Skip to main content

[मूल ते मा़झेच होते]

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 06/12/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी सागरलहरी ह्यांच्या ह्या अप्रतिम काव्याचे हे एक रुप चमचे ते तुझेच होते, काटेच हाती घेऊनिया.. स्वस्त नव्हतीच थाळी, म्हणे आमरस अनलिमिटेड घ्या तव मुलींशी घसट माझी, निमीत्त्य ते खाणावळी वातड सहा पोळ्या तोडतो, तिच्याकडे पाहून त्या उगीच नाही मी नोकरी, केली ती परगावी, आणिक बेचव डाळ-उसळींची, पर्वा मी केली का? तुझला आक्षेप नसे, तुच रचिला खेळ सारा, बराय हा जावईतरी, येथेच ह्याला जेवू द्या... दिन सरता डेप्युटेशनचे, दैव सारे पालटले, सुन्न मी तुझ्याच इतका, परदेसीच मला राहू द्या...
काव्यरस

ते झाड़ तोडले कोणी ?

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 06/12/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
ते झाड़ तोडले कोणी ? पक्ष्यांची घरटी होती ... बहराची पालव होती .. .... ते झाड़ तोडले कोणी ? संध्याकाळी मावळतीचा निरोप घेउन आम्ही यावे ... इवल्या इवल्या पिल्लांना हे मायेचे दाणे द्यावे .. करून विसावा पुन्हा पिलाना तुझिया खान्द्यावरती द्यावे... इवले होते स्वप्ना आमुचे तोडून विस्कटले कोणी? .... ते झाड़ तोडले कोणी ? सळ सळ ऐकत तुझीच आम्ही प्रेम गूंजने करीत होतो .. मावळतीच्या पटलावरती स्वप्न उद्याचे रेखीत होतो .. प्रीत फुलांच्या वचना साठी तुलाच साक्षी ठेवीत होतो .. संकेत भेटीचा तुझ्या तळीचा असा मोडला कोणी ? ....

कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे,

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 06/12/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे, वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, मुरलीची तान , ऐकू येता जाई भान, सुटे कामधाम, घेते तुझ्याकडे धाव रे , तुझ्या वेणु नादामधे जीव धुंद होतो रे कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, रोज खेळू रास, हाच लागे ध्यास, तुझे नाम होई श्वास, उरे हाच एक छंद रे, तुझ्या पायी सोडिले मी, उभे घरदार रे , कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, नुरे द्वैताचे भान, होते सारी एकतान, लागे कृष्ण ध्यान, कृष्णमयी होते रे , सारीकडे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण बघते रे, कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे वेड़े प

फूल ते माझे न होते....

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 06/12/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
फूल ते माझे न होते, काटेच हाती घेऊ दया.. हास्य ते नव्हतेच गाली, जखमा उरातून वाहू दया मृत्युशी दोस्ती ही माझी, आहे पुराणी वेगळी मृत्यूचा आनंद लुटतो, जगणे उद्यावर राहू दया मुक्त मी केली फकीरी, साथ ही नव्हते कुणी साक्ष देण्या त्या क्षणांची, माझे कलेवर राहू दया काय नसतो देव तेथे, पाहण्या हा खेळ सारा ? असो मग 'काहीतरी', 'तेथे' उगीचच राहू दया ... रात्र सरता मैफिलीचे, रंग सारे लोपले, मात्र हा इतुकाच ठिपका, तुमच्या रुमाली राहू दया.. --- सागरलहरी २८/३/२००९

अजून एक क्रियाशील आदर्श

लेखक विकास यांनी रविवार, 06/12/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू.

बोधीवृक्षावरची बांडगुळं

लेखक शैलेन्द्र यांनी रविवार, 06/12/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतील बोधीवृक्षावरची बांडगुळे लेख वाचनात आला. हे विचार प्रथमच मांडले गेलेत असे नव्हे किंवा मध्यमवर्गाला अपराधीच्या पिंजर्‍यात ऊभी करायची पद्धतही नवीन नाही.

शेझवान सॉस सोबत चिकन लॉलीपॉप

लेखक गणपा यांनी रविवार, 06/12/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, इंडो-चायनिज् च्या पहिल्या भागात आपलं सहर्ष स्वागत. गेल्या बुधवारी संतोषने झक्कास व्हेज रोल आणि त्या जीवघेण्या शेझवान सॉस चा फोटो टाकला तेव्हा पासुन आमच्या जीभेचा वाहणारा नळ काही बंद होईना. काही तरी बनवुन कोंबल्या शिवाय तो बंद होणार नाही ते आम्ही तेव्हाच ताडले. तर आजचा मेन्यु बच्चे कंपनीच लाडक चिकन-लॉलीपॉप. (आम्हीही अजुन ल्हानच आहोत ;) ) आजकाल बाजारात रेडीमेड लॉलीपॉप्स मिळतात. पण आपल्या कडे अजुन सर्वत्र मिळतीलच अस नाही. त्यामुळे तुम्हाला चिकन्-विंग्जस् पासुन लॉलीपॉप कसे बनावायचे ते पण सांगतो. साहित्यः चिकन विंग्जस् .

माझे खाद्य-पेय जीवन-४

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 06/12/2009 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः मद्य, मद्यपान व मद्यपी यांच्याविरुद्ध तीव्र आणि टोकदार मते असणार्‍यांनी हे लिखाण वाचले नाही तरी चालेल. मद्यपानाचे मला काही उदात्तीकरण वगैरे करायचे नाही, जे आहे, जे पाहिले, ते सांगायचे आहे, इतकेच. चिअर्स! चहा, कॉफी ही प्रातःकालीन उत्साहवर्धक पेये झाली की इतर पेयांचा विचार सुरु होतो. त्यातली बाटलीबंद शीतपेये तूर्त सोडून देऊ. इतर पेयांमध्ये लिंबू सरबत, कोकम सरबत आणि पन्हे हे सरताज. लिंबू सरबतात बारीक वेलदोड्याची पूड आणि बर्फाचे भरपूर खडे असले की ते अधिक चविष्ट लागते. कोकम हे तहान भागवणारे खरे, पण त्यात पाण्याऐवजी थंडगार सोडा घातला तर ते अधिक मादक लागते.

गूगलचे लिप्यंतर (Google Transliteration)

लेखक राहूल यांनी रविवार, 06/12/2009 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक फ्रेंच मित्र आहे - जिरोम म्हणून. त्याच्या कॉम्प्युटरला मी शक्यतो हात लावत नाही. कारण त्याच्या laptop मध्ये अथपासून इतिपर्यंत सर्वकाही फ्रेंच भाषेत आहे; आणि अस्मादिकांना फ्रेंच मधल्या bonjour व merci च्या पलीकडे ओ कि ठो कळत नाही. जिरोमची हि तऱ्हा; तर चिनी मित्राच्या कॉम्प्युटरकडे बघायला सुद्धा नको. फ्रेंच भाषा कळली नाही तरी निदान लिपी इंग्रजीसारखी आहे. चिनी भाषेची अगम्य गिचमिड पाहून आपण निरक्षर असल्याचा भास मला होतो.

बहिणाबाई- एक महान कवियत्री

लेखक सुनिल पाटकर यांनी शनिवार, 05/12/2009 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
बहिणाबाई- एक महान कवियत्री मन वढाय वढाय....असं म्हणत मानवी मनाचा गुंता जिने आपल्या कवितेत रेखाटला,कशाला काय म्हणू नये हे जिने जाणलं , संसाराची व्याख्या जिला पुर्णपणे कळली ,माणूस.माणूस कधी होईल याचा जिला ध्यास लागला ,वाट्च्या वाटसरुलाही जिने मार्ग दाखविला अशी महान कवियत्री बहिणाबाई’,,,, जांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द काव्य होऊन बाहेर पडायचा.बहिणाबाईंना जाऊन ५७ वर्ष पूर्ण झाली परंतु त्यांच्या कविता आजच्या काळातही चपलख लागु होतात. घरापासून मळ्यापर्यंत हा बहिणाबाईंचा रोजचा प्रवास होता, कागद पेन दूरच पण अक्षरांची साधी ओळखही जांना नव्हती त्यांची गाणी.कविता ओव्या आजच्या काळाही मार्गदर्श