Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अ
अत्रे
Mon, 03/27/2017 - 07:34
🗣 592 प्रतिसाद
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
94896 वाचन

💬 प्रतिसाद (592)
श
श्रीगुरुजी Fri, 03/31/2017 - 11:40 नवीन
मटा म्हणजे शिवसेना प्रेम, सॉफ्ट कॉर्नर वगैरे आहेच. परंतु जर फिर्यादी, साक्षीदार व आरोपी एकच गोष्ट सांगत असतील तर ते 'मटा'त आलं किंवा अजून दुसर्‍या वृत्तपत्रात आलं तरी फरक पडत नाही कारण फिर्यादीने जे आरोप केले आहेत त्या गुन्ह्यांची कबुली आरोपीने दिली आहे व साक्षीदाराने त्याला दुजोरा दिला आहे. जर तसं झालं नसेल तर गायकवाडांनी पुढे येऊन तसं सागावं. परंतु गायकवाड आपले व्हर्जन बदलायला तयार नाहीत. आपण कर्मचार्‍याला चपलेने मारहाण केली व त्याला ढकलून द्यायचा प्रयत्न केला हे त्यांनी जाहीरपणे मान्य केले आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 03/31/2017 - 12:25 नवीन
साक्षीदाराने लिंक नीट वाचल्या/बघितल्या का?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 03/31/2017 - 12:35 नवीन
साक्षीदाराने वर्ड चुकून लागला - लिंक्स नीट वाचल्या बघितल्या का असे म्हणायचे होते. खासकरून इअरफोन्स लावून नक्की बघा व्हिडीओज सगळे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
श
श्रीगुरुजी Fri, 03/31/2017 - 14:34 नवीन
पाहिल्यात.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
अ
अनुप ढेरे गुरुवार, 03/30/2017 - 10:13 नवीन
Image removed.
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 03/30/2017 - 12:42 नवीन
आवरा. गडाबडा लोळत आहे हसून.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
वरुण मोहिते गुरुवार, 03/30/2017 - 10:25 नवीन
म्हणजे काय हे कळलं ह्या धाग्यावर . गायकवाडांच्या मारहाणीचे समर्थन कोणीही केलं नाही . काही प्रतिसाद एअर इंडिया च्या सेवेवरून होते . काही प्रतिसाद दोन्ही बाजू तपासून पाहू म्हणून होते. अभ्या तर तिकडचाच आहे त्यामुळे त्याने पाठिंबा आहे लोकांचा त्यांना असे म्हटले,असे म्हटले . पण सरसकट वाट्टेल त्या शब्दात खिल्ली उडवणे , काहीही बोलणे , दर्जाहीन भाषा वापरणे . कठीण आहे . येतो राग लोकांना तर येत असेल बुवा ठीक आहे . पण ते चप्पल मारण्यापेक्षा अश्या भाषेत इथे बोलणारे जर त्या जागी असते तर काय मारले असते विचार करतोय . एकंदरीत नेहमीप्रमाणे अजेन्डा कळला.
अ
अनुप ढेरे गुरुवार, 03/30/2017 - 10:28 नवीन
गायकवाडांच्या मारहाणीचे समर्थन कोणीही केलं नाही .
समर्थन केलेलं आहे. वर एका प्रतिसादाची लिंक दिली आहे.
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/30/2017 - 10:52 नवीन
इथेसुद्धा समर्थन दिसतंय.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 10:30 नवीन
पण ते चप्पल मारण्यापेक्षा अश्या भाषेत इथे बोलणारे जर त्या जागी असते तर काय मारले असते विचार करतोय
इंटरनेट जिंदाबाद मोहितेसाहेब! या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत. इंटरनेट अनामिकता ही सर्व नागरिकांसाठी गुंडांनी पुरवलेल्या संरक्षणासारखीच आहे.
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
अ
अभ्या.. गुरुवार, 03/30/2017 - 10:46 नवीन
या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत.
इलेक्शन पण अनामिकच मतांची असते हो. तिथे बरे निवडून दिले लोकांनी. तुम्ही गुंड वगैरे ठरवून कॉईन केलेला शब्दप्रयोग आहे. आधीचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे त्यांच्या गुंडगिरीचे? ह्या प्रकरणात सुध्दा चप्पल मारण्यापर्यंत मजबूर केलं जातं असं काय घडलं ते लोकांसमोर येऊ द्या मग बोला. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याआधीच सजा टोठावायला इंटरनेट किंवा एअरइंड्या म्हनजे न्यायालय नाही. लाईक्सवरुन सजा द्यायला निघालेत.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 10:57 नवीन
आधीचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे त्यांच्या गुंडगिरीचे?
मी जनरल स्टेटमेंट केले आहे, सर्व गुंड पाळणाऱ्या राजकारण्याविषयी. "यांचे" चरित्र प्रसिद्ध पुढे कधी प्रसिद्ध झाले तर वाचीन.
ह्या प्रकरणात सुध्दा चप्पल मारण्यापर्यंत मजबूर केलं जातं असं काय घडलं ते लोकांसमोर येऊ द्या मग बोला
सगळं लोकांसमोर ऑलरेडी आलेलं आहे. खासदारसाहेब कारने दिल्लीत पोचतील तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रीतसर जबाब नोंदवावा. कार्यवाही लवकर होण्यास हात भार लावावा. उगाच संसदेचा वेळ वाया घालवू नये. आणि हो माफी मागावी.
एअरइंड्या म्हनजे न्यायालय नाही
थोडी फार सजा ऑलरेडी मिळालेलीच आहे! उरलेली ही लवकरच मिळो.
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 11:00 नवीन
इलेक्शन पण अनामिकच मतांची असते हो. तिथे बरे निवडून दिले लोकांनी.
भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण नाही.
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 03/30/2017 - 11:05 नवीन
भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण नाही.
मग काय इंटरनेट त्यापेक्षा प्रगल्भ आहे असे तुम्हाला म्हणायचेय का?
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 11:12 नवीन
मग काय इंटरनेट त्यापेक्षा प्रगल्भ आहे असे तुम्हाला म्हणायचेय का?
इंटरनेट हे केवळ व्यक्त होण्याचे माध्यम आहे. खऱ्या लोकशाहीत लोकं कोणालाही न घाबरता मनातले बोलू शकतात. इंटरनेट वे हे थोडे सोपे जाते. फेसबुकवर लाईक्स ठोकणारे फार दीर्घ विचार करून लाइक करतात असे नाही. पण इतक्या दिवस उद्दाम राजकारणी लोकांबद्दल मनात साठलेला राग या निमित्ताने बाहेर येतो - हे ही नसे थोडके.
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 03/30/2017 - 11:18 नवीन
म्हणजे एकूणच फक्त मळमळ बाहेर काढली जात आहे म्हणा ना. चालू द्या...
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 11:24 नवीन
तुम्ही त्याला मळमळ म्हणा की अजून काही म्हणा! लोकांना काही फरक पडत नाही. शाब्दिक व्यक्त झालं की मनाला समाधान मिळतं. आणि असे व्यक्त होण्याचे अधिकार फक्त गुंड पाळणाऱ्याकडे नसावेत.
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 03/30/2017 - 12:57 नवीन
या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत. हे काहीच्या काहीच आहे राव. तुम्हाला स्वातंत्र्य पण पाहिजे अभिव्यक्तीचे आणि घाबरायचे पण आहे. शिवाय उद्या एखाद्याने ठरवले तर तो आरामात आय्पी ट्रॅक करेल. उगाच बागुलबुवा केला आहे या राजकारण्यांचे गुंड वगैरे. इतके भिउन जगायचे तर अपघात होतात म्हणून रस्त्यावर गाडी चालवणे पण सोडून द्यावे लागेल.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 13:10 नवीन
IP ट्रॅक करेल तर आपण VPN, ToR वापरू शकतो ना भाऊ! मी तरी तुमच्या इतका धाडसी नाही.
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 03/30/2017 - 10:27 नवीन
रविण्द्र गायकवाड गाडीने दिल्लीला निघाले आहेत अशी बातमी वाचली.लोकसभेत जर ते व्यवस्थित बोलले वा माफी मागीतली तर विमान कंपन्यांनी त्यांना ताकीद देऊन प्रवासाची परवानगी द्यायला हरकत नाही. रविंद्रांना काही महिने विमानप्रवास सक्तीने चपला व तत्सम हत्यारे(पट्टा वगैरे) काढूनच करण्यात यावा असे ह्यांचे मत! चपला त्या 'चेक-इन' बॅगेजमध्ये जातील.
क
कुंदन गुरुवार, 03/30/2017 - 10:35 नवीन
एअर इंडिया ला सुध्हा ग्राहक सेवे बद्दल ताकिद दिली जावी. हे जे कोणी सुकुमार आहेत , ते निवृत्त झाले होते असे वाचले अन मग त्यांना पुन्हा दुसर्या कंपनी मार्फत घेण्यात आले. त्यांच्या जागी ४ नवयुवकांनाही घेता आले असते का याचा ही विचार व्हावा.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
सुबोध खरे गुरुवार, 03/30/2017 - 17:15 नवीन
@ माईसाहेब कुरसूंदीकर माईसाहेबांचे "हे" म्हणजे अगदीच "हे" दिसताहेत. ते रवींद्र दुसऱ्याच्या चपलेने नाही का हाणू शकणार? चाकू कात्री इ आयुधे गैरवापर होतील म्हणून सगळ्याच्या सगळ्या प्रवाशांच्या चेक इन बॅगेज मध्ये जातात. सर्वच प्रवाशांना चपला चेक इन बॅगेज मध्ये टाकायला सांगणार का?
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/30/2017 - 10:44 नवीन
Image removed.

Business class does not necessarily give a man class. Seat is temporary, class is permanent.

अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 10:59 नवीन
हे सुंदर वाक्य मोहम्मद कैफ चे आहे. (ट्विटर).
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 03/30/2017 - 12:28 नवीन
"एअर इंडिया ला सुध्हा ग्राहक सेवे बद्दल ताकिद दिली जावी." नक्की काय वाईट सेवा होती ह्यावर कोणी प्रकाश टाकेल का ? की खासदार आहे म्हणजे कर्मचार्यानी गायकवाडांना "साहेब साहेब' म्हणून हाक मारावी अशी अपेक्षा होती? की साहेबांना सर्वात आधी विमानातून उतरायचा मान मिळाला नाही ? कारण त्या फ्लाईटमधील प्रवाशानी तसे काहीच म्हंटल्याचे दिसत नाही. रिक्षावाला,बस कंडक्टर जशी भाषा खपवून घेतात तशी भाषा विमानकंपन्यांतील कर्मचारी ऐकून घेणार नाहीत..हे रविंद्रनाथांना मान्य आहे का ? हे आधी तपासले पाहिजे.
अ
अभ्या.. गुरुवार, 03/30/2017 - 12:40 नवीन
रिक्षावाला,बस कंडक्टर जशी भाषा खपवून घेतात तशी भाषा विमानकंपन्यांतील कर्मचारी ऐकून घेणार नाहीत..हे रविंद्रनाथांना मान्य आहे का ? हे आधी तपासले पाहिजे.
तशी सर्व्हिस पण विमानकंपन्यानी देऊ नये (आणि मुख्य म्हणजे एअरईंडीयाचा लौकिक त्यासाठीच आहे) आणि दिली तर ग्राहक एकून घेणार नाहीत हे विमान कंपन्याकडून मान्य करुन घेतीलच म्हणा माई.
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
वरुण मोहिते गुरुवार, 03/30/2017 - 12:54 नवीन
कुपन जाऊदे पण एअर इंडिया च्या कित्येक डोमेस्टिक फ्लाईट्स अश्या आहेत कि ज्यात व्यावसायिक श्रेणी ची तिकिटे नाहीत . त्यात काय प्रकार आहे पुढील आसनांच्या दोन रांगा ह्या त्या श्रेणी ला दिल्या जातात . आणि फक्त पडदा असतो मध्ये . आणि काही सीट कंफर्ट . ह्यांनी तिकीट काढल्यावर हे सांगण्यात आलं . म्हणजे माझं कुपन वेस्ट. त्यात हे कर्मचारी हुज्जत घालत बसले हे चूक नाही का?? म्हणजे ऐनवेळी फ्लायिंग ला वेगळं विमान आल्यावर तुम्ही हुज्जत घालताय त्यापेक्षा रीतसर तक्रार नोंदवून घ्या टीप -मारहाणीचे समर्थन नाही .
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 13:24 नवीन
त्यात हे कर्मचारी हुज्जत घालत बसले हे चूक नाही का?
हे खरे असल्यास ही चूक आहे. वरती मी एअर इंडिया च्या फ्लाइट फीडबॅक फॉर्म ची लिंक दिली आहे. तिथे सामान्य माणसाप्रमाणे तक्रार करता येते. आणि ती न करता मारामारी केल्यामुळे प्रकरण वाढले.
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
र
राजाभाऊ गुरुवार, 03/30/2017 - 16:46 नवीन
>>म्हणजे ऐनवेळी फ्लायिंग ला वेगळं विमान आल्यावर तुम्ही हुज्जत घालताय त्यापेक्षा रीतसर तक्रार नोंदवून घ्या<< बातम्यांनुसार गायकवाडांनी तक्रारवहि मागवलेली पण त्यांना ती नाकारण्यात आली, वर त्या सुकुमारने उद्दामपणे "तू खासदार होगा तो तेरे घरका" वगैरे डायलॉग मारला, आणि तो टिप्पिंङ पॉइंट ठरुन प्रकरण पुढे चिघळलं. मूळात एयर इंडियात कस्टमर सर्विस हा प्रकार म्हणजे आनंदच आहे...
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 14:41 नवीन
एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.
वा! असले गुप्तहेर सेनेकडे आहेत म्हणूनच तर देशात अतिरेकी हल्ले होत नाहीत. http://www.loksatta.com/mumbai-news/sanjay-raut-ravindra-gaikwad-air-india-sukumar-shivsena-mp-1443011/
अ
अभ्या.. गुरुवार, 03/30/2017 - 14:47 नवीन
ह्यांना द्या राव एखादा विभाग काढून सेपरेट. सकाळ संध्याकाळ सेनेला शिव्या घालायला. लैच कॉमेडी आयटम आहे.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 15:09 नवीन
काय करावे, संधीच देतात ते एवढी. असो आता थांबतो.
↩ प्रतिसाद: अभ्या..
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 03/30/2017 - 16:24 नवीन
बँडविड्थ अवेलेबल झाली दिसतंय, कि काँसंट्रेशन भंग पावलं?;););) (लाईटली घ्या).
↩ प्रतिसाद: अत्रे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/30/2017 - 16:59 नवीन
एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले. या राऊतला कधीच अक्कल येणार नाही का?
↩ प्रतिसाद: अत्रे
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 03/30/2017 - 20:24 नवीन
एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.
सेनेचे पुढारी हे असे चौथी 'क' मध्ये असल्यासारखे का बोलतात ते कळयला मार्ग नाही. 'योग्य वेळ' कधी येणार्? डॉनने 'मातोश्री'ला फोन केल्यावर ? आणी राउतांनी माहिती दिलीच नाही तर एयर लाईनने मातोश्रीवर थैल्या पोचवल्या असे समजायचे का?
अ
अनुप ढेरे Fri, 03/31/2017 - 06:32 नवीन
माईसाहेब असा धोतरात धोतराला हात नाही घालू =))
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ए
एमी Fri, 03/31/2017 - 11:57 नवीन
धागा थंडावल्यावर सगळी चर्चा वाचली. हतोळकरांचा प्रसाद यांचे प्रतिसाद आवडले. विमान कर्मचार्यांकडून आधी प्रोवोकेशन झालं आणि खासदारांचे कृत्य हे त्यावर प्रतिक्षिप्त क्रिया होते असे एकंदर चर्चेवरुन वाटते. कायद्यात क्राइम ऑफ पैशनला नेहमीच थोडी कमी शिक्षा असते. उदा. एखाद्याने भावनेच्या भरात खून केला आणि दुसर्याने अगदी प्लान वगैरे करुन खून केला तर पहिल्याला कमी शिक्षा होते. http://www.misalpav.com/comment/reply/39294/929669 http://www.misalpav.com/comment/reply/39294/929697 http://www.misalpav.com/comment/reply/39294/930029 >> हे काही पटले नाही. माझ्या माहितीनुसार सबळ पुरावे 'कोर्टात' साबीत झाल्याखेरीज कोणालाच शिक्षा करता येत नाही. केवळ आरोपीने कबुलीजबाब दिला या एकाच आधारावर तर नाहीच नाही... काहीही काय...
ज
जय२७८१ Fri, 03/31/2017 - 13:01 नवीन
ग
गामा पैलवान Fri, 03/31/2017 - 14:22 नवीन
लोकहो, या प्रकरणात काय घडलं याचा माझा अंदाज सांगतो. १. एअर इंडियाने व्यवसायवर्ग नसल्याचं खा.गायकवाड यांना वेळेत कळवलं. खासदारांनी तरीही जायचं ठरवलं. २. चढपत्र (=बोर्डिंग पास) मात्र व्यवसायवर्गच दाखवत होतं. त्यामुळे खासदारांना वाटलं की पहिला बदल रद्द झाला असून व्यवसायवर्ग उपलब्ध आहे. ३. तरीही विमानात केवळ जनतावर्गच आढळला. ४. यावेळेपर्यंत विमानप्रवास सुरू झाला होता. तो चालू असतांना खासदारांनी आपली समस्या कागदावर लिहून काढली आणि हवाई सेविकेकडे सोपवली. प्रवास संपल्यावर खासदारांनी समस्येवर उपाय व स्पष्टीकरण मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवायची विनंती केली. त्यानुसार एअर इंडियाच्या चार लोकांशी बातचीत अगोदरंच झालेली होती. ५. तेव्हढ्यात श्री. सुकुमार नामे कर्मचारी बातचीत करायच्या निमित्ताने आंत घुसला. त्यानं शिवीगाळ चालू केली. ६. शिवीगाळीस प्रत्युत्तर म्हणून खासदारांकडून सुकुमार यांना चपलांचा प्रसाद मिळाला. कोणीतरी खासदारांना हाणून काढूया म्हणून ओरडा केला. त्यानंतरही खासदार तासभर विमानातनं उतरले नाहीत. ७. प्रसारमाध्यमांनी चपलांनी मारलं म्हणून गोंगाट माजवला. खासदारांना शिव्या घातल्यानेच त्यांनी २५ फटके मारले ही बाब इथे स्पष्ट होते : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8 असो. हे माझं आकलन आहे. जसजशी तथ्ये उजेडात येतील तसतसा आकलनात बदल घडू शकेल. आ.न., -गा.पै.
श
श्रीगुरुजी Fri, 03/31/2017 - 14:31 नवीन
एअर इंडियाच्या तिकिटासाठी रवींद्र गायकवाडांची धडपड; नावाच्या स्पेलिंगमध्ये वारंवार बदल
अ
अत्रे Fri, 03/31/2017 - 15:14 नवीन
एअर इंडिया ची सर्व्हिस इतकी ढिसाळ, खराब व भंगार आहे की खासदारसाहेबांना परत परत त्यांच्याच विमानात जायची हौस आहे. यांना एअर इंडिया ने पुढच्या पब्लिसिटी मध्ये वापरायला हवे. आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/31/2017 - 16:57 नवीन
आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!
खि खि खि . . . खासदार महाशयांनी हा मुद्दा आता जास्त प्रतिष्ठेचा न करता स्वतःहून माफी मागून प्रकरण मिटवून टाकावे. स्वतःहून मारहाणीच्या फुशारक्या कॅमेर्‍यासमोर मारल्याने त्यांची बाजू लंगडी झाली आहे व जनमत मोठ्या प्रमाणात त्यांच्याविरूद्ध आहे. हे प्रकरण ते जितके जास्त ताणत राहतील तितकी त्यांची व त्यांच्या पक्षाची बदनामी होत राहील. मूक मोर्चा व्यंगचित्र प्रकरणात उधोजींनी शेवटी सगळा मान, स्वाभिमान, डरकाळ्या, पंजा, वाघनखे, दांडपट्टा वगैरे बाजूला ठेवून माफी मागून प्रकरण संपविले होते. या प्रकरणात तसे केले तर प्रश्न मिटेल.
↩ प्रतिसाद: अत्रे
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/31/2017 - 17:11 नवीन
आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!
पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली आहे का हो कोणाकडे? एकूणच या प्रकरणात पेंग्विनसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्‍या सगळ्यांनाच स्वतः गायकवाडांनीच चांगलेच तोंडघशी पाडले आहे. या सगळ्यांच्या म्हणण्याचा डोलारा एअर इंडिया म्हणजे एक नंबरची ढिसाळ एअरलाईन आहे आणि तिला तिच्या कारभाराचा जाब विचारायलाच हवा यावर आधारलेला होता. त्यासाठी गायकवाड मोठ्ठे हिरो ठरले होते त्यांचे. पण कुठचे काय. स्वतः गायकवाडांनीच परत एअर इंडियाचेच तिकिट काढून एअर इंडियानेच प्रवास करायचा प्रयत्न करून चांगलेच थोबाड फोडले सगळ्या पेंग्विनसेना समर्थकांचे (**) **: थोबाड फोडणे वगैरे भाषा मी सहसा कधी वापरत नाही. पण काय करणार. मिपावरील पेंग्विनसेना समर्थकांच्या संगतीत राहून माझ्यावरही थोडा परिणाम झाला आहे :)
↩ प्रतिसाद: अत्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 03/31/2017 - 19:42 नवीन
मागे एकदा मी भक्त कोणाला म्हणायचे असा प्रश्न विचारला होता, अर्थात उत्तर थातूरमातूरच मिळाले होते. इथे कोणाला पेंग्विनसेना समर्थक म्हणायचे असे विचारून पाहतो. बाकी भक्त म्हणल्यावर वाईट वाटू शकते, मग दुसर्यांना पेंग्विनसेना समर्थक म्हणणे योग्य असू शकते का? खासकरून अभ्यासू आयडींकडून असे आले की जास्तच बेक्कार वाटते हो!
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोदक Fri, 03/31/2017 - 19:48 नवीन
आदरणीय ट्रुमनाला हे अनेकदा सांगितले आहे. पण तो केजरीवाल आणि हल्ली शिवसेना म्हटल्यावर "कोक+मेंटॉस" या मिश्रणापेक्षाही लवकर उसळतो. :(
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ग
गॅरी ट्रुमन Sat, 04/01/2017 - 06:07 नवीन
केजरीवाल आणि हल्ली शिवसेना म्हटल्यावर "कोक+मेंटॉस" या मिश्रणापेक्षाही लवकर उसळतो. :(
जे आहे हे असेच आहे आणि असेच राहणार आहे. एखादी न पटलेली गोष्ट ज्या प्रमाणात पटलेली नाही त्या प्रमाणावर माझी प्रतिक्रिया असते. जर एखादी गोष्ट थोडीशी पटली नाही तर थोडीशी टिका, अजिबात पटली नाही तर प्रचंड टिका, थोडीशी पटली तर थोडेसे समर्थन आणि पूर्ण पटली तर प्रचंड समर्थन!! ओठात एक पोटात दुसरेच, उगीच पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी गुडी गुडी बोलणे इत्यादी ढोंगे मला जमत नाहीत. तसेच इतरांना माझ्याविषयी काय वाटेल या गोष्टीचाही विचार करायची गरज मला वाटत नाही. या बाबतीत बाळासाहेब माझे आदर्श आहेत :) :) जर का अडवाणींच्या भाजपला मी मिपावरच भाजीप (भारतीय जीना पक्ष) म्हटले असेल (आणि आजही जर अडवाणी पक्षाच्या नेतेपदी आले तर मिपावर माझ्यापेक्षा मोठा भाजपविरोधक बघायला मिळणे कठिण आहे) तर शिवसेनेला पेंग्विनसेना म्हटले तर त्यात मला स्वतःला तरी काही वावगे वाटत नाही. असो. आता या विषयावर आणखी चर्चा करण्यात मला अजिबात स्वारस्य नाही.
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अमोल खरे Sat, 04/01/2017 - 17:09 नवीन
मी क्लिंटनचा पुर्वीपासुनचा पंखा आहे. मिपावर जी माणसं तटस्थपणे मत देऊ शकतात त्या थोड्या लोकांमध्ये हा आहे. आता झालाय असं की गेल्या काही वर्षांपासुन सामना मध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली जात आहे त्याने माझ्यासारखे लोक, ज्यांना स्व. बाळासाहेब आणि आता मोदींविषयी प्रचंड प्रेम आहे ते दुखावले जातात आणि अशी प्रकरणे बाहेर आली की त्यावर टोकाचे समर्थन किंवा टोकाचा विरोध पाहायला मिळतो. कोणी माना किंवा न माना, आत्ता लोकसभा व बाकी राज्यांमध्ये जी भाजपाला सत्ता मिळाली आहे ती केवळ मोदींवर असलेल्या विश्वासावर मिळाली आहे. "ये अपनेको नही डुबायेगा" असे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांपासुन कॉर्पोरेट मधील मेजॉरिटी लोक बोलत आहेत. मोदींच्या परदेशातील सभा आजची तरुण पिढी क्रिकेट मॅच पेक्षा आवडीने बघतात. किती पंतप्रधानांच्या नशिबी हे भाग्य आले आहे (लालबहादुर शास्त्री व इंदिरा गांधी वगळता). त्यामुळे भाजपा मधील बाकी लोकं कितीही गोंधळ घालत असली तरी मोदींच्या प्रेमापोटी लोकं त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत आहेत. शिवसेना इथेच मागे पडतेय असं वाटतं, म्हणुन आत्ता गायकवाडांच्या केस मध्ये पण दुसरी बाजु असु शकते.... एअर इंडिया च्या माणसांनी दादागिरी केली असु शकते ह्याचा विचारही केला जात नाही. राहता राहिला प्रश्न माध्यमांचा. माध्यमं व दाक्षिणात्य माणसांचा शिवसेनेवर आणि आता भाजपावर राग आहेच, त्यामुळे कदाचित ह्याला व्यापक प्रसिद्धी मिळाली असावी. मागे एकदा फडणविसांच्या अमेरिका दौर्याच्या वेळी मुख्य सचिव पासपोर्ट विसरल्याने विमान डिले झाले होते, तेव्हा माध्यमांनी सर्व बिल फडणविसांवर फाडले होते. त्यामुळे हे होतच राहणार. असल्या प्रसंगांनी आपली मिपावरची किती रिलेशन तोडायची ह्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 04/01/2017 - 05:57 नवीन
प्रसादराव तुम्ही हिंदी चित्रपट बघितले असतीलच. त्यात अनेकदा असे बघायला मिळते--- गोळी एकाला मारली की अगदी जस्ट इन टाईम दुसरा कोणीतरी मध्ये येऊन ती गोळी स्वतःच्या अंगावर घेतो!! तुम्ही त्या गोळी अंगावर घेणार्‍यांसारखे का करत आहात? तुम्ही पेंग्विनसना समर्थक नाही हे तुम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे थोबाड फोडणे वगैरे भाषा तुम्ही कधी वापरलेली नाही. मग तो प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाहीच. तशी भाषा वापरणारे वेगळे आहेत आणि अशा प्रवृत्तींना (ज्यांना मी पेंग्विनसेना समर्थक म्हणतो) उद्देशूनच तर तो वरील प्रतिसाद होता.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 04/01/2017 - 07:32 नवीन
ट्रुमनसाहेब, तुम्ही मला म्हणत आहात म्हणून मला वाईट वाटतेय असे अजिबात नाही. मिपावर वावरत असताना, काही आयडी आणि त्यांचे मुद्देसूद अभ्यासू लिखाण हे रोल मॉडेलसारखे पहिले जाते, कमीत कमी मी तरी पाहतोच. तुम्ही त्यापैकी एक आहातच हे उघड आहे. बरेच वेळेस भाजप समर्थनार्थ मांडलेले मुद्दे "भक्त" ह्या संबोधनाखाली दुर्लक्ष केले जातात. तुम्हीही त्याचा अनुभव घेतला असेलच. तसेच "पेंग्विनसेनासमर्थक" ह्या संबोधनाने होऊ नये म्हणून मी माझे मत व्यक्त केले. मला उद्देशून काही म्हटले असेल तरच प्रतिक्रिया द्यावी असे मला वाटत नाही. मला पटले नाही म्हणून मी म्हणालो, तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही लिहु शकताच. माझा काहीही आक्षेप नसेल.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 03/31/2017 - 19:49 नवीन
निंदेच्या सोयीसाठी आता कुठल्याही थराला जाऊ शकतात, पुरावे आहेत का याला काही? बाकी उघड उघड गोष्टींसाठीही पुरावे मागणारे, आपल्या सोयीच्या गोष्टींवर किती सहज विश्वास ठेवतात हे उघड दिसतंय.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा