अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.


💬 प्रतिसाद
(456)
स
साहना
Tue, 09/20/2016 - 21:16
नवीन
आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे माणूस` असे म्हटले नसून प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडला जातो असे म्हटले आहे. ह्यांत समजण्यासारखे कठीण काय आहे हे समजत नाही. त्यांचे विधान कदाचित खोटे असेल पण आपला नक्की तर्क काय आहे हे समजत नाही. कोहळा म्हणजे माणूस असे आत्मबंद ह्यांना वाटून घरी कोहळा आणला असता त्याला खुर्चीवर बसवून ते चहा पाणी विचारतील असे वाटत नाही.
प्रतीकात्मक नरबळी साठी कोहळा फोडताना मी स्वतःच्या नजरेने पहिले आहे. पूजा वेताळ सारख्या जुन्या देवाची होती.
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
Tue, 09/20/2016 - 21:21
नवीन
कोहळा म्हणजे काय?
खरच माहित नाहिय म्हणुन विचारतोय.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 04:53
नवीन
भोपळा..
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 09/21/2016 - 04:57
नवीन
तांबडा भोपळा टू बी स्पेसिफिक.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2016 - 05:23
नवीन
हा घ्या कोहोळा.
फोटू- अं जा साभार.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 05:27
नवीन
येईच! धन्स!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/21/2016 - 15:24
नवीन
कोहळा (Benincasa hispida) वेगळा
आणि
तांबडा भोपळा (Cucurbita) वेगळा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 09/21/2016 - 20:04
नवीन
मला कोहळा म्हणजे तांबडा भोपळाच वाटायचं.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/22/2016 - 17:43
नवीन
कोहळ्याचे वडे भारी लागतात ! :)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/22/2016 - 17:59
नवीन
=))
खाल्ले नाहित कधी.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 09/22/2016 - 06:26
नवीन
ह्यापुढे हॉलोविनला हा लाल भोपळा भुताचे तोंड म्हनून वापरायचा नाही असा आदेश काढण्यास हरकत नाही.
.
अखिल हम्रिका, युरोप बिरोप टणाटणी मंडळ.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 09/23/2016 - 10:42
नवीन
ज्याच्यापासून पेठा बनवतात तो कोहळा. घारगे बनवतात तो भोपळा.
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Fri, 09/23/2016 - 11:12
नवीन
http://www.misalpav.com/node/23562
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 09/21/2016 - 06:26
नवीन
ash gourd
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2016 - 08:53
नवीन
@आत्मबंधवाल्यानी `कोहळा म्हणजे माणूस` असे म्हटले नसून प्रतीकात्मक नरबळी म्हणून कोहळा फोडला जातो असे म्हटले आहे. ह्यांत समजण्यासारखे कठीण काय आहे हे समजत नाही. ››› त्यांना ते समजलेलं आहे. किंबहुना माहितंही असतं असलं सगळं अश्यांना. पण मी वरती म्हटल्याप्रमाणे त्यांनी जाणीवपूर्वक मती मंदत्व स्विकारलेलं आहे. किंवा स्वखुषिनी अंधत्व पत्करलेलं आहे. त्यामुळे ते टनाटनीपणा करणार. सगळं सर्व बाजुनी नाकारत रहाणार.
म्हणूनच मी म्हटलं वरती. चालू द्या (आत्मकुंथक)टनाटनीपणा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 09:37
नवीन
ऐकीव समजूतीमागची माहिती देता येत नसल्याने आता प्रत्येक प्रतिसादात व्यक्तिगत टिप्पणी सुरू झाली आहे. असो. हे अपेक्षितच आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2016 - 12:07
नवीन
@ऐकीव समजूतीमागची माहिती ››› य्ये ब्बात! उद्या एखाद्या क्रिकेटरलाही तुम्ही सांगाल की "बॅटच्या जड वजनाचा स्ट्रोक बसण्याशी घनिष्ट संबंध असतो. " ही तुझी स्वानुभवाने आलेली माहीतीही ऐकीव आहे.
टनाटनीपणा तो हाच्च!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 09:33
नवीन
कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली, त्याला आधार काय हेच मी विचारतो आहे. सर्वात आधी घाटपांड्यांनी नारळ फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी असे विधान केले. त्याचा आधार विचारल्यावर एक विकिपिडियाची लिंक दिली त्यात काहीही स्पष्टीकरण नव्हते व नारळाचे इतर उपयोगच दिले होते.
एखादा तसं समजून कोहळा फोडतही असेल, पण म्हणून कोहळा फोडणारा प्रत्येक जण किंवा देवासमोर नारळ फोडणारा प्रत्येक जण प्रतीकात्मक नरबळी देत असतो असे समजायचे का? नारळ हा बहुतेक सर्व घरातून खाल्ला जातो. म्हणजे यच्चयावत सर्व कुटुंबे भूतकाळात नरबळी देत होती असे समजायचे का?
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 09/21/2016 - 12:24
नवीन
मी नरबळी म्हटल नाही. नीट कॉमेट वाचा.http://misalpav.com/comment/881819#comment-881819
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 09/21/2016 - 12:32
नवीन
श्रीगुरूजी नरबळीविषयक विधाने जाणीवपूर्वक दुसऱ्यांच्या माथी मारत आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 13:52
नवीन
Ok. Sorry. नारळाची शेंडी व नरबळीचा संबंध पूर्वी कानावर पडल्याने तेच प्रतिसादात आलं.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 13:54
नवीन
हा प्रतिसाद घाटपांडे यांच्यासाठी सुद्धा आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/21/2016 - 14:57
नवीन
मला शास्त्रार्थ वगैरे काही माहित नाही किंवा मी धर्मशास्त्र वाचलेलेही नाही
परंतु नारळ फोडणे म्हणजे नरबळी हे अतिशयोक्त आहे असे वाटते.
आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी नवी मोटार किंवा मोटार सायकल विकत घेतली तेंव्हा त्याच्या समोर नारळ फोडला असेल.
एवढ्या क्षुल्लक कारणासाठी नरबळी दिला जातो हे कोणत्याच संस्कृतीमध्ये कोणत्याही काळात शक्य नाही.
मोठे धरण किंवा पूल बांधताना नरबळी द्यावा असे म्हणणारे मांत्रिक ऐकिवात आहेत. प्रत्यक्ष आजच्या काळात भारतात असे शक्य नाही. बाकी जारण मारण प्रक्रिया सारख्या थोतांडाबद्दल काय बोलावे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 20:24
नवीन
ही अतिशयोक्तीच आहे. नारळ म्हणजे माणसाचे मस्तक व नारळाची शेंडी म्हणजे मस्तकावरील शेंडी आणि नारळ फोडणे म्हणजे नरबळी देण्याचे प्रतीकात्मक रूप अशा कहाण्या काहीजणांकडून ऐकल्या आहेत. त्यांनाही यामागचे लॉजिक माहित नव्हते. त्यांनीही अशाच कोणाकडून तरी हे ऐकले होते आणि या ऐकीव माहितीवर विचार न करता ते विश्वास ठेवत होते. जर नारळाची शेंडी म्हणजे माणसाची शेंडी मानली तर याचा अर्थ भूतकाळात शेंडीवाली माणसे म्हणजे ब्राह्मण बळी दिले जात होते असा अर्थ निघू शकतो. परंतु बळी महारांचा दिला जात असे असेही दावे वाचले आहेत. संत श्रीचोखामेळा यांना बळी दिले गेले असेही दावे वाचले आहेत. हे दोन्ही दावे एकत्र केले तर महार शेंडी ठेवत असत किंवा ब्राह्मणांना बळी दिले जात असे हे दोन वेगवेगळे निष्कर्ष काढता येतील.
नारळ फोडण्याआधी नारळाला मध्यभागी गोलाकार पाणी लावले जाते. ते का लावले जाते याविषयीही कोणालाच माहिती नाही. याचाही संबंध कदाचित बळीशी जोडला जाईल. लिंबू उभे कापणे असेच अशुभ समजले जाते. एकंदरीत सगळाच गोंधळ आहे व अनेक ऐकीव गोष्टी पसरल्या आहेत.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 09/22/2016 - 11:57
नवीन
हे बघा क्सले क्सली यज्ञ अन बळी देत होते त्याची सविस्तर माहिती:
http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-04-39/2012-10-01-06-03-42?start=8
ह्यात उल्लेख आहे बळी साठी ब्राह्म्ण वगैरे आणण्याचा अन इतरही. आता ह्या पर्टिक्युलर गोष्टीत त्याला सोडुन दिले, पण इतर ठिकाणी देतही असतील!
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 09/23/2016 - 10:50
नवीन
साहेब,
एकेकाळीच्या नर्/पशु बळींच्या प्रथा जैन बौद्ध काळात शाकाहारात रुपांतरित झाल्या यावर आक्षेप आहे की
इतके दिवस पूजेमध्ये, वास्तुशांतीत वगैरे जे नारळ फोडले त्यांना अचानक कोणी ब्रम्हहत्या म्हणू लागले म्हणून मनाला त्रास होतो आहे ?
आत्मबंध यांनी पुरावे दिल्यानंतर सुद्धा मान्य का करत नाही ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 09/23/2016 - 11:16
नवीन
नर/पशु बळींच्या प्रथा शाकाहारात रूपांतरीत झाल्या असतील तर ती अत्यंत आनंददायक गोष्ट आहे. मी शाकाहाराचा कट्टर पुरस्कर्ता आहे व कोणत्याही प्रकारच्या हत्यांना माझा पूर्ण विरोध आहे.
नारळ फोडणे या प्रकाराला ब्रह्महत्या म्हणल्याने मनाला त्रासबिस होत नसून लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर व्हावा अशी इच्छा आहे.
मूळ प्रतिसाद नारळ फोडणे म्हणजे बळी/नरबळी देण्याचे प्रतीकात्मक रूप आहे अशी काहीजणांची असलेली गैरसमजूत यावर होता. नारळ फोडण्याला बळी/नरबळी देण्याचे प्रतीकात्मक स्वरूप समजणे या भ्रामक समजूतीच्या पुष्ट्यर्थ अजूनपर्यंत कोणीच पुरावे दिलेले नाहीत. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींनाही याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही फक्त ऐकीव माहिती असल्याचे सांगितले आहे.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 09/22/2016 - 11:47
नवीन
नारळ स्वस्त! पण पुण्य तेवढच! पुण्य लाभाव म्हणुन आता जिकंड तिकंड देत असतील नारळ बळी!
आता कुशावर्तावर स्नान केल्यावर सप्तगंगांच स्नान केल्याच पुण्य लाभत तर ह्याचही तसलंच लॉजीक असेल.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 09/21/2016 - 18:50
नवीन
हे स्वमतीमंदत्व आहे असे आता मला सुद्धा वाटायला लागलेय. इतकेच म्हणू शकते

- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 09/21/2016 - 19:15
नवीन
थोडेसे अवांतर - माहीते असावी म्हणून विचारतो. गावी काही घरांत आडाला कोहळा बांधून ठेवलेले पाहीले आहे. ते का करतात ?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2016 - 19:26
नवीन
आजच्या भाषेत सांगायचं तर तो निगेटिव्ह पॉवर्स स्वत:कडे खेचून घेतो .. म्हणून तो दर्शनी लावावा.. इसं आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 09/22/2016 - 16:21
नवीन
हे काय असतं? पाॅवर म्हणजे कार्य करण्याचा दर. तो धन किंवा ऋण कसा काय असू शकतो?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 09/22/2016 - 16:33
नवीन
पावर मंजे शक्ती हो रावसाहेब! निगेटीव पावर मंजे दुष्ट शक्ती. इति सनातनप्रभात =))
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
गुरुवार, 09/22/2016 - 23:15
नवीन
त्यांना एनर्जी म्हणायचं असावं बहुतेक.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/22/2016 - 16:49
नवीन
हहपुवा
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/22/2016 - 19:09
नवीन
वर सांगितलेला अर्थ ही एक प्रचलीत धर्म श्रद्धा आहे. माझं मत किंवा विचार नव्हे. अर्थात तुम्ही आत्मकुंथक पणे ते जणू काही मीच आत्म मतीनी बोल्लोय असं समजून हसून घेणार.. . आणी स्वत:चा क्षणीक /लाक्षणीक विजय झाल्याचा उन्माद बालीशपणे मनात घोळवणार .. हे उघड आहे.
तेंव्हा चालू द्या स्वार्थक आत्मरंजन!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/22/2016 - 20:40
नवीन
या भोपळ्याची पॉवर विधानावरून तुम्हाला नाही हसलो हो. त्या मूळच्या विनोदी विधानाला हसलो. तस्मात् मनात असलेले चांदणे काढून टाका. तुम्हाला हसण्याची वेगळी कारणे आहेत की.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 09/23/2016 - 09:12
नवीन
@तस्मात् मनात असलेले चांदणे काढून टाका.›››
कशाला धरू मी चांदणे मनी?
तू तर मुळचाच चंद्र टनाटनी!
@ तुम्हाला हसण्याची वेगळी कारणे आहेत की. ››› ते तुमचं तुम्ही पाहिजे तेव्हढं स्वार्थक आत्मकुंथन करू शकता. त्यानी फरक असा काहीही पडत नाही. पण तुमच्यावर हसण्या इतकीही कारणं उपलब्ध नाहित, कारण~ हास्यापद व्हायलाही काही लायकता लागते. तुमची तीही नाही.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 09/23/2016 - 09:25
नवीन
ते राहू दे. तुम्हाला स्वतःला हे निगेटिव्ह पाॅवर वगैरे पटतं का?माझ्या मते हे सगळे मनाचे खेळ आहेत.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 09/23/2016 - 09:47
नवीन
मनाचेच खेळ सगळे.
पण त्याच्या इनपुटची भेळ आपण जो पर्यंत बाधीत व्यक्तीच्या मनातून काढायचे उपाय योजत नाही.. किंवा किमान तशी इच्छा व्यक्तवत नाही.. तोपर्यंत त्याची निंदा करू नये.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 09/23/2016 - 12:17
नवीन
दोष दाखवल्याशिवाय समोरचा माणूस ते सोडेल याची अपेक्षा करणं कसं शक्य आहे? का तुमच्या दृष्टीने दोष दाखवणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/23/2016 - 12:55
नवीन
बोकशेठ, हे समजलं नाही? दोष दाखवणं आणि निंदा करणं दोन वेगळया गोष्टी!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 09/23/2016 - 13:28
नवीन
@का तुमच्या दृष्टीने दोष दाखवणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत? ››› ते कोणती व्यक्ती काय हेतूनं शब्द रचना वापरेल? त्यावरून कळणार. त्यामुळे अत्ता कसं सांगता येईल? भाषा समजावणुकीचा सूर घेऊन असली तर ऐकणाराही ऐकतो.. असंच काहिसं अपेक्षित आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 09/23/2016 - 13:30
नवीन
दोष दाखवल्याशिवाय समोरचा माणूस ते सोडेल याची अपेक्षा करणं कसं शक्य आहे? का तुमच्या दृष्टीने दोष दाखवणं आणि निंदा करणं या वेगळ्या गोष्टी आहेत?
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 09/23/2016 - 10:59
नवीन
माझ्या मते हे सगळे मनाचे खेळ आहेत.
अहो, त्यांच्या धंद्यावरच पाय कशाला आणताय ? तस तर हे वास्तुशांत वगैरे बी मनाचा खेळच की.
बिअरच्या झाकणाचा ट्टॉक असा आवाज झाला तरीही वातावरण प्रसन्न वगैरे होतच की. तरीसुद्धा वास्तुशांतीच दुकान चालायच ते चालतच ना.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 09/23/2016 - 11:14
नवीन
ती दारुची दुकानं वास्तू फेंगशुई किंवा वास्तू शांत शिवायच जोरदार चालताना दिसतातच की
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Fri, 09/23/2016 - 11:17
नवीन
=))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 09/23/2016 - 11:18
नवीन
हास्यास्पदच होण्याची तुमची लायकी आहे हे तुम्ही मान्य केल्यामुळे आनंद होऊन हसू येत आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 09/23/2016 - 13:24
नवीन
@हास्यास्पदच होण्याची तुमची लायकी आहे हे तुम्ही मान्य केल्यामुळे आनंद होऊन हसू येत आहे.››› तन्निमित्तानी तुमचीही लायकी त्यापलीकडे नाही.. हे ही सिद्ध करून दिलत टुम्ही आपोआप! =))
हो की नाही?
टन्ना टन्नी?
हास्यास्पदच आणी हास्यास्पदही (मी वापरलेला शब्द) या दोन शब्दातला फरक कुणालाही कळेल.. फक्त तो कपटी टनाटनी श्रीखुर्जी नसला पाहिजे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 09/23/2016 - 19:23
नवीन
पुन्हा एकदा हसायला आलं. तुमचे सगळेच प्रतिसाद हास्यास्पद आहेत. विशेषतः दर २-३ वाक्यांमागे टणटण, टनाटन असलं काही तरी वाचून, पूजा करताना दर २-३ मिनिटांनी पुरोहित यजमानांना पळीभर पाणी सोडा किंवा आचमन करा असे सांगतात, त्याची आठवण झाली. पूर्वी लक्ष्मी रस्त्यावर एक माणूस एका हातात एक फलक उंच धरून दुसर्या हातात उदबत्त्यांचे पुडे धरून उदबत्त्या विकायचा. त्याच्या हातातल्या फलकावर टनाटन अगरबत्ती असं लिहिलेलं होतं. तुमच्या प्रत्येक प्रतिसादातील प्रत्येक २-३ वाक्यांमागे जो टणटणाट असतो ते वाचून त्या उदबत्तीविक्याची आठवण झाली.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »