Welcome to misalpav.com

झिंगूनी गुत्त्यात सार्‍या...

लेखक: धन्या | प्रसिद्ध:
गझलसम्राट सुरेश भटांची माफी मागून "थट्टीफस" निमित्त: झिंगूनी गुत्त्यात सार्‍या मी हो नाही बेवडा दाबले जरी चिकनचिली मज वाटे ते घेवडा कोण जाणे कोठुनी हे नवे दोस्त आले पुढे मी असा की जमे "असा" मित्रमेळा एव्हढा असे ही खिशात माझ्या चपटी औषधापरी हे कंट्रीचे प्रेम माझे देशभक्त मी हो केव्हढा कोणत्या इयत्तेत कळेना मी प्यावयास लागलो अन्‌ कुठे मित्र गेले पुढे मी विकत राहीलो वडा सांगती गुण माझे सारखे बायको अन्‌ चार पोरे नवरा माझा दारुडया अन्‌ बाप आमचा बेवडा न पिणार्‍यांच्या मध्यरात्री झिंगणारा स्वच्छंदी मी त्रास नको घरच्यांना म्हणून बाहेर राहतो एव्हढा


तांबडा-पांढरा व्हाया स्ट्रॉबेरी

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
बरेच महिन्यांपासून एका मोठ्या ब्रेकच्या प्रतिक्षेत होतो. कामाच्या वाढ्त्या मापामुळे तो ब्रेक घेणं जमत नव्हतं. मग शेवटी वेळ मिळालाच. कुठे जायचं हा एकच प्रश्न होता. गोवा म्हणावं तर क्रिसमस चा काळ, म्हणजे मुंबईच नाही तर देशभरातून तिथे गर्दीचे लोंढे आलेले असणार, मग कलकलाटापासून लांब जाणं होणारच नाही, त्यामुळे गोवा बाद. कोकणात जाणं शक्य होतं, पण ते इतर वेळी होतच राहतं. मग कुठे? क... कोल्हापूर ! असं लई भारी डेस्टिनेशन सुचलं, शिक्कामोर्तब झालं. कसं जायचं हे आधीच फिक्स होतं.....


काही वेगळे चित्रपट....

लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:
मला चित्रपट परीक्षण किंवा पुस्तक परीक्षण जमत नाही, त्यामुळे तुम्ही चित्रपटाविषयी काही वाचायला ह्या धाग्यावर आला असाल तर, मी प्रथमतः माफी मागतो. गेली कित्येक वर्षे मी फक्त मराठी नाटके आणि इंग्रजी सिनेमे बघतो. गेल्या काही महिन्यांतील मला आवडलेले सिनेमे लिहीत आहे. १. रन लोला रन => एकाच तिकीटात ३ सिनेमे २. इन्सेपशन ==> निव्वळ खतरनाक "लिओनार्डो डिकाप्रिओ"च्या प्रेमात पडला नसाल तर नक्की बघा. ३. व्हँटेज पॉइंट ==> पैसा वसूल , थ्रिलर पटच पण वेगळ्या पद्धतीने घेतलेला. ४. मिलियन डॉलर बेबी ===> क्लिंट इस्ट्वूड आणी हिलरी स्वांक अधिक मॉर्गन फ्रीमॅन,,, अजुन काय पाहिजे? ५.


भटकंती ३

लेखक: इन्ना | प्रसिद्ध:
असच काहीबाही आयुष्यात काही भारी माणसं भेटतात. विविधरंगी, प्रसंगी चक्रावून टाकणारे, विचार करायला लावणारे अनुभव देऊन जातात. ह्या उन्हाळी सुट्टीत मी आणि माझा मुलगा, वय वर्षं १४, जर्मनी भटकायला गेलो होतो. १२-१३ दिवसांत, बर्लिन, म्युनिक, स्टुटगार्ट, हायडेलबर्ग असा ढोबळ प्लॅन होता. जर्मन फुटबॉल आणि जर्मन गाड्या हे लेकाचं माझ्याबरोबर येण्याचं कारण. ह्यावेळच्या दौर्‍याचं वैशिष्ट्य म्हणजे मुक्काम वेगवेगळ्या स्थानिक लोकांच्या घरी होता. बर्लिनमध्ये माझी आर्किटेक्ट मैत्रीण, म्युनिकमध्ये तिचा भाऊ, स्टुटगार्टमध्ये एक स्पॅनिश फॅमिली आणि हायडेलबर्गमध्ये एक मेक्सिकन.


छायागीत १ - तु मेरे सामने है, तेरी जुल्फें है खुली, तेरा आंचल है ढला…

लेखक: Atul Thakur | प्रसिद्ध:
रफी आणि मदनमोहनने हिन्दी चित्रपट संगीतात जी क्लासिक गाणी दिली त्यापैकी एक महत्वाचे गाणे म्हणजे “तु मेरे सामने है”. गुरुदत्त म्हटलं की “प्यासा”, “चौदहवी का चांद”, “साहब बीवी और गुलाम” किंवा “कागज के फूल” आठवणार्‍यांना “सुहागन” आठवणार नाही कदाचित. मात्र अस्सल संगीतप्रेमीच्या नजरेतुन (कानातुन?) हे गाणे सुटणे अशक्य. मदनमोहन मुळातच गायकाची प्रकृती, गाण्याची पार्श्वभुमी या सार्‍या गोष्टी पाहुन गाणे देणारा संगीतकार.


छद्मयुद्ध-२

लेखक: कैलासवासी सोन्याबापु | प्रसिद्ध:
http://www.misalpav.com/node/26601 छद्मयुद्ध -१ वरील लिंक वर वाचा --------------------------------------------------------------------------------- एपीसोड १ - खुलासा स्थळ - रॉ हेड क्वार्टर्स, दिल्ली आज तिने जवळपास १ वर्षाने साधी ब्लू डेनिम अन एक फ़ॉर्मल पांढरा शर्ट घातला होता, केस मोकळे सोडले होते, मेबलिन ची हल्कीशी आय लायनर पुरेशी होती निलोफ़र उर्फ़ गौरी साठी, लावण्यखनी म्हणावी अशी २६ वर्षांची टीपिकल "दिल्ली दी कुडी" वाटणारी गौरी, अनार्म्ड कॉंबॅट अन बेटन फ़ायटींग मधे सगळ्यांची आई असल्याचे फ़क्त शहादरा स्टेशन वरच्या २ "मनचल्यांना" पुरे कळले होते!. तिकडे दिलशाद गार्डन मधे करण उर्फ़ अश्फ़ाक


छद्मयुद्ध -१

लेखक: कैलासवासी सोन्याबापु | प्रसिद्ध:
एपीसोड १ :- रुटीन स्थळ :- प्रोफ़ेसर्स रेसिडेंट क्वार्टर्स,खान रिसर्च लेबॉरेटोरी, कहुटा, पाकीस्तान वेळ :- सकाळी ०८०० प्रो. रहीम खुर्रम आज फ़ुल मुड मधे होते, मुखात गुलाम अली साहेबांची " चुपके चुपके रात दिन आंसु बहाना याद है" गझल होती, त्याला कारण ही तसंच होतं त्यांची लाडकी परवीन आज चक्क त्यांच्याकडे पाहुन हसली होती, "खुदा तुझे लाख शुक्रिया" म्हणता म्हणता प्रोफ़ेसर साहेबांचे डोळे पाणावले, पाणावणार होतेच, २३ वर्षांचे होते ते फ़क्त बी. टेक झाले तेव्हा.


उळळागड्डी , एक अप्रतिम एकांकिका.

लेखक: विशाल चंदाले | प्रसिद्ध:
नुकतच पुरोषोत्तम करंडक आणि इतर राज्य स्पर्धेत ह्या वर्षी अव्वल ठरलेली एकांकिका 'उळळागड्डी' पाहण्याचा योग आला. बरेचसे प्रेक्षक विचारत होते "उळळागड्डी म्हणजे काय हो?". कोणी विचारत होतं , " काय हो विनोदी आहे का एकांकिका?". पण आम्हीहि केवळ पुरोषोत्तम करंडक विजेती आणि उत्सुकता यापोटीच आलो होतो, यापलीकडे काहीच माहित नव्हतं. एकांकिका खरं तर दिलेल्या वेळेपेक्ष्या बऱ्याच उशिराने सुरु झाली त्यामुळे प्रेक्षक खूप वैतागले होते. त्या नाराजी मुळे प्रेक्षकांनी विनाकारण टाळ्या वाजऊन संयोजकांना हैराण करून सोडलं होतं. उठून निघून घरी येण्याचे विचारहि मनामध्ये येत होते (विनामूल्य असल्यामुळे).


टोपण नावे

लेखक: अत्रन्गि पाउस | प्रसिद्ध:
मराठीतील टोपण नावे आणि मूळ लेखकाचे नाव ह्यांची यादी करूयात का? १. कलंदर : अशोक जैन २. ठणठणपाळ : जयवंत दळवी ३. तंबी दुराई : ?? ४. ब्रिटीश नंदी : प्रविण टोकेकर


कुंडलिनी

लेखक: शरद | प्रसिद्ध:
कुंडलिनी कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे. निरनिराळ्य़ा लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळ्या प्रकारे झाल्याने तिच्या व्याख्या नानाविध प्रकारांनी केल्या आहेत. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत.