Welcome to misalpav.com

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ|| गेलो तुळशी मंजीरा घ्याया तेथे न तू गावला राया ||१|| गेलो राऊळी शोधाया शोध व्यर्थ गेला वाया ||२|| चंद्रभागेकाठी तू न सापडेना तुझ्याविण मन शांत होईना ||३|| शोध घेतला शोध घेतला अंती नाही तू भेटला ||४|| पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५|| - पाभे


अशाच एका सांज वेळी

लेखक: पंडित मयुरेश न… | प्रसिद्ध:
अशाच एका सांजवेळी भेट व्हावी आपुली अवेळी एकांत असावा तेव्हा तेथे नसावे कोणी अवतीभवती परतणार्या पक्षांचीही दाटी नसावी अवतीभवती काळोखातही लख्ख दिसावा चेहरा तुझा चन्द्रकोरीसारखा पापण्यांची उघड-झाप असावी जणु चमचमणार्या तारका गार वार्याची झुळुक येईल उब घ्यावीशी तुला वाटेल हातांचा ऊबदार स्पर्श अन् उश्वासांची साथ भेटेल मुकी जरी तु उभी असलीस पैंजण सारे बोलुन जातात चांदण्यात फिरावयास मग पाऊले अलगद चालु लागतात जरी शांतता असली चहुकडे गाणे मनी गुणगुणत असते तालावरती पावलांच्या सतार मनी छेडत असते निरोपाचा क्षण येतो जेव्हा वाट सापडु नये असे वाटते मी हसण्याचा प्रयत्न करतो पाणी तुझ्या डोळ्यात दाटते ---


जीर्णनगरी मुशाफिरी : प्रसन्नगडाचे प्रसन्न दर्शन.

लेखक: सुज्ञ माणुस | प्रसिद्ध:
जीर्णनगरी मुशाफिरी : चावंड किल्ला बरेच दिवस जुन्नरच्या मुलखात भटकंती झाली नव्हती. नाशिक जिल्हा आता जवळपास संपवून मोर्चा वळवला तो जुन्नर कडे. एकंदर जुन्नर चा इतिहास बघता, सुमारे २००० वर्ष जुना हा प्रदेश म्हणजे 'भौगोलिकदृष्ट्या' आणि 'ऐतिहासिकदृष्ट्या' महाराष्ट्राचा शिरेटोप म्हणता येईल. सातवाहन राजांच्या कालापासून हा प्रदेश प्रसिद्ध तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रदेश नागरी वस्तीखाली यायला, व्यापारदृष्ट्या येथून सुरुवात झाली असे कळते. तेव्हा हा प्रदेश सातवाहनांची उपराजधानी होती.