Welcome to misalpav.com

पीनट बटर

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
आपण सगळेच जाणतो, की, जर व्यायाम ही नाण्याची एक बाजू असेल, तर दुसरी बाजू अर्थातच सकस आहार आहे. सकस आहाराचा एक अविभाज्य भाग म्हणजे प्रथिनं. आपल्या शरीराला (पुरेसा व्यायाम करत असल्यास) प्रतिदिन १ ग्रॅम प्रति किलो (६० किलो वजन असलेल्या व्यक्तीला प्रतिदिन ६० ग्रॅम प्रथिनं) इतकी प्रथिनांची गरज असते. शरीरसौष्ठव, वजनवाढ किंवा इतर विशेष उद्दिष्ट असल्यास १.५ ग्रॅम प्रति किलो. आता, शाकाहारीं मंडळींना प्रथिनांची गरज भागवण्याचे स्त्रोत कमी असतात. कम्प्लीट प्रोटीन जे म्हणतात ते शाकाहारात फार कमी मिळतं. त्यामुळे वेगवेगळ्या स्त्रोतांतून प्रथिनं शरीरात जावी लागतात.


पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग १

लेखक: दिपक.कुवेत | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी, श्रीमती सोनाली मुखर्जी ह्यांचा "फुकेत-थायलंड" धागा पाहुन मी २०१२ साली मित्रासोबत केलेली टुर आठवली. त्या सफरीचे काहि निवडक फोटो येत्या काहि भागात देतोय. आशा आहे पाकॄ सारखाच हा धागाहि गोड मानुन घ्याल. फोटोंमधुन थायलंडचं सॄष्टिसौदर्य तुम्हि अनुभवाव हाच निखळ हेतु आहे त्यामूळे विस्तृत माहिती न देता फक्त फोटो देत आहे. १. बँकॉक एअरपोर्टवर उतरल्यावर जागोजागी असलेले मनमोहक ऑर्किड आपलं लक्ष वेधुन घेतात orchids २.


खळबळ

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते. त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील.........


अळीवाचे लाडू

लेखक: टक्कू | प्रसिद्ध:
थंडीने तिचा गुलाबी रंग दाखवायला सुरुवात केली नाही तर इथे आम्हा खवय्यांची season special list तयार होऊ लागली. अहो काय काय यादी करावी तितकी कमीच. त्यात आवडत्या अळीवाच्या लाडवांचा क्रमांक प्रथम. करायला सोप्पा खायला त्याहून सोप्पा आणि एकदम healthy अशा या लाडवाने यादीची सुरुवात करूया. साहित्य: १ वाटी खवलेला नारळ ३/४ वाटी चिरलेला गूळ १/४ वाटी अळिव २ छोटे चमचे वेलची पूड कृती: १. अळीव नारळाच्या पाण्यात अथवा साध्या पाण्यात ४-५ तास भिजवावेत. साधारण अळीव भिजतील इतके पाणी घालावे व झाकून ठेवावे. २. भिजवलेले अळीव, गूळ आणि नारळ एकत्र करावे व मंद आचेवर शिजण्यास ठेवावे.


गूज

लेखक: अमेय६३७७ | प्रसिद्ध:
शिशिराची ती असो पानगळ गदमद किंवा दाहवणारी तुझ्या संगती कळे न काही निशा नवी की ... मालवणारी दूर राहता उमजत जाते नात्याच्या विरहाची खोली मनांसारखी उधाणलेली देहांचीही असते बोली सभोवताली निसर्गलीला चराचराचे खेळ वेगळे आज पाहता नसे स्वस्थता कर्पूरासम चित्त पेटले गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई भूल घालतो तशात चाफा हिवाळ्यातही चटका देई शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे अंगोपांगी मोहरतो मी गूज कुणा सांगावे कैसे ! -- अमेय