Welcome to misalpav.com

विकास म्हणजे नक्की काय?

लेखक: उडन खटोला | प्रसिद्ध:
पुणे आणि आसपासचा परिसर , घणसोली ,नवी मुंबई परिसर ,पेण - पनवेल इत्यादी परिसरात भूखंड / जमीन विक्रीतून आलेल्या प्रचंड पैशातून निर्माण झालेला नवश्रीमंत वर्ग आणि पर्यायाने बोकाळलेली गुंठामंत्री संस्कृती (?) इत्यादी पहाता या भागाचा विकास झाला आहे,असे म्हणणे योग्य ठरेल का? महाराष्ट्रात जे चालले आहे त्याच वर्णन करायला एकाच शब्द आहे, तो म्हणजे 'महाभयंकर'! ह्याला उद्योगीकरण म्हणतात काय? शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या (किंवा) विकायला मोहात पाडायचं आणि तिथे Concrete Jungle उभ करायचं ह्याला म्हणायचे शहरीकरण? जमिनींचे भाव वाढणे, गाड्यांची संख्या वाढणे.


'जय हो!' आख्यान

लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
तर आता असं बघा, सलमानचा 'जय हो!' चित्रपटगृहामध्ये झळकलेला आहे. सलमानच्या प्रतिमेला साजेसा चित्रपट असेल या अपेक्षेने जनतेने चित्रपटगृहाकडे पावले वळवली खरी परंतु घात झाला, पावले थिजली, नजरा स्तब्ध जाहल्या, हात शिट्ट्या मारण्यासाठी ओठांकडे न जाता गपगुमान खिशात गेले, पायाच्या बोटांनी शरमेने मान खाली घातली, चेहरे सुकले, हसू मावळलं, हळद रुसली, कु़ंकू हसलं...असे काय बरे जाहले? चित्रपट सुरु होतो ते एका युवतीच्या अपहरणाच्या प्रसंगाने.


कोयरी आणि कुंदन रांगोळ्या

लेखक: इशा१२३ | प्रसिद्ध:
संक्रातीच्या निमित्त्ताने काही खरेदी करावी म्हणून बाजारात फेरफटका मारला आणि नविनच कोयरीचे साचे मिळाले.मग काय लगेच घेउन टाकले.


द्विभाषिक क्षणिका/ चश्मा /उम्मीद

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
(१) चश्मा डोळे झाले माझे अधू दिखती नहीं है दिल्ली. मिळेल कुठे तो जादूचा चश्मा दिखाए मुझे जो लालकिला. (२) उम्मीद झाले शरीर जरी म्हातारे दिल अभी जवान है. वरेल का मला ती षोडसी उम्मीद अभी कायम है.


आयुका वेधशाळा - गिरवली

लेखक: मोदक | प्रसिद्ध:
. आयुकाचे श्री चैतन्य राजर्षी आणि श्री उमेश वाघेला यांच्यासोबत या शनिवारी गिरवली गावाजवळ असलेल्या आयुकाच्या वेधशाळेला भेट देण्याची संधी मिळाली. आयुकाचा टेलीस्कोप बघणे हे या भेटीचे मुख्य आकर्षण होते. रिफ्लेक्टींग प्रकारच्या या टेलीस्कोपच्या आरशाचा व्यास २ मीटर आहे. आरशाच्या व्यासाच्या आकारावरून, कावलूर टेलीस्कोप (२.६ मीटर) आणि लडाख मधील एका टेलीस्कोपनंतर याचा नंबर लागतो.


चिकन चिली

लेखक: स्वाती दिनेश | प्रसिद्ध:
साहित्य- ५०० ग्राम बोनलेस चिकन, २ ते ३ हिरव्या मिरच्या मध्ये फोडून लांब चिरुन (पोपटी मिरच्या कमी तिखट असतात, गडद हिरव्या मिरच्या घ्या.


जिजामाता उद्यान कट्टा वृत्तान्त

लेखक: सुधांशुनूलकर | प्रसिद्ध:
|| श्री गुरवे नम: ||

जिजामाता उद्यान कट्टा वृत्तान्त

जिजामाता उद्यानातलं वृक्ष-पुष्पवैभव

डिस्क्लेमर : खरं तर वृक्ष-वनस्पती या विषयात मला फार काही माहीत नाही. प्राणी-पक्षी-कीटक-फुलपाखरं-साप हे माझ्या विशेष आवडीचे आणि अभ्यासाचे विषय. मात्र, बायकोला वृक्ष-वनस्पतींची खूप माहिती असल्यामुळे, तिच्यामुळे मला जे काही थोडंफार माहीत झालं, त्याच्या जोरावर कट्ट्याला गेलो आणि हा सचित्र वृत्तान्त सादर करतो आहे.


लोकमान्य टिळक आणि अनुवाद

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
नमस्कार ह्या धाग्याची दोन उद्दीष्टे आहेत.पहिला लोकमान्य टिळकांची स्वतःची अनुवाद पद्धती (शैली) होती जी मुख्यत्वे गीतारहस्यामधील गीता अनुवादा करिता वापरली त्याची नोंद घेणे.स्वतःला हवा तसा अर्थ लावता येणारा स्वैर अनुवादा ऐवजी लेखकास अभिप्रेत तत्कालीन संदर्भ काय असले पाहीजेत हे लक्षात घेत जसाच्या तसा अनुवाद करण्यावर लोकमान्यांचा भर असावा. या बद्दल गीतारहस्याच्या युनिकोडीकरणा नंतर माहिती देणे अधीक सोपे असेल.


दोभोळकर कुटुंबीयांनी समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्यासारखा सरकारी पुरस्कार नाकारावा का ?

लेखक: psajid | प्रसिद्ध:
नुकताच डॉ. नरेंद्र दाभोळकरांना सरकारने 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला. या निमित्त माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले ते तुमच्याशी व्यक्त करावे म्हणतो १) डॉक्टरांच्या खुनाला आज जवळ जवळ पाच महिने होत आलेत तरीही पोलिस नेमक्या खुन्यापर्यंत पोहोचली नाहीत आणि म्हणून सरकारने हे अपयश झाकण्यासाठी, आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून आम्ही (सरकार) सुधारणावाद्यांच्या बरोबरच आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली का ? २) कोणत्याही समाज सुधारकाचे कार्य हे त्याच्या मृत्युनंतरच लोकांसमोर यावे का ?