Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण जिंकणार दिल्ली?

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/29/2015 - 16:13
🗣 452 प्रतिसाद
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते. प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे. दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली. बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही. सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

प्रतिक्रिया द्या
149616 वाचन

💬 प्रतिसाद (452)
ग
ग्रेटथिंकर Tue, 02/03/2015 - 13:31 नवीन
दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ जात आहे, हे दिसताच गुरुजींनी टोपी फिरवली. आता म्हणत आहेत आआप आले तर आवडेल. अहो गुरुजी ,नैल्सनचाच नाही प्रत्येक सर्वे केजरीवाल व आप यांना ३५ते ४० जागा दाखवत आहे. त्यामुळे किरण बेदीला आणण्याचा डाव भाजपवरच उलटला आहे व किरण बेदीची इमेज संधिसाधु अशी झाली आहे. मोदी केजरी यांना टारगेट करत आहेत, त्याचा रिवर्स इफेक्टच दिसतोय, त्यामुळे मोदींच्या रॅलीचाही तितकासा फरक पडत नाहीए. एकंदर भाजपाची देहबोली आता पॅनिक वाटत आहे,ते आआपला घाबरलेले दिसत आहेत, त्यांचे कोणतेच कार्ड चालत नाहिए आपसमोर. ( त्यामुळे श्रीगुरुजींनीही इकडे पलटी मारली. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
ग्रेटथिंकर Tue, 02/03/2015 - 15:40 नवीन
http://m.ndtv.com/india-news/chief-minister-arvind-kejriwal-ndtv-poll-of-opinion-polls-shows-aap-ahead-736609 NDTV ने तीन सर्वेचा मीन काढला आहे. त्यातही आपलाच पहीली पसंती दिसतेय, एकंदर भाजपच्या सगळ्या स्ट्रटेजी फसत आहेत व ते तथाकथीत चाणक्य अमीत शाह यांचेही डाव बॅकफायर झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
श
श्रीगुरुजी Tue, 02/03/2015 - 17:37 नवीन
>>> दिल्ली इलेक्शन भाजपाला टफ जात आहे, हे दिसताच गुरुजींनी टोपी फिरवली. आता म्हणत आहेत आआप आले तर आवडेल. तू पण टोपी फिरविलेस की रे माईसाहेबा! तू तर आधी केजरीवालांना खोटारडा म्हणायचास आणि आप म्हणजे खाप पंचायत आहे असे तुझे मत होते (तुझे का तुझ्या 'ह्यां'चे?). बादवे, तुझ्या 'ह्यां'नी एखादे सर्वेक्षण केले का नाही? आणि भाजपने मतदान यंत्रात गडबड केली आहे असे कालपासून कोण सांगतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
क
क्लिंटन Wed, 02/04/2015 - 11:26 नवीन
आणि भाजपने मतदान यंत्रात गडबड केली आहे असे कालपासून कोण सांगतंय?
अशी गडबड करता येत असती तर लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस ४४ जागांवर थोडीच खाली आला असता? असो. तरीही निवडणुक आयोगाने अशी कोणतीही गडबड मशीनमध्ये नाही असे स्पष्ट केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/03/2015 - 17:45 नवीन
आज बर्‍याच वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणाचे आकडे आलेत. (१) एबीपी न्यूज - नेल्सन - आआप : ३७% मते व ३५ जागा, भाजप : ३३% मते व २९ जागा, काँग्रेस : १८% मते व ६ जागा, इतर : १२ % मते व शून्य जागा (२) आजतक-सिसेरो - आआप : ४२ जागा, भाजप : २२ जागा, काँग्रेस : ६ जागा (३) हिंदुस्तान टाइम्स - आआप : ३६-४१ जागा, भाजप : २६-३१ जागा, काँग्रेस : २-४ जागा (४) इकॉनॉमिक टाइम्स - आआप : ३६-४० जागा, भाजप : २८-३२ जागा, काँग्रेस : १-३ जागा (५) झी न्यूज - आआप : ३४ जागा, भाजप : ३२ जागा, काँग्रेस : ५ जागा (६) इंडिया न्यूज - आआप : ३१ जागा, भाजप : ३३ जागा, काँग्रेस : ६ जागा - काँग्रेसची कामगिरी २०१३ च्या निवडणुकापेक्षाही वाईट असेल व काँग्रेसला जास्तीत जास्त ६ जागा मिळतील हे सर्व ६ सर्वेक्षणात दिसत आहे. - ५ सर्वेक्षणात आआप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल असे दिसते तर फक्त एका सर्वेक्षणात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल असा अंदाज आहे. - ३ सर्वेक्षणात आआपला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज आहे, तर उर्वरीत ३ सर्वेक्षणानुसार कोणालाच बहुमत मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 02/04/2015 - 18:08 नवीन
आज अजून ४-५ नवीन सर्वेक्षणाचे अंदाज आलेत. आश्चर्य म्हणजे कालच्या अंदाजाच्या बरोबर उलटा आजचा अंदाज आहे. २४ तासात एकदा इतके चित्र बदलेल यावर विश्वास बसणे कठीण आहे. एकतर कालचे अंदाज तरी चुकीचे असतील किंवा आजचे तरी. हे आहेत आजचे अंदाज. (१) आयबीएन - डाटा माईनरो भाजप - ३६, आआप - २७, काँग्रेस - ७ (२) न्यूज नेशन भाजप - ३३, आआप - ३२, काँग्रेस - ४, इतर - १ (३) इंडिया टीव्ही - सी व्होटर भाजप - ३६, आआप - ३१, काँग्रेस - ३ (४) द वीक - आयएमआरबी भाजप - ३६, आआप - २९, काँग्रेस - ५ आआपने स्वतःचे एक सर्वेक्षण ३१ जाने - १ फेब्रु या काळात केले आहे. आआपचे राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांच्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल. भाजप - १५ (३३% मते), आआप - ५१ (४६% मते), काँग्रेस - ४ (११% टक्के मते), इतर (१०% टक्के मते) योगेंद्र यादवांच्या अंदाजानुसार आआपला कदाचित ५७ जागासुद्धा मिळू शकतील व त्या परिस्थितीत भाजपला जास्तीत जास्त १० जागा मिळतील. अगदी वाईट परिस्थितीत सुद्धा आआपला किमान ४४ जागा मिळतील व त्या परिस्थितीत भाजपला जास्तीत जास्त २० जागा मिळतील. म्हणजे थोडक्यात आआप ४४ च्या खाली येणार नाही व भाजप २० च्या वर जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
क्लिंटन गुरुवार, 02/05/2015 - 06:18 नवीन
आज अजून ४-५ नवीन सर्वेक्षणाचे अंदाज आलेत. आश्चर्य म्हणजे कालच्या अंदाजाच्या बरोबर उलटा आजचा अंदाज आहे. २४ तासात एकदा इतके चित्र बदलेल यावर विश्वास बसणे कठीण आहे.
या सर्व्हेवाल्यांनी खूपच गोंधळ केला आहे यावेळी. लोकसभा निवडणुकांच्या वेळीही भाजप+एन.डी.ए ला २४० ते ३४० अशी जागांची मोठी रेंज विविध सर्व्हेंनी दिली असली तरी कोणत्याच सर्व्हेने काँग्रेसला भाजपपुढे दाखविलेले नव्हते.यावेळी काय ते समजत नाही.दिल्ली राज्य लहान असल्यामुळे आणि ७० च जागा असल्यामुळे असे होत आहे ही शक्यता आहेच.एकूणच सगळ्या सर्व्हेंचे आकडे एकत्र करून १० तारखेला प्रत्यक्ष निकाल लागतील त्याबरोबर ताडून बघितले तर बाकी काही नाही तरी मनोरंजन नक्कीच होईल.
योगेंद्र यादवांच्या अंदाजानुसार आआपला कदाचित ५७ जागासुद्धा मिळू शकतील
अगदी १९९८ मध्येही काँग्रेसला ५३ जागा मिळाल्या होत्या.त्यापेक्षा जास्त जागा यावेळी आआपला मिळतील असा दावा आहे? बघू. दहा तारखेला अजून पाचच दिवस राहिले आहेत. याच योगेन्द्र यादवांनी लोकसभेत आआपला दिल्लीत ७ पैकी ६ जागा मिळतील असेही म्हटले होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/05/2015 - 07:06 नवीन
इतक्या लहान राज्यात तिरंगी लढती झाल्या की अंदाज चुकायचेच. माझ्या अंदाजाने पुन्हा त्रिशंकु येईल. काँग्रेस किंग मेकर बनेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/05/2015 - 09:43 नवीन
आज सकाळी १२ वाजता एक नवीन सर्वेक्षणाचे अंदाज आलेत. आयबीएन साठी आरडीआय ने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपला ४१-४५, आआपला २१-२३ आणि काँग्रेसला ०-४ जागा मिळतील. आयबीएनच्या कालच्या सर्वेक्षणाचे आकडे येऊन अजून १६ तास सुद्धा उलटले नाहीत तोवर हे दुसरे सर्वेक्षण आले सुद्धा! एकूणच सावळा गोंधळ दिसतोय. वृत्तसंस्था निष्पक्षपातीपणे सर्वेक्षण करण्यापेक्षा बहुतेक त्यांना जो पक्ष जिंकावासा वाटतोय त्या पक्षाच्या बाजूने अंदाज प्रसिद्ध करताहेत. गेल्या ४० तासात वेगवेगळ्या १० वृत्तसंस्थांच्या सर्वेक्षणाचे अंदाज प्रसिद्ध झालेत. ५ जणांनी आआप सर्वात मोठा पक्ष असेल (त्यात तिघांनी आआपला पूर्ण बहुमत दाखवलंय) असा अंदाज दिलाय तर उर्वरीत ५ जणांनी भाजप सर्वात मोठा पक्ष असेल (त्यात तिघांनी भाजपला पूर्ण बहुमत दाखवलंय) असा अंदाज दिलाय. काँग्रेसला कोणी खिजगणतीतही धरलेलं नाही हा एकच समान अंदाज सर्व १० सर्वेक्षणात आहे. >>> अगदी १९९८ मध्येही काँग्रेसला ५३ जागा मिळाल्या होत्या.त्यापेक्षा जास्त जागा यावेळी आआपला मिळतील असा दावा आहे? बघू. दहा तारखेला अजून पाचच दिवस राहिले आहेत. याच योगेन्द्र यादवांनी लोकसभेत आआपला दिल्लीत ७ पैकी ६ जागा मिळतील असेही म्हटले होते का? ही एक जुनी लिंक सापडली. http://www.firstpost.com/politics/delhi-polls-aap-survey-claims-it-will-win-38-to-50-seats-1260795.html या वृतानुसार १ डिसेंबर २०१३ ला दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ४-५ दिवस आधी आआपच्या योगेंद्र यादवांनी सर्वेक्षण करून आपला अंदाज दिला होता. त्यावेळचा त्यांच्या सर्वेक्षणाचा अंदाज असा होता. आआप : ३८-५० जागा (३५.६% मते), भाजप : जागांचा अंदाज दिलेला नाही (२७% मते), काँग्रेस : जागांचा अंदाज दिलेला नाही (२६% मते) प्रत्यक्ष निकालात आआपला २८ जागा व २९.७% मते मिळाली होती. भाजपला ३२ जागा व ३४.२% मते आणि काँग्रेसला फक्त ८ जागा आणि २४.७% मते मिळाली होती यानंतर योगेंद्र यादवांची मुलाखतही मनोरंजक होती. http://www.theunrealtimes.com/2013/12/05/aaps-yogendra-yadav-rubbishes-exit-polls-insists-on-seeing-their-raw-data/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 02/05/2015 - 09:55 नवीन
इतकी वर्षे या चाचण्या अनेकदा फसूनही त्यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालेला नव्हता.हे सगळे वाचून मला माझे मत बदलावे वाटणार असे दिसते.
या वृतानुसार १ डिसेंबर २०१३ ला दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ४-५ दिवस आधी आआपच्या योगेंद्र यादवांनी सर्वेक्षण करून आपला अंदाज दिला होता. त्यावेळचा त्यांच्या सर्वेक्षणाचा अंदाज असा होता. आआप : ३८-५० जागा (३५.६% मते), भाजप : जागांचा अंदाज दिलेला नाही (२७% मते), काँग्रेस : जागांचा अंदाज दिलेला नाही (२६% मते)
आपल्या पहिल्याच निवडणुकीत (नक्की किती ताकद जमिनीवर आहे याचा काहीच अंदाज नसताना) ३८ ते ५० म्हणजे बहुमत नक्कीच आणि कदाचित दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा दावा करणे जरा अतीच वाटते.
यानंतर योगेंद्र यादवांची मुलाखतही मनोरंजक होती.
असणारच. कारण हा दुवा अनरिअल टाईम्समधला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/05/2015 - 17:25 नवीन
कालच्या सर्वेक्षणात आआपला ४४ ते ५७ जागांचा अंदाज देणारे योगेंद्र यादव आज आआपसाठी ४०-५० इतके खाली उतरलेत. कालाय तस्मै नमः http://indiatoday.intoday.in/story/delhi-election-yogendra-yadav-aap-to-get-50-seats/1/417118.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 02/05/2015 - 17:30 नवीन
हे सर्व्हेवाले एक्सेलमध्ये रॅन्डम नंबर जनरेट करून येईल तो आकडा देत आहेत असे वाटायला लागले आहे. आआपच्या आकड्यांमध्ये २७ ते ५७ इतका फरक आहे.म्हणजे आआपसाठी सर्वात चांगला आकडा सर्वात वाईट आकड्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त आहे. कमालच म्हणायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नांदेडीअन गुरुवार, 02/05/2015 - 09:56 नवीन
TheUnrealTimes ची लिंक देऊन तिला योगेंद्र यादवची मुलाखत म्हणताय ? *shok* व्वा, अभिनंदन !!! *mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/05/2015 - 10:00 नवीन
अहो, "अनरिअल टाइम्स"ची लिंक मी पाहिली होती. इथल्या तापलेल्या वातावरणात मनोरंजन म्हणून ती लिंक दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/05/2015 - 17:25 नवीन
काय खरं नाय गड्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 02/04/2015 - 09:26 नवीन
पहिल्या सर्वेक्षणानंतर जेमतेम १-६ दिवसात आआपच्या मतांची टक्केवारी ५०% टक्क्यांवरून ३७% पर्यंत खाली येणे, भाजपच्या मतांची टक्केवारी ४१% टक्क्यांवरून ३३% पर्यंत खाली येणे, काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ९% टक्क्यांवरून १८% पर्यंत वाढणे व इतरांची मते ०% टक्क्यांवरून १२% पर्यंत वाढणे हे धक्कादायक वाटते.
हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे यावर प्रतिसाद द्यायचा मोह आवरता येत नाहीच. पुढील तक्त्यात विविध निवडणुकांमध्ये विविध पक्षांना दिल्लीत किती टक्के मते मिळाली हे दिले आहे. table.tableizer-table { border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: 12px; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #ccc; } .tableizer-table th { background-color: #104E8B; color: #FFF; font-weight: bold; }              1993 Assembly1996 Lok Sabha1998 Lok Sabha1998 Assembly1999 Lok Sabha2003 Assembly2004 Lok Sabha2008 Assembly2009 Lok Sabha2013 Assembly2014 Lok Sabha BJP42.80%49.90%50.70%34.00%51.70%35.20%40.70%36.30%35.20%34.20%46.60% INC34.50%37.30%42.60%47.80%42.00%48.10%54.80%40.30%57.10%24.70%15.20% JD12.60%4.80%2.30%1.80%        AAP         29.70%33.10% BSP       14.00%5.30%5.40%  Others10.10%8.00%4.40%16.40%6.30%16.70%4.50%9.00%2.40%6.00% या तक्त्यावरून एक गोष्ट नक्कीच कळते की इन जनरल भाजप आणि काँग्रेस हे पक्ष (एकत्र मते धरल्यास) लोकसभा निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करतात. याचे कारण हे पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत .त्याचबरोबर अपक्ष आणि इतर पक्ष विधानसभा निवडणुकांमध्ये अधिक मते घेतात. हे का होते याविषयी माझ्याच पडघम-२०१४ या लेखमालेतील दुसर्‍या लेखात सविस्तर लिहिले आहे. काही सर्व्हे आआपला अगदी ५०% मते देत आहेत. ५०% ला बर्‍याच जवळ अशी मते काँग्रेसला १९९८ आणि २००३ मध्ये मिळाली होती.पण तरीही ५०% मते विधानसभेत कुठल्याच पक्षाने टच केलेली नाहीत. १९९८ प्रमाणे यावेळीही लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ८-९ महिन्यात दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका आहेत. १९९८ मध्ये नक्की किती टक्के मते फिरली हे पुढील तक्त्यात दिले आहे: table.tableizer-table { border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: 12px; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #ccc; } .tableizer-table th { background-color: #104E8B; color: #FFF; font-weight: bold; }      1998 Lok Sabha1998 AssemblyDifference BJP50.70%34.00%-16.70% INC42.60%47.80%5.20% JD2.30%1.80%-0.50% Others4.40%16.40%12.00% याचा अर्थ १९९८ मध्ये ८-९ महिन्यात १६.७% मते भाजपविरोधात गेली. यापैकी काही मते प्युअर अ‍ॅन्टी-इन्कम्बन्सी म्हणून तर काही मते भाजप हा राष्ट्रीय पक्ष होता या कारणाने विधानसभेत पक्षाविरोधात गेली.या दोन कारणांचे योगदान वेगळे काढता येणार नाही पण मुळात लोकसभेत ५०% हा मोठा बेस लक्षात घेता दुसर्‍या कारणाचेही योगदान बर्‍यापैकी असावे. जर आआपला ५०% मते मिळणार असतील तर लोकसभा निवडणुकांपासून किमान १२% मतांचा फटका भाजपला बसायला हवा. यावेळीही त्याच दोन कारणांमुळे मते पक्षाविरोधात जातील.पण सुरवात ४६% या त्यामानाने लहान बेसपासून होत असल्यामुळे दुसर्‍या कारणाचे योगदान त्यामानाने कमी असेल. म्हणजे नेट-नेट अ‍ॅन्टी इन्कबन्सी या कारणांमुळे फेब्रुवारी ते नोव्हेंबर १९९८ या काळात जितकी मते पक्षाविरोधात फिरली साधारण तितकीच मते यावेळीही त्याच कारणामुळे फिरायला हवीत. फेब्रुवारी ते नोव्हेंबर १९९८ या काळात परिस्थिती काय होती? १. वाजपेयींकडूनही मोदींकडून आहेत तशाच अपेक्षा होत्या. पण वाजपेयी सरकार सतत आय.सी.यु मधील रूग्णाप्रमाणे होते. कधी जयललिता पाठिंबा काढतील की ममता ही टांगती तलवार सतत होती. जयललिता (आणि काही प्रमाणात ममतांचेही) ब्लॅकमेल तर विचारूच नका. दिल्लीमध्ये राजधानी असल्यामुळे केंद्र सरकारविरोधी/बाजूच्या मतांचेही प्रतिबिंब मतांमध्ये उमटतेच. (शीला दिक्षित यांचे सरकार इतका मोठ्ठा धुव्वा उडावा इतके वाईट नक्कीच नव्हते पण केंद्रातील सरकारविरोधी मतांचा फटका शीला दिक्षित यांना बसला). ठिक आहे मोदी सरकारनेही फार मोठा पराक्रम केला आहे असे अजिबात नाही.पण तरीही १९९८ मध्ये वाजपेयी सरकारची जी अवस्था होती त्यापेक्षा मोदी सरकार नक्कीच अधिक चांगल्या परिस्थितीत आहे. २. वाजपेयी सरकारला पहिले वर्षभर महागाईवर अजिबात नियंत्रण ठेवता आले नव्हते. लोकसभा निवडणुकपूर्व काळात तीन रूपये किलो असलेला कांदा नोव्हेंबर १९९८ पर्यंत साठ रूपयांना भिडला. यावेळी तशी परिस्थिती आहे का? तेलांच्या घसरलेल्या दरांमुळे का होईना महागाई आकाशाला भिडलेली नाही. त्यामुळे तितक्या प्रमाणावर भाजपविरोधी मते जायची शक्यता मला तरी वाटत नाही. ३. दिल्लीमध्ये १९९८ मध्ये अशा काही घटना घडल्या की त्या भाजपचा पराभवच घडावा यासाठी घडल्या होत्या की काय असे मला वाटायला लागू लागले होते.अनेक ठिकाणी भेसळयुक्त रॉकेलचा पुरवठा झाला आणि त्यामुळे गॅस स्टोव्हचे स्फोट झाले.त्यात किमान शंभरेक लोक जखमी झाले होते. तसेच १९९७ मध्ये आणि १९९८ च्या सुरवातीच्या काळात दिल्लीत अनेक लहान क्षमतेच्या बॉम्बचे स्फोट झाले होते.त्यात प्राणहानी फार झाली नाही तरी घबराट नक्कीच पसरली. अशा स्वरूपाचेही अजून काहीही झालेले नाही. तेव्हा आआपला ५०% मते मिळतील आणि त्यासाठी भाजप १२-१४% चा फटका खाईल असे मला तरी वाटत नाही. दुसरे म्हणजे काँग्रेसला एप्रिल २०१४ मध्ये १५.७% मते मिळाली होती.त्यापैकी किती मते कमी होतील? कितीही काहीही झाले तरी काँग्रेस पक्ष दिल्लीत अगदी अलीकडच्या काळापर्यंत सत्तेत होता-- अगदी १५ वर्षांपासून.आणि कोणत्याही पक्षाचे खंदे समर्थक असतातच.ते इतक्या कमी कालावधीत पक्षाला सोडत नाहीत.त्यामुळे काँग्रेस १०-१२% पेक्षा कमी मते घेईल असे मला तरी वाटत नाही.म्हणजे काँग्रेस पक्ष एप्रिल २०१४ नंतर ५% मते गमावेल असे समजले आणि त्यापैकी सगळी मते आआपला गेली असे गृहित धरले तरी (हे प्रत्यक्षात शक्य नाही. बसपा/अपक्ष आणि इतरही या मतांवर डल्ला मारेलच) आआपची मते ५०% पर्यंत वाढणे शक्य नाही. २०१३ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांमध्ये बसपा आणि इतरांना बर्‍यापैकी मते होती. २०१३ मध्ये ११.४% आणि २०१४ मध्ये ५.९%. ही विधानसभा निवडणुक असल्यामुळे बसपा/अपक्ष आणि इतर किमान १०% मते खातीलच. तेव्हा एकंदरीत वाटते की भाजप आणि आआपच्या मतांमध्ये फार फरक नसेल आणि एकदम काटेकी टक्कर होईल. दुसरी गोष्ट म्हणजे एबीपी ने केलेल्या सर्व्हेंमध्ये अगदी आश्चर्यकारक फरक दिसले आहेत. एका सर्व्हेत आआपला ३१% मते आणि तीन दिवसांनंतर केलेल्या दुसर्‍या सर्व्हेत ४७% मते!! तीन दिवसात १६% स्विंग हा भारताच्या इतिहासात अगदीच अभूतपूर्व आहे. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतरच्या १९८४ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला दिल्लीत १९८० च्या तुलनेत १५% मते जास्त मिळाली होती तर पूर्ण देशात ६% मते जास्त मिळाली होती.म्हणजे इतकी मोठी घटना घडूनही १६% इतका फायदा पक्षाला झालेला नव्हता. इथे त्याच्या ५% तीव्रतेचेही काही न होता तीन दिवसात १६% स्विंग येईल असे म्हटले जात आहे हे जरा आश्चर्यकारकच आहे. काही लोक म्हणत आहेत की हे सर्व्हे पेड सर्व्हे आहेत.खरेखोटे काय ते मला माहित नाही आणि ते जाणून घेण्यात इंटरेस्टही नाही.तरीही इतका प्रचंड स्विंग इतक्या थोड्या काळात येणे मला तरी शक्य वाटत नाही. प्रत्यक्षात काय होते ते १० फेब्रुवारीला कळेलच. तरीही आआपला ५०% मते मिळणे मला तरी अशक्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सव्यसाची Wed, 02/04/2015 - 09:46 नवीन
धन्यवाद सर. भूतकाळात काय झाले आणि त्यातही आजसारखी परिस्थिती असलेल्या निवडणुकीत काय झाले याचे चांगले विश्लेषण केले आहे. सर्व पोल्समध्ये एकमत आहे कि भाजप ला फटका बसला आहे. पुढच्या दोन दिवसात मतदान असल्याने अजून पोल्स येतील असे वाटत नाही. पण एवढे मोठे मतपरिवर्तन होण्याचे खूप तीव्र कारण मलाही खूप कळत नाही. इंडिया टुडे च्या सर्वे नुसार तर भाजप ला १९ जागा सुद्धा मिळू शकतात. अजून ३ दिवसामध्ये प्रचार आणि जमिनीवरचे कार्यकर्ते कसे मोबिलाईझ होतात त्यावर दोन्ही पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे असे मला वाटते. निवडणुकीच्या दिवशी सुद्धा ज्या बाजूचे कार्यकर्ते बूथ लेवल व्यवस्थापन चांगले करू शकतील तिथे निकाल पलटायची शक्यता वाटते. अगदीच कांटे कि टक्कर जिथे जिथे आहे तिथे तिथे मतदान कसे होते हे पाहणे रोचक ठरेल. बाकी १० फेब्रुवारी ला कळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 02/04/2015 - 10:55 नवीन
धन्यवाद. याविषयी कालच मी इंटरनेटवर एक लेख वाचला.त्यातून आयडीया घेऊन मी हा प्रतिसाद लिहिला आहे. माझ्यासारख्या निवडणुकांच्या आकडेवारीत आकंठ बुडलेल्या माणसाला ही गोष्ट आधी लक्षात यायला हवी होती.पण अनेकदा मिडियामध्ये अशा गोष्टींचा इतका गदारोळ होतो आणि इतका धुराळा उठतो की त्यामुळे प्रभावित व्हायला होतेच.मी तो लेख वाचून मग माझ्याकडील जुनी आकडेवारी आणि जुने संदर्भ बाहेर आणून त्यातील धागे कसे एकमेकांमध्ये गुंततात हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. एकूणच आआपचे पारडे जड वाटत आहे पण तरीही भाजपचा इतका मोठा पराभव होईल असे वाटत नाही. आआपचे पारडे जड आहे म्हणूनच की काय भाजपने आयत्या वेळी किरण बेदींना पुढे आणले आहे आणि त्या मते फिरवतील हा जुगार खेळला आहे असे वाटते. अन्यथा निवडणुका युद्ध आलेल्या असताना बाहेरचा सेनापती कोणी आणत नाही. तरीही किपिंग फिंगर्स क्रॉस्ड. १० तारखेला मात्र मजा येणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
भ
भुमन्यु Wed, 02/04/2015 - 13:40 नवीन
गेल्या कित्येक दिवसांमधले वातावरण हे "आप" पोषकच दिसत आहे आणि परत एकदा "फुकट खाऊ" समाज एक चुकिचा (अभि)नेता त्या गादीवर आणुन ठेवेन अशी भिती वाटायला लागलि आहे. याचा परिणाम म्हणजे एका अराजकतावादी डाव्या विचारसरणीच्या नतद्रष्ट राजकारण्याच्या हाती सत्ता जाऊन तो मुख्यमंत्री बनणार. आणि रोज वेग-वेगळ्या ठिकाणी धरणे-आंदोलने दिसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 02/04/2015 - 13:54 नवीन
अगदी.भाजप नको असेल तर काँग्रेसला मते दिलेली कधीही समजता येईल.१९९८ ते २०१३ या काळात शीला दिक्षित यांच्या सरकारने दिल्लीसाठी काही चांगल्या गोष्टी नक्कीच केल्या.आज दिल्लीमध्ये मुंबईपेक्षा इन्फ्रास्ट्रक्चर चांगले आहे (रूंद रस्ते, फ्लाय-ओव्हर,चांगली कनेक्टिव्हिटी इत्यादी) यांचे श्रेय शीला दिक्षित यांना नक्कीच जाते.१९९३ ते १९९८ या काळातील भाजपचे मदनलाल खुराणा आणि साहिबसिंग वर्मा यांची सरकारे फारसे काही करणारी नव्हती आणि त्यांचा कालावधी दिल्लीसाठी एक वाईट कालखंड होता असे माझ्या दिल्लीतल्या काही मित्रांकडून ऐकले आहे.खरेखोटे त्यांनाच माहित. तसेच दिल्लीतील काँग्रेसचे नेतृत्व दिलेला अजय माकन हा माणूसही तितका वाईट नाही असे माझे मत आहे.तेव्हा काँग्रेसचे सरकार आले (त्यापेक्षा भारत फुटबॉलचा विश्वचषक जिंकायची शक्यता जास्त वाटत आहे :) ) तर काही वाईट वाटणार नाही. त्याचप्रमाणे मोदी सरकारला एक समर्थ विरोधी पक्ष हवाच आहे.त्या दृष्टीनेही काँग्रेस जिंकली तरी चालेल.पण आआपसारखे morons जिंकू नयेत असे नक्कीच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु
भ
भुमन्यु Wed, 02/04/2015 - 15:47 नवीन
अजय माकन हा माणूसही तितका वाईट नाही ...हे अगदी खरंय. माझ्या माहिती प्रमाणे इतक्या करप्ट कॉंग्रेस मध्ये या माणसावर आरोप झाले नाहीत. त्या दृष्टीनेही काँग्रेस जिंकली तरी चालेल.पण आआपसारखे morons जिंकू नयेत असे नक्कीच वाटते._+११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Wed, 02/04/2015 - 09:55 नवीन
क्लिंटन, खूप सविस्तर विश्लेषण आहे. बघूया १० फेब्रुवारीला काय निकाल येतोय ते. त्याआधी ७ फेब्रुवारीला मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज येतील. तेव्हा चित्र जवळपास पूर्ण स्पष्ट झालेलं असेल. डिसेंबर २०१३ सारखी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ नये हीच इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
ग्रेटथिंकर Wed, 02/04/2015 - 14:21 नवीन
आता आआप येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यावर त्रीशंकूचे दुखः उगाळत बसलेत श्रीगुरुजी :ROFL:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 02/04/2015 - 17:29 नवीन
प्रतिसाद प्रसिद्ध करायच्या आधी जरा र्‍हस्व, दीर्घ शब्द तरी नीट लिहित जा रे नानासाहेब. :YAHOO:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
क
क्लिंटन Wed, 02/04/2015 - 17:39 नवीन
दिल्ली विधानसभा निवडणुका किती चुरशीच्या आहेत हे पुढील आकड्यांवरून लक्षात यावे. एकूण ७० जागांपैकी १० जागांवर आअपच्या उमेदवाराने तर १३ जागांवर भाजपच्या उमेदवाराने ५% पेक्षा कमी मताधिक्याने विजय मिळवला होता.म्हणजे २.५% मते इकडची तिकडे झाली किंवा कॉंग्रेसने थोडी जास्त किंवा थोडी कमी मते खाल्ली तरी त्या मतदारसंघातील निकाल फिरू शकेल. म्हणजे ७० पैकी २३ जागा तरी नक्कीच अगदीच ’वेफर थिन’ मार्जिनवाल्या होत्या. जरी ओपिनिअन पोलमध्ये नक्की दिल्लीत किती टक्के मते मिळतील हे बऱ्यापैकी अचूक अंदाज बांधला तरी मतांचे जागांमध्ये रूपांतर करताना या २३ जागांमुळे तो थोडा हवेतला गोळीबार ठरेल हे नक्कीच. यातूनच कोण बहुमत मिळविणार याचा अंदाज बांधणे नक्कीच कठिण आहे. एकूणच १० फेब्रुवारी हा एक अत्यंत इंटरेस्टिंग मतमोजणी दिवस असेल अशी आताची चिन्हे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 08:48 नवीन
एक अतिशय जास्त अवांतर प्रश्ण!! निवडणुक प्रचारामधे प्रत्येक पक्ष मी यंव करीन मी त्यंव करीन म्हणुन आश्वासनं देत असतो. दिलेल्या आश्वासनांपैकी किमान ६०%- ७०% आश्वासनं पुर्ण झालीचं पाहिजेत असा काही कायदा संमत करुन घेता येईल का? नं केल्यास पक्षाची आणि तत्कालिन नेत्यांवर आजन्म निवडणुक लढवण्यावर बंदी आणता येईल काय?
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Sat, 01/31/2015 - 08:52 नवीन
हा कायदा संसदेमध्ये संमत करावा लागेल. तिथे हा मंजूर होणे अशक्य दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
विवेकपटाईत Sat, 01/31/2015 - 09:27 नवीन
मी दिल्लीतल्या सर्वात मोठी अनधिकृत वसाहत उत्तम नगर येथील बिंदापूर गाव जवळ एकी कडे पंख रोड, दुसरी कडे नजफगढ (शिवाजी मार्ग) रोड आणि तिसरी कडे ककरोला पालम रोड मधली १५-२० स्क़ायर किमी ची वसाहत, केवळ घरेच-घरे आणि २० फूट रुंद रस्त्यात. ज्याचे घर मुख्य रस्त्याजवळ त्याच्या घरी ७-८ पाणी आणि ज्याचे दूर तिथे पाणी नाही. माझे घर पंखा रोड पासून १ km आत आहे. पाण्याच्या लाईनी २०-२५ वर्षे जुन्या असल्या मुळे आणि ४ इंचाचा असल्यामुळे पाणी घरा पर्यंत पोहचत नाही. आठवड्यातून एक दिवस टेंकर येतो. रोजचे इतर कार्य सबमार्सिबल (किर्लोस्कर कंपनीचा कारण १५० फुटावरून पाणी ओढल्या जाते)द्वारा होते. इति इथल्या लोकांना काय वाटते. १. गेल्या ६ महिन्यापूर्वी वीज कंपनीचे छापे पडले होते. आमच्या कोलोनितच १०-१२ चोर सापडले. इथले ५०% लोक वीज .... केजरीवाल आले तर कंपन्यांची छापा मारण्याची हिम्मत होणार नाही. २. लोकांनी पाण्याची ही चोरी सुरु केली आहे. ती करणे अत्यंत सोपे आहे, गेल्या वर्षांत बहुतेक नव्या घरात लोकांनी सरळ लेबर तर्फे पाण्याची अवैध कनेक्शन घेतले आहे (अर्थातच रिश्वत देऊन. जमिनी खाली काय आहे, हे कोण बघायला येणार) आणि दाखविण्यासाठी वेगळे. ज्यावर मीटर लागेल. कारण २०००० लिटर फ्री आणि १ लिटर ही जास्त लागले तर एकदम १००० रुपये. वर्षाचे १२००० वाचविण्यासाठी चोरी करण्यात काहीच गैर नाही. अश्या लोकांना केजरीवाल पाहिजे. म्हणजे त्यांच्यावर कोणी कार्यवाही करणार नाही. ३. या भागातले जवळपास सर्व प्रोप्रर्टी डीलर केजरीवालचे समर्थक झाले आहे - कारण १५ x ६० च्या प्लॉट वर १५ x ६४ (पहिल्या माल्यापासून) असे ४ माले निर्माण करायचे असते. त्या साठी पोलीसला ५००० रुपये प्रती मला द्यावे लागतात. केजरीवाल आले तर त्यांना हे पैशे द्यावे लागणार नाही. त्यांना आपवाले पळवून लावतील. (नक्शा पास करून घर बनविले तर जागा सोडावी लागते). ४. ऑटोरिक्षा रिक्षावाल्यांना मुजोरी करता येईल, कोणी पोलीसवाला त्यांचा चालान कापणार नाही किंवा रिश्वत घेणार नाही. ५. मिनी बस माफिया - दिल्लीत ब्लू लाईन बंद झाली (कोर्टाच्या आदेशाने), दुसर्याच दिवसांपासून ३००० मिनी सुरु झाल्या. यात १६ सीट्स असतात. त्यातल्या एका बाजूचा सीट्स काढून एक बाक लावल्या जातो. १६च्या जागी ४० लोक बसविल्या जातात. यांना ही पोलीसचा त्रास नको. ६. गेल्यावर्षी या भागातल्या अधिकांश लोकांनी प्रोपर्टी कर भरला नाही. दुकानदारांना ही वाटते पटरीवर कब्जा केला तरी पोलीस हटविणार नाही किंवा रिश्वत मागणार नाही. (अर्थात आप मदत करेल). ७. रेह्डी पटरीवाल्यांना ही हा विश्वास वाटतो. आत्ताच अर्धा रस्त्यावर यांचा कब्जा असतो, पुढे कदाचित जायला रस्ता मिळणार नाही. (हे ही आप चे खंदे समर्थक). ८. पाणी माफिया (आमच्या बिंदापूर कॉलोनीत (२०० घर असतील भाडेकरी मिळून 8०० परिवार ) महिन्यातून १०० टेंकर येतात. यांनी तर पाणी माफ झाले तेंव्हा 'कडू पाण्याची दिवाळी साजरी केली होती). त्यांना पाणी मिळत आहे ते अधिक पाण्याची बरबादी करतील. अधिक टेंकर चालतील. केजारीवालचे खंदे समर्थक. हे झाले अनधिकृत कोलोनितल्या लोकांचे मत. सरकारी कर्मचारी - वेळे वर येण्याच्या दंडुक्यामुळे कर्मचारी केजरीवाल यांना मते देऊ शकतात. २. सरकारी कर्मचार्यांचे निवृत्ती वय ६०च्या जागी ५८ करण्याची अफवा (येथे नमूद करायचे वाटते, रामलीला मैदानाच्या रेलीत त्यांनी सर्वाना आश्वस्त केले, जो पर्यंत मी प्रधान सेवक आहे तो पर्यंत तरी सरकारचा असा काही विचार नाही). ३. अल्पसंख्यक, बांगलादेशी यांच्या मतात मागे विभाजनी झाली होती, या वेळी ७० टक्के तरी आप ला मिळतील. भाजप ला ही २०% मिळू शकतात. आप जिंकली तर : १. पोलिसांचे मनोधेर्य कमी होईल आणि गुन्हे वाढतील. २. राज्य सरकारच्या करांमध्ये भयंकर कमी येईल. 3. कदाचित पाच वर्षात अशी परिस्थिती येईल कि राज्य सरकारच्या कर्मचार्यांना पगार देणे ही अवघड होईल. ४. विकास योजना, शाळा कोलेज, रस्ते दुरस्ती सर्व थांबेल. (४९ दिवसांच्या कार्यकाळातच १८०० बसे विकत घेण्याचा सौदा रद्द केला होता - कारण २५० कोटी वीज कंपन्यांना खिरापत दिली) अर्थातच या सर्वांचा उपयोग केजरीवाल केंद्र सरकारला दोष देतील. धरणे, उपोषण आणि अराजकता पसरवून लोकप्रियता वाढविण्यासाठी करतील. आपल्या मनात एक प्रश्न येईल, दिल्लीचे लोक मूर्ख आहेत का, पण एक लक्षात ठेवा - हिटलर, कुणालातरी टार्गेट करून लोकप्रिय झाला होता, केजरीवाल ही तेच करत आहेत.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 10:51 नवीन
आआपचा खरा चेहरा दिल्लीतील तुमच्यासारख्या स्थानिक मतदाराने उघड केला हे फारच चांगले झाले. जर त्रिखंडातील सर्वात प्रामाणिक पक्ष अशा अवैध धंदे करणार्‍यांच्या समर्थनातून सत्तेवर येणार असेल तर त्यापेक्षा मोठा विरोधाभास नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
श
श्रीगुरुजी Sat, 01/31/2015 - 12:00 नवीन
उत्तम प्रतिसाद! परंतु हा प्रतिसाद वाचून केजरीभक्तांचे डोळे उघडतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व
विवेकपटाईत Sat, 01/31/2015 - 15:02 नवीन
व्यक्त केलेले मत लोकांचे आहेत. यात कुठले ही मत माझे नाही. दिल्लीकरांवर केंद्र सरकारची नेहमीच विशेष कृपा राहिली आहे. त्या मुळे लोकांना सर्वकाही फुकटात पाहिजे. यात काहीच नवल नाही. काही महिन्यापूर्वी मी मेरठ जवळच्या गावी दोन दिवस राहिलो होतो. गावात विजेचे मीटर कुणा ही कडे नव्हते. सरकारी ही केवळ १५० रु प्रती घर वसूल करते. वीज फक्त २-४ तास राहते. जवळपास सर्वांच्या घरी डीजेल वर चालणारे जनरेटर होते. १०००रु महिन्या त्यावर खर्च. दिल्लीत सध्या २३ तास तरी वीज असते. पुढे काय होईल सांगता येत नाही. मुंबईत चोबीस तास वीज असते. कारण ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Mon, 02/02/2015 - 09:55 नवीन
कोणत्याही भक्ताचे डोळे कधीही उघडत नाहीत ! मग तो नमोभक्त असो कि केजरीभक्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संपत Sat, 01/31/2015 - 14:15 नवीन
तुमच्या प्रतिक्रियेचा एकूण रोख कायदा मोडणाऱ्या लोकांचा आपला पाठींबा आहे असा आहे. हे सर्व लोक आप सारख्या नवीन पक्षाला पाठींबा देण्यापेक्षा ज्या कॉंग्रेसने त्यांना १५ वर्षे अभय दिले तिला मतदान का करत नाहीत? शिवाय भाजप सत्तेत आल्यास ह्यांच्यावर कारवाई करेल अशी भीती का वाटावी? महाराष्ट्रात तरी कॉंग्रेस आणि भाजपच्या कारभारात फारसा फरक नव्हता / नाही. मग दिल्लीतले भाजप नेते जास्त स्वच्छ आहेत असे दिल्लीतील जनतेला वाटते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
अ
अस्वस्थामा Sat, 01/31/2015 - 14:28 नवीन
एकंदर काय तर बहुसंख्य जनता ही भ्रष्टाचारी, फुकटी आणि ढोंगी असल्याने "जशी प्रजा तसा राजा" हे लागू होईल असेल तुम्हास म्हणायचेय असे दिसतेय. ;) हेच एकंदर देशास पण लागु होते काय, असा प्रश्न पडलाय आम्हा सामान्य जनास ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
अ
असंका Tue, 02/03/2015 - 13:47 नवीन
जर सगळेच भ्रष्ट असतील, तर समस्या कुणाला आहे!!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ह
हाडक्या Wed, 02/04/2015 - 11:38 नवीन
हा हा हा.. हेच तर विचारायचे होते ना. जर आप इतका भ्रष्ट आहे (आणि तो भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीचा असूनही) आणि लोक त्यांना निवडून देणार आहेत असे यांना वाटतेय तर मग प्रश्न तोच आहे की समस्या कोणाला आहे नक्की ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
श
श्रीरंग_जोशी Sat, 01/31/2015 - 18:11 नवीन
स्थानिक लोकांबद्द्ल तुम्ही लिहिलेली विस्तृत निरिक्षणे आवडली. यावर मला एक प्रश्न पडतोय. दिल्ली पोलिस जर केंद्रीय गॄहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात तर तेथील राज्य सरकार आपचे आल्यास त्यांच्यावर चाप कसा काय बसणार आहे? भविष्यात केंद्रीय गृहमंत्रीपद जर आप कडे आले किंवा घटनात्मक दुरुस्ती होऊन दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तरच पोलिस दल राज्य सरकारच्या अखत्यारीत येईल. अर्थात सर्वसामान्य लोक एवढा तांत्रिक अंगाने विचार करत नसतात हे ठाऊक आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ब
बॅटमॅन Sun, 02/01/2015 - 14:43 नवीन
ब्लू लाईन मेट्रो- अर्थात बदरपुर लाईन कधी बंद झाली? ऑक्टोबर २०१४ मध्ये तरी सुरू होती, तिथून गेल्याचे आठवतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
न
नांदेडीअन Sat, 01/31/2015 - 11:37 नवीन
कालपासून मी एकटाच इथे ‘उत्तरं’ देतोय. माझ्या प्रश्नांवर मात्र कुणी बोलत नाहीये. त्यामुळे आता विनाकारण इथे वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही या निष्कर्षाप्रत मी येऊन पोहोचलोय. जाता जाता एव्हढेच म्हणावे वाटते की ‘निष्पक्ष’ असाल तर प्रश्नही तसेच विचारा. आप या पक्षाची स्थापना होऊन जेमतेम २ वर्षं झाली आहेत, पण आपण त्यांना २ हजार प्रश्न विचारले. आणि प्रश्नसुद्धा फार महत्त्चाचे ! केजरीवाल का खोकलतो ? केजरीवाल मफलर का घालतो ? केजरीवालने मुलांची का शपथ घेतली ? केजरीवाल धरणे का देतो ? केजरीवाल बिजनेस क्लासमधून का गेला ? अहो कधी २ प्रश्न कॉंग्रेस-भाजपालासुद्धा विचारा. आणि ‘निष्पक्ष’ नसालच तर मग सगळे माफ आहे तुमच्यासाठी. पण त्यासाठी कृपया निष्पक्ष असल्याचा आव तरी आणू नका. माझा एक मित्र आहे. दुर्दैवाने तोसुद्धा आता भक्त झालाय. पण तो स्पष्ट सांगतो की मला ‘कट्टर’ हिंदूत्व हवे आहे म्हणून मी भाजप आणि मोदींना सपोर्ट करतोय. "माझ्या मनात आप आणि केजरीवालबद्दल खूप आदर आहे. मला माहित आहे की ते आमच्यापेक्षा खूप प्रामाणिक आहेत, पण मी तसे उघडपणे जाहीर करू शकत नाही.", मित्राचे मत. मला त्याचे हे खूप आवडले. म्हणून आता आम्ही चर्चा करण्यात जास्त वेळ घालवत नाही, कारण दोघांनाही एकमेकांची ‘स्पष्ट’ मतं माहित आहेत. कट्टर हिंदू नसणे म्हणजे देशद्रोही या BJP च्या स्टान्सवरून कुमार विश्वास यांचा एक इंटरव्ह्यू आठवला. http://abpnews.abplive.in/video/2015/01/29/article487817.ece/Ghoshanapatra-with-Kumar-Vishwas?id=487817#.VMyt22iUe3I ३३:१३ ते ३६:५८ या टाईमफ्रेममध्ये बघा हा व्हिडिओ. कुमार विश्वासने त्यात डाऊ केमिकलकडून मिळणार्‍या फंडिंगबद्दलसुद्धा सांगितले होते, पण ते बहुधा आता एडिटिंगमध्ये कट केले आहे. आणि हो, आज आपने आपला मॅनिफेस्टो जाहिर केला आहे. भाजप-कॉंग्रेससारखा प्रिंट करायचा म्हणून प्रिंट केला नाही तर खूप विचार करून बनवलेला मॅनिफेस्टो आहे. बघून घ्या एकदा. https://www.youtube.com/watch?v=hJb1aoiGEOM यातल्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या नाही तर नंतर आपण सगळे मिळून शिव्या घालू त्यांना.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 12:14 नवीन
याला मेकिंग व्हर्चू ऑफ नेसेसिटी म्हणतात. २६ जानेवारीच्या कार्यक्रमात विघ्न आणावेसे वाटणे यातसुध्दा तुम्हाला काही चुकीचे वाटत नाही का?कारण त्याविषयी काही न लिहिता इतरच लिहित आहात म्हणून विचारले. जर आआप हा नवा पक्ष आहे, इतरांपेक्षा आमचा पक्ष वेगळा आहे वगैरे गोष्टी केल्या जातात तेव्हा तुमचा पक्ष नक्की कसा वेगळा हे सिध्द करायची जबाबदारी तुमच्या पक्षाचीच.पण होते कसे की प्रश्न विचारले गेले की एक तर इतर पक्षांकडे बोट दाखविले जाते किंवा पळ काढला जातो किंवा आम्हालाच प्रश्न का विचारता असा प्रतिप्रश्न केला जातो. एकतर हा पक्ष अण्णांच्या उपोषणरूपी फार्समधून जन्माला आला आहे (नंतर अण्णांशी मतभेद झाले तरी) हे नक्कीच. आणि अण्णांच्या त्या उपोषणाला माझा अगदी पहिल्या दिवसापासून विरोध होता.त्यावेळी मिसळपाववर मी ते लिहिलेही होते (आणि काँग्रेस समर्थक म्हणून इतरांच्या शिव्याही खाल्या होत्या). अनेकांनी अण्णा जोपर्यंत काँग्रेसविरोधात होते तोपर्यंत त्यांचे समर्थन केले पण नंतर आआप भाजपची मते खाणार हे लक्षात आले त्यावेळी आआपबरोबरच अण्णांनाही नावे ठेवायला सुरवात केली त्यापैकी मी नक्कीच नाही :) असो. मी कोणत्याही नेत्याचे समर्थन करताना तो नेता एकूण पॅकेज काय देत आहे हे बघतो. म्हणजे त्याची आर्थिक धोरणे, परराष्ट्र धोरणे (केंद्रात असल्यास), उद्योगधंद्यांविषयीची धोरणे इत्यादी इत्यादी ही महत्वाची गोष्ट आहेच.पण त्याच बरोबर ते पॅकेज तो नेता अंमलात आणू शकेल ही आशा त्या नेत्याकडून वाटते का हा पण त्या पॅकेजचा अविभाज्य घटक. कोणाही नेत्याच्या १००% गोष्टी पटणार नाहीतच.पण एखाद्याच्या १०% गोष्टी पटत नाहीत म्हणून ९०% गोष्टी पटतात त्या सोडून देऊन ज्याच्या ९०% गोष्टी पटत नाहीत अशा कोणाही नेत्याला समर्थन देणे मला तरी अयोग्य वाटते. या पक्षाच्या मुळातल्या पॅकेजविषयीच शंका आहेत.एकतर डाव्या धोरणांना माझा नक्कीच विरोध असतो. त्यातूनही ती धोरणे एकूण पॅकेजचा छोटा हिस्साच असतील तरी ठिक आहे.पण इथे मात्र अमुक फुकट देऊ, तमुक अर्ध्या किंमतीत देऊ या गोष्टी बर्‍याच महत्वाच्या!! त्यापेक्षा जास्त (भ्रष्टाचाराचा विरोध करू वगैरे हवेतल्या गोष्टीव्यतिरिक्त) या पक्षाची आर्थिक निती काय, उद्योगधंदे, शेती वगैरे निती काय याविषयी पुरता ठणठणगोपाळ. जर का तुमची याविषयी काही धोरणे आहेत तर त्याविषयी कधीच मुद्देसूदपणे न बोलता--अमका भ्रष्ट, तमका अंबानीचा एजंट, तिसरा कोणी अडाणीचा एजंट वगैरे बुडबुडे मात्र सतत सोडायचे. टिव्हीवरील चर्चांमध्ये त्या आशुतोष आणि आशिष खैतानचा आक्रस्ताळेपणा इतका की अरणब गोस्वामी सुध्दा त्यापुढे फिका वाटायला लागतो. वर त्या कमलमित्र चिनॉय आणि प्रशांत भूषणसारखे गणंग गोळा केलेले. पाकव्याप्त काश्मीरचा मंत्री भारताला लेक्चर देतो-- आआपचे ऐका आणि काश्मीरात सार्वमत घ्या!! म्हणजे शत्रूला आपल्याविरूध्द बोलायला हे लोक फॉडर देणार. पक्षांतर्गत लोकशाही-लोकशाही वगैरे कितीही बाता मारल्या तरी गोपीनाथ, संजीव आगा सारखे मार्केट इकॉनॉमीचा फायदा झालेले लोक आणि मेधा पाटकर आणि चिनॉय सारखे समाजवादी-डावे एकाच तंबूत गोळा केलेले. इतकी भांडणे त्या पक्षात झाली यात काहीच आश्चर्य वाटण्यासारखे नाही.परस्परविरोधी विचारांचे लोक एकत्र आल्यावर दुसरे काय होणार? हे कमीच की काय म्हणून रस्त्यावरचे धरणे, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विघ्न आणावेसे वाटणे इत्यादी.हे असले पॅकेज तुमचे नेते देणार असतील तर त्यापेक्षा मला मोदी देत आहेत ते पॅकेज नक्कीच अधिक चांगले वाटते. २००९ मध्ये तशीच आशा मनमोहन सिंगांविषयी होती म्हणून माझे मत त्यावेळी काँग्रेसला होते. तेव्हा नुसते र्‍हेटॉरिक न वापरता तुमचा पक्ष वेगळा कसा हे सप्रमाण सिध्द करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
आ
आनन्दा Tue, 02/03/2015 - 14:54 नवीन
व्यक्तिशः मी २०१३ च्या निवडणूकीत आपचा समर्थक होतो. अगदी निवडून आल्यानंतर आपने वेगवेगळे पराक्रम केले तरीही.. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन जेव्हा केजरीवालांनी लोकसभेला उडी मारली तेव्हा मात्र मी माझे मत पूर्ण बदलले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
पिंपातला उंदीर Sat, 01/31/2015 - 12:00 नवीन
पण त्यासाठी कृपया निष्पक्ष असल्याचा आव तरी आणू नका. *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: "मी भाजप चा समर्थक नाही पण …।" या शब्दांनी वाक्य सुरु करून प्रत्येक भल्या बुऱ्या गोष्टीत भाजप च समर्थन करणार्याना उघड पाडू नका हो अस .आणि हो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर नाही मिळणार
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 01/31/2015 - 14:43 नवीन
ही माझी खुप इच्छा आहे. खुर्चीवालने जी काही अतर्क्य आश्वासने आपल्या जाहिरनाम्यात दिली आहेत ती फक्त त्याने पुर्ण करुन दाखवावी अशी इच्छा आहे. लाईट,पाणी,घरे व इतर सुखसोयी दिल्ली सारख्या राज्यातील नागरिकाना फुकट ते देवु शकतात का हे आपल्याला निदान कळुन येईल. तसेच सर्व प्रसारमाध्यमांचा मोदींच्या वरचा फोकस कमी होवुन तो खुर्चीवाल वर पडेल. त्यामुळे मोदीना ५ वर्ष त्याच्या आश्वासनपुर्तीसाठी विनात्रास वेळ मिळेल. शेवटी कोन सच्चा आणि कोन पळपुटा ह्याचा जनतेला निर्णय घेता येईल्.जनतेला फक्त चांगले शासन व कमी खर्चात सुखसोयी पाहिजेत्,भले त्या मोदी देवोत वा खुर्चीवाल देवोत.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 17:17 नवीन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील प्रचार सभेत एक किस्सा सांगितला. कुठलीच गोष्ट फुकटात मिळत नसते याविषयीचा हा किस्सा आहे आणि केजरीवालांचे नाव न घेता मस्त समाचार घेतला आहे: "मुझे कोई बता रहा था कि एक चतुर ऑटो रिक्शा वाला था। बहुत बुद्धिमान था। बात को नए तरीके से कहना, कैसे कहना, लोगों की आंख में पलभर के लिए धूल झोंकना, इसमें वह बड़ा माहिर था। उसने अपने ऑटो रिक्शा पर बोर्ड लगाया था कि मुफ्त में रिक्शे में बैठिए। कोई भी बाहर का व्यक्ति आता तो उसे बहुत सेवाभाव वाला समझता। वे उसके ऑटो में बैठ जाते थे। फिर बताते थे कि वहां जाना है तो वह ले जाता था। जब रिक्शे से उतरने लगते तो ड्राइवर पैसे मांगता था। लोग कहते कि भाई तुमने तो बोर्ड लगाया है कि रिक्शे में बैठना मुफ्त है। वह कहता- सही बात है। बैठना मुफ्त में, लेकिन उतरना पैसे देकर के।" "मुझे बताइए यह महंगा सौदा दिल्ली का भला करेगा और क्या दिल्ली भाग्य बदलेगा। एक बार झूठ बोलकर चल जाता है, लेकिन बार-बार लोगों की आंख में धूल झोंककर कोई सफलता हासिल नहीं कर सकता है।"
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/31/2015 - 18:16 नवीन
दिल्लीतल्या रिक्षावाल्याने हे खरोखरच केले असेल यावर विश्वास बसण्याजोगा आहे. (दिल्लीतील रिक्षावाले, पोलिस आणि त्यावर तेथिल वकिलांची प्रतिक्रिया ऐकून थक्क झालेला) इ ए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 18:24 नवीन
दिल्लीतल्या रिक्षावाल्याने हे खरोखरच केले असेल यावर विश्वास बसण्याजोगा आहे.
अगदी अगदी. शाळेत असताना दिल्लीला गेलो होतो त्यावेळी मुंबईत अडीच रूपये मिनिमम भाडे होते.साधारण तितक्याच अंतरासाठी आमच्याकडून १२ रूपये उकळल्याचे आठवते.चार वर्षांपूर्वी परत दिल्लीला गेलो असतानाही बर्‍यापैकी मुजोर असा अनुभव या रिक्षावाल्यांकडून आला.अर्थात दिल्लीतल्या रिक्षावाल्यांची या बाबतीत मोनोपॉली आहे असे नक्कीच नाही. पुण्यातले रिक्षावालेही काही कमी नाहीत. बाय द वे, डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांच्या वेळी रिक्षावाल्यांचा पाठिंबा आआपला होता हे लक्षात घेता मुजोर लोक बहुसंख्येने आआपला पाठिंबा देत आहेत या विवेक पटाईत यांच्या मताला पुष्टीच मिळताना दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कपिलमुनी Mon, 02/02/2015 - 10:00 नवीन
किरण बेदी यांच्या प्रचारप्रमुखांचा राजीनामा टंडन हे भाजपचे गेल्या 30 वर्षांपासून सदस्य होते. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपविला आहे. ३० वर्षे सदस्य असून सुद्धा बिचार्‍याला काल आलेल्यांकडून वाईट वागणूक मिळाली !
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 02/02/2015 - 12:39 नवीन
राजीनामा मागे पण घेतला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 02/02/2015 - 13:24 नवीन
पण द्यावा लागला हे पण वाईट ! खर सांगायचा तर अश्या उपर्‍यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्यायच होतो मग रागां असो किंवा बेदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 02/02/2015 - 13:59 नवीन
आम आदमी पार्टी व्हॉलंटिअर अ‍ॅक्शन मंच (ए.व्ही.ए.एम) नामक गटाने पक्षाला मिळालेल्या देणग्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांच्या मते या पक्षाला चार बोगस कंपन्यांकडून ५० लाखाची देणगी मिळाली आहे आणि आणखी ३१ अशा बोगस कंपन्यांनी आआपला देणग्या दिल्या आहेत असा या गटाचा दावा आहे. मागच्या वर्षी काही मंडळी आआपमधून बाहेर पडून त्यांनी या 'ए.व्ही.ए.एम' ची स्थापना केली होती हे आठवले. पूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडणारे लोक 'आम्हीच खरे काँग्रेसवाले' असे म्हणत असत त्या धर्तीवर 'आम्हीच खरे आम आदमी पार्टीवाले' असेही त्यांनी म्हटले होते असे आठवते. पूर्वी आआपमध्ये असलेल्या म्हणजे पूर्वी प्रामाणिकपणाचे मुकुटमणी असलेल्या लोकांनी सध्या प्रामाणिकपणाचे मुकुटमणी असलेल्या लोकांवर आरोप केला आहे. आजच उत्तराखंडमधील अशाच पूर्वी प्रामाणिकपणाचे मुकुटमणी असलेल्यांनी पुरासाठी मदतनिधी म्हणून गोळा केलेल्या पैशाचे पुढे काय झाले हा प्रश्न उभा केला आहे. माझ्यासारख्याला बाहेरून हा तमाशा बघायला काय जाते? यांचे अनलिमिटेड मनोरंजन चालू राहू दे आम्ही हे फुकटातले मनोरंजन एन्जॉय करतच आहोत!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा