अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.


💬 प्रतिसाद
(456)
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 09/24/2016 - 02:52
नवीन
अपेक्षित आत्मकुंथन!
भ्याड आत्मकुंथनाचा निषेध असो!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 09/24/2016 - 11:20
नवीन
सगळेच मुद्दे संपलेले दिसतात. आता फक्त कुंथन आणि टणटणाटच शिल्लक आहे. हे अपेक्षितच होतं. चालू द्यात. आम्ही एंजॉय करीत आहोत. यापुढे पूजेत लक्ष्मी रस्त्यावर मिळणारी टनाटन अगरबत्ती वापरत जा.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 09/24/2016 - 13:47
नवीन
कपटी पलायनवादी टनाटनी श्रीखुर्जीचे भेकड आणी भुक्कड आत्मकुंथन!
कळलं सगळ्यांना.. कोण भ्याड आहे ते.
त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...! 
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 09/23/2016 - 07:24
नवीन
> कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली, त्याला आधार काय हेच मी विचारतो आहे.
> कोहळा फोडणे म्हणजे प्रतीकात्मक नरबळी ही समजूत कोठून आली
कर्मकांडांत हे सहभागी होतात त्यांच्या पारंपरिक ज्ञानाने, देवालयांत प्रथांचा इतिहास त्यांच्या मागच्या कथा इत्यादी लिहिलेले असते. ज्या प्रथेत मी सहभागी होते तिथे बांध बांधण्यासाठी कधी कधी नरबळी दिले जायचे आणि त्यांच्या नावाने उत्सव केला जायचा. आज फक्त खरे मानवी रक्त सांडले जाते, कोहळा फोडला जातो.
ह्यापेक्षा आणखीन काय आधार आपणास अपेक्षित आहे हे मी समजू शकत नाही.
> एखादा तसं समजून कोहळा फोडतही असेल, पण म्हणून कोहळा फोडणारा प्रत्येक जण किंवा देवासमोर नारळ फोडणारा प्रत्येक जण प्रतीकात्मक नरबळी देत असतो असे समजायचे का? नारळ हा बहुतेक सर्व घरातून खाल्ला जातो. म्हणजे यच्चयावत सर्व कुटुंबे भूतकाळात नरबळी देत होती असे समजायचे का?
हा विषय समजणे आपणास जड का जात आहे हे मी अजून पर्यंत समजले नाही. कुठे तरी एका प्रथेत कोहळा नरबळीच्या स्वरूपांत फोडला जातो म्हणून माझी वडे करण्यासाठी कोहळा फोडते तेंव्हा नरबळी च्या भावनेनें फोडत असेल असे आपणाला म्हणायचे आहे काय ? विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून आम्ही वाटतो तर कधी आपट्याची फांदी पेरली तर दररोज सोने मिळावे ह्या भावनेने आम्ही ती पेरली आहे असे समजावे का ? मारणाऱ्या माणसाच्या दोनदांत गंगाजल घालतात म्हणून गंगाजल पिणारा प्रत्येक माणूस स्वतःचे मरण अपेक्षित करतो असे समजायचे का ?
नारळ लोक खाण्यासाठी फोडत असतील आणि काही ठिकाणी इतर कुठल्या तरी प्रतीकात्मक दृष्टीतून फोडत असतील दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्यांचा काहीही संबंध नाही.
हा तर्क म्हणजे तर्कशास्त्रांतील Implication हा तर्क आहे. बाबू मुतला तर अंगण ओले होते, पण अंगण ओले आहे ह्याचा अर्थ बाबू मुतलाच असावा असे नाही पाऊस सुद्धा पडला असेल कदाचित (हि आमच्या गणित सरांची भाषा आहे). बहुतेक मानवांना हा तर्क स्वतःहून समजतो.
आपण फक्त वाद घालावा ह्या हेतूने घालत आहात असे वाटते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 09/23/2016 - 11:23
नवीन
तुम्ही इथे लिहिलेल्या ४-५ ओळी हाच आधार का?
या दोन्ही गोष्टी एकच आहेत. नारळ फक्त खाण्यासाठीच फोडला जातो. त्याला बळी/नरबळीचे प्रतीकात्मक स्वरूप समजणे मूर्खपणा आहे.
या गणितात मूळ सिद्धांत व त्याचा कॉन्व्हर्स असे म्हणतात. याचा इथे काय संबंध आहे? काही वेळा दोन्ही सिद्ध करता येतात तर काही वेळा फक्त मूळ सिद्धांतच सिद्ध करता येतो, पण कॉन्व्हर्स सिद्ध न होणारी एक किंवा अनेक काऊंटर उदाहरणे देता येतात.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 09/20/2016 - 14:51
नवीन
सतिश गावडे,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.
१.
हिंदू जनजागृती समितीने तक्रार दाखल केली आहे. मात्र शासनदरबारी दाभोलकरांचं वजन जास्त आहे ना. या प्रकरणाचा स्रोत म्हणून एक ३९ पानांची ५१ एमबीची पीडीएफ धारिका आहे : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial-frauds-and-Naxal-links#download
तिच्यातल्या सोळाव्या पानाचं पटचित्रं :
२.
सनातन संस्थेची विचारसरणी हास्यास्पद आहे तर शासन तिच्या साधकांच्या मागे हात धुवून का लागलंय?
३.
शिंतोडे? काहीही हं सगा! मी तर पार चिखलराड्यात घुसळतोय दाभोलकरांना! बरं ते जाऊदे.
दिवंगत दाभोलकरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं. असं वाटणं चुकीचं नाही. आता असं बघा की, आज चालू घडीला डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांना खोट्या आरोपाखाली अटक करून चुकीची औषधं देऊन ठार मारण्यात येतंय. तुम्हाला जसं दाभोलकरांविषयी वाटतं अगदी तस्संच आम्हाला डॉक्टर तावड्यांविषयी वाटतं. डॉक्टर तावड्यांचा जीव जाऊ नये म्हणून दाभोलकरांचा फ्रॉड उघडा पाडला तर त्यात गैर ते काय?
डॉक्टर तावड्यांना केलेली मारहाण कोणत्या कायद्याखाली समर्थनीय आहे?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 09/20/2016 - 21:01
नवीन
=))
विचारसरणी हास्यास्पद असली तरी कृती तशी नाही म्हणून.
डॉ. तावडेंबद्दल काही विशेष माहिती नाही.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 09/20/2016 - 21:22
नवीन
वरील कागदपत्रे घाईत वाचली. हे कार्य जबर आहे. खूप शुभेच्छा. असे कार्य हिंदू हितरक्षक म्हणणाऱ्या सर्वच `संघ`टनांनी केले पाहिजे.
ह्याच प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन जर आणि कोणी केले असते तर एव्हाना सरकार हात धुवून मागे लागले असते.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 09/21/2016 - 22:20
नवीन
धन्यवाद साहना!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 09/21/2016 - 07:07
नवीन
जाताजाता
कोल्हापूरच्या देवळातील जमीनीचा घोटाळा देखील याच विधिज्ञ परिषदेने बाहेर काढला असे ऐकून आहे. आणि वीरेंद्रसिंह तावडेच्या विरोधात साक्ष देणारे काही हिंदुत्ववादी या घोटाळ्याचे लाभार्थी आहेत असेही ऐकून आहे. खरे खोटे देव जाणे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 09/21/2016 - 22:24
नवीन
आनन्दा,
तुमची माहिती बरोबर आहे. संजय साडविलकर याने अंबाबाईच्या देवस्थानाची चांदी चोरली. हा चांदीचोर आता तावड्यांच्या विरुद्ध प्रमुख साक्षीदार आहे. सौ चूहे खाके बिल्ली चली हाज.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 04:57
नवीन
बळी देणे हा प्रकार 'तांत्रिक' पुजांमधून आला आहे, कालांतराने तो अहिंसक होत गेला आहे. जिवंत प्राण्याऐवजी प्रतिकात्मक वस्तू वापरल्या जातात, एखाद्या क्षेत्राबद्दल आपण अनभिज्ञ असलो म्हणजे तसे काही नसतेच हा अनाठायी आत्मविश्वास योग्य नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 09/21/2016 - 09:35
नवीन
मी नारळ फोडण्यामागे जी समजूत आहे त्याबद्दलच माहिती विचारत आहे. माहिती विचारणे हा गुन्हा नसावा. जोपर्यंत विश्वासार्ह माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यामागची समजूत चुकीची आहे असे समजण्यात चूक नसावी.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Wed, 09/21/2016 - 14:40
नवीन
हे सर्व तर्क झाले, पुरावा कुठेय ?
उदा. मधले बोट दाखवणे याचा प्रतीकात्मक अर्थ काय ? तो तसा वापरण्यास सुरुवात कधी झाली, कोणी केली ?
पहा : http://english.stackexchange.com/questions/64916/whats-the-origin-of-flipping-the-bird
काही विश्वासार्ह पुरावा आहे का? कायपण माहित नाही इतिहास ह्या वल्लीना (प्रक्षिप्त म्हणे) आणि धार्मिक कार्य या अ.आ. ना (प्रतीकात्मक म्हणे) आणि काहीतरी तर्क लावताहेत.
:P
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 15:34
नवीन
गुरुजी आणि सागर,
'विश्वासार्ह पुरावा' ह्याचा तुमच्यालेखी काय अर्थ आहे तेवढा कळवा. म्हणजे त्यात बसणारं काही आहे काय हे बघून सांगता येईल.
'आज'च्या काळात ज्याही पुजा आपण करतो त्यांचे सर्वांचे 'मूळ अर्थ' पूजा करणार्याला माहित नसतात, अनेक विधी तर तशी परिस्थिती उपलब्ध होत नसल्याने टाळले गेले आणि आता लुप्त झाले आहेत.
किंवा, तुम्हाला नसेल मानायचे की नारळ फोडण्यामागे नरबळी आहे तर तेही तुम्ही मानू शकता, कोणतीही मनाई नाही. आपल्यापैकी कोणीही भूतकाळात टाइममशीन घेऊन जाऊन तपासू शकत नाही. तेव्हा खरंच या विषयावर वाद तरी किती घालावा हा प्रश्न पडलाय. पण आपण 'आज' जी करतोय ती विधी आधी 'हिंसक व चीड आणणारी' होती हा 'आज' झालेला उलगडा त्रास देणारा असेल तर तुम्ही ह्याचा पाठपुरावा करणे योग्यच आहे.
डॉक्टरसाहेब,
>> असे आपल्याला (तुम्हा-आम्हाला) वाटते कारण आपले संस्कार तसे आहेत. अन्यथा जगात अनेक ठिकाणी अनेक अघोरी प्रथा परंपरा असतात ज्या कल्पनेतही आपण आणू शकत नाही. आत्ता ताबडतोब आठवणारी एक प्रथा आहे, सौम्यच आहे तशी, भारतातल्याच एका जमातीतः तिकडे आलेल्या पाहुण्याला दारू देणे हे सर्वात मोठे कर्तव्य मानले जाते. जन्म असो वा मरण कोणत्याही प्रसंगी दारू पाहिजेच. अगदी माणूस मेल्यावर त्याच्या अंतिम कार्याची सोय लावण्याआधी दारूची सोय लावायला घरचा माणूस बाहेर पडतो. आलेले लोक आधी मनसोक्त दारू ढोसतात, मग मढ्याकडे बघितले जाते.
नवी मोटार, किंवा काही घेतल्यावर आपण 'आज' ज्या भावनेनी नारळ फोडतो ती भावना 'नरबळी देणे' ही नाही. पण नारळ फोडणे ही जुन्या काळातल्या नरबळी-पशुबळीची प्रतिकात्मक क्रिया आहे. ह्याचा अर्थ आपण नविन वस्तूच्या स्वागतासाठी आपल्याला ही कृती करावीशी वाटते, त्यामागे 'कुणाचा जीव घेणे' हा हिंस्र विचार नसतो, किंवा त्याकाळात नरबळी देण्यामागे फक्त 'कुणाचा जीव घ्यावा, घेता यावा' म्हणून पूजा-विधी करत नव्हते. पिढ्यांपिढ्यांमागे सामाजिक कृतींचे बदल होतात हे तरी मान्य आहे की नाही? प्रत्येक विधीचे शास्त्रिय अर्थ प्रत्येकालाच ठावूक असलेच पाहिजेत असेही होत नाही.
'बळी देणे' हि संकल्पनाच मुळात तांत्रिक जगतातली आहे. कायद्याने असे करणे, उघड उघड करणे शक्य नाही म्हणून होतच नाही असे मानणे योग्य नव्हे. नरबळी दिल्याच्या अनेक घटना स्थानिक वृत्तपत्रांतून नित्य येत असतात. अर्थात त्यातून देणार्यास फायदा झाला की तुरुंग झाला हा वेगळा विषय.
मंत्र-तंत्र-सिद्धी हा एक वेगळा विषय आहे. अंनिसच्या धाग्यावर 'योग्य' चर्चा सुरु होईल अशाने... त्यामुळे थांबतो. =))
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/21/2016 - 15:38
नवीन
आपण म्हणता ते तर्कशुद्ध आहे. परंतु पुढच्या वेळेस नारळ फोडताना हा विचार मनात नक्की येईल.
तसाही मी फारसा धार्मिक नाहीच. पूजाविधी कर्म कांड इ. काहीच करत नाही. त्यामुळे फार काही अडणार नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 16:00
नवीन
खरं आहे डॉक्टरसाहेब, त्यामुळेच हे वाचणार्या अनेकांना त्रासदायक वाटलं असेलच. पण मी त्यांना म्हणेन, तुमची स्वत्:ची भावना महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा, क्रियेमागे काय प्राचिन अर्थ आहे तो जौद्या उडत. मी कर्मकांड-पुजाविधींपासून दूर जाण्याला हेच 'मागचं खोदकाम' कारणीभूत आहे, ज्या कोण्या प्रतिकांची आपण मनोभावे पूजा करतो, त्यांना पवित्र मानतो ती प्रतिके आपल्या मनातल्या प्रतिमांशी सुसंगत नाहीत ही माहिती आतून हलवणारी असते. किंवा आपल्या मिश्र संस्कृतीमुळे दुसर्या लोकांच्या देवांना, चालिरितींना, मान्यतांना आपण आपल्या देवघरात, कर्मकांडांत 'काहीही ठोस कारण' नसतांना स्थान दिले हे भावनाही विचलित करुन जाते. आणि कधीकधी त्या देवांची सत्य किंवा प्राचिन प्रतिमा ही आपल्या भावनांशी विसंगत ठरते तेव्हाही सॉल्लिड धक्का बसतो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/21/2016 - 16:09
नवीन
बऱ्याच वेळेस पूजा करताना त्यांचा अर्थ समजून घेतला तेंव्हा त्यात रुढीशिवाय फार काही आढळले नाही त्यामुळे मी रोज पूजा करीत नाही किंवा कोणतेही कर्मकांड करीत नाही. देवाला नमस्कार करतो तो केवळ एक जगनियंत्याचे प्रतीक म्हणून. मग देव कोणताही असो. आजतागायत शिरडीलाच काय ( जेथे लष्करी ओळख पत्र दाखवले असता थेट प्रवेश होता) सिद्धिविनायकालाही गेलो नाही. कोणत्याही देवळाच्याच काय हॉटेलच्याही रांगेत उभे राहणे पटत नाही. स्वतःपुरती तत्वे पाळतो आहे. दुसर्यांनी पाळावी असा आग्रहही नाही म्हणून कदाचित आनंदी आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 16:15
नवीन
हमरा भी कुछ ऐसाही है.. ;))
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 09/22/2016 - 10:59
नवीन
हा ultimate फालतूपणा आहे असं स्पष्ट मत आहे. नवस बोलणे हा दुसरा, देवाच्या दर्शनासाठी रांग लावून उभं राहणे हा तिसरा आणि अमुकतमुक पदार्थ या देवाला वर्ज्य हा चौथा.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 09/21/2016 - 16:02
नवीन
अश्वमेध यज्ञामागे असच विचित्र काहीतरी आहे. पहिल्यांदा कळालं तेव्हा एकदम घृणा आलेली.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Wed, 09/21/2016 - 16:08
नवीन
ह घ्या असं नेहमी टाकलाच पाहिजे का?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 16:09
नवीन
सॉरी हो, ते नंतर लक्षात आलं, =))
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 09/21/2016 - 20:22
नवीन
ओके. धन्यवाद
आमच्या घरी ह्याला गंगाफल म्हणतात. :)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 09/21/2016 - 22:51
नवीन
सतिश गावडे,
तुम्हाला डॉक्टर तावड्यांविषयी फारशी माहिती नाही. तर तेच सूत्र पकडून थोडी माहिती देईन म्हणतो. काही प्रश्न पडलेत म्हणून हा खटाटोप करतोय.
पोलीस डॉक्टर तावड्यांचा अमानुष छळ करताहेत. त्यांना रात्रभर मारहाण करून दुसरे दिवशी सहदिवाणी न्यायालयासमोर उभं केलं. पायावर बुटाचा वळ स्पष्ट उमटलेला दिसंत असतांनाही न्यायाधीशांनी परत पोलीस कोठडीच मंजूर केली. डॉक्टर तावड्यांना रक्तदाबाचा त्रास असतांना व ते निर्दोष असतांना ही मारहाण कशासाठी? आज तावडे जात्यात आहेत आणि तुम्ही आम्ही सुपात आहोत. उद्या कशावरून आपण जात्यात भरडले जाणार नाही?
यानंतर गेल्याच आठवड्यात डॉक्टर तावड्यांना चुकीची औषधे देऊन जीवे मारायचा प्रयत्नही झाला. हा काय प्रकार चाललाय? शेवटी तावड्यांनी जिवाचं भय आहे म्हणून स्वतंत्र कोठडी मिळावी म्हणून अर्ज केला.
मारहाण सहन करीत डॉक्टर तावडे कोठडीत शांतपणे नामजप करीत बसले होते. तर त्यांच्या हातातून जपमाळही काढून घेतली. कित्ती शूरवीर आहेत नाही ते पोलीस! आता जर कोण्या गणेशोत्सव कार्यकर्त्याला वाटलं की पोलिसास खाडीत बुडवून ठार मारावं, तर दोष कुणाचा असेल बरं?
डॉक्टर तावड्यांना न्यायालयात आणतांना अनेक पत्रकार खुलेआम त्यांच्या जवळ येत होते. हा सुरक्षाभंग आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अपमानदेखील आहे. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवण्याइतके पोलीस का माजले आहेत? साध्वी आणि प्रसाद पुरोहितांच्या वेळेस जर चाप लावला असता तर ही हिम्मत झाली असती का पोलिसांची?
गेले तीन वर्षं कुठलाही पुरावा गोळा करू न शकलेले पोलीस निरपराध्यांवर अत्याचार का करताहेत? दाभोलकरांच्या मृत्यूचा हा गैरफायदा घेतला जातोय ना?
गावडे साहेब, दाभोलकरांना विवेकवादी म्हणता तुम्ही, बरोबर? मग त्यांच्या मृत्यूचं निमित्त करून कसलाही संबंध नसलेल्या निरपराध्याचा अमानुष छळ होतांना तथाकथित विवेकवाद्यांचा विवेक कुठे शेण खायला गेलेला असतो? सनातन संस्थेसाठी नव्हे तर दाभोलकरांची मृत्यूपश्चात विटंबना होऊ नये म्हणून तरी आवाज उठवणार का तुम्ही?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
साहना
गुरुवार, 09/22/2016 - 06:52
नवीन
ह्यांत खूपसे तथ्य आहे असे मला वाटते. कुठल्याही तथाकथित विवेकवाद्याने खरे तर ह्या विषयावर तावडे ह्यांची बाजू घ्यायला हवी होती. संपूर्ण प्रकरणाकडे पहिले असता पोलीस लोक सामान्य आणि पापभिरू लोकांना जास्त दंडेली दाखवत आहेत असे वाटते. साध्वी प्राची काहीही आरोप नसताना उगाच जेल मध्ये आहे.
आसाराम बापूवर "बलात्काराचा आरोप" असे म्हटले जाते पण प्रत्यक्षांत आरोप थोडे वेगळे आहेत. आसाराम बापुना दोषी मानले तरी ५ वर्षांची सजा होईल आणि त्यांनी आधीच ३ वर्षे जेल मध्ये व्यतीत केली आहेत.
तावडे ह्यांच्या विरदोहांत नक्की काय पुरावे आहेत हे अजून पोलिसांनी स्पष्ट केले नाही उलट ज्या दिवशी दाभोलकरांची हत्या झाली त्या दिवसापासून सनातनवर आरोप सुरु झाले होते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 09/22/2016 - 12:10
नवीन
साध्वी प्राची तुरुंगात नाहीयेत.
- Log in or register to post comments
स
साहना
गुरुवार, 09/22/2016 - 20:01
नवीन
प्रज्ञा चूक झाली
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 09/22/2016 - 05:07
नवीन
दोन नवीन म्हणी मिपा वाचकचरणी अर्पण.
संकलक नाखु (वाचकांची) पत्रेवाला
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 09/22/2016 - 10:56
नवीन
तुमचे वरचे प्रतिसाद वाचले.मला एक शंका आहे. एवढं जर असेल तर आपल्याकडे पूजेत सरळसरळ मांस का वापरत नाहीत? अमुकतमुक पदार्थ मांसाचं प्रतीक हा फालतूपणा कशासाठी? माझ्यासारख्या कट्टर मांसाहारी लोकांची घरी पूजा वगैरे असेल त्यावेळी प्रचंड अडचण होते. ते तरी दूर होईल जर सरळसरळ मांस वापरायला सुरुवात केली तर. कृपया अज्ञान दूर करावे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/22/2016 - 11:04
नवीन
सहमत. या भ्रामक समजूती म्हणजे तद्दन फालतूपणा आहे आणि हा फालतूपणा थांबविण्याऐवजी त्याचे सरळसरळ समर्थन सुरू आहे.
ज्यांना मांसाहाराचे वावडे नाही त्यांनी असले प्रतीकात्मक पदार्थ वापरण्याऐवजी खरेखुरे मांसाचे पदार्थ वापरावेत. उडीद वड्यांऐवजी कोंबडीवडे वापरावेत आणि नारळ फोडण्याऐवजी एखादी कोंबडी, बकरी कापावी. मांसाचे वडे म्हणून नैवेद्यात उडीद वडे ठेवणे म्हणजे देवाला फसविण्यासारखे आहे. अशाने देव प्रसन्न होण्याऐवजी कोपायचा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/22/2016 - 11:27
नवीन
ह्याचे समर्थन कोणीही करत नाही. ह्या क्रूर प्रथाच होत्या हे निर्विवाद. मी स्वत: कट्टर शाकाहारी आहे पण केवळ आपल्याला पटत नाही म्हणून पूर्वी असे काहीच नव्हते असे म्हणणे हे केवळ मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/22/2016 - 18:21
नवीन
@ ››› +++++++१११११११.
ह्याच मताला टनाटनी लोक सहमती दर्शवित नाहीत .
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Fri, 09/23/2016 - 11:07
नवीन
उडीद वड्यांऐवजी कोंबडीवडे वापरावेत
कोंबडीवडे शाकाहारी असतात. ते कोंबडीसोबत खातात म्हणून कोंबडीवडे. बाकी सर्व मान्य आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 09/23/2016 - 11:14
नवीन
हा हा हा...
मला पण सुरवातीला माहित नव्हतं कोंबडीवडे काय असतात ते... भीमथडी जत्रेच्या वेळेस कळले..
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/22/2016 - 11:23
नवीन
मी वर म्हटल्याप्रमाणे शाकाहारी परंपरा ह्या केवळ बौद्ध धर्माच्या यज्ञहिंसेला विरोध आणि जैनांची सम्पूर्ण अहिंसा ह्यातून उगम पावलेल्या आहेत. केवळ त्याचमुळे पूजेतही मांसान्नाला हळूहळू विरोध होत गेला. शिवाय नंतर वैदिक देवता मागे पडून भक्ती पंथावर चाललेल्या भागवत धर्माचाही प्रसार होत गेला.
रामायण महाभारत ह्या ग्रंथात मांसान्नाचे (नैवेद्य/श्राद्ध म्हणून) कित्येक उल्लेख सापडतील. रंतीदेवाची कथा तर प्रसिद्धच आहे. खुद्द विश्वामित्राने कुत्र्याची तंगडी खाल्ल्याचे उदाहरण आहे.
अगदी अलीकडच्या काळात बघावे तरी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर विजयादशमीला आणि (बहुधा चैत्री पौर्णिमेला) रेडा बळी द्यायची प्रथा होती जी अगदी पंतप्रतिनिधींच्याही काळातही चालू होती.
अगदी आजही कोकणातील कित्येक घरात गौरींना मटणाचा नैवेद्य दाखवला जातो तर विजयादशमीला बळी दिला जातो. चैत्रात तर कित्येक बोकडांचा, कोंबड्यांचा बळी चालू असतो.
केवळ ह्या धर्मांच्या शाकाहाराच्या प्रसारामुळे हे प्रमाण बरेचसे कमी झाले मात्र त्याचे ट्रेसेस आजही ह्या प्रतिकांच्या रुपाने अस्तित्वात आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 09/22/2016 - 11:32
नवीन
निदान आजच्या काळात तरी प्रतीकात्मक रूपाने सुद्धा या प्रथा नसाव्यात. म्हणजे नारळ हा नारळ म्हणून फोडावा, बळी देण्याचे प्रतीकात्मक रूप म्हणून नको किंवा वडे हे वडे म्हणूनच असावेत, मांसवड्यांचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणून नको. गुलालबिलाल टाकलेला भात असले प्रकार बंद व्हावेत.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/22/2016 - 11:35
नवीन
सहमत.
केवळ प्रथा म्हणूनच ह्या चालू आहेत. प्रथेमागचं कारणही आज कित्येकांना माहीत नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 09/22/2016 - 14:10
नवीन
कसंय ना गुरुजी, हा एक विचित्र प्रकार आहे बघा. शॉर्टकट मारलेले हे आजचे सर्व विधीच हुकलेले आहेत. 'शास्त्र' म्हणून ह्याच्या ठिकाणी ते वापरा, हे नाही मिळत का तर त्याच्याऐवजी दर्भ, सुपारी, अमुक-तमुक वापरा. हे जे शॉर्टकट मारलेत त्याने पुजेपासूनचा लाभ मिळत नाही फक्त 'काहीतरी केल्याचं समाधान' यजमानाला मिळतं. यजमान विचार करतो की आपण शास्त्रोक्त पुजाविधी करत आहे, पण प्रत्यक्षात ही नकळत फसवणूक आहे. कोणत्याही अस्सल तांत्रिक पुजेत विशिष्ट तीच वस्तू, त्याच स्पेसिफिकेशनची मिळाली नाही तर पूजा केलीच जात नाही. आपल्या सामान्य लोकांच्या घरी ज्या पूजा केल्या जातात त्या शास्त्रार्थ पूजा नव्हेतच. फक्त एक फस्टक्लास गोंधळ आहे. जस्ट अ रिचुअल फॉर द सेक ऑफ दॅट.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 09/22/2016 - 18:02
नवीन
जर देव चराचरांत आहे, तर डोळे मिटून ध्यान करण्याने किंवा नामस्मरणानेही तेच व्हायला हवं, जे पूजेने होतं. पुरोहित वर्गाने स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी ज्या अनेक फर्मास गोष्टी केल्या, त्यातली एक पूजा असणार. वर प्रचेतसभौंनी १४ व्या शतकाचा उल्लेख केलाय. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या नंतरच्या काळात. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळात पूजाअर्चा हे प्रकार होत नव्हते का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/22/2016 - 18:29
नवीन
पूर्वीही पूजाअर्चा व्हायच्याच की. मात्र त्यांचे स्वरूप कालानुक्रमने बदलत गेल्याचे दिसते..आजचे पूजेचे स्वरुप पाहिले तर ऋग्वेदादी वेदांचे फ्यूजन अलिकडच्या काळातील स्तोत्रांसह होऊन नवीनच श्लोक तयार झालेले दिसतात शिवाय संतरचित आरत्यांचा वापर तर खुपच मोठ्या प्रमाणावर आहे.
वैदिक यज्ञातील हवन ही देवताना तृप्त करण्यासाठी केलेली पुजाच, चालुक्य -शिलाहारांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला नित्योपचारांसाठी दिलेली दाने ही देखील पूजाच, आणि आजच्या काळात आरत्या म्हणत घालीन लोटांगण म्हणत फेर धरणे ही देखील पूजाच.
- Log in or register to post comments
न
निशाचर
Sat, 09/24/2016 - 02:35
नवीन
बौद्ध किंवा जैनांच्या प्रभावाबद्दल जास्त माहिती नाही. पण मांसाहारी नैवेद्याबद्दल खूपच सहमत.
माझ्या माहितीप्रमाणे नवरात्रात बहुधा खांडेनवमीला बळी दिला जातो. महाराष्ट्रासह इतरही राज्यांतही प्रथा आहे. कोकणात (विशेषतः रत्नागिरी जिल्हयात) चैत्रात (भैरीभवानी सारख्या) ग्रामदेवतेची जत्रा असते तेव्हाही बर्याच घरी कोंबड्याचा वा मटणाचा नैवेद्य असतो. त्याशिवाय देवीचा गोंधळ (बहुतेक एक बोकड अधिक पाच कोंबडे, नक्की आठवत नाही. शिवाय दारू); कुळाचार, घरात लग्न झाल्यास पाचपरतावणे, तिखट जेवण किंवा गोतांबीर वगैरे असल्यास मांसाहारी नैवेद्य असतोच.
ज्यांना लहानपणापासून हे बघायची सवय असते त्यांना त्यात काही विशेष वाटत नाही. बोकड नाही, पण कोंबडी घरी कापणे ही नॉर्मल गोष्ट असू शकते. गावठी कोंबडी अगदी ठाण्यामुंबईतही बरीच लोकं (जिवंत) घरी आणून स्वतः कापत, कारण कापून मिळत नाही.
कोकणात (रत्नागिरी जिल्हयात) गौरीगणपतीत खूप घरांत गौरीआवाहनाच्या संध्याकाळी नैवेद्याला मच्छी असते आणि दुसर्या दिवशी गौरीपूजनाला कोंबडा किंवा मटण आणि वडे असतात. गणपतीसाठी मात्र शाकाहारी गोडाचा नैवेद्य असतो. गंमत म्हणजे गणपतीला गौरीचा नैवेद्य वर्ज्य म्हणून गौरीला नैवेद्य दाखविताना तो गणपतीला दिसू नये यासाठी त्याच्या गौरीकडील बाजूला केळीचं पान लावतात!
पण बहुधा या घरांमध्येही इतरत्र उल्लेख झालेल्या पूजाविधींच्या वेळी शाकाहारी प्रतिकांचा आधार घेतला जातो.
- Log in or register to post comments
ह
हिमु
Mon, 09/26/2016 - 18:22
नवीन
कोकणात आअम्च्या घरि गौरीला मट्ण वडे हाच नैवेद्य असतो
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 09/22/2016 - 12:13
नवीन
यज्ञातुन मुर्तीपुजेकडे वळल्यावरचे अवशेष म्हणजे सध्याचे होम हवन. जैन बुद्ध धर्मांच्या वाढत्या प्रभावाखाली अन अर्थात आर्थिक दृष्ट्या सारखे ब्ळी देण प्रकार कठीण होत गेले. तेव्हा मग रीप्लेसमेंट म्हणुन धान्याचा वापर सुरु झाला.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 09/22/2016 - 11:33
नवीन
हा प्रकार साधारणपणे कधी चालू झाला असेल?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/22/2016 - 11:39
नवीन
नाही सांगता येत.
कदाचित इस्लामिक राजवटीत. पण हा केवळ तर्क. कारण बऱ्याशच्या पोथ्या ह्या १४ व्या शतकानंतर लिहिल्या गेलेल्या आहेत.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 09/22/2016 - 11:57
नवीन
शोधा तुम्हाला एखादा शीलालेख सापडेल तरी तसा उल्लेख असलेला.
सोबत अत्मुदांनाही घ्या म्हणजे तिथलया तिथे (शीलालेखाचीच) कुंडली मांडून नक्की कधी चालू झाले हे प्रतिकात्मक पूजन ते आम्हाला समजेल.
अज्ञानी बालक नाखु
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 09/23/2016 - 11:05
नवीन
'पूजा' हा शब्द वेदांमध्ये आढळत नाही. उपनिषदांमध्येही बहुधा पूजा हा शब्द नाहीच. प्रचेतस म्हणताहेत तसे आज जे पूजेचं स्वरूप आपल्याला दिसतेय ते त्यामानाने फार अर्वाचीन आहे हे निःसंशय.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 09/22/2016 - 11:53
नवीन
नारळाचा नरबळीशी संबंध आहे असे एक बाजूने कबूल केले किंवा नारळाचा नरबळीशी संबंध नाही असे दुसर्या बाजूने कबूल केले तर जीभ झडेल का कुणाची?????
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 09/22/2016 - 12:15
नवीन
मी केलं ना!!! ;)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- ›
- »