ढोकळा
- Read more about ढोकळा
- 21 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 12430 views
ढोकळ्याच्या अनेक रेसिप्या यापूर्वी येऊन गेल्या आहेत, पण ही एका गुज्जु मैतरिणीची बिनताकाची ही रेसिपी थोडी वेगळी वाटली म्हणून तुम्हा सर्वांसाठी-
साहित्य- नेहमीचेच.. डाळीचे पीठ(बेसन) साधारण कपभर, २ चहाचे चमचे रवा,
पाऊण ते १ चमचा खायचा सोडा,
१/२ चमचा धणे खरगटून, १-२ हिरव्या मिरच्या + पेरभर आलं भरड वाटून्,
साखर,लिंबू,मीठ,तेल,मोहरी,हिंग,खोबरे,कोथिंबिर
कृती-
अर्ध्या लिंबाचे २ चमचे साखर घालून पेलाभर सरबत बनवून घ्या.
त्यात मावेल एवढे बेसन घाला आणि ढोकळ्याच्या पीठाला भिजवतो तितपर सरसरीत कालवा.साधारण कपभर पीठ लागते.
त्यात २चमचे रवा, खरगटलेले धने १/२ चमचा, १ चमचा तेल,१चमचा आलं मिरचीचे वाटण घाला.