Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अ
अत्रे
Mon, 03/27/2017 - 07:34
🗣 592 प्रतिसाद
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
94896 वाचन

💬 प्रतिसाद (592)
M
mayu4u Fri, 03/31/2017 - 15:02 नवीन
http://m.timesofindia.com/india/sena-mp-ravindra-gaikwad-makes-7-attempts-to-fly-in-7-days-but-airlines-keep-him-grounded/articleshow/57940461.cms
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 03/31/2017 - 15:30 नवीन
"तेव्हढ्यात श्री. सुकुमार नामे कर्मचारी बातचीत करायच्या निमित्ताने आंत घुसला. त्यानं शिवीगाळ चालू केली." नक्की ? तुला कधी असा अनुभव आलाय काय रे गामा? कुणा मिपाकराला असा अनुभव आलाय ? की उगीच मराठी खासदार आता तोंडावर आपटलाय म्हणून बाजू सावरून घेताय ? शिवीगाळ,हप्तेवसुली,तोंडाला काळे फासणे,परवानगी न घेता कार्यालयांत घुसून काचा फोडणे.. ह्यात वाकबगार कोण? आधी म्हंटल्याप्रमाणे भविष्यात कुणा बिहारी,तामिळ खासदाराने अशाच कारणांवरून(एयर इंडियाची दर्जा चांगला नाही) मराठी कर्मचार्याला बुकलले तर खासदाराची बाजू घेणार का?
ग
गामा पैलवान Fri, 03/31/2017 - 22:45 नवीन
माईबाई, १.
नक्की ? तुला कधी असा अनुभव आलाय काय रे गामा? कुणा मिपाकराला असा अनुभव आलाय ? की उगीच मराठी खासदार आता तोंडावर आपटलाय म्हणून बाजू सावरून घेताय ?
मला अनुभव आलेला नाही. पण विमानातल्या सगळ्या लोकांना आलाय. "Don't do anything silly for the stupid man...." असं हवाई सेविका खासदारांना उद्देशून बोलंत होती. कृपया हे चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=gCRj5FQnohE हा स्ट्युपिड मॅन म्हणजे सुकुमारच (वा ज्याने खासदारांवर हल्ला केला तोच) आहे. आणि हो, याचा मराठी वा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. २.
शिवीगाळ,हप्तेवसुली,तोंडाला काळे फासणे,परवानगी न घेता कार्यालयांत घुसून काचा फोडणे.. ह्यात वाकबगार कोण? आधी म्हंटल्याप्रमाणे भविष्यात कुणा बिहारी,तामिळ खासदाराने अशाच कारणांवरून(एयर इंडियाची दर्जा चांगला नाही) मराठी कर्मचार्याला बुकलले तर खासदाराची बाजू घेणार का?
विषयांतर. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 11:19 नवीन
मला अनुभव आलेला नाही. पण विमानातल्या सगळ्या लोकांना आलाय. "Don't do anything silly for the stupid man...." असं हवाई सेविका खासदारांना उद्देशून बोलंत होती. कृपया हे चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=gCRj5FQnohE हा स्ट्युपिड मॅन म्हणजे सुकुमारच (वा ज्याने खासदारांवर हल्ला केला तोच) आहे. ही चित्रफीत सुद्धा पाहिलेली आहे. सुकुमारने खासदारावर हल्ला केला असे यातून अजिबात दिसत नाहीत. अनेकजण पाठमोरे दिसतात व हवाईसुंदरी 'डोन्ट डू दॅट, डोन्ट डू दॅट' असे दोन वेळा ओरडताना दिसते. याचा संबंध कर्मचार्‍याला विमानातून ढकलण्याशी असावा कारण विमानाच्या दारात सुकुमार पुढे दिसतात व त्यांच्या मागे गायकवाड दिसतात व सुरक्षा कर्मचार्‍याने त्यांचा हात धरलेला दिसतो. सुकुमारने खासदाराला मारहाण केली असे कणभरसुद्धा दिसत नाही. 'कितने बद्तमीज है ये लोग' असे कोणतरी म्हणल्याचे ऐकू येते. हे कोण कोणास म्हणाले हे समजू शकत नाही. संतापलेल्या खासदार महाशयांना शांत करण्यासाठीच हवाईसुंदरी सुकुमारचा स्टुपिड मॅन असा उल्लेख करत असावी. आपल्याच सहकार्‍याला मूर्ख म्हटल्याने खासदारसाहेबांचा उसळलेला क्रोध कमी होईल असा त्यामागचा हेतू असावा. भारतात एखाद्या पक्ष कार्यकर्त्यावर सुद्धा हात उचलण्याची सर्वसामांन्यात हिम्मत नसते. एखाद्या खासदारावर ६० वर्षीय कर्मचारी हात उचलण्याची शक्यता शून्य आहे.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 03/31/2017 - 22:58 नवीन
श्रीगुरुजी, १.
खासदार महाशयांनी हा मुद्दा आता जास्त प्रतिष्ठेचा न करता स्वतःहून माफी मागून प्रकरण मिटवून टाकावे.
यावरून एक गोष्ट आठवली. मोदींनाही माध्यममुखंड गुजरात दंगलींवरून सदैव माफी मागायचा आग्रह करीत. एके दिवशी मेघनाद देसाई चर्चेस आलेले असतांना त्यांनी विचारलं की जर मोदींनी माफी मागितली तर इथे बसलेले किती जण माफ करतील? सगळे नाही म्हणाले. देसाई म्हणतात की नेमकं हेच कारण आहे की मोदी माफी मागंत नाहीत. श्रीगुरुजी, जर खासदारांनी माफी मागितली तर तुम्ही त्यांना अजिबात माफ करणार नाहीत. उलट त्यांच्या माफीचं भांडवल करून गहजब कराल. हे गायकवाड बरोब्बर जाणून आहेत. २.
स्वतःहून मारहाणीच्या फुशारक्या कॅमेर्‍यासमोर मारल्याने त्यांची बाजू लंगडी झाली आहे व जनमत मोठ्या प्रमाणात त्यांच्याविरूद्ध आहे.
ज्याला तुम्ही फुशारक्या म्हणता त्यात गायकवाडांनी चपलेने का मारलं त्याचं कारण दिलेलं आहे. पण तुम्हाला ऐकायचं नाहीये. चलचित्र इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8 चपलेने मारण्याचे सांगण्यापूर्वी मुलाखतकर्ताच म्हणतोय की उसने (म्हणजे सुकुमारने) हात से मारा. म्हणजे गायकवाडांनी मार खाल्ल्यावरच चप्पल उगारलेली आहे. आणि हो, जनमत काहीही त्यांच्याविरुद्ध नाहीये. धाराशिवेत लोकांनी व्यवस्थित बंद पाळला (ऐकीव माहिती). आ.न., -गा.पै.
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 11:06 नवीन
यावरून एक गोष्ट आठवली. मोदींनाही माध्यममुखंड गुजरात दंगलींवरून सदैव माफी मागायचा आग्रह करीत. एके दिवशी मेघनाद देसाई चर्चेस आलेले असतांना त्यांनी विचारलं की जर मोदींनी माफी मागितली तर इथे बसलेले किती जण माफ करतील? सगळे नाही म्हणाले. देसाई म्हणतात की नेमकं हेच कारण आहे की मोदी माफी मागंत नाहीत. श्रीगुरुजी, जर खासदारांनी माफी मागितली तर तुम्ही त्यांना अजिबात माफ करणार नाहीत. उलट त्यांच्या माफीचं भांडवल करून गहजब कराल. हे गायकवाड बरोब्बर जाणून आहेत. माफी मागायची नसेल तर मग बसा रेल्वेने जात किंवा मग वेगवेगळ्या नावाने बुकिंग करून बुकिंग कॅन्सल होत असलेले बघत बसा. एकतर ज्या विमानात व्यवसाय वर्गच नव्हता, त्या विमानातून प्रवास पूर्ण झाल्यावर व्यवसाय वर्ग का नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा आहे. दुसरं म्हणजे आपण कर्मचार्‍याला मारले हे अत्यंत उन्मत्तपणे कॅमेर्‍यासमोर सांगितल्याने या विशिष्ट व्यक्तीबद्दल जनमत मोठ्या प्रमाणात विरोधात गेले आहे. खासदार शिवसेना या बदनाम पक्षाचे असल्याने जनमताची भावना अजून तीव्र आहे. कॅमेर्‍यासमोर फुशारक्या मारून गायकवाडांनी स्वतःची बाजू लंगडी करून ठेवली आहे. तिसरं म्हणजे सर्व विमान कंपन्यांनी कायदेशीररित्या यांच्या प्रवासावर बंदी घातली आहे व हे त्याबाबतीत बंदी हटवा अशी विनवणी करण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. यांना बंदी घालण्यामागे विमान कंपन्यांकडे सबळ कारणे आहेत व त्यामुळेच खासदार महाशय बंदीविरूद्ध न्यायालयात गेलेले नाहीत कारण विमान कंपन्यांची कायदेशीर बाजू भक्कम आहे. म्हणूनच शिवसेना सुमित्रा महाजनांनी मध्यस्थी करून बंदी उठवावी यासाठी धडपड करीत आहे. शिवसेनेच्या दुर्दैवाने १-२ वैयक्तिक खासदारांचा अपवाद्द वगळता कोणीही शिवसेनेच्या बाजूने नाही. संसदेत शिवसेनेचे २१ खासदार असताना जेमतेम ७-८ खासदार बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे मंत्रीमंडळातील प्रतिनिधी अनंत गीते मूग गिळून गप्प आहेत. शिवसेना रोज सकाळ संध्याकाळ भाजपच्या नावाने शिमगा करीत असते. त्यामुळे भाजप या प्रकरणात पूर्ण तटस्थ राहून गायकवाडांची मजा बघत आहे. अशा परिस्थितीत दोनच उपाय शिल्लक आहेत. एक म्हणजे विमान कंपन्यांनी स्वतःच बंदी उठवायची (ही शक्यता अत्यंत धूसर आहे) किंवा गायकवाडांनी माध्यमांसमोर न येता गुपचूप विमानकंपन्यांशी बोलणी करून वेळ पडल्यास दिलगिरी व्यक्त करून बंदी उठविण्याची विनंती करायची. तसे करायचे नसेल तर मग बसा तोंड लपवून आणि रेल्वेतून प्रवास करत. ज्याला तुम्ही फुशारक्या म्हणता त्यात गायकवाडांनी चपलेने का मारलं त्याचं कारण दिलेलं आहे. पण तुम्हाला ऐकायचं नाहीये. चलचित्र इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8 ही चित्रफीत मी पाहिलेली आहे. या चित्रफितीतील गायकवाडांच्या वाक्यावाक्यातील माज डोक्यात तिडीक उत्पन्न करतो. कोणत्याही परिस्थितीत मारहाणीचे समर्थन होऊच शकत नाही. चपलेने मारण्याचे सांगण्यापूर्वी मुलाखतकर्ताच म्हणतोय की उसने (म्हणजे सुकुमारने) हात से मारा. म्हणजे गायकवाडांनी मार खाल्ल्यावरच चप्पल उगारलेली आहे. उसने म्हणजे गायकवाडनेच (सुकुमारने नव्हे) हातानेच मारले का असे मुलाखतकर्त्याने विचारल्यावर गायकवाड मोठ्या माजात सांगतात की हाताने नाही चपलेने मारले. आणि हो, जनमत काहीही त्यांच्याविरुद्ध नाहीये. धाराशिवेत लोकांनी व्यवस्थित बंद पाळला (ऐकीव माहिती). बंद पाळणे म्हणजे जनमत बाजूने आहे असा अर्थ नसतो. जनता मारहाणीच्या व तोडफोडीच्या भीतिने अत्यंत नाईलाजाने दुकाने बंद ठेवतात.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 03/31/2017 - 23:00 नवीन
गॅरी ट्रुमन,
एकूणच या प्रकरणात पेंग्विनसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्‍या सगळ्यांनाच स्वतः गायकवाडांनीच चांगलेच तोंडघशी पाडले आहे.
या प्रकरणाचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही. आ.न., -गा.पै.
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 07:15 नवीन
नुसता शिवसेनेचाच नाही गापै, आता माझं मत असं बनलंय कि याचा त्यांच्या विमानसेवेबद्दलच्या तक्रारीशीही काही संबंध नाही. त्यांनी त्यांची तक्रार शांततेनेच (पण विमान खोळंबवुन चुकीच्या मार्गाने) करायचा प्रयत्न केला. भांडण आणि मारामारी हा कर्मचाऱ्यांच्या शुद्ध अरेरावीतून सुरु झालेला प्रयत्न आहे. तो विडिओ आणि मीडियाला दिलेली स्टेटमेंट्स अनेकवेळा बघितल्यावर उलट माझे मत असे झाले आहे कि खासदारांनी त्यांना फक्त एकाच झापड मारली आहे(अर्थात हाही गुन्हाच आहे). त्यांचे "चप्पलसे २५ मारा" हे उपरोधात्मक वक्त्यव्य स्वतःचा शिवसेनाविरोध कुरवळण्यासाठी वापरण्यात येत आहे, कारण ह्या वाक्याच्या आधीचं उसने क्या बोला कैसे मारा? हातसे, पैरसे, असं विचारानं आणि त्याच वाक्याच्या नंतरचं "बतमीजीसे बात कर रहा था, मारा एक फिर" हे वाक्य सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. "त्यांनी स्वतःच २५ मारल्याची कबुली दिलीय" याचा वापर करताना (त्यांनी ते स्वतःच्या कृतीबद्दल कबुली दिलीय त्यामुळे त्याला पुरावा लागणार नाही असं लंगडं समर्थन करून) त्यांनी स्वतःच स्वतःबद्दल "चार बार पैर गिरा, आप बुजुर्ग हो बैठके बात करो" हे मात्र सरळ दुर्लक्ष करायचं. एका ६० वर्षाच्या "बुजुर्गला" कपडे फाडून चपलेने मारले असे ओरडून सांगून बुजुर्गपणाचा वापर करून प्रकरणाचे गांभीर्य वाढवताना हे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचे कि खासदार स्वतः ५७ वर्षाचे आहेत. खासदारांच्या बाजूच्या प्रत्येक गोष्टीला पुरावा मागताना त्यांच्या विरोधातल्या गोष्टी मात्र कुठल्याही वर्तमानपत्रात कुठल्याही पुराव्याविना आल्या तरी लगेच विश्वास ठेवायचा. खासदारांनी तिकीट बुक करण्याचा ७ वेळा प्रयत्न केला याला पुरावा काय? त्यांच्या नावाने बुक करण्याचा प्रयत्न कोणी केला याबद्दल काहीही माहिती नसताना त्याबद्दल जणूकाही विमान कंपनीने बरा दणका दिला म्हणून आनंद व्यक्त्य करणे म्हणजे दांभिकता वाटते.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 11:29 नवीन
नुसता शिवसेनेचाच नाही गापै, आता माझं मत असं बनलंय कि याचा त्यांच्या विमानसेवेबद्दलच्या तक्रारीशीही काही संबंध नाही. त्यांनी त्यांची तक्रार शांततेनेच (पण विमान खोळंबवुन चुकीच्या मार्गाने) करायचा प्रयत्न केला. भांडण आणि मारामारी हा कर्मचाऱ्यांच्या शुद्ध अरेरावीतून सुरु झालेला प्रयत्न आहे. कारण काहीही असले तरी कर्मचार्‍याला मारणे हा गुन्हा आहे. व्यवसायवर्ग नसलेल्या विमानातून प्रवास करून प्रवास पूर्ण झाल्यावर व्यवसाय वर्ग का नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा होता. तक्रारीसाठी विमान खोळंबून ठेवणे व कर्मचार्‍याला चपलेने मारणे हा मोठा गुन्हा आहे. कर्मचार्‍याच्या अरेरावीचे कारण पुढे करून हे गुन्हे झाकता येणार नाहीत. तो विडिओ आणि मीडियाला दिलेली स्टेटमेंट्स अनेकवेळा बघितल्यावर उलट माझे मत असे झाले आहे कि खासदारांनी त्यांना फक्त एकाच झापड मारली आहे(अर्थात हाही गुन्हाच आहे). त्यांचे "चप्पलसे २५ मारा" हे उपरोधात्मक वक्त्यव्य स्वतःचा शिवसेनाविरोध कुरवळण्यासाठी वापरण्यात येत आहे, कारण ह्या वाक्याच्या आधीचं उसने क्या बोला कैसे मारा? हातसे, पैरसे, असं विचारानं आणि त्याच वाक्याच्या नंतरचं "बतमीजीसे बात कर रहा था, मारा एक फिर" हे वाक्य सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. "त्यांनी स्वतःच २५ मारल्याची कबुली दिलीय" याचा वापर करताना (त्यांनी ते स्वतःच्या कृतीबद्दल कबुली दिलीय त्यामुळे त्याला पुरावा लागणार नाही असं लंगडं समर्थन करून) त्यांनी स्वतःच स्वतःबद्दल "चार बार पैर गिरा, आप बुजुर्ग हो बैठके बात करो" हे मात्र सरळ दुर्लक्ष करायचं. एका ६० वर्षाच्या "बुजुर्गला" कपडे फाडून चपलेने मारले असे ओरडून सांगून बुजुर्गपणाचा वापर करून प्रकरणाचे गांभीर्य वाढवताना हे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचे कि खासदार स्वतः ५७ वर्षाचे आहेत. आपण २५ वेळा चपलेने मारले हे त्यांनी स्वतःच माध्यमांसमोर सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी फक्त एकच झापड मारली या तुमच्या मताला शून्य महत्त्व आहे. १ असो वा २५, मारहाण हा गुन्हाच आहे. आपण काही चुकीचं केलंय हे त्यांना मान्यच नाही. उलट आपल्या कृत्याच्या अभिमानाने फुशारक्या मारल्यामुळे सर्वांच्या डोक्यात तिडीक गेली आहे. अशा खासदाराचे इथे समर्थन होत आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. खासदारांच्या बाजूच्या प्रत्येक गोष्टीला पुरावा मागताना त्यांच्या विरोधातल्या गोष्टी मात्र कुठल्याही वर्तमानपत्रात कुठल्याही पुराव्याविना आल्या तरी लगेच विश्वास ठेवायचा. खासदारांनी तिकीट बुक करण्याचा ७ वेळा प्रयत्न केला याला पुरावा काय? त्यांच्या नावाने बुक करण्याचा प्रयत्न कोणी केला याबद्दल काहीही माहिती नसताना त्याबद्दल जणूकाही विमान कंपनीने बरा दणका दिला म्हणून आनंद व्यक्त्य करणे म्हणजे दांभिकता वाटते. बुकिंगबद्दल विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. आग्रह नाही. ७ वेळा वेगवेगळ्या नावाने, स्पेलिंग बदलून बुकिंगचा प्रयत्न केल्याची बातमी अनेक माध्यमातून आली आहे. त्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. विमान कंपनीने असल्या माजाला दणका दिला म्हणून खरोखरच आनंद झाला आहे. शिवसेनेच्या फुशारक्या, माज, घाणेरडी भाषा आणि या खासदार महाशयांचा माज अत्यंत डोक्यात जातो. अशांना दणका मिळाल्यामुळे झालेला आनंद व्यक्त करणे म्हणजे दांभिकता नसून खरोखरच आनंद झाला आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 14:24 नवीन
तुम्ही इअरफोन्स लावून नीट विडिओ बघा आणि ऐका, खूप गरज आहे त्याची. अर्थात पूर्वग्रह बाजूला ठेवणेही तितकेच गरजेचे आहे नाहीतर काहीही हवे ते ऐकू येते आणि असे दिसते, तसे दिसते असले मुद्दे स्वसोयीसाठी वापरले जातात. बाकी तुम्ही दर वेळेला २५ मारल्याचे खासदाराने सांगितल्याच्या पुढे सरकत नाही आहात, अगदी वरच्याच प्रतिसादात त्याचा प्रतिवाद असतानाही. यावरून मला असे वाटते की तुमचे मुद्दे परत परत तेच आहेत आणि चर्चा तिथेच फिरते आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 17:06 नवीन
मी सर्व चित्रफिती पाहिल्या आहेत. सुकुमार यांनी गायकवाड यांना शिवीगाळ केल्याचे किंवा मारहाण केल्याचे कोणत्याही चित्रफितीत नाही. इथे पूर्वग्रहाचा संबंधच नाही. जे दिसतंय त्यावरच मी बोलतोय. खासदाराने २५ वेळा मारल्याच्या पुढे सरकायचं म्हणजे नक्की काय करायचं? आपण २५ वेळा चपलेने कर्मचार्‍याला मारलं हे खासदाराने अभिमानाने सांगितले. त्यानंतर विमान कंपन्यांनी त्यांच्यावर प्रवासबंदी आणली. त्या दिवसापासून खासदार माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी सभापतींची भेट घेऊन बंदी उठविण्याची मागणी केली. परंतु सभापतींनी या प्रकरणात पडण्यास नकार दिला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरूद्ध फिर्याद दाखल केलेली आहे. याव्यतिरिक्त अजून काही घडले असेल तर ते सांगा.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 14:51 नवीन
शिवसेनेच्या फुशारक्या, माज, घाणेरडी भाषा
बाकी हे एकमेव (पूर्वग्रहदूषित) कारण आहे ह्या प्रकरणात विरोधाचा उत्साह उतू जाण्याचं, दुसरं काही नाही. दोनच महिन्यांपूर्वी दवाखान्यातील डॉक्टरांना भाजप खासदाराकडून झालेली मारहाण, मागच्या वर्षी सिद्धिविनायक मंदिरात भाजप खासदाराने पोलिसांना केलेली मारहाण, भंडाऱ्यात भाजप आमदाराने पोलिसांना केलेली मारहाण, भाजप खासदाराने मागच्या वर्षी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण कशी काय दुर्लक्षली गेली असेल बुआ? एवढा सात्विक संताप तिथे निघाला नाही? सगळ्याच पक्षात असे मुजोर लोक होते आणि आहेत. पण असं सगळं बाजूला ठेवून एखाद्या पक्षाचा अंधविरोध हि दांभितकताच होय!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अत्रे Sat, 04/01/2017 - 15:02 नवीन
याला कारण म्हणजे शिवसेना अशा ठोकशाहीचे थंड डोक्याने समर्थन करते. त्यांची Ideology च ती आहे. त्यांना मारहाण करून प्रश्न सुटतात असे वाटते. खालचा लेख वाचा http://www.rediff.com/news/column/why-the-shiv-sena-wont-say-sorry/20140725.htm तुम्ही मला सांगा दुसऱ्या किती पक्षात अशा वर्तनाचे
अभिमानाने समर्थन
केले जाते? राडा हा शब्द शिवसेना (आणि मनसे) या पक्षांनबद्दलच का वापरला जातो?
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 15:26 नवीन
दोन वेगवेगळ्या गोष्टींचा संबंध जोडण्याचे काही एक कारण नसावे. ते पक्ष त्यांचे आंदोलन कसे करतात आणि आंदोलनाचा विषय काय असतो हा स्वतंत्र मुद्दा आहे. ते कुठल्या गोष्टीचं समर्थन करतात हे स्पष्ट न करता हे पक्ष असे आहेत तसे आहेत हे म्हणणं म्हणजेच पूर्वग्रह! सध्या विषय चालू आहे तो एका खासदाराच्या वैयक्तिक गोष्टीचा आणि तिथे पक्ष आणून सरसकट त्या पक्षाच्या इतर गोष्टी आणून टीका करणे म्हणजेच आपला पूर्वग्रह कुरवळाने. राहता राहिला प्रश्न त्यांच्या कार्यपद्धतीचा तर यासाठी एक वेगळा धागा आला तर विस्तृतात चर्चा करता येईल. हा देश खूप कायद्यानेच चालला असल्याच्या थाटात आणि सामान्य लोकांना उगाचच असल्या आंदोलनांनी त्रास होतो वगैरे दांभिकतेत जगण्यात मला रस नाही. त्यांनी काय आंदोलन केले आहे, त्या विषयाची व्याप्ती काय, त्यामागचा फायदा काय आणि पक्षाचा त्यामागचा उद्देश काय ह्या गोष्टी मला समर्थन देताना महत्वाच्या वाटतात, पक्ष नाही.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Sat, 04/01/2017 - 16:44 नवीन
आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी माझ्या परीने उत्तर दिले. विस्तृत चर्चा पाहिजे तर बघू कधी वेळ मिळाल्यास. मला तरी असे वाटते पक्षाची ideology जशी असते तसेच बहुतांश लोक त्या पक्षात राहतात. तुम्हाला कायद्याची भाषा हा दांभिकपणा वाटतो पण या गोष्टी developed देशात बऱ्या दिसून येत नाहीत! तिथे असल्या पक्षांना काडीचेही महत्व दिले जाते असे मला वाटत नाही. चूक फक्त पक्षांचीच आहे असे नाही. शेवटी ते पण सामान्य लोकांतूनच वर येतात. या आणि अशा घटनेतून ठोकशाही चे समर्थन करणाऱ्यांची जितकी सार्वजनिक निंदा होईल, जितके जास्त लोकं यांना शिव्या घालतील - यातूनच पुढे जाऊन समाजामध्ये सकारात्मक बदल होईल असे वाटते. भारताला "सुधारीत" देश बनायचे असेल तर या प्रवृत्तीचा पदोपदी विरोधच केला पाहिजे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 17:18 नवीन
हा देश खूप कायद्यानेच चालला असल्याच्या थाटात आणि सामान्य लोकांना उगाचच असल्या आंदोलनांनी त्रास होतो वगैरे दांभिकतेत जगण्यात मला रस नाही. त्यांनी काय आंदोलन केले आहे, त्या विषयाची व्याप्ती काय, त्यामागचा फायदा काय आणि पक्षाचा त्यामागचा उद्देश काय ह्या गोष्टी मला समर्थन देताना महत्वाच्या वाटतात, पक्ष नाही. सामान्य लोकांना आंदोलनांनी त्रास होतो ही दांभिकता!!!!!!!!!!!! वा! वाचून धन्य झालो. दोन उदाहरणे सांगतो. पवारांना नोव्हेंबर २०११ मध्ये दिल्लीत एका शीख व्यक्तीने मारले होते. त्यानिमित्त दुसर्‍या दिवशी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बंदचा आदेश दिला. माझ्या एका मित्राचे औषधांचे दुकान आहे. त्यादिवशी राष्ट्रवादीच्या टोळीच्या मारहाणीच्या व तोडफोडीच्या भीतिने बहुतेकांनी दुकाने बंद ठेवली होती. परंतु औषधांची दुकाने उघडी होती. माझ्या मित्राने देखील त्याचे औषधाचे दुकान उघडे ठेवले होते. साधारण ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीच्या टोळीतील ४०-५० जण दुचाकींवरून घोषणा देत आले. याचे औषधाचे दुकान उघडे बघून त्यांचे टाळके सरकले. दुचाकीवरून १०-१२ जण खाली उतरून दुकानात आले व दुकान बंद ठेवण्यासाठी दमदाटी करू लागले. हे औषधांचे दुकान आहे व शहरातील सर्व औषधांची दुकाने उघडी आहेत असे मित्राने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु टोळीतील एका गुंडाने राष्ट्रवादीच्या झेंड्याची काठी उलटी करून एका जाहिरात फलकावर मारून तो खाली पाडला. दुसर्‍याने माझ्या मित्राची गचांडी पकडली. त्यामुळे त्याचा सदरा फाटला व त्याचा चष्मा खाली पडून फुटला. नाईलाजाने निव्वळ भीतिने त्याला दुकान बंद करावे लागले. दुसरे उदाहरण. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका महिलेचे वडील मुंबईत अत्यवस्थ असल्याचे समजल्यावर ती एशियाडने मुंबईला निघाली. पिंपरीच्या जवळ रस्ता अडविला होता कारण रिपब्लिकन पक्षाच्या कोणाला तरी अटक झाली होती. त्याचा निषेध म्हणून त्याच्या पित्त्यांनी पुणे-मुंबई रस्ता बंद पाडला होता. तब्बल ३-४ तासांच्या खोळंब्यानंतर हळूहळू वाहतूक सुरू झाली. ती महिला खूप उशीरा मुंबईला पोहोचली तेव्हा वडीलांचे निधन होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील होऊन गेल्याचे तिला समजले. या गुंडांमुळे आपल्याला वडीलांचे अंत्यदर्शन सुद्धा घेता न आल्याने तिला अतिशय दु:ख झाले व संतापही आला. अर्थात तुमच्या दाव्यानुसार वरील दोन उदाहरणात त्रास वगैरे झालेला नसून ती निव्वळ दांभिकता होती.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 19:04 नवीन
माझी परत एकदा विनंती आहे, तुम्ही प्रतिसाद नीट वाचत जावा. घाईघाईमध्ये आपल्याला हवा तसा अर्थ काढण्यात काहीही हशील नाही. वरील चर्चा धाग्याला धरून होत नाहीये, पण तुम्ही खेचलाच आहे विषय म्हणून मी उत्तर देतो. शिवसेनेबद्दलच टीका का?-->त्यांची आंदोलने तशीच असतात--> म्हणून त्यांची इमेज खराब-->त्यांची आंदोलने सर्वसामान्यांना त्रासदायक असतात का?--> असं पक्षसापेक्ष आंदोलनांना त्रासदायक ठरवणं दांभिकता आहे. --- साधारण अशी चर्चा झाली. बाकी हे बरे झाले की तुम्ही नेमक्या कोणत्या आंदोलनाबद्दल बोलत आहात ते सांगितले. आता एक काम करा, जरा गुगल करा, भाजप + रास्ता रोको, भाजप + बंद. त्या आंदोलनांनी नसेल ना होत त्रास? म्हणजे शिवसेना/मनसे खराब कारण ते लोकांना त्रास होईल अशी आंदोलने करतात. कोणती आंदोलने करतात ज्यामुळे लोकांना त्रास होतो तर रास्ता रोको, बंद वगैरे . मग भाजप करतं अशी आंदोलने करतं तेव्हा भाजप खराब कसं काय नाही? तर उत्तर म्हणजे ते भाजप आहे. हि दांभिकता आहे असे माझे मत आहे. मी माझी आंदोलनांच्या बाबतीतली भूमिका स्पष्टपणे वर मांडली असतानाही तुम्हाला हवा तसा अर्थ काढण्यात यशस्वी झालात. आता परत एकदा भूमिका वाचा म्हणजे पूर्ण अर्थ लागेल. शिवसेना आणि मनसेच्या कोणत्या आंदोलनांनी लोकांना त्रास झाला म्हणून त्यांना वाईट म्हणायचं हे स्पष्ट करावं आणि मग तशीच आंदोलने दुसऱ्या पक्षांनी केली असतील तर त्याच बेसिसवर त्यांना वाईट न म्हणणे म्हणजे दांभिकता!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 11:48 नवीन
मी माझी आंदोलनांच्या बाबतीतली भूमिका स्पष्टपणे वर मांडली असतानाही तुम्हाला हवा तसा अर्थ काढण्यात यशस्वी झालात. आता परत एकदा भूमिका वाचा म्हणजे पूर्ण अर्थ लागेल. शिवसेना आणि मनसेच्या कोणत्या आंदोलनांनी लोकांना त्रास झाला म्हणून त्यांना वाईट म्हणायचं हे स्पष्ट करावं आणि मग तशीच आंदोलने दुसऱ्या पक्षांनी केली असतील तर त्याच बेसिसवर त्यांना वाईट न म्हणणे म्हणजे दांभिकता! ज्या आंदोलनांनी सर्वसामान्य जनतेला त्रास होतो ती आंदोलने कोणत्याही पक्षांनी केली व कोणत्याही कारणासाठी केली तरी वाईटच आहेत. भाजपने केलेले आंदोलन चांगले व इतरांचे वाईट असे काही नसते. ती आंदोलने सारखीच वाईट आहेत.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
अ
अत्रे Sat, 04/01/2017 - 03:54 नवीन
त्या खो-कथेतील पात्रांप्रमाणेच इथे काही जण दुसऱ्या मितीतून येऊन युक्तिवाद करत आहेत असे वाटते :) असो, सत्यमेव जयते.
ग
गामा पैलवान Sat, 04/01/2017 - 14:01 नवीन
श्रीगुरुजी, १.
कोणत्याही परिस्थितीत मारहाणीचे समर्थन होऊच शकत नाही.
होतं. जो अंगावर चाल करून येत असेल त्याला मारहाण करणं समर्थनीय आहे. गायकवाडांनी चारचार वेळा तेच तेच सांगायला लागल्यामुळे आपली समस्या लिहून काढली. सुकुमारला लिहिता वाचता येत नाही काय? बाकी चार लोकांशी काहीच भांडण उद्भवलं नव्हतं. एकट्या सुकुमारने हात उचलला ना? सुकुमारला कोणी अधिकार दिला? २.
माफी मागायची नसेल तर मग बसा रेल्वेने जात किंवा मग वेगवेगळ्या नावाने बुकिंग करून बुकिंग कॅन्सल होत असलेले बघत बसा.
थोडक्यात काय की बळी तो कान पिळी. आज जनतेला झक मारून एअर इंडियाने जावं लागतं. कोणीही हवाई कर्मचारी प्रवाशाला थोबाडून काढू शकतो. आणि प्रवाशाने फक्त गप्प बसायचं. दाद मागायची सोय नाही. विजय मल्ल्याने किंगफिशर खड्ड्यात घातली म्हणून तो दोषी ठरला. मात्र ज्या प्रफुल्ल पटेलने एअर इंडिया खड्ड्यात घातली तो आज राजरोसपणे हिंडतो आहे. कारण एअर इंडियाकडे फुकट पैशांचा स्रोत आहे. शेवटी बळी तो कान पिळी हेच खरं, नाहीका? आ.न., -गा.पै.
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 15:41 नवीन
मलाही उत्सुकता लागली आहे की विमान कंपनीचा हा उद्दामपणा किती दिवस चालतो ते पाहण्याची. आज ना उद्या त्यांना हि बंदी मागे घ्यावीच लागणार आहे. असा उद्दामपणा ते कोणाशीही करू शकतात म्हणूनच शिवसेनेचा सभागृहातूनच ह्या गोष्टीचा निकाल लावण्याचा प्रयत्न चालू आहे.यासाठी कायद्यातही योग्य ती तरतूद करण्याचा प्रयत्न दिसतोय. यूट्यूबवर नुसते या विमान कंपन्यांच्या माजाचे विडिओज शोधून बघा, तिडीक येते डोक्यात.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 17:26 नवीन
मलाही उत्सुकता लागली आहे की विमान कंपनीचा हा उद्दामपणा किती दिवस चालतो ते पाहण्याची. आज ना उद्या त्यांना हि बंदी मागे घ्यावीच लागणार आहे. असा उद्दामपणा ते कोणाशीही करू शकतात म्हणूनच शिवसेनेचा सभागृहातूनच ह्या गोष्टीचा निकाल लावण्याचा प्रयत्न चालू आहे.यासाठी कायद्यातही योग्य ती तरतूद करण्याचा प्रयत्न दिसतोय. गायकवाडला स्वतःच्या पक्षातूनच फारसे समर्थन नाही. मग इतर पक्ष काय कप्पाळ समर्थन देणार? इतर सर्व पक्ष गायकवाडची मजा बघत आहेत. गायकवाडची सर्व बाजू लंगडी असल्याने तो काहीही करू शकत नाही. गायकवाडने सरकारी कर्मचार्‍याला केलेली मारहाण व विमानाला केलेला खोळंबा हा फौजदारी गुन्हा आहे व तो संसदेच्या बाहेर घडलेला आहे. त्यामुळे संसद त्याबाबतीत हस्तक्षेप करू शकत नाही व खासदार शिवसेनेचा असल्याने तसा हस्तक्षेप करण्याची कोणत्याही पक्षाची इच्छा नाही. यूट्यूबवर नुसते या विमान कंपन्यांच्या माजाचे विडिओज शोधून बघा, तिडीक येते डोक्यात. विषयांतर
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 19:15 नवीन
ते शिवसेनेचे नेमके कशाला समर्थन आहे आणि कशाला नाही ह्याची तुम्हाला माहिती कुठून मिळाली त्याचे सोर्स सांगितले तर बरे होईल. खासदारांवर त्यांनी केलेल्या मारहाणीबद्दल कारवाई होण्यात शिवसेना हस्तक्षेप करत नसेल तर उत्तमच की! शिवसेनेचे कौतुक करायला हवे याबाबतीत. आणि त्यांच्या बंदीबाबत शिवसेना त्यांच्यासोबत नाही अशी तुमची माहिती असेल तर त्याचा खात्रीलायक सोर्स सांगा! बाकी, शिवसेना खासदारांसोबत राहिली म्हणजे खासदारांची बाजू चांगली नाहीतर लंगडी हे भारी लॉजिक आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 11:53 नवीन
लोकसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण दाखवितात. शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार असले तरी गायकवाडांवरील बंदी रद्द करा अशा घोषणा देऊन अध्यक्षांच्या आसनासमोर उतरलेले फक्त ७ खासदार होते. बाकीचे कोठे होते? सुमित्रा महाजनांनी त्यांना कडक शब्दात झापल्यानंतर ते परत आपल्या आसनावर गेले. मंत्रीमंडळात मंत्री असलेल्या अनंत गीतेंनी तर या विषयावर एक शब्दही बोललेला नाही. अध्यक्षांना भेटायला शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळात फक्त ६-७ खासदार होते. बाकीचे कोठे गेले? संजय राऊत रोज वाहिन्यांना बाईट देऊन पूर्णपणे अतार्किक तारे तोडत असले तरी उधोजी आणि आदूबाळ गप्पच आहेत.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 04/02/2017 - 12:52 नवीन
कोणी कोणत्या मुद्द्यावर बोलावे याचे पक्षसंकेत त्यांनी पाळले तर त्यावर कोणाला काही प्रॉब्लेम असू शकतो का? २१ च्या २१ खासदारांनी गोंधळ घातला म्हणजे त्या सगळ्यांचा पाठिंबा हे तुमचे अजब तर्कट म्हणजे उगाच विरोधाला विरोध काहीही असे आहे. लोकसभेचे, विधानसभेचे किंवा आणखीही कुठले कामकाज जरा जवळून पहा म्हणजे बाकीचे कोठे होते हा प्रश्न पडणार नाही. कधी विधानसभेत तरी वेलमध्ये 100 आमदार बघितले आहेत का? शिष्टमंडळ हे प्रातिनिधिक असू शकत नाही का? कि अध्यक्ष्यांसमोर जाऊन मतदान करायचे होते पाठिंब्याबद्दल? त्यांचा पक्ष म्हणून त्यांना काय करायचेत ते करू देत कि, शिवसेना म्हणून उगाच प्रत्येक गोष्टीत पक्ष आणण्यात काय फायदा?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 16:56 नवीन
शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, खासदार व दस्तुरखुद्द अध्यक्ष या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत. यातूनच काय समजायचं ते समजा.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 04/02/2017 - 17:53 नवीन
राष्ट्रीय स्तरावर चर्चा करण्यासारखा विषय नसतानाही तो चर्चिला जावा आणि तोही एकांगी अशी अपेक्षा ठेवली जाते यातुनच काय समजायाचे समजते, तुम्हीही समजायचं ते समजून घ्या!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 19:18 नवीन
विषयांतर
बरोबर आहे हे विषयांतरच आहे कारण तुमच्यासाठी विमान कंपन्यांची मुजोरी हा विषयच नसून संबंधित खासदार हा शिवसेनेचा आहे एवढाच विषय आहे. विमान कंपनीचा कर्मचारी मुजोरी करूच शकत नाही हा पूर्वग्रह दूर व्हावा म्हणून तो सल्ला होता.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 11:56 नवीन
या धाग्याचा विषय गायकवाडांनी मूर्खासारख्या कारणावरून एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला केलेली मारहाण व मारहाणीचे उन्मत्तपणे केलेले समर्थन हा आहे. विमानकंपन्यांची सेवा हा एक व्यापक विषय आहे व तो या धाग्याचा विषय नसल्याने त्याविषयी बोलणे म्हणजे विषयांतर आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 04/02/2017 - 12:54 नवीन
तुम्ही मुळात "कारण" कधी समजावून घेतलेलेच नाही, त्यामुळे त्याला मूर्खासारखे म्हणणे अपेक्षितच आहे. विषय समजावून घेतला नसल्यामुळेच विषयांतर वाटणे साहजिकच आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 16:58 नवीन
बरं. ठीक आहे. तुम्ही सांगा तक्रारीचे काय कारण होते ते.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 17:22 नवीन
होतं. जो अंगावर चाल करून येत असेल त्याला मारहाण करणं समर्थनीय आहे. गायकवाडांनी चारचार वेळा तेच तेच सांगायला लागल्यामुळे आपली समस्या लिहून काढली. सुकुमारला लिहिता वाचता येत नाही काय? बाकी चार लोकांशी काहीच भांडण उद्भवलं नव्हतं. एकट्या सुकुमारने हात उचलला ना? सुकुमारला कोणी अधिकार दिला? सुकुमारने हात उचलला? कधी? चित्रफितीत तर तसे काहीच दिसत नाही. सुकुमारवर हात उचलण्याचा गायकवाडला कोणी अधिकार दिला? मुळात समस्या नसतानासुद्धा गायकवाडला तमाशा करण्याचे काय कारण व अधिकार होता? थोडक्यात काय की बळी तो कान पिळी. आज जनतेला झक मारून एअर इंडियाने जावं लागतं. कोणीही हवाई कर्मचारी प्रवाशाला थोबाडून काढू शकतो. आणि प्रवाशाने फक्त गप्प बसायचं. दाद मागायची सोय नाही. कोणत्या हवाई कर्मचार्‍याने कोणत्या प्रवाशाला थोबाडले आहे? विजय मल्ल्याने किंगफिशर खड्ड्यात घातली म्हणून तो दोषी ठरला. मात्र ज्या प्रफुल्ल पटेलने एअर इंडिया खड्ड्यात घातली तो आज राजरोसपणे हिंडतो आहे. कारण एअर इंडियाकडे फुकट पैशांचा स्रोत आहे. शेवटी बळी तो कान पिळी हेच खरं, नाहीका? विषयांतर
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
उ
उपेक्षित Sat, 04/01/2017 - 16:26 नवीन
खासदार गायकवाड यांनी मारहाण केली हे निश्चितच चूक आहे पण म्हणून एयर इंडियाच्या सुकुमार नामक महाभागाची काहीच चूक नाही असेही नाही शिक्षा झाली तर दोघांना झाली पाहिजे तोच खरा न्याय असेल.
उ
उपेक्षित Sat, 04/01/2017 - 18:15 नवीन
माझी संपादक मंडळाला एक कळकळीची विनंती आहे येथील काही ID वारंवार एखादा मुद्दा भाजप विरुद्ध सेना अशा track वर आणून वाट्टेल तशी चर्चा करतात (अगदी अभ्यासू ID सुद्धा) आता खरच कंटाळा आला आहे या गोष्टींचा. या असल्या वांझोट्या चर्चा पहिल्या पानावर आणि जयंत काका वगेरे लेखकांचे लेख/ कथा कुठेतरी ३/४ थ्या पानावर जातात. कृपया थोडातरी चाप लावा या लोकांवर.
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 19:26 नवीन
अत्यंत खेदाने नमूद करतो, हा अत्यंत अकारण आणि हिणकस शेरा वाटला. चर्चा हि चर्चा आहे. ती मिपाच्या धोरणाला धरून नसेल तर संपादक मंडळी नक्कीच लक्ष घालतात. राहता राहिला प्रश्न तुम्हाला आवडते लेख पहिल्या पानावरुन बघण्याचा, तर ते "एक्सट्रा क्लिक" इतकं सोपं आहे. हे मलाच लिहिलंय असं गृहीत धरून नाही, तर कोणालाही असं का लिहावं म्हणून प्रतिसाद दिला . पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.
↩ प्रतिसाद: उपेक्षित
उ
उपेक्षित Sun, 04/02/2017 - 13:20 नवीन
प्रसाद भाऊ इतके मनाला नका लाऊन घेऊ, तीच तीच चर्चा आणि तेच तेच नेहमीचे खेळाडू बघून आता थोडे थांबा असे म्हणावेसे वाटले बाकी काही नाही. तुम्ही चर्चा निट पाहिली तर असे ध्यानात येईल कि मोजके ४/५ नेहमीचे खेळाडू फ़क़्त खेळत असतात बाकी सदस्य जास्ती सहभागी नसतात so तेच नेहमीचे सदस्य तेच मुद्दे वारंवार उगाळत बसतात (नव्या बाटलीत जुनीच दारू ) असो मला जे वाटले ते स्पष्टपणे लिहिले कुणालाही दुखावण्याचा यात अजिबात हेतू नव्हता, नाहीये आणि नसणारे. बाकी ज्याचे त्याला कळतेच.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ग
गामा पैलवान Sat, 04/01/2017 - 18:27 नवीन
श्रीगुरुजी,
सुकुमारने हात उचलला? कधी? चित्रफितीत तर तसे काहीच दिसत नाही.
या चित्रफितीत मुलाखतकार म्हणतोय की 'हात से मारा' : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8 खासदारांचं म्हणणं आहे की सुकुमारने शिवीगाळ केली. खासदारांचा वृत्तांत इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=ssZlfXZC8_8 आ.न., -गा.पै.
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 12:17 नवीन
पैलवान मामा, तुम्हाला चित्रफीत नीट समजली नाही का मुद्दाम वेड पांघरताय? पहिल्या चित्रफितीत सुकुमारने मारहाण केली असा अजिबात उल्लेख नसून गायकवाडच पत्रकाराला विचारतोय की "मी त्याला कसे मारले असे सुकुमार सांगतोय? हाताने का पायाने?" यावर तो पत्रकार म्हणाला की "तो म्हणतोय हाताने मारले". यावर गायकवाड प्रौढीने सांगतो की "हाताने नाही, मी चपलेने मारलंय." इथे आपण सुकुमारला कसं मारलंय हे अत्यंत अभिमानाने गायकवाड सांगतोय. दुसर्‍या चित्रफितीत तर गायकवाड स्वतःच अगदी स्पष्टपणे काय घडलंय ते सांगतोय. विमान दिल्लीला पोहोचल्यावर तो हवाईसुंदरीला तक्रारपुस्तक आणायला सांगतो. मला जनता वर्गात बसायला लावल्याची तक्रार लिहायची आहे असे तो सांगतो. त्याला तिने तक्रारपुस्तक दिल्यानंतर तो त्यात आपली तक्रार लिहून देतो (गायकवाडला तक्रारपुस्तक देण्यात आले नव्हते हा काही माध्यमांचा दावा खोटा दिसतो कारण इथे गायकवाड स्वतःच सांगतोय की मला तक्रारपुस्तक मिळाल्यानंतर मी त्यात तक्रार लिहून दिली). तक्रार लिहिल्यानंतरसुद्धा तो आसनावर बसून राहतो. एअर इंडियाच्या सीएमडीला (चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर) इथे बोलवा. त्यांच्या कानावर तक्रार घातल्याशिवाय मी इथून हलणार नाही असा अत्यंत मूर्खासारखा आग्रह धरून तो आसनावरच बसून राहतो. फक्त जनता क्लासचीच आसने असलेल्या विमानात व्यवसाय वर्गाची आसने का नाहीत ही तक्रार याला थेट सीएमडी कडे करायची होती! तो आसनावरून उठत नाही हे पाहून वरीष्ठ कर्मचारी सुकुमार तिथे येतो. तो याला उठायला सांगतो. आपण खासदार आहोत असे गायकवाड सांगतो. मग सुकुमार त्याला ऐकवतो की तू खासदार असलास म्हणून काय झालं. मी तुझी मोदींकडे तक्रार करीन. हे ऐकल्यावर गायकवाडची सटकते. तो रागाने सांगतो की तुझ्याकडून ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही. मी शिवसेनेचा खासदार आहे. असे म्हणून तो पायातले सँडल काढून २५ वेळा सुकुमारला मारतो. हे सर्व गायकवाडने स्वतःच दुसर्‍या चित्रफितीत सांगितले आहे. एकतर पूर्ण जनता वर्गाची आसने असलेल्या विमानातून प्रवास पूर्ण करून नंतर मला व्यवसाय वर्गाचे आसन का दिले नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा आहे. दुसरं म्हणजे तक्रारपुस्तकात अधिकृतरित्या तक्रार लिहून दिल्यानंतर सुद्धा आसनातच बसून राहून इतरांना खोळंबा करणे हा नालायकपणा आहे. नंतर थेट सीमडीला बोलवा, ते आल्याशिवाय मी बाहेर येणार नाही हा अत्यंत अडेलतट्टूपणा आहे आणि शेवटी मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा खासदार आहे अशी बढाई मारून चपलेने कर्मचार्‍याला मारहाण करणे हा अत्यंत उन्मत्तपणा आहे. सुकुमार कदाचित आवाज चढवून बोलला असेल, परंतु खासदरकीचा माज दाखवून अडेलतट्टूप्रमाणे विमानाला खोळंबा करणार्‍याशी असे बोलणे चूक नाही. आणि त्याला उत्तर म्हणून मारहाण करणे हे जातिवंत गुंडगिरीचे लक्षण आहे. एकंदरीत शिवसेनेचे नेते म्हणजे 'आधीच मर्कट आणि त्यात मद्यप्राशन' अशी अवस्था आहे.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 04/02/2017 - 13:03 नवीन
शेवटी पत्रकाराला कर्मचाऱ्याने हाताने मारले असे सांगितल्याचे तुम्हाला चित्रफितीत दिसल्याचे पाहून आनंद वाटला (त्याने हातसे मारा म्हटले, हातात चप्पल होती हे कधी नाकारले वगैरे युक्तिवाद येण्याची शक्यता नाकारता येत नाही :):)). गाडी थोडी तरी वास्तविकतेकडे सरकली. बाकी चपलेने मार खाल्ला असता तर कर्मचार्याने हाताने मारले असे का सांगितले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला नसावा, अपेक्षितच आहे. साधे उपरोधिक बोलणेही विडिओ अवेलेबाल असतानाही न समजने दुर्दैवी आहे. हिंदी-इंग्रजी माध्यमे असे छोट्या छोट्या वाक्यात विभागून स्वतःला हवा तसा अर्थ काढतात आणि स्वतःची पोळी भाजून घेतात त्यापेक्षा हे काही वेगळे नाही.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संजय पाटिल Sun, 04/02/2017 - 13:18 नवीन
सुकूमार्ने स्वतःच सांगीतलय चप्पलने मारलय म्हणून... https://www.youtube.com/watch?v=6UbLVVL3qxg
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
संजय पाटिल Sun, 04/02/2017 - 13:20 नवीन
*सुकूमारनी
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 04/02/2017 - 15:59 नवीन
त्यांनी नंतर दिलेल्या प्रतिक्रियेत काय म्हटले हा मुद्दा नाही. त्यांनी पत्रकाराला का सांगितले की हातसे मारा? या विडिओत तरी स्वतः काय बोलल्याने भांडण सुरु झाले हे सांगितल्याचे दिसत नाही. शिवाय घटनेनंतरच्या प्रतिक्रियेत देखील हे साहेब एकेरीतच उल्लेख चालवत आहेत. तिथे विमानात काय वेगळे काय केले असेल याचा अंदाज येऊ शकतो. शिवाय हवाईसुंदरीच्या प्रतिक्रियेत "उन्होने चप्पल हाथ मे ली तो मै बीच मी पडी और उन्हे मारनसे रोका" असेच म्हटले आहे. पुन्हा अधोरेखित करतो, खासदारांना त्यांनी काय केलेय त्याची शिक्षा मिळायला हवी, काय बोलले त्याची नाही. शिवाय ते करताना विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याचा उद्दामपणा अजिबात दुर्लक्षिला जाऊ नये.
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 17:06 नवीन
खाली संजय पाटील यांनी दिलेली चित्रफीत बघा. आपल्याला चपलेने मारले हे सुकुमार स्वतः सांगत आहे. आणि उपरोध बिपरोध इ. गोष्टी शिवसेनेच्या स्कोपमध्ये नाहीत. जे थेट अंगावर येऊन गचांडी धरून मारहाण सुरू करतात, त्यांच्यासाठी उपरोध त्यांच्या कुवतीपलिकडचा आहे. गायकवाड सांगतोय त्यात उपरोध वगैरे काही नव्हता. त्यात निव्वळ माज आणि आपण काहीतरी प्रचंड पराक्रम गाजवून आलोय हा अभिमान होता.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ग
गामा पैलवान Sun, 04/02/2017 - 15:00 नवीन
श्रीगुरुजी, १.
एअर इंडियाच्या सीएमडीला (चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर) इथे बोलवा. त्यांच्या कानावर तक्रार घातल्याशिवाय मी इथून हलणार नाही असा अत्यंत मूर्खासारखा आग्रह धरून तो आसनावरच बसून राहतो.
नेमक्या याच कारणासाठी माझा रवींद्र गायकवाडांना पाठींबा आहे. गायकवाडांनी तिकीट आगाऊ आरक्षित करूनही एअर इंडियाने त्यांना वेळच्या वेळी सूचन का दिली नाही? गायकवाड दुसऱ्या विमानाने यायला तयार होते. प्रवाशाची गैरसोय करणे कोणत्या तत्त्वांत बसतं? की एअर इंडियाचा तोटा झाल्याखेरीज त्यांना जाग येणार नाहीये? २.
मग सुकुमार त्याला ऐकवतो की तू खासदार असलास म्हणून काय झालं. मी तुझी मोदींकडे तक्रार करीन. हे ऐकल्यावर गायकवाडची सटकते. तो रागाने सांगतो की तुझ्याकडून ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही. मी शिवसेनेचा खासदार आहे. असे म्हणून तो पायातले सँडल काढून २५ वेळा सुकुमारला मारतो.
लायकीप्रमाणे सुकुमारला वागवाल्याबद्दल प्राध्यापकमहाशयांचं पुनश्च अभिनंदन! ३.
नंतर थेट सीमडीला बोलवा, ते आल्याशिवाय मी बाहेर येणार नाही हा अत्यंत अडेलतट्टूपणा आहे
आहेच मुळी. मात्र असा अडेलतट्टूपणा केल्याशिवाय एअर इंडियाला जाग येत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. ४.
शेवटी मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा खासदार आहे अशी बढाई मारून चपलेने कर्मचार्‍याला मारहाण करणे हा अत्यंत उन्मत्तपणा आहे.
याच्याशी मात्र असहमत. उन्मत्तपणा सुकुमारने दाखवला आहे. मोदींना ओढायची काय गरज होती? शिवीगाळ करायची काय गरज होती? त्याऐवजी पोलिसांना बोलवायचं होतं. असो. या प्रकरणातल्या दोन गोष्टी खटकल्या. १. प्रा. गायकवाडांवर विमानबंदी लादली गेली. परंतु लोकहिताची कामं केल्यावर उलटा प्रसाद मिळणं नवीन नाही. २. सीएमडी विमानात आला नाही. तो आला असता तर गायकवाडांनी त्यालाही बडवला असता. यातून अधिक चांगली निष्पत्ती झाली असती. पण ठीकाय. ड्यूटी म्यानेजर तर ड्यूटी म्यानेजर! तूर्तास दुधाची तहान ताकावर भागवतो. जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे. जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल. आ.न., -गा.पै.
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 16:53 नवीन
नेमक्या याच कारणासाठी माझा रवींद्र गायकवाडांना पाठींबा आहे. गायकवाडांनी तिकीट आगाऊ आरक्षित करूनही एअर इंडियाने त्यांना वेळच्या वेळी सूचन का दिली नाही? गायकवाड दुसऱ्या विमानाने यायला तयार होते. प्रवाशाची गैरसोय करणे कोणत्या तत्त्वांत बसतं? की एअर इंडियाचा तोटा झाल्याखेरीज त्यांना जाग येणार नाहीये? गायकवाड दुसर्‍या विमानाने जायला तयार होते हे कोणी सांगितलं? तयार होते तर का गेले नाहीत? लायकीप्रमाणे सुकुमारला वागवाल्याबद्दल प्राध्यापकमहाशयांचं पुनश्च अभिनंदन! अगदी याच उद्दाम वृत्तीमुळे बहुसंख्य राजकारण्यांचा जनता तिरस्कार करते. लायकी नसतानासुद्धा विमानाच्या व्यवसायवर्गाची सवलत दिल्यानंतर हे असेच वागणार. आहेच मुळी. मात्र असा अडेलतट्टूपणा केल्याशिवाय एअर इंडियाला जाग येत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. व्यवसाय वर्ग नसलेल्या विमानात व्यवसाय वर्ग का नाही याबद्दल प्रवास संपल्यानंतर तक्रार करणे हा मूर्खपणा होता व त्यानंतर थेट विमानकंपनीच्या अध्यक्षाला बोलाविल्याशिवाय मी उठणार नाही असा हट्ट धरणे हा महामूर्खपणा होता. अशी मागणी करणे म्हणजे संगणक वापरताना विंडोजमध्ये एखादी समस्या आल्यावर थेट बिल गेट्सला भेटण्याचा हट्ट धरण्यासारखे आहे. याच्याशी मात्र असहमत. उन्मत्तपणा सुकुमारने दाखवला आहे. मोदींना ओढायची काय गरज होती? शिवीगाळ करायची काय गरज होती? त्याऐवजी पोलिसांना बोलवायचं होतं. विमानात व्यवसाय वर्ग नाही हे माहित असूनसुद्धा प्रवास पूर्ण करणे व प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे हाच मूळ उद्दामपणा होता. नंतर थेट सीएमडीला बोलाविण्याचा हट्ट धरणे व इतरांचा खोळंबा करणे हा त्याहून जास्त मोठा उद्दामपणा. सुकुमारने शिवीगाळ केलेली नाही. गायकवाडच मूर्खासारखं वागत होता. मोदींचे नाव घेण्यामागे जे कारण आहे ते मी पूर्वीच सांगितले आहे आणि ते योग्यच होते. या प्रकरणातल्या दोन गोष्टी खटकल्या. १. प्रा. गायकवाडांवर विमानबंदी लादली गेली. परंतु लोकहिताची कामं केल्यावर उलटा प्रसाद मिळणं नवीन नाही. कसली डोंबलाची लोकहिताची कामे? विमान कर्मचार्‍याला चपलेने मारणे, इतर प्रवाशांचा खोळंबा करणे ही लोकहिताची कामे नसून समाजघातक कामे आहेत. २. सीएमडी विमानात आला नाही. तो आला असता तर गायकवाडांनी त्यालाही बडवला असता. यातून अधिक चांगली निष्पत्ती झाली असती. पण ठीकाय. ड्यूटी म्यानेजर तर ड्यूटी म्यानेजर! तूर्तास दुधाची तहान ताकावर भागवतो. असल्या फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडी येत नसतात. बाकी बडविण्याचे समर्थन वाचून अजिबात आश्चर्य वाटत नाही. हीच विकृती शिवसेनेने आजवर जोपासली आहे. जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे. विमानबंदीस माझा पूर्ण पाठिंबा आहे. विमानातून प्रवास करण्याची यांची लायकी नाही. अशांनी फक्त एस टी च्या लाल डब्यातून प्रवास करावा. जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल. कसली डोंबलाची तक्रार? विमानात व्यवसाय वर्गच नसताना मला व्यवसाय वर्गात का बसविले नाही अशी तक्रार करणे तद्दन मूर्खपणा आहे. अशी तक्रार करणे म्हणजे जैन पावभाजी खाल्ल्यानंतर त्यात कांदा का नव्हता अशी तक्रार करून पावभाजीवाल्याला बडविण्यासारखे आहे. जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे. जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 04/02/2017 - 22:27 नवीन
श्रीगुरुजी, १.
गायकवाड दुसर्‍या विमानाने जायला तयार होते हे कोणी सांगितलं? तयार होते तर का गेले नाहीत?
गायकवाड दुसर्‍या विमानाने जायला तयार होते हे गायकवाडांनी सांगितलं. कृपया इथे पहा : https://www.youtube.com/watch?v=ssZlfXZC8_8 मात्र इतर विमानाची माहिती वेळेत मिळणं अपेक्षित होतं. एक वर्षापासून ही जनताफेरी होती. खासदारांनी व्यवसायवर्गाचं तिकीट वर्षभर आगाऊ आरक्षित केलेलं असतांना हा बदल केल्यानंतर एअर इंडियाने त्यांना ही माहिती पुरवायला हवी होती. ऐन वेळेस बदल कळवल्याने त्यांना निरुपायाने त्याच फेरीने जावं लागलं. २.
लायकी नसतानासुद्धा विमानाच्या व्यवसायवर्गाची सवलत दिल्यानंतर हे असेच वागणार.
लायक लोकं असं आजीबात वागंत नाहीत. म्हणून तर एअर इंडिया डोक्यावर चढून बसलेत. त्यामुळेच नालायकांना लायकी दाखवून द्यावी लागते. ३.
व्यवसाय वर्ग नसलेल्या विमानात व्यवसाय वर्ग का नाही याबद्दल प्रवास संपल्यानंतर तक्रार करणे हा मूर्खपणा होता व त्यानंतर थेट विमानकंपनीच्या अध्यक्षाला बोलाविल्याशिवाय मी उठणार नाही असा हट्ट धरणे हा महामूर्खपणा होता.
आजिबात नाही. नाक दाबलं की तोंड उघडतं. ४.
अशी मागणी करणे म्हणजे संगणक वापरताना विंडोजमध्ये एखादी समस्या आल्यावर थेट बिल गेट्सला भेटण्याचा हट्ट धरण्यासारखे आहे.
म्हणूनंच विंडोज ह्याक केली जाते. लिनक्समध्ये अशी वेळ कधीच येत नाही. ५.
विमानात व्यवसाय वर्ग नाही हे माहित असूनसुद्धा प्रवास पूर्ण करणे व प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे हाच मूळ उद्दामपणा होता.
पूर्वसूचना न देता व्यावासाय्वर्ग रद्द करणे हा माझ्या मते उद्दामपणा आहे. ६.
नंतर थेट सीएमडीला बोलाविण्याचा हट्ट धरणे व इतरांचा खोळंबा करणे हा त्याहून जास्त मोठा उद्दामपणा.
एअर इंडियाकडे बक्कळ विमानं आहेत. कोणाचाही खोळंबा व्हायला नको. ७.
सुकुमारने शिवीगाळ केलेली नाही. गायकवाडच मूर्खासारखं वागत होता. मोदींचे नाव घेण्यामागे जे कारण आहे ते मी पूर्वीच सांगितले आहे आणि ते योग्यच होते.
सुकुमारने शिवीगाळ केली नाही हे कशावरून म्हणता तुम्ही? ८.
कसली डोंबलाची लोकहिताची कामे? विमान कर्मचार्‍याला चपलेने मारणे, इतर प्रवाशांचा खोळंबा करणे ही लोकहिताची कामे नसून समाजघातक कामे आहेत.
वरवर पाहता तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. ही अपवादात्मक परिस्थिती उद्भवण्यास सुकुमार आणि एअर इंडिया जबाबदार आहेत. ९.
असल्या फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडी येत नसतात. बाकी बडविण्याचे समर्थन वाचून अजिबात आश्चर्य वाटत नाही. हीच विकृती शिवसेनेने आजवर जोपासली आहे.
माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडीला यायला भाग पाडलं की एअर इंडियाच्या सेवेचा दर्जा आपोआप सुधारेल. बाकी, बडवण्याचं म्हणालात्त तर ती विकृती आहेच. शंकाच नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. अशी अपवादात्मक परिस्थिती उद्भवणारच नाही याची काळजी एअर इंडियाने सेवेचा दर्जा उंचावून घेतली पाहिजे. १०.
विमानातून प्रवास करण्याची यांची लायकी नाही. अशांनी फक्त एस टी च्या लाल डब्यातून प्रवास करावा.
एअर इंडियाची विमानं उडवायची लायकी नाही. त्यांनी फक्त खेळण्यातली विमानं उडववीत. ते तरी त्यांना जमेल का याची शंकाच आहे. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/03/2017 - 09:38 नवीन
आजिबात नाही. नाक दाबलं की तोंड उघडतं. इथे गायकवाड पक्षपरंपरेला अनुसरून एअर इंडियाचे नाक दाबायला गेले. त्यांना वाटले की नाक दाबले की तोंड उघडेल. प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्याच ** दाबल्या गेल्या व आता त्यांच्यावरच लपून बसायची वेळ आली आहे. दिल्लीला जाण्यासाठी नावाचे स्पेलिंग बदलून, ठिकाण बदलून, विमान कंपनी बदलून तिकीट काढायचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सर्व विमानकंपन्यांनी एकजूट दाखवून त्यांची मग्रुरी मोडून काढली आहे. पूर्वसूचना न देता व्यावासाय्वर्ग रद्द करणे हा माझ्या मते उद्दामपणा आहे. विमानात व्यवसायवर्ग नव्हतात तो रद्द कोटून करणार? एअर इंडियाकडे बक्कळ विमानं आहेत. कोणाचाही खोळंबा व्हायला नको. विमानं म्हणजे नाक्यावरच्या रिक्षा नव्हेत. एक गेली तर लगेच दुसरी मिळते असं विमानाचं नसतं. एक विमान एखाद्या प्रवाशाच्या मूर्खपणामुळे खोळंबलं तर लगेच दुसरं विमान उभं करा असं शक्य नसतं. त्यापेक्षा भविष्यात त्या मूर्खाला प्रवासबंदी करून तो परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे सोपे असते. माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडीला यायला भाग पाडलं की एअर इंडियाच्या सेवेचा दर्जा आपोआप सुधारेल. बाकी, बडवण्याचं म्हणालात्त तर ती विकृती आहेच. शंकाच नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. अशी अपवादात्मक परिस्थिती उद्भवणारच नाही याची काळजी एअर इंडियाने सेवेचा दर्जा उंचावून घेतली पाहिजे. दांडगाई वगैरे करून सेवेचा दर्जा सुधारत नसतो. त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया वापरावी लागते. दांडगाई केली तर दांडगाई करणार्‍याविरूद्ध जनमत जाते. मुळात ज्या मुद्द्यावरून गायकवाडांनी मारहाण करून दांडगाई केली तो मुद्दाच मूर्खपणाचा होता. मुगायकवाडांनी योग्य त्या कायदेशीर मार्गाने मुद्दा उपस्थित केला असता तर दाद लागू शकली असती. थेट कायदा हातात घेतल्याने जनतेला एअर इंडीयाऐवजी गायकवाडांच्या मग्रूरीचाच संताप आला आहे व त्यांना विमानप्रवास बंदी केल्याचा आनंद झाला आहे. एअर इंडियाची विमानं उडवायची लायकी नाही. त्यांनी फक्त खेळण्यातली विमानं उडववीत. ते तरी त्यांना जमेल का याची शंकाच आहे. जर एअर इंडीयाची विमाने उडविण्याची लायकी नसेल तर गायकवाडांनी एअर इंडियाने प्रवास टाळायला हवा होता. बंदी घालूनसुद्धा सुरवातीचे काही दिवस त्यांनी पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाचेच बुकिंग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांच्यात कणभर स्वाभिमान असता (त्यांचा पक्ष जातायेता, दिवसरात्र स्वाभिमानाच्या गफ्फा हाणत असतो), तरी त्यांनी आयुष्यात परत एअर इंडियाच्या विमानात पाऊल ठेवले नसते.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 04/03/2017 - 14:53 नवीन
श्रीगुरुजी, १.
परंतु सर्व विमानकंपन्यांनी एकजूट दाखवून त्यांची मग्रुरी मोडून काढली आहे.
प्रा. गायकवाडांना त्रास सहन करावा लागेल हे उघड आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेकांनी हालापेष्टा सहन केल्या तसाच हा त्याग आहे. २.
त्यापेक्षा भविष्यात त्या मूर्खाला प्रवासबंदी करून तो परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे सोपे असते.
मान्य. कारण की, त्यापेक्षा भविष्यात एअर इंडियाला उड्डाणबंदी करून ते परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे कठीण असते. ३.
दांडगाई वगैरे करून सेवेचा दर्जा सुधारत नसतो. त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया वापरावी लागते.
पण सेवेचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष वेधता येतं. ४.
थेट कायदा हातात घेतल्याने जनतेला एअर इंडीयाऐवजी गायकवाडांच्या मग्रूरीचाच संताप आला आहे व त्यांना विमानप्रवास बंदी केल्याचा आनंद झाला आहे.
इच्छा असूनही थेट कायदा हातात घ्यायची हिंमत नसल्याने कित्येक लोकं हात चोळंत बसतात. त्यांना प्रा. गायकवाडांवरील बंदीने आनंद झालेला नाही. ५.
जर एअर इंडीयाची विमाने उडविण्याची लायकी नसेल तर गायकवाडांनी एअर इंडियाने प्रवास टाळायला हवा होता.
मान्य. मात्र तिकीट सरकारी कोट्यातून मिळालेलं होतं. म्हणून एअर इंडियाचा सरकारी पाठींबा काढून घेतला पाहिजे. ६.
त्यांच्यात कणभर स्वाभिमान असता (त्यांचा पक्ष जातायेता, दिवसरात्र स्वाभिमानाच्या गफ्फा हाणत असतो), तरी त्यांनी आयुष्यात परत एअर इंडियाच्या विमानात पाऊल ठेवले नसते.
यांत स्वाभिमानाचा संबंध नसून हा सुविधेचा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुविधाहीन प्रवासामुळेच हे प्रकरण उद्भवलं आहे. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 04/03/2017 - 17:31 नवीन
सर्वच प्रतिसाद वाचून खूप हसायला आलं.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Sun, 04/02/2017 - 17:12 नवीन
एअर इंडिया व इतर भारतीय विमान कंपन्यांना धडा शिकविण्याची संधी गायकवाडांना अजूनही आहे. त्यांना भारतीय विमान कंपन्यांनी बॅन केलं असलं तरी परदेशी विमान कंपन्यांनी बॅन केलेलं नाही. ते आता दिल्लीला जाण्यासाठी एखाया परदेशी विमान कंपनीतून प्रवास करू शकतात. उदाहरणार्थ, ते मुंबईहून ब्रिटिश एअरवेज च्या विमानाने लंडनला जाऊन तिथून ब्रिटीश एअरवेजची लंडन-दिल्ली ही फ्लाईट घेऊन दिल्लीला येऊ शकतात. असे केले तर भारतीय विमान कंपन्यांची चांगली खोड मोडेल व शिवसेनेला विजयोत्सव साजरा करता येईल. अर्थात लंडनला पोहोचल्यावर ब्रिटिश एअरवेजच्या कर्मचार्‍याला मारहाण वगैरे केली किंवा ब्रिटीश एअरवेजच्या अध्यक्षाला इथे बोलाविल्याशिवाय मी विमानातून खाली उतरणारच नाही असा 'शिव'हट्ट धरला तर पुढची १०-१२ वर्षे लंडनच्या तुरूंगात जाऊन पडावं लागेल.
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा