उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
म्हणजेच, आज ना उद्या एअर इंडियाला बंदी उठवावी लागणारच आहे, त्यावेळी आतापर्यंत घातलेली बंदी विसरून "एअर इंडीयाचे थोबाड फोडले" असे अग्रलेख नक्की वाचायला मिळतील.त्या अग्रलेखात "वाघाला डिवचलं की तो पंजा मारणारच", "जो शिवसेनेला आडवा गेला, तो संपला", "एअर इंडियाच्या छाताडावर नाचून आम्ही बंदी मागे घ्यायला लावली" अशी टाळीखेचक वाक्ये असतील. बादवे, शूर मर्द मावळा गायकवाड लपून का बसला आहे? पानपताची लढाई जिंकून आल्यासारखा भीमपराक्रम गाजविल्यानंतर तर त्याचे कोपर्याकोपर्यावर सत्कार व्हायला हवेत.एअर इंडिया आणि विमान कंपन्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्याय केला आहे. मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती. मला धक्काबुक्की केल्यानंतर मी फक्त त्या अधिकाऱ्याला ढकललं होतं." २५ वेळा चपलेने मारले असे कॅमेर्यासमोर फुशारक्या मारणार्या ह्या खासदारांने संसदेत तर सरळ-सरळ घूमजाव केले आहे. सध्याच्या शिवसेनेची हि सवयच झालेली दिसतेय, कॅमेर्यासमोर फुशारक्या मारायला एक बोलायचे व प्रकरण अंगाशी आल्यावर शेपुट घालायचे, पुर्वी बाळासाहेब त्यांनी मांडलेल्या विधानावर ठाम तरी असत पण सध्या फक्त बोलबच्चन लोकच उरलेत शिवसेनेत.