Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

उ
उडन खटोला
Fri, 12/04/2015 - 02:17
🗣 384 प्रतिसाद
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

प्रतिक्रिया द्या
66568 वाचन

💬 प्रतिसाद (384)
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 11:17 नवीन
बायदवे वास्को द गामाने तरी गोव्यावर राज्य केलं का कधी? त्याला मानणार्‍या पोर्तुगीजांनी त्याच्या स्मरणार्थ शहराचे नाव ठेवले. सध्याची मागणीही तीच आहे. संभाजीराजांना मानणारे लोक त्यांचे नाव ठेवा अशी मागणी करताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
म
मालोजीराव Fri, 12/04/2015 - 12:15 नवीन
इथले प्रतिसाद वाच, संभाजीराजांना काय काय नावाने हिणवलंय बघ.एकंदर नामांतर झालं तर "काहीही फरक पडणार नाही " अस म्हणता येणार नाही Backdoor move to rename Vasco after Maratha king?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 12:25 नवीन
अगदी अगदी. बाकी गोवेकरांमध्ये अशी कीडही कार्यरत आहे हे पाहून रोचक वाटले. फक्त छत्रपतीच नव्हे तर एकुणात मराठी माणसाचाही द्वेष कसा मस्त ठासून भरलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 12:33 नवीन
वास्कोत प्रॉपर्टी रेट चा रेंज काय असतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 12:59 नवीन
नो आयड्या, पण त्याचा इथे संबंध काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 13:28 नवीन
तसंही गोव्यात प्रॉपर्टी असणे रोचक प्रकार असेल. त्या शिवाय डेमोग्राफीक बदलात फुलं न फुलाची पाकळी बदल करणे हाच कोणत्याही घेटोवर उपाय असू शकतो असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 13:40 नवीन
अच्छा तसं होय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 13:43 नवीन
नुसतंच तक्रार करत बसण्यात काय हशील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कपिलमुनी Fri, 12/04/2015 - 13:31 नवीन
फक्त मराठी नाही तर तिथे भारतीय लोकांबद्दल द्वेष आहे. अजूनही तिथले काही लोक मनाने पोर्तुगीज आहेत. आणि कित्येक हॉटेल्समधे फक्त परदेशी लोकानाच प्रवेश असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 13:35 नवीन
कित्येक हॉटेल्समधे फक्त परदेशी लोकानाच प्रवेश असतो.
हे नक्की का? बाकी मनाने पोर्तुगीज असलेले लोक असणे यात कै आश्चर्य नाही. अजूनही भारतात जन्मल्याची लाज वाटणारे लोक अनेक आहेत आपल्याकडे. खरे मेकॉलेपुत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 13:39 नवीन
पुर्तुगीज लोकही तसेच इंग्रजी विकिपीडियावर पोर्तुगाल विषयक लेखात त्यांच्या कॉलोनीला पास्टटेन्स एवजी प्रेझेंट टेन्स मध्ये अट्टाहासाने वापरला जात होता. (सध्याची स्थिती माहित नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मालोजीराव Fri, 12/04/2015 - 13:40 नवीन
मला अनुभव आहे, रेड डोअर होस्टेल अंजुना …तिथे राहण्यासाठी पासपोर्ट ची कॉपी ठेवावी लागली…भारतातल्या भारतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 13:44 नवीन
हे चिंताजनक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 13:48 नवीन
च्यायला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
य
यशोधरा Fri, 12/04/2015 - 14:00 नवीन
पोलीस स्टेशनला तक्रार केली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मालोजीराव Mon, 12/07/2015 - 11:57 नवीन
रेशनकार्ड वर बदलेले नाव दिसत आहे, संभाजी आणि कंसात वास्को Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मालोजीराव Fri, 12/04/2015 - 11:17 नवीन
अगदी बरोबर,झेवियर ने संभाजीराजांपासून गोवा वाचवला अशी धारणा होती , लोकगीते सुद्धा होती … अजूनही असावीत म्हणून गमतीने म्हणालो . छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याचं राज्य पादाक्रांत केलं नव्हतं, फक्त मोठ्या प्रमाणावर आक्रमण केलं होतं. स्थानिक कर्तुत्ववान व्यक्तीचं नाव देणं जास्त योग्य ठरेल . 'मारियो मिरांडा' सुद्धा चालू शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
क
कपिलमुनी Fri, 12/04/2015 - 10:48 नवीन
पुणे विद्यापीठाचे नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले त्याने काय फरक पडला कोण जाणे ? बाकी नामांतर करायचे झाले की शाहू , फुले , आंबेडकर , शिवाजी महाराज , संभाजी महाराज आणि खपलेले राजकारणी एवढेच आठवतात. उद्योजक, खेळाडू यांची नावे आठवत नाहीत हे दुर्दैव!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 10:54 नवीन
हे बाकी खरेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मास्टरमाईन्ड Fri, 12/04/2015 - 11:55 नवीन
आणि एक शंका, वरील थोर व्य्क्तींची नावं दिल्यानं काय होणारै? ज्या त्या ठिकाणाला आपण भौगोलिक नावं का नाही ठेवत आपल्याकडं? जसं की पुणे विद्यापीठ, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, मराठवाडा विद्यापीठ, मुंबई पुणे एक्स्प्रेसवे (याला दोन नावं आहेत म्हणे.. एक पु.ल. देशपांडे आणि एक यशवंतराव चव्हाण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
पिशी अबोली Fri, 12/04/2015 - 11:01 नवीन
http://www.rediff.com/news/dec/26goa.htm वर प्रदीपजींनी जे सांगितलंय त्या संदर्भातला दुवा. हा वाद आजचा नाहीये. या बातमीतील संघाचे प्रतिनिधी म्हणून उल्लेख केलेल्या नावाव्यतिरिक्त इतर कुणाही मागणी करणार्‍याचा संघाशी/भाजपाशी संबंध नाही. शशिकलाताईंच्या काळातपण ही मागणी होतीच, पण तिला केंद्राने मान्यता दिली नाही असे दिसते. मगोपने 'कदंबनगर' वगैरेच्या ऐवजी 'संभाजी नगर' करायची मागणी करणे समजू शकतेच. बाकी त्यातल्यात्यात मागच्या काही वर्षांत झालेला बदल म्हणजे 'वास्को-दि-गामा' ऐवजी 'वास्को' एवढाच उल्लेख केला जातो, रेल्वे स्टेशनांवर वगैरे. (हजरत निजामुद्दिन-वास्को दि गामा गोवा एक्स्प्रेस म्हणेपर्यंत ट्रेन सुटायची वेळ यायची ;)) औरंगाबाद असा जनरल उल्लेख केल्यावर कुणाच्या डोक्यात औरंगजेब आणि गुलामीच्या खुणा काही लगेच येत नाहीत (नसाव्यात), तसंच वास्को म्हटल्यावर एक गोमंतकीय म्हणून मलातरी वास्को-दि-गामा आठवत नाही. पण त्याचे नाव बदलायचेच असल्यास त्याला एखाद्या गोवा मुक्ती संग्रामातील व्यक्तीचे नाव द्यावे असे वाटते. 'संभाजीनगर' उगाच आपलं!
पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने
बरं. -शुद्ध भारतीय पुणेरी सोवळ्या नवीन पिढीला रोज पाहणारी, पिशी
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 12/04/2015 - 14:18 नवीन
दुव्याबद्दल. आता ह्यात भाजपाचा हात आहे, म्हणणार्‍या मंडळीचा आवाज थोडा कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 11:03 नवीन
आमेरीकेत पुर्वी कोलंबस डे साजरा होत असे तोच आजकाल नेटीव्ह आमेरीकन दिवस म्हणुन साजरा केला जाऊ लागला आहे असे वृत्तांवरून दिसते. बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 12/04/2015 - 11:14 नवीन
बरोबर आहे कारण या कोलंबसाने अमेरिका शोधुन काढण्यापुर्वी तिथे केवळ आदिवासी राहत होते. त्यामुळे अमेरिका आज ज्या स्थानावर पोचली आहे त्याचे श्रेय कोलंबस आणि त्यानंतर त्याच्यापाठोपाठ तिथे पोचलेल्या गोर्‍यांना जाते. त्यांना कोलंबसाचे कौतुक वाटणे साहजिक आहे. तो त्यांचा माणूस होता. वास्को डि गामा आणि गोवा यांच्याबद्दल दुर्दैवाने असे म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोलंबस डे वेगळा आणि नेटिव्ह अमेरिकन डे वेगळा. नेटिव्ह अमेरिकन डे काही ठराविक राज्यात साजरा करतात आणि तो देखील वेगवेगळ्या दिवशी. नेटिव्ह अमेरिकन डे ची तारीख ठरलेली नसते तर दिवस ठरलेला असतो. कोलंबस डे बाय डिफॉल्ट १२ ऑक्टोबरलाच असतो आणि तो मला वाटते फेडरल हॉलिडे आहे. कर्मधर्म संयोगाने कधीकधी हे दोन्ही दिवस कधीतरी एकाच दिवशी येत असतील तर माहिती नाही. बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 11:14 नवीन
जसा विण्टर सॉल्स्टिसच्या प्रसंगी साजरा केला जाणारा पेगन सण पुढे ख्रिसमस म्हणून साजरा केला जाऊ लागला तसेच... बाञदवे ते ख्रिसमस ट्री वगैरे मूळ ख्रिश्चॅनिटीत कुठे आहे? हे सगळे जर्मानिक-नॉर्डिक लोकांचे घुसलेले प्रक्षिप्त प्रकार आहेत. येशू ख्रिस्त जन्मला आणि मरणही पावला इस्राएलमध्ये, तिथे बर्फ कुठून पडायला (एक्काकाका अता सौदीतले बर्फाचे फटू दाखवू नका बरे)? मूळ व्हर्जन साजरी करायची तर खजुराचे झाड पाहिजे होते तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 12:04 नवीन
ख्रिसमस ट्री वगैरे मूळ ख्रिश्चॅनिटीत कुठे आहे?
बरोबर, ख्रिसमस ट्री इझ्रायलात नव्हताच शिवाय त्यांच्या तत्वज्ञातही त्याला वस्तुतः स्थान असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 12:07 नवीन
मूळ व्हर्जन साजरी करायची तर खजुराचे झाड पाहिजे होते तिथे.
वृक्षपुजेला अथवा प्रतिकांना त्यांच्या तत्वज्ञानात स्थान असू शकत नाही. (सेलिब्रेशन मध्ये ख्रिसमस ट्री मनोभावे वापरणारे -भाव असेल तर- आपोआपच हिंदू होतात :) ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 12:14 नवीन
हिंदू धर्म प्राचीन काळी जगभर पसरलेला होताच की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 12:19 नवीन
झालं तरं मग प्रश्नच मिटला ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 12:24 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मितान Fri, 12/04/2015 - 12:09 नवीन
रोचक चर्चा !
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 12/04/2015 - 12:36 नवीन
एक चित्रपट शारुक आणी शरद कपुर होता. शारुक ची ईगल गॅंग आणी शरद ची बिच्छु गॅंग.. त्यात शरद शारुकला "ये वास्को शहर तेरे बाप का है क्या?" अस विचारतो. लेखातील वास्को शहर तेच आहे का ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/04/2015 - 12:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कपिलमुनी Fri, 12/04/2015 - 13:33 नवीन
शारुखाबाद असे सहिष्णू नामकरण करावे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कानडाऊ योगेशु Fri, 12/04/2015 - 13:53 नवीन
अजुन एक पर्याय. शर्दकपूर (जसे पंढरपूर नागपूर ). तसे हे नाव संस्क्रुत म्हणुन ही खपून जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 13:55 नवीन
हा हा हा, एकच नंबर. लय अवडले. बाकी शर्दक या संस्कृत शब्दातून (अर्थ? ते काय असतं?) शाहरुख हा यावनी शब्द आला अशीही मलमपट्टी करता येईल ते वेगळेच. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
अ
अजया Fri, 12/04/2015 - 12:44 नवीन
वाचतेय.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Fri, 12/04/2015 - 13:52 नवीन
आणखी एका शतकी धाग्याबद्दल उ.ख. याना शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
मोगा Fri, 12/04/2015 - 14:26 नवीन
महाराजांचे वारस सगळ्या प्रॉपर्टींचा उपभोग घेत मजेत असतील. आण इते बाकीचे लोक डोस्की फोडत आहेत. ..... डोस्को दि गामा
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 12/04/2015 - 16:19 नवीन
जसे तुमचे काका ओंरंग्या आणी निजामाचे वारस मज्या करत आहेत.. आणी तुमी वारंवारडु आयडी घेऊन स्वत:चे हसे करत आहात.. भोस्कु दे आता-जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Fri, 12/04/2015 - 18:49 नवीन
भगवदगीतेत लिवलय ! " हे राजा ! युद्धात तू जिंकलास तर इथले राज्य भोगशील आणि मेलास तर स्वर्गाचे राज्य भोगशील ! " हे सगळं राजाला बरं का ! सामान्य तानाजी युद्धात जिंकला तर तो कुठलं सुख भोगणार आणि तो मेला तर तो कुठल्या स्वर्गात जाणार , त्याच्या घरचा रायबा तूरडाळ कशी विकत घेणार ? हे गीताच काय कोणत्याच पुस्तकात नाही.. ( तानाजीऐवजी कसाब लिवलं तरी चालेल ! ) ..... त्यामुळे कोण कुठला राजा बायकोला सोडवायला कसा लढला आणि कोण कुठल्या धर्मासाठी मेला , आम्हाला कोणत्याच गोष्टीत स्वारस्य नाही... सर्व राजे व त्यांचे परिवार यांच्या दृष्टीने युद्धे जिंकणे व हरणे ही विन विन सिचुएशनच होती. मग त्यांचं इतकं कौतुक कशाला ? ...... जेंव्हा मोघल सत्ता होती तेंव्हा आमचा खापरपणजोबा मोघलाना कर देत होता आणि जेंव्हा स्वराज्य आले तेंव्हा हिंदू महाराजाना देत होता. आमचा खापरपणजोबाही गेला आणि तेही गेले ! आता आमच्या डोस्क्याला नस्ता ताप कशाला ? गावाचे नाव संभाजीनगर / महमदापूर / वास्कोपूर / अशोकनगर / बाहुबलीनगर .... काइ का ठेवेना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अगम्य Fri, 12/04/2015 - 22:39 नवीन
"सर्व राजे व त्यांचे परिवार यांच्या दृष्टीने युद्धे जिंकणे व हरणे ही विन विन सिचुएशनच होती" काय म्हणता? औरंगजेबाचे मांडलिकत्व न पत्करता संभाजीराजे त्याचाशी लढत राहिले, त्याच्या तावडीत सापडले. त्यानंतर राजांचे जे हाल झाले ते विन विन होते? राजांची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू औरंगजेबाच्या कैदेत पडले, ते ही विन विन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
क
कानडाऊ योगेशु Fri, 12/04/2015 - 23:55 नवीन
हे राजा
माझ्यामते असे संबोधन भगवद्गीतेत कुठेही आले नसावे. तसाही अर्जुन हा राजा नव्हताच. युधिष्ठीर हा राजा होता. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या विविध नावांनी संबोधले आहे.(जसे पार्थ,धनंजय,गुडाकेश,सव्यसाची वगैरे.) ह्या तर्कानुसार अर्जुन सुध्दा राजाऐवजी एक सैनिकच वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
अ
अनुप ढेरे Sat, 12/05/2015 - 05:31 नवीन
हा हा हा. प्रतिसाद आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ग
गामा पैलवान Sat, 12/05/2015 - 11:50 नवीन
मोगा,
>> गावाचे नाव संभाजीनगर / महमदापूर / वास्कोपूर / अशोकनगर / बाहुबलीनगर .... काइ का ठेवेना !
तुमच्याशी सहमत. नेमक्या याच कारणासाठी तुम्ही या धाग्यावर येऊ नये ही विनंती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
अ
असंका Sun, 12/06/2015 - 04:12 नवीन
भगवदगीतेत लिवलय ! " हे राजा ! युद्धात तू जिंकलास तर इथले राज्य भोगशील आणि मेलास तर स्वर्गाचे राज्य भोगशील !
याबद्दल बोलताय ना भाउ? - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम| तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः|| गीता २,३७ यात कुठे "हे राजा" असं म्हणलंय? हा श्लोक कौन्तेय म्हणजे अर्जुनाला उद्देशून म्हणलाय. आणि राजा तर कुठेच असल्याचं आठवत नाही मला. क्षत्रिय असं मात्र म्हणलंय. त्यात राजा येतो तसे सैनिक पण येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Sun, 12/06/2015 - 15:19 नवीन
सैनिक जिंकला तरी तो राजसुख घेऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Mon, 12/07/2015 - 08:30 नवीन
श्लोकात राजसुख नाय हो भाउ...पृथ्वी आहे फक्त. - भोक्ष्यसे महीम्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
माहितगार Sat, 12/05/2015 - 13:13 नवीन
शिवाजी महाराज सबंध रयतेचे राजे होते, त्यांनी राज्य रयतेच्या हितासाठी चालवले आपल्या वारसदारांसाठी चालवले नाही, वतनदारी बंद करण्यासाठी त्यांनी आप्तस्वकीयांशीही वैर घेतले, शिवाजी महाराज आणि हिंदूत्व हा वाद थोड्या वेळासाठी बाजूस ठेवला ते जे काही होते परधर्मीयांवर अन्याय केले नाहीत, त्यांच्याशी धर्माच्या कारणावरून दुजाभाव ठेवला नाह परधर्मीयांना सौजन्याने वागवले. शिवाजी महाराजांनी राज्य स्वतःच्या वारसदारांसाठी नव्हे रयतेसाठीच चालवले हे त्यांच्या इतिहासाच्या प्रत्येक कृतीतून अक्षरातून शब्दातून सिद्ध होते. शिवाजी महाराजांचे खरे वारस भारतीय जनता आहे. शिवाजी महाराजांची तुलना धार्मीक भेदभाव बाळगणार्‍या तत्कालीन पोर्तुगीज किंवा औरंगजेबाशी मुळीच होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जनतेचा राजा होता आणि त्यांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनताच आहे. हे आमचे मत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
अ
अगम्य Sun, 12/06/2015 - 04:43 नवीन
लाख बोललात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा