उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
पण आपण तक्रार पुस्तिका मागून पण जर मिळत नसेल तर ते हि चूक आहेया नवीन कहाणीतील काही परस्परविरोधी मुद्दे - एअर इंडिया लोकांना मिसगाईड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दस्तुरखुद्द गायकवाडांनी अत्यंत अभिमानाने कॅमेर्यासमोर सांगितले आहे की मी सँडल काढून कर्मचार्याला २५ वेळा मारले . . . ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, मी शिवसेनेचा खासदार आहे . . . उशीरा दाढीमिश्या आल्यासारखे हे जे उशीरा शहाणपण सुचले आहे हे त्याच दिवशी सुचले असते त्यांच्यावर आज लपून रहायची वेळ आली नसती. दुसरा मुद्दा म्हणजे तक्रारपुस्तक मिळाले नाही म्हणून विमानातच बसून राहून इतरांचा खोळंबा करणे व नंतर कर्मचार्याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न करणे व आपण तसे केले हे अत्यंत अभिमानाने सांगणे हे अत्यंत अयोग्य आहे. विमानात तक्रारपुस्तक मिळाले नसेल तर टर्मिनलवर येऊन तिथल्या एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविता आली असती. एखाद्या खासदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याएवढे धाडस एअर इंडियाच्या व्यवस्थापक किंवा कर्मचार्यांमध्ये असेल असे वाटत नाही. गायकवाडांच्या म्हणण्यानुसर त्यांना वाईट सेवा मिळाल्याबद्दल तक्रार करायची होती. त्यांना नक्की कोणती सेवा वाईट मिळाली याविषयी ते अजिबात बोललेले नाहीत. विमानात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते का, त्यांना वाईट खानपान पुरविण्यात आले होते का, त्यांच्याशी विमानात कर्मचार्यांनी गैरवर्तणूक केली होती का, त्यांना खराब आसन देण्यात आले होते का इ. गोष्टींबद्दल ते काहीही बोललेले नाहीत. या सर्व गोष्टींचा खुलासा त्यांनी लगेचच केला असता तर ही वेळ आलीच नसती. त्यांनी कॅमेर्यासमोर आत्मप्रौढीने ज्या बढाया मारलेल्या आहेत त्यावरच विसंबून प्रतिक्रिया येणार. . कोणत्या प्रॉपर सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या नाहीत, त्यांची नक्की काय फसवणूक झाली इ. गोष्टींबद्दल ते अजूनही सांगत नाहीत. आपल्याला वाईट सेवा मिळाल्यामुळे आपल्याला तक्रार करायची होती असा त्यांचा दावा होता. परंतु आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला हीच त्यांचे खरे दुखणे दिसते. जनसामान्यांच्या बरोबर इकॉनॉमी क्लासमध्ये मांडीला मांडी लावून बसावे लागल्यामुळे त्यांचा पारा चढलेला दिसतो. एकीकडे म्हणतात आपल्याला वाईट सेवा मिळाली, परंतु नक्की कोणती सेवा वाईट होती त्याविषयी चकार शब्द नाही. तर दुसरीकडे सांगतात की आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला. जर विमानात बिझनेस क्लासची आसने असूनसुद्धा त्यांना मुद्दाम इकॉनॉमीने जायला लावले असत तर त्यांची तक्रार रास्त होती. पण विमानात जर बिझनेस क्लासची आसनेच नसतील तर फक्त यांच्यासाठी इकॉनॉमी क्लासची ५-६ आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसवायची होती का? जर त्या विशिष्ट विमानात बिझनेस क्लासच नव्हता त्यांनी त्या विमानाने प्रवास करणे टाळून ज्यात बिझनेस क्लासची व्यवस्था आहे अशा एखाद्या दुसर्या विमानातून प्रवास करायला हवा होता. तसे न करता त्यांनी इकॉनॉमीतून प्रवास पूर्ण केला आणि नंतर मला बिझनेस क्लास दिला नाही हो म्हणून कांगावा सुरू केला. एअर इंडीया कितीही वाईट कंपनी असली, त्यांना कितीही वाईट सेवा मिळाली असली तरी एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने पायातील पादत्राणाने एका ६० वर्षीय कर्मचार्याला अनेकवेळा मारणे, त्याला शिडीवरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे आणि नंतर आपल्या या घृणास्पद कृत्याबद्दल जराही खेद, खंत न बाळगता अभिमानाने आपल्या कृत्याची प्रौढी मारणे हे अत्यंत संतापजनक व तिरस्करणीय वर्तन आहे. त्यांनी जे केले तो गुन्हाच आहे व या अत्यंत उन्मत्त वर्तनाबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. विमानकंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी समर्थनीय आहे.इतिहासातील आणि वर्तमान काळातील भाजप च्या चुका ह्यावरही एक धागा काढेन वेळ मिळाला कि . पण सगळ्यांनी नीट बोला हा तेव्हा ....नक्की लिहा. धाग्याची वाट बघतो.चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहेझाला, व्यवस्थित झाला. लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे.माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.सहानूभूती नाही तर पाठिंबा प्रचंड आहे. माजुरडेपणाला असेच जागच्या जागी उत्तर द्यावे लागते. नंतर फक्त निरवानिरवी असते ह्या तत्त्वावर आमची श्रध्दा आहे.मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?सध्या तरी मी एकटाच आहे आणि माझ्या निवेदनाने तुम्हाला बरे वाटलेले नाहीये. राहता राह्यला परत निवडून यायचा भाग. ते आधीही आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ह्यावेळी खासदारकीची निवडणूक त्यांची पहिली निवडणूक नव्हती अन येत्यावेळेस तर ते जब्बरदस्त मतांनी येणार. . आता कसं वाटतंय?धन्यवाद. ऐकून बरे वाटले.असे म्हणण्यात कसलेतरी समर्थन केले आहे. तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे. धन्यवाद = प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ऐकून बरे वाटले = जनता पुन्हा निवडून आणणार नाही हे ऐकून बरे वाटलेतुम्हाला वाटते एकेरी भाषा चुकीची आहे. मला नाही वाटत तसे. बेसिकली अशा (मारहाण करणाऱ्या) माणसाबद्दल आदर का म्हणून ठेवायचा? कोणत्यातरी निवडणुकीत जिंकला म्हणून? चप्पल मारणे सोडून त्याचे कर्तृत्व काय?काही व्यक्तींबद्दल एकेरी उल्लेखच केला जातो. त्यांचे कर्तृत्वच इतके महान आहे की त्यांच्याबद्दल अहोजाहो असे वापरताच येत नाही. ते निवडून आले असले तरी त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करणे अशक्य आहे. (उदा. लालू, आव्हाड, मणीशंकर अय्यर . . असे बरेच जण आहेत).