उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
का बुआ, "मी मारले" हा त्यांचा स्वतःबद्दलचा क्लेम मान्य आणि "मी त्यांना शांततेने आदराने बसून बोलू, तुम्ही बुजुर्ग आहात...." हा स्वतःबद्दलचा क्लेम अमान्य? बाकी जसे मारल्याचे फक्त खासदारांचे म्हणणे हा पुरावा मान्य आहे तसे का मारले हे म्हणणे तत्त्वता: विरोधी पुरावा मिळेपर्यंत तरी गृहीत धरायला नको का? इथे कोणी वकील मंडळी असतील तर ती कायद्याच्या दृष्टिकोनातून असल्या फुशारक्यांचे स्थान सांगू शकतील. बाकी ज्यांना फक्त त्यांच्या वाक्याचा वापर करायचा आहे त्यांना विरोधी पुराव्यांची गरजच नसावी.एक सांगा. त्यांनी कर्मचार्याला चपलेने मारले का नाही मारले. त्यांनी मारले हा आरोप त्यांच्यावर इतर कोणीही करत नसून त्यांनी स्वतःहूनच हे सांगितले आहे. या क्षणापर्यंत त्यांनी ते नाकारलेले नाही. त्यांनी कर्मचार्याला खरंच मारले होते का हे सिद्ध करण्याची जबाबदारी इतरांवर नाही कारण इतर कोणीही हा आरोप केलेला नाही. त्यांनी स्वतःहूनच कबुली दिल्याने आता त्याच्यात कोणीही काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. परंतु कर्मचारी बेताल वागला, अपशब्द वापरले हे आरोप त्यांनी कर्मचार्यावर केले आहेत. जो दुसर्यावर आरोप करतो, त्याच्यावरच ते आरोप सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी असते. ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर ही जबाबदारी नसत. त्याने नुसते आरोप नाकारले तरी ते पुरेसे असते. त्यामुळे खासदार महाशय कर्मचार्यावर जे आरोप करीत आहेत, ते सिद्ध करणे हे कायदेशीर दृष्ट्या त्यांच्यावर बंधनकारक आहे.परत एकदा समजून घ्या, गायकवाडांनी जर मारहाण केली असेल मग ती २ चापट असू कि २५ चपला, तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्याची न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हावी. पण जशी विमान कंपनीने केस टाकली आहे तशीच ती खासदारांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याबद्दल टाकली आहे. हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून एकांगी फटकेबाजी चालू ठेवायचीच असल्यास त्याला पर्याय नाही. मग व्हिडिओत हवे ते दिसते, ऐकायला येते, पेपर पक्षप्रेमी होऊ शकतो आणि प्रतिक्रिया ह्या पेंग्विनसेनासमर्थनार्थ होऊ शकतात.आपल्याला धक्काबुक्की व शिवागीळ झाली हे सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी खासदार महाशयांवर आहे. त्याचवेळी विमान कंपनीने आपल्या कर्मचार्याला मारहाण केल्याची व विमानाला खोळंबा केल्याची केस टाकली आहे त्यात फार काही सिद्ध करण्यासारखे नाही कारण दस्तुरखुद्द खासदार महाशयांनीच कॅमेर्यासमोर या गुन्ह्याची जाहीर कबुली दिली आहे व ती कबुली न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईलच. अर्थात शिक्षा टाळण्यासाठी, "मी मारहाण केलीच नव्हती. फुशारक्या व पोकळ बढाया मारणे ही आमच्या पक्षाची व पक्षनेतृत्वाची संस्कृती आहे व त्याला अनुसरूनच मी मारहाण केलेली नसतानाच कॅमेर्यासमोर मारहाण केल्याच्या फुशारक्या मारल्या. अशा फुशारक्या मारल्या तर माझा व माझ्या पक्षाचा भाव वाढेल असे मला वाटले." असा खासदार महाशयांनी न्यायालयात स्टँड घेतला तर मात्र मारहाण झाली हे सिद्ध करण्याची जबाबदारी कर्मचार्याची राहील.मग हाच तर मुद्दा सांगण्याचा प्रयत्न आहे ना? मी अमुक केले तमुक केले ह्या नुसत्या कबुलीला न्यायालयात काहीही स्थान नाही, त्याला परिस्थितीजन्य पुरावे किंवा प्रत्यक्ष साक्षीदार लागतात. तेव्हा न्यायालयाला करू देत ना त्यांचे काम.चुकीची माहिती आहे. कोणत्याही खटल्याची सुनावणी सुरू होताना सर्वात प्रथम न्यायाधीश आरोपीला त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप वाचून दाखवितात व त्यावर "गिल्टी ऑर नॉट गिल्टी?" असे त्याला विचारतात. जर "नॉट गिल्टी" असा त्याने दावा केला तर पुढील सुनावणी सुरू होतो व फिर्यादीला आरोपीच्या विरूद्ध असलेले पुरावे सादर करावे लागतात. जर आरोपीने या प्रश्नावर "गिल्टी" असे पहिल्याच फटक्यात कबूल केले तर खटला पुढे चालविण्याची गरजच नसते. हा खटला भविष्यात कधीकाळी सुरू झाला व खासदार महाशय आपल्या दाव्यावर ठाम राहिले तर एका मिनिटात खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन त्यांना शिक्षा ठोठावली जाईल. "आपण मारहाण केलीच नाही. कर्मचार्याला मारहाण केल्याची नुसती फुशारकी मारली." असा त्यांनी न्यायालयात दावा केला तर मात्र आपल्याला मारहाण झाली हे कर्मचार्याला सिद्ध करावे लागेल. जोपर्यंत खासदार आपल्या कबुलीला चिकटून आहेत तोपर्यंत पुरावे, साक्षीदार इ. ची गरज नाही.आधी तुम्हाला राग कशाचा आहे ते ठरवा. त्यांनी फुशारक्या मारल्या म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे कि त्यांनी मारले म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे?दोन्ही गोष्टींचा राग आहे. परंतु फुशारक्या मारणे हा कायदेशीर गुन्हा नाही. ही एक मानसिक प्रवृत्ती आहे. परंतु मारहाण करणे हा गुन्हा असल्याने याच गुन्ह्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. सदर प्रकरणातील खासदार कोणत्याही पक्षाचे असते तरी मी टीका केलीच असती. हवाईसुंदरीने जे काही सांगितले ते फक्त मटा, लोकसत्ता याच वृत्तपत्रातील आंतरजाल आवृत्तीत दिसले. त्यांच्या छापील आवॄत्तीत त्यांनी हे छापलेले नाही. इतर माध्यमांनी सुद्धा त्या निवेदनाची दखल घेतल्याचे वाचण्यात आले नाही. तिची ओळखही लपविलेली आहे. त्यामुळे ते जे निवेदन होते ते कितपत जेन्युईन आहे याविषयी साशंक आहे.बाकी फुशारक्या मारणे आणि पोकळ बढाया मारणे अजून कोण कोणत्या पक्षाची संस्कृती आहे हे वेगळे सांगणे न लगे. तो इथला मुद्दाच नाहीये, तुमचा तो शिवसेनेवरचा वैयक्तिक राग आहे असे मला वाटते.शिवसेनेवर माझा राग आहेच व मी तो कधीच लपविलेला नाही. परंतु हा राग विनाकारण किंवा अनाठायी नाही हे या व आधीच्या इतर अनेक प्रकारणांवरून सिद्ध झाले आहे. शिवसेनेवर टीका करण्याची संधी शिवसेनेच्याच खासदार महाशयांनी मिळवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला नावे का ठेवता हा इतरांना प्रश्न न विचारता शिवसेनेलाच विचारणे योग्य ठरेल.प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला?बापरे. म्हणजे आता कोणत्याही खासदाराशी बोलताना हा कधीही चपलेने मारू शकतो याची जाणीव ठेवूनच कर्मचार्यांनी बोलले पाहिजे आणि ते सांगतील त्यापुढे मान तुकविली पाहिजे. खरं तर त्या कर्मचार्याचीच चूक आहे. हे खासदार मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून इतरांना चपलेने बडविण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख कर्मचारी विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.यापुढे एअर इंडियाने प्रवास करतांना व्यवसायवर्गाचं तिकीट हातात असतांना जनता वर्गानं जावं लागलं तरी उपकारांच्या ओझ्याखाली दबून जाऊन मुकाटपणे प्रवास केला पाहिजे. जरी बोर्डिंग पासवर व्यवसायवर्ग छापलेलं असलं तरीही तोंडातनं चकार शब्द काढता कामा नये. तक्रारपुस्तिका मागितल्यावर मिळाली नाही तरी गप्प बसून राहिलं पाहिजे. कारण की कोणी कर्मचारी मारायला अंगावर धावून आला असता प्रतिकार केल्यास प्रवाशास विमानबंदी होऊ शकते.विमानात मुळात बिझनेस क्लासची आसनेच नसताना केवळ हे महाशय विमानात येणार म्हणून त्यांच्याकरता आयत्यावेळी तशा आसनांची सोय करायची होई का? व्यवसायवर्गाचं कूपन हातात असलं तरी विमानात ती सोय असल्याशिवाय यांना व्यवसायवर्गात कसं बसविणार? जर त्यांना जनता क्लासमधून प्रवास करायची इच्छा नव्हती तर त्यांनी त्या विमानातून दिल्लीला न जाता ज्यात व्यवसायवर्गाची सोय आहे असे विमान बघून त्यातून प्रवास करायला हवा होता. ते न करता हे जनता क्लासमध्ये बसून दिल्लीला पोहोचले आणि नंतर मला व्यवसाय वर्ग का दिला नाही म्हणून वादविवाद सुरू केला. जर विमानात व्यवसायवर्गाची आसने असतानासुद्धा यांना ते आसन न देता जनता क्लासमधून प्रवास करायला लावला असेल तर ते नक्कीच चु़कीचे आहे व त्यांची तक्रार योग्य आहे. पण विमानात तशी आसने नसताना सुद्धा हे त्याबद्दल तक्रार कसे करू शकतात. मुंबईत बोरीबंदर स्थानकावरून फास्ट लोकलची घोषणा ऐकूनसुद्धा फास्ट लोकलमध्ये बसून नंतर ती लोकल दादरनंतर थेट अंधेरीलाच थांबली, मला तर माटुंग्याला उतरायचे होते, पण यांनी मुद्दामच लोकल माटुंग्याला थांबवली नाही अशी तक्रार एखाद्याने केली तर ते हास्यास्पद होणार नाही का? किंवा "शुद्ध शाकाहारी भोजन" असा फलक लावलेल्या उपाहारगृहात शाकाहारी थाळी चेपल्यानंतर बिल द्यायची वेळ आल्यावर "माझ्यावर अन्याय झाला. मला मटण वाढलेच नाही. मला तक्रार करायची आहे." अशी भूमिका किती हास्यास्पद होईल. इथेही तसेच झाले आहे.खरंतर खासदाराची चूक आहे. एअर इंडिया मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून तक्रारपुस्तिका न देता मोदींकडे उलट गाऱ्हाणं मांडण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख खासदार विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.मोदींकडे तक्रार केल्यास मोदी व्यक्तिशः लक्ष घालून तक्रारीची दखल घेतात हा विश्वास मोदींनी कमावला आहे. त्यामुळे मोदींचे नाव सांगणे अजिबात चुकीचे नाही. खासदार ज्या शाळेत जातात त्या शाळेचे मोदी मुख्याध्यापक आहेत. या महाशयांनी अत्यंत हास्यास्पद कारणावरून विमान अडवून धरले होते व त्यामुळे इतर प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे कर्मचार्याने योग्य तेच केले आहे.उद्दाम आणि सडकछाप अमित शहा ह्यावर एक लेख लिहाचमी काय म्हणतो मोहिते साहेब.. तुम्ही सतत दुसर्याला लेख लिहायला का सांगता..? तुम्हाला एखादा विषय / व्यक्ती / घटना टोचत असेल तर तुम्ही अभ्यास करून लेख लिहा आणि मग जी काय चर्चा व्हायची ती होवूदे. लोकांनी लेख लिहावेत मग मी मते मांडणार ही भूमीका किती दिवस चालणार..?लेख लिहा लेख लिहा हि भूमिका आपली असते मोदक साहेब .हो असते आणि फक्त तुमच्या बाबतीत, कारण तुम्ही स्वत: दुसर्याला तशी आवाहने करता म्हणून.अभ्यासुपूर्ण..मी काही अश्या विषयांवर लेख लिहीत नाही प्रतिसादांसाठी . अनेक विषय आहेत वेगळे .हे नक्की काय लिहिले आहे ते मला कळाले नाही. प्रतिसादांसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या भूमीकेसाठी आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी लेख लिहावा असे पूर्वी / आत्ता सुचवले आहे.आणि मला कोण टोचत नाही , दुटप्पी भूमिका टोचते .तेच. जे काही टोचत असेल त्यासाठीच सांगतोय. लेख लिहा आणि मग टोचणे बंद होते का ते बघा. तुम्हाला टोचत असलेल्या गोष्टींवरपण दुसर्याने इलाज शोधावा अशी अपेक्षा आहे का..?मी भाषा सोडून पण बोलत नाही कधीहे मी बोललो नाहीये. त्यामुळे पास.कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, अरेरावी, शिवीगाळयुक्त वागण्याचे आणि धक्काबुक्कीचे हे उघड समर्थन आहे, नाही का?नाही. कर्मचार्याने असे केले आहे हे सिद्ध झालेले नाही किंवा मी हे केले अशा फुशारक्या कर्मचार्याने मारलेल्या नाहीत.खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहेत? पुरावे आहे त का आपल्याकडे काही?विमानातून उंचावरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे हे एखाद्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेच समजले जाते. __________________________________________________________________________________________ कर्मचार्याचे व्हर्जन असे आहे. Mr. Gaikwad had travelled by Air India Pune-Delhi flight (AI 852) on Thursday and hit the employee with his slippers after the plane landed in Delhi. He was travelling on an open ticket and was miffed with the fact that he was not allotted a business-class seat on the all-economy flight. He also refused to deboard from the aircraft for an hour, following which a team of airline officials tried to reason with him as the plane was to fly on the Delhi-Goa sector next. “When I asked my crew what was causing the delay, they told me all passengers, except one, had disembarked from the plane. They told me he was sitting in the front row and was saying he was an MP and that wanted to meet the senior management,” he recalled. Mr. Sukumar then went into the aircraft to talk to the MP. “He asked me who I was and that he would only speak to the senior management. He also asked me to call the CMD,” the employee added. “I told him I couldn’t and that I would complain to his higher-ups, if required to Modiji. As soon as I said that, he took out his slippers and started hitting me,” Mr. Sukumar said. “He also tried to push me through a door of the aircraft. I ducked and came to another door where the step-ladder was positioned. But he tried to lift me and throw me off the ladder. My colleagues then stopped him,” he added. The MP also broke Mr. Sukumar’s spectacles and tore his sweater. The MP later boasted that he slapped the AI employee “25 times” and refused to apologise. - आपण त्या कर्मचार्याला चपलेने २५ वेळा मारले असे दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी सांगितले आहे. - गायकवाडांनी त्या कर्मचार्याला चपेलेने मारले व विमानाच्या दारातून शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न केला असे त्या तुमच्या हवाईसुंदरीनेच सांगितले आहे. - http://www.timesnow.tv/india/video/watch-shiv-sena-mp-threatens-to-push-air-india-staff-member-off-the-plane/58017 The video shows Gaikwad first threatening to push the staffer off the stairs leading out of the aircraft. "No no, don't do that sir, don't do that," an Air India staff member is heard shouting when the MP tries push the staff member towards the exit of the flight. Ravindra Gaikwad, Shiv Sena's Lok Sabha MP, boasted about this incident when he was confronted by the media earlier in the day. "Yes. I hit him. I wanted to throw him out of the plane," the Shiv Sena MP told TIMES NOW. "Is he really an officer. He is not even a buffalo cart driver. He doesn't know how to deal with customers," Gaikwad had even demanded an apology from Air India. "I have no regrets. First, that person should ome and apologise to me and then the Air India CMD should also come and apologise. "परत एकदा तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढले आहेत. पुरावे कशाला म्हणतात हे सांगावे लागेल काय? ते कर्मचारी महोदय काहीही सांगतील, त्याला पुरावा काय? आणि हवाईसुंदरीच्या बातमीवर शेवटी तुम्हाला हव्या त्या वर्तमानपत्राचा आणि हव्या त्या अर्थाचा पुरावा मिळाला म्हणून आता विश्वास बसतोय का? मी टाकलेल्या सर्व लिंकस् परत एकदा वाचण्यास हरकत नसावी.तुम्हीच विचारलं होतंत की खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहात. म्हणूनच मी वेगवेगळे संदर्भ दिले. हवाईसुंदरी त्याबद्दल सांगतेच आहेत. परंतु दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी देखील आपण कर्मचार्याला ढकलण्याचा प्रयत्न केला याची कबुली दिली आहे. कर्मचार्याने देखील हेच सांगितले आहे. या प्रकरणातील फिर्यादी, आरोपी व साक्षीदार हे तिघेही ही घटना घडल्याचे सांगत आहेत.शेवटी काय तुम्हाला फुशारक्या आणि घडलेला प्रसंग यातला फरक ओळखता येत नाहीये. अर्थात कोर्टाला तो येतो, त्यामुळे तिथे काय होते ते बघूच. खरतर कर्मचार्यांनीच खासदारांना विमानात नेऊन मारहाण करण्याचा (याला तुमच्या लॉजिकने खून करण्याचा असे म्हणता येईल का?) उल्लेख विडिओत स्पष्ट ऐकू येत आहे.कोणत्या चित्रफितीत? मी पाहिलेल्या कोणत्याही चित्रफितीत असा उल्लेख ऐकलेला नाही."The air hostess said that the Shiv Sena MP was only trying to pull up the duty manager for his misdemeanour and said that he had no intentions of throwing him down the ladder."मटा ने दिलेल्या वृत्तात खासदार महाशयांनी कर्मचार्याला मारहाण केली व विमानाच्या शिडीवरून ढकलायचा प्रयत्न केला असे हवाईसुंदरीने सांगितल्याचे लिहिले आहे. मी वर दिलेल्या संदर्भात सुद्धा हवाईसुंदरीने हेच सांगितले आहे.