Welcome to misalpav.com

जिजामाता उद्यान कट्ट्यासाठी सर्वांना सहकुटूंब आमंत्रण.....

लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:
भायखळ्याचं जिजामाता उद्यान. जवळजवळ ५० एकर विस्तीर्ण परिसरावर दीडेकशे वर्षांपासून उभं असलेलं हे उद्यान मुख्यता प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध. इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला. हल्ली तिथे फार थोडे प्राणी शिल्लक आहेत. मात्र प्राणिसंग्रहालय असलेल्या या उद्यानात अनेक दुर्मीळ आणि आगळेवेगळे वृक्षही आहेत, हे फार थोड्यांना माहीत असेल. हे एक समृद्ध बोटॅनिकल गार्डनच आहे. निसर्गाने फुलांच्या रूपाने रंगांची मुक्त उधळण केली की इथलं वृक्षवैभव जास्तच खुलून दिसतं. अगदी न चुकवण्यासारखी ही रंगपंचमी निसर्गवेडे दर वर्षी बघतातच.


प्रचाराची रणधुमाळी

लेखक: सचीन | प्रसिद्ध:
२०१४ च्या लोकसभा निवडणुका आता ४ महिन्यांवर आल्यात. सर्व पक्षात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचे पारडे सारखे खाली वर होत आहे. ह्या निवडणुकींचा निकाल काय लागेल ह्याबाबत साऱ्या देशात उत्सुकता आहे.कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? आप ह्या निवडणुकीत काय चमत्कार घडवेल? तिसरी आघाडी सत्तेवर येईल का?


काsssssssssssssयपो छे......... ( ईन्टरनॅशनल)

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
मागील दुवा..... काSSSSSSयपो छे.... http://misalpav.com/node/16556 संक्राम्तीच्या निमित्ताने पुन्हा अहमदाबादच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथला पतंगमहोत्सव हा अवर्णनीय असतो. गरब्याप्रमाणेच पतंग हाही गुजरातच्या सांस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संक्रान्तीला सगळेजण पतंग उडवत असतात. मुले मुली आजी आजोबा आई वडील नातेवाईक मित्र सगळे जणू मिळून अक्षरशहा दिवसभर आकाशात असतात. सगळा गुजरात पतंगमय झालेला असतो.


वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा काढली गेली त्याला दिडशेहून अधिक वर्षे होऊन गेली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषतुलना हे पहिल स्त्रीवादी ग्रंथ लेखन इ.स.


संक्रांति ऋतू परिवर्तन

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
दिनांक: १८.१.२०१४. संक्रांति दरवर्षी जनवरीच्या १४ किंवा १५ तारखेला येते. त्या पूर्वी दिल्लीच्या कुडकुडत्या हिवाळ्यात माणूस काय लेखणी ही जमून जाते. जवळपास महिन्याभरा पासून बिछ्यान्यात दडून बसलो होतो.संक्रांति पासून मोठा होणारा दिवस जाणवू लागतो. सकाळी थंड वर आणि दुपारी सूर्याच्या उन्हात थोडी उष्णता जाणवते. पर्वतांवर बर्फ वितळू लागते. उत्तरेकडून येणारे वारे सुरु होतात ते शिवरात्री पर्यंत ४० दिवस राहतात याला ‘चिल्ला जाडा’असे म्हणतात. धुक्याचा परदा दूर होतो. शेतांत सरसोंला(मोहरी) फुले येतात. दूरपर्यंत पिवळा गालीचा पसरलेला सहज दिसतो.


काकस्पर्ष

लेखक: दिवटा कारटा | प्रसिद्ध:
आज एक सिनेमा पाहिला इन्विजिबल या नावाचा. आत्मा मरणासन्न अवस्थेतलं शरीर शोधतो अशी साधारण कथा असलेला चित्रपट. आयएमडीबीवर रीव्हिव्यू वाचताना ट्रिवियामध्ये एक गोष्ट वाचली. "The shirt that Nick is wearing at the end of the movie bears a crow on the chest. In some Native American legends (and the graphic novel by James O'Barr bearing the name) the crow could carry a person's soul back from the land of the dead." (http://www.imdb.com/title/tt0435670/trivia?ref_=tt_trv_trv) मला वाटायचं पिंडाला कावळा शिवणे, काकस्पर्ष वगैरे भोंदूगिरी आपल्यातच आहे.


मनसुखसेट्ची चाय ! - २

लेखक: पहाटवारा | प्रसिद्ध:
मनसुखसेट्ची चाय ! ... मनसुखसेठ्च्या अजब युक्तीवादावर प्रत्युत्तर न सापडून देशपांड्यांनी ऊगाचच गल्ल्याशी चाळा सुरु केला अन गावी गेल्यावर काय बोलायचे याची मनोमन तयारी सुरु केली. ***************************************** "रात्रीच्या जेवणापर्यंत परत यायला जमेल ना?" दुपारच्या जेवणाचा डबा ऊघडत सौ.देशपांड्यांनी विचारले.


एक कप चहा...!

लेखक: jaypal | प्रसिद्ध:
एक कप चहा..! अगदी मनापासून सांगतो चहाच्या "या" कपाने मी नेहमी भारावतो. परत परत हरवतो. कितीदा तरी पिऊन "हा " चहाचा घोट मला पुन्हा पुन्हा वेडावतो. आज बाहेर पाऊस तुफान "पेटलाय", अगदी माझ्यासारखा..! रागरंग बघून लवकर "विझेल" असं वाटत नाही...जुनीच सवय दोघांची.! भर दुपारीच दाटलाय मिट्ट काळोख डोळ्यांसमोर.! मी उभा असतो बाल्कनीमध्ये, भिंतीवर अंग रेलून...ध्यानमग्न योग्याप्रमाणे "त्याच्यावर" त्राटक जमवून.! मधेच चमकते लख्ख सय तुझी, एखादी वीज बनून माझ्या चेह-यावर.! आवेगाचे तुषार बघ हा कसा उडवतो उनाड वारा, अन् "फुलवतोय" काटा देहावर एक एक फटकारा..! एक, दोन, तीन....अगणित अगणित फटक्यांची शिक्षा.


तुम आगये हो...

लेखक: विकास | प्रसिद्ध:
Suchitra Sen   Suchutra-Sanjeev मुन्नी आणि शीलाच्या आधीच्या काळात, म्हणलं तर सरळसाधे आणि तरी देखील भारदस्त वाटावी अशी अभिनेत्री म्हणजे सुचित्रा सेन.