Welcome to misalpav.com

औषध

लेखक: मोक्षदा | प्रसिद्ध:
हल्लीच महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्यातील काही महत्त्वाचा भाग सर्वांच्या माहितीसाठी इथे देत आहे. औषधांचा वापर, विक्री, आणि रुग्णाचे हित आणि औषध प्रशासनाची जबाबदारी याबद्दल यात खूप चांगल्या तर्‍हेने उहापोह केलेला आहे. ------------------------------- औषधांच्या वापरामुळे मानवी जीवन सुखकर होत चालले असताना औषधांच्या चुकीच्या वापरामुळे उद्भवणारे भयानक परीणाम सुद्धा वाढीस लागले हि बाब सामाजिक स्वस्थ्याकरिता अत्यंत हानिकारक आहे.


आपल्याला सगळं कसं,साधं सोपं पाहिजे …

लेखक: घन निल | प्रसिद्ध:
राज्य करणारे करतात निषेध… पण सैनिक मात्र ,जीवानिशी जतो … शहीद होणं , हुतात्मा होणं म्हणजे नेमक काय ? शेवटी मृत्यूच तो …. नाही का ? मग आपण सजवतो त्यांची प्रेतं … गुंडाळतो आपल्या तिरंग्यात …. आणि जमलंच, तर थोडा संताप व्यक्त करत जोडतो आपले हात … आदरा खातर … मरताना खरंच ,त्याला वेदना झाल्या असतील का हो? आपला गाव,आई-बाप ,मित्राची हाक,बायकोचं हसू छकुलीचं रुसू … यातलं काही आठवलं असेल ? खरं खरं सांगा … कि सांगून टाकू , हसत हसत शहीद झाला तो … ? ऐका माझं ,आपण असंच करु.… तिरंग्यात गुंडाळून आणु ….


रिझर्व बँकेचा नवा आदेश आणि काळा पैसा

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
मित्रांनो, रिझर्व बँकेच्या नव्या आदेशानुसार सन २००५ च्या आधीच्या म्हणजे थोडक्यात जिच्यावर साल छापलेले नाही अशा ५०० रुपयांच्या नोटा काही कालानंतर चलन म्हणून अमान्य होतील. ज्यांच्याकडे असतील त्यांनी नाव गाव पत्ता आदि सोपस्कार करून त्याऐवजी चालतील अशा नोटा बदलून घ्याव्यात असे साधारण म्हटले गेले आहे.


मौत का सौदागर कुणाला म्हणावे मग?

लेखक: मंदार दिलीप जोशी | प्रसिद्ध:
गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना काही वर्षांपूर्वी मौत का सौदागर म्हटल्याने सोनिया गांधींवर चौफेर टीका झाली. मग रीतसर सारवासारव करण्यात आली. नुकतेच एका काँग्रेसी मंत्र्याने पंतप्रधान नरभक्षक नको असे खळबळजनक विधान केले. तर गुजरातच्या दंगलींच्या वेळेला नरेन्न्द्र मोदी मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्यावर मौत का सौदागर असल्याचा आरोप केला जातो. पण जेव्हा ३०००+ शी़खांची हत्या झाली तेव्हा सरदहु दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप हरकिशनलाल भगत, ललित माकन, जगदीश टायटलर व सज्जनकुमार (नावात चूक असेल तर कृपया सांगा) यांच्यावर होता.


सर्व वास्तु पांडवकालीन कश्या ?

लेखक: प्रमोद देर्देकर | प्रसिद्ध:
आपण कोणत्या ही ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) पहायला गेलात तर तेथील स्थानिक रहिवाशी ती वास्तु पांडवकालीन आहे असा उल्लेख करतात. माझे इतिहासाचे जे वाचन झाले ते थोडेसेच, आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा योगही जास्त नाहिये. आज पर्यंत जेवढ्या ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) गोष्टी पहिल्या, स्थळांचा इतिहास स्थानिक लोकांकडुन ऐकला त्यावरुन एक अनुमान निघते की या सर्व वास्तु पांडवांनी त्यांच्या वनवासातील काळात ते इथे होते तेव्हा बांधल्या आहेत. आता पांडवांना जो वनवास झाला तो १२ वर्षाचा आणि एक वर्षाचा एकांतवास होता.


राष्ट्रीय राजकारणावरचा प्रादेशिक अस्मितांचा प्रभाव

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
लोकसभा प्रेडिक्शन्सच्या दृष्टीनेइंडिया टूडे या मासिकाचा ओपिनीयन पोल आला आहे. ओपिनीयन पोल्स अंदाज बरोबर चूक निघू शकतात आणि अजून मध्ये बरेच महिनेही आहेत. या धाग्यात ओपिनीयन पोल मधली एक वेगळी गोष्ट जी अधोरेखीत करावयाची आहे ती म्हणजे राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय पक्ष पूर्ण बहुमत मिळवत नसल्याने प्रादेशिक अस्मिता असलेले आणि छोट्या पक्षांचा प्रभाव वाढतोच आहे.


रिंकू पाटील १९९०

लेखक: देव मासा | प्रसिद्ध:
काल एक कविता वाचनात आली . त्यात हि ओळ होती “कोण्या पुस्तकात झाला अपमान माझा, भडकून उठले जवामर्द. भर गर्दीत रिंकू पाटील जाळली तेव्हा सारे का झाले सर्द ? '' आणि अचानक मन १९९०चा दशकात गेले त्या वेळी मी ५वीत असीन. त्याच काळात रिंकू पाटील जळीत प्रकरण घडले होते , ९०च्या काळात १०वीत शिकणाऱ्या मुलीला प्रियकर असणे हीच मोठी अशचर्यचि गोष्ट होती . या प्रकरणात तर मुलीला १०वीच्या परीक्षा केंद्रातच पेटवून दिले होते . हरीष पटेल असे काहीतरी तिच्या प्रियकराचे नाव होते . आणि तिची दुसरी सख्खी बहिण सुधा याच परीक्षा केंद्रात परीक्षा देत होती म्हणे असे पुसटसे आठवत आहे .


नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग ३ (आ) नेताजी निवासातील नोकर वर्ग

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
भाग 3 (आ) - नेताजी निवास सिंगापूर वास्तव्यातील निवासातील नोकरवर्ग बर्लिनहून नेताजींबरोबर आलेले श्री स्वामी व हसन सुमारे दीड वर्षापर्यंत नेताजींचे चिटणीस म्हणून काम पहात. शिवाय स्वातंत्र्य सैनिकातून श्री रावत हे गढवाली ग्रहस्थ लष्करी सहायक म्हणून दिमतीस दिलेले होते. एक शीख ग्रहस्थ श्री समशेरसिंग व एक चाळीशी उलटलेले गुरखा सुभेदार, नेताजींचे अंगरक्षक म्हणून काम करीत. जपानी भाषा व अथवा व्यक्तींशी संबंध आणणारी सर्व कामे सुलभतेने व्हावीत म्हणून एका उच्च सरदार कुळातील श्री कोबायाशी हे जपानी तरूण नेताजींच्या दिमती हजर असत. श्री.


उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २ - अधिक माहितीसह..)

लेखक: मोदक | प्रसिद्ध:
रात्री १२ पर्यंत गप्पा मारत बसलो व नंतर उद्याच्या प्रवासाची उजळणी करत दिवस संपला.. (भाग १) दिवसभराचा प्रवास आणि भरपेट खादाडी यामुळे रात्री गाढ झोप लागणे साहजिक होते पण मित्राच्या घराजवळ असलेली डेअरी, तेथे रात्रभर सुरू असणारी रिक्शांची वर्दळ आणि तेथेच वावरणारे कुत्र्यांचे टोळके यांनी शांत झोपेच्या आनंदावर विरजण घालण्याचा जणू चंग बांधला होता त्यामुळे सलग दुसर्‍या रात्री झोपेचे खोबरे झाले. अगदी कशीबशी पाऊणएक तास झोप मिळाली. सकाळी आजीबात फ्रेश वाटत नव्हते.


फ्लॉवर ची भजी

लेखक: भ ट क्या खे ड वा ला | प्रसिद्ध:
हिवाळ्याची मौज: फुलगोभी मटार पोहे हि पाककृती वाचून पूर्वी केलेली एक पाककृती सुचली ती देत आहे.त्या मूळे फोटू नाहीत वाकबगार मंडळी योग्य ते बदल करून हि पाककृती करू शकतील. हिवाळ्यातील स्वत आणि मस्त फ्लॉवर चा तुकतुकीत पांढरा गड्डा आणावा. एवढा कशाला आणलात असे सौ ने विचारावे. तुला भाजी ला किती लागेल तेव्हढा ठेव , बाकीच्याचे मी काय ते करतो असे सांगून स्वयंपाक घरावर अतिक्रमण करावे. अतिक्रमण पूर्वनियोजित असेल तर बेसन सुद्धा आधीच आणावे. ( कधी कधी बेसन संपत आलंय असली कारणे देऊन बेत हाणून पाडायचा प्रयत्न होतो) फ्लॉवर ची फुले खुडून घ्यावीत ,धुवावीत.