Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अ
अत्रे
Mon, 03/27/2017 - 07:34
🗣 592 प्रतिसाद
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
94896 वाचन

💬 प्रतिसाद (592)
अ
अत्रे Wed, 03/29/2017 - 10:58 नवीन
असेल असेल. समाजप्रबोधनाची गरज सगळीकडेच असते.
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अभ्या.. Wed, 03/29/2017 - 11:04 नवीन
सामना चे अग्रलेख वाचूनच शिकलोय :)
अरारारारा, अहो ते स्वतःचे नाव पत्ता देऊन लिहून छापणारे पब्लिक आहेत हो. काय झाले गेले तर निस्तरायची धमक आहे त्यांची. कशाला उगा न झेपणारे आदर्श घेताहात?
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Wed, 03/29/2017 - 11:11 नवीन
हे मात्र बरोबर बोललात. इंटरनेट anonimity मुळे माझ्यासारख्या नागरिकांना फायदाच झालेला आहे. जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते. सध्या तरी मी यांचा तात्पुरता माज उतरलेला पाहून संतुष्ट आहे. मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही.
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 03/29/2017 - 11:29 नवीन
जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते. ह्याला निर्भयपणा म्हणत नसतात हो, ट्रोलिंग म्हणतात. असल्या भाषेत लिहून मोकळे व्हायचीच भावना होत असेल तर मग डायरी ठेवा ना.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Wed, 03/29/2017 - 11:46 नवीन
मग डायरी ठेवा ना.
कशाला. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे ना मला! फुकट कशाला घालवू ते. आणि इतरांना व्यक्त होताना बघून जे व्यक्त झाले नाहीत त्यांनाही हुरूप येईल.
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 11:42 नवीन
मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही. नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुंबईत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे एका महाविद्यालयीन मुलीने चेपुवरील आपल्या भिंतीवर "बाळासाहेब ठाकरे गेले म्हणून बंद पाळणे योग्य नाही" अशा अर्थाची १-२ वाक्ये लिहिली होती. तिच्या एका मैत्रिणीने तिची पोस्ट लाईक केली होती. शिवसेनेच्या एका स्वाभिमानी, मर्दमावळा, शिवाजी महाराजांचा चेला, वाघ वगैरे असलेल्या कार्यकर्त्याने ही पोस्ट पाहिल्यावर त्याचे डोके फिरले आणि लगेच त्याने पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करायला लावली. त्यानंतर लगेच सेनेच्या टोळक्याने तिच्या काकांच्या रुग्णालयात धुडगूस घालून मोडतोड केली. त्या दोन्ही मुली नंतर इतक्या घाबरल्या की त्यांनी पालघर सोडून गुजरातमध्ये शिकायला गेल्या. २००१ मध्ये आनंद दिघेंचे सिंघानिया रूग्णालयात निधन झाल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे हल्ला करून रूग्णालयाला आग लावली व प्रचंड मोडतोड केली ज्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. सर्वसामान्य नागरिकांनी असल्या गुंडांच्या टोळीला घाबरूनच राहिले पाहिजे.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अभ्या.. Wed, 03/29/2017 - 12:17 नवीन
पक्षात सर्वसाधारणपणे कीती गुंड कार्यकर्ते अन त्यांच्यावर एफायार असल्यावर त्याला गुंडांची फौज म्हणायची पध्दत आहे? आगी लावणे अन कोट्यावधींचे नुकसान करण्याच्या घटनांबद्दल ते काम पक्षाच्या गुंडानीच केले, ह्यात चिडलेले जनमानस वगैरे काही नव्हते असे आपणास म्हणायचे आहे का?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 17:03 नवीन
आगीसाठी कारणीभूत पक्षातील गुंडांनी न करता चिडलेल्या जनमानसाने केले!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! छान युक्तीवाद!
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 03/30/2017 - 08:39 नवीन
आनंद दिघे गेले, का गेले त्याबद्दल अनेक सुरस कथा ऐकल्या आहेत. मला नक्की आठवत नाही पण बहुधा शिशिर शिंदेंच्या गाडीशी टक्कर झाली होती. एकवेळ डॉक्टर बद्दल राग पण समजू शकतो पण जनक्षोभ असेल तरी काहीही संबंध नसलेल्या रुग्णांना त्रास देणे हा तर सरळ रानटीपणाच.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभ्या.. गुरुवार, 03/30/2017 - 09:52 नवीन
अहो माझा नाही हा युक्तीवाद. आठवत नसेल तर ताण द्या बरं जरा. कुठे झाला होता बरं असा जनक्षोभ? ठाण्यापेक्षा बराच मोठा होता हो तो.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक गुरुवार, 03/30/2017 - 10:40 नवीन
गोध्रा का बाबरी..?
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 03/30/2017 - 12:37 नवीन
मी इन जनरल लिहिले आहे. तुम्हाला उद्देशून नाही.
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आजानुकर्ण Wed, 03/29/2017 - 14:29 नवीन
गुरुजींशी सहमत. शिवसेना ही गुंडांचीच एक टोळी आहे. इथे त्या खासदाराच्या वागण्याचे समर्थन करणारे लोक पाहून जुन्या चर्चांची आठवण आली. http://www.misalpav.com/node/23211 http://www.misalpav.com/node/23207 (अलीकडे गुरुजींशी काही काही बाबतीत सहमत होत असल्याचे मला आश्चर्य वाटत आहे.)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वरुण मोहिते Wed, 03/29/2017 - 12:03 नवीन
टुकार पक्षच कार्यकर्ते ? कुठले कुठले पक्ष आहेत ? लिस्ट द्या माझ्याकडे १० -२० गुंडांची फौज आहे नक्की हा खरं..जस्ट एक चर्चा म्हणून. म्हणजे कुठले पक्ष कुठले कार्यकतें ??
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Wed, 03/29/2017 - 12:05 नवीन
जाऊ द्या ना बाळासाहेब!
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
विशुमित Wed, 03/29/2017 - 13:07 नवीन
तंतरली वाटते धागा लेखकाची. डायरेक्ट बाळासाहेबांचाच धावा चालू केला. माणसाने सोसेल एवढ्याच फुशारक्या माराव्यात.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Wed, 03/29/2017 - 13:17 नवीन
शेवटचे वाक्य मस्त आहे. लक्षात नाही ठेवले तर विमानातून उडता येत नाही. :)
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अनुप ढेरे Wed, 03/29/2017 - 13:28 नवीन
हा हा हा!
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अभ्या.. Wed, 03/29/2017 - 13:59 नवीन
एकदा नावगाव लपवले की निर्लज्जपणे कसेही उडता येते हे मात्र लक्षात आले.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Wed, 03/29/2017 - 14:44 नवीन
सेम, सेम! एकदा गुंडांची फौज पाळली की कसेही अग्रलेख लिहिता येतात. :)
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
वरुण मोहिते Wed, 03/29/2017 - 12:11 नवीन
किती दिवसांपासून असे वाद चालू असतात त्यात बोलताना भाजप समर्थकांनी जी पातळी सोडली लोकांना नावे ठेवताना ती कोणीच सोडली नाही . बाकी एकदा काय झालं माहितीये बजरंग दलामुळे अनेक मुली पळून गेल्या . आपण वरील घटना जी सांगत आहेत पालघर ची त्यात त्यांच्या आक्षेपार्ह कमेंट्स होत्या ते पण चुकीच्या वेळेला . मुलींच्या बाबतीत संघीय भूमिका माहिती असावी अशी अशा करतो . अजून एकदा काय झालं संघामुळे ना एक हॉस्पिटल फोडावे लागले बंगलोर ला. अजून एकदा काय झालं ते तुम्ही सांगा मी सांगत राहतो .
म
मराठी_माणूस Wed, 03/29/2017 - 12:15 नवीन
एक विचार त्या अधिकार्‍याने, आपण सेवा क्षेत्रात काम करत आहोत याची जाणीव ठेउन , शांतपणे समजावले असते , चुक मान्य केली असती , त्यांच्या परीने काय मार्ग काढाता येईल ते सांगीतले असते तरी असेच घडले असते का ?
व
विशुमित Wed, 03/29/2017 - 13:04 नवीन
हा सयंत विचार अगदी पटला. त्या अधिकाऱ्यासाठी गायकवाड हे प्रथम त्यांचे ग्राहक होते नंतर खासदार एवढा संकेत पाळला असता तर त्याला २५ जोडे खावे लागले नसते. आणि मोदीजी काय कॉल सेंटर ऑपरेटर आहेत का विमान वाहतूक वाल्यांचे?
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
श
श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 17:05 नवीन
त्या अधिकार्‍याने, आपण सेवा क्षेत्रात काम करत आहोत याची जाणीव ठेउन , शांतपणे समजावले असते , चुक मान्य केली असती , त्यांच्या परीने काय मार्ग काढाता येईल ते सांगीतले असते तरी असेच घडले असते का ? चूक मान्य केली असती??????? त्या कर्मचार्‍याने नक्की कोणती चूक मान्य करायला हवी होती व त्या चुकीतून मार्ग काढायला हवा होता?
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/29/2017 - 13:32 नवीन
मानले... पेंग्विनसेना समर्थकांना मानले. कोणत्याही परिस्थितीत आपल्याच पक्षाचे कडवे समर्थन कसे करावे, संबंधित मनुष्य खासदार असल्यामुळे या प्रकरणात कायद्याची बूज राखायची जास्त जबाबदारी त्याच्याकडे होती वगैरे प्रश्नांना मनात जराही येऊ न देता वर इतर पक्षांच्या समर्थकांना भक्त कसे म्हणावे हे पेंग्विनसेना समर्थकांकडूनच शिकावे. मानले... पेंग्विनसेना समर्थकांना मानले.
अ
अमर विश्वास Wed, 03/29/2017 - 13:38 नवीन
अभ्या / मोहिते / विशुमित प्रतिक्रिया वाचुन गम्मत वाटली भाजप ला फाटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना एक गोष्ट लक्षात नाही का? या खासदारसाहेबांनी एका माणसाला २५ वेळा चपलेने मारले .. वर ही गोष्ट अभिमानाने सांगितली ... ह्या गोष्टीचे तुम्ही अप्रत्यक्षपणे समर्थन करीत आहात
व
विशुमित Wed, 03/29/2017 - 14:10 नवीन
भाजपचा इथे कसा संबंध जोडला कळले नाही ? उलट भाजप वासियांनाच जास्त जोर चढलेला दिसला आहे. वरून आम्ही गुंडाना घाबरतो म्हणून पदरा आडून ठुसक्या सोडत आहेत. अधिकाऱ्याने मोदींना कशाला ओढलं मध्ये ? प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला? सर्वात महत्वाचं आम्ही (पक्षी: मी) कोणाचं आणि कशाचं समर्थन करायचं याची पण परवानगी घ्यावी लागणार का मिपावर?
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अप्पा जोगळेकर Wed, 03/29/2017 - 14:30 नवीन
प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला? गायकवाडने तर फुशारक्या मारल्या होत्या. निषेध केल्याचे आठवत नाही. एक नंबरचा उद्दाम, बिनडोक माणूस आहे. (माझे नाव सौरभ जोगळेकर असून मी चिंचवडमधे राहतो. मी पेंग्विनसेना, गायकवाड, राष्ट्रवादी, शरद पवार यांचा जाहीर विरोधक आहे. नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचा जाहीर समर्थक आहे. मी गायकवाड बद्दल केलेल्या सगळ्या विधानांची जबाबदारी घेतो. (संपादित) )
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/29/2017 - 14:33 नवीन
चिंचवड मध्ये कोठे?
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विशुमित Wed, 03/29/2017 - 14:37 नवीन
(संपादित) "सभासदांनी आपल्या भाषेवर ताबा ठेवावा आणि वैयक्तिक शेरे मारणे टाळावेत. संभाषण केवळ मुद्द्यांपुरते सीमीत ठेवावे." --- संपादक मंडळ
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अमर विश्वास Wed, 03/29/2017 - 14:44 नवीन
<<परत आम्ही २५ वेळा जोड्याने मारल्यावर सहन नाही होयचा अप्पाना..!!>>> ही जाहीर धमकी समजायची का?
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/29/2017 - 16:57 नवीन
अप्पा आपली लायकी आणि लेवल समजली...!!
हे आणि
संपादकांनी लक्ष घालावे..
हे ही दोन वाक्ये एकाच दमात कसे लिहू शकता हो?तुमच्या कॉन्फिडन्सचे (की फाजील आत्मविश्वासाचे) खरोखरच कौतुक वाटते.
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 03/29/2017 - 17:18 नवीन
सर्व जुन्या जाणत्या सदस्यांना (लहान तोंडी मोठा घास घेऊन) विनंती करतो की थोडं सबुरीने घ्यावे. उगाच वैयक्तिक मुद्दे आणि गुद्दे कशाला? सर्वांचेच वेगवेगळे दृष्टिकोन आणि मतं असू शकतात आणि त्याला मुद्देसूदपणे काउंटर केलं जाऊ शकतंच ना? बाकी आपण सगळे सुज्ञ आहोतच! आक्षेपार्ह्य वक्त्यव्य गाळल्याबद्दल संपादकांचे आभार!
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/29/2017 - 17:24 नवीन
उगाच वैयक्तिक मुद्दे आणि गुद्दे कशाला? सर्वांचेच वेगवेगळे दृष्टिकोन आणि मतं असू शकतात आणि त्याला मुद्देसूदपणे काउंटर केलं जाऊ शकतंच ना?
सहमत आहे. पण ज्यांनी इतरांची लायकी आणि लेवल काढली त्यांना हे सर्वप्रथम लागू आहे असे वाटत नाही का?
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 03/29/2017 - 17:36 नवीन
हो, म्हणूनच सर्व जुन्या जाणत्या असा उल्लेख केला. तुमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देताना फक्त तुम्हालाच उद्देशून असा हेतू नव्हता. गैरसंजबद्दल दिलगिरी.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विशुमित गुरुवार, 03/30/2017 - 08:12 नवीन
सहमत आहे. पण ज्यांनी इतरांची लायकी आणि लेवल काढली त्यांना हे सर्वप्रथम लागू आहे असे वाटत नाही का? ==>> अप्पानी आणि मी आमचा प्रश्न सोडवला आहे. संपादकांनी पण त्यांचे काम चोख बजावले आहे. तुम्ही का एवढे टरिला लागले समजले नाही.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 17:32 नवीन
(संपादित) हे वक्तव्य सुद्धा आक्षेपार्ह आहे. ही तर उघडउघड धमकीच आहे. हे वक्तव्या सुद्धा काढून टाकले पाहिजे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 03/29/2017 - 17:34 नवीन
सहमत!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/29/2017 - 17:39 नवीन
सहमत आहे. अशाप्रकारच्या धमक्या मिपावर राहू दिल्या तर मिपा हे सुसंस्कृत लोकांचे संकेतस्थळ आहे या समजाला तडा जाईल.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
विशुमित गुरुवार, 03/30/2017 - 07:03 नवीन
चर्चा चांगली चालली असताना त्यांनी अपशब्द वापरले आणि आम्ही फक्त त्याचे परिणाम काय होतील हे नमूद केले होते. असो... आम्ही आमची पातळी सोडणार नाही, याची ग्वाही देतो..!!
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 03/30/2017 - 07:38 नवीन
मी ड-३०५, डीएसके कुंजबन, पुनावळे, चिंचवड येथे राहतो. माझ्याकडून चुकीची भाषा वापरली गेली त्याबद्दल. दिलगीर आहे. ही दिलगीरी रविंद्र गायकवाड बद्दल केलेल्या विधानासाठी नाही. माझ्या प्रतिसादातील चुकीच्या भाषेसाठी आहे. हे लक्षात घ्यावे. गायकवाड बद्दलची माझी मते ठाम आहेत. माझ्यापुरता विषय संपला. तुम्हाला जे योग्य वाटते ते करावे.
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अमर विश्वास Wed, 03/29/2017 - 14:36 नवीन
विशुमित <<<सर्वात महत्वाचं आम्ही (पक्षी: मी) कोणाचं आणि कशाचं समर्थन करायचं याची पण परवानगी घ्यावी लागणार का मिपावर?>>> माझ्या प्रतिसादात परवानगी असा उल्लेख तरी आहे का? बाकी तुम्ही तुमच्या विचारसरणीनुसार कशालाही / कुणालाही सपोर्ट करा .. काय फरक पडतो ? पण विरोधी मते ऐकायची तयारी ठेवा .. या खासदारसाहेबांच्या वागण्याचे कुठल्याच पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही. सर्वप्रथम त्यांनी आपल्या कृत्याची माफी मागितली पाहिजे
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 03/29/2017 - 14:39 नवीन
तुमच्या आणि माझ्या समर्थनाला कोण विचारतो इथे?
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
श
श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 17:13 नवीन
अधिकाऱ्याने मोदींना कशाला ओढलं मध्ये ? गेल्या २-३ वर्षात अनेकवेळा असे दिसून आले आहे की मोदी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू इ. नेत्यांशी ट्विटर किंवा इतर माध्यमातून आपल्या समस्यांबद्दल संपर्क साधला तर ते तातडीने त्यात लक्ष घालतात. एका उदाहरणात रेल्वेचा एक टीसी पैसे मागत असताना त्या प्रवाशाने सुरेश प्रभूंच्या ट्विटर खात्यावर याची माहिती दिल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्‍यांशी संपर्क केला व त्या टीसीला पुढील स्थानकावर उतरवून निलंबित करण्यात आले. दुसर्‍या एका प्रकरणात एका महिलेला रेल्वेत प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तिच्या यजमानांनी ट्विटरवरून प्रभूंशी संपर्क केल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. परदेशस्थ भारतीयांना परदेशात येणार्‍या समस्यांबद्दल सुषमा स्वराजांशी संपर्क साधल्यानंतर आपल्या समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. शस्त्रक्रिया किंवा इतर काही गोष्टींसाठी मोदींच्या ट्विटर खात्यावर माहिती दिल्यानंतर मोदींनी व्यक्तिशः लक्ष घालून मदतीची व्यवस्था केल्याचेही वाचले आहे. मोदी किंवा इतर काही नेते आपल्या समस्येत व्यक्तिश: लक्ष घालून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात हे आता सर्वश्रुत असल्याने, या खासदार महाशयांनी विमान अडवून ठेवून अरेरावी सुरू केल्यावर त्या कर्मचार्‍याने मोदींकडे तक्रार करीन असे सांगणे योग्यच आहे कारण त्यामागे मोदींनी कमावलेला विश्वास आहे.
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 03/29/2017 - 17:32 नवीन
मोदकजी, मोदींचं नाव हे त्या "इतर" प्रकरणांसारखे पोजीटीव्ह स्पिरिट मध्ये घेतले गेले होते असे आपल्याला खरेच वाटते का? "आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो और शांतिसे बात करो, क्यूँ बीपी बढाके के ले राहे हो" यावर "तू पहले निचे उतर, तू एमपी हॊगा घरका, मै भी मोदीको बताउंगा" इथून ते वैयक्तिक भांडण सुरु झाले असावे. तिथून ते शिवीगाळ आणि धक्काबुक्कीमुळे वाढतच गेले असावे. याला राजकीय रंग व फक्त सेवा दिली नाही म्हणून चपलेने फोडून काढले असा रंग देणे पटत नाही. त्यांनी मारहाण केली असेल तर त्यांच्यावर मारहाण केल्याबद्दल कायद्यात असते ती शिक्षा व्हायला हवीच, पण त्याच वेळी एका संसद सदस्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि अरेरावी झाली असेल तर ती करणार्यांना सोडले जाऊ नये असे वाटते.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 03/29/2017 - 17:38 नवीन
दुरुस्ती : चुकून मोदकजी लिहिलं, श्रीगुरुजी असं म्हणायचं होतं
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
म
मोदक गुरुवार, 03/30/2017 - 04:24 नवीन
काय राव हतोळकर... माझ्या भावना दुखावल्या की वो..! =))
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 03/30/2017 - 08:19 नवीन
आय मायस्वारी बर्र का, घ्या सांभाळून :):).
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 17:42 नवीन
"आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो और शांतिसे बात करो, क्यूँ बीपी बढाके के ले राहे हो" यावर "तू पहले निचे उतर, तू एमपी हॊगा घरका, मै भी मोदीको बताउंगा" इथून ते वैयक्तिक भांडण सुरु झाले असावे. ही वाक्ये ज्या चित्रफितीत ऐकू येतात त्या चित्रफितीची लिंक आहे का?
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 03/29/2017 - 17:48 नवीन
चपलेने २५ वेळा (२५ वेळा सोडून द्या एक वेळाही) मारले हे कुठल्या चित्रफितीत दिसले? खासदारांनी सांगितले म्हणूनच ते वापरले जातेय ना? मग हे खासदारांनीच सांगितले आहे (त्यांच्या प्रतिक्रियांचे विडिओ बघून घ्या). शिवाय त्या हवाईसुंदरीने साधारण ह्याच लाईनवर सांगितले आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा