Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

स
साहना
Sun, 09/18/2016 - 04:28
🗣 456 प्रतिसाद
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

प्रतिक्रिया द्या
217829 वाचन

💬 प्रतिसाद (456)
अ
अमितदादा Mon, 09/19/2016 - 18:15 नवीन
धन्यवाद, हे वाचलं नव्हतं. इथे सरसकटी झालाय हे मान्य, परंतु हा मुद्दा सतत हिंदू धर्मातील चालीरीती यावरती बोलणारे बोलके पुरोगामी , leftis, आणि psudo-secular(काँग्रेस आणि आप) यांना उद्देशून होता. (ह्या लोकांच्या बाबत असणार माझं मत परत एकदा सरसकटी करण वाटेल, पण माझं ते ठाम आणि वैयक्तीक मत आहे). शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची मते नेहमी आधुनिक राहिली आहेत यात शंका नाही. पण हे सत्य आहे की बहुतांश हिंदू धर्मावरती बोलणारी लोक अश्यावेळी गप्प राहणं पसंत करतात. एक उदाहरण म्हणून पाहिलं तर न्यायालयाचा महिला प्रवेशाबाबत नमते घेणारी महाराष्ट्रातील मंदिरे आणि सक्त विरोध करणारे मुंबई मधील दर्गा यातील फरक लोकांना समजत नसेल तर आश्चर्य आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/18/2016 - 08:20 नवीन
ही प्रतिक्रिया मिळून सार्‍या जणी मासिकात २००१ म्ध्ये आलेल्या सुजाता देशमुख यांच्या पुरोगामी जमातवाद या लेखावर प्रतिक्रिया म्हणुन दिली होती. त्याच वेळी ९/११ झाल्याने त्याची आठवण आली म्हणुन खाली ती देत आहे. मूळ लेखा मुळे सुजाता देशमुख "मिळून सार्‍या जणी" च्या संपादक मंडळातुन बाहेर पडाव लागलं. महाराष्ट्र फाउंडेशन चे सुनिल देशमुख या अमेरिका स्थित असलेल्या पुरोगामी आधारस्तंभाची नाराजी ओढवली होती. माझ्याकडे सुजाता देशमुख यांचा मूळ लेख नाही. त्यामुळे कदाचित थोडे सुसंगत वाटणार नाही. पण तरी स्वतंत्र्य रित्या पाहिले तरी चालेल. उपक्रमचे संकेतस्थळ रिड ओन्ली स्वरुपात देखील गंडते म्ह्णुन पेस्टवत आहे. पुरोगामी जमातवाद "पुरोगामी म्हटल्यावर सर्वसाधारणपणे 'डाव्या` असा शिक्का लोकांनी मारलेल्या सामाजिक, राजकीय, संघटना तसेच 'आम्ही डावं उजवं मानीत नाही. जात, धर्म पंथ वंश मानीत नाही. अशा विचारांचे लोक` असं चित्र डोळयासमोर येईल. तुमचा कुत्रा कुठल्या जातीचा आहे असा प्रश्न विचारल्यावर पामेरियन, अल्सेशियन असं काही उत्तर मिळाल्यावर त्याची अंगकाठी, रंगरूप बांधा वगैरे गोष्टी डोळयासमोर येतात. तसं माणूस कुठल्या जातीचा आहे असं विचारल्यावर तो हलकट, काळा, गोरा, उंच, विद्वान असं अभिप्रेत नसंत. त्याची जन्मानुसार असलेली मराठा, महार, मांग, चांभार, ब्राम्हण वगैरे अभिप्रेत असतं. निसर्गात अभिप्रेत असलेली जात ही गुणधर्मानुसार असते. एकटया गुलाबाच्या सुद्धा भरपूर जाती आहेत. सरकारी नोकरीत बायोडाटा देताना मला जात विचारली तर 'मी मनुष्य जातीचा प्राणी आहे' व 'मानवता हा माझा धर्म' असे सांगितल्यावर सगळे हॅ हॅ करुन हसले. तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते मी सांगणार नाही असे म्हटल्यावर त्याने नाही सांगितले तरी आम्हाला कळतं असे म्हणून स्वत:च तो कॉलम भरुन टाकला. एखादा वाद आला म्हणजे मध्यवर्ती मुद्दा आला तसं पुरोगामी जमातवादाला सुद्धा मध्यवर्ती केंद्रबिंदू असतो. तो म्हणजे जन्माधिष्ठित नसलेले पुरोगामित्व. हे पुरोगामित्व सुद्धा कुठल्यातरी बिंदूमुळेच मिळालेली एका रेषेवरील दिशा आहे. त्याच अनुषंगाने प्रतिगामित्व ठरते. या बिंदूच्या सापेक्षते मुळेच पुरोगामित्वाचे शिक्के बसत असतात. त्या मुळे पुरोगामी कुणाला म्हणायचं या प्रश्नात प्रसंगी कुत्सितता वाटली तरी सापेक्षता पण आहे. लेखात नमूद केलेला पुरोगामी जमातवाद हा धर्म निरपेक्षतेशी निगडीत आहे. या धर्म निरपेक्षतेची सापेक्षता ही जन्माधिष्ठित असलेल्या धर्माशी सापेक्ष आहे. पुरोगामित्वाचं सोवळं हे लोकांनीच नेसवलेलं आहे. त्याला मी धर्मविरहित आहे असे सांगण्याची सोय नाही. त्याने स्वत:ला काहीही म्हणवले तरी जन्माधिष्ठित धर्म हा त्याला चिकटला जाणारच. सर्वधर्मसमभाव हे तर रिंगमास्टर एकमेकाचे हाडवैर असणारं प्राणी जस एका रिंगणात 'प्रेमानं` बसवितो तसा बसवलेला भाव आहे. हिंदुत्ववाद हा तरी कुठे एक आहे? त्यातही अनेक छटा आहेत. विविध जाती- जमातींची उतरंड असलेला हा समाज एक असणं हे मानण सुद्धा त्या रिंगमास्टरची कमाल आहे. धर्मनिरपेक्षतेची चिकित्सा करताना कुठलाही धार्मिक मूलतत्ववाद आणि धर्मांधता वगळता येत नाही. धर्मांधता आणि धार्मिक मूलतत्ववाद याचे मूल्यमापन करताना धर्मचिकित्सा ही अपरिहार्य बनते कारण धर्म तत्वांची त्याला जोड असते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला एक प्रश्न नेहमी विचारला जातो काहो तुम्ही फक्त हिंदूच्याच अंधश्रद्धांवर झोड उठवता पण मुस्लिमांच्या अंधश्रद्धांविषयी फारसे बोलत नाही? हा पळपुटेपणा नाही काय? यात हिंदूंच्या अंधश्रद्धाविषयी बोलण्याचा अधिकार प्रश्नकर्त्याने मान्य केलेला आहे. किंबहुना हे काम तुम्ही चांगलच करता आहात असाही कधी कधी सूर असतो. पण तुम्ही पुरोगामी व धर्मनिरपेक्ष आहात तर मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धांविषयी पण त्याच न्यायाने बोला ना! असे आवाहन अभिप्रेत असते. याची उत्तरे ही दिली जातात ती अशी की जवळजवळ ऐशी टक्के लोक हिंदू आहेत साहजिकच बहुसंख्य कार्यकर्ते हिंदूच असणार. त्यामुळे ऐशी टक्के अंधश्रद्धा हिंदूंबाबत असणार. दुसरं उत्तर दिलं जातं आम्ही हिंदू धर्मात जन्मलो साहजिकच संस्कार हिंदू झाले असल्याने आम्ही हिंदू धर्मातील अंधश्रद्धांविषयी अधिक संवेदनाशिल असणं स्वाभाविक आहे. आपण आपलं घर साफ करायचं नाही तर शेजाऱ्याच करायचं काय? या उत्तरांमध्ये चूक नाही पण सर्वसमावेशकताही नाही. चळवळ ही प्रबोधनाशी निगडित असल्याने जवळीक हा महत्वाचा दुवा आहे. अंधश्रद्धा ही सापेक्ष आहे ही बाब जरी घटकाभर बाजूला ठेवली तरी अंधश्रद्धा ही हिंदू धर्मातील काय किंवा मुस्लिम धर्मातील काय तितकीच अंध आहे.चळवळ जरी दोन्ही धर्माना समान लेखत असली तरी जन्माधिष्ठित चिकटलेल्या धर्मामुळे हिंदू कार्यकर्ते हिंदूत्ववाद्यांना मुस्लिमांपेक्षा जास्त जवळचे वाटण्यची शक्यता अधिक. हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हिंदू धर्मात असलेले विविध, प्रसंगी परस्पर विरोधी विचार प्रवाह ही बाब. ग्रंथप्रामाण्य असलं तरी विशिष्ठ धर्मग्रंथ हाच एक प्रमाण हा भाग नाही. धर्मसंस्थापक ही कुणी एक व्यक्ती नाही. चार्वाक दर्शनाला सुद्धा मानाचे स्थान आहे या अर्थाने हा धर्म सर्वसमावेशक आहे. धर्मचिकित्सेलाही एक परंपरा लाभली असल्याने अंधश्रद्धा निमूर्लनाला पोषक असा विचार प्रवाह संतसाहित्यातच सापडतो. त्यामुळे हिंदू धर्मांधता ही मुस्लिम धर्माधते पेक्षा बोथट बनलेली आहे. त्यामुळे येथे अंधश्रद्धा निमूर्लन हे तुलनात्मक दृष्टया सोयीचे आहे. अगोदरच धर्मचिकित्सा हा संवेदनाशिल विषय असल्याने सोयीचा असलेला भाग हा प्राधान्यक्रमात असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा धर्मांधता व मूलतत्ववाद हा राष्ट्रहिताशी निगडीत असते त्यावेळी ही चिकित्सा सोयीनुसार करुन चालणार नाही ती कठोरपणेच झाली पाहिजे ही बाब नाकारुन चालणार नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बळी ठरलेली ९/११ ही न्यूयार्क मधील घटना ही त्याची साक्ष आहे."
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 09/18/2016 - 08:47 नवीन
थेट उत्तर द्या/ स्पष्ट मत नोंदवा: १. कुठल्याही धार्मिक कारणाने कोणत्याही प्राण्याचा हालहाल करून / हालहाल न करता बळी देणे योग्य आहे की अयोग्य? २. सदर बातमीतील हमीद दाभोलकरांच्या मताशी आपण सहमत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
वामन देशमुख Sun, 09/18/2016 - 08:48 नवीन
आखीर कहना क्या चाहते हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
इ
इरसाल Sun, 09/18/2016 - 08:37 नवीन
हिंदु धर्म जरा जास्तीचा लवचिक आहे. कमीत कमी माणुस तोंड इचकुन काहीही बरळला तरी कोणी "चॉप-चॉप स्क्वेअर" नेवुन तलवार चालवत नाही की चामड्याच्या चाबकाने (कोडे़) फटकवत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 09/18/2016 - 08:41 नवीन
ह्याबद्दल आनंद आहे की दुःख?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ग
गॅरी ट्रुमन Sun, 09/18/2016 - 08:59 नवीन
यातल्या काही पुरोगाम्यांची विचार करायची पध्दत कशी असते हे बघा. मागच्या वर्षी बाबासाहेब पुरंदर्‍यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला गेला त्यावेळी या पुरोगाम्यांनी आकांडतांडव केलेच होते. त्यावेळी याच हमीद दाभोळ(ल)करांच्या भगिनी मुक्ता यांनी पेपरात पुढील पत्र लिहिले होते: Image removed. त्यावर मागच्या वर्षीच पुढील लिहिले होते. ते विषय निघालाच आहे म्हणून कॉपी-पेस्ट करतो. हे असले स्वयंघोषित पुरोगामी लिखाण बघितलं की खरोखरच तळपायाची आग मस्तकात जाते. १. बाबासाहेब पुरंदर्‍यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर करणे आणि त्यापूर्वी दीड-दोन महिने गोविंद पानसरेंचा खून होणे या दोन गोष्टी लोक का जोडतात हे समजत नाही.गोविंद पानसरेंचा दुर्दैवी खून झाला म्हणून बाबासाहेबांच्या कामाचे महत्व कमी होते का?आपण इतिहासकार आहोत असा दावा बाबासाहेबांनी कधीच केला नव्हता.इतकेच नव्हे तर आपण इतिहासकार नसून छत्रपतींचे शाहिर आहोत हेच बाबासाहेब अजूनही म्हणतात.शाहिरांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊ नये आणि केवळ इतिहासकारांनाच द्यावा असा काही नियम आहे का? महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्यांना बाबासाहेबांच्या शिवचरित्राने वेड लावले होते. महाराष्ट्रातील घराघरांमध्ये शिवाजी पोहोचविण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्याचे महत्व पानसरेंचा खून झाला म्हणून कमी होते का? २. धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचविण्याचा गोविंद पानसरेंनी प्रयत्न केला म्हणून त्यांचा खून झाला असे आम्हाला वाटते असे मुक्ता दाभोलकर म्हणतात.असे कोणालाही काहीही वाटू शकते.पण त्यामागे काही आधार नसेल तर तसे वाटण्यामध्ये आणि मलाही कधीतरी मी ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल मिळवायला पात्र आहे असे वाटले तर तसे वाटण्यामध्ये नक्की फरक काय? असे वाटण्याला काही आधार आहे का? असल्यास कोणता?"शिवाजी कोण होता" हे पुस्तक पानसरेंने किती वर्षांपूर्वी लिहिले होते?मग इतकी वर्षे त्यांच्या नखालाही धक्का लागला नव्हता तोच अचानक आताच लागायचे काय कारण? नक्की कारण काय हे मला माहित असायचा प्रश्नच नाही.पण म्हणून त्या खुनामागे अमुक एक हेच (आणि आम्हाला वाटते तेच) कारण होते हे ढोल जगभरात पिटण्याला काय अर्थ आहे? बरं त्याच्याच पुढचे वाक्य--"धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराजांची मांडणी केली म्हणून पानसरेंचा खून झाला आणि शासनाच्या बेपर्वाईमुळे खुनी अजूनही मोकाटच आहेत". म्हणजे आधीच्याच वाक्यात खुनामागे ते कारण आहे असे आम्हाला वाटते असे म्हणणार्‍या मुक्ता दाभोलकर लगेच पुढच्याच वाक्यात त्याच कारणामुळे त्यांचा खून झाला असा निवाडाही करून टाकतात? मजाच म्हणायची. ३. बाबासाहेबांनी लिहिलेले शिवाजी महाराजांचे चरित्र या बाईंनी वाचले आहे असे दिसत नाही. अन्यथा पानसरेंनी उभ्या केलेल्या शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेपेक्षा विपरीत अशी प्रतिमा बाबासाहेबांनी उभी केली आहे असे वाटायचे काहीच कारण नाही. मी बाबासाहेबांचे राजा शिवछत्रपती अक्षरशः हजारो वेळा वाचले आहे. आजही मी ते पुस्तक कुठलेही पान उघडून वाचायला सुरवात करू शकतो.त्यात हाच उल्लेख आहे की स्वराज्याच्या बाजूने उभा राहिल तो आपला आणि स्वराज्याच्या विरोधात उभा राहिल--मग तो कोणत्याही जातीधर्माचा असेना तो मोंगल. ही धर्मनिरपेक्षता नाहीतर काय आहे?शिवाजी महाराज धर्मांध होते अशा स्वरूपाचा नक्की कोणता उल्लेख या महान पुरोगाम्यांना त्या पुस्तकात मिळाला हे समजायला मार्ग नाही. आणि पानसरेंच्या खुनानंतर सर्वत्र "शिवाजी कोण होता" या पुस्तकाच्या प्रती पुरोगामी कार्यकर्ते वाटत होते.अशा वेळी पुरंदर्‍यांना दिलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचा वापर पानसरेंनी महाराजांची प्रतिमा मांडली होती त्याच्या विरूध्द प्रतिमा उभी करायला केला जाईल असे पुरोगामी कार्यकर्त्यांना वाटते!! म्हणजे यांना वाटेल ते वाटणे काही संपतच नाही.बरं लोकशाही आहे. कोणालाही काहीही वाटू शकते. पण म्हणून या पुरोगामी कार्यकर्त्यांना जे वाटते ते ब्रह्मवाक्य थोडीच आहे? तुम्हाला वाटायचे ते वाटू दे पण ते वाटणे इतरांवरही बंधनकारक थोडीच आहे? ४. बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार द्यायला विरोध जातीय भावनेतून होत असेल हे आमच्या आधी लक्षात आले नाही. वा वा वा. टाळ्या वाजवून हात दुखायला लागले. काय बोलता राव. हा विरोध करणार्‍यांमध्ये कोण होते/आहे हे यांना माहित नव्हते की मुद्दामून डोळेझाक करायचे ठरविले होते? जितेंद्र आव्हाड, अजित पवार असले गणंग बाबासाहेबांना पुरस्कार द्यायचा विरोध करत होते आणि या लोकांचा पूर्वेतिहास मुक्ता दाभोलकर यांना माहित नव्हता का? की झोपायचे सोंग लावले होते? हे असले काहीतरी वाचले की "पुरोगामी","विवेकवादी" इत्यादी मराठी भाषेतील सर्वात वाईट शिव्या आहेत असे वाटायला लागते. एकूणच काय या असल्या ढोंगी लोकांना पुरोगामी म्हणणे यापेक्षा खरोखरच्या पुरोगामीत्वाचा मोठा अपमान असूच शकत नाही. डिजगस्टींग!!
  • Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा Sun, 09/18/2016 - 09:10 नवीन
अगदी! यांचा जोर हिंदुविरोधीच आहे यात शंका नाही. अभिराम दिक्षीतांनी अशा ढोंगी लोकांवर सडेतोड टिका केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/18/2016 - 09:10 नवीन
काही संबंधित माहिती. योगेश परळे यांचा लेख पानसरे शिवाजी इस्लाम आणि इतिहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रसाद_१९८२ Sun, 09/18/2016 - 09:31 नवीन
एकूणच काय या असल्या ढोंगी लोकांना पुरोगामी म्हणणे यापेक्षा खरोखरच्या पुरोगामीत्वाचा मोठा अपमान असूच शकत नाही. डिजगस्टींग!! अगदि सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विवेकपटाईत Sun, 09/18/2016 - 15:11 नवीन
डाव्यांचे चालले तर शिवाजी महाराजांचा इतिहास हि पुसून टाकतील. अफजलखान धर्मनिरपेक्ष हिरो आणि शिवाजी खलनायक हि प्रतिमा स्थापित करायला हि कमी करणार नाही. पुढे कुणीतरी महान पुरोगामी इतिहासकार शिवाजी झालाच नव्हता असे हि म्हणू शकेल. सर्व काही मिथिक कथा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sun, 09/18/2016 - 19:09 नवीन
अफजलखान धर्मनिरपेक्ष हिरो आणि शिवाजी खलनायक हि प्रतिमा स्थापित करायला हि कमी करणार नाही.
पटाईतकाका, अफझलखान धर्मनिरपेक्ष हिरो होता अशी प्रतिमा प्रस्थापित करायचा या मंडळींनी प्रयत्न केला आहे की नाही माहित नाही पण मागच्या वर्षी दिल्लीमधील औरंगजेब रोडचे नाव बदलून ए.पी.जे.अब्दुल कलाम रोड करायचा केंद्र सरकारने निर्णय घेतला त्याविरूध्द "औरंगजेब किती चांगला होता, किती धर्मनिरपेक्ष होता" इत्यादी अकलेचे तारे काही पुरोगामींनी तोडलेच होते. त्याला दीड-दोनशे लोकांनी लाईक केले होते. त्या लाईक करणार्‍यांमध्ये मिपावरचेही काही होतेच. हे तथाकथित पुरोगामी तिकडे दिवाळी अंकातही लिहितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
आ
आजानुकर्ण Mon, 09/19/2016 - 17:07 नवीन
गॅरीसाहेबांशी अगदी सहमत. स्वयंघोषित पुरोगामी आणि स्वयंघोषित हिंदुत्त्ववादी हे नेहमीच त्यांच्या विचारसरणीच्या विपरीत काम करत असल्याने हे शब्द आता शिवीस्वरुप झाले आहेत.
फक्त कधीकधी हे स्वयंघोषित पुरोगामी अनेक मुखवटे सादर करतात की त्यापैकी नक्की कोणत्या मुखवट्यावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नक्कीच पडतो.आणि होते असे की असे वेगवेगळे मुखवटे परिधान करणारे लोक स्वतःची विश्वासार्हता पूर्ण गमावून बसतात आणि त्यामुळे त्यांचे बोलणे गांभीर्याने घेणे बंद केले तर मग परत "उरलेल्या ६ मुद्द्यांवरही सकारात्मक काम होत नाही" म्हणून उलटी कोल्हेकुईही करतात.
याच्याशीही सहमत. किंबहुना हाच परिच्छेद असाच्या असा एका बाबा चमत्कारी संघटनेला लागू होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ओ
ओम शतानन्द Fri, 09/23/2016 - 13:19 नवीन
मस्तच, खोटारड्या पुरोगाम्यान्ची चान्गली चम्पी केली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ए
ए ए वाघमारे Mon, 09/26/2016 - 11:30 नवीन
या पत्रावर मी दिलेली आणि यामागच्या राजकारणावर बोलणारी प्रतिक्रियाही लोकसत्तेने छापली होती. ती खालीलप्रमाणे आम्ही सारे राजकारणी माझ्या पत्रावर मात्र मुक्ताबाईंचे उत्तर आले नाही आणि 'या विषयावरचा पत्रव्यवहार आता इथेच थांबवित आहोत' असे लिहिण्याची संपांदकांची (आणि जाहीर वाद घालायची आमची) संधी मात्र हुकली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 09/18/2016 - 15:01 नवीन
ट्रुमन एक विनंती आहे, तुम्ही इतके नीट बोलला आहात की तुम्ही सगळे प्रतिसाद नीट संकलित करून त्याचा एक मस्त लेख बनवा, सही होईल ते एकदम
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 09/18/2016 - 15:18 नवीन
ट्रुमन यांचे सर्व प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
साहना Sun, 09/18/2016 - 17:56 नवीन
गॅरी ट्रुमन ह्यांचे विचार मुद्देसूद आणि तर्कास धरून आहेत . फुरोगामी आणि तर्क ह्याचा संबंध असतोच असे नाही. ज्या प्रमाणे कम्युनिस्टांची नजर पूर्वी फादरलॅन्ड कडे असायची त्याप्रमाणे भारतीय फुरोगामी आपले विचार कदाचित पश्चिमेकडील फुरोगाम्या कडून इम्पोर्ट करत असावेत असे वाटते. त्यांत गैर काही काही नाही पण पश्चिमी फुरोगाम्यांनी त्यांच्या स्वतःच्या देशांत काय गोंधळ घातले आहेत हे पाहणे आवश्यक आहे. इस्लाम चे लांगुनचलन, सरकारी ताकद वापरून आपल्या विरोधकांची तोंडे बंद करणे, आपल्याच इतिहासाविषयी कमालीचा न्यूनगंड बाळगणे हे विदेशी पुरोगाम्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे आणि काही प्रमाणात भारतीय कॉपीकॅट्स सुद्धा हे विषय आयात करताहेत असे कधी कधी वाटते. अमेरिकेत कैद्यातील काळ्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे म्हणून फुरोगामी ओरडत असतात त्याच प्रमाणे मागे आपल्या फुरोगाम्यांनी सुद्धा भारतीय कैद्यांत मुस्लिम (आणि नंतर दलित) ह्यांचे प्रमाण जास्त का आहे असा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता पण कदाचित ते आकडे अंगावर आल्याने तो प्रकार बंद पडला. काही दिवस आधी अशीच एक ओळखीची फुरोगामी महिला, "महिलांना सार्वजनिक ठिकाणी बाळांना दूध पाजण्याचा हक्क असला पाहिजे" म्हणून मुंबईत काही तरी कार्यक्रम घडवू पाहत होती. विषयावर मत काहीही असो सध्या अमेरिकेत ह्या विषयाची फॅशन आहे म्हणून इथे हा विषय आणला जातो असे राहून राहून वाटले. आमच्या इथे लोक सर्रास संडास उघड्यावर करतात दूध पाजणे हि तर नगण्य (आणि बहुतेक करून समाजाला मान्य असेलेली) गोष्ट आहे. भारतीय परंपरांना विरोध आणि ख्रिस्ती/मुस्लिम परंपरांना समर्थन ह्यांत हिंदू द्वेषा पेक्षा पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव हे कारण आहे असे मला वाटते. पाश्चिमात्य देशांत हजारो वर्षांच्या ख्रिस्ती प्रभावाने नास्तिक लोकांच्या मनात सुद्धा निसर्गपूजक, अनेकेश्वरवादी इत्यादी आमच्या सारख्या पेगन लोकांच्या समजुती बद्दल कमालीचा द्वेष किंवा भयगंड असतो. "तुम्ही मृत्यूच्या देवतेला भजता ? तुम्हाला लाज नाही वाटत का ?" अश्या प्रकारचा प्रश्न विचारणारे नास्तिक लोक खूप भेटतात. कारण मृत्यू त्यांच्या दृष्टीने खूप वाईट गोष्ट असते आणि भारतीय संस्कृतीतील मृत्यू (पुनर्जन्म) ह्या संकल्पनेबद्दल आमच्या ज्या धारणा असतात त्या त्यांना सहज सहजी समजत नाहीत. ह्या उलट जपानी बौद्ध किंवा थाई लोकांना हे सगळे समजण्यास अजिबात कष्ट पडत नाहीत. भारतीय पुरोगामी सुद्धा दुर्दैवाने अश्या प्रकारच्या विचारांना बळी पडलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 09/18/2016 - 18:55 नवीन
प्रकाश घाटपांडे,
हे अस काहीतरी होते अन अंनिस चा सहानुभूतीदार वर्ग वेगाने दुरावायला सुरुवात होते
वरील विधानाशी असहमत. थोरले दाभोलकर फ्रॉड होते/आहेत. त्यांचे साधना आणि परिवर्तन हे न्यासदेखील गैरव्यवहारात आकंठ बुडालेले आहेत. त्यामुळे अनिसचा सहानुभूतीदार वर्ग (जो काही उरलासुरला आहे तो) दुरावतो आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/19/2016 - 05:54 नवीन
हा मुद्दा सनातनवाले दाभोलकरांच्या हयातीत सुद्धा मांडत होते.पण त्यात काही अर्थ नसावा. फार तर काही तांत्रिक अनियमितता असेल.परदेशी मदत स्विकारणे हा गैरव्यवहार नाही. मला वाटत की पुर्वी याची चर्चा आपण केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 09/19/2016 - 09:13 नवीन
प्रकाश घाटपांडे, बराच अर्थ आहे. वृत्तपत्रांनी बातमी दाबली म्हणून सत्य लपणारे थोडंच? वर्षानुवर्षे धर्मादाय आयुक्तांकडे विवरणपत्र भरलेच नाही. याला तांत्रिक अनियमितता म्हणंत नाहीत. फ्रॉड म्हणतात. तर लोकांचा विश्वास उडणारच ना? समाजप्रबोधन करण्यासाठी फ्रॉडची काय गरज? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/19/2016 - 10:17 नवीन
वृत्तपत्रांनी बातमी दाबली म्हणून सत्य लपणारे थोडंच?
सगळा मिडिया कसा मॅनेज होईल? तथ्य असते तर मिडियाला सनसनाटी बातमी हवीच असते. ते मागे लागले असते. अण्णांच्या संस्थांवर पण असे आरोप झाले. आता तांत्रिक बाब हा तात्विक दृष्ट्या भ्रष्टाचार असतो.पण गौण. सबब या मुद्दयात फारसा अर्थ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 09/19/2016 - 23:21 नवीन
प्रकाश घाटपांडे, सगळा मीडिया म्यानेज करणं आवघड आहे हे मान्य. दाभोलकरांचा उदोउदो करण्यात सगळी माध्यमे गर्क होती तरी सनातन प्रभात वृत्तपत्राने सत्याला वाचा फोडलीच. अर्थात केवळ मीडिया म्यानेज करूनही भागंत नाही. भुजबळांच्या व्यवहारांवर माध्यमांतून काहीच भाष्य झालं नव्हतं. बरोब्बर माध्यमांना खिशात घातलं होतं. तरीही आज ते अडकलेच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/20/2016 - 13:25 नवीन
मग तुम्ही म्हणता त्यात सत्य असेल तर उद्या हेही अडकतील. मुक्ता दाभोलकर ने आपण केस दाखल करु शकता असे सनातनवाल्यांना जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे. जी काही परदेशी आर्थिक मदत घेतली असेल तर ती कायद्याची परिपुर्ती करुन घेतली आहे असे तिने सांगितले आहे अनेकांना दाभोलकरांची मते मान्य नाहीत पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्द्ल वा हेतु बद्द्ल शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सतिश गावडे Tue, 09/20/2016 - 03:33 नवीन
थोरले दाभोलकर फ्रॉड होते/आहेत. त्यांचे साधना आणि परिवर्तन हे न्यासदेखील गैरव्यवहारात आकंठ बुडालेले आहेत.
त्यांचे हे गैरव्यवहार जगासमोर आणण्याच्या दिशेने कारवाई का केली नाही कुणी? एका अतिशय हास्यास्पद विचारसरणी असलेल्या संस्थेने आपल्या ब्लॉगवर चार शब्द खरडण्यापलीकडे काहीच कसे झाले नाही यावर? हमिद दाभोलकरांचे विधान अतिशय चुकीचे आहे यात शंका नाही. मात्र तो धागा पकडून विवेकवादाच्या चळवळीतील एका दिवंगत सच्च्या कार्यकर्त्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार हा प्रकार चांगला नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
पुंबा Tue, 09/20/2016 - 13:15 नवीन
ह्या आरोपांबद्दल तुम्ही एक तरी पुरावा देणार आहात का? माहिती अधिकार वगैरे वापरुन मिळालेली माहिती वगैरे काही आपल्याकडे आहे का? जर नसेल तर तुमच्या विधानांवर विश्वास केवळ सनातन प्रभात ने छापले एवढ्या मर्यादीत पुराव्यांवर ठेवायचा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ब
बाळ सप्रे Mon, 09/19/2016 - 11:14 नवीन
कुर्बानी आणि बळी देणे दोन्ही एकाच पातळीवरच्या अंधश्रद्धा आहेत. कुर्बानीविरुद्ध अंनिसकडू अजून लक्षवेधी काम झालेले नाही हे मान्य करायला काहीच हरकत नव्हती. मांडलेला मुद्दा कुरापत काढायला असो वा खरच निर्मूलन व्हावे या इच्छेने असो , हमीद यांची प्रतिक्रीया मुद्द्यावर असायला हवी होती. कुर्बानीमागचा भावार्थवगैरे जरा अतिच झालं. नरेन्द्र दाभोलकरांइतके संयमित भाष्य करणे हमीद / मुक्ता यांना तेवढेसे जमत नाही. अविनाश पाटील खरतर अध्यक्ष आहेत त्यांना प्रतिक्रीया वगैरे देताना जास्त ऐकलेले नाही केवळ कुरापत काढण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य केल्याने मुद्द्याला पाठीशी घातले असेच वाटणार. अशाने कुरापत काढणारे (फोटोशॉप मधे जास्त लाल रंगाने रंगवून रस्त्यावर रक्ताच्या नद्या दाखवणारे) आणखी फोफावणार.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 09/19/2016 - 12:06 नवीन
फोटोशॉप मधे जास्त लाल रंगाने रंगवून रस्त्यावर रक्ताच्या नद्या दाखवणारे म्हणजे अशा लाल रक्ताच्या नद्या वाहिल्याच नव्हता, व कुणीतरी हे फक्त कुरापत काढण्यासाठी प्रसवलेले आहे, असे तुमचे म्हणणे आहे. हे नक्की कुणी केले आहे, माहिती नाही. पण 'लिबरल', डावीकडे झुकलेला गार्डियन त्यात असेल असे मला वाटले नव्हते! तुमची माहिती माझ्या अल्प माहितीपेक्षा अधिक आहे, असे दिसते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Mon, 09/19/2016 - 12:35 नवीन
फेसबुक्/व्हॉट्सॅपवर फिरतायत त्या फोटोंची रंगवलेली आणि बिन रंगवलेली व्हर्शन्स आंतरजालावर उपलब्ध आहेत. शोधुन पहा. देवाच्या नावावर कत्तल चूकच, पण अतिरंजित चित्रं /मजकूर वापरून भावना भडकवणेही चूक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
अ
अनुप ढेरे Mon, 09/19/2016 - 12:40 नवीन
ही स्टॅंडर्ड पद्धत आहे. खरे फोटो/व्हिडो जर आपल्याला डॅमेजिंग असतील तर मुद्दाम एकदोन डॉक्टर्ड वर्जन्स फिरवायची. मग आपणच आरडा-ओरडा सुरू करायचा की हे बघा लोक कसे खोटे फटू पसरवतायत. मग जे खरे फोटो असतात त्याबद्दल देखील संशय निर्माण होतो. JNU प्रकरणातदेखील हेच झालं होतं. दोन-तीन खरे व्हिडो फिरत असताना एक खोटा व्हिडो देखील फिरवला होता. मग आरडाओरडा सुरू झाला की जे व्हिडो फिरतायत ते खोटे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
प
प्रदीप Mon, 09/19/2016 - 16:43 नवीन
मला फेबु व व्हॉट्सअ‍ॅपवर काय फिरते आहे, ते शोधुन पहाण्यची काय जरूर आहे? मुळात तसे रक्तरंजित पाणी वाहत होते हे (दस्तुर्खुद्द 'गार्डियन' म्हणाते आहे, तेव्हा) कुणी नाकबूल करू शकत नाही. ते सगळे तसे काही नव्हतेच, आणि मुद्द्दाम कुणीतरी ते कुरापत काढण्याकरता निर्माण केले आहे, हे खरे नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
स
संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 16:55 नवीन
सोशल मीडियावर फिरणे हीदेखील कुरापत असू शकते, ;) हे काही पहिल्यांदा घडत नसेल किंवा यापेक्षा जास्त रक्त भारतातल्या कत्तलखान्यात -जयांचे मालक हिंदू आहेत- वाहत असेल रोज. अर्थात, माझे कुठल्याच बळी प्रकाराला दुरुनही समर्थन नाही. खाणाऱ्याला खाऊ द्या, बळी देणाऱ्यांचे प्रबोधन करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Mon, 09/19/2016 - 17:03 नवीन
भारतातल्या कत्तलखान्यात -जयांचे मालक हिंदू आहेत- वाहत असेल रोज. कत्तलखान्यांत काय होते मला माहिती नाही. पण नेपाळमधे तेथील हिंदूंनी गेल्या वर्षी एक सण साजरा केला, त्यातही हजारो बकर्‍यांचा बळी देण्यात आला असे वाचनात आले होते. तेही ह्या घटनेइतकेच निषीद्ध आहेच. आणि तेही बदलले पाहिजे. जे आहे, ते आहे, ते मान्य करून पुढे जाणे उत्तम. तसे काही झालेच नाही, सर्वच अतिरंजित आहे, इत्यादी मखलाशी कुठल्याच घटनेविषयी न करणे हे शहाणपणाचे आहे, नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रदीप Mon, 09/19/2016 - 17:07 नवीन
सोशल मीडियावर फिरणे हीदेखील कुरापत असू शकते, ;) एका बाजूला आपल्याकडील तथाकथित प्रमुख प्रवाही मीडियाने स्वतःची विश्वातार्हता झपाट्याने आता गमावलेली आहे. दुसरीकडे सोशल मीडिया आता सर्वांना उपलब्ध आहे. कोंबडे झाकून उजाडले नाही, असे मानण्याचे दिवस गेले. मूळ चित्रे सोशल मीडियावर फिरणे कुरापत का समजावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 17:16 नवीन
का फिरली असावी हाच प्रश्न पडला आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Mon, 09/19/2016 - 17:29 नवीन
जे काम तथाकथित प्रमुख (mainstream) प्रसारमाध्यमे जाणूनबुजून करीत नाहीत, ते आता, मार्ग उपलब्ध सहजी झाल्याने दुसरे कुणीतरी करणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अमितदादा Mon, 09/19/2016 - 13:39 नवीन
फोटोशॉप मधे जास्त लाल रंगाने रंगवून रस्त्यावर रक्ताच्या नद्या दाखवणारे
ते फोटो खरे आहेत , नंतर आलेले फोटो ज्यामध्ये लाल कलर न्हवता ते फोटो खोटे म्हणजे फोटोशॉप केलेले आहेत. खालील लिंक पहा. link यामध्ये नमूद केलाय कि , ...But the images weren’t actually photoshopped at all. In fact, the images without the blood were the doctored ones. हि पहा बांगलादेश मधील वर्तमानपत्रातील लिंक , link यामध्ये व्हिडीओ सुद्धा दिलाय तो हि पहा. हि बातमी खरी आहे नंतर आलेले फोटो खोटे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
आ
आजानुकर्ण Mon, 09/19/2016 - 17:10 नवीन
बकऱ्यांचा बळी देण्यात निषिद्ध काय आहे हे समजले नाही. नॉनव्हेज खाणेही निषिद्ध मानायचे काय? बांगलादेशातील रक्ताच्या नद्या वगैरेंमुळे हायजिनिक प्रॉब्लेम्स निर्माण होतात हे मान्य. पण गटारी अमावास्येच्या पवित्र तिथीला किती बोकड-कोंबडे कापले आणि किती लिटर दारु विकली गेली याचे आकडे सामनामध्ये दरवर्षी प्रकाशित केले जातात. मग नक्की आक्षेप कशाला घेतलाय ते कळले नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 17:18 नवीन
खाण्यासाठी मारले ते चालेल, धर्माच्या नावावर मारू नका,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 09/19/2016 - 17:26 नवीन
बकरीईदलाही खाण्यासाठीच मारतात. गणेशचतुर्थीला मोदक करतात ते देवाच्या नावाखाली केले असले तरी ते खाण्यासाठीच केलेले असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/19/2016 - 17:58 नवीन
जत्रे मधे बकरी कोंबड कापतात ते देवाच्या नावाने असले तरी ते माणसंच खातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 18:02 नवीन
फरक आहे थोडा, बकरे सर्व समाज कापतो तर कोंबड्या काही अशिक्षित लोकांपर्यंत उरलं, सुशिक्षित कापत असतील तर माहित नाही,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
साहना Mon, 09/19/2016 - 20:26 नवीन
सुशिक्षित लोक सुद्धा भरपूर कोंबडे कापतात आणि चांगला ताव मारतात. स्वानुभव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ख
खटपट्या Tue, 09/20/2016 - 20:54 नवीन
ये बात हजम नही हुई. इस्कटून सांगा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 09/21/2016 - 05:05 नवीन
हिंदुमधली एखादी जात जे कोंबडं बकरे वैगेरे देवाला कापतात त्यातला सुशिक्षित वर्ग ह्या प्रथा सोडून आहे, मुस्लिमांमध्ये मात्र असे काही नाही, श्रीमंत गरीब, शिक्षित अशिक्षित सर्वच ईदला बकरे कापतात, खाण्यासाठी वापरत असाल तरी मूळ कारण बळी देणे हेच आहे, ते एक पवित्र व न टाळता येण्यासारखे कार्य समजून केले जाते, हिंदू समाजात असे कम्पलशन दिसत नाही, चुभु देणेघेणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्रदीप Mon, 09/19/2016 - 17:31 नवीन
आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आनंदयात्री Mon, 09/19/2016 - 17:22 नवीन
मूळ आक्षेप बळी देण्याला नसून दुटप्पीपणाला आहे असे वाटते. जसे मांढरदेवी किंवा तत्सम यात्रेत बळी देणे म्हणजे अंधश्रद्धा, क्रौर्य इत्यादी इत्यादी, पण बकरीइडीला बकरे कापणे म्हणजे धार्मिक अभिव्यक्ती! असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
साहना Mon, 09/19/2016 - 19:16 नवीन
अगदी बरोबर. सन्मानपूर्वक बळी देणे सर्व संस्कृतीचा भाग आहे आणि कुणाला पालन करायचे असेल तर कायद्याच्या चौकटीत राहून जरूर करावे. दुट्टपी पणा ह्यावर आक्षेप. आम्ही लोक साधी बैलगाडी शर्यत भरवू शकत नाही आणि ह्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी बकरे कापायची मुभा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 19:34 नवीन
हो ना राव! साध्या बैलगाडा शर्यतीत भाग घ्यायचाय, पण माझ्या गाडीसाठी एक साधा बैल कमी पडतोय, समर्थकांपैकी कोणाला वेळ असेल तर कळवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
स
साहना Mon, 09/19/2016 - 20:26 नवीन
इतके चांगले बैल इथे तुम्हाला मिळतील असे वाटत नाही आणि ते स्लो असतील तर दुसऱ्या बाजूने तुमची गती कमी होईल. सजेशन म्हणून तुम्ही एकटेच गाडी ओढा ना ? कदाचित तुम्ही एकटेच सगळ्यांना भारी पडाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा