अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.


💬 प्रतिसाद
(456)
झ
झेन
Sun, 09/18/2016 - 04:46
नवीन
+11111
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sun, 09/18/2016 - 05:13
नवीन
हमीद दाभोळकरला कोणीच गुरुस्थानी मानलेले नाही. बाकी वरील उद्गारावरून त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला.
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sun, 09/18/2016 - 05:15
नवीन
केवळ त्यांच्या आडनावामुळे नव्हे तर निव्वळ त्यांच्या उज्ज्वल स्वकर्तृत्वामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सध्याचे सर्वेसर्वा बनलेले थोर विचारवंत श्री हमीद दाभोळकर (कोण रे तो घराणेशाही, घराणेशाही म्हणून ओरडतोय? गप्प करा त्याला. लोकशाहीविरोधी फाशीष्ट कुठला! ). तर असे थोर्थोर विचारवंत श्री हमीद दाभोळकर ह्यांनी 'मातीची बकरी' ह्या मोहिमेवरचे त्यांचे मौलिक विचार नुकतेच व्यक्त केले.
सकाळमध्ये आलेल्या बातमीनुसार बकरी ईदला खरीखुरी जिवंत बकरी कुर्बान न करता त्याऐवजी 'मातीची बकरी' करून ती कुर्बान करावी अशी एक मोहीम काही लोकांनी राबवली होती. थोर्थोर विचारवंत श्री दाभोळकर ह्यांच्या मते ही मोहीम चुकीची असून 'धर्माधर्मात तेढ वाढवण्याच्या खोडसाळ उद्देश्याने चालवलेली आहे'. 'धार्मिक संकल्पनांचे निव्वळ स्वतःला हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा लोकांनी प्रयत्न करायला हवा' असे समंजस, मानवतावादी वगैरे आवाहनही त्यांनी लोकांना केले.
हमीद गुर्जींचे म्हणणे आहे की ईदला बकरा कापणे ह्या धार्मिक संकल्पेनाला भावार्थ आहे, पण दसऱ्याला बळी दिला तर ती मात्र अंधश्रद्धा असून त्या अंधश्रद्धेचा कसून विरोध करायला पाहिजे बर्का मुलांनो? आणि हो, ह्याला दुटप्पीपणा म्हणत नाहीत, हा एक थोर पुरोगामी विचार आहे. तेव्हा वाजवा आता जोरदार टाळ्या!
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sun, 09/18/2016 - 05:17
नवीन
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI
खालील प्रतिक्रिया जरूर वाचा !
'मातीची बकरी' ही खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम
- - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016 - 06:32 PM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI
Tags: #dr hamid dabholkar, eid, religious, social networking, pune
नेटिझन्सच्या ‘ट्रोलिंग‘ला हमीद दाभोलकरांचे उत्तर, विवेक जपण्याचे केले आवाहन
पुणे- "सध्या केवळ कुणालातरी टोमणा मारावा आणि धर्मधर्मात तेढ वाढवावी, अशा नकारात्मक उद्देशाने काही समाजमाध्यमांतून बकरी ईद निमित्त खऱ्याखुऱ्या जिवंत बकरीऐवजी ‘मातीची बकरी‘ कुर्बान करावी, अशी खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम राबवली जात आहे. मात्र, असे अपप्रचार करणाऱ्यांचा उद्देश पुरेसा स्वच्छ नाही, हे लगेच लक्षात येते. चुकीच्या प्रथेला विधायक पर्याय देण्याचा विचार आणि विरोधासाठी विरोध यात फरक आहे, हे लक्षात घ्यायला हवे," अशा शब्दांत डॉ. हमीद दाभोलकर यांनी समाजमाध्यमांवरील चर्चांना उत्तर दिले.
याचवेळी त्यांनी ‘भिन्न भिन्न धर्माचे सहअस्तित्व हे त्यांच्या वेगळेपणासह आणि विवेक जपत मान्य करायला हवे. धार्मिक संकल्पनांचे निव्वळ हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा,‘ असे आवाहनही केले.
बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असताना डॉ. दाभोलकर यांनी आपली ही मतं व्यक्त केली. ते म्हणाले, " खरंतर, धर्माधर्मात वितुष्ट न निर्माण करता त्यांच्या असणारा संवाद कसा उन्नत होईल, हे समाजमाध्यमांनी पाहायला हवे. आज ‘मातीची बकरी‘ करण्याचे सल्ले जेही कुणी देताहेत, त्यांनी एका अर्थाने कधीकाळी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस नको, मातीच्या गणेशमूर्ती हव्यात‘ ही आमच्याप्रमाणे अनेकांनी दिलेली हाक आज मान्य केली आहे आणि तिला त्यांचा आजवर असणारा विरोधही अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे. एका अर्थाने त्यांनी धर्म चिकित्साच तर मान्य केली आहे."
... हे समाजबदलाचे द्योतक
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, " ‘विसर्जित गणपती दान करा‘, या आमच्या मोहिमेला वीस वर्षांपूर्वी प्रचंड विरोध झाला होता. आज मात्र हाच विचार न्यायालय, शासन-प्रशासन आणि अगदी नागरिकांच्या पातळीवरही स्वीकारला गेला असल्याचे दिसून येईल. आज आम्ही गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक करू, असे जेव्हा पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती म्हणतात, तेव्हा ते बदलत्या समाज मानसाचे द्योतक असते."
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sun, 09/18/2016 - 05:17
नवीन
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI
खालील प्रतिक्रिया जरूर वाचा !
'मातीची बकरी' ही खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम
- - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016 - 06:32 PM IST
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=cB3JQI
Tags: #dr hamid dabholkar, eid, religious, social networking, pune
नेटिझन्सच्या ‘ट्रोलिंग‘ला हमीद दाभोलकरांचे उत्तर, विवेक जपण्याचे केले आवाहन
पुणे- "सध्या केवळ कुणालातरी टोमणा मारावा आणि धर्मधर्मात तेढ वाढवावी, अशा नकारात्मक उद्देशाने काही समाजमाध्यमांतून बकरी ईद निमित्त खऱ्याखुऱ्या जिवंत बकरीऐवजी ‘मातीची बकरी‘ कुर्बान करावी, अशी खिल्ली उडवणारी चर्चा मोहीम राबवली जात आहे. मात्र, असे अपप्रचार करणाऱ्यांचा उद्देश पुरेसा स्वच्छ नाही, हे लगेच लक्षात येते. चुकीच्या प्रथेला विधायक पर्याय देण्याचा विचार आणि विरोधासाठी विरोध यात फरक आहे, हे लक्षात घ्यायला हवे," अशा शब्दांत डॉ. हमीद दाभोलकर यांनी समाजमाध्यमांवरील चर्चांना उत्तर दिले.
याचवेळी त्यांनी ‘भिन्न भिन्न धर्माचे सहअस्तित्व हे त्यांच्या वेगळेपणासह आणि विवेक जपत मान्य करायला हवे. धार्मिक संकल्पनांचे निव्वळ हवेतसे अर्थ लावण्याऐवजी त्यातील भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा,‘ असे आवाहनही केले.
बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असताना डॉ. दाभोलकर यांनी आपली ही मतं व्यक्त केली. ते म्हणाले, " खरंतर, धर्माधर्मात वितुष्ट न निर्माण करता त्यांच्या असणारा संवाद कसा उन्नत होईल, हे समाजमाध्यमांनी पाहायला हवे. आज ‘मातीची बकरी‘ करण्याचे सल्ले जेही कुणी देताहेत, त्यांनी एका अर्थाने कधीकाळी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस नको, मातीच्या गणेशमूर्ती हव्यात‘ ही आमच्याप्रमाणे अनेकांनी दिलेली हाक आज मान्य केली आहे आणि तिला त्यांचा आजवर असणारा विरोधही अप्रत्यक्षपणे मान्यच केला आहे. एका अर्थाने त्यांनी धर्म चिकित्साच तर मान्य केली आहे."
... हे समाजबदलाचे द्योतक
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, " ‘विसर्जित गणपती दान करा‘, या आमच्या मोहिमेला वीस वर्षांपूर्वी प्रचंड विरोध झाला होता. आज मात्र हाच विचार न्यायालय, शासन-प्रशासन आणि अगदी नागरिकांच्या पातळीवरही स्वीकारला गेला असल्याचे दिसून येईल. आज आम्ही गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक करू, असे जेव्हा पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती म्हणतात, तेव्हा ते बदलत्या समाज मानसाचे द्योतक असते."
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 09/18/2016 - 05:22
नवीन
ते ठिकाय आहे पण तुम्ही डॉल्बीला सपोर्ट करता त्यामुळे तुम्हाला दुसऱयांकडे बोट दाखवायचा नैतिक अधिकार नाही
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 09/18/2016 - 05:28
नवीन
हाण च्यामारी! ;)
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Sun, 09/18/2016 - 05:28
नवीन
रोज खारा नैवेद्य खाणारे हिंदु देव - देव्याही मातीच्या बकरी/कोंबडीवर समाधान मानतील का?
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sun, 09/18/2016 - 15:05
नवीन
ते ठिक आहे चम्पक राव पन एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ह्यांनिच(अनीस किंवा त्यांचे प्रोप्रायटर दाभोळकर ह्यांनी) सत्यनारायण का ठेवावा हे कळले नाही आणी त्यांचे उपदेश हे फक्त हिन्दुंना का असतात हे सुद्धा नाही उमगले.नाही म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या वापरु नका,नवसाला बळी देउ नका ई ई उपदेश फक्त हिंदुना का देतात्, सैतानाला दगड मारतांना किति मुस्लिम मरतात (मागे तिथल्या चेंगराचेंगरीत मेलेल्या मुस्लिमांचे मृतदेह तिथल्या सरकारने जे सि बी ने साफ केले होते)त्यांनाही सांगावे कि बाबांनो हे असे दगड मारने चांगले नव्हे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 09/19/2016 - 06:15
नवीन
त्यांनाही सांगावे कि बाबांनो हे असे सैतानाला दगड मारने चांगले नव्हे.
असे सल्ले दिले तर अत्यंत दयाळू धर्माचे अनुयायी फतवा काढतील ना ईश्वर निंदा(blasphemi) केली. याची शिक्षा फाशी आहे.
मग हमीद साहेबाना टोंगा किंवा सॉलोमन बेटे अशा कुठल्या तरी देशात आश्रय घ्यावा लागेल किंवा उत्तर ध्रुवावरील "अस्वलाच्या उवां"वर संशीधन करायला रशियन शिष्यवृत्ती घेऊन सैबेरियाच्या उत्तरेला जायला लागेल ना.
तुम्ही काय पण बोलता राव.
- Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द
Fri, 09/23/2016 - 13:00
नवीन
चम्पूताई,
रोज खारा नैवेद्य खाणार्या हिन्दु देव देव्या ची नावे सान्गशील का?
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 09/18/2016 - 05:55
नवीन
कठपुतल्या नाचविनार्याच्या तालावर नाचतात. ताल जर सेकुलर असेल तर फक्त एका विशिष्ट धर्म परंपरांचा विरोध करतील बाकींचा नाही. हमीद साहेब हि एक कठपुतली आहेत. नुकतीच बातमी वाचली मुस्लीम राष्ट्रीय मंचाने जनावरांना आपल्या हाताने चारा खाऊ घालून बैतुल मध्ये ईद साजरी केलील. खरे अंधश्रद्धा विरोधी कोण आणि खोटे कोण सहज कळते.
- Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा
Sun, 09/18/2016 - 06:04
नवीन
साहना हा आयडी अभिराम दिक्षीतचा आहे का??
- Log in or register to post comments
स
साहना
Sun, 09/18/2016 - 06:29
नवीन
हे अभिराम दीक्षित कोण आहेत ? वरील छायाचित्र व्हाट्सअँप द्वारे कुणी तरी पाठवले होते.
- Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा
Sun, 09/18/2016 - 07:54
नवीन
फेसबूक वर शोधा सापडतील ते!!
ते आमचे गुरू आहेत आणि मंगेश सपकाळ आमचे दैवत आहे.
- Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द
Fri, 09/23/2016 - 13:01
नवीन
१ नं
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 09/18/2016 - 06:21
नवीन
हे अस काहीतरी होते अन अंनिस चा सहानुभूतीदार वर्ग वेगाने दुरावायला सुरुवात होते
असो
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sun, 09/18/2016 - 08:48
नवीन
अॅडा आम्हास दुरावणार्यांमध्ये.
- Log in or register to post comments
म
मोदक
Sun, 09/18/2016 - 09:55
नवीन
अहो चांगले आहे की, बुरखे टराटरा फाटत आहेत.
- Log in or register to post comments
स
साहना
Sun, 09/18/2016 - 06:31
नवीन
नैतिकतेचा माझा कंपास कधीच हरवलेला असल्याने मी खुशाल बोटे दाखवते.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 09/18/2016 - 07:21
नवीन
Hats off then, you are different ....you accept it publicly :)
- Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब
Sun, 09/18/2016 - 11:02
नवीन
बहुदा तै फक्त मनात साठलेले गरळ ओकायला मिपावर येतात हे कबूल करीत असाव्यात असे वाटते
(घाबरलेला)
ढेल्या
- Log in or register to post comments
क
क्षमस्व
Sun, 09/18/2016 - 10:30
नवीन
लै भारी हाणलात।।।।
- Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर
Sun, 09/18/2016 - 10:39
नवीन
दणदणित बोलता एकदम...
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 09/18/2016 - 06:37
नवीन
याविषयीच ३-४ दिवसांपूर्वी फेसबुकवर आणि मिपाच्या खरडफळ्यावर लिहिले होते ते इथे पेस्ट करत आहे:
"ऐशी की तैशी या बुबुडाविपुमाधविंची (बुध्दीजीवी बुध्दीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंतांची).हे बुबुडाविपुमाधवि असले काहीतरी बरळतात ना म्हणून जाम डोक्याला शॉट लागतो.
जर का मानवता हाच धर्म असेल तर कुठल्याही कारणामुळे कुणाही जीवाची हत्या करणे हे कधीच समर्थनीय होणार नाही.मग ते देवळांमध्ये कापल्या जाणार्या कोंबड्या बकर्यांप्रमाणेच बकरी ईदच्या दिवशी 'कुर्बान' केल्या जाणार्या बकर्यांनाही तितकेच लागू होते.मी शाळेत असताना नेपाळला गेलो होतो.तिथे एका देवळात शिरत असताना समोरच कोंबडा कापताना बघावा लागण्याचे दुर्भाग्य आले होते.त्या प्रकाराचा भयंकर संताप आला आणि असल्या ठिकाणी देव असूच शकत नाही हे लगेचच समजले.कुठले देऊळ होते हे आता लक्षात नाही पण बहुदा पोखर्यामधले बर्यापैकी महत्वाचे देऊळ असावे.त्या मूर्तीचे दर्शन न घेताच ताबडतोब तिथून बाहेर पडलो होतो हे स्पष्ट आठवते.
आता वळू या श्री.रा.रा हमीद दाभोळ(ल)कर काय म्हणतात त्याकडे.जर का मी ज्या कारणासाठी देवळांमध्ये बकरे कापू नयेत ही मागणी करतो त्याच कारणासाठी बकरी ईदलाही बकरे 'कुर्बान' करू नयेत ही मागणी केली तर ती टोमणा मारायला किंवा धर्माधर्मात तेढ वाढावी या उद्देशाने हा जावईशोध त्यांनी कुठून लावला? आणि वर 'हा अपप्रचार करणार्यांचा हेतू पुरेसा शुद्ध नाही हे लगेच लक्षात येते' ही मखलाशी हे करणार.म्हणजे कुणाचा हेतू शुध्द आणि कुणाचा अशुध्द हे हे दीडशहाणे ठरविणार का? अटरली युजलेस!!जर का आमचा हेतू पुरेसा शुध्द नाही हे कुणाच्या लक्षात येतच असेल तर ते असल्या गुडघ्यातल्या बिनडोक बुबुडाविपुमाधविंच्याच.
दाभोळ(क)र पुढे म्हणतात की धार्मिक संकल्पनांचे निव्वळ हवे तसे अर्थ न लावता त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. वा.वा.वा. टाळ्या. हजारो टाळ्या वाजवाव्यात, इतक्या टाळ्या वाजवाव्यात की हात दुखायला लागावा अशी इच्छा होत आहे.काही दिवसांपूर्वीच मी इथेच फेसबुकवर लिहिले होते की आपल्या जुन्या परंपरांमध्ये विज्ञान कसे आहे याचा ओढूनताणून बादरायण संबंध जोडणार्या संस्कृतीवाद्यांची बकवास ऐकून डोक्याला शॉट जातो.आता हे दाभोळ(ल)कर साहेब बकर्याच्या मानेवरून सुरा फिरवून त्याच्या नसांमधून जास्तीत जास्त रक्त वाहून जास्तीत जास्त काळ जिवंत ठेऊन आणि त्याचे कसे हालहाल होत आहेत हे बघायच्या (साध्या शब्दात 'हलाल' करायच्या) नृशंस परंपरेचा भावार्थ समजावून घेतला पाहिजे असे म्हणतात? अरे एका मुक्या निरपराध जीवाला हालहाल करून मारायचा कसला भावार्थ आला आहे?आणि हे असले ढोंगी लोक वर मोठ्या तोंडाने मानवता मानवता ही जपमाळ ओढताना दिसले की तळपायाची आग मस्तकात नाही तर अस्मानात जाते. अटरली डिजगस्टींग!!
या दाभोळ(ल)करांची बडबड पुढे चालूच आहे. मातीचा बकरी कापा हे सल्ले देणार्यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरीस नको, मातीच्या गणेशमूर्ती हव्यात ही भूमिका आणि तिला त्यांचा आजवर असलेला विरोध अप्रत्यक्षपणे मान्य केला आहे आणि एका अर्थी धर्मचिकित्सा मान्य केली आहे!! म्हणजे मातीची बकरी कापा हे सल्ले देणारे सगळेच प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तींना विरोध करणारे असतात का?अशांमध्ये माझ्यासारखेही अनेक लोक आहेत जे म्हणतात की गणेशोत्सवच नको--अगदी कुठलीच मूर्ती नको. मातीची पण नको आणि प्लॅस्टर ऑफ पॅरीसची पण नको.आमच्यासारख्यांचे काय?
या असल्या बुबुडाविपुमाधविंना नक्की काय म्हणावे?ढोंगी? पाताळयंत्री?दुटप्पी?आतल्या गाठीचे?की अन्य काही?"
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Sun, 09/18/2016 - 07:06
नवीन
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 09/18/2016 - 07:08
नवीन
+11111111111
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 09/18/2016 - 07:25
नवीन
सह्मत आहे
या पार्श्वभूमीवर एका पुरोगाम्याचे आत्मपरिक्षण व त्यावरील चर्चा वाचावी
न पटणारा विचार सोडून द्यावा बाकीचा तर घ्यावा. समजा दहातले चार मुद्दे पटत नाही तर उरलेल्या सहा मुद्द्यांवर सहमतीतून सकारात्मक काम करावे. आपल्या मनात देखील परस्पर विरोधी विचारांचे द्वंद्व असतेच की!
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 09/18/2016 - 09:53
नवीन
याविषयी असहमत असायचा प्रश्नच नाही.
फक्त कधीकधी हे स्वयंघोषित पुरोगामी अनेक मुखवटे सादर करतात की त्यापैकी नक्की कोणत्या मुखवट्यावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नक्कीच पडतो.आणि होते असे की असे वेगवेगळे मुखवटे परिधान करणारे लोक स्वतःची विश्वासार्हता पूर्ण गमावून बसतात आणि त्यामुळे त्यांचे बोलणे गांभीर्याने घेणे बंद केले तर मग परत "उरलेल्या ६ मुद्द्यांवरही सकारात्मक काम होत नाही" म्हणून उलटी कोल्हेकुईही करतात.
आमचा जातीपातीत विश्वास नाही हा यांचा दावा नेहमीच असतो.पण तो दावा किती फोल आहे हे काही गोष्टींवरून लक्षात आले.
अंतर्नाद या नियतकालिकात लेख लिहिणारे एक विचारवंत आहेत.माझ्या माहितीप्रमाणे तिकडे दिवाळी अंकातही ते बहुदा (वेगळ्या विषयांवर) लिहितात. त्यांचा दावा असतो की ज्या परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली त्या परशुरामाला आपला आद्य पुरूष मानणार्या ब्राह्मणांची मला किव येते!!पूर्वीच्या काळी पुरोहितशाहीने माजविलेल्या कर्मकांडांच्या स्तोमाला माझा तरी अगदी प्रखर विरोध आहे आणि त्यावर मी मिपावर लिहिलेही आहे. पण या विचारवंतांचे लॉजिक अगदीच पूर्णच गंडलेले आहे. याविषयी मी त्यांच्याशी अगदी भिडलोही आहे. त्याचा काही उपयोग झाला नाही ही गोष्ट वेगळी.
१. एक तर कोणी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय कशी करू शकेल? हे बोलणे म्हणजे "आमच्या घराण्यात ब्रह्मचर्याची परंपरा आहे. माझे आजोबा ब्रह्मचारी होते, माझे वडिल ब्रह्मचारी होते, मी ब्रह्मचारी आहे आणि माझा मुलगाही ब्रह्मचारी असेल" असे म्हणण्यासारखे झाले. एकदा पृथ्वी नि:क्षत्रिय केली की झाले. मग परत दुसर्यांदा, तिसर्यांदा नि:क्षत्रिय करण्यासाठी क्षत्रिय येतीलच कुठून? बरं असे म्हटले की या कत्तलीतून लहान मुले आणि स्त्रियांना सोडले आणि लहान मुले मोठी झाली मग त्यातून क्षत्रिय वाढले आणि मग परत दुसर्यांदा, तिसर्यांदा ती नि:क्षत्रिय केली तरी याचा अर्थ परशुराम २१ पिढ्या कापून काढू शकेल इतकी वर्षे असला पाहिजे. एक पिढी २५ वर्षांची धरली तरी किमान ५२५ वर्षे तो असायला हवा. म्हणजे अर्थातच २१ वेळा नि:क्षत्रिय करणे वगैरे बकवास आहे, थाप आहे हे समजून यायला हरकत नसावी.
२. अगदी ही गोष्ट खरी आहे हे गृहित धरले तर मग मायथॉलॉजीमधील संदर्भ आपल्याला हवे तेव्हा घ्यायचे, हवे तेव्हा सोडायचे याला काय अर्थ आहे? म्हणजे मायथॉलॉजीमधील 'खुनी' परशुरामाला आपला आद्य पुरूष मानतात म्हणून हे ब्राह्मणांना झोडपणार पण मग मायथॉलॉजीमधीलच उल्लेखानुसार राम अयोध्येत जन्मला ही गोष्ट मात्र नाकारणार. हा ढोंगीपणा नाही का?
३. बरं परशुराम खरोखरच होऊन गेला, नाही गेला याचे कुठलेच पुरावे मिळणे शक्य नाही.म्हणजे एका काल्पनिक मनुष्याने केलेल्या काल्पनिक हिंसेसाठी हे सध्याच्या ब्राह्मणांना झोडपणार पण मग मध्यपूर्वेतल्या एका धर्माच्या संस्थापकांनी केलेल्या हिंसेचे काय?त्याविरूध्द हे मूग गिळून बसणार.बरं परशुरामाच्या नावावर २०१६ मध्ये दहशतवादी संघटना किती आहेत? जे.ई.एम मधील एम म्हणजे मधुसूदन नाही हे या पुरोगाम्यांना माहित असावे ही अपेक्षा.
४. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणाही माणसाकडे त्याची जात/धर्म इत्यादी लेबले न वापरता एक माणूस म्हणून बघावे हे एकीकडे बोलणार आणि परत ब्राह्मण या लेबलचा वापर करण्यात काही विसंगती आहे हे यांच्या गावीही नसते.
असल्या लोकांच्या १० पैकी ४ मुद्द्यांवर सहमती म्हणावी की ६ मुद्द्यांवर हे समजायचे कसे?कारण हे नक्की कुठला मुखवटा समोर ठेऊन बोलत आहेत हे समजायला लागणारी दिव्यदृष्टी माझ्याकडे तरी नाही.
या पुरोगाम्यांची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे या असल्या गोष्टींमुळे. उठल्यासुटल्या थोडे काहीतरी लिहितो आणि स्वतःला डायरेक्ट आगरकर आणि महर्षी कर्व्यांच्या परंपरेतला समजायला लागतो.त्या खरोखरच्या पुरोगाम्यांच्या आचार- विचार आणि उच्चारात एकवाक्यता होती.तिथेच हे स्वयंघोषित पुरोगामी गंडतात.आणि हो. कोण बोलत आहे याकडे लक्ष न देता काय बोलले जात आहे याकडे लक्ष द्यावे असल्या गोष्टी अत्यंत भाबड्या असतात असे माझे तरी स्पष्ट मत आहे. उद्या पॉल पॉट, हिटलर किंवा माओ उठून मानवाधिकारांवर लेक्चर द्यायला लागला किंवा आकंठ दारूत बुडलेला जर दारूबंदीवर लेक्चर द्यायला लागला तर ते "कोण बोलतोय यापेक्षा काय बोलतोय" याकडे लक्ष देऊन शिरसावंद्य मानण्याइतका भाबडा मी तरी नाही.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 09/18/2016 - 12:02
नवीन
आपले मुद्दे पटणारे आहेत. आचार विचार यातील विसंगती हा सर्वांच्या बाबतीत लागू आहे.
बाकी पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका हा सदानंद मोरे यांचा साधना साप्ताहिकातील जुना लेख इथे नमूद करतो.वाचनीय आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 09/18/2016 - 14:58
नवीन
धन्यवाद
सहमत आहे.
पण होते कसे की स्वयंघोषित पुरोगामी इतरांना "तुम्ही मूर्ख आहात" अशा पध्दतीची भाषा वापरतात.त्यामुळे त्यांच्याविषयीच्या वर्तणुकीच्या अपेक्षा वाढतात.तू मूर्ख आहेस असे सांगितलेले कोणालाही आवडत नाही.हा मानवी स्वभाव झाला.अशी रोखठोक भाषा अगदी आगरकरांनीही वापरलेली आहे.पण गोपाळराव आगरकरांच्या आचार-विचार-उच्चारात एकवाक्यता होती त्यामुळे तत्कालीन समाजाच्या नसले तरी आजच्या समाजाच्या ते आदरास पात्र आहेत.पण अशी आचार-विचार-उच्चारात एकवाक्यता नसेल तर मात्र इतरांकडून कंबरड्यात लाथा पडणारच---तत्कालीन समाजाच्याच.भविष्यातील समाज अशा लोकांना लाथा घालायला जाणार नाही कारण 'एक ढोंगी' म्हणून अशांचा भविष्यात विसरही पडेल.
तेव्हा स्वयंघोषित पुरोगामी ज्या वाटेने जातात ती वाट अगदीच निसरडी आहे.समाजातील अनेक गोष्टी अगदी कोरडे ओढण्यायोग्य आहेत हे मान्य केले तरीपण ते करताना जर गोपाळराव आगरकरांसारखी एकवाक्यता असेल तर समाजाने कितीही टिका केली तरी एक ना एक दिवस आपले म्हणणे समाजाला पटेल हे कन्व्हिक्शन असेल आणि कितीही टिका झाली तरी विचलित व्हायला होणार नाही.पण तशी एकवाक्यता नसतील तर मात्र तुम्ही इतरांवर जितके लत्तेप्रहार करत आहात त्याच्या दहापट लाथा परत मिळणारच आहेत आणि मग तक्रार करून अजिबात उपयोग नाही.
एकेकाळी (म्हणजे फार जुनी गोष्ट नाही--५-६ वर्षांपूर्वी) मी पण बर्याच प्रमाणात स्वयंघोषित पुरोगाम्यांप्रमाणेच होतो.पण अजून आत्मपरिक्षण केल्यावर त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आला.गोपाळराव आगरकरांप्रमाणे रोखठोक जरूर बोलावे पण त्यापूर्वी स्वतःला त्यांच्याइतक्या नैतिक उच्चतेच्या पातळीवर न्यावे आणि मगच बोलावे.त्या उच्च पेडेस्टलपासून मी कित्येक योजने दूर आहे हे समजले.असो.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 09/18/2016 - 17:20
नवीन
अगदी मनातल बोललात. अनेक ठिकाणी मी हे मांडत असतो.
http://www.maayboli.com/node/49918?page=6#comment-3189597
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 09/18/2016 - 17:23
नवीन
हेच म्हणणार होतो, अगदी घाटपांडे सर असच बोलतात
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 09/18/2016 - 17:22
नवीन
अगदी मनातल बोललात. अनेक ठिकाणी मी हे मांडत असतो.
http://www.maayboli.com/node/49918?page=6#comment-3189597
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 09/18/2016 - 17:27
नवीन
प्रतिसाद पेस्ट करतो. मिपावर पण हा कुठेतरी दिला होता.
"अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्या अॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही."
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sun, 09/18/2016 - 18:01
नवीन
अशा भूमिकेचे स्वागतच आहे. जर स्वतःला पुरोगामी म्हणणवणार्या सगळ्यांनाच हे भान असते तर या मेगाबायटी चर्चांची गरजच पडली नसती. असो.
अजूनही हमीद दाभोलकरांच्या विधानाचा निषेध स्वयंघोषित पुरोगामी लोक अन्यथा जेवढा आवाज करतात त्या मानाने फिकाच आहे हे पण नमूद करावेसे वाटते.हे विधान येऊन २-४ दिवसच झाले आहेत.यापुढील काही दिवसात अशा ढोंगीपणाविरूध्द स्वयंघोषित पुरोगामी लोकच आवाज उठवतील अशी आशा आणि अपेक्षा आहे.तसे झाले आणि अशा प्रकारच्या आगळिकींविरूध प्रत्येकवेळी या स्वयंघोषित पुरोगामींनी आवाज उठवला तरच ही अविश्वासाची भावना कमी व्हायला मदत होणार आहे. अर्थातच अशांचा आजपर्यंतचा इतिहास लक्षात घेता असे काही व्हायची शक्यता फार नाही पण अपेक्षा करायला काही हरकत नसावी. उम्मीद पे दुनिया कायम है असे काहीसे म्हणतातच.
- Log in or register to post comments
म
मोदक
Sun, 09/18/2016 - 10:01
नवीन
>>>>न पटणारा विचार सोडून द्यावा बाकीचा तर घ्यावा. समजा दहातले चार मुद्दे पटत नाही तर उरलेल्या सहा मुद्द्यांवर सहमतीतून सकारात्मक काम करावे. आपल्या मनात देखील परस्पर विरोधी विचारांचे द्वंद्व असतेच की!
दोन चार चुकार घटकांसाठी हिंदू धर्मावर घाऊक टीका करताना हे विचार कुठे जात असावेत?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 09/18/2016 - 07:43
नवीन
बाकी सुरूवातीला ऐशी की तैशी म्हटल्यामुळे गैरसमज झाला होता ;)
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Sun, 09/18/2016 - 08:50
नवीन
सहमत!!
- Log in or register to post comments
क
क्षमस्व
Sun, 09/18/2016 - 10:32
नवीन
सहमत।।।।
- Log in or register to post comments
ज
जोन
Tue, 09/20/2016 - 04:08
नवीन
+११११११११११११
- Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द
Fri, 09/23/2016 - 13:09
नवीन
या वाक्यामुळे हमिदरावान्ची मुस्लिम धर्म, रुढी इ वर टीका करायची म्हटली की xxते हे सिद्ध होते
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 09/18/2016 - 07:56
नवीन
दाभोलकरांचे विधान अतिशय दुर्दैवी आहे. विवेकवादाच्या चळवळीतील व्यक्तीच्या तोंडी ही "आमची" आणि "त्यांची" भाषा शोभत नाही.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 09/18/2016 - 08:02
नवीन
हमीद दाभोळकरांचं मत चुकीचं आहे, दुट्टपी आहे, परंतु ह्यामुळं अंनिस न भूतकाळात केलेल्या कामच महत्व कमी होत नाही. मला नेहमी अस वाटत कि हिंदू धर्मातील खरे आणि खोटे सुधारक इतर धर्मातील चुकीच्या प्रवृत्तीबद्दल बोटचेपी भूमिका घेतात , हि लोक ह्या धर्मातील कट्टरवाद्यांना भितात कि काय असा प्रश्न पडतो. प्रकाशजी नि वर मांडलेल्या मताशी सहमत
अवांतर: जेंव्हा मुस्लिम कायदा मंडळ सुप्रीम कोर्टाला ठणकावून सांगते की तलाक बद्दल निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही आणि आमच्या कायद्यात सर्वोच न्यायालयाने ढवळाढवळ करू नये! त्यावेळी एक हि पुरोगामी चकार शब्द उच्चारत नाही तेंव्हा डोक्यात तिडीक जाते.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 09/18/2016 - 08:04
नवीन
+११११११११
- Log in or register to post comments
स
साहना
Sun, 09/18/2016 - 08:30
नवीन
कुठलाही विचार जर युनिफॉर्म पद्धतीने वापरला नाही तर चांगल्या विचाराचा सुद्धा अतिशय वाईट परिणाम होतो. हिंदू धर्मियांनी होळी सुद्धा खेळू नये पण इतर धर्मियांनी वाट्टेल ते करावे न्यायाने आपण पुढे जात राहिलो तर हिंदू धर्म नामशेष होईल.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 09/18/2016 - 08:44
नवीन
तुम्हाला highlight केलेलं वाक्य नीट समजलेलं दिसत नाही. कोण होळी खेळू नका असं बोललं तर ते पटत नाही म्हणून तुम्ही नाकारू शकता. एखादा उत्सवावेळी कायदे पाळा असे बोलला, तर ह्यावर सहमती होऊन होऊन हे अमलात आणले जाऊ शकते, ह्यातून धर्म पुढचं जाईल. सध्या सध्या सकारात्मक गोष्टीत सहमती करून आपण धर्म वाढवूच, तो स्वर्वव्यापी बनवू.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 09/18/2016 - 09:04
नवीन
@ ››› +++१११ फुर्रोगामी, फेक्युलर , खमुनिस्टांकडून गैरमुस्लिम समुदायाला दिली जाणारी अश्या हरेक प्रकारची वागणूक हाच भारतीय धर्मनिरपेक्षते मधला मोठ्ठा अडथळा आहे. टनाटनी मनुव्रुत्तीच्या लोकांचं यांच्यामुळेही भरपूर फावतं.
- Log in or register to post comments
क
क्षमस्व
Sun, 09/18/2016 - 10:36
नवीन
गुरुजी पक्षवात झालेल्या माणसाप्रमाणे काय बोलत आहात (आय मिन लिहीत) आहात?
लईच लाडात आलंय वाटतं।।।
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Mon, 09/19/2016 - 17:22
नवीन
असं सरसकट बोलल्याने नक्की काय साध्य होतं ते कळलं नाही. तलाकबाबतच्या निर्णयाबद्दल उच्चारलेले हे चकार शब्द. (निव्वळ थोडं गूगल केल्याने सापडले).
http://www.asianage.com/mumbai/secular-muslims-slam-aimplb-statement-779
http://www.indiaglitz.com/javed-akhtar-condemns-muslim-personal-law-board-hindi-news-166646.html
http://scroll.in/article/724902/ban-triple-talaq-and-abolish-muslim-personal-law-board-says-former-minorities-commission-chairman
http://www.financialexpress.com/india-news/shabana-azmi-speaks-up-against-triple-talaq/305629/
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »