Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण जिंकणार दिल्ली?

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/29/2015 - 16:13
🗣 452 प्रतिसाद
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते. प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे. दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली. बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही. सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

प्रतिक्रिया द्या
149616 वाचन

💬 प्रतिसाद (452)
ग
ग्रेटथिंकर Sat, 02/07/2015 - 10:18 नवीन
आआपला मिळणार भरघोस पाठिंबा बघुन भाजप चक्क गडबडलेला दिसतोय, बिनबुडाचे आरोप करणे चालु आहे. किरण बेदिही हडबडल्यासारख्या आज वागत आहेत, प्रचार संपुणसुद्धा त्या दिल्लीत आज मतदानादिवशी प्रचार करत फिरत होत्या, आपने तशी तक्रार केली आहे इसीकडे.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Sat, 02/07/2015 - 11:07 नवीन
बरेच दिवस दिसला नाहित.. माई सांगत होत्या कि तुमचे मुळव्याधीचे ऑपरेश्न झाल्या पासुन तुम्हि सतत पालथे पडुन असता म्हणुन. पण मला खात्रि होति दिल्लि निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हि आपली पायधुळ इथे झाडाल. बाकि सगळे ठिक... माई काय म्हणतायत्..सचिन कसा आहे..... काँग्रेस नि सकाळिच जाहिर केल आहे कि ते निवडणुकिनंअतर जाहिर करणार आहेत कि ते आप ला पाठींबा दयायचा कि नाहि... लडने से पहले हि पप्पु ने हार मान लि या तो आप और पप्पु मिले हुए है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
प
प्रतापराव Sat, 02/07/2015 - 10:25 नवीन
आपचा उदय होणे हि काळाची गरज आहे. सध्याचे पक्ष त्यातील ते कार्यकर्ते,घराणेशाही लाचारांच्या फौजा पाहून हेच आपल्या भवितव्याचा देशाचा निर्णय घेणारे लोक हे वाटून विषन्न व्हायला होत होते. आपच्या रूपाने दिल्लीकरांना एक समर्थ पर्याय मिळाला आहे. राजकारणाचे प्रचलित रूप बदलायलाच हवे नि त्यात कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा नि तो घेताना केजरीवाल हे दिसतायत.केजरीवाल हे योग्य आहेत कि नाहीत हे येणारा काळच सांगेल मात्र इतर पक्ष ज्यांना पुरेशी संधी मिळालेली आहे ते सारखेच आहेत ह्यात काही शंका नाही.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Sat, 02/07/2015 - 10:38 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
न
नांदेडीअन Sat, 02/07/2015 - 10:39 नवीन
आप आल्यामुळे इतर पक्षांना एक प्रकारची भिती असेल की पुढच्या वेळी निवडणुकीला सामोरे जाताना नुसते बोलबच्चन देऊन भागणार नाही. आपचा प्रभाव वाढू द्यायचा नसेल तर कॉंग्रेस-बीजेपीलासुद्धा काम करावे लागेल. आणि कॉंग्रेस-बीजेपीवाले जर प्रामाणिकपणे काम करायला लागले तर आपची गरजच भासणार नाही.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 10:59 नवीन
हे बघा यान्चे उमेद्वार http://www.bhaskar.com/news-ht/UT-DEL-NEW-aap-candidate-beaten-up-for-stopping-illegal-alcohol-distribution-4896682-PHO.html
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Sat, 02/07/2015 - 11:19 नवीन
बरेच दिवस दिसला नाहित.. माई सांगत होत्या कि तुमचे मुळव्याधीचे ऑपरेश्न झाल्या पासुन तुम्हि सतत पालथे पडुन असता म्हणुन. पण मला खात्रि होति दिल्लि निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हि आपली पायधुळ इथे झाडाल. बाकि सगळे ठिक... माई काय म्हणतायत्..सचिन कसा आहे..... काँग्रेस नि सकाळिच जाहिर केल आहे कि ते निवडणुकिनंअतर जाहिर करणार आहेत कि ते आप ला पाठींबा दयायचा कि नाहि... लडने से पहले हि पप्पु ने हार मान लि या तो आप और पप्पु मिले हुए है.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 02/07/2015 - 14:03 नवीन
ट्रिपल शेंच्युरी निमीत्त श्री.श्रीगुरुजी आणी समस्त मिपाकराचा सत्कार मोफत लाईट,पाणी आणी एक एक 120/300 किवाम पान देण्याची घोषणा करुन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Sat, 02/07/2015 - 15:49 नवीन
फुलचंद स्पेशल, रिमझीम ज्यादा टाकून पान द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 16:10 नवीन
ही तुझ्या 'ह्यां'ची पसंती दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
क
कपिलमुनी Sat, 02/07/2015 - 18:43 नवीन
भगवी चड्डी आणि पांढरी गांधी टोपी असा पूर्ण पोशाख देण्यात येत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/07/2015 - 14:16 नवीन
३५ सिट येणार आपला आणि आपच सरकार यावं ही इच्छा ! बाकी चालु द्या. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 14:57 नवीन
सगळ्या exit poll नुसार आप च सरकार बनत आहे . दोन दिवसापासूनच हा कल मोदी सरकार विरुद्ध नाही अस सांगण्याची केविलवाणी कसरत करत आहे . इथे मिपा वरचे भक्त पण थोड्या फरकाने तेच करत आहेत म्हणा . मला वैयक्तिक अस वाटत की अजूनही भाजप आणि आप ला समान संधी आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/07/2015 - 15:24 नवीन
आगाउपणा असेल.( मी यातील तज्ञ नाही किंवा तसा कोणताही दावा नाही) पण जे एक्झिट पोल पहिले त्यांचे अंदाज दुपारी ३ पर्यंतचे आहेत त्यामुळे कदाचित भाजप शेवटच्या क्षणी बाजी मारून जाईल असे वाटते. तीन पर्यंत मतदान न केलेल्या त्यांच्या उमेदवारांना संघ कार्यकर्त्यांनी शिस्तशीरपणे उठवून मतदान करायला लावले असे ऐकतो आहे यामुळे हा फरक पडेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 15:49 नवीन
हे आकडे ३ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाचे आहेत - ३-६ या काळात आपचे आकडे वाढते आहेत. बाकि wishful thinking आहेच
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Sat, 02/07/2015 - 15:54 नवीन
सगळे exit pole खोटे आहेत ,बीजेपीला सत्तर जागा मिळणार आहेत-इतिश्रीगुरुजी :ROFL:
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 15:57 नवीन
लवकरच गुर्जी unreal times किंवा faking news ची एखादी लिंक देऊन आपली तोंड बंद करतील . बघाच तुम्ही *lol* *LOL* :-)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
द
दुश्यन्त Sat, 02/07/2015 - 16:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 16:11 नवीन
माझी कोणतीही लिंक खोटी नसते. खोटं बोलायला मी थोडाच आपटार्ड आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ग
गणेशा Sat, 02/07/2015 - 16:55 नवीन
माझी कोणतीही लिंक खोटी नसते. खोटं बोलायला मी थोडाच आपटार्ड आहे!
पहिले वाक्य बरोबर असेन ही .. एक मिपाकर म्हनुन आप्लय मतांचा आदर आहेच. पण दुसरे वाक्य चुकीचे आहे. हे भाजप सम्र्थक कधी दुसर्‍यांना येव्हडे तुच्छ समजणे बंद करणार काय माहीत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 16:13 नवीन
अरे नान्या, जरा १० तारखेपर्यंत तरी थांब. लगेच नाचायला लागलास. :YAHOO:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 16:03 नवीन
मोदी -कितने आदमी थे ? शाह -सरकार वह "1 "ही है ! मोदी - और तुम ? शाह -सरकार 400 एम .पी ,एम एल ए.200000 आर यस यस वर्कर +मिडिया ... मोदी -फिर इतने टेंसन में क्यों हो ? शाह -सरकार सब कुछ करके देख लिया ...अब कुछ ना हो पायेगा ...यहाँ तक केजरी के चेले ई .वी .एम .मशीन भी चेक कर रहे हैं . मोदी -अब क्या करो गे? शाह -जीत गये तो मोदी ..मोदी ..मोदी .. ..... .हार गये तो बेदी ....बेदी ...बेदी !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 16:09 नवीन
मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्यांचे अंदाज (१) इंडिया टीव्ही - सी-व्होटर आआपः ३१-३९, भाजपः २७-३५, काँग्रेसः २-४ (२) इंडिया टुडे - सिसेरो आआपः ३५-४३, भाजपः २७-३५, काँग्रेसः ३-५ (यात आआप व भाजपच्या सरासरी जागांची बेरीज ७० आहे. काँग्रेसला ३-५ जागा कशा मिळणार?) (३) एबीपी-नेल्सन आआपः ३९, भाजपः २८, काँग्रेस: ३ (४) टुडेज चाणक्य आआपः ४२-५४ (४०-४६% मते), भाजपः १६-२८ (३४-४०% मते), काँग्रेसः ०-२ (१०-१६% मते) (५) न्यूज नेशन आआपः ३९-४३, भाजपः २५-२९, काँग्रेसः १-३ (६) इंडिया न्यूज - अ‍ॅक्सिस आआपः ४६-६०, भाजपः १०-२४, काँग्रेसः ०-२ मतदानपूर्व चाचण्यांचे अंदाज गोंधळात टाकणारे व उलटसुलट होते. याउलट मतदानोत्तर चाचण्यांचे सर्व अंदाज एकच स्पष्ट कौल दर्शवितात. बहुतेकांचे अंदाज आआपला बहुमत देणारे आहेत. काँग्रेसची कामगिरी अत्यंत निष्प्रभ ठरेल यावरही सर्व चाचण्यांचे एकमत आहे. बरं झालं आआपला स्पष्ट बहुमत मिळतंय ते. आता काँग्रेसची गरज नाही. आता मजा येईल.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 16:15 नवीन
बाकी गुर्जी मजा कशी येईल . उत्सुक अमोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 16:18 नवीन
जरा विचार करा. लगेच लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 16:21 नवीन
आल लक्षात . See you in another battle then .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
ग्रेटथिंकर Sat, 02/07/2015 - 16:17 नवीन
भाजपचा पुरता सुपडासाफ होताना दिसतोय, पण गुर्जींना आनंद कशाचा तर काँग्रेस हारतेय याचा ! आता मोदींचे क्रॉनी कॅपिटॅलीझम आणि केजरीवाल यांचा स्वच्छ कारभार यात तुलना होईल व बड्या उद्योगपतींच्या हातचे बाहुले असलेले भाजप व मोदी पुर्ण झाकोळुण जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
होबासराव Sat, 02/07/2015 - 16:51 नवीन
रच्याकने, आप चा प्रवक्ता प्रो.आनन्द कुमार वृत्त वाहिनि वर म्हणाले कि खेजरीवाल ला कंन्ट्रोल करणे हि आता मीडिया ची जबाबदारि आहे ह्यातच सगळे आले. ह्याला आणि ह्याच्या पंटर लोकाना मिडियानेच तर बनवले आहे. आधिच मर्कट त्यात प्यालेला.. दुद्रैव दिल्लिच जर हे आकडे प्रत्यक्षात उतरले तर. ग्रेटथिंकर नाना काहि दिवस असेच येत रहा मिपा वर मग बघुया मफलर म्यान चा स्वच्छ कारभार. त्याला आता शेपुट घालुन पळता हि येणार नाहि आणि राज्यकारभार तर मुळिच जमणार नाहि. मग आहेच मोदिं च्या नावाने गळा काढणे आणि आंदोलनाचा तमाशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
ग
गणेशा Sat, 02/07/2015 - 18:21 नवीन
बरं झालं आआपला स्पष्ट बहुमत मिळतंय ते. आता काँग्रेसची गरज नाही. आता मजा येईल.
हा अ‍ॅटीट्युड बदलला पाहिजे सर्वांचा.. जर आप पुर्ण बहुमतात आले तर आप सर्व वचनांना खरे जागेन.. ह्या एकाच गोष्टीमुळॅ लोकांना भाजप आणि कॉन्ग्रेस ला पर्याय हवा आहे.. आम्ही असे केले आम्ही हे करु शकलो नाही तर तुम्ही १५ वर्षात काय केले असले तरी आप बोलणार नाही. पाहुच फक्त मजा म्हणुन आणि विरोधाला विरोध म्हणुन आप निवडनुकीत उतरली नव्हती. आप म्हणजे नाशिक मध्ये महानगरपालिकेत सत्ता मिळालेली म.न.से नाही की भाजप कॉन्ग्रेस सारखी निवडनुकां नंतर लोकांशी संपर्क न करणारी पार्टी ही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 16:13 नवीन
बाकी कॉंग्रेस मुक्त नारा देणार्या भाजपाला या निवडणुकीत कॉंग्रेस चा performance चांगला हवा होता . त्याना दिल्ली कॉंग्रेस मुक्त नको होती . For obvious reasons . पण राहुल गांधी यांनी इथे पण निराशा केली . जो केजरीवाल फेकू ला पुरून उरतो तो पप्पू ला कसला ऐकतो
  • Log in or register to post comments
प
प्रतापराव Sat, 02/07/2015 - 16:24 नवीन
जर चाचण्यां नुसार निकाल लागला तर हा भारतातला एक एतेहासिक विजय असेल. बलाढ्य केंद्रसरकार, जवळपास २००००० संघाचे कार्यकर्ते, १२० खासदार, प्रचाराची सर्व साधने अमाप खर्च ह्याविरुद्ध एकटे केजरीवाल नि त्यांनी उभी केलेली सुशिक्षित युवकांची फौज ह्यांचा हा विजय प्रस्थापित राजकारणा विरुद्धचा निकाल असेल. आणि हा विजय न जातीवर आधारित असेल न धर्मावर असेल तो असेल सर्वसामान्य जनतेचा स्वताला सत्तेच्या अहंकारामुळे खास समजणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध्चा विजय....
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 16:33 नवीन
त्याना एका धर्मगुरू (इमाम बुखारी ) ने पाठींबा दिला होता . हिम्मत बघा आप ने तो नाकारला . भाजप आणि कॉंग्रेस यातून काही शिकतील का हा प्रश्न आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
ह
होबासराव Sat, 02/07/2015 - 16:54 नवीन
रच्याकने, आप चा प्रवक्ता प्रो.आनन्द कुमार वृत्त वाहिनि वर म्हणाले कि खेजरीवाल ला कंन्ट्रोल करणे हि आता मीडिया ची जबाबदारि आहे ह्यातच सगळे आले. ह्याला आणि ह्याच्या पंटर लोकाना मिडियानेच तर बनवले आहे. आधिच मर्कट त्यात प्यालेला.. दुद्रैव दिल्लिच जर हे आकडे प्रत्यक्षात उतरले तर. ग्रेटथिंकर नाना काहि दिवस असेच येत रहा मिपा वर मग बघुया मफलर म्यान चा स्वच्छ कारभार. त्याला आता शेपुट घालुन पळता हि येणार नाहि आणि राज्यकारभार तर मुळिच जमणार नाहि. मग आहेच मोदिं च्या नावाने गळा काढणे आणि आंदोलनाचा तमाशा.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 16:58 नवीन
आता हा कोणत्या आय डी चा डू आय डी ? कळवावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Sat, 02/07/2015 - 17:02 नवीन
हा डू आय डी नाहि आहे हो..जसे तुम्हि पिंपातला उंदीर तसे आम्हि होबासराव.. बाय द वे तुम्हि कुठल्या दुसर्या आय डि ने वावरता :)
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 17:08 नवीन
माझा एकच आय डी आहे . आणि तो १० आय डी च्या बरोबर आहे . माझे profile बघा . कळेलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ज
जेपी Sat, 02/07/2015 - 17:04 नवीन
मस्त चर्चा... एक अंदाज भाजप 36 आप 24 कॉं 10 खोट ठरल तर आनंद आहे. रच्याकने-आनंद कभी मरते नही...
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Sat, 02/07/2015 - 17:05 नवीन
वर्हाड प्रांति होबासक्या करणे म्हणजे आगाउ पणा करणे... :)
  • Log in or register to post comments
प
प्रतापराव Sat, 02/07/2015 - 17:27 नवीन
भाजपा नि कॉंग्रेस हे धर्मावर आधारित राजकारण करण्यात पटाईत आहेत. सामान्य लोकांशी त्यांना घेणे आहे ते फक्त मतापुरते. आता भाजपला लोकसभेत बहुमत मिळाले तेव्हा मी तरी मोदींच्या विकासाच्या आश्वासनाला भुलून मत दिले मात्र आता देशातील परिस्तिथी धार्मिक बनत चालली आहे कोण म्हणतोय 'हम दो हमारे दस' सगळा गोंधळ चाललाय.. एकेकाची विधाने एकूण त्यांच्या बालबुद्धीची कीव येतेय .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 02/09/2015 - 16:27 नवीन
आज काही वाहिन्यांवर बातमी पाहिली. ७ तारखेला मतदान झाल्यापासून आआपचे काही उमेदवार व कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर २४ तास खडा पहारा ठेवून आहेत. रात्री ते तिथेच बाहेर झोपतात. भाजपने मतमोजणी यंत्रात काही गडबड करू नये म्हणून केजरीवालांनीच पहारा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा काय मूर्खपणा आहे? भाजपने किंवा इतर कोणत्याही पक्षाने मतदान झाल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात गडबड केल्याचे यापूर्वीचे एखादे उदाहरण आहे का? जर भाजप मतदान झाल्यावर अशी गडबड करू शकतो तर तो मतदानापूर्वीच का करणार नाही? पहारा ठेवण्याचे असे बालिश कृत्य करून आआप व केजरीवाल काय साध्य करणार आहेत? निवडणुक आयोगाची स्वतःची संरक्षण यंत्रणा असते. आजतगायत मतदान झाल्यावर मतदान यंत्रे हॅक करून निकाल बदलण्याचे एकही उदाहरण नाही. मग कशासाठी हे नाटक सुरू आहे?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 02/09/2015 - 16:55 नवीन
इलेक्ट्रोनीक ताक पण फुंकुन प्यायला बसलेत आणि काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 06:32 नवीन
असे उदाहरण आहे.. पण एक सामान्य नागरीक म्हणुन मी पुरावा कसे देणार. चिंचवड विधानसभे मध्ये भाजप कडुन जेथे इतर पक्षाचे उमेदवार आहेत तेथील बरीच मशीन्स कुठलेही बटन दाबल्यास भाजप ला मत देत होती. कायदेशीर तक्रार मोरेश्वर भोंडवे नी केली होती. नाना काटे गप्प राहिले कारण पुढे उगाच त्रास नको आणि हे प्रकरण दाबलेच जाणार होते. असो.. तुम्हाला अजुनही दुसर्‍यांना मुर्खच म्हणायचे आहे का ? असो .. सोफ्टवेअर मधेय बदल करुन असे करता येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/10/2015 - 06:51 नवीन
विनाकारण चुकीची माहिती पसरवू नये असे मला वाटतं. मी आत्तापर्यन्त तीन वेळा मतदान केन्द्राध्यक्ष होतो. मतदान यंत्र आम्ही ताब्यात घेतल्यापासून किमान दहावेळा तपासून घेतलेलं असत Mock Poll ( अभिरूप मतदान) घेतलेलं असतं आणि मग मतदान यंत्र प्रत्यक्षात वापरलं जातं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 07:04 नवीन
हो.. पण तपासणारे .. सारीच यंत्रणांना पैसे चारुन हे करता येवु शकते. असो माझ्याकडे पुरावे नाहीत आणि देता ही येणार नाही त्यामुळे मी शांत बसतो .. पण ही चुकीची माहीती नाहिये. जसे तुम्ही तपासुन घेता तसेच येथे ही तपासणारे ओळखिचे आहेतच त्यांच्याकडुन पण माहिती घेतली होती. दुसरी गोष्ट त्या सोफ्टवेअर मधेय बदल करुन असे करता येवु शकते हे कोणी ही सांगु शकते. त्यामुळे पुरावे नसणारी गोष्ट असु शकते पण चुकीची माहीती मी पसरवत नाहिये .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/10/2015 - 08:08 नवीन
चालु द्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 08:20 नवीन
पुन्हा निट वाचले.. मतदानापुर्वी असे करु शकतात, मतदान झाल्यावर असे करता येत नाही. बाकी काही चुकी झाल्यास विसरुन जावे.. कारण या गोष्टीचे पुरावे आपण देवु शकत नाहीत, तेव्हडी ताकद नसते आपणाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/10/2015 - 08:27 नवीन
मतदानापूर्वी कसं करता येतं ? किती मतदान झालय हे मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी दाखवतात. रीडिंग शून्य. आणि उमेदवारांच्या नावासमोर शून्य मतदान असते ते सर्वांना दाखवून मतदान सुरु होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 09:43 नवीन
मतदान मोजनी पुर्वी असे म्हणायचे होते. मतदान मशीनच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल करुन कुठले ही बटन दाबले तरी एकाच उमेदवारास वोट जाते. आणि हे आज नाही तर पुढे कधी कोण सापडले तर आठवण ठेवा. @ गुरुजी , जसे तुम्ही चुकीच्या लिंक आणि गोष्टी सांगत नाही असे जे तुम्ही म्हणता तसे मी थापा मारत नाही. आता ह्याचा पुरावा माझ्याकडे कसा असेल, मी एक सामान्य वोट देणारा आहे. बिरुटे सर, तुम्ही मतदान मशीन मधले सोफ्टवेसर बद्दल माहीती दिली तर मग जास्त बरे होयील आणि ती सोफ्तवेअर चीप बदलताच येत नाही असे नसते. असो पुरावा नसल्याने थापा वाटत असतील तर सोडुन देणे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्रीगुरुजी Tue, 02/10/2015 - 08:34 नवीन
अहो आता पुरेना थापेबाजी. केजरीवाल अजूनही भंपकपणा करत आहेत. निदान तुम्ही तरी थांबा. जर भाजपला मतदानापूर्वी किंवा मतदान चालू असताना किंवा मतदानानंतर मतदान यंत्रे हॅक करून निकाल बदलता येत असता तर त्यांनी हे दिल्ली किंवा इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केले नसते का? महाराष्ट्रात १२२ जागांऐवजी १४५ किंवा सर्व २८८ जागा नसत्या का मॅनेज करता आल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Tue, 02/10/2015 - 09:46 नवीन
चार मशिन्स फक्त भाजपलाच वोटींग करत होत्या हे आधी तपासुन आप ने तसे जाहीर निवेदन निवडनुक अधिकार्‍यांना दिले होते, त्यानुसार बदल झाले. ठिक आहे , तुम्ही म्हणता तसे करता येत नसेल. पुरावा नसल्याने हा मुद्दा मी पुढे न्हेत नाही, तुम्ही यब्द्दल केजरीवाल ला मुर्ख समजला तरी हरकत नाही. पण पुढे राष्ट्रवादी कडुन असे कधी होते आहे हे बोलु नका.. कारण बारामतीत पण काही ठिकाणी हे होते अआणि माहीती आहे. पुरावे अर्थातच नाही एक बारामतीकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा