Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

उ
उडन खटोला
Fri, 12/04/2015 - 02:17
🗣 384 प्रतिसाद
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

प्रतिक्रिया द्या
66568 वाचन

💬 प्रतिसाद (384)
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 10:47 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 09:02 नवीन
तरी प्रत्येक पोलिटिकल पॉवर आपापल्या आयडिऑलॉजीप्रमाणे नावे बदलणे, भाषा बदलणे इ. करतच असते. त्यात विशेष ते काय?
गोव्यात 'ती' पोलिटिकल पॉवर आजवर अनेक वर्षे पर्रीकरांच्या रूपात होती. त्यांनी हे उद्योगधंदे केले नाहीत. ते खरे गोवेकर आहेत. आता ते दिल्लीत गेल्यावर हे बाहेरचे लोकं हे उद्योग करताहेत. उद्या जर कानडी लोकांनी पुण्यातल्या कॅम्पाचं 'चामुंडरायनगर' म्हणून नामकरण करा अशी मागणी केली तर दैनिक सकाळ मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहाराची काय अवस्था होईल? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 09:35 नवीन
उद्या जर कानडी लोकांनी पुण्यातल्या कॅम्पाचं 'चामुंडरायनगर' म्हणून नामकरण करा अशी मागणी केली तर दैनिक सकाळ मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहाराची काय अवस्था होईल?
बेळगाव परिसरार यळ्ळूर नामक एक गाव आहे. कर्नाटकात असूनही ग्रामस्थ "महाराष्ट्र राज्य" अशीच पाटी लावतात कायम. =)) तितके चिवट असतील तर म्हणतीलही, नैतर काय? =)) बाकी मिरजेचे नामांतरण मूर्तजाबाद असे केले जात नाही तोवर आम्हांला नामांतराची तादृश चिन्ता नाही हे खरेच. ;) तरी एक कल्चरल सिंबॉल म्हणून हे केले जाते आणि त्यात वाईट काही नाही असे माझे मत आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 12/11/2015 - 06:53 नवीन
बेळगाव परिसरार यळ्ळूर नामक एक गाव आहे.
तो वेगळा विषय आहे. सीमाभागातल्या जनतेने त्यांचं कर्नाटकात घातलं जाणं अजूनही मान्य केलेलं नाहिये. ते स्वतःला अजूनही महाराष्ट्राचाच भाग मानतात. त्या लोकांविषयी अतीव म्हणजे अतीव आदर आहे. गोव्याचं तसं नाहिये. गोवेकरांनी बहुसंख्येने महाराष्ट्रात सामील न होता त्यांचं स्वतःच स्वतंत्र अस्तित्व राखायाचा मतदानातर्फे निर्णय घेतलाय. तेंव्हा आता गोव्याच्या बाहेरच्यांनी त्या मतदानाचा आदर राखून गोवेकरांना जे काही हवंय ते केलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मोगा Fri, 12/11/2015 - 08:02 नवीन
त्याना रेशन , शाळा , वीज , पाणी कोण पुरवतं ? महाराष्ञ्र की कर्नाटक ? जर त्यांच्या गरजा कर्नाटक पुरवत असेल तर पोसणारा नवरा एक आणि बाई नवरा बोलते दुसर्‍यालाच , असं त्या संत मीराबैसारखं का करायचं म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुबोध खरे Fri, 12/11/2015 - 14:50 नवीन
है शाबास आम्हाला वाटलं तुमचा आय डी उडाला काय? बाकी -- त्यांना महाराष्ट्रात घ्या त्यांचं रेशन पाणी वीज शाळा कॉलेज महाराष्ट्र बघेलच हो. म्हशीची शिंगं म्हशीला जड नसतात. काळजी नसावी. आपलीच माणसं आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Sat, 12/12/2015 - 05:57 नवीन
आधी महाराष्ट्रात घ्या . मग बोर्ड लावा की. अपली शिंगं दुसर्‍याच्या डोक्यावर बसवुन शिंगाने व म्हशीने एकमेकांवर कसं प्रेम करायचं बुवा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 12/12/2015 - 06:37 नवीन
आम्ही त्यांना घ्यायला आतुर आहोत. कानडी लोकांनी फांदी मारली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/11/2015 - 15:58 नवीन
विनोदाचा प्रयत्न इतकासा बरा नव्हता ! "रेशन , शाळा , वीज , पाणी, हे दान म्हणून मिळते की विकत घेतले जाते ?" हा प्रश्न बहुदा तुम्हाला गैरवाजवी वाटला असेलच नाही का ??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Sat, 12/12/2015 - 07:32 नवीन
मीही माझ्या घरावर सल्तनत सौदी किंवा किंग्डम होनोलुलुचा बोर्ड लावावा म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/12/2015 - 08:20 नवीन
माझा प्रतिसाद ध्यानात आला नाही की ध्यानात आणून घ्यायचा नाही ?! बहुदा दुसरेच ! त्यामुळे चालुद्या तुमचं आत्मकुंथन ! असे विनोद फार कमी लोकांना करता येतात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ह
होबासराव Sat, 12/12/2015 - 08:29 नवीन
क्या मिया कितना खयाली पुलाव पकाते! दस सालासे तो दस अल्लग अल्लग आयडी से दस अल्लग अल्लग धागे डाले कि नयी मुंबई मे इधर फ्लॅट लेउ कि उधर लेउ....और कहा तुम सल्तनक कि बाता करते...वैसे वो फोटो डाला था ना लास्ट टाईम खुदका वो देखके बहोत बुरा लगा मेरे को, मिया जहा रोज खुद कि बेईज्ज्ती करा लेते हो वहा पर अ‍ॅट्लीस्ट अपने फॅमिलि का फोटो नहि देना चाहिये, तुम्हारे तरफ देखते हि पता चल्ता है मिया एक नंबर के चींधी चोरा है तुम्..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
र
रमेश आठवले Sat, 12/12/2015 - 16:06 नवीन
उन्हे हैदराबादी है ये मालुमच नही था मेरेको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
न
नाव आडनाव Sat, 12/12/2015 - 08:46 नवीन
जे काश्मिरी लोक इथलं खातात आणि नापाकिस्तान, इसिस चे झेंडे फडकवतात त्यामगचा त्यांचा आणि तुमचा विचार सारखाच वाटतो सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
सुबोध खरे Sat, 12/12/2015 - 10:18 नवीन
पाकिस्तानचाच लावा की. नको कोण म्हणतंय नाहीतर ISIS चा लावा. आणि आर्थर रोडची सर्व खर्चासहै सहल मोफत मिळवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Sat, 12/12/2015 - 18:05 नवीन
एका घरावर पाकिस्तान लिहुन काय होणार ? आमचा नथुराम म्हणायचा तीन्ही मिळून अखंड हिंदुस्तान व्हावा ! ... अखंड हिंदुस्तानवादी ब्यारिस्टर मोगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
भ
भंकस बाबा Sun, 12/13/2015 - 16:36 नवीन
एकडाव तुमची मते काय ती सपस्ट मांडा , एक धागा च् टाका. तेव्हा मग जब तक सूरज चाँद रहेगा तबतक तुम्हारा ये धागा रहेगा। तुमचे महणने न कल्लेला. योक अडाणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
प
प्रचेतस Fri, 12/04/2015 - 09:39 नवीन
यादवकाळापासून ते शहर अस्तित्वात आहे. त्याचे जुने नाव खडकी असे होते.
खडकी नावाची व्युत्पत्ती मोठी मजेदार आहे. हे नाव 'कटक' ह्या शब्दावरुन आले आहे. कटक म्हणजे सैन्याचा तळ. वेरूळच्या दशावतार लेण्यातील राष्ट्रकूट सम्प्राट दंतिदुर्गाच्या शिलालेखात कटकाचा उल्लेख आहे. तदनंतर लीळाचरित्रात कटकाचे कित्येक उल्लेख आहेत. कण्हदेवो कटकी आला संगे महादेव धाकुटा होता. ह्यातील कण्हदेव म्हणजे महापराक्रमी सिंघण (दुसरा) ह्याचा पुत्र आणि रामदेवरायाचा पिता कृष्णदेव. तर महादेव म्हणजे ह्या कृष्णाचा धाकटा भाउ. कटकचे कटकी आणि कटकीचे खडकी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 09:42 नवीन
हाण्ण तेजायला. ही माहिती नवीनच आहे मजसाठी. एकच नंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
S
sagarpdy Fri, 12/04/2015 - 10:01 नवीन
कुठल्याशा कादंबरीत 'खिडकी' असेही वाचल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
भ
भीमराव Fri, 12/04/2015 - 20:54 नवीन
आणि मग पुण्याची खडकी? तिच्या नावाची उत्पत्ती आणि तिथला मिल्ट्री एरिया यांचा काही संबंध आहे का? खडकी या नावाने आजुन बक्कळ गावे आहेत महाराष्ट्रात त्या प्रत्येक ठिकाणी सैनिकी तळ असावा का? गावांची नावे हा खुप माहीतीदायक विषय होईल, कारण प्रत्येक नावामागे थोडा का होईना इतिहास लपलेला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अर्धवटराव Fri, 12/04/2015 - 22:06 नवीन
जय हो वल्लीशेठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद१९७१ Fri, 12/04/2015 - 09:33 नवीन
आपल्याला हा नामकरण प्रकारच पटत नाय बॉ. वीटीचे सीएसटी केले,
मी अजुनही व्हीटीच म्हणतो आणि मद्रास पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद गोडबोले Fri, 12/04/2015 - 09:05 नवीन
गोवा इन्क्विसिशनबद्दल पिंडा ह्यांचे मत जाणुन घ्यायला आवडेल ! https://en.wikipedia.org/wiki/Goa_Inquisition बाकी आम्ही नामांतर चळवळीचे कट्टर समर्थक आहोत ! वास्को दा गामा ह्यांचे खरेच काही भव्य दिव्य योगदान असले तर त्यांच्घे नाव जरुर ठेवावे , (पण किमान आमच्या माहीतीत तरी तसे काही नाही), तस्मात नामांतर जरुर व्हावे ! संभाजी नगरच असा हट्ट नाही , अगदीच जुने नाव माहीत असल्यास जुने नाव द्या अन्यथा कोणत्याही सुप्रसिध्द गोवेकर्‍याचे नाव द्या :) आणि कृपया ह्या नामांतरला हिंदु विरुध्द खिर्श्चन असा रंग देवु नये, मागे मुंबैत के ई एम हॉस्पिटलचे ( की हॉफकिन इन्स्टिट्युट चे ) नामांतर करावे वगैरे वाद चालु होता तेव्हा त्याला कित्येक हिंदुनीच विरोध केला होता कारण ज्यांचे नाव मुळ वास्तुला आहे त्यांचे मुंबैच्या इतिहासात मोठ्ठे योगदान आहे ! काही लोकांना वाटते की नावे बदलुन काय होणार आहे ? पण नावाचा इम्पॅक्ट खुप खोलवर असतो , एखादी गोष्ट सतत बिंबवत गेल्याने तीच मनावर ठासली जाते साधे सोप्पे मानसशात्रीय अनुमान आहे हे !
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 09:13 नवीन
काही लोकांना वाटते की नावे बदलुन काय होणार आहे ? पण नावाचा इम्पॅक्ट खुप खोलवर असतो , एखादी गोष्ट सतत बिंबवत गेल्याने तीच मनावर ठासली जाते साधे सोप्पे मानसशात्रीय अनुमान आहे हे !
केवळ नामांतरामुळे इम्पॅक्ट झालेली अशी काही उदाहरणे देऊ शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 09:30 नवीन
इन्क्विझिशनबद्दल मी काय मत देणार? ते झालं होतं हे खरं आहे. खुद्द माझ्या पूर्वजांना त्याची झळ बसलेली आहे. पण ते इन्क्विझिशन करणारे पाद्री/ राज्यकर्ते आता गोव्यात हजर नाहियेत की त्यांचे डायरेक्ट वंशजही. हे आहेत ते आपलेच भारतीय रक्ताचे लोक आहेत. त्यांचा धर्म वेगळा असला तरी संस्कृती भारतीयच आहे. सवर्णाना धर्मांतराचा जाच झाला असेल पण बहुसंख्य अशिक्षित इतरेजन आपणहून सवर्णांच्या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी ख्रिस्ती झाले ही वस्तुस्थीती आहे. ते दिवाळी साजरी करत नसतील पण ख्रिसमसला करंज्या, कडबोळी आणि चकल्याच करतात! त्यांच्याशी प्रेमानं वागायचं की वाद का उकरून काढायचा?
आणि कृपया ह्या नामांतरला हिंदु विरुध्द खिर्श्चन असा रंग देवु नये
तो रंग मनात ठेवूनच तर हा वाद् उकरला जातोय. नाहीतर गोव्यातल्या एखाद्या गावाला महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याचे नांव सुचवायची गरजच काय? लोकं काय दुधखुळी आहेत काय? बाय द वे, हापुस (अल्फान्सो) आंब्याचंसुद्धा आता राघोबाआंबा असं नामकरण करा!!! :) कारण ते ही नांव अल्फान्सो द अल्बुकर्क ह्या गोव्याच्या गव्हर्नराच्या नांवावरून ठेवलं गेलेलं आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 12/04/2015 - 11:13 नवीन
बहुसंख्य अशिक्षित इतरेजन आपणहून सवर्णांच्या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी ख्रिस्ती झाले ही वस्तुस्थीती आहे.
ओके . ही खरेच वस्तुस्थिती आहे की नाही , त्या संबंधी काही पुरावे आहेत की नाही हे मला माहीत नाही , ह्या विषयाचा माझा अभ्यास नाही पण आधी महाराष्ट्र विरुध्द गोवा => हिंदु विरुध्द खिर्श्चन => सवर्ण विरुध्द इतरेजन ( आता आणि ह्या नंतर = > ब्राह्मण विरुध्द ब्राह्मणेतर ) हा चर्चेचा लॉजिकल प्रवाह मी ओळखुन आहे :)
बाय द वे, हापुस (अल्फान्सो) आंब्याचंसुद्धा आता राघोबाआंबा असं नामकरण करा!!! :) कारण ते ही नांव अल्फान्सो द अल्बुकर्क ह्या गोव्याच्या गव्हर्नराच्या नांवावरून ठेवलं गेलेलं आहे!!
सर्वप्रथम अल्फान्सो चे हापुस केले इतके पुरेसे आहे , शिवाय अल्फान्सो द अल्बुकर्क च्या आधी हा आंबा नव्हताच काय ? ह्या माणसाचे काय योगदान ? त्याने विकसीत केली का ही आंब्याची प्रजाती ? तुम्ही आज जे नांमांतर होते त्याला आक्षेप नोंदवता मग इतिहासात जे नामांतर झाले त्याला आक्षेप का बरे नोंदवत नाही ? बाकी संदीपजींनी विचारले की नामांतराने असा काय फरक पडतो उदाहरणे द्या : मला एक उदाहरण आठवते की १९५५ साली बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यावर कित्येकांन्नी नामांतरही केले आणि त्याचा बहुतेक चांगला परिणाम झाला . सातार्‍यातही कित्येक मुलींची नावे "नकोशी" असे होते , अत्ता नुकतेच त्या मुलींची नावे बदलली गेली . शिवाजी महाराजांनी भाषाशुध्दी करता राज्यव्यवहारकोष बनवला त्यातही अनेक फारसी नामे बदलुन पर्यायी मराठी नावे सुचवली गेली , असे का बरे केले असेल महाराजांन्नी ? असो , आमच्या मते आपण मानसिक गुलामगिरीतुन बाहेर पडणे गरजेचे आहे आणि ह्याची सुरुवात नामांतराने होवु शकते ! वास्कोला हिंदु मराठी सवर्णाचे नाव द्यायचे नसेल तर ज्या कोणी ख्रिश्चन माणसाने लोकांच्या भल्याचे काम केले असेल त्याचे नाव द्या , वाटल्यास ख्रिस्तपुर नाव द्या ... काही हरकत नाही :) असो ह्या विषयावर आपला जास्त अभ्यास नाही म्हणुन तुर्तास थांबतो ... पुढील चर्चेला शुभेच्छा ! अवांतर : बाकी कंपुबाज लोकहो , ते सनबर्न फेस्टीव्हल ला जायचे काय झाले राव ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 12/11/2015 - 07:04 नवीन
ह्या विषयाचा माझा अभ्यास नाही पण आधी महाराष्ट्र विरुध्द गोवा => हिंदु विरुध्द खिर्श्चन => सवर्ण विरुध्द इतरेजन ( आता आणि ह्या नंतर = > ब्राह्मण विरुध्द ब्राह्मणेतर ) हा चर्चेचा लॉजिकल प्रवाह मी ओळखुन आहे
एकीकडे अभ्यास नाही म्हणता आणि दुसरीकडे ओळखून आहे म्हणता. तुमचं खरं काय ते तुम्हालाच माहिती!!! :)
शिवाय अल्फान्सो द अल्बुकर्क च्या आधी हा आंबा नव्हताच काय ?
तुमच्या माहितीसाठी... पोर्तुगीजांच्या पूर्वी हा आंबा भारतात नव्हता अशी माहिती आहे. पोर्तुगीजांनी हे कलम ब्राझीलमधून (जी सुद्धा पोर्तुगीजांचीच वसाहत होती) भारतात आणलं आणि भारतातल्या स्थानिक (बहुदा रायवळ) आंब्यावर त्याचं कलम केलं. ज्या काळात ही गोष्ट घडली त्या काळात अल्फान्सो द अल्बुकर्क हा गोव्याचा गव्हर्नर होता. म्हणून बहुदा त्याचं नांव ह्या नव्या कलमाला दिलं गेलं असावं. आजही ब्राझिलमधून ही जात एक्सपोर्ट होते, अमेरिकेत तिला केन्ट मॅन्गो हे नांव आहे. आपल्या हापुससारखाच पण आकाराने हापुसच्या जवळजवळ तिप्पट असा आंबा असतो. चव तीच पण त्याला हापुससारखा वास नसतो. तो वासाचा गुणधर्म बहुदा आपल्या स्थानिक रायवळ आंब्याकडून आला असावा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
भ
भंकस बाबा Sat, 12/12/2015 - 03:53 नवीन
हा आंबा भलेही पोर्तुगिजानि आणला असेल पण त्याची उत्तम जात कोकणात देवगड भागात जोपासलि गेली. इथे जात म्हटले तर परत आक्षेप येतील कारण कलम तेच पण चवित पुष्कळ फ़रक. कोकणात पार अलीबाग पासून बाँदया पर्यन्त हापुसचि लागवड होते. मात्र देवगड़ हापुस सर्वश्रेष्ठ मानला जातो. देवगड़ भागात असलेल्या खाडिच्या आसपासच्या डोंगरावर कातळात लावलेला हापुस चवित उत्तम असतो. चवीबद्दल कोणाला वाद घालयचा असेल तर त्यांनी ह्या भागात फिरून खरा आंबा खावा. कारण या देवगड़ भागातील हापुस मुंबई पुण्यात अपवादाने मिळतो. सर्व माल गल्फ , यूरोपला जातो. पुणेकर ,मुंबईकर खातात ते रत्नागिरी ,चिपळून चा हापुस. जो जास्त गोड असतो पण ज्याला मधुरपणा म्हणतात (देवगड़ हपुससारखा) तो नसतो. असो हे अवांतर झाले. बाकी चर्चा छान जमुन राहिली आहे. बैटमन ,पिंडा, ट्रूमैन. च्या मारी कोणत्या बोटित बसु तेच कळेना झालय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 12/16/2015 - 05:31 नवीन
मात्र देवगड़ हापुस सर्वश्रेष्ठ मानला जातो. देवगड़ भागात असलेल्या खाडिच्या आसपासच्या डोंगरावर कातळात लावलेला हापुस चवित उत्तम असतो.
सहमत. 'देवगडचा हापुस, सगळ्या हापुसचा बापुस!' :)
कारण या देवगड़ भागातील हापुस मुंबई पुण्यात अपवादाने मिळतो. सर्व माल गल्फ , यूरोपला जातो.
ह्याच्याशीही सहमत. ज्यांच्या कडे 'घरची' टोपली/पेटी येते त्यांनाच हा आस्वाद माहिती. आणि घमघमाट कसला! घरात पेटी आली की सगळ्या बिल्डींगला पत्ता लागे की, 'ह्यांच्याकडे आंबे आले!' मग पुढील काही दिवस शेजार्‍यांची काहीना काही निमित्त काढून घरी रीघ लागे!!! (कशाला जुन्या आठवणी काढायला लावता?) :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
स
सूड Fri, 12/04/2015 - 11:41 नवीन
सवर्णाना धर्मांतराचा जाच झाला असेल पण बहुसंख्य अशिक्षित इतरेजन आपणहून सवर्णांच्या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी ख्रिस्ती झाले ही वस्तुस्थीती आहे. ते दिवाळी साजरी करत नसतील पण ख्रिसमसला करंज्या, कडबोळी आणि चकल्याच करतात! त्यांच्याशी प्रेमानं वागायचं की वाद का उकरून काढायचा?
सहमत!! नुसती नामांतरं करुन परिस्थिती बदलणार आहे का? आणि तसं बघायला झालं तर इन्क्विझिशन्स करणारे गेले निघून, आता ऊर बडवून काय उपयोग? आणि त्याला कारणही आपलेच लोक होते की! गोर्‍यांनी शिवलं, बाटला!! गोर्‍यांच्या हातचं काही खाल्लं, बाटला!! आणि अशा सो कॉल्ड बाटग्याला आपलेच लोक गावाबाहेर काढत असत. इन्क्विझिशन्स सोपे करुन दिले आपल्याच लोकांनी, अरे एवढीच चाड होती तर एखाद्या पादर्‍याला जानवं घालून आता तू हिंदू झालास असं का नाही ठणकावलं च्यायला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 11:55 नवीन
बाकी मांडोवी आणि झुआरी नद्यांमध्ये गंगेचे पाणि आणि गोमुत्र शिंपडल्याने हे काम अधिक सहज होईल का :) ? ((ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 12/04/2015 - 12:09 नवीन
आता कशाला? आता आहे तसं स्वीकारा की!! काय फरक पडतो? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 12:25 नवीन
आम्ही स्विकारतोच हो तुम्ही जानव्याचा विषय काढला म्हणून त्या पेक्षा सोपा उपाय सांगितला, पण जसे आहे तसे स्विकारणे सर्वाधिक चांगले आणि सोपे य बद्दल सहमत. भारतात राहता म्हणून तुम्ही आमचे, विवीध गोष्टी मनोभावे करता म्हणुन तुम्ही आमचे. हे सोपे आणि चांगलेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 12/04/2015 - 13:27 नवीन
ते मी ते लोक इन्क्विझिशन्स करत होते तेव्हाचं म्हणतोय. तेव्हा आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना बाटगे म्हणून बाहेर काढलं त्याबद्दल बोलतोय. आताचं म्हणाल तर कोणाचा धर्म काय आहे त्याच्याशी मला शष्प देणं घेणं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 13:33 नवीन
सहमत आहे. भारतीय भाषांसाठी भारतीय लिपी शिवाय इतर लिपी वापरण्यासारखे जाणीवपुर्वक उद्योग जरा खूपतात बाकी काही देणे घेणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सुबोध खरे Sat, 12/05/2015 - 08:08 नवीन
इन्क्विझिशन्स च्या काळात ज्यांनी धर्मांतराला नकार दिला त्यांना फाशी दिले जात असे या फाशी देण्याचा हुक आमच्या वास्कोच्या नौदलाच्या जीवन्ति रुग्णालयाच्या एका वडाच्या झाडाला अजून दिसतो. (हि जागा अगोदर पोर्तुगीजांच्या तळा ची होती). झाड रुंद झाल्याने हुक लावलेली लोखंडी साखळी झाडात रुतून बसलेली हि दिसते. प्रत्येक वेळेस ते पाहताना माझ्या हृदयात कालवा कालव होत असे. या कारणांसाठीच तेथील गुलामगिरी आणी अत्याचाराच्या आठवणी पुसल्या पाहिजेत.यात त्यांची नावे हि येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 12/05/2015 - 12:56 नवीन
त्याचे छायाचित्र उपलब्ध आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पिशी अबोली Sat, 12/05/2015 - 07:36 नवीन
बहुसंख्य अशिक्षित इतरेजन आपणहून सवर्णांच्या जाचापासून सुटका मिळवण्यासाठी ख्रिस्ती झाले ही वस्तुस्थीती आहे
नाही हो.. असली काही आमिषं दाखवायचं शहाणपण पोर्तुगीजांनी दाखवलं असेल असं काही वाटत नाही. त्यांच्या एकूणच पॉलिसीमधे 'सवर्णांचं धर्मान्तरण' यालाच जास्त महत्व दिल्याचं दिसतं. दुसरं, गोव्यातील ख्रिश्चन लोक अगदी नीट जाती पाळतात. धर्म बदलला म्हणून जात हा फॅक्टर संपला असं कधी झालंच नाही. अगदी पोर्तुगिजाळलेले लोकसुद्धा जातीच्या बाबतीत कट्टर असतात हे कायम दिसणारं चित्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सुबोध खरे Sat, 12/05/2015 - 08:00 नवीन
अगदी अगदी नव हिंद टाईम्स च्या वधू / वर संशोधनाच्या जाहिरातीत RCB (ROMAN CATHOLIC BRAMHIN) पाहिजे हे सर्रास दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
स
सुनील Fri, 12/04/2015 - 09:38 नवीन
अगदीच जुने नाव माहीत असल्यास जुने नाव द्या
हे शहरच मुदलात पोर्तुगिजांनी १६ व्या शतकात वसवले आणि त्याला वास्को द गामाचे नाव दिले (हे त्यांच्या दृष्टीने ठीकच). तेव्हा त्याला जुने नाव काहीही नाही. तसे वसवा एखादे (स्मार्ट) शहर आणि द्या त्याला हवे ते नाव. काऽऽऽही हरकत नाही!!! नामांतराचा उपद्व्याप नको. बाकी संभाजी महाराजांचे गोव्यात यथोचित स्मारक फोंड्याजवळील फर्मागुढी येथे आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सुबोध खरे Fri, 12/11/2015 - 15:05 नवीन
मागे मुंबैत के ई एम हॉस्पिटलचे ( की हॉफकिन इन्स्टिट्युट चे ) नामांतर करावे वगैरे वाद चालु होता तेव्हा त्याला कित्येक हिंदुनीच विरोध केला होता कारण ज्यांचे नाव मुळ वास्तुला आहे त्यांचे मुंबैच्या इतिहासात मोठ्ठे योगदान आहे ! १९१० साली सेठ गोरधनदास सुंदरदास यांच्या नावाने त्यांच्या वारसांनी रुपये बारा लाख (फक्त) हे वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यासाठी दिले. तेंव्हा सोन्याचा भाव ७ रुपये तोळा (१२ग्राम) होता.आजच्या भावाने हि रक्कम जवळ जवळ ५०० कोटी इतकी होईल त्याला कोणत्या तरी नतद्रष्ट राजकारण्याचे( ज्याचा वैद्यकीय क्षेत्राशी काडीचाही संबंध नव्हता) नाव देण्याचे घाट घातले जात होते. त्याला तेथील आजी आणी माजी विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला आणी म्हणून ते नामांतर टळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 09:36 नवीन
मी दमलो, रात्रीचे साडेबारा वाजून गेले. आता मी झोपतो. तुम्ही तुमचं चालू द्या.... श्री. उडन खटोला, तुमच्यावर आमचा वैयक्तिक रागलोभ वगैरे नाही. तुमच्या धाग्यातलं जे खटकलं ते तुमच्या नजरेसमोर आणायचा प्रयत्न केला. आणि मग हे रामायण घडलं!!!! :) तरी चूभूद्या घ्या...
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Fri, 12/04/2015 - 10:16 नवीन
अग्रीड पिडांकाका. आणि नामकरण करायचच तर , कुणा कर्तृत्ववान गोवेकराच नाव द्या हे माझ मत.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 12/11/2015 - 07:08 नवीन
अगदी दीपाजी रांण्यांपासून सोयरोबा आंबियांपर्यंत नांवं काय कमी आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
म
मृत्युन्जय Fri, 12/04/2015 - 10:29 नवीन
एकुण धाग्याचा सूर असा आहे की संभाजी सारख्या बाहेरच्या माणसाचे नाव द्यायच्या ऐवजी गोव्याच्य भूमीतील सुपुत्राचे नाव द्यायला हवे. त्यामुळे वास्को शहराचे नाव बदलुन ते "मनोहरनगर" करावे असा प्रस्ताव मी मिपामंडळासमोर मांडतो. आपण मोठ्या संख्येने अनुमोदन करुन हा प्रस्ताव तडीस न्यावा आणि सरकारवर दबाव टाकावा अशी सर्व मिपाकरांना आणी नीलकांतला णम्र विणंती.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 12/04/2015 - 10:29 नवीन
नामांतरामुळे नक्की काय साधणार आहे. औ बाद चे संभाजीनगर करणे वगैरे मुळे लोकाम्च्या पुढे चघळायला कडबा याशिवाय काहीच पदरात पडत नाही. बाँबे चे मुंबै झाल्यामुळे असा काय फरक पडला आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 12/04/2015 - 10:31 नवीन
पोर्तुगीजांच्या जुलूमी राजवटीच्या संदर्भात कै. तांबे ह्यांनी इथे वसईबद्दल एक लेख लिहीलेला होता. त्याचा दुवा कुणी कृपया देईल काय?
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 12/04/2015 - 10:32 नवीन
गोवन संकृतीमधली हि छत्रपती संभाजीमहाराज विरुद्ध सेंट झेवियर अशी सरळ फाईट म्हणायची काय ?
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Fri, 12/04/2015 - 10:54 नवीन
अस काही नाहीये. मुळात नामांतर झाल नाही तरी काहीही फरक पडत नाही. पण ज्या संभाजीराजांनी इथे राज्य नाही केल त्यांच नाव द्यायचा अट्टाहास का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा