रानी की वाव
- Read more about रानी की वाव
- 48 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 15653 views
बर्याच दिवसापासून गुजरातमधल्या राणी की वाव,अदलज,आणि मोढेरा इथले सूर्यमंदिर पाहायला जायचे चालले होते. पण नेहेमी बरोबर येणारे आमचे मित्र मंडळ नुसत्या मूर्ती आणि मंदिर बघायला जायच्या आमच्या बेताला फाटे फोडायला लागण्याआधी दिवाळीच्या दिवशी पहाटे अहमदाबादला जाणार्या विमानाचे आरक्षण पक्के करून टाकले!
दुपारीच मेहेसाणामार्गे पाटणला येऊन पोहोचलो. पाटण हे लहानसे खेडेगावासारखे वाटणारे गाव हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. इथल्याच पाटण पाटोला साड्या जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या किमती विचारल्यावर तेवढ्या खर्चात आपण युरोपला जाउन येऊ अशी समजूत घालून पुढे निघालो.