कोण जिंकणार दिल्ली?
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
💬 प्रतिसाद
(452)
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 09:19
नवीन
माफी निवडनुकीच्या तोंडावर मागितली नाही, तुम्ही काय म्हणता, तुम्हाला तेव्हडे कळते आणि दिल्लीतील जनतेला काहीच कळत नाही ?
आणि एक ते ठाम भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी आहेत, आणि त्या साठी इतर गोष्टींचा मी कधीच विचार करत नाही.
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Wed, 02/11/2015 - 09:52
नवीन
हॅ हॅ हॅ... भाजपा नेत्यांबरोबर आता कार्यकर्त्यांच्या तोंडात सुद्धा हे वाक्य पक्कं बसलंय बहुतेक. प्रामाणिकपणाच लवलेशही नसलेले वायदे, आश्वासने आणि वक्तव्ये करणे हे प्रस्थापित पक्षांना तरी कुठे नवं आहे? हे म्हणजे चिखलात लोळणार्याने शेजारून चाललेल्या माणसाच्या चपलेवरच्या डागाला हसण्यासारखं आहे.
भाजपाची विरोधी पक्ष असतानाची भूमिका/धोरणे आणि त्यांनी सध्या घेतलेले निर्णय असा धागा कुणी काढेल काय? नै... मला वरची वाक्ये नक्की कुठल्या पक्षासाठी लागू करायची हे कळेना आता. :)
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 02/11/2015 - 04:23
नवीन
गुर्जीनी संजय जोशी यांचा उल्लेख कसा खुबीने टाळला हे मंडळीच्या लक्षात आले असेलच *biggrin*
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:32
नवीन
स्वतःकडे मुद्दे नसले की विषयाशी संबंध नसलेल्या प्रतिसादातून कमरेखाली वार करून किंवा एक ओळीच्या प्रतिसादांच्या काड्या टाकून धागा भरकटवणे ही तुमची खोड आहे. याबद्दल २ दिवसांपूर्वी मी एक डोस दिलेला होता.
वरील एका ओळीच्या प्रतिसादातून परत तोच प्रयत्न सुरू झालेला दिसतोय. धागा भरकटू नये म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करतोय.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 09:00
नवीन
मोदींच्या व्यक्तीकेंद्रीत आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी संजय जोशी ठरले होते ..
आता मोदी निवडणूक जिंकले आहेत म्हणून निवडणुक जिंकली असली तरी लगेच हे दोष गुणात परिवर्तित होत नसतात.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 17:56
नवीन
>>> मोदींच्या व्यक्तीकेंद्रीत आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी संजय जोशी ठरले होते ..
बळी ठरले होते म्हणजे नक्की काय झालं होतं त्यांचं?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 02/11/2015 - 10:28
नवीन
असा त्रागा करू नका हो गुर्जी . तुमचे प्रतिसाद अधिकच विनोदी होत चालले आहेत . बाकी ते डोस वैगेरे जाऊ द्या . तुमसे ना हो पायेगा - Gangs of Wasseypur मधला संवाद *lol*
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Tue, 02/10/2015 - 13:45
नवीन
सुधारतील ते भाजपेयी कसले. राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे सोयीनुसार गुंडाळून बसले, आता काला धन विसरत आहेत. महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत.
केजरीवालवर टीका करायला यांना तोंड आहे का? प्रधानसेवक स्वतः राज्याराज्यात 'मै , मै 'करत प्रचार करत फिरतात. दिल्लीमध्ये विरोधकांना बाजारू, अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना असले सल्ले देत फिरतात तर भक्त तरी कसे गप्प बसतील. आता भक्त लोक दिल्लीत हिंदुनी एक होवून मते दिली नाही म्हणून आप जिंकली असला प्रचार करत आहेत जणू काही हिंदू मते म्हणजे यांची जहागीर आहे. हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारणे हा यांचा जुना धंदा आहे. युपी मध्ये पण सध्या भाजप आणि सपा हेच करत आहेत. मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/10/2015 - 18:51
नवीन
>>> सुधारतील ते भाजपेयी कसले. राममंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा हे मुद्दे सोयीनुसार गुंडाळून बसले, आता काला धन विसरत आहेत.
हे सर्व मुद्दे अजिबात गुंडाळून ठेवलेले नाहीत आणि ते जिवंत आहेत हो. ३७० वे कलम आणि अॅस्फामुळेच तर यांचं अजून पीडीपीशी जमत नाहीय्ये. हे दोन्ही गुंडाळावेत अशी पीडीपीची इच्छा आहे आणि भाजप त्याला विरोध करतोय म्हणून तर तिथं अजून सरकार स्थापन होत नाहिय्ये.
>>> महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत.
कधी केली संभाजी ब्रिगेडशी जवळीक? कधी केलं एनसीपी बरोबर फिक्सिंग? आजचीच बातमी आहे. शिवसेना युती सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल असं आजच राकाँ ने जाहीर केलंय. हे फिक्सिंग असतं का?
>>> केजरीवालवर टीका करायला यांना तोंड आहे का? प्रधानसेवक स्वतः राज्याराज्यात 'मै , मै 'करत प्रचार करत फिरतात.
केजरीवालही तेच करतात ना. मी ४९ दिवसात यँव केलं, त्यँव केलं अशा फुशारक्या मारत होतेच ना. माझ्या ४९ दिवसांच्या कारकीर्दीतल्या तिमाहीत दिल्लीत सर्वाधिक करभरणा झाला अशीही लोणकढी थाप त्यांनी मारून स्वतःकडे नसलेलं श्रेय घेतलं होतंच ना.
>>> दिल्लीमध्ये विरोधकांना बाजारू, अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना असले सल्ले देत फिरतात तर भक्त तरी कसे गप्प बसतील.
केजरीवाल स्वतःबद्दलच बोलताना अनार्किस्ट असे म्ह्णाले होते.
>>> आता भक्त लोक दिल्लीत हिंदुनी एक होवून मते दिली नाही म्हणून आप जिंकली असला प्रचार करत आहेत जणू काही हिंदू मते म्हणजे यांची जहागीर आहे.
असे भाजपने सांगितलेलं नाही. अजून काही दिवसांनी आत्मपरीक्षण केल्यावर भाजपची प्रतिक्रिया येइल. प्रथमदर्शनी असं दिसतंय की भाजपची मते जवळपास तेवढीच आहेत (३२.३%). फक्त २ टक्क्यांनी घटलेली आहेत. काँग्रेसची मते १६-१७% टक्क्यांनी घटलेली असून आआपच्या मतात अंदाजे २४-२५ टक्क्यांची वृद्धी आहे. म्हणजे काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात आआपकडे वळलेली (की वळविलेली?) आहेत. थोडक्यात म्हणजे या निवडणुकीत आआपच्या मतांना सूज आलेली आहे आणि कोणतीही सूज काही काळाने उतरतेच. २०१६ मधील निवडणुकीत ही सूज उतरलेली दिसेल.
>>> हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण कारणे हा यांचा जुना धंदा आहे. युपी मध्ये पण सध्या भाजप आणि सपा हेच करत आहेत.
असे करणे हे काँग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भाजपचे नाही. केजरीवालांनी देखील बुखारीला पाठिंबा द्यायला जाहीर करायला लावून तेच केले होते. प्रकरण अंगाशी येताना दिसताच घाईघाईने बुखारीचा पाठिंबा आम्हाला नको असे शहाजोगपणे सांगितले. तोपर्यंत मुस्लिमांपर्यंत योग्य तो संदेश गेला होता. मुस्लिमांनी आआपला मते द्यावीत असे बुखारीने सांगितले होते. पण केजरीवालांनी युक्ती करून मुस्लिम मते नकोत असे न सांगता बुखारीचा पाठिंबा नको असे सांगून चलाखी केली होती.
>>> मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार.
सेम फॉर केजरीवाल
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 02/10/2015 - 19:28
नवीन
समान नागरी कायदा या लोकसभेला बिजेपी च्या मुद्यांमध्ये नव्हताच. आणि होता तर आता बहुमत त्यांच्याकडे आहे का करत नाहियेत ? या एका मुद्द्या साठी मी कायम भाजप ला मत देइन पण त्यांनी तो मुद्दा खरेच गुंडाळुन ठेवलाय. कास्मिर च्या राजकारणात मी पडत नाही, पण ३७० कलम केंद्रा सरकार रद्द करु शक्ते की राज्य ? आणि जर राज्य सरकार करत असेन तर लोकसभेला तशी घोषणा त्यांनी का केली होती. ( हेच तुम्ही नेहमी केजरीवाल ला बोलता ना )
--
महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ?
>>> महाराष्ट्रात बोलायचं झाल तर टोल मुक्तीवरून यु टर्न , एनसीपीबरोबर फिक्सिंग, संभाजी बिग्रेडशी जवळीक अशी कित्येक उदाहरणे आहेत.
कधी केली संभाजी ब्रिगेडशी जवळीक? कधी केलं एनसीपी बरोबर फिक्सिंग? आजचीच बातमी आहे. शिवसेना युती सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल असं आजच राकाँ ने जाहीर केलंय. हे फिक्सिंग असतं का?
मला वाटते संभाजी ब्रिगेड नसेल म्हणायचे त्यांना शिवसंग्राम बोलायचे आहे काय मेटेंचे ? ते आणि ब्रिगेड वेगळॅ आहेत.
जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता.
आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो.
मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते.
आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा .
तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ?
मग तुम्ही मोदींना मतांची सूज आलेली आहे याव्ळेस लोक्सभेच्या निवडनुकीत ती पण कधी ओसरेल हे का सांगत नाहियेत ? का सुजा फक्त आप च्या मतांच्या ओसरतात, भाजप्चय मतांच्या नाहित.
आणि एक ३३ % होते तर ते वाढवण्याचे का जमले नाही भाजप ला ? आणि असे ही शक्यता नाही का की कॉन्ग्रेस ची २५ % मतातील १५ % मते आप ला पडली अशी तुम्ही म्ह्णाता त्यातले ५ % च आप ला मिळाले असतील आणि १० % भाजप्ला पण . पण भाजप्चे स्वताचे ११ % आप कडे वळले असतील .
का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ?
माझय मताने भाजप चे पण ११ % आप ला मिळाले आणि कॉन्ग्रेस चे १० % भाजप्ला मिळाले. याला पण अर्थ का होत नाहीत तुम्ही म्हण्ता तसे ?
मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना.
मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे. म्
आणि आप सांगत ते सहाजोग पणा, आणि हेच महराष्ट्रात बिजेपी थोड्याच दिवसात रा,कॉ ने पाठिंबा दिलाच नाही ते कौताकास पात्र असा भेद का ? चुक ती चुकच ना मग ?
>>> मोदिसरकारने भंपक भाषणबाजी कमी करून लोकांची कामे करावीत नाहीतर जनता असे धक्के देत राहणार.
सेम फॉर केजरीवाल
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Wed, 02/11/2015 - 07:56
नवीन
बीग्रेडच्या व्यासपीठावर फडणवीस, गडकरी गेल्या महिन्यात जावून आले आहेत. पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी भाजपच्याच तिकिटावर २ वेळा आमदार खाली होती (आता एनसीपी मध्ये आहे). पवार/ प्रफुल पटेल आणि गडकरी/ शहा/ मोडी याराना नवीन नाहि. भाजप - एनसीपी च्या सेटिंग मुळेचच सरकार स्थापनेननंतर लोकांनी गेल्या २० वर्षात घातल्या नाही इतक्या शिव्या घातल्या हे फडणवीस यांनी स्वतः कबूल केले आहे.
समान नागरी कायदा, ३७० कलम , राममंदिर हे मुद्दे भाजपने कधीच गुंडाळून ठेवले आहेत. वरचे गुरुजी कदाचित अजून ८०-९० च्या दशकात वावरत असावेत कारण भाजपच्या आजच्या नवीन कार्यकर्त्यांना तर हे मुद्दे काय होते हे पण आठवत असेल कि नाही माहित नाहि.हिंदू- मुस्लिम ध्रुवीकरण करण्यात भाजप माहिर आहे. सध्या युपी मध्ये भाजप-सप दोघेही हेच करत आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:55
नवीन
>>> बीग्रेडच्या व्यासपीठावर फडणवीस, गडकरी गेल्या महिन्यात जावून आले आहेत. पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी भाजपच्याच तिकिटावर २ वेळा आमदार खाली होती (आता एनसीपी मध्ये आहे).
व्यासपीठावर जाऊन काय त्यांचा अजेंडा मान्य केला काय?
>>> पवार/ प्रफुल पटेल आणि गडकरी/ शहा/ मोडी याराना नवीन नाहि. भाजप - एनसीपी च्या सेटिंग मुळेचच सरकार स्थापनेननंतर लोकांनी गेल्या २० वर्षात घातल्या नाही इतक्या शिव्या घातल्या हे फडणवीस यांनी स्वतः कबूल केले आहे.
न मागता राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याचा फडणवीसांनी अत्यंत चतुराईने उपयोग करून शिवसेनेला नमवून शरण आणले. ज्या दिवशी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तेव्हा मौन पाळले नसते तर शिवसेनेने प्रचंड ब्लॅकमेल करून मंत्रीपदांसाठी अतिशय त्रास दिला असता. त्याऐवजी पाठिंबा ना स्वीकारून ना नाकारून शिवसेनेला घायकुतीला आणून व कासावीस करून भाजपने एक अत्यंत चतुर खेळी खेळली होती.
>>> समान नागरी कायदा, ३७० कलम , राममंदिर हे मुद्दे भाजपने कधीच गुंडाळून ठेवले आहेत.
अशी तुमची खुळी समजूत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:43
नवीन
>>> समान नागरी कायदा या लोकसभेला बिजेपी च्या मुद्यांमध्ये नव्हताच. आणि होता तर आता बहुमत त्यांच्याकडे आहे का करत नाहियेत ? या एका मुद्द्या साठी मी कायम भाजप ला मत देइन पण त्यांनी तो मुद्दा खरेच गुंडाळुन ठेवलाय.
भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. कायदा मंजूर होण्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर व्हावा लागतो.
>>> कास्मिर च्या राजकारणात मी पडत नाही, पण ३७० कलम केंद्रा सरकार रद्द करु शक्ते की राज्य ? आणि जर राज्य सरकार करत असेन तर लोकसभेला तशी घोषणा त्यांनी का केली होती. ( हेच तुम्ही नेहमी केजरीवाल ला बोलता ना )
--
केंद्र आणि राज्य असे दोघेही लागतात.
>>> महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ?
कोणत्या वृत्तपत्रात आले होते? लिंक देता का?
>>> जर भाजप ने राष्ट्रवादीशी संगनमत केले नव्हते तर आवाजी मतदान पास होउन भाजप्चे सरकार आलेच कसे होते ? आवाज नक्की कोणाचा होता.
आवाजी मतदानात एकूण मतांपैकी निम्मी किंवा अधिक मते पडावी लागतात. विश्वासदर्शक ठरावावेळी फक्त २४६ आमदारांचाच आवाज होता. त्यात भाजपचे १२३ + काही इतर मित्रपक्षांचा बहुमताचा आवाज होता. राष्ट्रवादीचे मौन होते. यावर दुसर्या धाग्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. ती वाचा.
>>> आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो.
मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते.
आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा .
तो दुसरा धागा वाचा.
>>> तुम्ही काय म्हाणता, केजरीवाल ने प्रचार करावयास नको होता का? तुमच्या म्हणण्याने काय केले पाहिजे होते, जेव्हडे ४९ दिवसाबद्दल केजरीवाल बोलला त्याच्या कितीतरी पट आणि कितीतरी दिवस भाजप त्या ४९ दिवसाबद्दल बोलत होता त्यामुळॅ त्याच ४९ दिवसांबद्दल भाजप ने बोलायचे पण केजरीवाल ने बोलायचे नाही असे का ?
करावा ना प्रचार. पण स्वतः काय केले तेवढेच बोला ना. माझ्या ४९ दिवसांच्या तिमाहीतच सर्वात जास्त करभरणा झाला हे सांगून करभरणा होण्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता.
>>> का असे कुठे लिहिलेले आहे की कॉन्ग्रेस चीच मते आप ला पडली. तुम्ही असे विश्लेशन कशाच्या जोरावर करता. न्युज चॅनेल च्या ?
आजच्या अनेक वृत्तपत्रातून विश्लेषण आले आहे ते वाचल्यास शंका दूर होतील.
>>> मुस्लिम मते नको असे का त्यांनी सांगायचे होते ? बुखारी नी पाठिंबा दिला होता तोच नको म्हणणार ना.
मुसलमानांची मते नको तर नको ही माणसिकता भाजपची आहे.
गुपचूप बुखारीला भेटून व त्याला जाहीररित्या पाठिंबा द्यायला लावून नंतर पाठिंबा नाकारणे हे एक नाटक होते हो.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 08:46
नवीन
संयुक्त अधिवेशन घेउन पास करता येता
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:48
नवीन
कदाचित येईल तसे करता. पण यासाठी साधे बहुमत पुरेसे की दोनतृतीयांश हे बघायला हवे. दोनतृतीयांशाची गरज असल्यास अजून काही वर्षे थांबावे लागेल.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 09:32
नवीन
समान नागरी कायदा लोक्सभेचा जाहिरनामा/वचननामा/व्हिजन आणि फलाना काय असते त्यात नव्हता. आणि
इ तो जानिव पुर्वक काधुन टाकला होता. तो तेथे असल्यास येथे दाखवुन द्यावे.
सकाळ पेपर मध्ये आले होते, न्युज प्रमाणे सर्च कसे मारतात मला माहीत नाही तरी पाहतो. मी खोटे बोलत नाहिये.
दुसर्या धाग्यावरचे भाजप च्या बाजुने नसणारे रिप्लाय पण बघा
या साठी दुसर्या धाग्याची गरजच नाहिये
मग स्वता बद्दल आणि त्या रीलेट्ड च बोलायचे होते तर भाजप आणि मोदी केजरीवाल बद्दल का बोलत होती ? का त्यांना स्वताविषयी काही बोलण्यासारखे नव्हते ?
कोणत्या वृत्तपत्रात असे ठोस लिहिलेले आहे की फक्त कॉन्ग्रेस चीच सर्व मते आप कडे वळाली. का त्या वृत्तपत्रांचे विश्लेषण बरोबर असते का ? मग अशी अनेक वृत्तपत्रे आहेत त्यात भाजप च्या चुका आहेत असे दाखवले आहे, शिवाय महारष्ट्रात काय घोळ घातला होता तेंव्हा ही त्यांच्यावर टिकायुक्त विश्लेशन पण आहे मग तेच का खरे नाही म्हाणायचे? आणि तुम्ही म्हणता तेव्हडेच का खरे माणयाचे ? तुमचाच धागा का प्रमाण माणायचा ?
जर गुपचुप बुखारी ला भेटायचे होते तर सगळीकडे कसे कळाले ? आणि काय बोलणे झाले हे पण न्युज वालेच सांगत आहेत, त्यांच्यावर पण आता किती भरवासा ठेवावा ?
बर असो असे सगळॅ झाले असले तरी लगेच पुर्ण पाठिंबा नाकारला गेला होता. आधीच्या चर्चा तुम्ही म्हणता तश्या गुपचुप झाल्या असतील आणि त्याला ठोस पुरावा नाहिये नक्की काय बोलणे झाले असेन , जो पुरावा आहे त्याच्यात काड्या टाकुन आधीच मागितला होता हे आपण कश्याच्या जिवावर बोलतो आहोत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 18:33
नवीन
>>> समान नागरी कायदा लोक्सभेचा जाहिरनामा/वचननामा/व्हिजन आणि फलाना काय असते त्यात नव्हता. आणि
इ तो जानिव पुर्वक काधुन टाकला होता. तो तेथे असल्यास येथे दाखवुन द्यावे.
जाहीरनाम्यात एखादी गोष्ट नसली तर ती करायचीच नसते किंवा तसे करणे हे घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे असं काही नसतं.
बादवे, हिंदुत्व आणि रामजन्मभूमीसारखे प्रश्न हा भाजपचा छुपा अजेंडा आहे असे अनेक विरोधक म्हणत असतातच.
>>> >>> >>> महाराष्ट्राच्या पेपर मध्ये आले होते भाजप स्कुल फी रेगुलायजेशन करत आहे.. मला तर हे कुठेच दिसले नाही सगःळी कडे हजारोंनी फी अजुन ही घेतली जातात, मग तसे दिक्लेअर का केले आहे पेपर मध्ये ?
>>> >>> कोणत्या वृत्तपत्रात आले होते? लिंक देता का?
>>> सकाळ पेपर मध्ये आले होते, न्युज प्रमाणे सर्च कसे मारतात मला माहीत नाही तरी पाहतो. मी खोटे बोलत नाहिये.
शोधा म्हणजे सापडेल.
>>> आता तुम्ही म्हणता केजरीवाल भगोडा होता आणि नंतर माफी मागत फिरतो.
मला सांगा राष्ट्रावादी बरोबर संगणमत करुन आवाजी मतदान घेणॅ पण भगोड्या टाईप प्रव्रुत्तीचेच लक्षण आहे हे सरळ सरकार आणण्यापासुन पळत होते.
ते कसं काय? राष्ट्रवादीला पाठिंबा मागितलाच नव्हता. राष्ट्रवादीने तो न मागता स्वतःहून दिला होता, पण भाजपने तो स्वीकारलाच नव्हता. ज्या पक्षाचा पाठिंबा स्वीकारलाच नव्हता त्याच पक्षाबरोबर संगनमत कसे काय शक्य आहे? भाजपने एक चतुराई केली. राष्ट्रवादीच्या स्वयंघोषित पाठिंब्याचा सरकारच्या बहुमतासाठी वापर करण्याऐवजी अत्यंत चलाखीने वापर करून शिवसेनेला शरण आणले.
>>> आणि या प्रयोगाला अतुम्ही कौतुकास पात्र असे ही बोलला आहे.. मग केजरीवाल नंतर माफी मागुन पुन्हा शुन्यातुन उठतो तर ते नाटक ? ते कौताकास पात्र नाही ? एकाच बाजुचा विचार सोडा .
त्याचे कारण हा प्रयोग करून भाजपने स्वतःला शिवसेनेकडून ब्लॅकमेल होऊन दिले नाही, म्हणून तो कौतुकास पात्र. केजरीवालांची माफी प्रामाणिक नव्हती. त्यामुळे कौतुकाचा प्रश्नच नाही.
>>> मग स्वता बद्दल आणि त्या रीलेट्ड च बोलायचे होते तर भाजप आणि मोदी केजरीवाल बद्दल का बोलत होती ? का त्यांना स्वताविषयी काही बोलण्यासारखे नव्हते ?
दोघेही एकमेकांविरूद्ध बोलले आहेत.
>>> कोणत्या वृत्तपत्रात असे ठोस लिहिलेले आहे की फक्त कॉन्ग्रेस चीच सर्व मते आप कडे वळाली. का त्या वृत्तपत्रांचे विश्लेषण बरोबर असते का ? मग अशी अनेक वृत्तपत्रे आहेत त्यात भाजप च्या चुका आहेत असे दाखवले आहे, शिवाय महारष्ट्रात काय घोळ घातला होता तेंव्हा ही त्यांच्यावर टिकायुक्त विश्लेशन पण आहे मग तेच का खरे नाही म्हाणायचे? आणि तुम्ही म्हणता तेव्हडेच का खरे माणयाचे ? तुमचाच धागा का प्रमाण माणायचा ?
माझा धागा नका प्रमाण मानू. वाचन वाढवा आणि स्वतःचे मत ठरवा.
>>> जर गुपचुप बुखारी ला भेटायचे होते तर सगळीकडे कसे कळाले ? आणि काय बोलणे झाले हे पण न्युज वालेच सांगत आहेत, त्यांच्यावर पण आता किती भरवासा ठेवावा ?
अलका लांबा निवडणुकीच्या काही दिवस आधी बुखारीच्या भावाला भेटून आल्या हे अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. त्या भेटून आल्यावर लगेचच बुखारी पाठिंबा देतो हा योगायोग नव्हे.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 19:05
नवीन
येथे पुरावा नसताना ही तुम्ही जर भाजपच्याच बाजुने असे बोलणार असेन तर पुढे काय बोलु आता मी.
मी मात्र तुम्हाला जाहीर पणे सांगतो, की भाजप या मोदी सरकारच्या ५ वर्षाच्या काळात समान नागरी कायदा आणणार नाही म्हणजे नाही.
जर त्यांनी असे केले तर मी कधीच राजकिय धाग्यावर माझे मत देणार नाही किंवा कधीच राजकिय धागे काढनार नाही.
या उलट तुम्ही जसे म्हणत की तो मुद्द गुंडालुन ठेवला नाही तो ते करणारच, तर काही प्रमाण देताल का ? मला वाटते तुम्हाला ते शक्य नाही.
तुम्ही आप सारखे अस्विकार केला का त्या पाठिंब्याचा? हे जे कौतुक करत आहात तर थोडे राष्ट्रवादीचे पण करा मग. आणि एक भाजप चा हा डाव नव्हता. ते काय सर्वांना सांगुन थोडेच पवारांना सांगणार होते पाठिंबा द्या.
हे सर्व ठरले होते, आता तुमचा धागा पहा आणि त्यावेळेसचे माझे रिप्लाय पण .
वा .. दुसर्याच्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला योग्य वाटत नाही.. दुसर्यास तुच्छ लेखने सोडा.
नाही, केजरीवाल मुद्द्याला धरुन बोलत होते, आणि भाजप काय करत होता हे तरी आता येथे द्यायला लावु नका . कुठला ही दिल्लीचए पेपर आणि न्युज पाहु शकता
बर्र ते जावुद्या दोघे ही एकमेकांन्बद्दल बोलत होते तर केजरीवल ४९ दिवसाच्यावेळॅस काय झाले बोलले तर तुम्हाला आक्षेप का ? बोलुद्या की ते पण बाकी भंपक बोलण्यापेक्षा ते महत्वाचे नव्हते का ?
बरोबर, तुम्ही पण वाचन वाढवा आणि इतरांच्या ही चुका पहा.
भावाल भेटुन त्या काय बोलल्या याचे संभाषण द्या ? नसेल तर फक्त भाजपच्या खोट्या आरोपावर मते गिरवु नका.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 09:02
नवीन
>>> तुम्ही आप सारखे अस्विकार केला का त्या पाठिंब्याचा? हे जे कौतुक करत आहात तर थोडे राष्ट्रवादीचे पण करा मग. आणि एक भाजप चा हा डाव नव्हता. ते काय सर्वांना सांगुन थोडेच पवारांना सांगणार होते पाठिंबा द्या.
हे सर्व ठरले होते, आता तुमचा धागा पहा आणि त्यावेळेसचे माझे रिप्लाय पण .
भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा स्वीकार किंवा अस्वीकार केलाच नव्हता. न मागता ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांना उत्तर द्यायची गरज काय? २००४ मध्ये सपचा अमरसिंग स्वतःहून सपचा संपुआ सरकारला पाठिंबा द्यायला गेला होता. सोनिया गांधींनी स्वीकार/अस्वीकार न करता त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. तसेच इथे पण.
२००१ मध्ये ९/११ नंतर वाजपेयींनी भारत अल्-कायदा विरूद्धच्या लढाईत अमेरिकेला पाठिंबा देईल असे अनेकवेळा बुशला सांगितले होते. बुशने त्या पाठिंब्याचा स्वीकार/अस्वीकार केला नव्हता.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/12/2015 - 10:24
नवीन
मग कॉन्ग्रेस ने पण आप ला मागच्या वेळेस होउन पाठिंबा दिला होता, तुम्ही आप ला तरी का दोष देत बी टीम म्हणता मग.
सर्वांचेच एकसारखे माना ना. काय प्रोब्लेम आहे ? आप ने पण कोठे कॉन्ग्रेस चा पाठिंबा मागितला होता.
आणि
समान नागरी कायद्यावर काहीच बोलत नाहीत, गुंडाळुन ठेवला नाही तर कधी पर्यंत आमलात येइन असे आपणास वाटते, का आमलात येणार नाही असेच आमच्या सारखे तुम्हाला वाटते
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 10:41
नवीन
>>> मग कॉन्ग्रेस ने पण आप ला मागच्या वेळेस होउन पाठिंबा दिला होता, तुम्ही आप ला तरी का दोष देत बी टीम म्हणता मग. सर्वांचेच एकसारखे माना ना. काय प्रोब्लेम आहे ? आप ने पण कोठे कॉन्ग्रेस चा पाठिंबा मागितला होता.
राष्ट्रवादीने भाजपला भाजपने न मागता स्वतःहून दिलेला पाठिंबा आणि मागील वर्षी दिल्लीत काँग्रेसने आआपला दिलेला पाठिंबा यात अजिबात साम्य नाही. राष्ट्रवादीने पाठिंब्याचे अधिकृत पत्र राज्यपालांना किंवा भाजपला दिलेले नव्हते. पाठिंबा देतो असे नुसतेच माध्यमांमध्ये जाहीर केले होते. अशा तोंडी आश्वासनांना अर्थ नसतो.
याउलट दिल्लीमध्ये आपले ८ आमदार आआपला पाठिंबा देत आहेत असे अधिकृत पत्र काँग्रेसने राज्यपालांना दिले होते. त्यानंतरच केजरीवालांना सरकारस्थापनेचे निमंत्रण मिळाले होते.
>>> समान नागरी कायद्यावर काहीच बोलत नाहीत, गुंडाळुन ठेवला नाही तर कधी पर्यंत आमलात येइन असे आपणास वाटते, का आमलात येणार नाही असेच आमच्या सारखे तुम्हाला वाटते
समान नागरी कायद्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल. त्यासाठी दोन्ही सभागृहात बहुमत लागेल (कदाचित दोन तृतीयांश बहुमत लागेल). सध्या भाजप राज्यसभेत अल्पमतात आहे. सध्याच्या स्थितीनुसार भाजपला राज्यसभेत बहुमतासाठी किमान ३ वर्षे थांबावे लागेल. त्यानंतर नक्कीच समान नागरी कायद्याची प्रक्रिया सुरू होईल.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 02/11/2015 - 04:28
नवीन
गुर्जी तुम्ही एका ठिकाणी म्हाणाला होतात की सत्तातूर कॉंग्रेस सत्तेसाठी काश्मीर मध्ये पीडीपी किंवा ओमर यांच्याशी शय्यासोबत करू शकत . मग आता भाजप पीडीपी सोबत करत आहे ते काय ? वन नाईट stand का contract marriage ?हमारा खून खून , तुम्हारा खून पानी ? बाकी कुठल्याही पक्षाचे नुकसान विरोधकांपेक्षा आंधळे समर्थक /भक्त करत असतात हे भक्तांना कधी कळेल ते एक अयोध्येचा रामच जाणे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:46
नवीन
भाजपने पीडीपी बरोबर युती केली तर ती स्वतःच्या अटींवर असेल. अॅफ्स्पा मागे घ्या अशासारख्या देशविघातक अटी भाजप मान्य करणार नाही.
याउलट काँग्रेस सत्तेत सहभागी होण्यासाठी पीडीपीच्या कोणत्याही अटी मान्य करू शकते. हाच फरक आहे भाजप व काँग्रेसमध्ये.
आज भाजपएवढ्या जागा काँग्रेसकडे असत्या तर एव्हाना पीडीपी बरोबर लग्न लागून हनीमून सुद्धा पार पडला असता. पण इथे भाजपशी गाठ असल्याने अजून युती होत नाहीय्ये.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 08:52
नवीन
भाजपाच्या युती या स्वतःच्या अटींवर ! आणि दुसर्याच्या युती म्हणजे सत्तालोलुपता !
आपला म्हणजे बीजेपीचा ( या आपच्या नावाने घोळ घातलाय ;) ) ते प्रेम !! दुसर्यांची ती भानगड
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:56
नवीन
>>> भाजपाच्या युती या स्वतःच्या अटींवर ! आणि दुसर्याच्या युती म्हणजे सत्तालोलुपता !
ही वस्तुस्थिती आहे.
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Wed, 02/11/2015 - 10:11
नवीन
नव्हे... अंधश्रद्धा आहे. :)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 18:09
नवीन
तसं समजा.
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Wed, 02/11/2015 - 10:10
नवीन
या आधी तिथे काँग्रेसची सरकारे येऊन गेलीत ना हो (एकदा तर पीडीपीचं पण येऊन गेलंय)? घेतला का अॅफस्पा मागे?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 18:11
नवीन
काही जिल्ह्यातून अॅफस्पा मागे घेण्याची चाचपणी युपीए सरकारने केली होती. लष्कराच्या ठाम विरोधामुळे तो प्रस्ताव पुढे रेटता आला नव्हता.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 02/11/2015 - 10:21
नवीन
भाजप आणि राष्ट्रवादी अभद्र छुप्या युतीचे समर्थन करणार्यांकडून काय अपेक्षा करणार ? बाकी valentine day ला नमोजी बारामतीला आहेत म्हणे ? गैरसमज नको . कार्यक्रमासाठी आहेत कुठल्यातरी
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 06:07
नवीन
लोकसभेला भाजपाची झाली ती वाढ आणि दिल्लीमध्ये आपची आली ती सूज !
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Wed, 02/11/2015 - 06:33
नवीन
त्यांची तीच सिस्टीम आहे हो.
हम करे तो प्यार, आप करे तो... ;)
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Wed, 02/11/2015 - 08:01
नवीन
अनार्कीस्ट आहात तर नक्षली बना असले सल्ले देत फिरतात तर भक्त तरी कसे गप्प बसतील.
गुरुजी, केजरीचे सोडा हो त्याला तुम्ही लोकांनी नालायक, भगोडा, खुज्लीवाल वगैरे वगैरे बोलून सोडून दिले होते (प्रत्यक्षात पब्लिकने काय केले ते दिसत आहेच). आपले प्रधानसेवक त्यांना तुम्ही नक्षली बना असे सांगत फिरत होते त्यावर बोला.बाकी पंतप्रधान पदावरची व्यक्ती असली बेजबाबदार विधाने करते तर त्यांचे अंधभक्त शाहाणपण दाखवतील ही अपेक्षा जरा जास्तच आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 08:50
नवीन
स्वतबद्दल बोलतानाच केजरीवालांनी अराजकवादी असा शब्द वापरला होता. अराजक माजवायचे असेल तर नक्षली बना हे सांगण्यात काय चूक?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 09:35
नवीन
लिंक द्या बरे, एकदा बघुद्या. कारण मी नेमके हे कधी बघितले / वाचले किंवा ऐकले नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 18:17
नवीन
>>> लिंक द्या बरे, एकदा बघुद्या. कारण मी नेमके हे कधी बघितले / वाचले किंवा ऐकले नाही.
मी पुराव्याशिवाय बोलत नसतो किंवा स्पेक्युलेशनही करत नसतो.
हे वाचा.
होय, मी अराजकतावादी आहे - केजरीवाल
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 18:49
नवीन
ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या वेळेस हे बोलले होते का, तरी मी म्हण्तले कधी बोलले होते बरे.
असो त्या न्युजमधीलच गोष्टी जश्याच्या तसे येथे कॉपी करुन देतो . मग पोलिस जर काही काम करणार नाही तर काय केले पाहिजे शिवाय ते दिल्ली राह्यसरकारच्या अंडर पण नव्हते.
तुम्हाला एखादी गोष्ट उलटी बोलली तरी खुप लागते, तर मग रुलिंग पार्टीचे पोलिस ऐकत नसेन तर ? त्यांना राग येवुच नये का ? असो बाकी त्यावेळेसच्या गोष्टी कोण बरोबर आणिचुक हे पुन्हा काढु नये दिल्लीए जनतेला हे माहीती होते आणि तरीही ५४ % टक्के लोकांनी त्यांना निवडुन दिले आहे.
--
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 08:53
नवीन
>>> ओके, तेंव्हा त्या पोलिसांच्या वेळेस हे बोलले होते का, तरी मी म्हण्तले कधी बोलले होते बरे.
असो त्या न्युजमधीलच गोष्टी जश्याच्या तसे येथे कॉपी करुन देतो . मग पोलिस जर काही काम करणार नाही तर काय केले पाहिजे शिवाय ते दिल्ली राह्यसरकारच्या अंडर पण नव्हते.
तुम्हाला एखादी गोष्ट उलटी बोलली तरी खुप लागते, तर मग रुलिंग पार्टीचे पोलिस ऐकत नसेन तर ? त्यांना राग येवुच नये का ? असो बाकी त्यावेळेसच्या गोष्टी कोण बरोबर आणिचुक हे पुन्हा काढु नये दिल्लीए जनतेला हे माहीती होते आणि तरीही ५४ % टक्के लोकांनी त्यांना निवडुन दिले आहे.
--
दिल्लीच्या जनतेला तेच बरोबर आहे हे माहिती होते तर लोकसभेला का एकही जागा मिळाली नाही?
>>> In a separate case, another minister Rakhi Birla has accused the police of ignoring her orders to punish a family responsible for a dowry-related death
याच रा़खी बिर्लांची मागील वर्षीची एक गोष्ट आठवली. गाडीवर कोणी तरी दगड मारला म्हणून थेट पोलिस तक्रार दाखल केली होती त्यांनी. चौकशीअंती हे समजले की लहान मुले फुटबॉल खेळताना तो चेंडू बिर्लांच्या गाडीवर आदळला होता. त्यावेळी बिर्लांनी थयथयाट करून एका मुलाच्या वडीलांना माफी मागायला लावली होती. हे प्रकरण तिथेच संपले होते. परंतु नौटंकी करण्याच्या आआपच्या व्यवच्छेदक लक्षणाला अनुसरून सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी गाडीवर कोणीतरी दगड मारल्याची थेट पोलिस तक्रार दाखल केली होती.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 08:56
नवीन
On Wednesday night, Delhi Law Minister, Somnath Bharti conducted a self-described midnight "raid" in a South Delhi neighbourhood, and asked the police to arrest Ugandan citizens and raid a house where he alleged they were trafficking drugs and sex. The police refused, saying they had no warrant.
Four women have since filed a police case alleging that they were beaten up by a mob, and forced to submit urine samples.They tested negative for drugs.
वॉरंट नसताना पोलिस कसे काय कोणाला अटक करणार होते? विशेषतः परदेशी नागरिकांच्या बाबतीत तर सर्व कायदेशीर प्रक्रीया काटेकोर पाळायला लागतात.
In a separate case, another minister Rakhi Birla has accused the police of ignoring her orders to punish a family responsible for a dowry-related death
पोलिसांना शिक्षेचे अधिकार नाहीत. ते न्यायालयाला आहेत. एखाद्या कुटंबाला शिक्षा करावी असे आदेश देणार्या या मंत्रीबाई धन्य आहेत.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 09:39
नवीन
केजरीवाल तर जिंकले . असो !
पण या पराभवाला मोदी जबाबदार आहेत का ?
तुमचे मत काय ?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 02/11/2015 - 10:35
नवीन
अनेक आंतरजालीय आंतरराष्ट्रीय फोरम वर आपल्या सरकारची /देशाची /पक्षाची बाजू मांडण्यासाठी चीनी कम्युनिस्ट सरकारने काही सदस्य पे रोल वर ठेवले आहेत . कितीही मोठ हत्याकांड होऊ दे , कुणालाही फाशी देऊ दे , कितीही मानवी हक्कांची पायमल्ली होऊ दे या सायबर आर्मी च एकाच काम असत . आपल्या सरकारच /पक्षाच समर्थन करायचं . या आर्मी च्या सदस्यांना टु सेंट आर्मी अस हेटाळनिने म्हंटले जात . इथंही असा काही प्रकार सुरु झालाय की काय अस वाटायला लागल आहे .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 18:20
नवीन
जेव्हा एखाद्या खेळाच्या स्पर्धेमध्ये भारत पराभूत होतो तेव्हा तो संघाचा पराभव असतो, कर्णधाराचा किंवा उपकर्णधाराचा किंवा एखाद्या विशिष्ट खेळाडूचा नसतो. संपूर्ण संघच जबाबदार असतो. राजकारणातही हेच तत्व लागू आहे.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 02/11/2015 - 16:06
नवीन
बाकी हा वैविध्यपूर्व देश एका संघटनेच्या / पक्षाच्या फक्त काळ्या किंवा पांढऱ्या रंगात पाहणाऱ्या लोकांची मला कीव कम सहानुभूती वाटते . बाकी श्रीगुरुजी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे असे दिसते . त्यामुळे काही एखादा वावगा शब्द गेल्यास क्षमस्व . बाकी मुद्दे आधारित वाद करत जाऊच .
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 19:21
नवीन
कोण जिंकणार दिल्ली ?
हे धाग्याचे शिर्क्षक .. मला वाटते सर्वांचय मतांचा येथे आदर होउन नकी कोण आणि कसे आणि का जिंकेल हे येथे पाहिजे होते, पण धागा कर्ता भाजप्च कसा बरोबर हे येव्हडेच का बोलतो आहे ?
कोण जिंकणार दिल्ली अवैजी भाजप च दिल्लीत योग्य आणि तेच सर्वाथाने चांगले असे म्हणुन धागा असता तर समजु शकलो असतो.
धाग्याचे नाव येक आणि आपण पाठपुरवठा करतो भाजप ला असे का ?
निपक्षपाती पणे कोण जिंकणार दिल्ली धागाकर्ता का माडण्यास असमर्थ ठरतोय ?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 19:23
नवीन
एक गोष्ट सआंगायची राहिलीच या धाग्याचे उत्तर एक च आहे ' आप ' तरीही त्यानंतर ही भाजप्च कसा बरोबर हे चालु आहे.
धन्य ते गुरुजी..
निदान भाजप म्हणुन दुसरा धागा काढा मग आणि तेथे भाजप ची मते लिहा.. कदाचीत तेथे कोणी येव्हडे विरोध करणार नाही.. धागा पाहुनच रिप्लाय द्य्वा का नाही ते ठरवतील
शिर्क्षक द्यायचे एक आणि आत दुसरेच हे बंद करा
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 08:46
नवीन
>>> एक गोष्ट सआंगायची राहिलीच या धाग्याचे उत्तर एक च आहे ' आप ' तरीही त्यानंतर ही भाजप्च कसा बरोबर हे चालु आहे.
आआपला बहुमत मिळाले म्हणून फक्त आआपच बरोबर आणि भाजप चूक हे कसे काय बुवा?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/12/2015 - 10:30
नवीन
कोण चुक कोण बरोबर हे आपण येथे बसुन थोडेच ठरवणार आहे, ज्यांनी ठरवायचे त्यांनी ठरवले ?
तुम्ही धागा दिल्ली कोण जिंकणार ? हा आहे की. दिल्लीत भाजपच योग्य आहे हा आहे ?
कृपया आधी सांगा.
बाकी आता या धाग्यावर मी लिहिने थांबवत आहे, कारण खुप लिहिले आहे आणि सारखे सारखे तेच तेच लिहिने योगय वाटत नाही.
तरी तेव्हडे समान नागरी कायदा गुंदाळुन ठेवला नाही वगैरे काहि म्हणा पण त्याचे तेव्हडे सांगा मग अमलात कधी पर्यंत येइल, कारण या एका गोष्टी साठी मी भाजप ला मत दिले होते.
तुम्ही उत्तर नाही दिले तरी ते मला माहित आहे .. तो होणार नाही या मोदी सरकारच्या काळात आणि पुढेही शक्यता कमी आहे. आणि ती भारतीय लोकांची शोकांतीका पण आहे.
------------------- समाप्त------------------------------------------
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 02/12/2015 - 10:45
नवीन
समान नागरी कायद्यावरून आठवले. बहुपत्नीकत्व हा इस्लामचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलाय.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 10:47
नवीन
बरोबर.
समान नागरी कायद्याच्या दिशेने हळूहळू वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात अशाच १-२ न्यायालयीन निर्णयांच्या आधारे समान नागरी कायद्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 10:45
नवीन
>>> तुम्ही धागा दिल्ली कोण जिंकणार ? हा आहे की. दिल्लीत भाजपच योग्य आहे हा आहे ?
कृपया आधी सांगा.
धागा दिल्ली कोण जिंकणार याच विषयावर आहे आणि १० तारखेला त्याचे उत्तर मिळाले आहे. दिल्लीत भाजपच योग्य आहे का हा त्यातूनच उपविषय निर्माण झाला आणि त्याचे उत्तर माझ्याकडून होय असेच आहे.
>>> बाकी आता या धाग्यावर मी लिहिने थांबवत आहे, कारण खुप लिहिले आहे आणि सारखे सारखे तेच तेच लिहिने योगय वाटत नाही.
तुमच्या संयमित आणि ठामपणे लिहिलेल्या प्रतिसादांबद्दल आणि मुद्द्यांबद्दल मनापासून आभार! कोठेही कटुता आली नाही हेच महत्त्वाचं.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- ›
- »