कोण जिंकणार दिल्ली?
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
💬 प्रतिसाद
(452)
ग
गणेशा
Mon, 02/02/2015 - 14:12
नवीन
सर्व वाचत आहे.. बरेच बोलायचे मनात होते.. पण आता इतका वेळ निघुन गेला आहे , त्यामुळे फक्त वाचतो आहे. नविन धागा काढला तरी तेच तेच बोलण्यात अर्थ नाही.
केजरीवाल मात्र जिंकले पाहिजेत..
दिल्लीची निवडनुक मुद्द्यांवर आणण्याचे काम आणि आमदार म्हणजे पण एक सेवक असतो हा प्रकाश पाडण्यात ते यशस्वी झाले आहेत.
बाकी इतर बोलले आहेतच
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 02/02/2015 - 14:57
नवीन
आम आदमी पार्टी ..वयक्तीक रित्या आप ला माझी सहानभुती आहे.. राजकारणात लायक उमेदवार आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढा देण्यात केजरीवाल योग्य ठरले आहेत. भाजप .. कॉन्ग्रेस .. राजकारणात नवख्या असणार्या आप ला कोंडित पकडत आहेतच.. तरीही त्यांना योग्य उत्तर निवडनुकीत मिळेल असेच सध्या आप वागते आहे असे वाटते.
गेल्या निवडनुकीच्या वेळेस केजरीवाल नी टोपी फिरवली आणि कॉन्ग्रेस बरोबर हात मिळवणि केली हे बोलणे सोप्पे आहे.
परंतु आपल्याला ३२ जागा मिळणुही आपण युद्धात जिंकुनही हार मानली आहे हे भाजपने ही लक्षात ठेवले पाहिजे होते.
भाजप आणि कॉन्ग्रेस दोघांनीही.. केजरीवल्ने कोणाअचा पाठिंबा घेणाअर नाही आणि देणार नाही म्हणुन बोलल्याने पहिल्यांना अनकंडिशनल पाठिंबा आप ला जाहिर केला होता. आप ने पाठिंबा घेवा असा लोकांचा कल दिसताच ह्यांनी काही कंडिशन वर पाठिंबा जाहिर केला. आणि आपला राजिनामा द्यावा लागला तो कॉन्ग्रेस ने ज्या १८ मुद्द्यांवर पाठिंबा दिला होता त्यातील जनलोकपाल या महत्वाच्या बिलाला विरोध केला म्हणुन. ती चुक आप ने मान्य केली.
आपने पुन्हा निवडनुका लादल्या.. जनतेला खर्चात पाडले ही सगळी शो बाजी वाटते,, निवडनुकीत एकट्या मोदिईंच्या एका सभेसाठी करोडो रुपये खर्च आले आहेत हे न्युज ला सांगितले जात होते.
दिल्लीतील निवडनुका नकारात्मक जाहिरातींपेक्षा मुद्द्यांवर लढवल्या जाव्यात हे आपचे म्हणने मला एकदम बरोबर वाटले..
आज पर्यंत केजरीवाल ला राजकारण जमनार नाही त्यांनी आंदोलन करावे म्हणणार्या भाजप्ने बेदिंना मुख्यमंत्री उमेदवार घोषीत केले.. मग त्यांना होता का राजकारणाचा अनुभव ? पोलीस यंत्रणेत होत्या तर केजरीवाल पण उपायुक्त का असेना पण प्रशासकिय सेवेतच होते..
मुद्दा हा नाही की कोणी राजकारणात यावे.. मुद्दा हा आहे की आपल्या विचारांवर प्रामाणिक पणे ठाम राहणे राजकारणात आता हवे आहे आणि त्याची सुरुवात अरविंद केजरीवाल यांनी केली. लोक भगोडा म्हणु द्यात.. पण आपल्या विचारांशी प्रतारणा करण्यापेक्षा आणि असला पाठिंबा घेवुन कायम हाजी हाजी करण्यापेक्षा राजीनामा देणे कधीही योग्य होते असे माझे वयक्तीक मत आहे. आणिक तसेही लोकसभे नंतर कॉंग्रेस पाठिंबा काढुन घेणारच होती. हे भाजप कॉन्ग्रेसचे राजकारणच होते.. आणि हेच राजकारण केजरीवाल यांना खेळता येत नाही.. अनुभव नाही असे बोलले जाते या पक्षांकडुन.
भाजप आणि कॉन्ग्रेस यांचे निवडनुक मुद्दे हे आपकडुन घेतलेले मुद्देच वाटतात मला , जरी चुकुन आप बहुमतात आली नाही आणि भले भाजप सत्तेत आली तरी जनतेचे जे काम होयील ते अप्रत्यक्ष आपच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांप्रमाणेच होईल असे वाटते, आणि युद्धात हारु नाहितर जिंकु ज्या मुद्द्यांवर निवडनुक लढली गेली ते जर प्रत्यक्षात येणार असतील तर आपचाच तो विजय असेन.
तरीही भाजप, वीज आणि गॅस या गोष्टीत खुप काही करु शकेन असे वाटत नाही कारण या गोष्टी भाजपच्या औद्योगीक धोरणात येत असल्याने फायदा उद्योगधंद्यावाल्यांचाच पाहिला जाईन असे मला वाटते.
मागील निवडनुकीत विनोद बिन्नी मंत्री न केल्याने आप विरुद्ध बोलत होता.. आता त्याचा बोलावता धनी कोण होता हे जनतेला कळालेच असेन.. भाजप ला स्वताच्या पक्षाचे उमेदवार नाहित काय काही ठिकाणी हेच कळत नाही.
देल्ही चे पोलीस पण मंत्र्यांच्या खिशातले भावले बनलेले आहेत, आणि प्रत्येकजन नेत्याच्या ओळखीनेच तेथे चिकटला आहे असे वाटते. देल्हीला राज्याचा दर्जा आणि पोलिस राज्याच्या अंडर असणे ही केजरीवाल यांची आनखिन एक बरोबर मागणी आहे. छोट्या छोट्या राज्यनिर्मितीला भाजप नेहमी पाठिंबा देते मग येथेच काय त्यांना प्रोब्लेम आहे माहीत नाही.
आप बद्दल महाराष्ट्रात खुप नकारात्मकता आहे.. कदाचीत मेडिया ही ह्यास जबाबदार आहे..केजरीवाल निवडनुकीपर्यंत काही तरी चांगले कोठे करतो आहे हे कोठेच कधी दाखवले जात नाही.. एखादी चुक किंवा पक्षातील कोणी काही तरीए वेगळॅ बोलले की लगेच न्युज तयार.. अश्या प्रकारे मेडियाने वागु नये असे वाटते.. उलट आप च्या प्रभावाने मोठ्या पक्षांना ही राजकारण पुन्हा निट सुरु करावे लागत आहे ही सद्द्य स्थीती आहे. महाराष्ट्रात आप सारखी पार्टी नसल्याने नकारात्मक आणि खळ्ळ खट्ट्याक पद्धतीनेच निवडनुक आणि राजकारण झाले. मुद्द्यांवर तेआले नाहीच निटसे.. आणि आले तेंव्हा भविष्य घड्याळावर ठेवुन लोक आणखिन राजकारण करत बसली.. आपण कोणाचे बरोबर कोण चुक करत बसलो आणि राजकारणात संधीसाधु पणाचाच पुन्हा विजय झाला.. निदान संधीसाधु पणा तरी आप कडे नाही असे वाटते, जे आहे ते हे आहे, पाहिजे तर स्विकारा नाहीतर नको .. उगाच आज एक उद्या एक असे तर नाही.
किरण बेदी यांच्याबद्दल आदर होता, पण त्यांच्या बोलण्याचा ..मुलाखतींचा सूर आता वेगळाच भासतो आहे.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Mon, 02/02/2015 - 15:01
नवीन
ऐकावं ते नवलच!
आता चार तारखेला या महाराजांचं भवितव्य ठरणार!
http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-elections-2015-can-outsider-arvind-kejriwal-contest-delhi-polls-hc-to-decide-on-feb-4-1067424/
त्यांच्या विरोधात निकाल लागला तर फायदा काँग्रेसला होईल असं दिसतंय .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/02/2015 - 15:30
नवीन
>>> त्यांच्या विरोधात निकाल लागला तर फायदा काँग्रेसला होईल असं दिसतंय .
इतक्या फुसक्या कारणावरून उमेदवारी रद्द होणे शक्य नाही. आपल्यावरील नोंदलेले गुन्हे, आपली एकूण संपत्ती इ. ची खरी माहिती न देणार्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न होता ते निवडूनही येतात. त्यामुळे मतदारयादीत नाव नाही किंवा पत्ता चुकलेला आहे अशा किरकोळ कारणावरून उमेदवारी रद्द होणार नाही.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Mon, 02/02/2015 - 17:26
नवीन
वरकरणी असे वाटत आहे. पण तरीही...
इंदिरा गांधींची लोकसभेवर निवडणुक अशाच फुसक्या कारणांवरून हायकोर्टाने रद्द केली होती. ती कारणे होती:
१. त्यांनी ज्या स्टेजवरून निवडणुक प्रचार सभेत भाषण केले त्या स्टेजची उंची नियमांमध्ये दिली आहे त्यापेक्षा जास्त होती.
२. ते स्टेज उत्तर प्रदेशातील पब्लिक वर्क्स डिपार्टमेन्ट कडून करून घेतले होते.
३. त्या स्टेजसाठीची आणि सभेसाठीची वीज उत्तर प्रदेश वीजमंडळाकडून घेण्यात आली होती.
४. त्यांच्यासाठी प्रचार करणार्यांमध्ये असलेल्या यशपाल कपूर हा गृहस्थ सरकारी नोकरीत होता.त्याने सरकारी नोकरीचा राजीनामाही दिला होता पण त्याचा राजीनामा विधीवत मंजूर केला जायच्या आधीच त्याने प्रचाराला सुरवात केली.
इंदिरा गांधींवरील इतर महत्वाचे आरोप-- मतदारांना लाच द्यायचा प्रयत्न करणे वगैरे कोर्टाने नाकारले पण वरकरणी फुसक्या वाटणार्या आरोपांवरून त्यांना दोषी ठरविले होते.इंदिरा गांधींची निवडणुक रद्द करायच्या या प्रकाराला लंडनमधील 'द टाईम्स' या वर्तमानपत्राने Firing the Prime Minister for a traffic ticket असे म्ह्टले होते.
अनेकदा अशा वरकरणी लहान वाटणार्या गोष्टी सर्वात जास्त डोकेदुखी निर्माण करतात.
असे होऊ शकेल का? शक्यता कमी आहे हे मान्य.तरीही ती शक्यता शून्य आहे का?
अवांतरः अरविंद केजरीवालांना हे राजकारणाचे गेम समजून घेणे गरजेचे आहे असे दिसते. २०१२ मध्ये मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती उत्तर प्रदेशातील चरखारी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. १९९३ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने हरियाणाच्या दोन माजी मंत्र्यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेवर एखाद्या राज्यातून निवडून जाण्यासाठी सुध्दा त्या राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदवले असणे गरजेचे असते.या अटीतून कशी पळवाट काढली जाते ते अगदीच जगजाहीर आहे. मनमोहन सिंग आसामातून, अरूण जेटली गुजरातमधून, व्यंकय्या नायडू मध्य प्रदेशातून, गुलाम नबी आझाद महाराष्ट्रातून निवडून गेले. इतकेच नव्हे तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संरक्षणमंत्रीपदाची शपथ घेतली आणि लगेचच उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरला. म्हणजे या सगळ्या नेत्यांनी त्यांचे नाव त्या राज्यातील एखाद्या मतदारसंघात मॅनेज केले होते हे नक्कीच.ते अरविंद केजरीवालांनी केले नसेल आणि त्या कारणासाठी त्यांची उमेदवारी रद्द झाली तर मात्र ती एक दुर्दैवी गोष्ट असेल. हे माझ्यासारखा आआपचा कट्टर विरोधक लिहित आहे हे विशेष. कायदा ही गोष्ट बघू शकणार नाही.तरीही टू बी फेअर टू हिम, या कारणावरून त्यांची उमेदवारी रद्द होऊ नये असे वाटते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/03/2015 - 08:00
नवीन
इंदिरा गांधींनी सरकारी वाहने (जीप्स) प्रचाराकरीता वापरल्या हेही एक कारण त्यांची निवडणुक रद्द करण्यामागे होते.
- Log in or register to post comments
उ
उदयकुमार महाजनी
Mon, 02/02/2015 - 15:12
नवीन
पुन्हा त्रिशंकु होणार आणी हात चोळीत बसावे लागणार.निवडुन आलेले आमदार यांची जबाबदारी आहे चांगले सरकार देणेची पण पक्षीय पध्द्तीमुळे बोंबाबोंब आणि जनतेला भुर्दंड .
- Log in or register to post comments
व
विलासराव
Mon, 02/02/2015 - 19:15
नवीन
माझं मतः
आपला एकदा संधी मिळावी असंच आहे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Tue, 02/03/2015 - 11:14
नवीन
काहीही असो आपने भाजपच्या तोंडच पाणी पळवल आहे हे मात्र खर. ३-५ राज्याचे मुख्यमंत्री,केंद्रातले -राज्यातले मंत्री, आमदार, खासदार यांच्या जोडीला प्रधानसेवक , अमित शहा, किरण बेदी सगळे जोर लावत आहेत मात्र मफलरवाला यांना जोरात टक्कर देत आहे. केंद्रात सत्ता येवून अजून ८-९ महिने झाले नाहीतरी असे का होतेय याचा विचार भाजपेयीनी करावा. चमकदार भाषणे फार झाली आता लोकांची कामे करा म्हणाव.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Tue, 02/03/2015 - 12:17
नवीन
दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये बोगस कंपन्या स्थापन करून त्याद्वारे २ कोटी रूपये पक्षाला एका मिनिटात मिळाले हा प्रकार कालच जाहिर झाला. या कंपन्यांचे पेड-अप शेअर कॅपिटल एक लाख, टर्न-ओव्हर शून्य त्यामुळे अर्थातच नफाही शून्य तरीही देणगी दिली ५० लाख प्रत्येकी. यात काहीतरी गौडबंगाल नक्कीच दिसते.एकूणच काय की आआप जो सात्विकतेचा आव आणत आहे आणि धर्मराजाचा रथ जमिनीच्या चार बोटे जात असे त्याप्रमाणे आपल्याइतका शुध्द कोणीच नाही हा आव आआपवाले आणत आहेत ती परिस्थिती नक्कीच नाही-- निदान प्रश्न तरी नक्कीच उभा करायला वाव आहे हे स्पष्टच आहे.त्यातही आम्ही २० कोटींमध्ये २०१३ ची निवडणुक लढवली अशा गमजा आआपवाले मारत होते.दोन कोटी म्हणजे त्या तुलनेत १०% इतकी मोठी रक्कम झाली. काल न्यूज चॅनेलवर ज्या पध्दतीने या प्रकाराचे समर्थन चालू होते ते बघून खरोखरच आआप या सर्कशीविषयी आणखी तिटकारा उत्पन्न झाला आहे.
म्हणजे काय की सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत. पण या आआपवाल्यांमध्ये (कम्युनिस्ट वगळता) इतर कोणत्याही राजकीय पक्षात नसलेले दुर्गुण आहेत--ते म्हणजे रस्त्यावरचे राजकारण आणि धरणे हा प्रकार, कमालीचा अहंमन्यपणा, नाटकीपणा इत्यादी इत्यादी.
असो पण या स्वयंघोषित सद्गुणांच्या पुतळ्यांकडून उत्तरांची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.
(आआपचा कट्टर विरोधक आणि दिल्ली विधानसभेतील फेसबुक आणि मिपावरील भावी विरोधी पक्षनेता) क्लिंटन
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Tue, 02/03/2015 - 15:39
नवीन
माफ करा, इथे रिप्लाय करणार नाही म्हणालो होतो, पण राहवले नाही म्हणून शेवटी आलोच इथे 'उत्तर' द्यायला.
प्रश्न तर विचारणारच नाही, कारण उत्तर कुणाकडूनही मिळणार नाही याची जाणीव आहे मला.
आपल्याकडे दुर्दैवाने खरी माहिती जाणून घेणार्यांपेक्षा खोट्या प्रचाराला बळी पडणार्यांची संख्याच जास्त आहे.
हे एक कारण आहे परत येऊन तुम्हाला रिप्लाय करण्याचे.
- या कंपन्या रजिस्टर्ड आहेत.
- त्यांचे बॅंक अकाऊंट आहे.
- त्या टॅक्स भरतात.
या तीन गोष्टींची खातरजमा करूनच चेक घेतलेला आहे.
‘आप’ने या कंपन्यांचे बँक बॅलंस चेक करायला हवे होते किंवा त्यांचा टर्नओव्हर, प्रॉफिट इत्यादी तपासायला हवे होते म्हणणे निव्वळ हास्यास्पद आहे.
नावामध्ये ‘आम आदमी’ ठेवले म्हणून हे आपचे कार्यकर्ते ठरत नाहीत.
प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या व्यक्तीची फेसबुक प्रोफाईल Open To All आहे.
कृपया त्या प्रोफाईलवर जाऊन मागचे फक्त १०-१५ स्टेटस चेक करावेत, तो कोण आहे हे कळून जाईल. (बिचार्याने ते पोस्ट किंवा प्रोफाईल डिलिट करून टाकायला हवी होती, पकडल्या गेला नसता.)
काही दिवसांपूर्वी तो BJP जॉईन करण्याचे आवाहन करत होता सगळ्यांना.
त्याचे BJP च्या नेत्यांसोबत फोटोसुद्धा आहेत त्याच्याच प्रोफाईलवर.
आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये यांनी ५० लाखांचे दोन चेक दाखवले.
हे चेक तुम्हाला कुठून मिळाले असे जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले, तेव्हा या बिचार्यांची झालेली अवस्था बघण्यासारखी होती. (भाजपने थोडी अजून चांगली ट्रेनिंग द्यायला हवी होती यांना.)
गंमत म्हणजे स्वतः या AVAM चेच ४-५ महिन्यांपूर्वी एक स्टिंग ऑपरेशन झाले होते.
https://www.youtube.com/watch?v=-Q3Ck-KOCpM
हा व्हिडिओ बघून ठरवा तुम्हीच हे लोक कोण आहेत.
काल भाजपचे एक केंद्रीय मंत्री म्हणत होते की हे सरळ सरळ Money Laundering चे प्रकरण आहे.
या भाजपवाल्यांना सांगा हो कुणीतरी की आता तुम्ही विरोधी पक्षात नाही आहात, तुमचे सरकार आले आहे, तुमच्याकडे सगळे अधिकार आहेत, पॉवर आहेत.
Money Laundering हा काही साधासुधा अपराध नाहीये.
भाजपने चौकशी करून या सगळ्या आपवाल्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे.
आपने या सगळ्या विषयावर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले की ते आता सुप्रिम कोर्टात जाणार आहेत हा विषय घेऊन.
कॉंग्रेस, भाजप आणि स्वतः आपच्या फंडिंगसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर SIT तर्फे चौकशी व्हावी अशी आपची मागणी आहे.
लगेच अरूण जेटली कॅमेर्यापुढे येऊन बोलले, "अशा डर्टी पॉलिटिक्सपासून आपण कोर्टांना दूर ठेवायला हवे."
का हो ?
बुमरॅंग झाले का परत ?
तिघांचीही चौकशी व्हावी म्हणणे म्हणजे डर्टी पॉलिटिक्स का ?
कोर्टातली ट्रायल का नकोय तुम्हाला ? मिडिया तुमच्या हाताशी आहे म्हणून मिडिया ट्रायलच करणार का ?
तुम्ही अर्थमंत्री आहात हो देशाचे, मनोरंजन मंत्री नाही !
भक्त असोत किंवा अंध विरोधक, किमान एका गोष्टीचे तरी 'आप'ला क्रेडिट द्या की त्यांच्यामुळे आज आपण राजकीय पक्षांच्या फंडिंगबद्दल चर्चा करतोय.
आप हा एकमेव पक्ष आहे जो आलेल्या प्रत्येक देणगीचा हिशेब देतो. मग देणगी १ रूपयांची का असेना.
या सगळ्या प्रकरणावर फेसबुकवर आलेले एक वाक्य आठवले.
भाजपाका आम आदमी पार्टी को चंदे को लेकर सवाल पुछना ठिक वैसे ही है जैसे सनी लियॉन किसी और को कह रही हो, "बहन जी आपका दुपट्टा सरक रहा है ।"
^^ या वाक्यावरून मला स्त्रीविरोधी वगैरे ठरवून सगळ्यांनी खुशाल मोकळे व्हावे, पण मुद्द्यावर बोलू नये.
आयुष्यभर जी गोष्ट केली नाही, ती आज कशाला करायची ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/03/2015 - 18:51
नवीन
जरा सत्य जाणून घेऊया.
इन्फोलॅन्स सॉफ्टवेअर, गोल्डमाईन बिल्डकॉन, सनव्हिजन एजन्सीज आणि स्कायलाईन मेटल्स व अॅलॉइज या ४ कंपन्यांनी प्रत्येकी ५० लाख असे २ कोटी रूपये आआपला देणगीदाखल दिले. हेमप्रकाश शर्मा, धर्मेंद्र कुमार व मुकेश कुमार हे तिघेजण या चारही कंपन्यांचे संचालक आहेत.
(१) इन्फोलॅन्स सॉफ्टवेअर - गांधीनगर भागात अत्यंत अरूंद गल्लीत या कंपनीचा पत्ता नोंदलेला आहे. या पत्त्यावर एक शिवणाचे दुकान आहे. झारखंडहून आलेले काही शिंपी हे दुकान चालवितात. त्या शिंप्यांना इन्फोलॅन्स सॉफ्टवेअर या कंपनीबद्दल काहीच माहिती नाही.
या कंपनीच्या अधिकृत कागदपत्रांनुसार यांच्याकडे रू. ५० कोटी कॅश रिझर्व्हज् आहेत, कंपनीचे ऑपरेशनल एक्सपेन्सेस रू. २२,०७७ असून ३१/३/२०१३ ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न शून्य होते.
(२) गोल्डमाईन बिल्डकॉन - या कंपनीने दिलेल्या पत्त्यावर गोकुळपुरीतील एका खोलीतले दुकान असून ते बंद आहे. शेजार्यांच्या सांगण्यानुसार मित्तल साहेब नावाच्या कोणाचे तरी हे दुकान असून तो दोन महिन्यांपासून बाहेर आहे. तिथल्या कोणीलाही गोल्डमाईन बिल्डकॉन नावाची कंपनीची माहिती नाही. या दुकानावर पांढर्या रंगात "अंडी मिळतील" अशी पाटी लिहिलेली आहे.
या कंपनीच्या आर्थिक रेकॉर्डनुसार ३१/३/२०१३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीचे शेअर्स रू. ५०० प्रतिशेअर या दराने विकले असून रू. ६१,२३७ इतका नफा झालेला आहे. शेअर्स प्रिमियम घेऊन विकल्याने कंपनीला रू. ४.५० कोटींचा फायदा झाल्याचेही दाखविण्यात आले आहे.
(३) सनव्हिजन एजन्सीज - करवाल नगर मधील मुकुंद विहार हा या कंपनीचा पत्ता आहे. या भागात अनेक अनधिकृत निवासस्थाने आहेत. दिलेल्या पत्त्यावर तळमजल्यावर एक पोस्ट ऑफिस असून त्यावर ४ मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या मालमत्तेचे मालक कंवर सिंग व बिरपाल सिंग आहेत अशी बाहेर पाटी आहे. या पत्त्यावर सनव्हिजन एजन्सीज नावाची कोणतीही कंपनी नाही असे बिरपाल सिंगच्या धाकट्या भावाचे म्हणणे आहे.
अधिकृत रेकॉर्डनुसार या कंपनीने शेअर्स विकून रू. ९४.९५ लाख मिळविले होते. या कंपनीचे ऑपरेटिंग एक्स्पेन्सेस फक्त रू. १०,००० दाखविलेले आहेत.
(४) स्कायलाईन मेटल्स अॅण्ड अॅलॉइज - अधिकृत माहितीनुसार या कंपनीने आपले शेअर्स काही अज्ञात गुंतवणुकदारांना रू. १.५७ कोटी ला विकले होते. याही कंपनीचे ऑपरेटिंग एक्स्पेन्सेस फक्त रू. १०,००० दाखविलेले आहेत.
ज्या कंपन्यांनी प्रत्येकी रू. ५० लाख इतकी घसघशीत देणगी दिलेली आहे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर शिवणाचे दुकान, बंद पडलेले एका खोलीत चालणारे किराणा कम बेकरी दुकान, पोस्ट ऑफिस इ. इतरच गोष्टी आहेत. एकंदरीत सर्वच कंपन्या बनावट दिसताहेत. चारही कंपन्यांचे संचालक एकच आहेत हाही योगायोग नसावा. यांच्याकडून मिळालेल्या देणग्यांमध्ये नक्कीच गडबड दिसते.
>>> आपल्याकडे दुर्दैवाने खरी माहिती जाणून घेणार्यांपेक्षा खोट्या प्रचाराला बळी पडणार्यांची संख्याच जास्त आहे.
एकंदरीत तुम्हीच आआपच्या खोट्या प्रचाराल बळी पडलात असं दिसतंय.
>>> या सगळ्या प्रकरणावर फेसबुकवर आलेले एक वाक्य आठवले.
भाजपाका आम आदमी पार्टी को चंदे को लेकर सवाल पुछना ठिक वैसे ही है जैसे सनी लियॉन किसी और को कह रही हो, "बहन जी आपका दुपट्टा सरक रहा है ।"
वरील वाक्यात भाजपच्या जागी आआप व आम आदमी पार्टीच्या जागी भाजप हे शब्द टाकून वाक्य परत वाचा. तोच अर्थ लागेल.
>>> या वाक्यावरून मला स्त्रीविरोधी वगैरे ठरवून सगळ्यांनी खुशाल मोकळे व्हावे, पण मुद्द्यावर बोलू नये.
भाजपने आआपला रोज ५ प्रश्न विचारत आहे. त्यातल्या एकालाही आजतगायत उत्तर न देता "अण्णांच्या फोटोला हार घालून त्यांचा अपमान केला", "माझ्या अग्रवाल जातीच्या गोत्राचा अपमान केला" असा कांगावा केजरीवाल करत आहेत. ते कधी मुद्द्यावर बोलणार?
आणि कालपासून तर त्यांनी भाजपने मतदान यंत्रात फेरफार केले आहेत असा टाहो फोडायला सुरूवात केली आहे. काय बोलणार आता?
असो.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 02/04/2015 - 12:13
नवीन
गुर्जी, खरं सांगु का? एवढं ढळढळीत सत्य आजकाल दुर्लभ आहे हो. तुमच्याकडे (अथवा तुम्ही समर्थन करत असलेल्या पक्षाकडे) इतके अगदी ताकावरच्या लोण्यासारखे सत्य पाहून आमच्यासारख्या सामान्यजनांचे (ज्यांना आपची कायपण पडलेली नाय) डोळे दिपले आहेत.
आपचे हे देणगीदार एकतर अतिमूर्ख असावेत किंवा हा बनाव असावा असे वाटण्याइतपत हे सगळे straightforward आहे.
तरीही जर हे खरेच असेल आणि ज्या कुणी हे संशोधन इतक्या तत्परतेने तडीस नेले असेल त्यांना एका चौकशी समितीवर नेमावे आणि याच पद्धतीने देशातील सर्वच गैरव्यवहार (जे काय कोळश्यापासून २जी पासून आणि टोलपासून काळ्या पैशापर्यंत) आहेत त्यांचीपण लगे हात वासलात लावून टाकावी. म्हंजे हाकानाका.
आपल्या सरकारला ही येक विंनंतीये बघा.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/04/2015 - 14:46
नवीन
झोपलेल्याला जागे करता येते पण सोंग घेणार्याला नाही !
म्हणून जे सामान्यांना दिसते ते भक्तांना दिसत नाही !
कितीबी आपटा ! कायसुदिक फर्क नाय बगा ..
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 02/04/2015 - 06:10
नवीन
आता कशी मिरची झोंबली?इतके दिवस कसे होते की हे आरोप करणार आणि पुरावा वगैरे द्यायच्या भानगडीत न पडता पळून जाणार आणि सगळ्या जगाने यांचे म्हणणे ब्रम्हवाक्य समजून उचलून धरावे अशा स्वरूपाची देहबोली आणि यांचेच कडू औषध यांनाच कोणी पाजले तर मात्र तो माणूस भाजपच्या पेरोलवरचा, अडाणी-अंबानी यांचा एजंट वगैरे वगैरे. बरं हे आरोप नक्की कोणी केले आहेत? पूर्वी आआपमध्ये असलेल्यांनीच. आणि या लोकांना आआपमध्ये प्रवेश दिला गेला होता म्हणजे त्यांच्याकडे KCHP (Kejriwal Certified Honest Person) हे अत्यंत कव्हेटेस असे सर्टिफिकेशन होतेच.मग काही महिन्यातच ते लोक भाजपच्या पेरोलवर जातील, अडाणी-अंबांनींचे एजंट होतील असे म्हणणे म्हणजे अत्यंत अहंमन्यपणाचेच द्योतक आहे. तीच गोष्ट विनोदकुमार बिन्नी, शाझिया इल्मी यांची. यांना तुम्ही उमेदवारी दिली होती. बिन्नी निवडून आले तर इल्मी विधानसभेत आर.के.पुरम मधून तर लोकसभेत गाझियाबादमधून पराभूत झाल्या.तुम्ही जर प्रश्न विचारू शकता की शाझियाकाकूंचे पूर्वीचे ट्विट बघा आणि त्यांनाच भाजपमध्ये प्रवेश कसा दिला तर तुम्हाला उलटा प्रश्न विचारला जाणारच-- पूर्वी ज्या शाझियाकाकूंकडे KCHP सर्टिफिकेशन होते त्याच रातोरात अंबानी एजंट कशा काय झाल्या? शाझिया इल्मींना तुम्ही (पक्ष) अंबानी-अडाणी एजंट म्हणत आहात की नाही याची कल्पना नाही पण एकंदरीतच आआपला विरोध करणारा प्रत्येक माणूस एकतर भाजपच्या पेरोलवर असतो नाहीतर अडाणी-अंबानींचा एजंट असतो असे तुमच्याच आशिष खैतान आणि आशुतोष यांच्या न्यूजचॅनेलवरील चर्चांवरून समजते.
हे आरोप आआपवर झाले आहेत तेच प्रकार सगळ्या पक्षांनी कधीनाकधी केले आहेत त्यामुळे त्या एका कारणासाठी आआपला सुळीवर चढवायला पाहिजे असे अजिबात नाही. पण आआपचे ट्रान्झिशन बघणे मनोरंजक ठरेल. म्हणजे सुरवातीला आम्हीच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) तेवढे स्वच्छ बाकीचे भ्रष्ट, मग आम्ही इतरांपेक्षा अधिक स्वच्छ आणि आता इतरपण अस्वच्छ आहेतच की असे म्हणणे. फक्त हाच दोन कोटींचा प्रकार इतर कोणत्याही पक्षाच्या बाबतीत झाला असता तर यांनी किती तमाशा केला असता याची कल्पनाही करवत नाही. अमित शहांना घेराव घाला, मोदींच्या घरापुढे धरणे धरा इत्यादी प्रकार यांनी केलेच असते.पण आता त्यांचाच पक्ष आहे ना त्यात. मग काय स्वयंघोषित प्रामाणिक पक्षाला कोण काय विचारणार?
हिंमत असेल तर मला अटक करा हे म्हणणे एक इलेक्शन जिमिक म्हणून ठिक आहे. मतदान होईपर्यंत जे काही ३-४ दिवस आहेत त्यात तपास पूर्ण होऊन कुणालाही अटक होणे अगदीच अशक्य आहे.हर्षद मेहताचे प्रकरण उघडकीस आले होते २३ एप्रिल १९९२ रोजी आणि प्रत्यक्षात त्याला अटक झाली जून १९९२ च्या पहिल्या आठवड्यात यावरून या गोष्टी किती स्पीडने होतात याची कल्पना यावी.अरूण जेटलींना वाटले म्हणून ते केजरीवालांना अटक करूच शकत नाहीत. सोमनाथ भारती तोंडी आदेशावरून कुणालाही अटक करायचे फर्मान सोडू शकतात.पण हे अरूण जेटली आहेत.देशाचे कायदेकानू,नियम त्यांना लागू आहेत. तेव्हा हिंमत असेल तर अटक करून दाखवा हे म्हणणे केजरीवालांनी निवडणुकीच्या तोंडावर आलेली परिस्थिती नक्कीच एका राजकारण्यासारखी हाताळली याचेच लक्षण आहे. असो.
(अडाणी-अंबानींचा एजंट आणि भाजपच्या पेरोलवर असलेला) क्लिंटन
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 02/04/2015 - 06:53
नवीन
परत परत तेच तेच चालू आहे. नांदेडीअन यांची माहिती तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. ते म्हणतात तसे, आपवर नुसते आरोप चाललेत. जर ते खरंच इतका काळा कोळसा आहेत, तर का उगाळताय पुन्हा पुन्हा?
आपला एक संधी मिळणार आहे. एक दोन चुकांनी कुणीही आपला राइट ऑफ करू शकत नाही .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/04/2015 - 09:27
नवीन
आआपला बहुमत मिळणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. बहुमत मिळाले नाही तरी निदान आआप सर्वाधिक मोठा पक्ष असेल हे आता स्पष्ट आहे. जवळपास सर्वच मतचाचण्यांचे असेच अंदाज आहेत.
विजयाची इतकी खात्री असताना स्वतःच्या जातीचे कार्ड खेळणे, मतदानयंत्रावर अविश्वास दाखविणे अशा टिपीकल काँग्रेसी स्ट्रॅटेज्या केजरीवाल का खेळत आहेत? अखिल ब्रह्मांडात आपण एकमेव स्वच्छ, प्रामाणिक व पारदर्शी आहोत आणि जे आआप मध्ये नाहीत ते सर्वजण कमालीचे भ्रष्टाचारी, अप्रामाणिक व अपारदर्शी आहेत असा दावा करणार्या आआपला डमी कंपन्यांकडून का देणग्या घ्यावा लागल्या? ह्या देणग्या म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचा राजमार्ग तर नव्हे?
एकंदरीत आआप हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष नसून भारतातील इतर कोणत्याही राजकीय पक्षासारखाच अजून एक पक्ष आहे. आआपची व केजरीवालांची वाटचाल १९८७-९० या काळातल्या जनता दल व वि.प्र.सिंगांच्या मार्गानेच सुरू आहे असे दिसतेय.
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 02/04/2015 - 09:57
नवीन
रोचक चर्चेत आतापावेतो वाचनमात्र होतो. पण आता अगदीच रहावले नाही -
खरय.
पण, आम्ही इतरांपेक्षा वेगळे, असे म्हणणारे कुणी दुसरेच होते. नै का? ;)
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Wed, 02/04/2015 - 11:10
नवीन
एकेकाळी 'पार्टी विथ डीफरन्स'चा ढोल पिटायचे..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/04/2015 - 18:11
नवीन
जसे आता आआपवाले स्वच्छ चारित्र्याचे, प्रामाणिकपणाचे व पारदर्शीपणाचे ढोल पिटताहेत तसेच ना!
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Wed, 02/04/2015 - 08:55
नवीन
प्रधान सेवकांची दिल्ली प्रचारसभेतील भाषणे टीवीवर पाहिली. अजूनही ते लोकसभा २०१४ च्या मोडमध्ये आहेत. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती असूनही प्रचारात तेच बाष्कळ टोमणे, नाटकीय हावभाव, वल्गना .केजरीच्या दिल्ली-दुबई विमान प्रवासाचे हे दाखले देत आहेत हा एक विनोद. यांच्या परवाच्या एका सूटच्या किमतीत असल्या किती प्रवास फेर्या होतील ते यांना विचारा . बस करा म्हणाव. तेव्हा ठीक वाटत होत आता तुम्ही सत्तेत आला आहत पंतप्रधान आहात तरी भाषणे आणि मुद्दे एखाद्या दुसर्या फळीतील नेत्यांसारखीच आहेत. तुम्ही आधी दिलेली वारेमाप आश्वासने किती पाळली ते दिसलय ८ महिन्यात. कॉंग्रेस आणि विरोधक मोदींना टार्गेट करून मोठे बनवत होते तोच प्रकार आता भाजप केजरीवाल यांच्या विरुद्ध करत आहे. भाजप , कॉंग्रेस का नाही स्वताच्या देणगी आणि देणगीदारांची माहिती खुली करत?दिल्ली महापालिका किती वर्षे भाजपच्या ताब्यात आहे त्यांनी केलेला कारभार लोक पाहत आहेतच. कितीही टीका करा, खिल्ली उडवा मफलरवाल्याने यांना घाम फोडला आहे हे खरेच आहे. सामान्य लोकांची सहानुभूती आपकडेच वळत आहे.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 02/04/2015 - 14:53
नवीन
आमच्या उत्तम नगर भागात गेल्या तीन निवडणूकीत निवडून आलेले कांग्रेसचे दबंग नेते मुकेश शर्मा (गेल्या निवडणूकीत पराजित झाले होते- भा ज प चे प्रवेश वर्मा जिंकले होते) , संपूर्ण भागात त्यांचे एक ही पोस्टर दिसत नाही आहे. तसेच जनकपुरीत ही कांग्रेसच्या उम्मेदावरचा प्रचार कमीच दिसत आहे. एक शंका बहुत लोकांच्या मनात येत आहे, कुठे कॉंग्रेस आपला 'walk over' तर देत नाही आहे ना.... दुसर्या आम्ही हरलो तरी चालेल भा ज प जिंकली नाही पाहिजे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/04/2015 - 18:15
नवीन
बादवे, या निवडणुकीत केजरीवाल निदान अजूनतरी स्वतःलाच आआपच्या कार्यकर्त्यांकडून थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून शाई उडवून घ्यायचे स्वयंआयोजित व स्वयंव्यस्थापित कार्यक्रम का आयोजित करीत नाहीत याचे कारण कळेल का? मागील निवडणुकीत त्यांनी असे बरेच कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले होते. पण यावेळी अजून एकही नाही याचं आश्चर्य वाटतंय.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 02/04/2015 - 18:22
नवीन
अडवाणींनाही एके काळी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रात फ्रॉड होतो असे वाटत होते. आता ते आप आणि काँग्रेसला वाटते. दिवस भले-बुरे येत जात राहतात. एवढा काय विचार करता. दिल्लीत कुठलंही सरकार आलं तरी पुण्यामुंबईला काय फरक पडणार आहे का?
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
गुरुवार, 02/05/2015 - 05:59
नवीन
दिल्लीच्या लोकल केबल ऑपरेटर्सनी NDTV ब्लॉक केले आहे म्हणे.
NDTV ने मोदींच्या रॅलीमध्ये ‘गर्दी’वर कॅमेरा फिरवायला नको होता. :(
रविश कुमारने किरण बेदींचा इंटरव्ह्यू घ्यायला नको होता. :(
NDTV च्या पत्रकाराने AVAM ला प्रेस कॉन्फरन्समध्ये अवघड प्रश्न विचारायला नको होते. :(
- Log in or register to post comments
भ
भुमन्यु
गुरुवार, 02/05/2015 - 06:32
नवीन
आप वाले म्हणतील, रवीश कुमार ने केजरिवालला पण प्रश्न विचारायला नको होते काल, ढोंगी पणाचा कळस होते कालचे प्रश्नोत्तरे.. (असो लोकसभेच्या निवडणुकिच्या वेळेसचे आज-तक बरोबरचा ईंटरव्ह्यु लोक विसरलेत का?)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/05/2015 - 09:52
नवीन
>>> दिल्लीच्या लोकल केबल ऑपरेटर्सनी NDTV ब्लॉक केले आहे म्हणे.
असं कोण म्हणे? असं केजरीवाल म्हणे का? पण मतदान यंत्रात भाजपने गडबड केली आहे असेही केजरीवाल म्हणे. भाजपने माझ्या अग्रवाल जातिच्या गोत्राचा अपमान केला असेही केजरीवाल म्हणे. मागील वर्षी भाजप कार्यकर्ते माझ्या थोबाडीत मारत आहेत आणि माझ्या अंगावर शाई उडवत आहेत असेही केजरीवाल म्हणे.
>>> NDTV ने मोदींच्या रॅलीमध्ये ‘गर्दी’वर कॅमेरा फिरवायला नको होता.
मी पाहिलेल्या सर्व १३-१४ वाहिन्यांनी मोदींच्या रॅलीमधील 'गर्दी'वर कॅमरा फिरविला होता. मग फक्त एनडीटीव्ही वरच राग का? इतर वाहिन्याही ब्लॉक व्हायला पाहिजेत ना. बादवे, मोदींच्या १ तारखेपासूनच्या सर्व सभा 'फेल' गेल्या म्हणे!
>>> रविश कुमारने किरण बेदींचा इंटरव्ह्यू घ्यायला नको होता.
किरण बेदींचे इतर अनेक वाहिन्यांनी इंटरव्ह्यू घेतले आहेत. मग फक्त एनडीटीव्ही वरच राग का? इतर वाहिन्याही ब्लॉक व्हायला पाहिजेत ना.
>>> NDTV च्या पत्रकाराने AVAM ला प्रेस कॉन्फरन्समध्ये अवघड प्रश्न विचारायला नको होते.
अवाम ला सर्वच वाहिन्यांचे पत्रकार 'अवघड' प्रश्न विचारत होते. मग फक्त एनडीटीव्ही वरच राग का? इतर वाहिन्याही ब्लॉक व्हायला पाहिजेत ना.
असो. आआपची रूमर फॅक्टरी जोरात दिसतेय.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
गुरुवार, 02/05/2015 - 10:15
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/05/2015 - 10:23
नवीन
माझ्या घरीसुद्धा काहीवेळा अचानक काही वाहिन्या काही काळ दिसेनाश्या होतात व नंतर काही काळाने परत दिसायला लागतात.
संपूर्ण दिल्लीतून या २ वाहिन्या दिसेनाश्या झाल्या का फक्त काही भागांमध्येच, यामागे काही तांत्रिक समस्या होती का राजकीय कारण, हे कोठे स्पष्ट झालंय का? जर गर्दीवरच कॅमरा फिरविण्याचा मुद्दा असेल किंवा किरण बेदींची मुलाखत हा मुद्दा असेल तर जवळपास सर्वच वाहिन्या ब्लॉक व्हायला हव्या होत्या. नाही का?
बादवे, एनडीटीव्ही ने या निवडणुकीत सर्वेक्षण केलेले नाही. इतर अनेक वाहिन्यांनी ते केले आहे. त्यातल्या ज्या वाहिन्यांनी आआपला झुकते माप दिले आहे त्या सर्वच ब्लॉक व्हायला पाहिजेत ना?
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
गुरुवार, 02/05/2015 - 10:29
नवीन
इतक्या लवकर बॅकफुटवर येत जाऊ नका हो.
थोडा वेळ घेत चला.
फारच प्रेडिक्टेबल होताहेत ब्वा तुमचे प्रतिसाद.
असो, हॅव अ ग्रेट डे अहेड !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/05/2015 - 10:38
नवीन
तुम्ही काहीही समजूत करून घ्यायला मोकळे आहात. आपण फ्रंटफूटवर आहोत व इतर बॅकफूटवर आहेत ही तुमची समजूत मला खूप आवडली. अगदी टिपीकल 'आआप'वाली समजूत आहे ही.
मतदान यंत्रात गडबड, गोत्राचा अपमान यापाठोपाठ आआपच्या रूमर मिलमधून आता नवीन पुडी सोडण्यात आलीये. भाजप मतदारांना पैसे, दारू आणि मांसाहारी जेवण वाटतोय आणि गरीब मतदारांची, निवडणुक आयोगाने दिलेली ओळखपत्रे काढून घेतोय म्हणे. (इति आशुतोष) आआपने जोरदार फ्रंटफूट ड्राईव्ह मारलाय आणि भाजपला बॅकफूटवर ढकललंय.
By: Press Trust of India | New Delhi | Posted: February 5, 2015 12:05 pm | Updated: February 5, 2015 12:13 pm
The AAP-BJP bitter spat on Thursday saw the Aam Aadmi Party accusing the saffron party of trying to “buy votes” ahead of February 7 Assembly polls by distributing money and free liquor.
“We have information that BJP is distributing money, liquor and non-vegetarian food to the public and they are also seizing voter identity cards of poor,” AAP leader Ashutosh alleged.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 02/05/2015 - 12:01
नवीन
मोदींनी पण "मुझे नीच जातीका कहा" जातीचे कार्ड खेळले होते ते आठवते आहे का गुर्जी ?
http://navbharattimes.indiatimes.com/lok-sabha-2014/narendra-modi-targets-priyanka-gandhi-on-twitter/articleshow/34721043.cms
हवा तर हि लिंक बघा !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/05/2015 - 17:21
नवीन
ते बरोबर आहे हो. पण ही तुलना करून तुम्ही केजरीवालांना मोदींच्या पातळीला आणून ठेवलंत. केजरीवाल म्हणजे अखिल ब्रह्मांडातले एकमेव स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शी, जातीयवादापासून पूर्ण दूर असलेले, फक्त विकास आणि जनतेच्या समस्यांसाठीच झगडणारे अशा असंख्य गुणांचा सागर असलेले अवतारी महापुरूष. त्यांना इतकं खाली आणायचं!
काही दिवसांपूर्वी केजरीवालांची एक मुलाखत पहात होतो. त्यात ते म्हणत होते की "वो गालीगलोच की राजनीती करते है और हम विकास और मुद्दोंकी राजनीती करते है|". स्वतःच्या जातीच्या गोत्राचे कार्ड खेळणे हीच केजरीवालांची "विकास और मुद्दोंकी राजनीती" असावी बहुतेक.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 02/05/2015 - 19:42
नवीन
दोघे या बाबतीत सारखेच !
मोदींनी तो विषय भरकटवून स्वतच्या जातीचा फायदा करून घ्यायची खेळी केली होती आणि आता केजरीवालपण तशीच खेळी करत आहे . जी चुकीची आहे .
पण मोदींचा चुकला होताचहे मान्य करा ना !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/06/2015 - 08:16
नवीन
त्यावेळी मोदी चुकले होते हे मान्य आहे.
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 02/05/2015 - 07:10
नवीन
अरविंद केजरीवाल हे अत्यंत प्रामाणिक नेते आहेत असे गृहीत धरून माझे मत मांडतो .
१. मागच्या वेळी नेत्रदीपक यश संपादन करून सुद्धा ते इतर पक्ष्यांच्या जाळात अलगद फसले असं वाटतं .
२. आंदोलन करणे आणी सरकार चालवणे ह्यात जमीन आसमानचा फरक आहे हे त्यांनी ओळखावे .
३. जनतेला प्रत्येक गोष्ट फुकट किंवा अतिशय कमी दरात देणे म्हणजे काही शहाणपणाचे काम नव्हे .
४. दीड लाख CCTV लावल्याने महिला सुरक्षित होतील असं वाटत नाही. त्यासाठीचा अंदाजे १००० कोटींचा खर्च कसा करणार ?
५. दिल्ली सरकारला केंद्र सरकार सोबत समन्वय साधूनच काम करावे लागते. उठसुट केंद्र सरकारवर टीका करणे योग्य नाही . अशाने AAP चं सरकार येउन सुद्धा काहीही फायदा होणार नाही . कधी नव्हे ते केंद्रात स्थिर सरकार आले आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा.
६. आम्ही सोडून जगात सगळेच भ्रष्टाचारी हा विचार अपरिपक्वपणाचे लक्षण आहे.
७. मी प्रामाणिक या सबबीखाली मनमानी कारभार करणे योग्य नाही. अशाने स्वपक्षीय नेते विरोधात जातील.
८. विकास ही एक निरंतर सुरु राहणारी प्रक्रिया आहे. तडकाफडकी निर्णय घेण्याआधी सर्व बाजूनी विचार करावा.
९. आपला पक्ष नवीन आहे. पक्ष बांधणी सुरु करावी.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 02/05/2015 - 07:34
नवीन
सहमत आहे.
खरंतर आआपने आपले नेतृत्त्व योगेंद्र यादव सारख्या संतुलीत व्यक्तीकडे दिल्यास पक्षाचे भले व्हावे. केजरीवाल यांच्यासारखे आक्रस्तळे नेतृत्त्व पक्षाला एकवेळ अल्पकाळ फायदा करून देईलही दूरगामी विचार केल्यास अहिताचे आहे.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
गुरुवार, 02/05/2015 - 07:57
नवीन
हा नऊ कलमी प्रतिसाद (विशेषतः २,३,६ आणि ७) तर अगदीच बिनतोड आहे. यापुढे आआपवर कोणतीही चर्चा असेल तर या एका प्रतिसादाची लिंक दिली की झाले :) एकूणच प्रतिसाद प्रचंड आवडला गेला आहे.
त्यातही आणखी दहावा मुद्दा (किंवा सहाव्या मुद्द्यात भर): आम्हाला प्रश्न विचारणारे अडाणी किंवा अंबानींचे एजंट किंवा भाजपच्या पेरोलवर असतात असे म्हणणे अतिशय अपरिपक्वपणाचे आहे.
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 02/05/2015 - 08:16
नवीन
१०. निवडणुकीतली हार-जीत खुल्या मनाने स्वीकारावी.
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 02/05/2015 - 08:18
नवीन
http://www.misalpav.com/node/27867
एक जुना लेख (लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रकाशित केलेला )
- Log in or register to post comments
भ
भुमन्यु
गुरुवार, 02/05/2015 - 08:59
नवीन
पर्फेक्ट प्रतिसाद.... १०१% सहमत
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 02/05/2015 - 12:03
नवीन
राज ठाकरेंना पण हा दुवा पाठवून देतो ;)
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/05/2015 - 10:07
नवीन
सर्व रिप्लाय वाचले... नांदेडिअन यांचे रिप्लाय एकदम बरोबर वाटतात.
सामान्य माणुस राजकारणात आला की त्याला कसेही करुन आपली ताकद/अनुभव वापरुन बाजुला कसे सारता येवु शकते हे भाजप करतो आहे, परंतु तसे होणार नाही.
पोल वर माझा विश्वास नाही.. भले आप निवडुन येवु किंवा भाजप कामे जनतेची होतील कारण दोघांपैकी कोणीही विरोधक झाले तरी ते रस्त्यावरच उतरणार आहेत. भाजप सुद्दा.
केजरीवाल अतिशय योग्य आणि लायक माणुस आहे दिल्लीचा मुख्यमंत्री होण्यास, जरी तो अनुभव्हिन असला तरी इतर भ्रष्ट नेत्यांपेक्षा तो बरा.
भले सगळे भ्रष्ट नाहित असे म्हणता येते.. पण ते ज्या पार्टीचे काम करतात त्यातील सहयोगी जर भ्रष्ट असतील तर तुम्हीही त्यांचेच साथीदार.
अरविंद केजरीवाल ला बरीचशी महाराष्ट्रीय जनता नावे ठेवते, पण दिल्लीतील सर्वेत जेंव्हा अरविंद केजरीवाल ला जास्त पसंदि मिळते तरी ती बुद्धु जनता आपणच काय ते बरोबर असे नसु नये असे माझे मत. मान्य कोणत्या तरी एका बाजुला आपले झुकते माप असते म्हणुन इतर बाजुचा कसला ही विचार न करता जायचे.
मागचेच काढायचे झाल्यास, महाराष्ट्रात रिलायन्स वाढायला आणि बिएसएनएल कमी व्हायला कोण कसे आणि किती रुपयानी जबाब्दार आहेत हे माहीती आहेच.
मला तरी एका आंदोलन कर्त्या साफ व्यक्तीमत्वाच्या व्यक्तीचे राजकारण आवडेल.. कारण ह्या बाकीच्यांचा विट आलेला आहे.
केजरीवाल ला भगोडा म्हणणारे म्हणुन द्यात हो.. त्यात काही होत नसते. त्याच्याकडे कॉन्ग्रेस चे १८ मुद्यावर पाठिंबा होता आणि त्यातील एका मुद्द्यावर कॉन्ग्रेस खरी उभी नाही राहिली म्हणुन त्याने राजिनाम दिला होता हे मला योग्य वाटते. काय चुक आहे ?
तुम्ही म्हण्ताल पाठिंबा का घेतला ?
घेतला नव्हता तेंव्हा हेच भाजप वाले आणि कॉन्ग्रेस वाले आमव्चा अनकंडिशन्ल पाठिंबा आहे आप ला, त्यांना राज्य चालवयचेच नाहीये म्हणुन ते कोणाचा पाठिंबा घेत नाहित असे म्हणत होती..
मग काय करायला पाहिजे होते आप ने तेंन्व्हा असे म्हंटल्यावर ?
दुसरी गोष्ट नकारात्मक जाहिराती महाराष्ट्रात चालल्या तेच दिल्लीत चालल्या नाही तेथेच भाजप पुन्हा पिछाडीवर आला.
त्याचा फायदा आप ने का घेवु नये, तुम्ही पैसे देवुन वयक्तीक लेवल वर जाहिराती करता मग फुकटात त्यांनी त्याचा विपर्यास का करु नये.
जश्यास तसे उत्तर दिलेच पाहिजेत.. उद्यागधंद्यावाल्याना फक्त प्रोत्साहन आणि त्यांचीच पाठराखन करुन कसे चालेल बाकी कोणी आहे की नाही ?
काही वेळेस आप पण थोडे जास्त करत आहे तेंव्हा त्यांनी ही थोडेसे सबुरीने घ्यावे नाहितर राईचा पर्वत बनवला जातो हे आता पर्यंत त्यांच्या लक्षात आले असेनच.
भाजप आणि त्यांचे भक्त आताच हरल्यासारखे का बोलतात.. कदाचीत भाजप बहुमत हाशील ही करु शकेन ..
आणि असे झाले तर जे लोक केजरीवाल ला तमाशा करतो म्हण्त होते त्यांना किरण बेदींचा ही तमाशाच पाहिला मिळेल असे वाटते.
किरण बेदींच्या मुलाखती तर खरेच नकोश्या वाटतात..
आप सत्तेत आली तरी हे विरोधक आता बघतोच तुमच्याकडे कसे काम करतायेत ते अश्या अर्थाने मागे लागेल असे वाटते, आनि हे चुकीचे वाटते.
असो..
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
गुरुवार, 02/05/2015 - 10:36
नवीन
भाजपच्या या नवीन प्रवक्त्यावर खूप दया येत होती काल. :(
https://www.youtube.com/watch?v=vcuDb875RFI
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 02/05/2015 - 12:59
नवीन
या डिबेटमध्ये एक गोष्ट पाहिली की, एक व्यक्ती पत्रकार परिषद घेते, आणि काही दावा करते, मग म्हणते हिंमत असेल तर मला कोर्टाची नोटिस द्या नाहीतर तोपर्यंत मी पत्रकार परिषदा घेणार आणि आरोप करणार आहे.
उ.दा.
१. माझे लग्न चार दिवसावर आले आहे. एकजण म्हणतो की तू गुन्हा (गंभीर असा) केला आहेस आणि त्यासाठी मी तुझी बदनामी करणार (त्यामुळे माझे लग्न मोडू शकते), जर तुला असे म्हणायचे आहे की तू गुन्हा केलेला नाहीस तर तू माझ्याविरुध्द कोर्टात जा आणि मला तुरुंगात टाक.
२. आता मी माझे हातातील काम सोडून कोर्टात जायचे आणि वकिलास खर्च करायचा आणि त्यास नोटिस पाठवायची.
३. मग जेव्हा तारिख येईल तेव्हा सिद्ध करायचे की हे सर्व दावे फोल आहेत आणि त्याने माझी बदनामी केली आहे, त्यानंतर त्याल कोर्टाने जी काही सजा मिळेल ती मिळेल (त्या व्यक्तीस माहित आहे की फार फार तर त्याला तुरुंगवास आणि दंड होईल).
४. आता हे काही चार दिवसात होणार नाही (हे अर्थातच त्या व्यक्तीला मव्यक्तीला, मग लग्न मोडले आणि या प्रसंगामुळे माझी सध्यातरी बदनामी होतेय आणि जोवर कोर्टाचा निकाल येत नाही तोवर माझे लग्न अडकतेय तर एकप्रकारे त्या व्यक्तीचा हेतू माझा गुन्हा सिद्ध करण्याचा नाही हे दिसत नाही काय ?
५. भले मी गुन्हा केला असेल अथवा नसेल पण या घडीला त्या व्यक्तीने पुरावे न देता जर फक्त आरोप केले असतील आणि मी माझ्या निरपराधपणाचे पुरावे समोर मांडत असेन (जे ती व्यक्ती म्हणतेय की तू कोर्ट केस कर आणि माझ्याविरुद्ध कोर्टात वापर) तर सरळ सरळ त्या व्यक्तीचा हेतू संशयातीत वाटत नाही काय ?
आपने केलेलेही असेल हवाला, पण कोणी गुरकीरत नावाच्या कॅनडास्थित व्यक्तीच्या नावाने दावे करायचे आणि तिला म्हणायचे की मी काही तुझ्याविरुद्ध कोर्टात जाणार नाही तुला तुझ्या निर्दोषत्वाची सिध्दता भारतातल्या कोर्टात येऊन, मला नोटिस देवून करावी लागेल.
हे जरा अतिच मूर्खपणाचे नाही का वाटत ? आणि यावर विसंबून भाजपा किंवा मिडियाने बातम्या द्याव्यात म्हणजे आपण कसला थिल्लरपणा चालवला आहे ??
आप शतमूर्ख असेल (नव्हे आहेच), पण हे जे काही इतर लोक करतायत ते सार्वजनिक मूढतादर्शक म्हणायचे की सार्वजनिक दांभिकता हेच समजत नाही.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
गुरुवार, 02/05/2015 - 19:19
नवीन
The Delhi Elections
I strongly recommend all Delhi voters to vote for the Aam Admi Party in the coming elections for the Delhi Assembly.
Before I give my reasons, I wish to make one thing clear, and this clarification is necessary because some people commented on some of my previous posts asking how much has been given or offered to me by Mr. Kejriwal.
My answer is : nothing.
Nothing has been offered or given to me by him.
In fact I have never even met Mr. Kejriwal in my life.
Any one can verify this from Mr. Kejriwal.
I have studied Mr. Kejriwal ( through the media ), and my opinion about him, which I have expressed earlier also, is that he is an upright man, who genuinely wishes to do good.
He was earlier impulsive and impatient, but he has realized his mistakes and has learnt from them.
As regards the BJP, I have already given my views in my articles ' The Party is Over' and ' Why Delhiites should vote for AAP ' on facebook and my blog justicekatju.blogspot.in
My reasons why Delhi voters should vote for AAP are as follows :
1. As explained in my article ' Why Delhiites should vote for AAP ', Delhi is mainly a city of shopkeepers and traders i.e. small and middle level businessmen. Earlier, the Jan Sangh, which later became the BJP represented these classes, while Congress represented big business. Now Congress has been decimated ( largely due to its own misdeeds ), and now BJP has become the party of big business ( or at least a section of it ), while in Delhi AAP represents small and middle businessmen. So it is in the interests of Delhiites to vote for a party which will represent them.
2. One of the main problems of Delhiites is electricity and water bills, and AAP is the only party which has shown an inclination to address this issue seriously
3. As regards BJP, everybody now realizes that the slogan of 'vikas' was bluff, illusion and sham rhetoric for winning the votes of the Indian youth who were unemployed, or who had the prospect of unemployment staring at them, and thought that vikas meant creation of millions of jobs for them. Instead, the Indian economy is stagnant, and there are lay offs ( see my articles ' The Party is Over ' and ' The Dream has Evaporated ' on fb and my blog )
4. All that BJP has is hatred of minorities. It pretends to be a party representing Hindus, but that is a sham and a pretence. In fact the BJP leaders have no idea of the great Hindu intellectualism, the real contribution of Hindus in science, literature, law, grammar, etc and instead by substituting falsehood for truth dilute the latter and make us a laughing stock before the whole world ( see my articles ' Mixing the True with the Untrue ' and ' Making us a laughing stock ' on fb and my blog ).
5. As regards Congress, the less said about it the better. During the rule of UPA scam followed scam, and Sonia Gandhi has yet to render accounts about them. As regards Rahul Gandhi, is any comment necessary for this boy ?
- Markandey Katju
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/05/2015 - 20:25
नवीन
My all team members in delhi will be vote for AAP.
5 sal kejarival..............................
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 02/06/2015 - 08:23
नवीन
धन्य आहे. काटजूंचं आवाहन इथे दिलंत. काटजू भाजपला पाठिंबा न देता आआपला पाठिंबा देताहेत त्यात नवल काय! किरण बेदींपेक्षा सुंदर असलेल्या शाझिया इल्मींना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न केल्यानेच रागावून त्यांनी आआपला पाठिंबा जाहीर केला असावा. शाझिया इल्मी किरण बेदींपेक्षा सुंदर असल्याने भाजपने त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायला हवं होतं असं आचरटपणाचं विधान त्यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. कतरिना कैफला राष्ट्रपती करायला हवं असा अर्थाचं अजून एक आचरट विधानही त्यांनी मागच्याच महिन्यात केलं होतं. अत्यंत बाष्कळ व आचरट विधान करणारे अशी त्यांची प्रसिद्धी आहे.
प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आचरट वक्तव्ये करणार्या काटजूंनी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ड्रामेबाजी करणार्या केजरीवालांना पाठिंबा जाहीर करावा यात काहीच आश्चर्य नाही. शेवटी 'समान शीलेषु व्यसनेषु सख्यम्' हेच खरं.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 02/05/2015 - 19:45
नवीन
४९ दिवसांमध्ये केजरीवालला भगोडा म्हणणारे सोयीस्कररीत्या वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार विसरतात..
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/05/2015 - 20:02
नवीन
वाजपेयींना बहुमत सिद्ध करता आले नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला. हे एक घटनादत्त कर्तव्य होते. ते पार न पाडल्यास राष्ट्रपतींनी त्यांचे सरकार बरखास्त केले असते.
अरविंद केजरीवाल यांच्याकडे बहुमत होते. बाहेरून पाठिंबा देणार्या पक्षाने पाठिंबा काढून घेतलेला नसताना स्वेच्छेने त्यांनी राजीनामा दिला. केजरीवाल यांच्याकडे उरलेले ५८ महिने व ११ दिवस किंवा काँग्रेसने त्याआधीच पाठिंबा काढून घेतल्यास तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहण्याचा पर्याय होता.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »