनुमान काढता येईल अशी आशा आहे :)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 05:47 नवीन
मा-ऑ,, इथे संसार बसवायचं चालय तुमचा काय उगाच हायपॉथेसीस हायपॉथेसीस चाललंय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sat, 06/09/2018 - 15:48 नवीन
हे पहा , एकदम सोप्प आहे, तुम्हाला वाटतंय की अपर्णा मॅडम म्हणाल्या त्याने संसार मोडतात, बायकांना परत माजघरात ढकलले जाते वगैरे वगैरे। बाकी काहींना वाटत आहे, की अपर्णा मॅडम म्हणतात ते योग्यच आहे , बायका गोडबोलून च नवऱ्याला अन घराला मुठीत ठेवतात । उर्मट बोलून अन तुसडे पणा दाखवून फक्त नाती तुटतील जुळणार नाहीतच । आता ह्यातील कोणते विधान सत्याच्या कसोटीवर खरे उतरते हे पडताळून पाहण्यासाठी हायपोथॅसिस टेस्टिंग करावेच लागेल । नुसत्या अर्ग्युम्नेट्स ने काहीही सिद्ध होत नसते , पुरावा द्यावा लागतोच , एखाददुसर्या वैयक्तिक अनुभवांवरून काहीही सिद्ध होत नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
प्रसाद गोडबोले Sat, 06/09/2018 - 16:04 नवीन
माझ्या पाहण्यात दोन्ही बाजूची उदाहरणे आहेत, तुसडेपणाने बोलणारी सून कसें का होईना पण गोड बोलायला लागली अन अचानक अक्षरशः अविश्वसनीय रित्या संसार सुखाचा झाल्याचे एक अतिषय जवळचे उदाहरण आहे तसेच प्रचंड मान राखूनही हिडीस फिदीस करणारे सासू सासरे सहन करणारी एक सून ही पाहण्यात आहे . तस्मात मी कोणत्याच बाजूला बायसड नाहीये । पुराव्याने शाबीत केल्याशिवाय कोणत्याही एका बाजूच्या मतावर विश्वास ठेवणे मला जमणार नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
वीणा३ Fri, 06/08/2018 - 18:47 नवीन
ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या साठी नाही, पण ज्यांचा होऊ घातलाय, लग्नासाठी मुली किंवा मुलं बघणं चालू आहे त्यांनी कुंडली बघताना या ताईंच्या भाषणाची रेकॉर्ड (वॉट्सअँप मेसेज) दुसऱ्या पार्टी ला पाठवून द्यायचा आणि विचारायचं कि तुमचे साधारण असेच विचार आहेत का ? जर दोन्ही बाजूचे विचार असेच असतील तरच लग्न लावायचं. बऱ्याच ठिकाणी सेल्स डिपार्टमेंट वेगळं आणि प्रत्यक्ष काम वेगळं असाच असतं. तसं न करता मुलीला कांदेपोहे कार्यक्रमातच नीट कल्पना द्यायची. आणि जी तयार होईल (झाली तर) तिच्याशीच लग्न करायचं. जरी लग्न जमायला उशीर झाला तरी अजिबात अटींवर तडजोड करायची नाही. ताईच भाषण ऐकवल्याशिवाय लग्न करायचा नाही. बरेचदा काय होत, लोकांना घरात घालायचा गाऊन घ्यायचा असतो पण बघायला गेले कि शर्ट-पॅन्ट पसंत पडते, दिसते स्मार्ट, पटकन आवडते, घेऊन येतात, आणि मग आल्यावर प्रश्न पडतो कि आरे आपल्याला गाऊन हवा होता. डिमांड क्लिअर असूनहि ती आयत्यावेळी बदलल्याने नसल्याने सप्लाय चुकीचा होतो :P , :D . प्रेमात पडताना पण आपल्याला आवडलेली मुलगी आपल्या घरी नीट राहील का, याचा अंदाज येणं अशक्य नसत. पण लग्नाआधी "लग्न होणं" महत्वाचं असतं. आणि लग्न झाल्यावर इतर गोष्टी महत्वाच्या होतात. आपल्या इथे लग्न मोडणं हि अजूनही "टॅबू " गोष्ट असूनही करताना अजिबातच विचार न करता करतात. हल्ली किमान शिकलेल्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र मुली त्यामानाने सावध झाल्या आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 06/08/2018 - 20:10 नवीन
झी मराठीची जाहिरात पाहिली का? एक मुलगा म्हणतो की मला "घरी बसून आई वडिलांची सेवा करणारी" बायको हवी आहे. लोकांना मोलकरीण किंवा रामागडी हवा असतो, शोधतात बायको! पण तुमचं मला अगदी पटलं! मी नुकताच एका अत्यन्त जवळच्या व्यक्तीच्या वधुसंशोधनात भाग घेतलाय. त्याला नीट शिकलेली, नोकरी करणारी पण ह्याने जॉब बदलला की सेंकदात जॉब सोडून त्याच्या मागे जाणारी, आई वडिलांची सेवा करणारी, सर्व धार्मिक कार्य करणारी, पण मॉडर्न, आणि भाऊ असलेली, अजिबात एकुलती एक नसलेली (तिच्या आई वाडीलांची ब्याद माझ्या गळ्यात नको) आणि मग बाकी नाजूक, गोरी, सुंदर मुलगी हवी होती. अशा परस्परविरोधी अपेक्षा ठेवून कसं होणार? बरं मग फोटो मध्ये फटकड्या मुली आवडायच्या आणि प्रत्यक्षात त्या "बरं मग किती स्वयंपाक येतो तुला" इथून सुरुवात करायच्या! आणि घरगुती साध्या मुली अजिबात आवडत नव्हत्या. साडे तीन वर्षा नन्तर त्याने ह्यातली एकही अट पूर्ण न करणारया मुलीशी लग्न केलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 05:36 नवीन
आईच्या पदराड जगलेली लग्नाऊ पोरांच्या बावळट अपेक्षा असतात. नंतर आपोआप सरळ होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ए
एमी Sat, 06/09/2018 - 03:30 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 05:44 नवीन
वीणा ताई वंटास प्रतिसाद... === आमच्या कडे सुपारी फोडताना लग्नाच्या याद्या केल्या जातात. त्यावर लग्न ठरवायला आलेल्या दोन्ही कडच्या पाहुण्याच्या सह्या असतात. अपर्णा ताईचं संपूर्ण भाषणच लिहून आणायचं, करा सह्या म्हणायचं. === हे एक वर्ष सगळ्यांनी काटकोर पाळले तर कापड बस्ते, फर्निचर आणि भांडीवाल्याना गबाळ बांधून काशी यात्रेला जावे लागेल. आणि फोटूवले झाडाला उलटे लाटून स्वतःचेच फोटो काढत बसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
व
विशुमित Sat, 06/09/2018 - 06:16 नवीन
लाटून== लटकून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गामा पैलवान Sat, 06/09/2018 - 10:00 नवीन
विशुमित, १.
अपर्णा ताईचं संपूर्ण भाषणच लिहून आणायचं, करा सह्या म्हणायचं.
अपर्णाबाईंच्या भाषणाचा परत चुकीचा उपयोग होतोय. २.
दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे जेव्हा बंद करतील तेव्हा खरा फेमिनिज्म अस्तित्वात येईल.
हे अगदी बरोबर बोललात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/11/2018 - 18:08 नवीन
अपर्णाबाईंच्या भाषणाचा परत चुकीचा उपयोग होतोय. -- लग्नाच्या आधी जसं मुलीला स्वयंपाक येतो का हे विचारतात, तसंच आहे हे. आपल्या घरात येणार नवीन माणूस आपल्या विचारांचं आहे कि नाही हे शोधायचा अगदीच सोपा मार्ग आहे हा. आणि मला खात्री आहे कि मुलांकडचे कधीच हा मार्ग वापरणार नाहीत, मुलींनीच सुरवात करायला हवी. आधीच विचारून घ्यावं कि तुमचे विचार अपर्णाताईंच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत का? म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणं सोपं जाईल. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे जेव्हा बंद करतील तेव्हा खरा फेमिनिज्म अस्तित्वात येईल. हे अगदी बरोबर बोललात. -- हे तुम्ही परस्परविरोधी बोलताय असं नाही वाटत का? जर सगळ्या बाबतीत "नवऱ्याचं / सासरच्यांच ऐक " हा मुख्य सल्ला ७०% भाषणात असेल तर दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणं कसाकाय बंद करणार. कितीतरी ओळखीच्या मैत्रिणी इंजिनिअरिंग करून लग्न झाल्यावर घरी बसल्या आहेत, आधी सांगितलं होता कि नोकरी केली तरी चालेल, लग्न झाल्यावर ३-४ महिन्यात नोकरी बंद, घरातली कामवाली बाई बंद. फक्त भांडण नको म्हणून संसार चालू. दुसरीच्या ओंजळीने पाणी प्यायचं नसे तर लग्नच करू नये किंवा घटस्फोट घेऊन एकटं राहावं हि बऱ्याच घरातली परिस्तिथी आहे. प्रॉब्लेम असा आहे कि अपर्णा ताई अशा पद्धतीने भाषण करतात कि "नवीन सून /बायको" हा घर मोडण्यातला एकमेव मुद्दा आहे. काही घरात तो असेलही (पण तो अगदी अगदी कमी टक्के असावा (विदा नाही )) . पण इतर मुद्यांबद्दल त्या बोलताच नाहीयेत हेच खूप लोकांना खटकतंय. पण इथे बऱ्याच लोकांना असं वाटतंय कि जेव्हा तुम्ही पब्लिक फोरम वर बोलता तेव्हा एखाद्या चांगल्या (किंवा जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारी) सूनेला (वरती अक्षदा नि म्हटल्याप्रमाणे ) टोचून बोलणारी लोक ढिगाने सापडतील. खूप जवळून बघितलेलं एक उदहारण आहे. मुलीचे वडील बिल्डर होते, मुलाला मुंबईत एक फ्लॅट, गाडी, भरपूर सोन, अतिशय खर्चिक लग्न असा मामला होता, मुलीला काय जमत नाही लाडात वाढलीये असं आधीच सांगितलं होतं. लग्नामुळे आर्थिक फायदे भरपूर झाले आणि करून घेतले पण. इतर नातेवाईंकांनी सावध पण केलं होत कि बाकी सगळं चॅन आहे पण हिला सांभाळून घायला लागेल. आधी एवढं काय म्हणाले, आणि नंतर (स्वतःच्या मुलासारख्याच :P )सुनेच्या सवयी बघून जमेनास झालं. तरी ती बिचारी कायतरी स्वयंपाक करायला बघायची पण सवय नसल्याने अगदीच वाईट व्हायचा. १००% मुलीची चूक असं खरंच एकही उदाहरण नाहीये. लग्नाआधीच्या भन्नाट अटी दोन्ही बाजूनी ऐकल्या आहेत. पण लग्नानंतर (माझ्या पाहण्यातला) ९०% घरात मुलींनीच जुळवून घेतलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 06/11/2018 - 23:24 नवीन
वीणाताई, १.
.... मुलींनीच सुरवात करायला हवी. आधीच विचारून घ्यावं कि तुमचे विचार अपर्णाताईंच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत का? म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणं सोपं जाईल.
मान्य. साधारणत: मुली विवाहाबाबत जास्त चोखंदळ असतात. त्यांना स्वत:चं घर सोडून दुसरीकडे जायचं असतं म्हणून. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेतलेला बरा पडावा. २.
हे तुम्ही परस्परविरोधी बोलताय असं नाही वाटत का? जर सगळ्या बाबतीत "नवऱ्याचं / सासरच्यांच ऐक " हा मुख्य सल्ला ७०% भाषणात असेल तर दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणं कसाकाय बंद करणार.
जरी ते परस्परविरोधी वाटंत असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. इतरांचं ऐकण्याचा सल्ला कुटुंबात रुळेपर्यंत लागू आहे. एकदा का रुळली की स्वत:च्या ओंजळीनं पाणी कसं प्यावं ते हल्लीच्या मुलींना चांगलंच जाणून असतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
ए
एमी Tue, 06/12/2018 - 00:48 नवीन
मुली विवाहाबाबत जास्त चोखंदळ असतात. ते हल्लीच्या मुलींना चांगलंच जाणून असतात. >> हे तुम्ही एका अतिशय छोट्या गटातल्या मुलींविषयी बोलत आहात. १९ वर्षाच्या आत एक/दोन मुल होणाऱ्या ४७% मुली आहेत भारतात... कित्येक शिकलेल्या मुलीदेखील पाहिल्या आहेत ज्या आपल्याला होकार देणाऱ्या पहिल्याच मुलाशी लग्न करतात, आवडला नसेल तरीही. कारण मुलीने नकार दिला तर समाजात बोभाटा होऊन तिला पुढे फारशी स्थळच येणार नाहीत... असो. मी आधीच म्हणल्याप्रमाणे म आं जा वर फक्त (इतर समाजाशी नाळ तुटलेल्या) 5% लोकांविषयी बोलणं चालू असत...ं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ए
एमी Sun, 06/10/2018 - 03:24 नवीन
ही बघा आळशी 'नोकरदार' बाईबद्दल 'कामसू' गृहिणीची कमेंट: तथाकथित उच्चभ्रू वस्तीत ते तरुण जोडपं राहत होतं. फक्त ब्रँडेड वस्तू आणि सगळे व्यवहार ऑनलाइन. शेजारीपाजारी कोण राहतोय, कोण जगला मेला सोयरसुतक नाही. दोघे एका उच्च बँकेत उच्च पदावर. एकदा त्यांच्याकडे काम करणारी बाई एक आठवडा सुट्टीवर गेली. आठव्या दिवशी आली आणि नाक दाबत बाहेर आली. शेजारची पन्नाशीची बाई तेव्हा नेमकी स्वतःच्या दाराबाहेर झाडत होती. म्हणाली, काय गं, काय झालं? तर काम करणारी बाई सांगू लागली "काय सांगू ताई. सिंक आणि ओटा भरून खरकटी भांडी आणि बाकी घरभर घाण कचरा आहेच पण अहो सात दिवसांच्या चड्ड्या बॉड्या आणि नाक पुसलेले चिकट रुमाल सुद्धा तसेच पडलेत." किळस शिसारी राग चीड व्यक्त करावी (अर्थात फक्त स्वतःशी) की "मला काय त्याचे" म्हणत पुढे जावे ! हं. शिक्षणाचा, पदाचा, भाषेचा, प्रांतांचा, पिढीपिढीतल्या अंतराचा कशाकशाशी कशाचाच संबंध नसतो. संबंध असतो फक्त माणूस असा किंवा तसा असण्याशी. बाकी गोष्टी छोट्याच असतात. - स्मिता गानू जोगळेकर >>अगदी खरं आहे शिक्षणाचा, पदाचा, भाषेचा, प्रांतांचा, पिढीपिढीतल्या अंतराचा कशाकशाशी कशाचाच संबंध नसतो. शिक्षणात काडीचीही अडचण न आलेली बाई, आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या पुरुषवर अवलंबून राहते, स्वतःखेरीज जास्तीजास्त ३ लोकांचा स्वैपाक करायच्या बदल्यात ४० हजार महिनाची लाईफस्टाईल मिळवते आणि उच्च बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या बाईचे चार घरी काम करून स्वतःचे घर चालवणाऱ्या बाईसोबतचे वागणे याबद्दल जालावर येऊन पो टाकते.... दुपारी ढाराढुर झोपणाऱ्या किंवा माझ्या नवऱ्याची बायको बघत बसणाऱ्या किंवा जालावर येऊन होममेकरी पो टाकणाऱ्या बायकांची कमी नाही जगात!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sun, 06/10/2018 - 10:32 नवीन
शिक्षणात काडीचीही अडचण न आलेली बाई, आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या पुरुषवर अवलंबून राहते, स्वतःखेरीज जास्तीजास्त ३ लोकांचा स्वैपाक करायच्या बदल्यात ४० हजार महिनाची लाईफस्टाईल मिळवते आणि उच्च बँकेत उच्च पदावर काम करणाऱ्या बाईचे चार घरी काम करून स्वतःचे घर चालवणाऱ्या बाईसोबतचे वागणे याबद्दल जालावर येऊन पो टाकते.... दुपारी ढाराढुर झोपणाऱ्या किंवा माझ्या नवऱ्याची बायको बघत बसणाऱ्या किंवा जालावर येऊन होममेकरी पो टाकणाऱ्या बायकांची कमी नाही जगात!
हे मत वाचल्यावर
शिक्षणाचा, पदाचा, भाषेचा, प्रांतांचा, पिढीपिढीतल्या अंतराचा कशाकशाशी कशाचाच संबंध नसतो. संबंध असतो फक्त माणूस असा किंवा तसा असण्याशी.
हे मत पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
अ
अनन्त अवधुत Sun, 06/10/2018 - 10:24 नवीन
.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Tue, 06/12/2018 - 03:32 नवीन
हा धागा आणि या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या आणि जगातील सर्वात लहान फेअरी टेल (shortest fairy tale) आठवली. A boy proposed to a girl. She refused. And he lived happily ever after. पिरीयड.
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 06/12/2018 - 03:38 नवीन
And they both lived happily ever after. Separately!! असं पायजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा