Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण जिंकणार दिल्ली?

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/29/2015 - 16:13
🗣 452 प्रतिसाद
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते. प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे. दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली. बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही. सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

प्रतिक्रिया द्या
149616 वाचन

💬 प्रतिसाद (452)
स
सव्यसाची गुरुवार, 02/05/2015 - 20:22 नवीन
वाजपेयी यांना सरकार सोडावे'च' लागले असते. ४९ दिवसानंतर सरकार सोडून जायची गरज होती असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
क्लिंटन Fri, 02/06/2015 - 06:09 नवीन
४९ दिवसांमध्ये केजरीवालला भगोडा म्हणणारे सोयीस्कररीत्या वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार विसरतात..
:) आआपला पाठिंबा कशामुळे मिळतो हे समजले. खरोखर काय घडले होते वगैरे विचार करायच्या भानगडीत न पडता कशाचाही कशाशीही बादरायण संबंध जोडून नुसती फेकुगिरी करायची आणि इतक्या मोठ्याने ओरडायचे की हाच मुद्दा खरा असे सगळ्या जगाला वाटायला लागावे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अनुप ढेरे Fri, 02/06/2015 - 06:12 नवीन
सहमत. ती तुलना कायच्या काय आहे. रच्याकने, ते सरकार पडलं, तेव्हा वायपेयींनी लोकसभेत केलेल भाषण लेजंडरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
कपिलमुनी Fri, 02/06/2015 - 09:34 नवीन
वाजपेयींनी बहुमत नसताना सरकार सोडला हे योग्य आणि घटनेला अनुसरुन होते . त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये जे बिल मांडले ते पास झाले नाही . हा कोणत्याही सरकारचा नैतिक पराभव असतो ( ज्या प्रमाणे कपात सूचना ) त्याला अनुसरून त्यांनी राजीनामा दिला होता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 02/06/2015 - 10:09 नवीन
त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये जे बिल मांडले ते पास झाले नाही . हा कोणत्याही सरकारचा नैतिक पराभव असतो
सगळे रामायण झाल्यानंतर रामाची सीता कोण!! हे बिल विधानसभेत मांडण्यासंदर्भात उपराज्यपालांनी सॉलिसिटर जनरलचे मत घेतले.सॉलिसिटर जनरलनी मत दिले की उपराज्यपालांच्या शिफारसीशिवाय हे विधेयक विधानसभेत मांडता येणार नाही.तरीही केजरीवालांनी हे बिल मांडायचा प्रयत्न केला आणि तसे करणे घटनाबाह्य होते.वर 'हे बिल मांडावे का' यावर सभागृहाचे मत घेतले. उपराज्यपालांची परवानगी नाही म्हणून हे बिल मांडणे घटनाबाह्य आहे या (भले तांत्रिक) कारणावरून भाजप आणि काँग्रेसने हे बिल मांडायला विरोध केला.त्यावर 'सब मिले हुए है' असे म्हणत हे महाशय राजीनामा देऊन पळून गेले.एकूणच काय तर पहिल्या दिवसापासून हे महाशय पळून जायला कारण शोधत होते ते त्यांना या बिलाच्या निमित्ताने मिळाले. उद्या हे सत्तेवर आले आणि विधानसभेत केंद्रातील मोदी सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव मांडला तर विधानसभेला केंद्र सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही आणि जरी असा प्रस्ताव विधानसभेने मंजूर केला तरी त्याचा तिळमात्र उपयोग होणार नाही या कारणासाठी जर भाजप आणि काँग्रेसने त्याला विरोध केला तरी परत म्हणणार का की 'सब मिले हुए है'?? वाजपेयींना राष्ट्रपतींनी ३१ मे १९९६ पूर्वी बहुमत सिध्द करायला सांगितले होते.त्यामुळे वाजपेयींचा विश्वासप्रस्ताव आणणे आणि त्यावर चर्चा होणे पूर्णपणे घटनेतील तरतुदींना धरून होते. केजरीवालांनी मुळात अशा तरतुदींचा भंग करून बिल मांडायचा प्रयत्न केला. तेव्हा वाजपेयींची केस आणि केजरीवालांची केस पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्या एकाच तागडीत कशा काय तोलू शकता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Fri, 02/06/2015 - 10:14 नवीन
>>> उद्या हे सत्तेवर आले आणि विधानसभेत केंद्रातील मोदी सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव मांडला तर विधानसभेला केंद्र सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही आणि जरी असा प्रस्ताव विधानसभेने मंजूर केला तरी त्याचा तिळमात्र उपयोग होणार नाही या कारणासाठी जर भाजप आणि काँग्रेसने त्याला विरोध केला तरी परत म्हणणार का की 'सब मिले हुए है'?? हे भारी! यावेळी आआपला स्पष्ट बहुमत जरी मिळाले तरी दिलेली अत्यंत अव्यावहारीक आश्वासने पूर्ण करता येत नाही असे दिसले की केंद्राकडे बोट दाखवून आणि असेच काहीतरी फुसके कारण काढून हे पुन्हा एकदा राजीनामा देऊन पलायन करतील हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Fri, 02/06/2015 - 10:25 नवीन
>>> त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये जे बिल मांडले ते पास झाले नाही . हा कोणत्याही सरकारचा नैतिक पराभव असतो ( ज्या प्रमाणे कपात सूचना ) त्याला अनुसरून त्यांनी राजीनामा दिला होता ! केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत 'जनलोकपाल' विधेयक मांडलेच नव्हते. त्यामुळे ते मंजूर किंवा नामंजूर होण्याचा प्रश्नच नाही. उपराज्यपालांनी हे विधेयक मांडण्यास परवानगी दिलेली नव्हती. त्यांच्याशी बोलून मार्ग काढण्याऐवजी केजरीवालांनी 'जनलोकपाल' विधेयक मांडावे का नाही या विषयी सभागृहात मतदान घेतले होते. काँग्रेस व भाजपने त्याला विरोध केला. केजरीवालांना खरोखरच 'जनलोकपाल'विषयी प्रामाणिक कळकळ असती तर त्यांनी ते विधेयक मांडू का नको असा ठराव मताला टाकण्यापेक्षा थेट विधेयकच सभागृहात मांडून विधेयकावर मतदान घ्यायला हवे होते. सभागृहात विधेयक मांडू का नको या प्रश्नावर जरी सरकारचा पराभव झाला होता, तरी त्या मताकडे दुर्लक्ष करून ते विधेयक सभागृहात मांडायला कोणतीही कायदेशीर अडचण नव्हती कारण 'विधेयक मांडू का नको' या प्रश्नावरचे मतदान आणि प्रत्यक्ष विधेयकावरचे मतदान हे दोन वेगळे ठराव आहेत. परंतु तसे न करता त्यांनी थेट राजीनामा देऊन टाकला कारण त्यांना पलायन करण्यासाठी कारण हवेच होते. ते कारण आयतेच मिळाले. त्यांना खरं तर आपले सरकार बरखास्त करायला लावून हुतात्मा व्हायचे होते व सहानुभूती मिळवायची होती. प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी पदपथावर झोपून आंदोलन करून त्यांनी केंद्र सरकारच्या हातात कोलीत दिलेही होते. परंतु तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांचा हुतात्मा होण्याचा डाव उधळून लावल्याने त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे शेवटी विधेयक मांडू का नको या प्रश्नावरील मतदानाचे निमित्त करून त्यांनी पलायन केले. भविष्यात सत्ता मिळाली तर ते पुन्हा एकदा अगदी असेच करतील याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/05/2015 - 19:53 नवीन
काळ्या पैशाबाबत निवडणुकीच्या काळातील मोदींची वाक्ये या 'म्हणी' होत्या म्हणे! http://www.esakal.com/Tiny.aspx?K=EC9BL उद्या 'अच्छे दिन आनेवाले है!' ही देखील म्हण असल्याचे कळाल्यास नवल वाटणार नाही. बाकी आप आणि भाजप म्हणजे 'इकडे आड तिकडे विहीर' अशी परिस्थिती झाली आहे.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Fri, 02/06/2015 - 04:27 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 02/05/2015 - 19:54 नवीन
विषय गहन आहे... आप 'ण' विचार करण्यासारखा. पण बी. जे. पी. मारून नेईल बहुतेक
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/06/2015 - 04:06 नवीन
वॉट्सअ‍ॅपवर फिरत आलेला विनोद - दिल्लीतील सभेनंतर मोदी जमावला उद्देशून विचारतात, "किसे वोट करेंगे?" जमाव एकसुरात म्हणतो, "आपको"
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/06/2015 - 09:03 नवीन
ठ्ठो =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
न
नांदेडीअन Fri, 02/06/2015 - 04:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
विशाल चंदाले Fri, 02/06/2015 - 06:44 नवीन
*lol* *LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
क्लिंटन Fri, 02/06/2015 - 09:22 नवीन
केजरीवालांना कोण कोण पाठिंबा देत आहेत? मला वाटते की मला न आवडणार्‍या लोकांचे 'हूज हू' अशी ही यादी असेल. १. असदुद्दिन ओवेसी (एम.आय.एम) २. ममता बॅनर्जी ३. डावे पक्ष ४. मार्कंडेय काटजू इतरही आहेतच.पण सगळ्या लिंका शोधायला आता वेळ नाही आणि उत्साह त्याहूनही नाही. तरीही आणखी एका लिंकेशिवाय हा प्रतिसाद पूर्ण होऊच शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरसंबंधीचा पाकिस्तानातील मंत्री बरजीस ताहिर म्हणतो की भारताने आम आदमी पक्षाचे म्हणणे ऐकावे आणि काश्मीरात सार्वमत घ्यावे. बाकी कोणीही काहीही म्हटले तरी असल्या पक्षाला पाठिंबा देऊन मी माझ्याच देशाच्या इंटरेस्टविरूध्द काहीही करूच शकणार नाही. दिल्ली निवडणुकांचा निकाल काहीही लागला तरी आम आदमी पक्ष या बोगस प्रकाराविरूध्दचा माझा लढा चालूच राहिल.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 02/06/2015 - 11:58 नवीन
या लीस्टमध्ये आता जामा मशिदीच्या सय्यद अहमद बुखारीचाही समावेश झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Fri, 02/06/2015 - 13:24 नवीन
>>> या लीस्टमध्ये आता जामा मशिदीच्या सय्यद अहमद बुखारीचाही समावेश झाला आहे. वा! आआपच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेलाय. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या बरोबर ७ दिवस आधी वि.प्र.सिंग बुखारीला भेटायला गेले होते. त्यांच्या भेटीनंतर लगेचच बुखारीने एक पत्रक काढून देशभरातील मुस्लिमांना जनता दलाला मत देण्याचे आवाहन केले होते. आताही अगदी तसंच घडतंय. आआपचे संजय सिंग बुखारीला गुपचूप भेटून आल्याचं सांगितलं जातंय. नंतर लगेचच बुखारीचा आआपच्या बाजूने फतवा आलाय. वि.प्र.सिंगही केजरीवालांसारखेच नाटकी आणि प्रामाणिकपणाचा व स्वच्छतेचा बुरखा पांघरलेले होते. केजरीवाल त्याच मार्गाने चाललेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
ग्रेटथिंकर Sat, 02/07/2015 - 07:11 नवीन
बुखारीने आआपला पाठिंबा दिलाय याची पोटदुखी कशाला? बीजेपीलाही उपद्रवी डेरा सच्चावाल्यांचा पाठिंबा मिळाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
होबासराव Fri, 02/06/2015 - 12:07 नवीन
गुरुजि आणि क्लिंटन तुम्हि इतके मुद्देसुद सगळ एक्सप्लेन केलय. त्या आप कडे काहि अजेंडा तरी आहे का ? ते फक्त फुकट वाटण्याच्या गोष्टि करतायत. खेजरीवाल पे़क्षा काँग्रेस परवडेल दिल्ली कराना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 02/06/2015 - 12:24 नवीन
खेजरीवाल पे़क्षा काँग्रेस परवडेल दिल्ली कराना...
याच चर्चेत मी लिहिले पण आहे की शीला दिक्षित यांच्या सरकारने दिल्लीसाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या.आजही अजय माकन हे चांगले मुख्यमंत्री बनू शकतील हेच माझे मत आहे-- किरण बेदींपेक्षाही.मी केंद्रात भाजपला समर्थन देत असलो म्हणून राज्यातही भाजपलाच समर्थन द्यायला हवे असे नक्कीच नाही. विशेषतः १९९३ ते १९९८ या काळात दिल्लीत भाजपच्या मदनलाल खुराणा आणि साहिबसिंग वर्मा यांनी फारसे काही केले नसताना आणि दिल्लीतील महानगरपालिकांमध्ये भाजपचा कारभार उत्तम आहे असे कोणी म्हणू शकेल असे वाटत नाही अशी परिस्थिती असताना.मी दिल्लीत मतदार नाही म्हणून या गोष्टीचा तितका विचार केलेला नाही पण कदाचित मी दिल्लीत मतदान करू शकत असतो तर मी भाजपलाच मत दिले असते का या प्रश्नाचे उत्तर १००% हो असे नक्कीच देऊ शकत नाही. पण आम आदमी पक्षाचा मात्र अगदी कडाडून विरोधच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ग
ग्रेटथिंकर Sat, 02/07/2015 - 07:16 नवीन
काँग्रेसचा वोट शेअर वाढण्याचा फटका आपला बसेल त्यामुळेच इथले भाजपेयी काँग्रेसचीही तळी उचलत आहेत :ROFL:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
नांदेडीअन Fri, 02/06/2015 - 13:52 नवीन
3.00 pm I Appeal all Muslims to support AAP candidates & help in forming a secular Govt in Delhi. - Imam Bukhari 4:00 pm We condemn and reject support of Shahi Imam. We don't support the ideology of Imam Bukhari. He had invited Pakistan Prime Minister Nawaz Sharif and not Indian Prime Minister Narendra Modi for his son's anointment. - Aam Aadmi Party On the other hand, you would have seen BJP seeking support of Baba Ram Rahim, Maulana Kalbe Jawwad and Sonia Gandhi meeting Imam Bukhari. (in the past) This is the difference ! Proud to be an AAPtard !
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Fri, 02/06/2015 - 14:10 नवीन
आताच बुखारींच्याकडून वक्तव्य आले आहे कि आप ने असा सपोर्ट मागितला होता. खरे खोटे कुणास ठाऊक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Fri, 02/06/2015 - 14:15 नवीन
भाजपानेच डिल केलेली होती म्हणे बुखारीसोबत. पण आपने यॉर्कर बॉलवर सिक्सर लगावला. खरे खोटे कुणास ठावूक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Fri, 02/06/2015 - 14:22 नवीन
आप ला मतदान करा आणि धर्मनिरपेक्ष सरकार बनवा असे आवाहन केले गेले. भाजप यामध्ये कुठे मध्ये येतो हे कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Fri, 02/06/2015 - 14:24 नवीन
तुमच्यासारखेच ‘खरे खोटे कुणास ठावूक’ म्हणालो ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Fri, 02/06/2015 - 14:32 नवीन
तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. माझ्या प्रतिसादातील पहिले वाक्य हे एका बातमी वरून आले आहे. जमले तर इंग्रजी माध्यमांमध्ये ही बातमी आपण पाहू शकता. मी काही माझ्या मनचे करून नाही सांगितले. 'खरे खोटे कुणास ठाऊक' असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा नेमके कोण खरे बोलतोय याचा उलगडा न झाल्याने म्हणालो. तुम्ही जे भाजप बद्दल म्हणालात त्याची मला कुठलीही बातमी सापडली नाही. कमीत कमी 'अधिकृत स्रोत' वगैरे च्या नावाखाली ज्या बातम्या येतात त्यामध्येही सापडले नाही. मला अपेक्षा होती कि तुम्ही म्हणाल कि आताच बातमी आलीय किंवा टीवी वर पहा वगैरे. पण 'खरे खोटे कुणास ठाऊक' असे का म्हणता आहात ते काही कळले नाही. जर तुमच्याकडे कुठली लिंक असेल तर मला द्या जी सांगते कि भाजपने डील केले आहे. खरे खोटे नंतर कळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Fri, 02/06/2015 - 14:37 नवीन
अहो, इतका मोठा पोपट झाल्यावर बुखारींकडून दुसरे कोणते स्टेटमेंट अपेक्षित होते तुम्हाला ? ज्या तातडीने भाजपाचे प्रवक्ते टीव्हीवर येऊन आप आणि बुखारीबद्दल बोलत होते, त्यावरून निदान मला तरी असेच वाटते की जनतेमध्ये एक चुकीचा संदेश पसरवण्यासाठी बुखारीला असे वक्तव्य करण्यासाठी भाजपानेच सांगितले असावे. अर्थात हे माझे मत आहे, कोणत्याही न्यूज चॅनलवर वगैरे आलेले नाही. भाजपावर इतका विश्वास तर आहेच मला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Fri, 02/06/2015 - 14:49 नवीन
ज्या तातडीने भाजपाचे प्रवक्ते टीव्हीवर येऊन आप आणि बुखारीबद्दल बोलत होते, त्यावरून निदान मला तरी असेच वाटते की जनतेमध्ये एक चुकीचा संदेश पसरवण्यासाठी बुखारीला असे वक्तव्य करण्यासाठी भाजपानेच सांगितले असावे.
अरुण जेटली यांनी, माझ्या माहितीप्रमाणे, पहिल्यांदा उत्तर दिले. पण त्यात फक्त हाच मुद्दा नव्हता. आता काही वेळानी सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. कॉंग्रेस ने पण दिली आहे. भाजपने बुखारींना सांगितले आणि बुखारींनी ते ऐकले हे आश्चर्यजनक आहे. बाकी आपली मते बनवण्याचा आपल्याला अधिकार आहेच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
क्लिंटन Fri, 02/06/2015 - 14:10 नवीन
अहो हे मराठी संकेतस्थळ आहे. गरजेपुरते इंग्लिश वापरायला काहीच आक्षेप नसावा पण सगळा प्रतिसादच इंग्लिशमध्ये? आणि तो पण स्वत:चा असेल असे वाटत नाही.भाषा जरा फेसबुकी वाटत आहे. आणि वरही असाच कुठलाकुठला फॉरवर्ड झालेला फोटो डकविला आहात. असो. आआपने बुखारींचा पाठिंबा नाकारला ही स्वागतार्ह गोष्ट आहे. तरीही काही मुद्दे उपस्थित होतातच. १. मुळात बुखारींना आआपला पाठिंबा द्यावासा वाटला.म्हणजे बुखारी ज्या तत्वांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी आआपमध्ये काहीतरी 'आशेचा किरण' नक्कीच दिसला. २. डिसेंबर २०१३ च्या निवडणुकांपूर्वी हेच केजरीवाल तस्लीमा नसरीन यांना ठार मारणार्‍याला बक्षिस द्यायला तयार असलेल्या मौलाना तौकिर रझा खान याला का बरे भेटले असावेत? की आपलं 'पब्लिक मेमरी इज शॉर्ट' म्हणून काहीही खपून जातं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Fri, 02/06/2015 - 14:18 नवीन
(परत एकदा) सुदैवाने देवाने स्वतःचे मत स्वतः बनवण्याएव्हढी सुबुद्धी दिली आहे. मीच लिहिलेले आहे हे. :) २००४ मध्ये बुखारींनी भाजपाला सपोर्ट दिला होता तेव्हा तेसुद्धा काही लोकांसारखे ‘स्वयंघोषित’ देशभक्त असतील ना ? ;) बरोबर आहे, पब्लिक मेमरी नक्कीच शॉर्ट असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 02/06/2015 - 15:01 नवीन
२००४ मध्ये बुखारींनी फतवा वगैरे जारी केला नव्हता.पूर्वी मलाही तसे वाटत होते.पण २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी जुने संदर्भ बघितले तेव्हा द हिंदूमधील हा दुवा मिळाला. त्यात बुखारीने फतवा जारी केल्याचे नाकारले आहे आणि भाजपमधील मतपरिवर्तनाचे स्वागत केले आहे. हे मतपरिवर्तन म्हणजे २००२ च्या काळात तोगाडिया स्टाईल प्रवृत्ती बेफाम दौडत होत्या त्यांना वाजपेयींनी विरोध करायचा प्रयत्न केला (त्यात यश कितपत आले ही गोष्ट वेगळी) हे असावे हा माझा तर्क. आणि त्या कारणासाठी वाजपेयींना मी पण नक्कीच श्रेय देतो. पण याव्यतिरिक्त जर का भाजपने आणखी काही करायचा प्रयत्न केला असेल तर त्याला माझा नक्कीच विरोध आहे. एकूणच काय तर तुम्ही 'आपटर्ड' असल्याचे स्वतःच मान्य केले आहे.सर्व आपटर्डची जी लक्षणे आहेत ती तुमच्यात अगदी १००% आहेत.एकतर सर्वात १००% योग्य कुठलाही पक्ष मिळणे शक्य नाही.२००४ मध्ये भाजपचा पराभव झाला, बुखारीने भाजपाविषयी काही चांगले बोलले हे सगळे मान्य.पण भाजप जे एकूण पॅकेज देणार होते त्यात बुखारीमुळे एक डाग नक्कीच लागला पण इतर चांगल्या गोष्टी (वाजपेयींचे नेतृत्व, १९९९-२००४ या काळात अर्थव्यवस्था चांगली सांभाळणे इत्यादी) होत्या त्याचे महत्व कमी होत नाही. तुमच्या आम आदमी पक्षाचे नक्की काय पॅकेज आहे हे विचारल्यानंतर एकतर आम्ही तेवढे स्वच्छ आणि बाकी सगळे जग भ्रष्ट, प्रश्न विचारणारा अंबानी-अडानीचा एजंट किंवा भाजपच्या पेरोलवरचा इत्यादी इत्यादी बकवासच पुढे येते. म्हणजे तुमचे पॅकेज नक्की काय याचा तुम्ही पत्ता १००% कधीच लागू देणार नाही आणि तुमच्या शब्दावर सगळ्या जगाने विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करणार.जे काही थोडे थोडके पॅकेज समोर दिसते त्यात त्या सबसिड्या आणि आयुष्यात पूर्ण न करता येण्यासारखी आश्वासने!!अशा वेळी इतर काहीच नसेल तर बुखारीचा पाठिंबा हा डाग नक्कीच मोठा दिसतो. कदाचित तो तितका मोठा नसेलही. पण तो मोठा दिसतो याचे कारण आआप समर्थकांचा आक्रस्ताळेपणा. तेव्हा परत एकदा-- १. तुमचे नक्की पॅकेज काय? २. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात असा तुमचा दावा असेल तर ते कृतीतून सिध्द करायची जबाबदारी तुमचीच. ३. आणि तुम्हाला प्रश्न विचारले तर इतरांकडे बोट दाखवून--त्यांच्यावरही डाग आहेत असे म्हणता त्याला काहीच अर्थ नाही. डाग सगळ्यांवर आहेत.पण प्रत्येक पक्ष नक्की काय देत आहे त्या प्रमाणात डाग किती लहान/मोठे आहेत हे सगळ्यांनाच दिसते.तुम्ही मात्र तुमच्यावरील डाग इतरांनी दाखविले की तुम्ही नक्की काय देऊ शकत आहात हे अंबानी-अडाणींना मध्ये न आणता दाखविलेत तर इतर पक्षांप्रमाणे तुमचाही विचार करता यायला काहीच हरकत नाही.पण तसे करताना आअप समर्थक कधीच दिसत नाहीत. असो. रामदास स्वामींनी जी अनेक लोकांची लक्षणे लिहिली आहेत त्याप्रमाणे मला पण आपटर्ड लक्षणे नक्कीच लिहिता येतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
आ
आनन्दिता Sat, 02/07/2015 - 00:03 नवीन
अहो केजरीवाल आहेतच तितके सरळ... मी तर काही आप वाल्यांना हे म्हणताना ऐकलय की केजरीवाल सत्तेत आले की ते तारक मेहताचा चष्मा सुद्धा सुलटा करणार आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
भ
भुमन्यु Sat, 02/07/2015 - 06:54 नवीन
आप वाल्यांना प्रश्न विचारायचे नसतात कारण उत्तरा ऐवजी फक्त आक्रस्ताळे पणा मिळतो. कारण आरोप करणार्‍यांना )विशेषतः 'आप' ला) तो सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. उद. गडकरी वि. खुजलीवाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
अ
अर्धवटराव Fri, 02/06/2015 - 17:09 नवीन
हे आशुतोष वगैरे मंडळींनी केजरीसाहेबांचा परत पोपट करण्याचा चंग बांधलाय का न कळे. सपोर्ट नाकारला म्हणजे? मागे काँग्रेसचा सपोर्ट नाकारला तसाच कि काय... :( केजरीसाहेब गुजरातचं मुल्यमापन करायला गेले असताना दिल्लीस्थीत भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा नेणारे हेच महाभाग होते. केजरीसाहेबांना अडचणीत आणायची एकही संधी हे साहेब सोडत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 08:30 नवीन
>>> केजरीसाहेब गुजरातचं मुल्यमापन करायला गेले असताना दिल्लीस्थीत भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा नेणारे हेच महाभाग होते. केजरीसाहेबांना अडचणीत आणायची एकही संधी हे साहेब सोडत नाहि. हेच केजरीवाल गुजरातचे तथाकथित मूल्यमापन करण्याच्या दौर्‍यावर असताना कोणालाही न कळविता, कोणतीही पूर्वसूचना न देता, पूर्ववेळ न ठरविता अचानक गांधीनगरला मोदींच्या निवासस्थानी गेले आणि मला लगेच मोदींना भेटून त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे माझी त्यांच्याशी लगेच भेट घालून द्या असा हट्ट धरून बसले. पूर्ववेळ घेतल्याशिवाय मोदींना असे भेटता येणार नाही व तुम्ही पूर्ववेळ घेऊन मग भेटा असे सचिवांनी सांगताच लगेच, 'मोदी मला घाबरले' अशी आत्मप्रौढी यांनीच मिरवायला सुरूवात केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 08:34 नवीन
अमित शाह अजूनही तडीपार आहेत का हो ? टोमणा नाही मारत आहे . खर खर विचारत आहे . गुगलून बघितल पण कळत नाहीये नीट .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 08:36 नवीन
माहिती नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केल्याचे वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
श
श्रीगुरुजी Fri, 02/06/2015 - 16:13 नवीन
>>> This is the difference ! Proud to be an AAPtard ! यालाच 'तू मारल्यासारखे कर', 'मी रडल्यासारखे करतो' प्रवृत्ती म्हणतात. बुखारी गेलाबाजार उगाच कोणालाही पाठिंबा देत नाही. १९८९ ला वि.प्र.सिंगांना दिलेल्या पाठिंब्याचे गुपित वि.प्र.सिंगांनी मुफ्ती मोहमंद सईदला गृहमंत्री केल्यावर लक्षात आले होते. संजय सिंह बुखारीला गुपचूप भेटून आल्याचे दुपारी काही वाहिन्यांवर सांगत होते. बुखारीने पाठिंबा जाहीर करायचा आणि नंतर प्रकरण तापणार असे दिसताच आआपने घाईघाईने 'आम्हाला नको बाबा तुमचा पाठिंबा' म्हणून 'होलिअर दॅन दाऊ' असा आव आणून आपण किती निधर्मी आहोत असा भास निर्माण करायचा. दरम्यानच्या काळात बुखारीकडून मुस्लिमांनी कोणाला मत द्यायचे याविषयी योग्य तो संदेश गेलेला असतो आणि इकडे हे तावातावाने पाठिंबा नाकारून दोन्ही दगडांवर पाय ठेवणार आणि तिसरीकडे आपटार्ड हा भाजपचाच डाव आहे असा प्रचार सुरू करणार. वा! आवडलं आपल्याला हे टेक्निक. बादवे, डिसेंबर २०१३ मध्येही केजरीवालांनी अशाच एका मौलवीचा आशिर्वाद घेतला होता हे आठवत असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
प
पिंपातला उंदीर Fri, 02/06/2015 - 16:47 नवीन
@श्रीगुरुजी- डेरा सच्च्या च्या राम रहीम ( messenger of god वाला) ने ही बीजेपी ला पाठिंबा जाहीर केलाय की.. आणि बीजेपी ने तो नाकारलाही नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव Fri, 02/06/2015 - 17:11 नवीन
हरियाणा निवडणुकीच्यावेळी देखील त्यांनी उघड पाठिंबा दिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ग
गणेशा Fri, 02/06/2015 - 19:29 नवीन
मुसलमान मते किती भाजप ला मिळातात हे भाजप ला पण माहिती आहे आणि आप ला पण. त्यासाठी आदल्या दिवशी आवर्जुन पाठिंबा मागण्यासाठी कोणी आपकडुन जाईल असे वाटत नाही. जी मते कधीच भाजप ला मिळत नाही त्यासाठी कशाला असेल नौटंकी.. असा साधा प्रश्न कोणाला ही पडेल त्यात टेक्निक ते काय ? कुठल्याही मुद्द्याला फिरवुन आपलेच म्हणने कसे बरोबर असते हे आप नाही भाजप कायम खेळतो असे मला वाटते. बाकी आप बद्दल येथे लिहिले आहे.. म्हणजे मी आपटर्ड (नविन शब्द माहिती झाला मला) असे समजु नये. मला एकाच बाजुने (आणि विशेष करुन राजकारणात) विचार करुन आपलेच मत कसे बरोबर आणि इतर कसे चुक असे आवडत नाही. आप ज्या स्वच्छ राजकारणासाठी राजकारणात आली आहे , तेंव्हा भाजप कॉन्ग्रेस त्यांना जेरीस आणणारच.. असो आप चा उद्य सर्व प्रमुख पार्ट्यांना विचार करण्यास लावणारा आहे . आणी हे ही खुप आहे असे वाटते... त्यामुळॅच स्वच्छ प्रतिमेचा नेता न सापडल्याने किरण बेदिंना भाजप ला आयात करावे लागले. भाजप बद्दल मला राग नाहिये खरे .. अटल बिहारी वाजपेयी हे माझ्या आवडत्या ४ नेत्यांमध्ये आहेत. पण भाजप कमालीचा अहम बाळगुन असलेला पक्ष आहे याची चीड वाटते. हा या धाग्यावरील शेवटचा रिप्लाय.. अवांतर : आवडते ४ राजकारणी १. शरद पवार २. बाळाअसाहेब ठाकरे ३. अटलबिहारी वाजपेयी ४ अरविंद केजरीवाल. येथे देण्याचे कारण श्री गुरजी याचे मागील दोन्ही धागे खुप एकांगी आणि फक्त भाजपच कसे बरोबर काही ही होउद्या तिकडे असे असल्याने वाईट वाटते. चुक ती चुक आणि पुढच्याकडे इतक्या तुच्छ नजरेने पाहणे योग्य नाही असे मला वाटते. असो. जसा भाजप तसेच समर्थक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 08:24 नवीन
>>> मुसलमान मते किती भाजप ला मिळातात हे भाजप ला पण माहिती आहे आणि आप ला पण. त्यासाठी आदल्या दिवशी आवर्जुन पाठिंबा मागण्यासाठी कोणी आपकडुन जाईल असे वाटत नाही. सर्व मुस्लिमांची मते आआपलाच मिळत/मिळणार असल्याने आआपला बुखारीच्या पाठिंब्याची गरजच नाही असा तुमचा गैरसमज दिसतोय. मुस्लिमांच्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत. त्यात काँग्रेस आहे, आआप आहे, डावे पक्ष आहेत, बसप आहे, सप आहे, संजद आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे ... व अत्यल्प प्रमाणात भाजपसुद्धा आहे. भाजपला मुस्लिमांच्या एकूण मतांपैकी ५-६ टक्के मते नक्कीच मिळतात. ती मते पक्षाला फारशी मिळत नसून उमेदवाराच्या व्यक्तिगत संबंधांमुळे मिळतात. उर्वरीत अंदाजे ९५ टक्के मतांपैकी काँग्रेसचा वाटा किमान ३०-४० टक्के मतांचा असतो. उरलेली अंदाजे ६० टक्के मते इतर निधर्मांध पक्षात विभागली जातात. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ८ पैकी ४ आमदार मुस्लिम मतदार बहुसंख्य आलेल्या मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळी दिल्लीतल्या एकूण मुस्लिम मतांपैकी आआपचा वाटा २५-३० टक्के मते असेल. उर्वरीत मुस्लिम मते काँग्रेस, बसप, डावे पक्ष, संजद, राष्ट्रवादी इ. निधर्मांध पक्षात विभागली जातील. आआपने बुखारीचा पाठिंबा आवर्जून मागण्याचे हेच ते कारण. आआपच्या अलका लांबा २-३ दिवसांपूर्वी बुखारीच्या भावाला भेटून आल्या आणि लगेचच बुखारीने फतवा काढला हा काय योगायोग होता का? जी मुस्लिम मते काँग्रेस, बसप, डावे पक्ष इ. पक्षांना जातील ती 'आप'ल्याकडे वळविण्यासाठीच हा सारा खटाटोप होता. पण हा फतवा बॅकफायर होईल हे लक्षात येताच घाईघाईत बुखारीचा पाठिंबा आम्हाला नको अशी संभावित भूमिका आआपने घेतली. तोपर्यंत मुस्लिम मतदारापर्यंत योग्य तो आदेश पोहोचलेला होता. >>> जी मते कधीच भाजप ला मिळत नाही त्यासाठी कशाला असेल नौटंकी.. असा साधा प्रश्न कोणाला ही पडेल त्यात टेक्निक ते काय ? वर सविस्तर उत्तर दिले आहे. यातली ९० टक्क्यांहून अधिक मते जरी भाजपला मिळत नसली तरी आआआप हा या मतांचा सोल कस्टोडिअन नाही. त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत. यातला बहुसंख्य वाटा आपल्याच पदरात यावा यासाठी ही सारी नौटंकी. गुपचूप पाठिंबा मागणे आणि नंतर जाहीररित्या पाठिंबा नाकारणे ही नौटंकी केजरीवालांच्या नाटकी स्वभावाला साजेशीच आहे. >>> कुठल्याही मुद्द्याला फिरवुन आपलेच म्हणने कसे बरोबर असते हे आप नाही भाजप कायम खेळतो असे मला वाटते. आआपवाले तेच करत असतात. काल वर्तमानपत्रात भाजपने दिलेल्या जाहिराती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आणि आआपची जाहिरात म्हणजे उल्लंघन नाही हा आआपचा दावा आहे. या उदाहरणावरून हे लक्षात येईल. >>> आप ज्या स्वच्छ राजकारणासाठी राजकारणात आली आहे , तेंव्हा भाजप कॉन्ग्रेस त्यांना जेरीस आणणारच.. आआपचे राजकारण स्वच्छ नाही. संशयास्पद देणग्यांवरून हे स्पष्ट आहे. >>> असो आप चा उद्य सर्व प्रमुख पार्ट्यांना विचार करण्यास लावणारा आहे . आणी हे ही खुप आहे असे वाटते... त्यामुळॅच स्वच्छ प्रतिमेचा नेता न सापडल्याने किरण बेदिंना भाजप ला आयात करावे लागले. किरण बेदी अनेक दिवसांपासून भाजपत यायच्या तयारीत होत्या. निवडणुकीत किरण बेदींचा दिल्लीत फायदा होईल असे वाटले म्हणून त्यांचा अधिकृत प्रवेश झाला. >>> भाजप बद्दल मला राग नाहिये खरे .. अटल बिहारी वाजपेयी हे माझ्या आवडत्या ४ नेत्यांमध्ये आहेत. पण भाजप कमालीचा अहम बाळगुन असलेला पक्ष आहे याची चीड वाटते. अखिल ब्रह्मांडात आम्हीच तेवढे स्वच्छ, नीतिमान, पारदर्शक आणि इतर सर्वजण भ्रष्टाचारी, अनीतिमान, छुपे व्यवहार करणारे या आआपच्या अहंकाराबद्दल आपले काय मत आहे? >>> असो. जसा भाजप तसेच समर्थक असो. जसा आआप तसेच समर्थक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 08:28 नवीन
@गुर्जी - डेरा सच्चा सौ च काय हो . त्याच्यावर तर खुनासारखे आणि बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत . उत्तर टाळत जाऊ नका हो असे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 08:33 नवीन
मग तस्लिमा नसरीन यांना ठार मारण्याचा फतवा काढलेल्या मौलाना ताकिर रझाच्या पाठिंब्याचं काय? एमआयएम च्या ओवेसीच्या पाठिंब्याचं काय? आणि दिल्लीत ३००० शिखांच्या हत्येतले प्रमुख आरोपी असलेल्या काँग्रेसच्या पाठिंब्याचं काय? ते बोला ना आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 08:36 नवीन
म्हणजे एकूण काय ? कॉंग्रेस , भाजप , आप सगळेच एकाच थाळीचे चट्टे बट्टे . सब घोडे बारा टक्के . काय म्हणता ? *lol* *LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 08:45 नवीन
गुर्जी बोलेनात , गुर्जी उत्तर देईनात . (चाफा बोलेना च्या चालीवर वाचावे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 08:52 नवीन
इतके उतावीळ होउ नका. जरा संयम ठेवा. लगेच निष्कर्ष काढून मोकळे होऊ नका. केजरीवालांसारखे जजमेंटल होऊ नका. मोदींना भेटायला गेल्यावर त्यांना पूर्ववेळ ठरवून या असे सांगितल्यावर लगेच 'मोदी मला घाबरले' असा सोयिस्कर निष्कर्ष काढून ते मोकळे झाले होते. हा तुमाचा एक ओळीचा प्रतिसाद १३:१५ चा आहे. माझा प्रतिसादही १३:१५ आहे हे लक्षात आलं असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
श
श्रीगुरुजी Sat, 02/07/2015 - 08:45 नवीन
हे मी आधी पण एका प्रतिसादात लिहिले होते. आआप हा पक्ष वर्तणुकीच्या बाबतीत भारतातल्या इतर कोणत्याही पक्षासारखाच आहे. परंतु आपटार्डना हे पटत नव्हते. आआपचे वेगळेपण फारसे नाही. फरक एवढाच आहे की आआप नेते अत्यंत अहंमन्य असून फक्त आपणच अखिल ब्रह्मांडातले एकमेव स्वच्छ, प्रामाणिक व पारदर्शी आहोत व इतर सर्वजण भ्रष्टाचारी, अप्रामाणिक आणि अपारदर्शी आहेत या भ्रमात आहेत. कमालीचा नाटकीपणा हे आआपचे दुसरे वेगळेपण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 08:47 नवीन
Party with difference बद्दल काय मत आहे तुमच ? दुसर्यांच्या पक्षावर लई टीका करून झाली . जरा आता आपल्या पक्षावर बोला की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा