Welcome to misalpav.com

घाटरस्ता, निसर्ग आणि मी

लेखक: चांदणे संदीप | प्रसिद्ध:
नुकत्याच होऊन गेलेल्या वर्षावाला, निथळून टाकणारी हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई. सकाळचे कोवळे ऊन पिऊन तजेलदार झालेली नवी पालवी. स्वच्छ धुऊन निघालेले, लाल मातीच्या चिखलावर, रेखीव छान वळणदार रांगोळीची जणू निळीशार रेघच असलेले रस्ते. त्यावरून वळणे घेत घेत मी निवांतपणे, आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत, मजेत आवडीचे गाणे गुणगुणत, घाटमाथ्यावर चढून जातो आणि, पुढे तसाच खाली उतरून जातो. दिवसभर राबायला, सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला. परत येताना पुन्हा तेच सारं. - संदीप चांदणे (मंगळवार, १३/०९/२०२२)


लघुकथा

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
लघुकथा अलक 1 आजोबांपासून चालत आलेला गाण्याचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेतोय याबद्दल गायत्रीताईना समाधान होते. एवढंच नव्हे तर पंतांची मुलगी अशी ओळख संपून गायत्री दांडेकर अशी ओळख निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो याचा त्यांना अभिमानच होता. पण एक खंत मात्र होती. प्रेमाने ज्याच नाव त्यांनी गंधार ठेवलं होतं, दुर्दैवाने तो मुलगा मुका होता. आपला कलेचा वारसा इथेच संपला या जाणीवेने त्या अस्वस्थ होत. पण वयाच्या तिसर्या वर्षापासून गंधार आई रियाजाला बसली कि समोर बसायचा. खरं तर गायत्रीताईना ते आवडायचं नाही. पण आधीच व्यंग असलेल्या मुलाला आणखी काय बोलणार म्हणून सोडून द्यायच्या. गंधार बारा वर्षाचा झाला.


दावत-ए-बिर्याणी

लेखक: पर्णिका | प्रसिद्ध:
पांचाली आपल्या आजी-आजोबांसोबत कोलकत्ता शहरांत राहत असते. त्या तिघांच्या नात्यांत प्रेम, आपुलकी, काळजी तर आहेच पण त्यापलीकडेही जाऊन मोकळी मैत्रीही आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील एका विद्यापीठात तिला प्रवेश मिळाला आहे. तिची अमेरिकेत येण्याची तयारी सुरु असतांनाच त्या कुटुंबाला एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागते. आणि खास आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पांचाली लखनऊला येते. तिला तिच्या आजीची बिर्याणीची (सिक्रेट) रेसिपी शोधायची आहे. त्यासाठी ती तिच्या आजीच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटते. या प्रवासात तिला तिच्या आजी-आजोबांची प्रेमकहाणी हळुवारपणे उलगडत जाते.


ऐक..दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा)

लेखक: vaibhav deshmukh | प्रसिद्ध:
ऐक.. दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा) सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता. जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.


ज्ञानवापी निकाल (12-सप्टेंबर-2022)

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
न्यायाधीशांनी निकाल वाचला. 'त्या' पाच महिला नाचल्या. मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग. म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग ओवैसी ने केला थयथयाट. 1991 चा कायदा त्याला पाठ 'औवैसी, तू कितनी भी पटक ले' आताआहे हिंदू जनमत सटकले औरंग ने काढले होते फर्मान त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण एक मंदिर-भिंत तशीच ठेवली हिंदू-जखम धगधगत ठेवली कसले दाखले अन कसले पुरावे उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे शतकातून मग एक लोकोत्तर नेता 370, राममंदिर,आता काशी घेता याआधी न्यायदेवता होती आंधळी कुत्रं पीठ खातं,आणि आंधळं दळी आज हसला असेल तो शिव-नंदी संपलीती वोटबँक राजनीती गंदी आभार त्या पाच 'ज्ञानव्यापी' महिलांचे ज्यांनी


लेखकांना आवाहन

लेखक: ज्ञानोबाचे पैजार | प्रसिद्ध:
गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे. या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही . आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच साहित्य संपादकांना दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत. तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची.


तमिळनाडूचा इतिहास भाग - ७

लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:
काँग्रेस बनवून तर झाली होती, अधिवेशनही होत होते. पण करायचं काय हे स्पष्ट नव्हतं. भारतीयांसाठी निवडणूक प्रक्रिया त्या वेळी नव्हती. दुसरी गोष्ट हि कि ते ब्रिटिशांसोबत सोबत काम करायचं म्हणत होते. पारसी आणि ब्राम्हण नेता, दोघांचा कम्फर्ट झोन हाच होता, कारण हे लोकं तळागाळातील आंदोलक नव्हते. हे तर त्यांचं एक पार्ट टाइम काम होतं कि वकिली वैगरे सोबत थोडी राजकारणाची चर्चा हि करता येईल. त्यांचे काही नेते इंग्रजांकडून पगारही मिळवत होते किंवा त्यांच्याशी संबंध बनवून होते त्यामुळे विरोध करायचा प्रश्नच नव्हता. पण बंकिमचंद्र चॅटर्जी ह्यांच्या आनंदमठ(१८८२) नंतर राष्ट्रवादी वातावरण तयार होऊ लागले.


ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

लेखक: निमिष सोनार | प्रसिद्ध:
ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल.


मोदक-१

लेखक: Bhakti | प्रसिद्ध:
यंदा गणपती बाप्पासाठी विविध प्रकारचे मोदक नैवेद्य म्हणून बनवायचा घाट घातला.सुरुवातीला दहा प्रकार करायाचे ठरवले,पण वेळेनुसार काहीच प्रकार बनवता आले.हे मोदक मी सकाळच्या घाईत वीस मिनिटांतच बनवले आहेत. त्या वेळी जे साहित्य असेल ,जे कमी जास्त प्रमाण वापरून केले आहेत.तेव्हा त्यांची रेसेपी देणे जरा अन्यायकारकच होईल.ज्यांना हे मोदक बनवायचे आहेत त्यांनी नक्कीच युट्युबवर त्या त्या रेसिपीचा शोध घ्यावा. १.गव्ह्याच्या पीठाचे ,गुळखोबरे,सुकामेवा सारण असलेले तळणीचे मोदक m २.सफरचं