कोण जिंकणार दिल्ली?
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
💬 प्रतिसाद
(452)
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 10:03
नवीन
त्या यंत्रात तांत्रिक बिघाड होता व तो दुरूस्त करण्यात आला हे निवडणुक आयोगानेच जाहीर केले होते.
एक साधा विचार करा. जर भाजपला ४ मतदान यंत्रात फेरफार करता येत असेल तर उर्वरीत यंत्रात का नाही करता येणार? जर मतदान यंत्रात भाजपला फेरफार करता येत असता तर भाजपने स्वतःची इतकी दारूण अवस्था करून घेतली असती का? उलट भाजपने स्वतःला दोन तृतीयांश जागांची बेगमी करून ठेवली असती.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 02/10/2015 - 10:13
नवीन
मी असे म्हणत नाही की भाजप ने तेथे केले आहे, मी हे फक्त सांगत आहे की तसे करता येते.
तुम्ही तांत्रीक बिघाड ज्याला म्हणता तो मॅन्युअली पण करता येते. मी एक सोफ्ट इंजिनिअर आहे . तो प्रोग्रॅम चेंज करुन मी दाखवु शकतो.
कृपया येथे तुम्ही विचारले असे कोठे होते का म्हणुन मी सांगितले. आता सआंगितल्यावर त्याला पाठपुरवठा मी करु शकत नाही म्हणुन मी चुकच असे नाही. ठिक आहे भविष्यात कधी असे निदर्शनास आल्यावरच बोलता येईल.
आणि सर्व ठिकाणी असे केले तरी सर्वांना पैसे चारायला लागतील तसे शक्यतो होत नाही. आणि सगळीकडे भाजपच आल्यावर मशीन चेक करण्याचे आदेश नंतर सर्व पक्ष देवु शकतील
. असो या मुद्द्यावर मी जास्त बोलु शकणार नाही. दिल्लीत भाजप न्मे तसे नसेल केले ही, पण आप मुर्खच आहे असे समजलात म्हणुन सांगितले असे होउ शकते.
वरती जो तुम्ही तांत्रीक बिघाड म्हणता आहे त्यात सर्व वोट भाजप ला जात होते
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 10:23
नवीन
मला फक्त एवढंच सांगा की मतदान झाल्यावर आआप कार्यकर्त्यांना व उमेदवारांना गेले ३ दिवसरात्र मतदानमोजणी यंत्रावर पहारा ठेवायला सांगण्याचा भंपकपणा करण्याचे कारण काय?
निवडणुक आयोगाची स्वतःची सुरक्षा यंत्रणा नसते का?
प्रत्येक मतदान यंत्राला सील नसते का?
या सगळ्यावर अविश्वास दाखवून आणि जणू काही भाजप प्रत्येक मतदान यंत्रातले सॉफ्टवेअर बदलून निकाल बदलणार आहे म्हणून स्वतःच तिथे वेगळा पहारा ठेवण्याचे प्रयोजन काय?
हे सगळे करून केजरीवाल काय साध्य करणार होते? भाजपबद्दल लोकांच्या मनात विनाकारण संशय निर्माण करण्याचे कारण काय? आआपचा पहारा नसता तर भाजप असे खरोखरच करू शकला असता का?
आज विजय मिळाल्यावर सुद्धा माझी बायको केंद्र सरकारी नोकरीत आहे व सरकार तिच्यावर सूड उगवू शकते हे जाहीर मेळाव्यात सांगण्याचे कारण काय?
भाजपवर विनाकारण कपोलकल्पित आरोप करणे केजरीवाल कधी थांबविणार खुदा जाने.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 02/10/2015 - 10:27
नवीन
असे झाले असेल तर ते योग्य नाहिये. पहारा देण्यासाठी आयोगाची यंत्रणा आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 10:30
नवीन
धन्यवाद!
भाजप वाईट पक्ष असेल, पण विनाकारण या पक्षाचा बागुलबुवा उभा करू नका हे केजरीवालांना कोणीतरी समजावण्याची गरज आहे.
असो.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/10/2015 - 10:46
नवीन
पंप्र मोदींच्या पत्नीची बातमी दाखवल्याची शिक्षा म्हणून गुजरात सरकारने तिथल्या दूरदर्शन संचालकाची बदली तात्काळ अंदमानला केली !
हा सूड नाहीतर काय आहे ??
आता यात मोदी कदाचित डायरेक्ट इन्वोल्व नसतील पण त्यांचे भक्त तर आहेत ना ? आणि त्यांनी याच्यावर सोयीस्कर मौन पाळले आहे . बाकी हागल्या मुतल्यावर ट्वीट करतात पण अशा घटनांवर नाही !
( हागल्या मुतल्यावर हा देखील * चा मुका घेणे या प्रमाणे वाक् प्रचार आहे)
म्हणून केजरीवाल यांचे सर्व आरोप निराधार नसतात
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Tue, 02/10/2015 - 10:50
नवीन
*lol* *LOL* :-))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 10:52
नवीन
मुख्यमंत्री राहिलेले आणि भावी मुख्यमंत्री असलेले केजरीवाल आणि गुजरात मधील दूरदर्शनचा संचालक यांच्यात काहीच फरक नाही का?
केजरीवालांच्या पत्नीला त्रास द्यायचा असता तर पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आणि आताच्या भाजप सरकारने यापूर्वीच त्रास दिला नसता का? इतका वेळ कशाला वाट पाहतील ते?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/10/2015 - 11:04
नवीन
थांक्यू ! कमीतकमी त्या संचालिकेला त्रास दिला हे कबूल केल्याबद्दल !
यापूर्वीच त्रास दिला नसता का?
अहो यापूर्वी केजरीवाल यांनी कुठे मोदी-शहा द्वयीला माती चारली होती ? ( पुन्हा वाक् प्रचार) ..
पूर्वीच्या आणि आताच्या परीस्थितीमधे बराच फरक पडला आहे . एका काळजी करणार्या नवर्याने बायकोची काळजी बोलून दाखवली.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 11:11
नवीन
>>> यापूर्वीच त्रास दिला नसता का?
अहो यापूर्वी केजरीवाल यांनी कुठे मोदी-शहा द्वयीला माती चारली होती ? ( पुन्हा वाक् प्रचार) ..
केजरीवालांनी त्रास देऊ नये म्हणून आधीच पत्नीला त्रास दिला नसता का? इतका वेळ वाट पाहण्याची गरज काय?
>>> थांक्यू ! कमीतकमी त्या संचालिकेला त्रास दिला हे कबूल केल्याबद्दल !
आपल्या धोरणांविरूद्ध बातमी दिल्यास कारवाई करण्याची दूरदर्शनची फार जुनी परंपरा आहे. १९७९ मध्ये जयप्रकाश नारायण यांचे निधन झाल्याची बातमी देणार्या वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते (त्यावेळी जयप्रकाश नारायण गेलेच नव्हते). २-३ महिन्यांपूर्वी चीनच्या पंतप्रधानांचे नाव झी (XI) असे उच्चारण्याऐवजी इलेव्हन असे उच्चारल्याबद्दल गोव्यातील वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते.
>>> एका काळजी करणार्या नवर्याने बायकोची काळजी बोलून दाखवली.
काळजीबिळजी काही नाही, हा शुद्ध भंपकपणा आहे. जे होणे शक्यच नाही ते भाजप करणार असल्याची विनाकारण ओरड आहे ही. स्वतः साळसूद राहून भाजपचा बागुलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हा. मतमोजणी केंद्रावर पहारा ठेवून हेच केलं होतं त्यांनी.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/10/2015 - 11:55
नवीन
>>केजरीवालांनी त्रास देऊ नये म्हणून आधीच पत्नीला त्रास दिला नसता का? इतका वेळ वाट पाहण्याची गरज काय?
तेव्हा केजरीवाल यांना एवढा यश मिळेल अशी अपेक्षा नव्हती !
>>आपल्या धोरणांविरूद्ध बातमी दिल्यास कारवाई करण्याची दूरदर्शनची फार जुनी परंपरा आहे. १९७९ मध्ये जयप्रकाश >>नारायण यांचे निधन झाल्याची बातमी देणार्या वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते (त्यावेळी जयप्रकाश नारायण >>गेलेच नव्हते). २-३ महिन्यांपूर्वी चीनच्या पंतप्रधानांचे नाव झी (XI) असे उच्चारण्याऐवजी इलेव्हन असे >>उच्चारल्याबद्दल गोव्यातील वृत्तनिवेदिकेस निलंबित केले गेले होते.
तुम्ही सांगत आहात त्या शुद्ध चुका आहेत !
त्याबद्दल निलंबित करणे योग्य कारण ते चुकीची शिक्षा आहे . पण योग्य आणि खरी बातमी दाखवल्याची शिक्षा ? कारण ती बदली रेग्युलर नव्हती.
बाकी मोदींचा १० लाखाचा सुट हा तुम्हाला भंपकपणा वाटणार नाही .. दिखाउ पणा वाटणार नाही .. तिथे मेक इन इंडिया आठवणार नाही .. याला दुसर्याच्या डोळ्यातला कुसळ दिसता पण स्वतःच्या डोळ्यामधला मुसळ दिसत नाही असे म्हणतात .
बाकी तुम्ही भक्त त्यामुळे तुम्हाला सर्व चालते
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 12:42
नवीन
>>> तेव्हा केजरीवाल यांना एवढा यश मिळेल अशी अपेक्षा नव्हती !
जाहीर सभेत कितीही दावे केले तरी प्रत्येक पक्षाला आपली व इतर पक्षांची परिस्थिती माहित असते.
>>> तुम्ही सांगत आहात त्या शुद्ध चुका आहेत !
त्याबद्दल निलंबित करणे योग्य कारण ते चुकीची शिक्षा आहे . पण योग्य आणि खरी बातमी दाखवल्याची शिक्षा ? कारण ती बदली रेग्युलर नव्हती.
दूरदर्शनची स्वतःचे नियम व धोरणे आहेत. त्याविरूद्ध वर्तन केल्यास कारवाई होते. हे निर्णय दूरदर्शन स्वतःच्या अखत्यारीतच घेते. प्रसारभारती आल्यावरसुद्धा या धोरणात बदल झालेला नाही. दूरदर्शनचे अनेक निर्णय हे विचित्र असतात. १९९३ मध्ये दूरदर्शनवर 'खून भरी मांग' हा चित्रपट दाखविला गेला होता त्यावेळी त्या चित्रपटातील शत्रुघ्न सिन्हाचे चित्रीकरण असलेली दृश्ये जाणूनबुजून कापली होती (कारण तो भाजपमध्ये होता). आणिबाणीच्या काळात दूरदर्शनने 'आंधी' चित्रपटावर बंदी आणली होती व त्या चित्रपटातील गायक किशोरकुमारची गाणी छायागीतमध्ये बराच काळ दाखवित नव्हते.
>>> बाकी मोदींचा १० लाखाचा सुट हा तुम्हाला भंपकपणा वाटणार नाही .. दिखाउ पणा वाटणार नाही .. तिथे मेक इन इंडिया आठवणार नाही .. याला दुसर्याच्या डोळ्यातला कुसळ दिसता पण स्वतःच्या डोळ्यामधला मुसळ दिसत नाही असे म्हणतात .
या सुटाची किंमत १० लाख कोणी सांगितली तुम्हाला? तुमच्याकडे काय शिंप्याची किंवा कपड्याची पावती आहे का? पुरावा असेल तर द्या.
>>> बाकी तुम्ही भक्त त्यामुळे तुम्हाला सर्व चालते
तुम्हा द्वेष्ट्यांना काहीच चालत नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/10/2015 - 13:28
नवीन
>>दूरदर्शनची स्वतःचे नियम व धोरणे आहेत. त्याविरूद्ध वर्तन केल्यास कारवाई होते. हे निर्णय दूरदर्शन स्वतःच्या >>अखत्यारीतच घेते. प्रसारभारती आल्यावरसुद्धा या धोरणात बदल झालेला नाही. दूरदर्शनचे अनेक निर्णय हे विचित्र >>असतात. १९९३ मध्ये दूरदर्शनवर 'खून भरी मांग' हा चित्रपट दाखविला गेला होता त्यावेळी त्या चित्रपटातील >>शत्रुघ्न सिन्हाचे चित्रीकरण असलेली दृश्ये जाणूनबुजून कापली होती (कारण तो भाजपमध्ये होता). आणिबाणीच्या >>काळात दूरदर्शनने 'आंधी' चित्रपटावर बंदी आणली होती व त्या चित्रपटातील गायक किशोरकुमारची गाणी >>छायागीतमध्ये बराच काळ दाखवित नव्हते.
खून भरी मांग दाखवला तेव्हा मला आठवता तसा इलेक्शन चालू होता त्यामुळे इनडायरेक्ट प्रचार होइल अशी धारणा झाल्यामुळे त्याचा पात्र कापला होता.
बाकी जे झाले त्याला चूक न म्हणता तुम्ही दुसर्याच मुद्द्यावर बोलत आहात . काँग्रेसच्या कालवधीमधल्या चुका दाखवून आता काय साध्य होणार आहे ? भाजपा त्याच चुका करणार असेल तर फरक तो काय ??
त्यामुळे मोदींविषयी बातमी दाखवून जर निष्कारण बदली होत असेल तर हे चूकच आहे हे मान्य करा .
काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण चुका होत होत्या म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवला आहे. ते चुकले म्हणून ही चूक जस्टीफाय होत नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 18:26
नवीन
>>> खून भरी मांग दाखवला तेव्हा मला आठवता तसा इलेक्शन चालू होता त्यामुळे इनडायरेक्ट प्रचार होइल अशी धारणा झाल्यामुळे त्याचा पात्र कापला होता.
त्यावेळी जवळपास कोणतीच निवडणुक नव्हती असे आठवत आहे. समजा असली तरी शत्रुघ्न सिन्हा चित्रपटात दिसल्यामुळे कसा काय प्रचार झाला असता? राजेश खन्ना त्यावेळी काँग्रेसचा खासदार होता व त्याचे चित्रपट मात्र सुरूच होते. आणि महत्त्वाचे म्हणजे केबलवर शत्रुघ्न सिन्हाचे चित्रपट कसे थांबविता येणार होते?
>>> बाकी जे झाले त्याला चूक न म्हणता तुम्ही दुसर्याच मुद्द्यावर बोलत आहात . काँग्रेसच्या कालवधीमधल्या चुका दाखवून आता काय साध्य होणार आहे ? भाजपा त्याच चुका करणार असेल तर फरक तो काय ??
त्यामुळे मोदींविषयी बातमी दाखवून जर निष्कारण बदली होत असेल तर हे चूकच आहे हे मान्य करा .
काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण चुका होत होत्या म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवला आहे. ते चुकले म्हणून ही चूक जस्टीफाय होत नाही.
दूरदर्शनवाले आपल्या धोरणानुसार अशी कारवाई करत असतात. मोदींचा त्याच्याशी संबंध नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 06:19
नवीन
हा तर कळस आहे ! रेल्वे अपघात झाला तेव्हा लालबहादूर शास्त्री स्वतः रेल्वे चालवत नव्हते किंवा सिग्नल दाखवत नव्हते पण त्यांनी नैतिक जबाब्दारी घेउन राजीनामा दिला .
दूरदर्शनवाले पण सरकारचा एक भाग आहे . मग दूरदर्शनचे धोरण हेच सरकारी धोरण .. त्यामुळे ही बातमी प्रसारीत झाल्यानंतर ती बदली रद्द करणे किंवा त्याचा निषेध करायला हवा होता. पण तो केला गेला नाही याचा अर्थ सरळ आहे की याला मोदींची हरकत नाहिये .
त्यांना मेसेज पास करायचा आहे माझ्याविरूद्ध झापाल तर घरी जाल .
त्यांची विरोधकांना संपवायची वृत्ती यातून दिसून येते जसा की संजय जोशी !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:17
नवीन
पंतप्रधानांनी प्रत्येक स्तरावरल्या नियुक्त्यात किंवा बदल्यांमध्ये लक्ष घातलं किंवा निषेध करत बसले तर देश कधी चालविणार? उद्या ग्रामपंचायतीतल्या एखाद्याची पाणीखात्यातून उंदीर मारायच्या विभागात बदली झाली तरी यात पंतप्रधानांनी लक्ष घातलं पाहिजे अशी तुम्ही अपेक्षा ठेवाल.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 02/11/2015 - 10:19
नवीन
भ्रष्टाचाराचे आरोप झाले की पावत्या मागायच्या असा विनोदी प्रकार भक्तांनी सुरु केलेला दिसतोय .
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/10/2015 - 13:32
नवीन
http://www.abplive.in/india/2015/01/27/article486403.ece/How-costly-is-Modis-personalised-suit
http://www.bbc.com/news/world-asia-india-31034110
http://www.dnaindia.com/india/report-pm-modi-s-name-suit-estimated-cost-close-to-rs-10-lakhs-2056026
http://www.standard.co.uk/news/londoners-diary/londoners-diary-only-savile-row-will-suit-to-meet-the-president-10003028.html
बाकी आता तुम्ही शिंप्याची पावती मागताय तर ज्या काळ्या पैशा बद्दल मोदी सरकार आणि भाजपा गळा काधत आहे त्या सर्व अकाउंटचे नाव नंबर आणि बॅलन्सशीट असतीलच तुमच्याकडे.. तेवढ्या द्या म्हणजे झाला
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 18:30
नवीन
हे सगळं स्पेक्युलेशन आहे हो. प्रत्येक जण आपल्या मनाने सूटची किंमत ठरवत असतो. आआपवाले तर सांगत होते की सूटवर जी पिवळ्या रंगाची शिवण दिसत होती तो प्रत्यक्षात सोन्याचा धागा आहे. आआपवाल्यांनी काय गाडगीळांकडे जाऊन सोन्याची शुद्धता तपासली होती की काय? एकजण उठतो आणि सूट १० लाखाचा सांगतो, लगेच दुसरा उठतो आणि सूट १५ लाखाचा सांगतो, ... याला काही अर्थ आहे का? सूटच्या कापडाची आणि शिंप्याची पावती असेल तरच विश्वास ठेवता येईल.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 02/10/2015 - 18:34
नवीन
एका भक्ताने नमोंना ते कापड भेट दिलं होतं. नमोंनी त्याचा कोट शिवला. नमोंच्या लेखी त्याची किंमत केवळ शिलाईचा खर्च. १५ लाखाची शिलाई आकारणारा शिंपी मनिष मलहोत्रा असावा काय? ;)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 06:12
नवीन
अशे आरोप झाल्यानंतर पंप्र किंवा त्यांच्या कार्यालयाने किंवा भाजपाने उत्तर देणे गरजेचे होते . पण आरोपांचे खंडन केले नाही. बाकी गोलमेज परीषदेला उघडे जाणारे गांधीजी किती महान होते ते पुन्हा एकदा रीयलाइ़ज झाले .
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 02/11/2015 - 06:28
नवीन
पंतप्रधान व्यक्तीने काय कपडे घातले, त्याची किंमत किती होती, कुठुन शिवले, कोणि ते कापड भेट दिलं याचं स्पष्टीकरण पंप्र कार्यालय किंवा भाजपने द्यायला हवं होतं? आय काण्ट बिलीव्ह इट.
तसंही आपल्या देशकारणाला आणि राजकारणाला गरिबीचं उदात्तीकरण करण्याची विचित्र हौस आहेच.
बाकी बापुंबद्दल काय बोलणार... त्यांच्या साध्या लाईफस्टाईलच्या महागड्या किंमतीबद्दल सरोजनी नायडुंचे उद्गार प्रसिद्ध आहेतच. असो.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 08:56
नवीन
नक्कीच आहे .
पण दोन्ही बाजूंना आहे
चायवाला पासून ते मोदी किती गरीबीतून कष्ट करून वाढले आहेत हे गरिबीचं उदात्तीकरण भाजपावाले पण करतात ..
राग " गिरे तो भी टांग उप्पर " या वृत्तीचा आहे . पोकळ समर्थन आणि दुसर्यांवर आरोप !
बाकी रागां ला शहजादे म्हणायचे आणि आपण सुद्धा तसेच वागायचे यालाच दुटप्पीपणा म्हणतात
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 02/11/2015 - 16:55
नवीन
गरिबीतुन कष्ट करुन वर येणं आणि दुसर्याच्या पैशातुन गरिबी विकत घेणं जर तुम्हाला सारखं वाटत असेल तर त्यावर माझं काहि म्हणणं नाहि.
आणि तसंही, या सध्याच्या राजकारणाच्या साठमारीत उगाच त्या गांधीबाबाला घुसडणं मला पटत नाहि. असो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:22
नवीन
पंतप्रधानांवर गेला बाजार असे अनेक आरोप रोज होत असतात. अशा प्रत्येक आरोपाला उत्तर ते देत बसले तर दिवसाचे ४८ तास करून सुद्धा पुरणार नाहीत. अशा खोडसाळ आणि निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करणेच योग्य.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 09:17
नवीन
मग हेच उद्या मुख्यमंत्र्यांना पण लागु होणार आहे हे लक्षात राहुद्या. आणि व्यर्थ आरोप करु नका
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 06:14
नवीन
सर्व आरोपांना पावत्या मागत असाल तर काळ्या धनाच्या पावत्या , पुरावे कुठे आहेत ?
भाजपा नुसते आरोप करत होती . आता ९ महिने झाले .. कुठे आहे काळा पैसा ?? किमान पुरावे तरी जाहिर करा
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 02/11/2015 - 06:32
नवीन
काळ्या धनाच्या 'पावत्या' आणि त्या 'दाखवणे' याबद्दल आपल्या काय अपेक्षा आहेत? किंवा त्याबद्दल आपल्या काय कल्पना आहेत असं विचारणं जास्त सयुक्तीक ठरेल.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 06:54
नवीन
गुर्जींना मोदींच्या कपड्याची पावती किंवा शिंप्याच्या बिलाची पावतीची जी अपेक्षा आहे ना तीच !
कारण मला माहीत आहे पंप्रच्या शिंप्याची आणि काळ्या धनाची कोणतीही खरी पावती अस्तित्वातच नसते !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:20
नवीन
जर शिंप्याची पावतीच अस्तित्वात नसते तर कशाच्या जीवावर तुम्ही सुटाची किंमत १० लाख ठरविलीत? उगाच हवेत काहीतरी निराधार वावड्या उडवायच्या.
बादवे, तुम्ही लग्नात सूट घातला होता का? असल्यास त्याला किती खर्च आला होता?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 08:58
नवीन
कृपया वैयक्तीक होउ नये !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 09:01
नवीन
वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व.
मुद्दा एवढाच की स्वतःच्या सूटला किती खर्च आला यावरून इतरांच्या सूटच्या किंमतीचा अंदाज येऊ शकेल.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 02/11/2015 - 10:24
नवीन
हे एक भक्ताच लक्षण . थोडी टीका झाली की संतुलन ढासळत . मला खात्री आहे गुर्जी णा मनातल्या मनात या देशद्रोही लोकांना कुठल्या नरकात पाठवू अस झाल असेल *lol* *LOL*
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 02/11/2015 - 16:56
नवीन
.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:23
नवीन
मोदींना आणि जेटलींना व्यनी केलाय, तुम्हाला पुरावे पाठविण्यासाठी.
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Tue, 02/10/2015 - 12:46
नवीन
कार्यकर्त्यांना भक्त म्हणून तुम्ही कार्यकर्ते किंवा भक्त यापैकी कुणातरी एकाचा अपमान केलाय... ;)
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Tue, 02/10/2015 - 11:46
नवीन
बायको वरून आठवल . जिंकल्यानंतर केजरीवाल प्रथमच आपल्या पत्नीस समोर घेऊन आले. त्यांचे प्रत्येक वेळी संभाळुन घेतल्याबद्दल आणि कायम पाठीशी उभे राहील्याबद्दल जाहीर आभार मानले. कुठे केजरीवाल आणि कुठे आपले ………. . बर ते जाऊ दे . चालायचंच *biggrin*
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 02/10/2015 - 12:42
नवीन
मी आता नेट वर एक लिंक पाहिली, अरविंद केजरीवाल यांनी अहंकार करु नका असे सांगितले आहे त्यात आणि हे चांगले वाटले.
सामान्य लोक जिंकु शकतात, हे आप ने दाखवुन दिले आहे, फक्त नेत्यांची मुले , पैसेवाले यांपेक्षा सामन्य लोक जिंकु शक्तात हे दाखवणे खुप आहे असे वाटते
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Tue, 02/10/2015 - 12:52
नवीन
हा कमरेखालचा वार आहे. न कळत्या वयात झालेल्या लग्नाची आठवण साठाव्या वर्षी का उगाळायची?
बाकी काँग्रेस समर्थकांच्या प्रतिक्रिया पाहताना मजा येतेय. भाजपाच्या पराभवाने थोडा तरी मुद्दा मिळाला आहे त्यांना.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 18:31
नवीन
चालायचंच. मुद्दे संपले की धागा भरकटविण्यासाठी असे वार केले जातात.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Tue, 02/10/2015 - 13:22
नवीन
दिवसभर दगदग केल्यानंतर, थकूनभागून घरी परतून मग 'ओल्या पिंपात माना मुरगळून पडलेल्या गलितगात्रांचा 'वर्ल्ड व्ह्यू वाचून 'अंमळ करमणूक' होते आहे खरी!
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/10/2015 - 12:33
नवीन
भाजपेयी आत्मपरीक्षण करतील अशी किंचित आशा होती पण हे तर अजून केजरीवाल भंपक आहे .. आक्रस्ताळा आहे ईई मुद्दे उगाळत बसले आहेत .
एवढ्या मोठ्या पराभवाची कारणीमीमांसा कोणत्याही पक्षाने , कार्यतर्याने , समर्थकाने नक्कीच करायला हवी. पूर्ण पराभव झाला याचा अर्थ चुकाही तेवढ्याच गंभीर आहेत . आणि मतदारांशी तुटलेली नाळ का तुटली .
केजरीवाल कसे का असेना पण आज मतदारांनी त्यांना स्विकारला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथे हातपाय आपटून नावे ठेवण्यात काही हशील नाही. अ पार्टी विथ डिफ्रन्स ने आत्मपरीक्षण करावे आणि पुढे या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी .
बाकी समर्थकाऐवजी भक्त असतील तर मात्र हे अवघड आहे.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Tue, 02/10/2015 - 12:44
नवीन
*mosking*
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 12:45
नवीन
>>> भाजपेयी आत्मपरीक्षण करतील अशी किंचित आशा होती पण हे तर अजून केजरीवाल भंपक आहे .. आक्रस्ताळा आहे ईई मुद्दे उगाळत बसले आहेत .
निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.
>>> एवढ्या मोठ्या पराभवाची कारणीमीमांसा कोणत्याही पक्षाने , कार्यतर्याने , समर्थकाने नक्कीच करायला हवी. पूर्ण पराभव झाला याचा अर्थ चुकाही तेवढ्याच गंभीर आहेत . आणि मतदारांशी तुटलेली नाळ का तुटली .
करतील ना. जरा वेळ तर द्या. अजून पूर्ण निकाल सुद्धा जाहीर झालेला नाही.
>>> केजरीवाल कसे का असेना पण आज मतदारांनी त्यांना स्विकारला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथे हातपाय आपटून नावे ठेवण्यात काही हशील नाही. अ पार्टी विथ डिफ्रन्स ने आत्मपरीक्षण करावे आणि पुढे या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी .
नक्कीच करेल हे भाजप
>>> बाकी समर्थकाऐवजी भक्त असतील तर मात्र हे अवघड आहे.
हे केजरीभक्तांनाही लागू पडते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/10/2015 - 13:34
नवीन
त्यांनी सरकार सोडल्यावर चूक मान्य केली .. लोकसभेचा पराभव पचवला .. चुका केल्या हे कबूल केला आणि त्या सुधारल्या म्हणून तर आज विजय प्राप्त झाला .
निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.
खरे आहे .. बाकी ते संजय जोशी कुठे असतात हो आज काल ??
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 18:34
नवीन
>>> त्यांनी सरकार सोडल्यावर चूक मान्य केली .. लोकसभेचा पराभव पचवला .. चुका केल्या हे कबूल केला आणि त्या सुधारल्या म्हणून तर आज विजय प्राप्त झाला .
मुख्यमंत्रीपद सोडल्यावर अनेक दिवस ही कृती योग्यच कशी आहे आणि आपण कशी मुख्यमंत्रीपदावर लाथ मारली असे केजरीवाल आणि आआपवाले उच्चरवाने सांगत होते. जनलोकपालसाठी अशी हजार मुख्यमंत्रीपदे कुर्बान आहेत अशा फुशारक्या ते मारत होते. आपले हे कृत्य जनतेला अजिबात आवडलेले नाही व आपण करत असलेले समर्थन कोणालाच पटत नाही व या निवडणुकीत हा मोठा इश्यू होईल हे ओळखल्यानंतरच केजरीवालांनी चूक मान्य केली. नाहीतर आधी बरेच महिने मी बरोबरच केलं असे अभिमानाने सांगत होते.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 02/10/2015 - 19:07
नवीन
अश्या फुशारक्या ते मारत असतील ही पण निदान माफी तरी मागितली. पण भाजप शेवट पर्यंत त्यांना भगोडा म्हणत होते आणि आता त्यांना ते म्हणण्याच्या ही लायक ठेवले नाही.
मी काय म्ह्णतो श्री गुरुजी, काही वेळेस तात्पुरती माघार घेणॅ किंवा चुक मान्य करणे ही फायदेशीर नसते का ?
असो.. तुम्ही जेव्हडे दुसर्यावरती चिखल फेकताल तेव्हडाच चिखल तुमच्याकडे पण फेकला जातो.
कट्टरता असावी पण ती इतरांचा पण आदर करुन असावी. दुसरे तुच्छ आणि आपण कसे बरोबर हे योग्य नाही.
मी तुमचे लिखान वाचतो, पहिले मुद्दे विश्लेषण योग्य असेन पण प्रत्येक विरोधी मतांवर ते बरोबर असले तरी आपण आपलेच मुद्दे का रेटायचे ?
दुसर्यांचे अभिनंदन करताना पण बघु आता असे का बोलायचे.
असो.. दुसर्यांना तुच्छ लेखने बंद करावे. त्यांनी चुक केली तर ते खाली येतील पुढच्यावेळेस आपोआप. आप काय कोणाचे पाहुने नाही की बिजेपी पण. जे तत्त्वाने..सदाचाराणे जनतेची कामे करतील त्यांच्या बाजुने लोक असतील असे नाही का वाटत.
असो .. आनखिन काय बोलणार
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 06:29
नवीन
आज चेसुगु असते तर शेवटचा प्रतिसाद कोणाचा या मुद्दावर २०००-३००० ची पार्टनरशीप नक्कीच झाली असती.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 18:35
नवीन
अवांतर - हे "चेसुगु" म्हणजे नक्की कोणते सभासद?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:28
नवीन
>>> अश्या फुशारक्या ते मारत असतील ही पण निदान माफी तरी मागितली. पण भाजप शेवट पर्यंत त्यांना भगोडा म्हणत होते आणि आता त्यांना ते म्हणण्याच्या ही लायक ठेवले नाही.
माफी मागणे ही निवडणुक स्ट्रॅटेजी होती हो. त्यात प्रामाणिकपणा नव्हता. मुख्यमंत्रीपद सोडल्यावर अनेक महिने ते आणि त्यांचे सहकारी हा निर्णय कसा योग्य आणि तात्विक आहे आणि जनलोकपालसाठी मुख्यमंत्रीपद कसे लाथाडले आणि भविष्यात अशी हजारो मुख्यमंत्रीपदे लाथाडू असे जाहीररित्या सांगत होते. आपला निर्णय चुकीचा होता याचा अचानक निवडणुकीच्या तोंडावर कसा काय साक्षात्कार झाला?
भविष्यात अशी हजारो मुख्यमंत्रीपदे लाथाडू असे जाहीररित्या सांगत होते आणि आता म्हणताहेत की आता मुख्यमंत्रीपद कधीही सोडणार नाही. एक ठाम भूमिका घ्या ना कधीतरी.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- ›
- »