Welcome to misalpav.com

असा(गेलो) मी आसामी.

लेखक: बॅटमॅन | प्रसिद्ध:
अलीकडेच कामरूप देशातील प्राग्ज्योतिषपूर ऊर्फ गुवाहाटी येथे जाणे झाले. नरकासुराच्या राजधानीत चारपाच दिवस होतो पण मोकळा वेळ दीडेक दिवस असेल नसेल. तस्मात बघावयास कमी वेळ मिळाला. तरी तेवढ्यात काही गोष्टी पाहता आल्या. कामाख्या मंदिर अन वसिष्ठ मंदिर पाहता आले नाही :( कारण वेळही मिळाला नै अन शिवाय कामाख्या मंदिरात गर्दी सोडूनही बळी देणे खुंदल खुंदल के चालू असते असे तेव्हाच तिकडे गेलेल्या एका प्राण्याकडून कळाले. मग म्हटले मरो तेच्यायला. एरवी एशी हाटलात बसून समोर मस्त सजवलेले, मसालेदार गिरवीत न्हालेले मांसाचे तुकडे चापावयास काही वाटत नाही पण ते प्राणी मारताना पाहून नै म्ह्टले तरी पोटात अंमळ ढवळतेच.


टि टाईम स्नॅक्स प्रकार १ - अंडे के पकोडे

लेखक: दिपक.कुवेत | प्रसिद्ध:
Pakode साहित्यः १. उकडलेली अंडि - ३ २. हिरव्या मिरच्या/पेरभर आलं बारीक चीरुन ३. १/२ जुडि प्रत्येकि मेथी आणि पालक बारीक चीरुन ४. ओवा - १/२ चमचा ५. हळद - १/२ चमचा ६. बेसन - गरजेप्रमाणे ७. चवीनुसार मीठ ८. चाट मसाला (ऑप्शनल) ९. तळण्यासाठि तेल कॄती: १. पकोडे तळण्यासाठि मंद आचेवर कढईत तेल तापत ठेवा २. एका मोठया बाउल मधे/भांडयात उकडलेली अंडि किसुन घ्या.