Welcome to misalpav.com

पुरूष एक वाल्या कोळी.

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
पुरूष एक वाल्या कोळी आयुष्यभर विणतो जाळी पापाचा घडा मात्र शेवटी त्याच्याच भाळी जाळ्यात शिकार फसेल म्हणून वाट बघत बसतो कर्तव्य पुर्तीचा भ्रम उगाच जपत आसतो पुरूष एक वाल्या कोळी..... तहान नाही भूक नही. बसला होता नाक्यावर डोक आलं जाग्यावर जेव्हाआप्तानीं मारलं फाट्यावर नारायण नारायण जाप करी नारदाची आली स्वारी ऐकुन विनंती वाल्याची म्हणती,त्रेता मधे एकच होता पुरूष एक वाल्या कोळी...... कलीयुगी सारेच वाल्या एवढे राम कोठून आणू नाही केवट नाही राम ज्याचे ओझे त्यालाच घाम कलियुग आहे बाबा, खुळ्या भ्रमात नको राहू दुसऱ्याच ओझं नको वाहू पुरूष एक वाल्या कोळी...... नारायण नारायण म्हणत गेले वाल्याचे डोके


(ऐसे(ही) ऐकिले आकाशी)

लेखक: ज्ञानोबाचे पैजार | प्रसिद्ध:
पेरणा http://misalpav.com/node/49655 अनन्त्_यात्री सरांच्या कळकळीच्या विनंती चा मान ठेऊन दारू हा विषय सोडून विडंबन पाडत आहे

ऐसे(ही) ऐकिले आकाशी

(१) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्


" समजूत "

लेखक: रश्मिन | प्रसिद्ध:
जरी नाहीस समोर तू, कायम सोबत असतेस तू .. एकांत रात्री ही सरतात सहज, कारण स्वप्नांमध्ये असतेस तू .. माझ्या ध्यानी मनी वसतेस तू, सुंदर विभ्रम करतेस तू .. कल्पांती नेतील प्रेमदूत माझे, मला मोहित करतेस तू ! वाऱ्याच्या झुळूकेबरोबर येतेस तू , आरशातही पाहताना दिसतेस तू .. पण प्राण अडकतो श्वासात, जेव्हा अवचित कधी दिसतेस तू ! अव्यक्त राहूनही जिंकतेस तू, कधीही कशीही आवडतेस तू .. कोरडी पडली होती जीभ सांगताना, "मला खूप आवडतेस तू" ! थोडी गडबडलीस तू, तरीही माफी मागत होतीस तू .. "मला नाही जमणार" सांगताना, मात्र निर्विकार होतीस तू ! खरी आहेस समजदार तू, माझ्या नकळत मला सांभाळतेस तू .. हळुवार जपल्या हळव्या


मकाण्णाचे सोने - जलजला

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
भगवान शंकराने आपला तिसरा नेत्र उघ्डला तर त्यातून निघणार्‍या अग्निज्वाळांनी संपूर्ण सृष्टी भस्मसात होईल हे लहानपणी वाचलेलं बहुतेकांना आठवत असेल. परंतु विनोद शहा आणि हरीश शहा या दोन महान विभूतींनी पूर्वापार चालत आलेली ही समजूत खोटी आहे आणि शंकराच्या तिसर्‍या डोळ्यातून अग्निज्वाला न निघता फक्त लेसरबीमच निघतो, या लेसरबीममुळे फक्त भूकंप होतो आणि त्यात फक्त खलप्रवृत्तीचे व्हिलन लोकच मरतात आणि सत्प्रवृत्तीचे हिरो लोक सुखरुप निसटून जातात हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं आहे! स्वत:च्या मूर्तीकडून करुन घेतलेले हे चमत्कार पाहून साक्षात शिवशंकरालाही संतापाने तांडव करावसं वाटलं असेल.


प्रेमअगन..!

लेखक: पाटिल | प्रसिद्ध:
प्रेमअगन. इसवी सन १९९८. फरदीन खान- सूरज, मेघना कोठारी- सपना. राज बब्बर- सूरजचा बाप+ आर्मीमध्ये कॅप्टन. स्मिता जयकर- सूरजची आई. अनुपम खेर- सपनाचा बाप+ अब्जाधीश उद्योगपती वगैरे. बीना बॅनर्जी- सपनाची आई. समीर मल्होत्रा- विशाल (सपनाचा भाऊ). पहिल्याच सीनमध्ये भर रस्त्यात झोका बांधून त्यावर झुलत जीवन आणि मृत्यूसंबंधी जांभईदार चिवचिवाट करणारी सपना दिसते आणि आपल्याला कळतं की आपली कशाशी गाठ पडलेली आहे..! विशालभैय्या आणि सपना रोज वेगवेगळ्या स्पोर्ट्सकारमधून कॉलेजला जातात. कारण अनुपमपापा अब्जाधीश आहेत. कॉलेजात एअरोबिक्सची ट्रेनर किरकोळ रजेवर असल्याने सपनावर ट्रेनिंगची जबाबदारी पडतेय..


तुझे गाणे

लेखक: अनुस्वार | प्रसिद्ध:
मी पाऊस झालो सखे तू माती होशील का? स्पर्शाने माझ्या अलगद तू सुगंध होशील ना? मी दरीत येऊन पडलो तू वारा होशील का? शीर्षासन करून मग मी जग पायाखाली घेईल ना. तू रात्र अबोली हो ना मी चंद्र सखा तुज भेटेल. तू पहाट होशील तेव्हा मी तुझ्याच कुशीत झोपेन. सुख बिंदू झेलायला तू गवताचे पाते हो ना. आयुष्याच्या धक्क्यांना मग मी अलगद सोशीत जाईल. जरी विस्कटली घडी जीवनाची तू अशीच हसरी राहशील? मी वचनाने मज बांधून घेतो हे गाणे तुझ्याच साठी गाईल.


आप मुझे अच्छे लगने लगे-२

लेखक: पाटिल | प्रसिद्ध:
भाग-१: https://www.misalpav.com/node/49462 (पुढे चालू)... 'भाभी,असं कसं विसरून जाऊ सपनाला? माझा दिल दुखतो. मला आत्ताच सपनाला जाऊन भेटलं पाहिजे' रोहित-निशिगंधाभाभीचा होस्टेलच्या गेटवर संवाद चाललाय. ह्यावर भाभीचं म्हणणं असं पडतं की, 'तू सुरक्षित रहावास ह्या भूमिकेतूनच सपनाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे..! ह्यामध्ये माझा काही विशेष रोल नाही. मी फक्त हा निरोप सांगण्याचं कर्तव्य करत आहे..! याउप्परही तुला तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असेल तर तू स्वतंत्र आहेस..!


अन्नोत्सव

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
आमची सोसायटी म्हणजे एक छोटासा गाव. म्हणजे बघा कहाणीतल्या आटपाट नगरा सारखा. मुआँ करोना आला आणी गावात सन्नाटा करून गेला. बरेच दिवस गाव चिडीचूप्प,हळु हळू गावाला जाग येऊ लागली . पुढाऱ्यांची मादियाळी जमा झाली. काहितरी करुयात म्हणत दवंडी आली. हाकारे पिटारे डांगारे कळवण्यात येते की आन्नोत्सव आयोजित होत आहे. जनमानसात आनंद पसरला. हौशे, गवशे आणी नवशे सगळ्याचीच गर्दी झाली. उत्तम आयोजन, गावातले गावकरी तृप्त झाले. सकाळी सकाळी सुर्यवंशींचा फेरा आला. अन्नोत्सवाचे भग्नावशेष बघून गत सध्यांकाळच्या वैभवशाली खुणा पुन्हा जागवू लागला.


नवी दिल्ली @ 110

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले.


ऐसे ऐकिले आकाशी

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्हा तारे- भल्या पहाटे फिक्कट होतील- तेव्हा त्यांना तेज त्यातले थोडे थोडे देईन वाटून"