Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

स
साहना
Sun, 09/18/2016 - 04:28
🗣 456 प्रतिसाद
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

प्रतिक्रिया द्या
217829 वाचन

💬 प्रतिसाद (456)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/22/2016 - 05:42 नवीन
@ मी ज्या ज्या वास्तुशांतीच्या पूजनात सहभागी होतो (यजमान म्हणून, पुरोहित म्हणून नाही) त्या त्या सर्व समारंभात गुलाल घातलेला भात, उडीद वडे असले प्रकार नव्हते. ››› तुम्ही नीट पाहिलेलं नाही. किंवा थापा मारत आहात. वास्तुशांतीत क्षेत्रपाल बळीपूजा नाही , असं होऊच शकत नाही. किंवा ज्या पुरोहितानी वास्तुशांत केली तो अद्न्यानी असेल. पण हे शक्य नाही. नुसते सत्यनारायणसम्राटएजंटठेकेदार पुरोहित सुद्धा वास्तुशांत चालवायला 'सर्व विधी येणारा' पुरोहित बरोबर आणतात. व सर्व करवतात. किंवा स्वत: तेव्हढा तसा show उभा करतात. ज्यात बलिपूजा असतेच. असो.. पुराव्यादाखल हा वास्तुशांतीतला बळीपूजेचा क्षेत्रपालाचा मुखवटा पहा.. (हा कोण वाटतो? नर की वानर? ) Image removed. हा अजून एक पहा. Image removed. अता आज जिथे महालय श्राद्धाला मी जाणारे तिथला भोजन पात्राचा फोटो इथे टाकतो.. आणी पुढे किंवा जुना एखादा असला तर नवरात्रातल्या कूष्मांड बळी कोहोळ्याचा फोटो टाकतो.. मग बघू तुम्ही काय म्हणता? ====== @ श्राद्ध किंवा तेराव्या/चौदाव्याचा जेवणात वडे होतेच, पण इतरही अनेक पदार्थ होते आणि त्याचा मांसाशी संबंध आहे असे कोणीही सांगितलेले नाही. ››› ते बहुतांश पुरोहितांना माहितंही नसतं. तर ते तुम्हाला काय डोंबलं सांगणार? मी विरोधी मतांचा अभ्यास केला म्हणून मला माहित झालं. @एक वास्तुशांत पौरोहित्याचा पिढीजात व्यवसाय असलेल्या व वेदाभ्यासाचा अभ्यास असलेल्या पुण्यातील एका नामवंत पुरोहित घराण्यातील पुरोहितांनी केली होती. यातील एका पुरोहितांनी नंतर वेदाभ्यास पूर्ण करून काशीतून 'दशग्रंथी' हा सन्मान प्राप्त केला. ››› या सो कॉल्ड उच्चशिक्षित पुरोहितांबद्दल तर बोलूच नका. अगदी अपवाद सोडले, तर कथीत उच्चशिक्षणाच्या मुखवट्याचा वापर करून धंदेबाजी करण्यापलिकडे हे दशग्रंथी टनाटनी घनपाठी काहिही करत नाहीत.. हेच पहात आलोय. त्यातले जे नम्र आणी विनयशील आहेत ते अश्या गोष्टी सांगायच्या कक्षेतही येत नाहीत. आणी हे सेलिब्रिटी पुरोहितही त्यांना बरोबर नेलं तरी झाडूसारखे कोपय्रातच ठेवतात.. हे ही पाहिलेलं आहे. शिवाय या सॅलिब्रिटी दशग्रंथींनाही हे सगळं माहित असतं.. पण ते अॉन ड्यूटी \अॉफ ड्यूटिही कधी काही बोलत नाहित. उलट "बलीपूजा मंजे केवळ द्रुष्ट काढण्यासारखं" असं मुद्दाम दडपून चानचान अर्थ सांगतात. @अजून एक वास्तुशांत दोन महिला पुरोहितांनी केली होती. त्यातही असले पदार्थ नव्हते. इतर नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या वास्तुशांतीत सुद्धा हे पाहण्यात नाही. ››› तुमची द्रुष्टीच महान आहे मग! शिवाय तुम्ही श्राद्ध भोजनातले पदार्थ बळीपूजा या विषयात कसे शिताफिनी मिसळताय . ही पण तुमची विशेष द्रुष्टीच असावी. असो. @इतर नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या वास्तुशांतीत सुद्धा हे पाहण्यात नाही. ››› त्यांच्याही नावानी थापा का? उत्तम! @घरी सत्यनारायणासाठी, सोळा सोमवारच्या व्रतासाठी, ग्रहयज्ञासाठी वा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी आलेल्या पुरोहितांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी ही चुकीची समजूत असल्याचे सांगितले आहे. ››› सत्यनारायणात बळीपूजा असते, असं इथे कोण म्हणालं हो? मग हा खुला सा का करत आहात? सोळा सोमवारच्या व्रत व कोणत्याही व्रतात (म्हणजे त्या व्रताच्या उद्यापनाच्या होमाच्या विधीत). व ग्रहयद्न्यात बळीपूजा नसतेच. त्यामुऴे हा खुला सा तुमच्यासाठी निरूपयोगी आहे. असो. शिवाय जे पुरोहित 'ही चुकीची समजूत आहे' असं सांगतात, त्यांना का हि ही माहित नाही. किंवा ते 'तिथे' सांगू शकत नाहित .. हेच खरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/22/2016 - 10:58 नवीन
ही असली भयानक व हिडीस सजावट मी स्वतःच्या घरच्या वास्तुशांतीच्या पूजेत पाहिली नाही किंवा इतरांच्या वास्तुशांतीतही पाहिली नाही. वास्तुशांत हा आनंदाचा सोहळा असतो. स्वत:च्या नवीन घरात रहायला जाण्याचा आनंद, त्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलेले नातेवाईक व मित्रमंडळीं, पूजेच्या निमित्ताने व मंत्रपठणाने निर्माण झालेले पवित्र वातावरण अशा सोहळ्यात असली सजावट बघून कसं तरीच वाटलं. असले हिडीस प्रकार आम्ही केले नाहीत किंवा आमच्या पाहण्यात नाहीत. मी ज्या दशग्रंथी विद्वान पुरोहितांबद्दल लिहिलंय त्यांनी अनेक वर्षे वेदांचा अभ्यास करून वाराणशी येथून हा पुरस्कार मिळविलेला आहे. त्यांचे घराणे अनेक पिढ्या पौरोहित्य करीत आहे. असे अभ्यासू विद्वान वेदांचा जो अर्थ सांगतात किंवा परंपरांच्या मागची विचारसरणी सांगतात ती अनेक वर्षांच्या अभ्यासातून आलेली असते आणि मी अशांच्या सांगणावरच विश्वास ठेवतो. अन्यथा सत्यनारायण, वास्तुशांत, श्राद्धाच्या पूजा सांगणारे कुडमुडे, पोटार्थी भटजी पैशाला पासरी सापडतील. ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने अनेक स्त्रीपुरूषांना पौरोहित्य या विषयाचे शिक्षण दिले आहे. ज्ञानप्रबोधिनीचे प्रशिक्षित पुरोहित/पुरोहिता सत्यनारायण, वास्तुशांतीपासून श्राद्ध, दहावा/तेरावा/चौदावा अशासारख्या सर्व विधींचे पौरोहित्य करता व ते करताना सर्व विधींचा अर्थ व त्यामागची कारणमीमांसा उलगडून सांगतात. गतवर्षी माझी सख्खी मेव्हणी अचानक कर्करोगाने गेल्यावर ज्ञानप्रबोधिनीच्या एका प्रशिक्षित गुरूजींकडून पुढील विधी करून घेतले. पिंड, कावळा पिंडाला शिवणे, गुलाल घातलेला भात, वडे इ. विचित्र प्रकार न करता त्यांनी सर्व विधी व्यवस्थित करून घेतले व त्यामुळे ते करताना कोणतीही घृणा वाटली नाही. आम्ही अशांनाच खरे व ज्ञानी पुरोहित मानतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/22/2016 - 13:39 नवीन
@ही असली भयानक व हिडीस सजावट मी स्वतःच्या घरच्या वास्तुशांतीच्या पूजेत पाहिली नाही किंवा इतरांच्या वास्तुशांतीतही पाहिली नाही. ››› हे केवळ भितीदायक आहे. भयानक आणी खास करून हिडीस हा तुमच्या कथीत सू धारीत द्रुष्टीचा दोष आहे. आता बाकिच्या प्रतिसादावर काहिही बोलायला नको. तुम्ही कसं सगळं चानचानच बघायचं ठरवून ठेवलेलं आहे. आणी तुमचं मन टनाटनी धर्म मुळातच चांगला आहे.. बाकिच्यांनी तो बिघडवला.. असली भूमीका घेऊन बसलेलं आहे. आंम्ही लोक धर्मात निरुपद्रवी बरी वाईट मूल्य असतात.. कारण शेवटी तो माणसांनीच तयार केलेला प्रकार आहे.. असं तसच असल्यामुळे तसं मानतो. तरीही तुम्हाला ब्रम्हकर्म या कर्मकांडाच्या पोथीतल्या वास्तुशांती प्रयोगाच्या पानांचे प्रींट औट काढून इथे दाखवतो. ज्यात या बलीदानाचा विधी व संस्क्रुत मंत्र आहेत. ते इथे टाकतो, ज्याचा इथे कोणिही संस्कृत भाषा द्न्याता अर्थ सांगू शकेल. व केवळ मी म्हणतो , म्हणून हे असं आहे.. असं कुणाला वाटणार नाही. शिवाय तुमचे कोण ते येव्हढे महाविद्वान गुरुजी ज्यांनी सदर विधीच तुमच्याकडे टाळला.. तो का? याची कारण मिमांसा त्यांना विचारून इथे स्पष्ट करतो.. संदेशातून नंबर द्या त्यांचा. आहे तयारी? अता या ज्ञानप्रबोधिनीतल्या कथीत नवपुरोहितांविषयी- हे लोक जे विधी करतात.. ते मूळ जुनेच विधी त्याच विषमतावादी मूल्यांसह फक्त छान छान माहिती देत.. मराठीत काही मंत्र रुपांतरित करून विधी करतात. ज्याचा प्र-बोधनाशी का हि ही संबंध नाही. फक्त तथाकथीत नवसुशिक्षीत वर्गाला कर्मकांडातल्या ज्या गोष्टी बोजड अवजड नकोश्या वेळखाऊ खर्चीक वाटत होत्या त्या यांनी आवश्यक तश्या उडवून , अल्टर करून जरा नव्या मार्केटला सधन व कथीत मॉड वर्गाला विचारात घेऊन चानचान हव्याश्या वाटतील अश्या तैय्यार केलेल्या आहेत.. म्हणजे ते ही विकतात वडापावच.. फक्त त्याला विकताना ब्रेडवडा म्हणतात. खॉलरेस्टॉल वग्रे शब्द उच्चारतात. पण त्यातला टनाटनीपणा काढून आधुनिकता समता वगैरे आणत नाहीत. थोडक्यात जुनं प्रॉडक्ट नव्या सुसह्य रूपात ते विकत आहेत. हे आधुनिक वग्रे असते, तर विवाहविधीतले कन्या-दानासारखे टनाटनी विधी काढून त्या जागी नवमूल्यवादी समतेचा पुरस्कार करणारे विधी त्यांनी आणले असते. पण ते होणे नाही. कारण मुळात जे जे टनाटनी त्यांच्या कशी यावी आधुनिकता मनी? ... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे गुरुवार, 09/22/2016 - 14:01 नवीन
कडक!!! _/\_ _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/22/2016 - 15:49 नवीन
कारण मुळात जे जे टनाटनी त्यांच्या कशी यावी आधुनिकता मनी?
मस्त! मस्त!! मस्त!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/22/2016 - 16:44 नवीन
अपेक्षित प्रतिसाद! अशा प्रतिसादाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. जेव्हा जेव्हा धर्म, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या निरर्थक/घातक/अन्यायकारक इ. इ रूढीपरंपरा इत्यादींमध्ये सुधारकांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा बुरसटलेल्या कर्मठ विचारांच्या खोडांनी त्यांची हेटाळणी करून अशा सुधारणांना विरोध केलेला आहे. त्यामुळेच श्राद्ध, वास्तूशांत इ. विधीतील फालतू प्रकार काढून टाकण्याला असलेला तुमचा विरोध समजू शकतो. सुदैवाने कर्मठांच्या विरोधाला न जुमानता हिंदू धर्म सुधारणा स्वीकारत राहिलेला आहे. जानवे परीधान करणे, शौचाला जाताना जानवे कानावर लावणे, दर वर्षी श्रावणात श्रावणी करून नवीन जानवे परीधान करणे, काही विशिष्ट प्रसंगी जानवे डाव्या खांद्यावरून न घालता उजव्या खांद्यावरून घालणे, आईवडील गेल्यानंतर क्षौर करणे, कावळा, पिंड . . . हे व अशासारखे असंख्य निरर्थक प्रकार कमी होत आहेत व ते कालांतराने पूर्णपणे नष्ट होणार आहेत. वास्तूशांतीची पूजा, श्राद्धाचा विधी, दहनापूर्वीचे व नंतरच्या दिवसातले विधी यातील निरर्थक आणि हिडीस प्रकार नष्ट होणारच. कर्मठ, कुडमुड्या भटजींनी कितीही विरोध केला आणि हे करणार्‍यांना कितीही नावे ठेवली तरी हे होणारच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/22/2016 - 17:39 नवीन
जेव्हा जेव्हा धर्म, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या निरर्थक/घातक/अन्यायकारक इ. इ रूढीपरंपरा इत्यादींमध्ये सुधारकांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा बुरसटलेल्या कर्मठ विचारांच्या खोडांनी त्यांची हेटाळणी करून अशा सुधारणांना विरोध केलेला आहे. त्यामुळेच श्राद्ध, वास्तूशांत इ. विधीतील फालतू प्रकार काढून टाकण्याला असलेला तुमचा विरोध समजू शकतो. सुदैवाने कर्मठांच्या विरोधाला न जुमानता हिंदू धर्म सुधारणा स्वीकारत राहिलेला आहे.
मात्र कर्मठ प्रकाराला विरोध करणाऱ्यांना कायम नावे ठेवण्यात हिंदुत्त्ववादी नेहमीच पुढे राहिले आहेत. आता या धाग्यावरही तेच चाललंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/22/2016 - 20:35 नवीन
मात्र कर्मठ प्रकाराला विरोध करणाऱ्यांना कायम नावे ठेवण्यात हिंदुत्त्ववादी नेहमीच पुढे राहिले आहेत. आता या धाग्यावरही तेच चाललंय.
हमीद दाभोलकर खरेखुरे हिंदुत्ववादी असणार कारण ईदला खरी बकरी कापण्याऐवजी मातीची बकरी कापण्याच्या सूचनेला प्रोत्साहन न देता त्यांनी ईदला बकरी कापण्यामागचा भावार्थ समजून घ्या असा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी समजणारे निधर्मी दिसतात कारण ते बुरखा, तोंडी तलाक, ईदला बकरी कापणे असल्या प्रकारांना विरोध करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/22/2016 - 20:45 नवीन
गुरुजी ईदला बकरी कापण्याची प्रथा हिंदूंमध्ये आहे आणि त्यामुळे हमीद दाभोलकर त्याला विरोध करताहेत ही नवीन माहिती तुमच्या प्रतिसादातून मिळाली. असेच ज्ञानकण आम्हा विद्यार्थ्यांना द्या. इथल्या अनेक प्रतिसादात देवीला नवसाला बकरी कापणे वगैरे प्रथांना अंनिसने विरोध केला म्हणून ते दांभिक असल्याची आवई उठलीच आहे. इतरत्रही अंनिसच्या कामाबाबत 'आमचेच उकीरडे का साफ करता, त्यांचं बघा, तोपर्यंत आम्ही घाणीतच लोळणार' वगैरे भूमिका घेणारे लोक कोण आहेत ब्रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/22/2016 - 20:58 नवीन
अच्छा, म्हणजे हिंदूसुद्धा ईद किंवा दिवाळीला बकरा कापत असले तर हे विरोध करणार, हिंदूंमध्ये अंधश्रद्धा असली तर दाभोलकर विरोध करणार, पण मुस्लिमातील अंधश्रद्धेला विरोध न करता त्यामागाचा भावार्थ समजून घ्या असे सल्ले देणार. वा! अंनिस धर्म, जात वगैरे मानत/पाळत नाही असे ऐकून होतो. पण इथे अंधश्रद्धा बघताना आधी धर्म बघून त्यानुसार विरोध करायचा का भावार्थ शोधायचा असं सिलेक्टिव्ह अंधश्रद्धानिर्मूलन चालललं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/22/2016 - 21:06 नवीन
आमचेच उकीरडे का साफ करता, त्यांचं बघा, तोपर्यंत आम्ही घाणीतच लोळणार
हीच ती वृत्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 09/23/2016 - 10:59 नवीन
आमचेच उकीरडे का साफ करता, त्यांचं बघा, तोपर्यंत आम्ही घाणीतच लोळणार
तसं नाही ते. हिंदू व मुस्लिम दोघेही एकच कृती करतात. पण हिंदूंचा तो उकिरडा आणि मुस्लिमांचं ते पवित्र, निर्मळ देवस्थान अशी विसंगती दिसते. दोघांनाही विरोध करायला हवा. धर्मावर आधारीत सिलेक्टिव्ह पाठिंबा व सिलेक्टिव्ह विरोध नसावा. ज्या हिंदूंच्या कृतीला अंधश्रद्धा म्हणून विरोध केला जातो त्याच मुस्लिमांच्या कृतीला विरोध न करता त्यातील भावार्थ समजून घ्या असा सल्ला दिला जातो. एकतर दोघांनाही अंधश्रद्धा म्हणून विरोध करा किंवा दोघांच्याही कृतीमागील भावार्थ समजून घ्यायचा सल्ला द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 09/23/2016 - 11:14 नवीन
जराशी गल्लत. विरोध अंनिस मुसलमान मंडळींचे संबोधन का करत नाही ह्याला नहिये. बळी देणं हे सगळीकडे सारखंच. पण जेव्हा कोणी हिंदुंनी बळी दिला की अंधस्रद्धा अन मुसलमानांनी बळी दिला तर धार्मिक भावना समजुन घ्या असे अंनिसचे पदाधिकारी सांगतात, तेव्हा त्यास विरोध चाललाय. तुम्हास मुसलमानांचे प्रबोधन वगरे नसेल करायचे, त्यांचे उकिरडे साफ करायचे नाहियेत सगळ मान्यय हो. पण फक्त त्यांनी तिकडच्यांच्या उकिरड्यास उकिरडा म्हणावे, बगिचा म्हणु नये येवढीच अपेक्षा. जर ते नाहि, तिकडे बगिचाच आहे म्हणत असतील, तर आम्ही त्यांना दुटप्पी म्हणु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
श
श्रीगुरुजी Fri, 09/23/2016 - 11:26 नवीन
एक्झॅक्टली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
आ
आजानुकर्ण Fri, 09/23/2016 - 21:12 नवीन
अनिरुद्ध साहेब हिंदूंच्या अनेक सणांना घरी कोंबडे, बोकड वगैरे कापून मांसाचा नैवेद्य असतो. याला अंनिसने कधी विरोध केला आहे? गटारी अमावास्येला अंनिसने विरोध केलाय का? ज्या गोष्टींना विरोध केलाय त्या अंधश्रद्धाच आहेत. नवस म्हणून बळी देण्याची जी प्रथा आहे ती अंधश्रद्धा आहे. भगत बोलावणे आणि त्यासाठी कोंबडी कापणे ही अंधश्रद्धा आहे. बकरी ईदला कापणारी बकरी ही नवस फेडण्यासाठी वगैरे कापली जात नाही. मुसलमानांमध्ये जो उकीरडा आहे (तलाक पद्धत वगैरे) यावर मुसलमानातलेच दलवाई वगैरे सुधारक काम करतच आहेत की. पण हिंदूंचा आक्षेप आमचं घाणीतलं लोळणं आधी का बंद करता यावरच कायम का असतो. उलट हिंदूंची घाण साफ करण्याचं काम प्रायॉरिटीनं होतंय म्हटल्यावर हिंदूंनी अंनिसप्रती कृतज्ञ राहायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 09/24/2016 - 04:56 नवीन
फरक नाही वाटत तुम्हाला तर विषय आटोपता घेतो माझ्याकडून. तुम्ही तुमचे गुणगान करत रहा! पण आता आम्हाला त्यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन प्रोजेक्ट्सबाबत कायमच संशय राहणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 11:15 नवीन
बकरी ईदला कापणारी बकरी ही नवस फेडण्यासाठी वगैरे कापली जात नाही.
गैरसमज आहे. प्राणी कापण्यासाठी फक्त नवसच असला पाहिजे असं नसतं. भूतकाळात कोणी एका मुस्लिमाने अल्लाच्या मागणीवरून मुलाचा बळी दिल्यावर अल्लाच्या आशिर्वादाने मुलाच्या जागी बकरी दिसली अशी कथा आहे. त्यामुळे मुस्लिम अल्लासाठी बकरी कापतात व कापताना कुराण किंवा इतर कोणत्यातरी धर्मग्रंथातील श्लोक वगैरे तोंडाने पुटपुटत असतात जेणेकरून कापण्याचे पाप लागणार नाही (हे एका मुस्लिमाकडून ऐकले आहे. नक्की काय श्लोक वगैरे पुटपुटतात याची कल्पना नाही). ईदला बकरी कापणे हे पूर्णपणे धार्मिक कृत्यच आहे व ते धार्मिक समजुतींवरच आधारीत आहे. या कृत्यात व हिंदूच्या नवसाचे कोंबडे कापण्यात फरक वाटत असेल तर मग बोलणंच खुंटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रदीप Sun, 09/25/2016 - 07:12 नवीन
मुसलमानांमध्ये जो उकीरडा आहे (तलाक पद्धत वगैरे) यावर मुसलमानातलेच दलवाई वगैरे सुधारक काम करतच आहेत की. कुठल्या दलवाईंच्या कार्याबद्दल वर्तमानात बोलत आहात आपण? हमीद दलवाईंना जाऊन २५+ वर्षे लोटली आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नि मेहरून्निसा दलवाईंनी ते कार्य पुढे सुरू ठेवण्याचा नेटाने प्रयत्न केला, पण त्या समाजातील प्रमुखांच्या रेट्यासमोर त्यांचे काही चालले नाही. परिणामी त्यांना ते प्रयत्न थांबवावे लागले. आता प्रकाश घाटपांड्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम सत्यशोधक मंडळीचे कार्य पुन्हा: सुरू झाले आहे, असे दिसते. आणि त्यांनीच एका प्रतिसादात अंनिसही त्यात सहभागी आहे असे म्हटले आहे. ही नक्कीच स्त्युत्य बाब आहे. बाकी, धाग्याच्या मूळ विषयावरील (हमीद दाभोळकरांचे वक्तव्य) तुमचे काय मत आहे, हे निसःदिग्ध शब्दांत येथे सांगाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रदीप Sun, 09/25/2016 - 07:14 नवीन
आजानुकर्णांना उद्देशूनन होता, तो चुकीच्या ठिकाणी पडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
अ
अमितदादा Sun, 09/25/2016 - 07:37 नवीन
बकरी ईदला कापणारी बकरी ही नवस फेडण्यासाठी वगैरे कापली जात नाही.
ती धार्मिक कारणासाठीच कापली जाते ना. एक परंपरा किंवा धार्मिक रीतिरिवाज अपेक्षित आहेत ना यातून, मग ती हिंदू धर्मातील बळी (नवस करू अथवा न करू) यापासून वेगळी कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/22/2016 - 18:53 नवीन
@ जेव्हा जेव्हा धर्म, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या निरर्थक/घातक/अन्यायकारक इ. इ रूढीपरंपरा इत्यादींमध्ये सुधारकांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा बुरसटलेल्या कर्मठ विचारांच्या खोडांनी त्यांची हेटाळणी करून अशा सुधारणांना विरोध केलेला आहे. त्यामुळेच श्राद्ध, वास्तूशांत इ. विधीतील फालतू प्रकार काढून टाकण्याला असलेला "तुमचा विरोध" समजू शकतो. ---माझा विरोध??? मी या गोष्टी काढून टाकायला कधी विरोध केला? दाखवा बरं? लाज नाही का वाटत कपटी पणानी असले खोटारडे आरोप करायला? उलट मीच या गोष्टी काढून टाकायला लोकांना प्रव्रुत्त करणारा धर्मसुधारणावादी पुरोहित आहे... हे यापुढे नीट लक्षात ठेवा. असला बिनडोकपणे आरोप करण्याआधी. @वास्तूशांतीची पूजा, श्राद्धाचा विधी, दहनापूर्वीचे व नंतरच्या दिवसातले विधी यातील निरर्थक आणि हिडीस प्रकार नष्ट होणारच. कर्मठ, कुडमुड्या भटजींनी कितीही विरोध केला आणि हे करणार्‍यांना कितीही नावे ठेवली तरी हे होणारच आहे. ››› अगदी बरोबर आहे.. आम्हीच आहोत ते. हे असले विधी यजमान इच्छेने उडवून धर्म सुधारणा करणारे. फक्त त्याचा व्यापक प्रसार तेंव्हाच नीट होईल. जेंव्हा तुमच्यासारखे दांभीक "मूळ धर्म चानचान आहे, रूढी परंपरांमुळे तो घाण झालाय" असं बोलायचं बंद होतील. आणी रूढी परंपरांच्या अंगावर सगऴे दोष ढकलून त्यांना शिव्या देऊन स्वत:ला आणी स्वत:च्या धर्माला हायली सोफेस्टिकेटेड वैगेरे समजायचे बंद होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/22/2016 - 20:37 नवीन
तुम्ही मागच्या पानावर जे २ फोटो टाकले ते तुम्ही सांगितलेल्या पूजेचे का अजून दुसर्‍या कोणत्यातरी भटजीबुवांनी सांगितलेल्या पूजेचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/23/2016 - 04:14 नवीन
ते फोटो कुणी केलेल्या पूजेचे ? याला काही एक विशेष महत्व नाही . अनेक(पुरोहित)जण असल्या अनेक पुजांचे विविध फोटो अं. जा. वर टाकत असतात. भाताचा बळी कोणी मुखवटा करून करतात. कुणी नुसताच ढीग रचून त्यावर दिवा उदबत्ती ठेवतात. कुणी ढीग रचून कडेनी भाताचे ८, १० मुटके ठेवतात. तो कसा केला याला महत्व नाही. तो विधीत आहे!. . हे महत्त्वाच आहे. त्याबद्दल चं आव्हान स्विकारा. त्याच फोटो टाकलेल्या कमेंट मधे दिलेलं. नुसता निर्रथक आत्मकुंथकपणा करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 09/23/2016 - 11:01 नवीन
ते फोटो कुणी केलेल्या पूजेचे ? याला काही एक विशेष महत्व नाही . अनेक(पुरोहित)जण असल्या अनेक पुजांचे विविध फोटो अं. जा. वर टाकत असतात. भाताचा बळी कोणी मुखवटा करून करतात. कुणी नुसताच ढीग रचून त्यावर दिवा उदबत्ती ठेवतात. कुणी ढीग रचून कडेनी भाताचे ८, १० मुटके ठेवतात. तो कसा केला याला महत्व नाही. तो विधीत आहे!. . हे महत्त्वाच आहे. त्याबद्दल चं आव्हान स्विकारा. त्याच फोटो टाकलेल्या कमेंट मधे दिलेलं. नुसता निर्रथक आत्मकुंथकपणा करू नका.
महत्त्व आहे ना. स्वतःला धर्मसुधारक पुरोहित म्हणवून घेणारे जेव्हा स्वतःच असली पूजा करतात किंवा असल्या पूजेचे समर्थन करतात आणि असले विधी महत्त्वाचे समजतात तेव्हा नक्कीच गडबड दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/23/2016 - 13:21 नवीन
@महत्त्व आहे ना. स्वतःला धर्मसुधारक पुरोहित म्हणवून घेणारे जेव्हा स्वतःच असली पूजा करतात किंवा असल्या पूजेचे समर्थन करतात. आणि असले विधी महत्त्वाचे समजतात तेव्हा नक्कीच गडबड दिसते. ››› ››› मी समर्थन केलय का ? ते विधी महत्त्वाचे आहेत असं म्हणलोय का? दाखव कुठे म्हणलोय? का परत परत मुद्दाम न केलेल्या गोष्टी माझ्यावर फेकता बरं? लाज नै का वाटत हेत्वारोप करताना? कपटी टनाटनी कुठचा. आणी हे लक्षात घे .. की धर्म सुधारणा हि जो यजमान तो धर्म वापरतो.. तो अशी सुधारणा त्याला त्याच्यात करवून हवी की नाही? याचा कल पाहून करवायची असते. हे बळजबरीनी करायला कै ती तुमची कपटी टनाटनी मुळची धर्म व्यवस्था नव्हे. जे बदलू इच्छितात.. त्यांच्याकडे आंम्ही हे बदलतो. जे नको म्हणतात.. त्यांना जमेल तसे बदलाचे विनम्र आवाहन करून विषय सोडून देतो. सुधारणेचा दांडा घेऊन तुमच्यासारखे सगऴ्यांच्या पाठी 'सुटत' नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/22/2016 - 18:36 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अप्पा जोगळेकर Fri, 09/23/2016 - 10:36 नवीन
तुस्सी ग्रेट हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
साहना Fri, 09/23/2016 - 04:26 नवीन
> ही असली भयानक व हिडीस सजावट मागच्या वेळी तुम्ही मुस्लिम, ख्रिस्ती म्हणजे हिंदूच असे मूर्खपणाचे विधान केले होते आता ह्या शुद्ध १००% हिंदू सजावटीस हिडीस ????? बहुतेक मंदिरात, किंवा आमच्या घरी गणेश चतुर्थी मध्ये गणपतीच्या मागे कीर्ती मुख लावलेले असते ( वर चित्रांत दाखवल्या प्रमाणे) ते हिडीस ? आमच्या ग्राम देवतेच्या संपूर्ण मंदिरांत ठीक ठिकाणी ह्या प्रकारच्या दैत्यांचा चेहेरा सजावटी साठी (किमान १०० वर्षे जुने) लावलेला असतो. तो हिडीस ? दैत्य किंवा असुरी रूपांचा समावेश आमच्या अनेक प्रथांत, लोककलां मध्ये, पेहेरावा मध्ये आणि विशेषतः दुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या जीवनात असतो ते सगळे हिडीस का ? आपलय हिंदू धर्माच्या मुलांची इतकी घृणा येते का म्हणून इथे हिडीस हा शब्दप्रयोग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/23/2016 - 04:47 नवीन
@आपलय हिंदू धर्माच्या मुलांची इतकी घृणा येते का म्हणून इथे हिडीस हा शब्दप्रयोग ? ››› ते तसं नाहिय्ये फक्त. आधुनिक विद्यांचे शिक्षण मिळायला लागल्यानंतर एक कथीत नवसुशिक्षित वर्ग भारतात तयार झाला. जो- कुणी घराबाहेर लाल कापडात बांधलेला नारऴ, कोहोळा, काळी बाहुली (उलटी टांगलेली. ) दिसली की त्याला घाण, हिडीस, अंध:श्रद्ध वगैरे म्हणतो. आणी स्वत:च्या घराबाहेर गणपतीचित्र , पिरॅमिड, फेंगशुई, तोरण इत्यादी लाऊन स्वत:ला सूधारीत म्हणवतो. हे महाशय त्यातलेच आहेत. विंग्रजी आमदानीत हे "सुरू" झालेले आहेत.. "रूढी परंपरांमुळे धर्म घाण, पण मुळात तो चानचान! " असं म्हणणारे. नव सू शिक्षित अट्टल टनाटनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
श
श्रीगुरुजी Fri, 09/23/2016 - 11:04 नवीन
मागच्या वेळी तुम्ही मुस्लिम, ख्रिस्ती म्हणजे हिंदूच असे मूर्खपणाचे विधान केले होते आता ह्या शुद्ध १००% हिंदू सजावटीस हिडीस ?????
तो मी नाही. मी असले विधान आजतगायत कधीही केलेले नाही. विश्वास बसत नसल्यास असले विधान केलेले माझे प्रतिसाद दाखवा.
बहुतेक मंदिरात, किंवा आमच्या घरी गणेश चतुर्थी मध्ये गणपतीच्या मागे कीर्ती मुख लावलेले असते ( वर चित्रांत दाखवल्या प्रमाणे) ते हिडीस ? आमच्या ग्राम देवतेच्या संपूर्ण मंदिरांत ठीक ठिकाणी ह्या प्रकारच्या दैत्यांचा चेहेरा सजावटी साठी (किमान १०० वर्षे जुने) लावलेला असतो. तो हिडीस ? दैत्य किंवा असुरी रूपांचा समावेश आमच्या अनेक प्रथांत, लोककलां मध्ये, पेहेरावा मध्ये आणि विशेषतः दुर्गम भागांत राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या जीवनात असतो ते सगळे हिडीस का ? आपलय हिंदू धर्माच्या मुलांची इतकी घृणा येते का म्हणून इथे हिडीस हा शब्दप्रयोग ?
ते फोटो पुन्हा एकदा बघा. मुलाबाळांना, इतरांना दाखवा आणि बघा ते काय म्हणतात ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/22/2016 - 11:41 नवीन
जवळ जवळ सगळ्या होमहवनाच्या विधीत होणारी क्षेत्रपाल बळीपूजा(भातावर उडिद मांस म्हणून घालून व वरती गुलाल रक्त साद्रुष्यता म्हणून घालून त्यावर कणकेचा दिवा ठेवलेला दिसतो ती बळीपूजा)
>> हेच म्हणतोय मी. बळी पुजा. तर वर गुर्जी म्हणाले की त्यांच्याकडं केली नाही म्हणे ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/22/2016 - 20:43 नवीन
तर वर गुर्जी म्हणाले की त्यांच्याकडं केली नाही म्हणे ही.
खरंच नव्हती केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/23/2016 - 04:17 नवीन
म्हणूनच तर म्हणतोय. द्या तुमच्या गुरुजिंचा नंबर. बघू दे विचारून एकदा.. नक्की कसल्या व कोणत्या कारणानं हे टाळलं त्यांनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 09/23/2016 - 11:10 नवीन
टाळलं हे चांगलंच केलं ना. तुम्ही स्वतःला धर्मसुधारक पुरोहित समजता ना. आपण सुद्धा असले विधी टाळायला हवेत असं वाटायला हवं. बादवे, मालतीबाई जोशी नावाच्या रीतसर पौरोहित्याचे प्रशिक्षण घेतलेल्या एका महिलेने व त्यांच्याबरोबर अजून एका प्रशिक्षित महिलेने (या बाईंचं नाव विसरलो) आमच्या घरी व्यवस्थित वास्तुशांत केली होती. त्यांनी अगदी शांतपणे सुंदर पूजा सांगितली होती. असले विधी केलेले नव्हते. त्यांचा क्रमांक माझ्याकडे नाही. आता त्या असतील का नाही याची कल्पना नाही कारण वास्तुशांतीच्या वेळीच त्यांचे वय ६५ च्या पुढे होते. भिकारदास मारूती मंदीर किंवा नव्या विष्णुच्या देवळात जमणार्‍या पुरोहितांकडून तुम्हाला त्यांचा क्रमांक मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/23/2016 - 13:42 नवीन
@ टाळलं हे चांगलंच केलं ना. तुम्ही स्वतःला धर्मसुधारक पुरोहित समजता ना. आपण सुद्धा असले विधी टाळायला हवेत असं वाटायला हवं.››› वाटतं . आणी करतोही. फक्त ते का टाऴले? त्यांना का वाटलं टाळावसं? आमच्या सारखी धर्मदोष दूर करण्याची भूमीका की आणखी काही? (जे असतं तसं बरच काही. ) ते कळायला हवं. एव्हढं नामांकीत घराणं आहे ना? द्या की नंबर त्यांचा. कशाला भिता एव्हढे? आणी महिला पुरोहितांचं सांगू नका. उगीच इकडची तिकडे फिरवाफिरवी. तुम्ही सदर घटने संबंधात ज्या दशग्रंथी पुरोहित घराण्यातल्यांचा उल्लेख केलाय.. त्यांच्याबद्दल बोला. त्यांच नाव सांगितलत संदेशातून.. तरिही ऒळखेन मी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभ्या.. Fri, 09/23/2016 - 13:50 नवीन
गुर्जींच्या धंद्यात कॉम्पीटिशन टफ हाय राव. इतकं करुन कामे मिळवून पार पाडणे म्हणजे हे साधे सोपे काम नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
श्रीगुरुजी Fri, 09/23/2016 - 19:15 नवीन
@ टाळलं हे चांगलंच केलं ना. तुम्ही स्वतःला धर्मसुधारक पुरोहित समजता ना. आपण सुद्धा असले विधी टाळायला हवेत असं वाटायला हवं.››› वाटतं . आणी करतोही. फक्त ते का टाऴले? त्यांना का वाटलं टाळावसं? आमच्या सारखी धर्मदोष दूर करण्याची भूमीका की आणखी काही? (जे असतं तसं बरच काही. ) ते कळायला हवं. एव्हढं नामांकीत घराणं आहे ना? द्या की नंबर त्यांचा. कशाला भिता एव्हढे? आणी महिला पुरोहितांचं सांगू नका. उगीच इकडची तिकडे फिरवाफिरवी. तुम्ही सदर घटने संबंधात ज्या दशग्रंथी पुरोहित घराण्यातल्यांचा उल्लेख केलाय.. त्यांच्याबद्दल बोला. त्यांच नाव सांगितलत संदेशातून.. तरिही ऒळखेन मी .
एव्हाना हे दशग्रंथी पुरोहीत कोण ते लक्षात यायला हवं होतं. पुण्यात पिढीजात पुरोहितकृत्य करणारी किती घराणी आहेत आणि त्यांच्यापैकी कितीजणांनी अध्ययन करून दशग्रंथी हा पुरस्कार वाराणशीतून मिळविला आहे हे लक्षात घेतलं तर मी कोणाबद्दल बोलतोय ते सहज लक्षात येईल. इतर कोणाकडून माहिती हवी असेल तर मामा थत्ते यांनी प्रशिक्षित केलेल्या अनेक महिला पुरोहितांना विचारा किंवा ज्ञानप्रबोधिनीने प्रशिक्षित केलेल्या पुरोहितांना विचारा. वास्तुशांत, श्राद्ध इ. विधीतील कोणकोणते अनावश्यक भाग ते करीत नाही याची माहिती मिळेल. अर्थात महिला पुरोहित किंवा ज्ञानप्रोबिधिनीचे पुरोहित म्हणजे फिरवाफिरवी असा समज असेल तर माझा नाईलाजा आहे. जेव्हा जेव्हा धर्म, रुढी, परंपरा इ. मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तेव्हा तत्कालीन कर्मठांनी त्यांची हेटाळणी केली होती असा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/23/2016 - 19:28 नवीन
लै आहेत तसे टनाटनी दशग्रंथी. पण स्वत:च्या तोंडानी नाहीच्च सांगणार नाव तुम्ही. सांगा की. लय भिता राव! मी मागे म्हणलेलोच होतो की टनाटनी भ्याड असतात. आव्हान न स्विकारता पळ काढणारे असतात. पुन: प्रत्यय आला आज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 09/23/2016 - 19:57 नवीन
इतके क्ल्यू दिले की. अजून नाही का लक्षात आलं? पुरोहितात सुद्धा अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक इ. गट पडलेले दिसतात. अ‍ॅलोपॅथीवाले काही जण होमिओपॅथीवाल्यांना भोंदू डॉकटर म्हणतात व ते औषध वगैरे न देता नुसत्या साखरेच्या गोळ्या देतात असा आरोप करतात. काही होमिओपॅथीवाले आम्ही रोग मुळापासून नष्ट करतो व इतर पॅथीवाले फक्त वरवरची औषधे देऊन रोग दाबून ठेवतात असे सांगतात. काही आयुर्वेदिकवाले वेदांपासून सुरू असलेली आमचीच उपचारपद्धती श्रेष्ठ असा दावा करतात. पुरोहितात सुद्धा कर्मठ पुरोहित आम्हीच तेवढे खरे व काळानुसार योग्य ते बदल करून सुधारीत स्वरूपात पूजा सांगणारे फिरवाफिरवी करतात असे सांगतात. चालायचंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
शलभ Fri, 09/23/2016 - 20:32 नवीन
तुम्ही नाव घ्यायला का लाजताय एवढे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विशुमित Sat, 09/24/2016 - 06:39 नवीन
<<<<<<<<तुम्ही नाव घ्यायला का लाजताय एवढे..>>>>>>>> हे वाक्य लिहताना तुमच्या चेहऱ्यावर कसले भाव असतील, ह्याची कल्पना करून मनामध्ये "ठो" हसलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 11:17 नवीन
टणटण भटजीबुवांना मी २-३ रेफरन्स दिले आहेत. त्यांच्याकडे जाऊन खात्री करून घ्यायची इच्छा नाही. ते फिरवाफिरवी करतात असे त्यांनी आधीच ठरवून टाकले आहे. काय फायदा नाव देऊन? ते शेवटी टणटणाट करून त्यांची अक्कलच काढणार. आपणच फक्त सर्वज्ञानी आणि इतर सर्वजण फिरवाफिरवी करणारे अशी समजूत असल्यावर असेच होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 13:48 नवीन
कपटी पलायनवादी टनाटनी श्रीखुर्जीचे भेकड आणी भुक्कड आत्मकुंथन! कळलं सगळ्यांना.. कोण भ्याड आहे ते. त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 19:36 नवीन
मुद्देच नसले की फक्त शिवीगाळ, त्रागा आणि आदळआपट असा टणटणाटच सुरू असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अभ्या.. Sat, 09/24/2016 - 19:37 नवीन
बुवा, असे का करायलात तुम्ही? एनी प्रॉब्लेम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 02:50 नवीन
अत्यंत अपेक्षित आत्मकुंथन! भेकड... भ्याड... टनाटनी! असो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 11:19 नवीन
सगळेच मुद्दे संपले. आता फक्त कुंथन आणि टणटणाटच शिल्लक आहे. हे अपेक्षितच होतं. चालू द्यात. आम्ही एंजॉय करीत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 13:48 नवीन
कपटी पलायनवादी टनाटनी श्रीखुर्जीचे भेकड आणी भुक्कड आत्मकुंथन! कळलं सगळ्यांना.. कोण भ्याड आहे ते. त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 19:36 नवीन
मुद्देच नसले की फक्त शिवीगाळ, त्रागा आणि आदळआपट असा टणटणाटच सुरू असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बाळ सप्रे Fri, 09/23/2016 - 11:17 नवीन
एक अवांतर प्रश्न- हे फोटो ज्यांना हिडीस वाटताहेत त्यांना बर्‍याचशा देवदेवतांचे याच्याशी साधर्म्य असणारे फोटो/मुखवटे/मूर्ती हिडिस भयंकर वाटतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा