उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
💬 प्रतिसाद
(592)
अ
अभ्या..
गुरुवार, 04/06/2017 - 20:19
नवीन
जर प्राणी वाचक उल्लेख आक्षेपार्ह असतील तर पेंग्विन सेनेचा जप उडवला जावा ही विनंती.
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 04/07/2017 - 06:31
नवीन
काय वेळ आली आहे. साहित्य संपादकांचे प्रतिसादही संपादित करावे लागत आहेत!!
अ
अभ्या..
Fri, 04/07/2017 - 08:28
नवीन
संपादक साहित्याचा आहे हो,
महापालिकेच्या उंदीरमार विभागात बसून ट्रम्प चुकलाच असल्या वांझोट्या चर्चेचा नाही.
.
जाऊ दे...ते साहित्य वगैरे तुमचा नाही विषय. तरीही फारच चिंता वगैरे वाटत असेल तर बेस्ट लक नेक्श्ट टैम. ;)
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 04/06/2017 - 20:06
नवीन
काही माध्यमांनी तर बंदी उठवली अशी बातमीही दाखवली आहे. आणि कसं आहे बरं का कोणी आज मांजर असतं कोणी उद्या, त्यात माज करण्यासारखं असं काही नाही. आणि कौतुक करण्यासारखं तर अजिबात नाही. बाकी भाजप खेळवायचा प्रयत्न करतेय हे मान्य केले हेही नसे थोडके. थोडक्यात काय या प्रकरणात दम काहीच नव्हता, भाजपला खेळायची लहर आली होती एवढेच. म्हणजे शिवसेनेचा राग योग्य आहे तर!
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/06/2017 - 20:23
नवीन
शिव्यासेनेने स्वतःला खेळविण्याची स्वतःहून भाजपला संधी दिली. कायम मगरुरी व मूर्खपणा सुरु ठेवला की इतरांना काहीच प्रयत्न न करता संधी मिळते.
स
संदीप डांगे
गुरुवार, 04/06/2017 - 07:32
नवीन
आय विश कि नुकतीच गोरक्षकांनी एकाची जी राजरोस हत्या केली त्याचाही आता अशीच हिरीरीने चर्चा, एवढा गिगाबायटी गूळ पाडून, एवढे शेकडो प्रतिसाद देऊन, परत परत तेच तेच लिहून, थयथयाट करून समाचार घेतल्या जाईल...
आय जस्ट विश.,
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/06/2017 - 11:42
नवीन
सुरू करा चर्चा. शुभस्य शीघ्रम्!
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 04/06/2017 - 17:49
नवीन
मोदींनी यावर थेट भूमिका जाहीर केल्यावर अशा घटनांना चाप बसेल असं वाटलं होतं पण परत परत त्याच घटना घडत आहेत. पाठलाग करून पकडून देण्यापर्यंत ठीक आहे पण मारहाण हि निषेधार्ह्यच आहे.
प
पुंबा
Fri, 04/07/2017 - 08:20
नवीन
हप्र, एखाद्या गावगुंडांच्या टोळक्याने केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तिला पाठलाग करून पकडून देणे (जर गुन्हेगार रंगेहाथ गुन्हा करताना पकडला गेला नसेल) ठीक आहे? पोलिसांना बातमी देणे एक वेळ समजू शकतो जेणेकरून पोलिस तपास करतील पण पाठलाग करून पकडून देणे? नक्की कायद्याचेच राज्य अपेक्षीत आहे ना तुम्हाला?
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 04/07/2017 - 18:59
नवीन
पोलिसांची एकूणच अवस्था आपण सर्व जाणतोच, त्यामुळे त्याबद्दल बोलणेच नको. गोहत्याबंदी असताना ट्रक भरून गायीबैल घेऊन जाणे हि संशयास्पद हालचाल गृहीत धरली जाऊ शकते. नुसतं पोलिसांना कळवून त्या हत्या थांबतीलच याची खात्री दिली जाऊ शकते का? त्यापेक्षा समजा पाठलाग करून ट्रक अडवून जर समजा पोलिसांना बोलावले आणि त्याचा कायद्याने सोक्षमोक्ष लावला तर त्यात चुकीचे काय? कायद्याला मदतच आहे ती! मारहाण समर्थनीय नाहीच हे वर मांडलेच आहे.
प
पुंबा
Sat, 04/08/2017 - 17:52
नवीन
आजिबात नाही. एखादा कायदा मोडला जात आहे हे केवळ त्या कायद्यासंबंधी दायित्व असलेल्या संस्थेला(इथे पोलिस) कळवणे एवढेच नागरिकाचे कर्तव्य आहे. पाठलाग करून पकडणे, कोण काय खातंय याची देखरेख करून त्याच्या घरावर हल्ला करणे इत्यादी प्रकार स्टेटलेस सोसायटीज मध्ये घडत असतील, भारत एक संविधानाने स्थापीत, कायद्याचे राज्य(rule of the law and not of men) आहे. इथे केवळ संवैधानिक व्यवस्थेलाच कायदे निर्माण करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, व त्यांचे अर्थान्वयन करणे हे अधिकार हवेत.
यासाठी पोलीस दलामध्ये सुधारणा घडवून आणायचा आग्रह धरणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे ना की स्वत: पोलीसांचे अधिकार आपल्या ताब्यात घेणे.
अखलाक हत्या, उना येथे झालेली दलितांना मारहाण आणि अलवार येथील नृशंस हत्या हे तीनही प्रकार सरकार या संस्थेचे राज्याचा(state) एजंट म्हणून आपले कर्तव्य निभावण्यात आलेले अपयश आहे.
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 04/08/2017 - 19:15
नवीन
मी फक्त एवढ्याच गोष्टीला धरून बोललो आहे, त्यामुळे बाकीच्या वर लिहिलेल्या गोष्टी गैरलागू आहेत. म्हणजे थोडक्यात आपले म्हणणे आहे की एखाद्याच्या बाजूच्या घरात चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न चालू असेल (किंवा त्याला तसा संशय असेल तर)तर त्याने त्याला पकडण्याच्या ऐवजी फक्त पोलिसांना कळवून गप्प राहावे(परिस्थितीजन्य आणि थेट पुरावा गायब). मला हे पटत नाही, आणि तसे घडतही नाही. तसे पकडने हा कायदेशीर गुन्हा असेल तर व्हावी की कायदेशीर कारवाई, त्याबाबतीत कोणाचा आक्षेप आहे?
बाकी आग्रह धरावा म्हणजे नेमके काय करावे हे सांगितलेत तर समजेल नीट!
प
पुंबा
Mon, 04/10/2017 - 15:24
नवीन
हप्र, ह्या केसमध्ये प्रस्तुत संशयिताला पकडणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे योग्य ठरते.
गोरक्षकांचं व्हिजिलांटिझम मला बरोबर वाटत नाही. असल्या कुठल्याही संघटनेला, मॉबला धरपकडीचे अधिकार नसावेत असे वाटते.
ह
हतोळकरांचा प्रसाद
Mon, 04/10/2017 - 18:41
नवीन
माझ्या पहिल्या प्रतिसादापासून मी माझे हेच म्हणणे स्पष्टपणे मांडले आहे. पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे योग्य ठरते, मग ते हे प्रकरण ते प्रकरण असं असू शकत नाही. मारहाण करणे वगैरे गुंडगिरी प्रकार कायद्याने गुन्हा आहेच. पोलिसांनी त्यावर योग्य ती कारवाई करावीच! ते गोरक्षक आहेत म्हणून त्यांना कायद्याने सूट दिलेली नाहीचाये!
प
पुंबा
Mon, 04/10/2017 - 19:15
नवीन
बरं..
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 04/06/2017 - 08:06
नवीन
करण्या योग्यच आहे व या हत्येला जबाबदार असणार्या सर्व दोषी लोकांना कायदेशीर शिक्षा ही व्हायलाच हवी.
पण,
मुळातच राजस्थान व इतर राज्यात गोहत्या, गांयीची अवैध तस्करी यांना कायदेशीररित्या बंदी असताना अशी तस्करी ही लोक करतातच का? शिवाय या अश्या गोष्टींनी आजकाल भुछत्रांप्रमाणे जिथे-तिथे उगवलेल्या तथाकथित गोरक्षकांच्या हातात आयते कोलित मिळते. मग त्यातूनच झालेल्या मारहाणीतून एकाद्याचा मृत्यु होतो व आजकाल भू छत्रांप्रमाणे जिथे-तिथे उगवलेल्या तथाकथित ढोंगी सेक्युलर लोकांना हे बेकायदेशीर कृत्य करणार्या लोकांचा पुळका येऊन अवार्ड वापसी सारख्या नौटंकी करायचा आयताच चांन्स मिळतो.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/06/2017 - 19:37
नवीन
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 04/06/2017 - 20:13
नवीन
मला वाटतं त्याचा मराठी अर्थ नक्कीच कळत असेल, नाही माध्यमांना आणि खासकरून सो कॉल्ड शिवसेनप्रेमी माध्यमांना कळला नाही म्हणून विचारलं! शिवाय लोकसभेतलं निवेदन बघून घ्या लगेहाथ, अर्थात फरक काही पडणार नाही म्हणा. हे भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार वगैरे काही नसून भाजप विरुद्ध शिवसेना आहे हे वर आलेलेच आहे.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/06/2017 - 20:29
नवीन
भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार असंच होतं. ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नसून शिव्यासेनेचा आहे असे बरळून गायकवाडने विनाकारण त्यात पक्ष आणला.
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 04/07/2017 - 05:37
नवीन
प्रकरण ताणून स्वतःचे हसे करून घ्ययची सवयच आहे शिवसेनेला.राज्याबाहेर दादागिरी चालणार नाही हे उद्धवने त्याच्या आमदार्,खासदारांना निक्षून सांगायला हवे. काल रविण्द्रने लोकसभेत केलेले भाषण ऐकले. "तू एयर इण्डियाका सी.एम.डी. है क्या ? तू बॅग उठानेवाला है ना ?" असे उद्धट्पणे रविंद्र म्हणाला. त्यावर तो कर्मचारी चिडला व त्याने 'तू नरेंद्र मोदी है क्या?' असे प्रत्युत्तर दिले. थोडक्यात सुरूवात खासदार साहेबांनीच केली होती असे दिसते.
म
मराठी_माणूस
Fri, 04/07/2017 - 06:47
नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/air-india-bal-thackeray-shiv-sena-ravindra-gaikwad-1447606/
हे वाचा
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 04/07/2017 - 07:19
नवीन
"माझा स्वभाव विनम्र आहे" रविंद्र गायकवाड.
लेख 'हे' वाचत होते .वरील वाक्य वाचल्यावर हे जे हसत सुटले ते काही थांबायला तयार नाहीत. कामे आटपली की मग स्वतःहून वाचेन.
प
प्रसाद_१९८२
Fri, 04/07/2017 - 08:23
नवीन
---
"मैने सँडलसे पच्चीस बार मारा" असे म्हणनार्याचा स्वभाव विनम्र आहे, हे विधान किती हास्यास्पद आहे.
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 04/07/2017 - 08:47
नवीन
सहमत आहे.
पण इथल्या पेंग्विनसेना समर्थकांना हे समजावणार कोण आणि कसे?
अ
अत्रे
Fri, 04/07/2017 - 07:52
नवीन
फक्त दिलगिरी वर काम भागणार नाही असे वाटते.
http://www.livemint.com/Politics/bSS2yhlxoh6woQeTgIvRtO/Ravindra-Gaikwad-poses-threat-to-flight-safety-Air-India-ca.html
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 04/07/2017 - 08:53
नवीन
असेच करायला हवे., या असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना चाप बसलाच पाहिजे.
म
मराठी_माणूस
Fri, 04/07/2017 - 13:13
नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/air-india-lifts-flight-travel-ban-on-shi-sena-mp-ravindra-gaikwad-1448108/
र
राजाभाऊ
Fri, 04/07/2017 - 15:14
नवीन
अगदि पदर खोचुन आणि मिशीला तुप लावुन एयर इंडियाची तळी उचलणार्यांची प्रतिक्रिया आता काय असेल बरे? शेवटी सेनेची "धमकी" कामाला आली कि काय? गायकवाडांनी फक्त संसदेची माफि मागितली, एयर इंडिया किंवा त्या सुकुमारची मागितलेली नाहि... ;)
अ
अनुप ढेरे
Fri, 04/07/2017 - 15:16
नवीन
या सगळ्या प्रकारात गायकवांडांचं हसं न होता जय झाला असं वाटत असेल तर ह्याप्पी बड्डे!
श
श्रीगुरुजी
Fri, 04/07/2017 - 15:36
नवीन
१५ दिवस बंदी घालून इतकी मानहानी झाल्यानंतर आणि नंतर माफीनामा लिहून दिल्यानंतर बंदी उठविल्यावर आपलाच 'विजय' झाला असे सेना नेत्यांना वाटून आता मातोश्रीच्या बाहेर फटाके फुटत असतील. गायकवाड आता दिल्लीहून मुंबईला विमानाने आल्यानंतर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत होऊन मातोश्रीपर्यंत मिरवणूक निघेल.
या प्रकारात गायकवाड व सेनेची पुरती इज्जत निघाली. देशभर गायकवाड व सेनाविरोधात वातावरण निर्माण झाले व निदान १५ दिवस तरी राजकारण्यांना एअर इंडियाने शिंगावर घेतले हेही नसे थोडके. आता भविष्यात अशी दांडगाई करण्याची गायकवाडांची हिंमत होणार नाही.
अ
अत्रे
Fri, 04/07/2017 - 15:50
नवीन
हेच म्हणतो! ती पोलीस केस संथ गतीने चालू राहील पण या प्रवासबंदीने चांगलाच धडा शिकवला आहे.
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 04/07/2017 - 16:53
नवीन
याविषयी एकाच्या फेसबुक भिंतीवर वाचले--- "मुलगा वर्गात दांडगाई करतो, गुंडगिरी करतो म्हणून त्याला शिक्षकाने वर्गात यायला बंदी घातली. पण नंतर मुख्याध्यापकांनी सांगितल्यावर त्याला वर्गात परत यायला परवानगी दिली. त्यानंतर त्या मुलाने मोठा पराक्रम केला आणि जणू काही स्कॉलरशीपच मिळाली असे त्याच्या घरच्यांना वाटायला लागून ते त्याचा आनंद साजरा करायला लागले"!!
मला वाटते की एअर इंडियाने या घटनेमुळे आयुष्यभरासाठी बंदी घालणे समर्थनीय नव्हतेच.पण दुर्दैवाने एअर इंडियाने या प्रकरणी पाहिजे तितका खमकेपणा दाखवलेला नाही. अजून काही काळ म्हणजे ६ महिने/१ वर्ष वगैरे काळ तरी बंदी घालायला पाहिजे होती. आता मला ६ महिने/१ वर्ष हा बंदीचा काळ पुरेसा आहे असे वाटत आहे तर काहींना १५ दिवस बंदी पुरेशी आहे असे वाटत असेलच!!
येशूदासने गायलेले एक सुंदर गाणे आहे. त्या गाण्यात नायक आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची स्तुती करतानाच भगवंताचीही स्तुती करतो. त्या गाण्याचे बोल आहेत---"जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा"!! त्याच धर्तीवर असे म्हणावेसे वाटते की "ज्या पक्षाचे समर्थक असे **** असतील तर त्या पक्षाचे नेते आणि तो पक्ष किती **** असेल"!! या **** च्या जागी मी थर्डक्लास, उद्दाम, उद्धट, शिवराळ असे शब्द टाकले. त्याजागी इतर कोणतेही शब्द टाकता येतील :)
व
वरुण मोहिते
Fri, 04/07/2017 - 19:30
नवीन
इतके रसिक आहात हे माहिती नव्हतं .
स
सतिश गावडे
Fri, 04/07/2017 - 19:42
नवीन
चित्रपटः सावन को आने दो. गाणं तुझे देखकर.रामायणातील राम अरुण गोविल या चित्रपटात हिरो होता. :)
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 04/07/2017 - 20:35
नवीन
काय बोलणार? मुद्दे सोडून आपल्या विरोधातील विचारधारेचा क्लास काढायची वेळ का येत असेल बरे? खेद वाटतो, अजाबात पटलं नाय!
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 04/08/2017 - 05:20
नवीन
ओक्के. नको पटू दे.
तो पक्ष आणि विचारधारा? ख्खो ख्खो ख्खो ख्खो. ज्यांचा जन्म नुसती गुंडगिरी करण्यात केला त्यांची कसली डोंबलाची आली आहे विचारधारा.
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 04/08/2017 - 06:37
नवीन
तुम्ही इथे या विषयावर त्या पक्षाच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांचा क्लास काढलात, ते त्या पक्षाचे समर्थकच आहेत असे गृहीत धरून. त्यांच्या विचारधारेबद्दल मी बोलत आहे. कि इथे बोलणाऱ्या लोकांची काही विचारधारा असू शकते हेही तुम्हाला मान्य नाही (शिवसेनेची काही विचारधारा नाही ह्या तुमच्या वैयक्तिक मताचा मी आदर करतो)? माझा मुद्दा सरळ होता, मिपावरच्या आदरणीय आयडींनी असे एखाद्या पक्षाच्या समर्थकांना थर्डक्लास कशाला संबोधावे? असो, मी लहान तोंडी मोठा घास घेणे योग्य नाही. तुम्हाला योग्य वाटेल तसे.
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 04/07/2017 - 18:51
नवीन
तुम्हाला इंग्लिश वाचता आणि समजता येते असा माझा समाज आहे, तो गैरसमज असेल तर त्या पत्राचे भाषांतर लिहून देण्याइतकी इंग्रजी येणारे बरेच लोक असतील इथे.
हाहाहा...भल्या मोठ्या अपेक्षा फोल झाल्या की असे होते. ह्या असल्या मुजोर कंपन्या सामान्य लोकांना नेहमीच शिंगावर घेत असतात. कोणी आवाज उठवत नाही, इथे आवाज उठवला गेला नाही तर आवाज काढला गेला म्हणून तंतरली!
श
श्रीगुरुजी
Fri, 04/07/2017 - 19:06
नवीन
एअर इंडियाची तंतरली?
हहपुवा
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 04/07/2017 - 20:32
नवीन
हसून घ्या! पर्याय नाही हो, बंदी तर उठली आहेच. त्या शिवसेनाप्रेमी माध्यमाने काल शिवसेनेने विमान उडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यावर विमान कंपनी हवालदिल झाल्याची बातमी छापली होती. त्याची लिंक कुठे मिळाली तर देतो ;).
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 04/08/2017 - 05:16
नवीन
व्वा मोठ्ठा पराक्रमच केला नाही त्या शिवसेनेने!!
खासदाराला उडण्यावर बंदी घातल्यामुळे एकही विमान उडू न देण्याची धमकी (आणि ती प्रत्यक्षात उतरवायची क्षमता) शिवसेनेच्या एकूणच वकुबाला साजेशी आहे. मी तर म्हणतो अशा प्रकारे प्रवाशांना वेठीस धरायला कोणी गेल्यास जनरल डायरसारखा कोणीतरी पाचारण करून ५-१०-५० लोकांना यमसदनी पाठवावे. एकदा अशी घटना कुठे घडल्यास हे सगळे राजकीय पक्षांमधले गुंड सुतासारखे सरळ येतील आणि भविष्यात कुठे असले प्रकार व्हायचे नाहीत.
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 04/08/2017 - 06:51
नवीन
हाही मोठा पराक्रमच असेल नाही?
शिवसेनेने विमानतळ बंद पाडण्याचं समर्थन दिसलं का माझ्या वाक्यात कुठे ? असलेल्या सत्तेच्या जोरावर फक्त संबंधित पक्ष शिवसेना आहे म्हणून भाजपने केलेली ही खेळी आहे हे आले आहेच वर! मग याला संसदेतून, डिप्लोमॅटिक मार्गाने दाद मिळत नसल्यावर शिवसेनेने त्यांचा "वकुब" वापरला तर ती शिवसेनेची खेळी आहे. त्यावर जी काय कायदेशीर कारवाई (सध्यातरी उपलब्ध असलेल्या भारतीय संविधानानुसार, डायरचं बघता येईल नंतर कधीतरी चुकूनमाकून हुकूमशाही आलीच तर) करण्याचा मार्ग आहेच की उपलब्ध.
बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत.
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 04/08/2017 - 07:13
नवीन
माझी काहीही हरकत नाही तसे करायला. निदान मिपावर तरी ज्याला इच्छा असेल त्याने धागा जरूर काढावा. फक्त प्रॉब्लेम इतकाच की हा प्रकार बंगालमधल्या खासदारानी केला आहे आणि मिपा हे मराठी संकेतस्थळ असल्यामुळे त्याला शिवसेना खासदाराने केलेल्या गोंधळाइतका टी.आर.पी मिळणे फारच कठिण. एकूणच असे सगळे प्रकार करणारे खासदार, तो परिचारक आणि अजून जो कोणी असेल तो सगळे एका माळेचे मणी.
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 04/08/2017 - 07:36
नवीन
छेहो, मिपावरच्या चर्चेबद्दल बोलत नाहीये मी. माध्यमांनी एका अरेरावीतुन सुरु झालेल्या भांडणाला असा काही रंग दिला आणि खासदार महाशय म्हणजे जणू या देशातील सर्वात धोकादायक व्यक्ती असा गोंधळ घातला. वरून हि संधी समजून एअर विमान कंपन्यांच्या आडून बंदीचा जो फार्स खेळला गेला त्याबद्दल बोलतोय. टीआरपी हि मराठीमुळे नाही तर टीआरपी हि शिवसेनेबद्दलच्या पूर्वग्रहदूषित भूमिकेमुळे मिळाली. गेली कित्येक वर्षे शिवसेना मनसे च्या विरोधात तथ्यविरहित मते मांडून देशातील इतर भागातील लोकांना चुकीची माहिती पुरवण्याचे काम हि मंडळी सातत्याने करत आहेत, तोच प्रकार यावेळेलाही घडला. या माध्यमांच्या आणि विमान कंपनीच्या भूमिकेबद्दल मी बोलत आहे.
प
प्रसाद_१९८२
Wed, 04/12/2017 - 12:38
नवीन
बाकी काल तृणमूल च्या खासदाराने विमानात गोंधळ घातल्याचे ऐकले आहे, बंदीच्या आणि माध्यमांच्या मागच्या दहा बारा दिवसातील ड्राम्याच्या रिपिट मोडच्या प्रतीक्षेत.
.
.
.
<<
.
.
मला वाटते तृणमूलच्या खासदाराने झालेल्या प्रकारानंतर कोणत्याही टिव्ही कॅमेर्यासमोर येऊन "मैने पच्चीस बार उसको सँडलसे मार्या" अश्या फुशारक्या मारलेल्या बातम्या कोणत्याही न्युज चॅनेलवर पाहिल्या नाहीत.
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 04/12/2017 - 13:17
नवीन
हो बरोबर आहे. थोडक्यात काय तर काय केले हे कधीच महत्वाचे नव्हते, काय बोलले हेच महत्वाचे होते!
प
प्रसाद_१९८२
Wed, 04/12/2017 - 14:36
नवीन
विमानात फक्त गोंधळ घालणे आणि
सरकारी विमान कंपनीच्या एका कर्मचार्याला मारहाण करुन त्याच्या खुनाचा प्रयन्त करणे ह्या दोन्ही घटनांत काहिच फरक वाटत नाही का?
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 04/12/2017 - 19:48
नवीन
खुनाचा प्रयत्न? हे ठरवणार कोर्ट कि तुम्ही? टोकाचा आकस कधीही वाईटच!
श
श्रीगुरुजी
Wed, 04/12/2017 - 20:07
नवीन
गायकवाडने कर्मचाऱ्याला विमानाच्या शिडीवरुन ढकलून द्यायचा प्रयत्न केला हे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. या गुन्ह्याला खून करण्याचा प्रयत्न करणे असेच म्हणतात.
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 04/13/2017 - 11:18
नवीन
तुम्हाला हव्या त्या प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितलं असेल, हवाईसुंदरीने सांगितलेले चालणार नाही बहुतेक!
- «
- ‹
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- ›
- »