प्रिय विद्या बालन हिस,
काल तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले. तुला ‘देड’ या शब्दाचा नेमका अर्थ ठाऊक होता का गं? बंबैय्या भाषेत ‘देड’ ह्या शब्दाच्या अर्थाला एक वेगळीच छटा आहे, ती ही तुला माहिती होती का गं? असावीच, नक्की माहिती असावी कारण तसे नसते तर तू ‘देड इश्किया’ मध्येही दिसली असतीस. पडद्यामागच्या खबरी काही मला माहिती नाहीत; त्यामुळे तू देड इश्किया नाकारलास की तुला देड इश्कियासाठी नाकारले गेले ते काही नेमके माहिती नाही, पण ‘जो होता है वो अच्छे के लिये होता है’ असे म्हणतात ते एकदम सत्यात उतरले आहे.