Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

उ
उडन खटोला
Fri, 12/04/2015 - 02:17
🗣 384 प्रतिसाद
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

प्रतिक्रिया द्या
66568 वाचन

💬 प्रतिसाद (384)
स
संदीप डांगे Sat, 12/05/2015 - 14:53 नवीन
निरंकुश ह्या शब्दाचा वेगळाच अर्थ घेतलाय का पैलवानसाहेब? त्याअर्थाने तर मग आजचे भारत सरकारही निरंकुश म्हणायला नको. जगातले कुठलेच सरकार तशा अर्थाने निरंकुश नसते. निरंकुश म्हणजे दुसरा प्रतिस्पर्धी न उरता एकछत्र अंमल असणे असे म्हणायचे आहे. जरी स्थानिक संस्थानिक असतील तरी ते सर्व मांडलिक होते. राज्यविस्तार करायची त्यांना परवानगी नव्हती. देशात कायदे बनवून राबवण्याचा हक्कही ४७ च्या मध्यरात्रीपर्यंत ब्रिटीशांकडेच होता. आपले स्वातंत्र्यविधान हेही त्यांच्या संसदेत संमत झालेला कायदा आहे. माझ्यामते, एवढे पुरे...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 12/06/2015 - 15:19 नवीन
अवांतर : संदीप डांगे, इतिहासाची मोडतोड करण्याबाबत इंग्रज निरंकुश होते हे निरीक्षण मान्य. भारतावरचा एकछत्री अंमल म्हणाल तर तो कोणाचाच नव्हता. इंग्रजांना प्रतिस्पर्धी नव्हते म्हणाल तर संस्थाने होतीच. त्यांना राज्यविस्तार करायची परवानगी नव्हती हे खरंय. मात्र तशीच इंग्रजांनाही त्यांची राज्ये घशात घालून राज्यविस्तार करता आला नाही. शिवाजीमहाराजांचं राज्य प्रजेला आपलंसं वाटायचं. त्याअर्थी ते एकमेव निरंकुश सत्ताधारी होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 12/06/2015 - 15:30 नवीन
मी तांत्रिकतेबद्दल बोलतोय हो! भावनिकतेबद्दल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोगा Sun, 12/06/2015 - 15:37 नवीन
शिवाजी महाराज स्वराज्य व संस्थाने उर्फ प्रिन्सलि स्टेट्स .... हे वॅगळ्यावेगळ्या शतकात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोगा Sun, 12/06/2015 - 15:45 नवीन
भारतात आयायटीची डिग्री घेऊन इंग्लंडात पैसे छापत बसलेला हा गामा पैलवान इंग्रजांविरुद्ध आंदोलन केलेल्या गांधीजींचा 'गांधीने' असा एकेरी उल्लेख करतो. किती ही निरंकुशता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे Mon, 12/07/2015 - 05:03 नवीन
तुम्ही भारतात डिग्री घेऊन भारतातच नोकरी करून मोदी साहेबांचा एकेरी उल्लेख करता ते चालतं वाटतं. भारताच्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे हे आपणही विसरता? आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी आपली स्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
भ
भंकस बाबा Sat, 12/12/2015 - 03:11 नवीन
१+++++++++++
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
राही Sat, 12/05/2015 - 09:30 नवीन
पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
न
निनाद मुक्काम … Sat, 12/05/2015 - 11:59 नवीन
भारतीय रेल्वे , इंग्रजी राजवटीवर शःशी थरूर ह्यांचे भाष्य, ह्या आधी सुद्धा त्यावर चर्चा झाली आहे पण आपल्याच पैशातून आपल्या लोकांचा घाम गाळून भारतीय वसाहती मध्ये गेलेले बांधकाम जेव्हा भारतीयांच्या ताब्यात देण्यात आले तेव्हा नव्या मालकाला नव्या वास्तुस नाव ठेवण्याचा नक्कीच अधिकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 01:33 नवीन
तंत्रज्ञान ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी आणले हे नक्कीच.आणि ब्रिटिश नसते तर आजही आपण बैलगाडीने प्रवास केला असता हे म्हणणेही अतिशयोक्तीपूर्ण आहे हे पण नक्कीच.पण ब्रिटिश येण्यापूर्वी अशी तंत्रज्ञानाची प्रगती व्हायला लागणारी बैठक आपल्याकडे होती असे म्हणता येईल असे वाटत नाही. आणि ब्रिटिश आल्यामुळे ती प्रक्रीया बरीच expedite झाली हे पण नाकारण्यात काही अर्थ नाही.
सहमत-असहमत. म्हणजे तांत्रिक प्रगती हा जणू काही पूर्णतः अटळ प्रकार होता असे नाही, आणि ब्रिटिशांनी थिअरी-प्रॅ क्टिकल यांच्या लिंकेजद्वारे एक मोठीच उडी घेतली हेही खरे आहे. पण त्यांनी अनेक नेटिव्ह तंत्रज्ञानाची गळचेपी केली. मग ते तलम वस्त्रवाले विणकर असोत किंवा खाणकाम उद्योग. शस्त्रास्त्रनिर्मितीमध्ये वूट्झ स्टील असो किंवा खाणकामात झिंक एक्स्ट्रॅक्शन मेथड असो किंवा अजून काही, बाय इट्सेल्फ ग्राउंड इम्प्लिसिटलि होते म्हटले तरी चालेल. टेक्निकल अचीव्हमेंट्स नक्कीच होत्या, पण त्यांची सांगड घालण्यात भारतीय लोक अयशस्वी ठरले.
पु.लंच्या बिगरी ते मॅट्रिकमध्ये प्राथमिक शाळेतील गणितावर गोपाळकृष्ण गोखल्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आहे. म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटी/२० व्या शतकाच्या सुरवातीला भारतातील एक आघाडीच्या व्यक्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहित होती. त्या उलट Philosophical Transactions of Royal Society of London सारखे जर्नल अगदी १६६५ पासून प्रसिध्द केले जात आहे. फोरिअरने त्याच्या फोरिअर सिरीजचा पेपर पहिल्यांदा सबमिट केला होता (१८०७ साली) तेव्हा "Lack of rigor" या कारणाने तो पेपर पहिल्यांदा रिजेक्ट केला होता असेही वाचले आहे. तेव्हा आपण किती शतके मागे होतो हे समजून यायला हरकत नसावी.
ही तुलना चुकीची आहे. कुणा व्यक्तीने पाठ्यपुस्तक लिहिले म्हणून तेवढ्यावरून देश मागास ठरत नाही. कॅल्क्युलसचा पाया म्हणजे इन्फायनाईट सेरीज, केरळ स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मधले लोक यात चँपियन होते. कॅल्क्युलसच्या जवळ गेले होते, पण थोडक्यात राहिले असे त्यांचे काम पाहून नक्कीच म्हणता येते.
राजकीय आघाडीवर ब्रिटिश येण्यापूर्वी भारत म्हणजे हे एक ओपन ग्राऊंड होते. कोणीही यावे आणि हात धुऊन न्यावेत अशीच भारतीयांची परिस्थिती होती. आणि ब्रिटिश म्हणजे कोणीतरी परके असे म्हणण्यापेक्षा तत्कालीन विविध राजेरजवाड्यांच्या रस्सीखेचीच्या राजकारणातील इतर खेळाडूंप्रमाणे एक खेळाडू असेच त्यांच्याकडेही बघितले जात होते असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. अगदी नानासाहेब पेशव्यांनीही अंग्र्यांचे आरमार बुडवायला ब्रिटिशांचीच मदत घेतली होती.मागे एकदा याविषयी लिहिलेही होते. आपले भारतीय लोकच आपापसात इतके भांडत असतील तर ती परिस्थिती कोणीतरी परका येऊन आपल्यावर राज्य करायला अत्यंत अनुकूल होती.अशा परिस्थितीत पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोकांचे भारतावर राज्य न येता ब्रिटिशांचे राज्य आले ही गोष्ट त्यामानाने चांगलीच झाली. आपल्याकडे एक गोष्ट फार वाईट असते. हे असे काही लिहिले की काळा इंग्रज, मेकॉलेचे गुलाम इत्यादी इत्यादी विशेषणांची सरबत्ती ते लिहिणार्‍यावर सुरू होऊन जाते. असला प्रकार वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या दृष्टीने नक्कीच चांगला नाही.
सहमत, पण जेवढे वाटते तेवढेही चित्र वाईट नव्हते असे दिसून येते ब्वा. कुठल्याही साईडचा दृष्टिकोन जास्त हिरीरीने मांडला की विशेषणे सुरू होतात आणि ते चूकच आहे. पण ब्रिटिश येण्याअगोदर सगळा जणू जाहिलियतचा काळ होता हे आजिबात खरे नाही. पोलिटिकल वर्चस्व मिळाले याचा अर्थ जित सर्व गोष्टींत कनिष्ठ दर्जाचे ठरतात असे या केसमध्ये आपसूक अझ्यूम केले जाते त्याला विरोध आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
संदीप डांगे Mon, 12/07/2015 - 04:49 नवीन
झकास प्रतिसाद! आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/07/2015 - 07:35 नवीन
कुणा व्यक्तीने पाठ्यपुस्तक लिहिले म्हणून तेवढ्यावरून देश मागास ठरत नाही.
माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. भारतात त्याकाळी (१७००-१८०० च्या सुमारास) केंब्रिजसारखी किती अभ्यासाची केंद्रे होती, रॉयल अ‍ॅकॅडेमीसारख्या किती संस्था होत्या, किती जर्नल त्याकाळी भारतातून येत होती इत्यादी इत्यादी. २० व्या शतकाच्या सुरवातीला देशातील आघाडीची व्यक्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहित होती हा एक तुलनात्मक मुद्दा म्हणून लिहिला आहे. युरोपात त्यापूर्वी दोनेकशे वर्षांपूर्वी फोरिअर सिरीजसारखे (जी आजही-- २०१५ मध्येही डिग्री लेव्हललाच शिकवली जाते-- प्राथमिक शाळेत नाही) पेपर 'lack of rigor' या कारणाने नाकारले जात होते. अशा प्रकारचे काम भारतात त्यावेळी होत होते का हा प्रश्न आहे. तसे काम युरोपात होत होते आणि त्याचा प्रचंड फायदा त्यांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीत मिळाला याविषयी कोणालाच शंका नसावी.
कॅल्क्युलसचा पाया म्हणजे इन्फायनाईट सेरीज, केरळ स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मधले लोक यात चँपियन होते. कॅल्क्युलसच्या जवळ गेले होते, पण थोडक्यात राहिले असे त्यांचे काम पाहून नक्कीच म्हणता येते.
अशा थोडक्यात राहिलेल्या गोष्टीचा काहीच उपयोग नसतो. पाणी ९० अंशापर्यंत तापवले तर ९०% वाफ कधीच मिळणार नाही. सगळ्या भारतीयांना अडाणी म्हणण्यात मला आनंद वाटतो आणि त्या हेतूने मी हे सगळे लिहिले आहे असा गैरसमज कुणाचाच नको.पण मी जे काही कॅल्क्युलसमध्ये अभ्यासले आहे त्यात भारतीय नाव अभावानेही दिसत नाही.डोक्यात ग्रे मॅटर असूनही, कष्ट घ्यायची तयारी आणि कुवत असूनही कुठल्याना कुठल्या कारणाने आपले लोक मागे पडले असे मला वाटते.पण आपले लोक मागे पडले होते हेच अनेकांना मान्य नसते.
कुठल्याही साईडचा दृष्टिकोन जास्त हिरीरीने मांडला की विशेषणे सुरू होतात आणि ते चूकच आहे.
नाही ब्वॉ. मी ही बाजू हिरीरीने वगैरे काही मांडत नाही. जे काही झाले त्यावर माझा विचार करून थोडीफार संगती लावायचा प्रयत्न करून लिहिले आहे. काहींना ते हिरीरीने वाटत असेलही. मी स्वतः भारतीय आहे म्हणून आपले लोक मागे पडले किंवा युरोपिअन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे होते हे म्हणायचेच नाही आणि तसे कोणी म्हटले तर भारतीयांना शिव्या घालण्यात त्या माणसाला आनंद मिळतो वगैरे दुराग्रह तर मी नक्कीच बाळगत नाही हे तर नक्कीच. (इतर मिपाकरांसारखाच एक भारतीय) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 08:24 नवीन
माझा मुद्दा अधिक ब्रॉड आहे. भारतात त्याकाळी (१७००-१८०० च्या सुमारास) केंब्रिजसारखी किती अभ्यासाची केंद्रे होती, रॉयल अ‍ॅकॅडेमीसारख्या किती संस्था होत्या, किती जर्नल त्याकाळी भारतातून येत होती इत्यादी इत्यादी. २० व्या शतकाच्या सुरवातीला देशातील आघाडीची व्यक्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहित होती हा एक तुलनात्मक मुद्दा म्हणून लिहिला आहे. युरोपात त्यापूर्वी दोनेकशे वर्षांपूर्वी फोरिअर सिरीजसारखे (जी आजही-- २०१५ मध्येही डिग्री लेव्हललाच शिकवली जाते-- प्राथमिक शाळेत नाही) पेपर 'lack of rigor' या कारणाने नाकारले जात होते. अशा प्रकारचे काम भारतात त्यावेळी होत होते का हा प्रश्न आहे. तसे काम युरोपात होत होते आणि त्याचा प्रचंड फायदा त्यांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीत मिळाला याविषयी कोणालाच शंका नसावी.
जुन्या काळी जी नालंदा-तक्षशिला वगैरे विद्यापीठे होती ती तोपर्यंत बहुतेक नष्ट झालेली होती. परंतु याचा अर्थ असा नाही की ऑल वॉज़ लॉस्ट. चार भाग होते मोस्टलि या काळात जिथे गणित म्हणा किंवा काव्य-व्याकरण-तत्त्वज्ञान अशा पद्धतीचे काम होत असे. उत्तरेत वाराणसी, महाराष्ट्रात वाई-सातारा व पैठण, दक्षिणेकडे तंजावर आणि पूर्वेला बंगाल अशा चार ठिकाणी बरेच काम झालेले आहे. किम प्लोफ्कर यांच्या "मॅथेमॅटिक्स इन इंडिया" या ग्रंथात याचा सारांश दिलेला आहे तो बघून सांगतो. बाकी १८०० पर्यंत युरोपीय गणितशास्त्र खूपच प्रगत झाले होते यात शंकाच नाही. पण त्याचा प्रवास अंमळ वेगळा आहे. युरोपीय गणिताचे मूळ म्हणजे ग्रीक गणित. अन ग्रीक लोक त्यांच्या भूमितीकरिता व प्रमेय-सिद्धता या पद्धतीकरिता प्रसिद्ध आहेत. पायथागोरसने "प्रूफ" ही कन्सेप्ट शोधून काढल्यापासून युरोपात तिचा प्रभाव राहिलेला आहे. तुलनेने अलजेब्रा-बीजगणित ही शाखा जरा नंतरच तिथे उदयाला आली म्हटले तरी चालेल. भारतात जे गणित होते त्याला तितकी प्रतिष्ठा नव्हती असे म्हणायला वाव आहे. मॅथेमॅटिक्स या शब्दाचा अर्थ पाहिला तर त्याचा गणित या शब्दाशी काही संबंध नाही. एक ज्ञानशाखा असाच अर्थ आहे. याउपट गणित या शब्दाचा अर्थच एकदम उपयुक्ततावादी आहे- जे गणले जाते ते गणित. यज्ञवेदी बनवण्यासाठी असो किंवा पंचांगासाठी असो, जी आकडेमोड लागते ती म्हणजे गणित. त्याची डिव्हेलपमेंट जशी गरज लागेल तसतशी होत गेली, त्या स्टाईलमध्ये प्रूफ वरती अक्धी स्ट्रेस दिला गेला नव्हता. म्हणजे एखादे प्रमेय दिले तर ते का बरोबर आहे असे सांगणारे स्पष्टीकरण दिले जायचे, पण ग्रीक स्टाईलमध्ये जितके डीटेल्स असायचे तितके डीटेल्स त्यात नसत. आणि हे डीटेल्सही मुख्य ग्रंथात नसून त्यावरील अर्थबोधिनी टीकेतच मुख्यतः असत. हे विवेचन अशाकरिता दिले की तुम्ही जो रिगरचा मुद्दा काढला तो भारतीय संदर्भात अंमळ गैरलागू आहे. याचा अर्थ असा नाही की भारतीय गणित फक्त ट्रायल अँड एररनेच पुढे जायचे. काहीएक मेथड नक्कीच होती, पण स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन वेगळी होती. अन रिगर या पैलूवर भर न दिल्यामुळे गणिती रिझल्ट्स काही कमी दर्जाचे किंवा कमी प्रकारचेच मिळाले असे आजिबात नाही. बायव्हॅरिएट क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या इंटिजर सोल्यूशनचा चक्रवाल अल्गोरिदम ब्रह्मगुप्ताने ६२८ साली शोधून काढला, तो युरोपात इंडिपेंडंटली डिस्कव्हर केला गेला त्यानंतर हजारेक वर्षांनी, शिवकाळाच्या आसपास. अशी अजूनही काही उदाहरणे सांगता येतील. १८ व्या शतकात गणिती काम तुलनेने थंडावले होते हे जरी खरे असले तरी नवीन "ज्योतिष" (जुन्या काळी अ‍ॅस्ट्रॉनॉमीलाही ज्योतिषच म्हणायचे) हे जुन्या सिद्धांतांच्या चौकटीत बसवायचे काम १८३५ सालीही सुरू होते असे दाखवणारे काही पुरावे आहेत. असो. भारतीय विद्याभ्यासाचा अस्त होत होता त्याच सुमारास युरोपीय ज्ञान अधिकाधिक गतीने प्रगत होत गेले ही वस्तुस्थिती नाकारण्यात काहीच अर्थ नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की काहीशे वर्षे अगोदर (मी १५००च्याही नंतर, काही केसेसमध्ये अगदी १७५० पर्यंत सांगतोय) युरोप आणि भारत यांमधील गणिती ज्ञान तुल्यबळ होते, काही बाबतीत युरोपच्या वरचढ होते. पण नंतर युरोपने खूपच मोठी मजल मारली. त्या काळाच्या अगोदर तुम्हांला अपेक्षित असलेली इकोसिस्टिम अस्तित्वात होती पण वेगळ्या स्वरूपात. ऑक्सफर्ड काय किंवा केंब्रिज काय, या संस्थांना अव्याहतपणे रॉयल सपोर्ट होता. मुस्लिम काळात अगोदरची विद्यापीठे नष्ट झाली, त्यांची जागा लोकल स्कूल्सनी घेतली. पण असे असूनही बौद्धिक औटपुटमध्ये फार मोठा फरक पडलाय असे कुठे दिसत नाही. फार लांब कशाला जा, भास्कराचार्य स्वतः कुठल्या तत्कालीन मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकल्याचे दिसत नाही. तेव्हा सेंट्रलाईझ्ड नसली (विंडोज किंवा मॅक ओएस) तरी लिनक्ससारखी एकोसिस्टिम भारतात नक्कीच होती आणि तिचा औटपुटही तितकाच उत्तम होता असे दिसून येते. फक्त ही सिस्टिम १८ व्या शतकात या शाखेपुरते पहायचे तर तितकीशी चालली नाही. याचा अर्थ त्याच्या अगोदर काही नव्हते असा नव्हे. मी बर्‍याचदा हाच पॉइंट मांडतो आहे कारण १८ व्या शतकात जे होते त्यावरून सार्वकालिक अनुमाने काढण्याची चूक होऊ नये.
अशा थोडक्यात राहिलेल्या गोष्टीचा काहीच उपयोग नसतो. पाणी ९० अंशापर्यंत तापवले तर ९०% वाफ कधीच मिळणार नाही. सगळ्या भारतीयांना अडाणी म्हणण्यात मला आनंद वाटतो आणि त्या हेतूने मी हे सगळे लिहिले आहे असा गैरसमज कुणाचाच नको.पण मी जे काही कॅल्क्युलसमध्ये अभ्यासले आहे त्यात भारतीय नाव अभावानेही दिसत नाही.डोक्यात ग्रे मॅटर असूनही, कष्ट घ्यायची तयारी आणि कुवत असूनही कुठल्याना कुठल्या कारणाने आपले लोक मागे पडले असे मला वाटते.पण आपले लोक मागे पडले होते हेच अनेकांना मान्य नसते.
आयला, उपयोग नसतो म्हणजे काय? कॅल्क्युलसचा शोध कोण लावला याबद्दलचा वाद थोडीच आहे हा. त्या विषयाशी काही पायाभूत संशोधन भारतीयांनी युरोपच्या अगोदर केले होते इतकाच मुद्दा आहे. न्यूटन-लेबनिझ द्वयीचे क्रेडिट अशासाठी की त्यांनी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रल याची नवीन थेरी मांडली आणि त्या आधारे अनेक प्रॉब्लेम्स सोडवू शकले. पण त्याच्या अगोदरच्या काही स्टेपवर भारतीय पुढे होते हे कळाले तरी बास झाले. अगोदर लोकांना हे माहितीच नसते. भारतीय गणित = (स्युडो)वैदिक (स्युडो)गणित असे समीकरण मांडत बसतात. त्यांना नेमके आपल्या लोकांनी काय केले हे सांगणेही तितकेच आवश्यक आहे. आणि त्यासोबतच आपण मागे पडलो हे सांगणेही.
मी स्वतः भारतीय आहे म्हणून आपले लोक मागे पडले किंवा युरोपिअन तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे होते हे म्हणायचेच नाही आणि तसे कोणी म्हटले तर भारतीयांना शिव्या घालण्यात त्या माणसाला आनंद मिळतो वगैरे दुराग्रह तर मी नक्कीच बाळगत नाही हे तर नक्कीच.
मलाही दुराग्रह बाळगण्यात काही राम वाटत नाही. पण या प्रश्नाच्या दोन्ही बाजू समोर येणे आवश्यक आहे. जुन्या लोकांनी जे केले त्याप्रमाणे त्याचे माप त्यांच्या पदरात टाकणे आणि जिथे इतरांपेक्षा ते मागे किंवा पुढे होते त्याची कबुली देणे हे आवश्यकच आहे. जाता जाता एक छोटासा मुद्दा: भारतीय गणितावरचे ग्रंथ पाहिले तर ती प्रेसेंटेशन स्टाईल किती किचकट आणि गैरसोयीची होती हे लक्षात येईल. आणि ब्रिटिश काळात आलेली स्टाईल तुलनेने किती सोपी होती हे कळाल्यावर मग युरोप्यन स्टाईलचा अंगीकार का विनासायास झाला हे लगेच समजून येईल. सर्वांत अगोदर म्हणजे हिंदूंची धर्माची आणि शास्त्रांची कॉमन भाषा = संस्कृत. गणितग्रंथ बहुधा याच भाषेत लिहिले जात. त्यामुळे संस्कृत येणे आवश्यक होते. पण ते ठीक आहे. युरोपातही १८०० च्या अगोदर सगळे शास्त्रीय ग्रंथ लॅटिनमध्येच लिहिले जात. ग्रंथ लिहायचा तर तो पद्यातच अशी जुनी रूढी होती. त्यामुळे वृत्ते, पद्यरचना, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, इ. चे ज्ञान असणे आवश्यक. आता गणितग्रंथ आहे म्हटल्यावर त्यात आकडे येणार हे ओघाने आलेच. त्यामुळे आकडे (एक, द्वि वगैरे) वृत्तात बसले पाहिजेत. त्यासाठी ३ सिस्टिम्स होत्या: पहिल्या सिस्टिममध्ये १ = आकाश, २ = पाय, ४ = वेद वगैरे कन्व्हेन्शन्स होती. म्हणजे वेद हा शब्द लिहिला तर त्याजागी ४ हा आकडा अभिप्रेत आहे. दुसर्‍या सिस्टिममध्ये १ ते ० साठी वेगवेगळी अक्षरे. उदा. १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ० क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म म्हणजे १ साठी क, ट, प यांपैकी कुठलेही अक्षर, ९ साठी झ किंवा ध, वगैरे. तिसरी सिस्टिम आर्यभटाने वापरलेली. बाकी कुणी फारशी वापरलेली दिसत नाही. त्यात प्रत्येक स्वर आणि व्यंजनाला किंमत होती, उदा. जर न = ३ आणि ई = ४ तर नी = ७ वगैरे. (नक्की असेच नाही पण अशा प्रकारचे) तर असा सगळा बोंगा घेऊन, संस्कृत व्याकरणाचे टनभर नियम पाळून ते वृत्तांच्या सांगाड्यात बसवायचे. गद्य विवेचनासाठी वेगळी टीका लिहीत असत. त्यात एक्सरसाईझेसचे हिंट्स & सोल्यूशन्स वगैरे असत. मुख्य ग्रंथ मात्र एकदम गोळीबंद असे. बाकी अगदी भूमितीवरील विवेचनातही हस्तलिखितांत क्वचितच डायग्रॅम वगैरे दिलेल्या सापडतात. तुलनेने इस्लामिक व युरोपियन ग्रंथांत मात्र नेहमीच साध्या गद्यात स्पष्टीकरण दिलेले असते. पाहिजे तिथे डायग्रॅम्सही भरपूर असतात. त्यांचा भर भूमितीवर असल्याने ते साहजिकही आहे, पण बाकी पद्य वगैरे भानगड नाही. सारांशः भारतीय स्टाईलची काही लिमिटेशन्स नक्कीच होती आणि काही वर्षांत भारतीय नक्कीच मागे पडले. पण त्याअगोदर आपले काँट्रिब्यूशन्स खरेच अतिउत्तम आहेत. मजा म्हणजे जे लोक भारतीय संस्कृती हीच सर्वश्रेष्ठ संस्कृती वगैरे बोंबा मारत बसतात त्यांना खर्‍या अभिमानास्पद इतिहासाशी काही घेणेदेणे नसते असेच दिसून आलेले आहे. फालतू वैदिक गणिताच्या नावाने सगळीकडे मिशी पिळणार्‍ञांना आपल्याकडे नक्की काय काय भारी होते हेच कळत नाही त्यामुळेही ते डोक्यात जातात. असो. प्रतिसाद विस्कळीत झालाय बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रचेतस Mon, 12/07/2015 - 08:34 नवीन
_/\_ अती उच्च प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/07/2015 - 08:38 नवीन
+१०००, संतुलित प्रतिसाद. विषेशतः हे वाक्य वर्मावर बोट ठेवणारे आहे... मजा म्हणजे जे लोक भारतीय संस्कृती हीच सर्वश्रेष्ठ संस्कृती वगैरे बोंबा मारत बसतात त्यांना खर्‍या अभिमानास्पद इतिहासाशी काही घेणेदेणे नसते असेच दिसून आलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संदीप डांगे Mon, 12/07/2015 - 08:52 नवीन
हजार दंडवते घातली तरी कमी आहेत बॅट्यासमोर. हा तर एक स्वयंभू लेखच झाला. ह्याला बुकमार्क करता यावे म्हणून मेनबोर्डावर टाका. _/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अभ्या.. Mon, 12/07/2015 - 09:01 नवीन
+१११११११११११११११११११११११११११११११११११ अर्थात अर्थात. बॅटोबाची जडण घडण कशा उच्च व्यासंगाच्या पार्श्वभूमीवर झालीय याचा मिरजक्षेत्री अनुभव आला आहेच. अगदी स्वच्छ शब्दात बॅटोबासारख्या बुध्दीमंताचा सहवास (आणि तो आम्हाला ही स्नेही मानतो हे) मिपावरची सर्वात मोठी उपलब्धी आहे. थँक्स रे बॅट्या. यू डिझर्वज मच मोअर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुनील Mon, 12/07/2015 - 10:00 नवीन
ही संपूर्ण उपचर्चा वेगळ्या धाग्यात हलवली तर उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/07/2015 - 09:07 नवीन
प्रतिसाद आवडला. एकूणच जर्नल, सायटेशन, रेफरन्सेस, पेपर नक्की कोणत्या प्रोसेसमधून स्विकारला जाईल इत्यादी पध्दती युरोपिअनांनी खूपच व्यवस्थित आखून ठेवल्या आहेत. आणि नवे तंत्रज्ञान विकसित होताना या पध्दतींचा त्यांना नक्कीच फायदा झाला. या सगळ्या गोष्टीत भारतीय कमी पडले.आणि युरोपिअनांशी संपर्क आल्यानंतर हा फायदा नक्कीच आपल्याला झाला. बाकी मी सगळे लिहिले त्यामागे भारतीय लोक बिनडोक होते असे मला म्हणायचे आहे हा उद्देश नक्कीच नव्हता आणि नाही.कुठल्या का कारणाने असेना आपण मागे पडलो होतो. ते कारण नक्की कोणते हे तुम्ही खूपच चांगले समजावून सांगितले आहेत. ग्रंथ पद्यात असणे वगैरे गोष्टी मला माहित नव्हत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मालोजीराव Mon, 12/07/2015 - 09:27 नवीन
जोरदार ब्याटिंग _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Mon, 12/07/2015 - 09:41 नवीन
बॅटूकाचार्य...दण्ड्वत घ्या आम्च्याक्डून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
श
शलभ Mon, 12/07/2015 - 09:45 नवीन
खतरनाक व्यासंग. प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाखु Mon, 12/07/2015 - 10:48 नवीन
बॅटोबा,बॅटुक्नाथ्,बॅट-महाशय्,बॅट-संदर्भी............ अता बोलणे नाही. मिरजेत "पंढरी" पाहिलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 12/07/2015 - 11:06 नवीन
मस्त हो … आज मॅथेमॅटिक्स इन इंडिया शोधायला हवा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 12/07/2015 - 14:09 नवीन
ब्याटोच्छीष्ट ज्ञानपूर्ण _______/\________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/10/2015 - 23:17 नवीन
आता मिपाभूषण पुरस्कार कोणाला द्यावा याची पंचाईतच झाली म्हणायची. एकदम कडक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 12/14/2015 - 16:49 नवीन
बॅट्या, बॅट्या, लेका, काय करू तुझं? :) (अवांतर : प्रतिसाद विस्कळीत झालाय बहुधा. ---> नक्कीच... मग काय करतोयेस त्याबद्दल? :ड)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाखु Wed, 12/16/2015 - 06:14 नवीन
बॅट्या, बॅट्या, लेका, काय करू तुझं? :)
तुम्ही काही करण्यापूर्वीच झालय काय व्हायचं ते !!!! बॅट्याच्या काही मोजकया चाहत्यांपैकी एक (खंतावलेला) चाहता प्रतिसादमात्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
पिवळा डांबिस Wed, 12/16/2015 - 06:22 नवीन
बॅट्याच्या काही मोजकया चाहत्यांपैकी एक (खंतावलेला) चाहता
बिका आहे, आम्ही आहोत, आणि साक्षात समर्थ तुम्ही आहांत! असंख्य आहेत!! मग "समर्थाचिया आयडॉल्या वक्र पाहे, असा सर्व मिपातळी कोण आहे?" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस Wed, 12/16/2015 - 06:42 नवीन
आम्ही पण चाहते ब्याट्याचे. ब्याट्या म्हणजे एक मिपाकर, एक मित्र आणि एक उत्तम माणूसही. ब्यान उठवावा अशी जाहिर विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 12/16/2015 - 06:55 नवीन
बॅट्यावर बॅन ठसला? वाघुळाला फास बसला.. कट कुठे नि कसा शिजला? राजहंस माझा निजला... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 12/16/2015 - 07:00 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सूड गुरुवार, 12/17/2015 - 09:49 नवीन
well....असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/17/2015 - 13:30 नवीन
:( खाटुकम्यान कु वापिस बोलीव,जिसके हम साथ है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
न
नाव आडनाव गुरुवार, 12/17/2015 - 09:54 नवीन
विनंतीला अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. Wed, 12/16/2015 - 07:07 नवीन
काय नसते होत असल्या श्लोकांनी. तो खुपतच होता आधीपासून. हाकारे घालून उकसवून शिकार करवलीय त्याची. च्यायला त्याची बाजू मांडायची पण चोरी करुन् ठेवलीय. तरुणाइच्या जोशात तो ज़रा वहावला तरी त्याचा मुद्दा जेनुइन होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
च
चौकटराजा गुरुवार, 12/17/2015 - 07:34 नवीन
आम्ही स्वतः ला अगदी " चौफेर " समजायचो. पाहुणे म्हणून इथे येताना जाणवले आपण बालिश बहु बायकात ( अनाहिता माफी असावी) बडबडला असे आहोत. म्हणून नाव चौफेर च्या ऐवजी चौकटराजा म्हणजे कमी आय क्यू असलेला (पण त्यामुळेच मिपावर नम्र राहिलो राव ) घेतले. प्रचेतस, आत्मबंध, ब्याटम्यान, डॉ म्हात्रे , डो खरे, एस , अभ्या , चित्रगुप्त, ग्यारी असे व्यासंगी पाहिले अन आपण घेतलेल्या नावाचे सार्थक झाले असे वाटले . वरील प्रतिसाद अशा एका व्यासन्गाचे उदाहरण ठरावे. पण आपल्या इतिहासापेक्षा आपल्या देशाचा वर्तमान अभ्यासणे मला अधिक मोलाचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मृत्युन्जय गुरुवार, 12/17/2015 - 10:35 नवीन
सुरेख प्रतिसाद. इतक्या व्यासंगी माणसाला मिपाने बॅन करावे हे नक्कीच मिपाचे दुर्दैव. बॅट्याला परत आणले जावे या विनंतीला जोरदार अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 12/06/2015 - 12:04 नवीन
प्लसच १ (+१) शिवाय हे ब्रिटिश किती हलकट होते (राज्यकर्ते म्हणुन अन तसंही) ह्याचे असंख्य नमुने आहेत उदा पहिल्या विश्वयुद्धानंतर फ्रेंच अन ब्रिटिश राष्ट्रप्रमुख अक्षरशः हमरीतुमरी वर आले होते (लॉयड जॉर्ज अन क्लेमेंसु एकमेकांवर धावून गेले होते ते प्रकरण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नितिन थत्ते Sat, 12/12/2015 - 18:35 नवीन
हे आपले असेच जनरल बर्का..... रेल्वे-तारायंत्रे- स्वतःच्या फायद्यासाठी आणलेली यंत्रे आहेत. फुकटचे उपकार नव्हेत ते. अन हे अन्य देशांनीही त्यांच्या कॉलनीजमध्ये केलेले आहे. सो ब्रिटनचा युनिकनेस त्यात नाही. वर्तमानपत्रे हा प्रकारही त्यातलाच.>> टाटांनी कैतरी लोणावळ्याला धरण बांधून खोपोलीला वीज निर्मिती केंद्र उभारलं ही मोठीच देशसेवा केली असं दर्शवणारा एक मेसेज नुकताच व्हॉट्सअ‍ॅपवर आला होता. त्या न्यायाने ब्रिटिशांनी देशाचा विकास केला हे म्हणणे योग्यच ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विकास Sat, 12/05/2015 - 01:45 नवीन
यात अमेरिकन, ऑस्ट्रेलियन्स, ब्रिटीश व स्थानिक चिनी असे सर्वच-- हे नामकरण अधिकृत रीत्या झाल्यावर त्या शहरास नव्या नावाने संबोधू लागले. नामकरणाआधी देखील लुफ्तांसा एअरलाईनच्या नकाशात "बाँबे (मुंबई)" असे पाहीले होत आणि सुखद धक्का बसला होता. आत्ता देखील जुने मराठी मुंबईकर (त्यात पुण्यापर्यंतचा भाग आला ;) ) बर्‍याचदा सवयीने "बाँबे"च म्हणताना ऐकतो. तर बरेचसे महाराष्ट्राबाहेरील अमराठी हे मुंबई म्हणताना ऐकले आहेत. (अर्थात मर्यादीत विदा आहे!) पण त्याचेही मला इतके काही वाटत नाही. (जरी मला मुंबईच म्हणायला आवडत असले तरी) पण अमेरीकेतील भारतीय जेंव्हा शास्त्रीय अथवा इतर कुठल्याही लेक्चर/प्रेझेंटेशन मधे रिव्हर गंगा म्हणायच्या ऐवजी रिव्हर गँजीस म्हणतात तेंव्हा डोके फिरते.... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
अ
अवतार Sat, 12/05/2015 - 07:15 नवीन
रिव्हर गंगा म्हणायच्या ऐवजी रिव्हर गँजीस म्हणतात तेंव्हा डोके फिरते
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
कानडाऊ योगेशु Sat, 12/05/2015 - 09:00 नवीन
स्लमडॉग मिलिनियेअर जेव्हा प्रसिध्द झाला त्यानंतर चित्रपटामधल्या कलाकार/दिग्दर्शक मंडळींची मुलाखत पाहीली होती. त्यात डॅनी बॉयल न चुकता नेहेमी मुंबई मुंबई असाच उल्लेख करत होता मात्र चित्रपटातील हिरोईन फ्रेडा पिंटो मात्र नेहेमी बॉम्बे असाच उल्लेख करत होती. ह्या इंटरव्यु नंतर फ्रेडा पिंटो कायमचीच डोक्यात गेली. माझ्या कंपनीतही एक गुजराथी स्त्री कलिग आहे. मुंबईत पार्ल्याला राहते. जेव्हा कधी मुंबईचा उल्लेख चर्चेत येतो तेव्हा न चुकता बॉम्बेच म्हणत राहते. पण मद्रास वगैरेचे मात्र व्यवस्थित चैनै असा उल्लेख करते. अश्या लोकांना मी हाय क्लास पिपल विथ थर्ड क्लास मेंटॅलिटी असे म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पिवळा डांबिस Fri, 12/11/2015 - 06:47 नवीन
धन्यवाद प्रदीपजी! बघा, गोव्याच्या बाबतीत नसलं तरी कुठं ना कुठं तरी तुमचं आणि आमचं एकमत आहे!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 08:49 नवीन
बाकी काही असो, पण औरंगाबाद शहर औरंगजेबाने वसवले नाही तर फक्त रीनेम केलेले आहे- नाशिकचे गुलशनाबाद आणि मिरजेचे मूर्तजाबाद वगैरे. यादवकाळापासून ते शहर अस्तित्वात आहे. त्याचे जुने नाव खडकी असे होते. अन फक्त नामांतराने काही होत नसले तरी प्रत्येक पोलिटिकल पॉवर आपापल्या आयडिऑलॉजीप्रमाणे नावे बदलणे, भाषा बदलणे इ. करतच असते. त्यात विशेष ते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 09:01 नवीन
तुमचे म्हणणे रास्तच आहे. ही शहरे अगदी पुराणकाळापासून असतील. पण औरंगजेबाने त्यात वॅल्यूअ‍ॅडिशन करूनच नामकरण केले असेल ना? (म्हणजे केले की नाही ते माहित नाही मला,) कि नुस्ता आयत्या शहरावर नाव माझं असं केलं? माझ्या माहितीनुसार नाशिकची फुले त्याला आवडायची म्हणून त्याने नाशिकचे नाव गुलशनाबाद केले. नामकरण करण्याला माझा विरोध नाही पण ते तेव्हाच योग्य वाटतं जेव्हा तुम्ही त्या शहराचा, वास्तूचा, संस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकता. त्यावेळी आपण केलेल्या कष्टाचे प्रतिक म्हणून नाव देणे, बदलणे योग्य आहे. पण आपल्याकडे सत्तेत असलेली लोक फक्त नावं बदलायचे पराक्रम करतात ते अजिबात योग्य नाही. बेंग्लोर चे बंगरुळू झालं ते तीथे झालेल्या सॉफ्टक्रांतीमुळे बदललेल्या शहराला शोभतंही. पण कलकत्ता चे कोलकाता होऊनही गचाळपणा कायम राहत असेल तर उपयोग नाही. पॉलिटिकल आयडॉलोजी काय करायची तिथे. सारे जनमत भडकवण्याचे आणि केंद्रीकरणाचे उद्योग. जमीनी फायदा काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 09:38 नवीन
पण औरंगजेबाने त्यात वॅल्यूअ‍ॅडिशन करूनच नामकरण केले असेल ना?
तसे तर काय दिसत नाय ब्वा. कुठे विदा असल्यास बघायला आवडेल. पण नामांतर करण्याचा घाट घातला की लगेच "नामांतर आणि प्रगती" ची लिंक लावणे याला कै अर्थ आहे? बहुतेकदा बदल खुपणारी लोक्सच या लिंकेआड दडून वार करू पाहतात. त्यांच्या जुन्या अस्मितेला धक्का पोचलेला चालत नाही त्यांना. अस्मितांचे युद्ध आणि बेसिक गव्हर्नन्स यांची गल्लत का करावी? जशी आपली अस्मिता आहे त्याप्रमाणे प्रतिसाद द्यावा किंवा उदासीनही रहावे- चॉईस ज्याची त्याची. पण नामांतराला असा शालजोडी विरोध काही कामाचा नाही असे आपले माझे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 09:57 नवीन
अहो मी प्रश्न विचारला आहे. उत्तर माहित असते तर विदाच दिला असता की. "नामांतर आणि प्रगती" अशी लिंक लावू पाहणार्‍यांच्या 'जुन्या अस्मिता असतात आणि त्यांना धक्का लागतो म्हणूनच विरोध होतो' हे कसे ठरले? नामांतरास विरोध असणारे न्युट्रल नसू शकतात काय? माझे मत: नामांतर वैगेरे चळवळी फक्त राजकिय अस्मितेवर आधारित आहेत. त्याने नक्की काय फायदा होतो हे कळत नाही. नुकसान होते हे मात्र कळते. मी सरसकट नामांतर विरोधात आहे असे ही नाही हे वरच्या प्रतिसादात दिलंय. बर्‍याच नामांतर चळवळीमध्ये हेकटपणा, जबरदस्ती, वैचारिक बैठक व इतिहासाचा शून्य अभ्यास असतो हे दिसून येते. ह्यास माझा विरोध आहे. नामांतराची निकड ज्यांना भासू लागते त्यांच्याकडे करण्यासारखी इतर काही विधायक कामे नाहीत असे वाटते. औरंगाबादचे संभाजीनगर करू नका असे मी म्हणणार नाही. करायचे असेल शहर मुळापासून बदलण्याच्या मोहिमेचा तो एक भाग असू द्यावा. नुसत्या खिंडारांवर संभाजीराजांचं नाव लावणे पटणेबल नाही. बाकी 'जुन्या अस्मितांना धक्का लागणे' हा शब्दप्रयोग आपण काय हेतुने केला ते कळले तर आभारी राहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 10:05 नवीन
नामांतरास विरोध असणारे न्युट्रल नसू शकतात काय?
अगदी असू शकतात, नव्हे अनेकजण असतात. आणि तसे मी अगोदरच्या प्रतिसादात म्हटलेही आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर करू नका असे मी म्हणणार नाही. करायचे असेल शहर मुळापासून बदलण्याच्या मोहिमेचा तो एक भाग असू द्यावा. नुसत्या खिंडारांवर संभाजीराजांचं नाव लावणे पटणेबल नाही.
सहमत.
बाकी 'जुन्या अस्मितांना धक्का लागणे' हा शब्दप्रयोग आपण काय हेतुने केला ते कळले तर आभारी राहीन.
एक उदाहरण- बाँबे ऐवजी मुंबई या नामांतरणामुळे कॉस्मॉपॉलिटन चेहरा हरवला, नैतर काय होतं बाँबे, सध्याची घाटी मुंबै, इ.इ. छाप गळे काढणारे लोक अधूनमधून आपले लेखरूपी पो टाकत असतात त्यातून याची झलक मिळावी. आपली कल्चरल सद्दी संपल्याचे दु:ख ज्यांना असते ते असे बोलतात. त्यांसंदर्भात हा शब्दप्रयोग केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 10:41 नवीन
अच्छा. आलं ध्यानात. तरी 'मुंबई'वर सूड उगवण्यासाठी त्यांनी 'सोबो' पक्षी 'साउथबॉम्बे' हा हुच्च्ब्रू प्रकार शोधून काढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा