अरुणाचल प्रदेश हा खूपच मोठा आहे. अजून त्यातील सर्वच भागांत टुरिझम साठी व्यवस्था नाही, सध्या तेथील तेजपूर्,भालुकपाँग, बोमदिला,दिरांग, तवांग या भागात हॉटेल्स वगैरे दिसतात. आमचा ड्रायव्हर सांगत होता की संपूर्ण अरुणाचल प्रदेश बघण्यासाठी तो एका जर्मन ग्रुपला घेऊन दोन महिने फिरत होता.तेंव्हा, सध्यातरी एक सेव्हन सिस्टर्स ही १८ दिवसांची वा आम्ही केलेली थ्री सिस्टर्सची सहल हे पर्याय उपलब्ध आहेत. त्याहून जास्त माहिती त्यांच्या टुरिझम कडून मिळू शकेल. अरुणाचल मधले रस्ते अजून खराब आहेत. आपले बीआरओ तिथे सतत रस्ते करत असते.(मिलिटरीची एक डिव्हिजन).