Welcome to misalpav.com

नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग ३(अ)

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
नेताजींचे सहवासात 1 2 मित्रांनो, आज नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आहे. त्या निमित्ताने या पुस्तकाचा परिचय भाग 3 सादर करीत आहे. आज तिथीनुसार स्वामी विवेकानंदांची जयंतीही साजरी होत आहे. (दिनांकानुसार दि 12 जानेवारी) भाग 3 (अ) - नेताजी निवास सिंगापूर बेटाच्या पुर्व किनाऱ्यावर समुद्रकाठी एकएका धनिकांचे ऐसपैस बंगले आहेत.


प्रादेशिक परिवहन अधिकारी यांस पत्र

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
प्रति, प्रादेशिक परिवहन अधिकारी विषय: रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल अभिनंदन आणि आभार a माननीय महोदय, सर्वप्रथम आपल्याला आणि समस्त वाहतुक नियंत्रकांना माझा सप्रेम नमस्कार. नुकताच रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रस्ता सुरक्षा ही खरोखरच किती महत्वाची गोष्ट आहे याची जाणीव खरं तर आज प्रत्येकाला होणं गरजेचं आहे.


निबंध स्पर्धेचे आयोजन ( मराठी हितवर्धिनी सभा).

लेखक: कलंत्री | प्रसिद्ध:
संदर्भ : लोकसत्ता पुणे पुरवणी दिनांक २३/०१/१४. मराठी हितवर्धिनी सभे तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विषय, १) शाळांतुन होणारा मराठीचा र्‍हास. २) मराठी भाषा आणि २०२०. ३)मराठीत खुपणारे इंग्रजीचे खडे. ४)मराठी अभिजात भाषा आहे काय? संपर्क : ८१४९१९४१९७ पत्ता, मराठी हितवर्धिनी सभा, लकडे भवन,३२, नारायण पेठ, माती गणपती जवळ, केळकर रस्ता, पुणे. कृपया या स्पर्धे सक्रिय भाग घ्यावा ही विनंती. द्वारकानाथ कलंत्री


कोंग्रेस चे राजकारण आणि रामदेवबाबा, अण्णा, केजरीवाल वगैरे...

लेखक: आनन्दा | प्रसिद्ध:
(मी एक कोन्स्पिरसी थिअरी मांडत आहे. सर्वांनी सहमत व्हावेच असे नाही.) सध्या आम आदमी पार्टीने सर्वच मीडिया हायजॅक केला आहे. सोमनाथ भारती प्रकरणात देखील दोन्ही प्रकारच्या बाजू समोर येतच आहेत. मला सध्या वेगळा प्रश्न पडला आहे. तो प्रश्न आहे आम आदमी पक्ष काँग्रेस चे अपत्य आहे का? याला अनुमोदन देणारी माझी निरीक्षणे - २०१० पासून जेव्हा काँग्रेस च्या भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे बाहेर पडू लागली तेव्हापासूनच कॉम्ग्रेस अस्वस्थ होती. लोकांच्या मनात प्रस्थापितांबद्दर तीव्र राग आहे हे दिसतच होते.


मूलभूत हक्क

लेखक: उडन खटोला | प्रसिद्ध:
माझ्या सुमारे ६ वर्षांच्या अनुभवावरून अशा निष्कर्षा प्रत पोहोचलो आहे , की यच्चयावत मराठी संस्थळां वर हिंदू अध्यात्म / देवता /आराधना /उपासना /साधना याविषयी कोणीही अभ्यासू ने /श्रद्धाळूने काही लेख टाकला रे टाकला कि कथित सुधारणा वाडी / विज्ञान वादी / अंधश्रद्धा इत्यादी मंडळी त्यावर तुटून पडतात . हे गैर आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वधर्म-उपासना स्वातंत्र्य हे भारतीय राज्य घटनेने दिलेले आहे ,असे असताना कथित नव -मतवादी किंवा सुधारक अथवा हिंदू धर्मद्वेषी मंडळी मूलभूत हक्कावर घाला घालू पहात आहेत .


बंधने

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
ओठांस बंधने हृदयाची हृदयास प्रेरणा प्राणाची प्राणास गती मन-शरिराची शरिरास कुंपणे काळाची काळास न आहे गोत कुणी वय चिर ओघळणारे पाणी अंतास अथांग जलाशय पण त्यासही किनार्‍याची करणी गुदमरे प्रयोजन जन्माचे ईप्सीत न कळते जगण्याचे प्रणयात म्हणे क्षणशांती परि सागरास अथक अशांती ………………. अज्ञात


भीमनी घंटी

लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
" मॅडम, भीमनी घंटी इकडं आहे, या बाजूने या," माझ्या सहका-याचा आवाज. मी गुजरातमध्ये ऑफिसच्या कामासाठी आले आहे. दोन आदिवासी गावांना भेट देऊन इथे चालू केलेल्या काही कार्यक्रमांची नोंद करायची आहे. इथं एक डॉक्युमेंटेशन टीम आहे - तिचं प्रशिक्षण आणि कामाची नोंद असा दुहेरी उद्देश आहे. सोबत माझी कार्यक्रमाची पाहणी पण करून होईल. सगळा कार्यक्रम आधीच ठरवलेला आहे. आदल्या दिवशी एकाने मला हळूच, "जाम्बुघोडा जवळच आहे तिथून. जाऊ यात का वेळ मिळाला तर?" असं विचारून घेतलं आहे. " काय आहे तिथं पाहण्यासारखं?" या प्रश्नावर "हनुमानाची प्रचंड मोठी मूर्ती" असं उत्तर उत्साहाने मला मिळालं.


अंधश्रद्धा - कर्मकांड

लेखक: kalpana joshi | प्रसिद्ध:
नको लागूस माणसा तू, अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या मागे नाही त्यातून चांगले ते निष्पन्न निघे। अडकता माणूस त्या भोवऱ्यात नाही सुटका होत त्यातून, माणसा तुझे कर्तव्य तू करत जा नको मागे लागू अंधश्रद्धेच्या आणि कर्मकांडाच्या आता तरी शहाणा हो व त्या गर्तेतून घे मोकळा श्वास। शिकून-सवरून तू मोठा झालासी, विज्ञानाचा वापर तू करू लागलासी, काय सत्य ते तुला ठाऊक तरी तू आहारी जातसे कर्मकांड व अंधश्रद्धेच्या! जे व्हायचे ते होणार असते नको अडकू तू या कर्मकांड व अंधश्रद्धे च्या फेऱ्यात माणसा माणसा, आता तरी तू डोळस हो. बघ जग कुठे चालले आहे?


चाळीस हजारी

लेखक: निनाद | प्रसिद्ध:
मराठी विकिला चाळीस हजारी टप्पा गाठायला आता अजून फक्त १९१ लेख हवे आहेत. २७ फेब्रुवारी या मराठी दिवसाच्या आधी मराठी विकीला चाळीस हजार लेखांच्या टप्प्यावर घेऊन जाऊया! या साठी अजून जवळपास महिन्याभराचा कालावधी आहे. विकिवर कस्काय लिहायचे बॉ? मराठीविकिवर लेखन करणे अगदी सोप्पे आहे. आपल्याला हवा तो शब्द शोधपेटीत शोधायचा तो लाल रंगात आला तर त्यावर टिचकी द्यायची की लेखनाची खिडकी उघडेल त्यात लिखाणास सुरुवात करायची. झाले! मी काय लेख लिहू? असा प्रश्न असल्यास आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याचा शोध घ्या. काही सापडले नाही तर लेख लिहून टाका.