Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

स
साहना
Sun, 09/18/2016 - 04:28
🗣 456 प्रतिसाद
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

प्रतिक्रिया द्या
217829 वाचन

💬 प्रतिसाद (456)
न
नाखु गुरुवार, 09/22/2016 - 12:27 नवीन
मान्यवर मी फक्त नारळाच्याच बाजूने आहे (कारण माझ्या घरी नारळाचे झाड आहे) आणि मुख्य म्हणजे त्याला नारळही आहेत. नारळीयन नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आनंदयात्री गुरुवार, 09/22/2016 - 16:23 नवीन
आहे असे सिद्ध झाले तर समस्त नारळप्रेमींची अडचण नाही होणार का? फोडला नारळ कि लगेच वाढला काउंट ब्रह्महत्येचा चित्रगुप्ताच्या चोपडीत! समस्त नारळप्रेमी जनता नरकात जाईल अश्याने आणि नरकात प्रचण्ड लॉजिस्टिकल अडचणी निर्माण होतील. स्वर्ग मोकळा पडेल. विश्वाचे संतुलनच बिघडेलना हो अश्याने. तस्मात असे सिद्ध न होणे किंवा कबूल न करणे हेच विश्वाच्या हिताचे आहे. -आनंदयात्री (चिन्ता करितो विश्वाची)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 09/22/2016 - 18:34 नवीन
अमक्यातमक्याला नारळ दिला वगैरे म्हणायची पण सोय राहणार नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/22/2016 - 18:55 नवीन
हो ना ! अँटिस्लेव्हरी किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग कायद्याखाली आत जायला लागेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विशुमित Fri, 09/23/2016 - 07:23 नवीन
हा हा हा ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Fri, 09/23/2016 - 11:30 नवीन
नारळाचा नरबळीशी संबंध आहे असे एक बाजूने कबूल केले किंवा नारळाचा नरबळीशी संबंध नाही असे दुसर्‍या बाजूने कबूल केले तर जीभ झडेल का कुणाची?????
पटत नसताना तसं केलं तर कर्मठ ढुढ्ढाचार्य सोकावतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अजया गुरुवार, 09/22/2016 - 18:38 नवीन
=)))) हा संपूर्ण धागा प्रतिसादासह एकदम वाचला तर काही बक्षीस वगैरे आहे का?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 09/22/2016 - 18:49 नवीन
एक बकरा व एक नारळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पैसा गुरुवार, 09/22/2016 - 19:01 नवीन
बकर्‍याचे काय करू? त्याला पाला खायला घालत रस्त्याने नेला तर फोंड्यात माझी मिरवणूक निघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सतिश गावडे Fri, 09/23/2016 - 05:22 नवीन
बकर्‍याला पाला घातलेला फोंड्याच्या लोकांना आवडत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 09/23/2016 - 06:55 नवीन
बकर्‍याला आवडेल न लोकांना पण आवडेल. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Fri, 09/23/2016 - 10:51 नवीन
यांनी पाला खायला(तरी) बकरा शिल्लक ठेवला यावर कुण्ण्णी(सुद्धा) विश्वास ठेवणार नाही असा पक्का समज आहे ! बकरा, पाला, पैसाताई ,गावडे मास्तर,नारळ्,आणि कोहळा सर्वांनी हलके घ्यावे. ता.क. लगेच घरावर मोर्चा काढू नये. गल्लीच्या तोंडाशी असलेल्या घरवाल्याकडे ज्याम थोराड व चावके कुत्रे आहे. सूचना संपली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 09/23/2016 - 13:48 नवीन
=)) =)) =)) कुत्र्याच्या चाव्यासाठी अँटी रेबीज इंजेक्षणे गेल्याच महिन्यात घेतली आहेत. घाबरते की काय! =)) =)) आमचा ढेल्या भूभू आहे मिपावर. त्याला पण आणू. अवांतरः कोहळा मिळवण्यासाठी आवळा घेऊन येऊ. कोहाळ्याचे सांडगे करायचेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
य
यशोधरा Sat, 09/24/2016 - 08:03 नवीन
सांडगे पार्सल करा. कित्ती वर्षे खाल्ले नाहीत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 09/24/2016 - 11:22 नवीन
नेक्ष्ट टैम पुण्यां येतना कुवाळ्याच्यो वड्यो हाडतांच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Sat, 09/24/2016 - 11:31 नवीन
हय, हय. घेवन यो. प्लीजच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अजया Fri, 09/23/2016 - 10:37 नवीन
ओला नारळ म्हणजे कसा मनुष्य समजायचा पण? ओल्या नारळाच्या करंज्या कराव्या म्हणते. बकरा कोणाला हवा असेल तर घेऊन जावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ए
एस Fri, 09/23/2016 - 11:08 नवीन
नुसताच बकरा घेऊन काय करू? आख्खा नारळ घातल्याशिवाय चव नाही यायची. तेव्हा बकरापण हवा आणि नारळपण. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ख
खटपट्या गुरुवार, 09/22/2016 - 19:15 नवीन
एक नारळ देण्यात येइल. (सद्या नारळ देणे म्हणजे = कामावरुन काढून टाकणे कींवा "आता या" म्हणणे) यातील काही नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Sat, 09/24/2016 - 09:32 नवीन
नारळाचा अज्जून एक अर्थ आहे, त्या अर्थाने टेंडर कोकोनट म्हणजे लय भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/23/2016 - 10:14 नवीन
जरा मूळ मुद्द्याकडे येउ. ओके मान्य मुस्लिमांना झुकत माप दिल. पण त्यामुळे बकरीद ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाने अंनिसच्या सहयोगातून यावेळी रक्तदान शिबिर घेतले. रक्त सांडू नका दान करा असे आवाहन केले. कुठतरी प्रबोधनाची सुरवात तर झाली. जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. मुस्लिम समाज हा तुलनेने कडवा व अधिक धर्मांध आहे हे वर एका प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे. तडजोड ही लबाडी नसते. मुस्लिम धर्मातील अनिष्ट प्रथांविषयी मुस्लिम सत्यशोधक मंडळ काम करते आहेच. हे केल तर ते का केल नाही असे आरोपीच्या पिंजर्‍यात पकडण्यापेक्षा जे काही शक्य आहे ते मर्यादा पाळून करताहेत तर जरा कौतुक करा ना! हिंदुनी आठ आठ पोरे जन्माला घालण्याच्या आवाहना पेक्षा मुस्लिमांना संतति नियमनाला प्रवृत्त करणे हे जास्त चांगले नाही का? खर तर हमीद दलवाईंनी या पेक्षा कठोर भुमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. अर्थात सर्व प्रतिसाद हे विचारमंथनच आहे.सुधारकांमधे जहाल मवाळ तेव्हाही होते आताही आहेत. आपला समाज एकाच वेळी तीन शतकात वावरतो आहे. बदल कुर्मगतीने का होईना होताहेत. आपापल्या परीने गति देण्याचा प्रयत्न करु यात!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/23/2016 - 10:33 नवीन
@पण त्यामुळे बकरीद ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाने अंनिसच्या सहयोगातून यावेळी रक्तदान शिबिर घेतले. रक्त सांडू नका दान करा असे आवाहन केले. कुठतरी प्रबोधनाची सुरवात तर झाली. जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. ››› +++१११. @ तडजोड ही लबाडी नसते. ››› प्रचंड सहमत. @मुस्लिम धर्मातील अनिष्ट प्रथांविषयी मुस्लिम सत्यशोधक मंडळ काम करते आहेच. हे केल तर ते का केल नाही असे आरोपीच्या पिंजर्‍यात पकडण्यापेक्षा जे काही शक्य आहे ते मर्यादा पाळून करताहेत तर जरा कौतुक करा ना! ››› येस . यालाही सहमती. @हिंदुनी आठ आठ पोरे जन्माला घालण्याच्या आवाहना पेक्षा मुस्लिमांना संतति नियमनाला प्रवृत्त करणे हे जास्त चांगले नाही का? ››› याच्याशी तर सर्वात जास्त सहमत. टनाटनी कपटी लोक.. ते करतात तर आम्हांलाही करू द्या अज्जून टनाटनीपणा.. असं आग्रहानी म्हणतात. तिथे त्यांना नेहमीच्या राष्ट्रहिताच्या गप्पा आठवत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रदीप Fri, 09/23/2016 - 10:58 नवीन
प्रकाश, तुमचे सगळेच प्रतिसाद अतिशय सौम्य, संतुलित व समजूतदार आहेत (जसे ते नेहमीच पूर्वीही असत). खरे तर मला वाटते, तुमच्यासारखी सौम्य, प्रांजळ व तडजोड स्वीकारणारी व्यक्ति अनिसच्या प्रमुखपदी असती तर आज अनिसचे कार्य बर्‍यापैकी पुढे गेले असते. (हे सर्व मी अतिशय प्रामाणिकपणे लिहीतोय, ह्यात सर्कॅझम अजिबात नाही, गैरसमज नसावा). मुस्लिम सत्यशोधक मंडळ अजून कार्यरत आहे व त्याचे मुस्लिम समाजात काही प्रभोधनाचे कार्य सुरू आहे हे ऐकून आश्चर्य वाटले. ह्याविषयी अधिक माहिती कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/23/2016 - 11:56 नवीन
मुस्लिम सत्यशोधक मंडळाची वेबसाईट याच वर्षी तयार झाली आहे http://www.muslimsatyashodhak.org/ तलाकपिडित मुस्लिम स्त्रियांना हिंदु स्त्रियांचा हेवा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
श
शलभ Fri, 09/23/2016 - 12:00 नवीन
प्रकाश, तुमचे सगळेच प्रतिसाद अतिशय सौम्य, संतुलित व समजूतदार आहेत (जसे ते नेहमीच पूर्वीही असत). खरे तर मला वाटते, तुमच्यासारखी सौम्य, प्रांजळ व तडजोड स्वीकारणारी व्यक्ति अनिसच्या प्रमुखपदी असती तर आज अनिसचे कार्य बर्‍यापैकी पुढे गेले असते.
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
ए
एस Fri, 09/23/2016 - 11:11 नवीन
आत्मबंध यांचे सर्व प्रतिसाद भारी आहेत. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
श
शलभ Fri, 09/23/2016 - 12:02 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
निशाचर Sat, 09/24/2016 - 02:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 04:32 नवीन
धन्यवाद. जे लोक धर्माभिमानाची टिमकी वाजवून टनाटनीपणा करतात.. पण धर्मातल्या मूलभूत चुकांवर स्वत: कधिही भाष्य अथवा क्रुती करत नाहित.. फक्त दुसय्रानी कुणीतरी केलेल्या कथीत सुधारणेवरून स्वत:चकाहितरी केल्याच्या थाटात फलक घेऊन हिंडतात.. . त्याच पैकी हे एक महाशय आहेत. मी मांडलेल्या मुद्यांचा तितकाच मुद्देसुद प्रतिवाद न करता. आव्हान न स्विकारता फक्त फिरवा फीरवीची उत्तरं देत हे बसले. म्हणून त्यांना खोलंलं जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
प्रचेतस Sat, 09/24/2016 - 05:13 नवीन
बाकी तुम्ही देखील नंतर नंतर मुद्दे न मांडता तुमच्या नेहमीच्याच टनाटनी, आत्मकुंथन असे नेहमीचे शब्द वापरून वैयक्तिक हल्ले सुरु केले हे रोचक आहे. :) तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर करतात तो टनाटनीपणा. श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बोका-ए-आझम Sat, 09/24/2016 - 05:25 नवीन
आत्मुगुर्जींनी विचारांवर शरसंधान करता करता विचार मांडणाऱ्यांवर शरसंधान केले. पण तरी त्यांनी मांडलेले मुद्दे आणि प्रतिवाद यातून जी माहिती मिळाली ती खूपच सखोल आणि काही गैरसमज दूर करणारी होती. त्याबद्दल आत्मुगुर्जी आणि श्रीगुर्जी या दोघांनाही मी धन्यवाद देतो. Dogmatic attitude is necessary for the development of rational thought because without that, no initial conjectures can be made - हेच यातून सिद्ध झालं आहे. तर आता दोघांनाही - चला, हवा येऊ द्या अशी णम्र विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 06:26 नवीन
@तर आता दोघांनाही - चला, हवा येऊ द्या अशी णम्र विनंती! ››› ठिक. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 06:25 नवीन
@तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर करतात तो टनाटनीपणा. ››› हर हर महादेव. @श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.››› क्या ब्बात ! व्वाह!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 06:57 नवीन
@श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.››› शांत राहिल्यामुळे स्टॅटेजिकली ते पुढे राहिले. आंम्ही नाही. (ह्ही ह्ही! ) असो.. चालावयाचेच. कुणी तत्वात जिंकतं, कुणी व्यवहारात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
विशुमित Sat, 09/24/2016 - 08:38 नवीन
"""कुणी तत्वात जिंकतं, कुणी व्यवहारात""" वाह क्या बात है..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 11:30 नवीन
बाकी तुम्ही देखील नंतर नंतर मुद्दे न मांडता तुमच्या नेहमीच्याच टनाटनी, आत्मकुंथन असे नेहमीचे शब्द वापरून वैयक्तिक हल्ले सुरु केले हे रोचक आहे. :) तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर करतात तो टनाटनीपणा. श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.
! _________________________ प्रचेतस, एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो. उत्तर द्यायचे का नाही हा तुमचा निर्णय असेल. श्रीरामरक्षा हे संस्कृतमधील स्तोत्र माझे अत्यंत आवडते स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्री बुधकौशिक ऋषींनी रचले असा स्त्रोत्रात उल्लेख आहे. हे बुधकौशिक ऋषी म्हणजेच महर्षी वाल्मिकी असे वाचण्यात आले होते. हे स्तोत्र नक्की कधी रचण्यात आले असावे व बुधकौशिक ऋषी म्हणजेच महर्षी वाल्मिकी हे बरोबर असावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 09/24/2016 - 12:00 नवीन
बुधकौशिक म्हणजे वाल्मीकि नक्की नाही. अर्थात हा कोण ह्याचा उलगडा नीट होत नाही तरी हे स्तोत्र इसवी सनाच्या दहाव्या बाराव्या शतकानंतर रचले गेले असावे असा माझा अंदाज आहे. निदान ५ व्या शतकानंतरच असे मात्र ठामपणे म्हणता येईल कारण स्तोत्राचा बराचसा भाग पद्मपुराणात आढळतो व त्यात बुधकौशिकाचा उल्लेख नाही. दहाव्या बाराव्या शतकानंतरच का असा अंदाज केला ह्याचे कारण म्हणजे स्तोत्राची श्री गणेशायनम: अशी सुरुवात. गाणपत्य संप्रदायाचा प्रभाव किंवा गणेशाला प्रथम मान द्यायचे श्लोक किंवा गणेशपट्टीकांचा प्रसार त्या काळानंतरच झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 12:02 नवीन
माहितीबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अर्धवटराव Mon, 09/26/2016 - 21:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अनुप ढेरे Sun, 09/25/2016 - 13:40 नवीन
पूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 11:26 नवीन
जे लोक धर्माभिमानाची टिमकी वाजवून टनाटनीपणा करतात.. पण धर्मातल्या मूलभूत चुकांवर स्वत: कधिही भाष्य अथवा क्रुती करत नाहित.. फक्त दुसय्रानी कुणीतरी केलेल्या कथीत सुधारणेवरून स्वत:चकाहितरी केल्याच्या थाटात फलक घेऊन हिंडतात.. . त्याच पैकी हे एक महाशय आहेत. मी मांडलेल्या मुद्यांचा तितकाच मुद्देसुद प्रतिवाद न करता. आव्हान न स्विकारता फक्त फिरवा फीरवीची उत्तरं देत हे बसले. म्हणून त्यांना खोलंलं जरा.
तुमच्या सर्व प्रतिसादात वैयक्तिक टीका, टणटणाट, आपणच तेवढे ज्ञानी आणि इतर सर्वजण फिरवाफिरवी करणारे इ. गोष्टींपलिकडे दुसरे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 13:52 नवीन
ते तूम्मी काहिही म्हणा. तुम्ही कपटी पलायनवादी भेकड टनाटनी आहात.. हे कळलंय सगळ्यांना.. त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 19:39 नवीन
मुद्देच नसले की फक्त शिवीगाळ, त्रागा आणि आदळआपट असा टणटणाटच सुरू असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 19:58 नवीन
यजमान पूजेला बसले आहेत. टनाटन भटजीबुवा पूजा सांगत आहेत. टनाटन भटजीबुवा: हं. ताम्हणात टनाटनी आचमन करा आणि म्हणा मम. यजमान (ताम्हणात आचमन करून हळूवार आवाजात): मम. टनाटन भटजीबुवा: आत्मकुंथनात मग्न असल्यासारखे इतक्या हळू आवाजात नको. एकदम टनाटनी आवाज काढा. यजमान (मोठ्यांदा): मम. टनाटन भटजीबुवा: ताम्हणात पळीभर पाणी सोडा आणि म्हणा आत्मनः. यजमान (ताम्हणात पळीभर पाणी सोडून): आत्मकुंथन. टनाटन भटजीबुवा (संतापून): भेकड, भ्याड, कपटी कुठले. आत्मकुंथन नाही हो. आत्मनः. यजमान(खजील होऊन): आत्मन: टनाटन भटजीबुवा: ताम्हणात पळीभर पाणी सोडा आणि म्हणा श्रुती स्मृती. यजमान (ताम्हनात पळीभर पाणी सोडून) श्रूती स्मृती. टनाटन भटजीबुवा: हं. संपली पूजा. आता लक्ष्मी रस्त्यावरून आणलेली टनाटन अगरबत्ती लावा. यजमान (बुचकळ्यात पडून): एवढ्यातच कशी संपली? टनाटन भटजीबुवा (संतापून): एवढ्यातच म्हणजे? पाताळयंत्री कुठले. ही पूजा म्हणजे महिनाभर चालणारा अश्वमेध यज्ञ वाटला की काय? यजमान ओशाळवाणे होऊन लक्ष्मी रस्त्यावरून आणलेली टनाटन अगरबत्ती पेटवितात. टनाटन भटजीबुवा: हं. चला आता घंटा वाजवून टनाटन आरती करा. यजमानः पण घंटा नाहीय्ये आमच्याकडे. टनाटन भटजीबुवा: मग एका रिकाम्या डब्यात दगड टाकून डबा हलवा. रिकामी भांडीच जास्त आवाज करतात हे माहितीय्ये ना. यजमान एका रिकाम्या डब्यात खडे टाकून झाकण लावून हलवत हलवत आरती करतात. रिकाम्या डब्याचा खूप मोठा आवाज येत असतो. टनाटन भटजीबुवा: चला. काढा आमची दक्षिणा. आता तुम्ही बसा आत्मकुंथन करत आणि आम्ही चाललो पुढच्या टनाटनी पूजेला. अशा तर्‍हेन पूजा पार पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अभ्या.. Sat, 09/24/2016 - 20:03 नवीन
ल्लूल्लूऊऊऊऊऊऊ राहिले. त्याशिवाय पूजा अधुरी आहे. पूजा हेगडे पण आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 20:13 नवीन
लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रचेतस Sat, 09/24/2016 - 20:20 नवीन
=)) लोलच लोल. कहर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
य
यशोधरा Sun, 09/25/2016 - 06:11 नवीन
=))) अरे काये हे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद_१९८२ Sun, 09/25/2016 - 07:01 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/25/2016 - 07:56 नवीन
@रिकामी भांडीच जास्त आवाज करतात हे माहितीय्ये ना.››› स्वत:च स्वत: विरूद्ध पुरावा दिला श्रीखुर्जींनी. एव्हढा मोठ्ठा खडखडाट करून. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा