Welcome to misalpav.com

मिपाकरलक्षणे

लेखक: सस्नेह | प्रसिद्ध:
| जय जय रघुवीर समर्थ | समर्थांसी मनोभावे प्रार्थुनी, मिपाकरांची काही येक लक्षणे डोळियांस दिसली ती श्रोतींयांस विनयपूर्वक सादर . || श्रीमिसळपाव || | मिपाकरलक्षणनाम समास प्रथम | ओम नमोजी संस्थळचालका | नीलकांता मिपामालका | कृपादृष्टीं सदस्यलोका | अवलोकिजे |१| तुज नमू रेवतीतै | अक्षयकान्ते आणि पैसातै | धागीं ठेवी कृपाहस्ते | लेखकुंच्या |२| वंदुनिया सल्लागारचरण | करूनिया संपादकस्मरण | परिक्षणार्थ मिपकरलक्षण | बोलिजेल |३| येक वोरीजिनल एक डूआयडी | उभयलक्षणे सरळ-कानडी | येकयेका घालुन सांगडी | शब्द मांडिले |४| डूआयडीचे लक्षण | पुढिले समासी वर्णन | सावधपणे वाचकजन | परिसोत


खिम्याचे उन्डे

लेखक: वासु | प्रसिद्ध:
जे लोक नोन्-वेज खातात त्यान्च्यासाठी साहित्य: १ किलो खिमा १ चमचा आल्-लसुण पेस्ट ३ चमचे लाल तिखट १/२ चमचा हळद १/२ चमचा गरम मसाला १/२ चमचा धने मसाला मीठ तेल कृती: प्रथम खिमा धुवून घ्यावा. नन्तर दगडी खलबत्त्यात(मिक्सर चालेल) खिमा चान्ग्ले बारीक वाटावे. नन्तर एका ताटात खिमा काढुन त्यात आल्-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने मसाला आणि मीठ घालुन ते एकजीव करावे व त्याचे हाताने गोळे करावे. आता एका कुकर मधे थोड तेल, (जास्त तिखट खात नसल्यास १ कापलेला टोमाटो टाकु शकता) घालुन फ्राय करावे. मग त्यात हे गोळे टाकावेत. त्यात थोडेसे पाणी टाकुन(फक्त शिजण्यापुरते) कुकर ला २-३ शिटी द्यावी.


पौष्टिक मूग भजी

लेखक: वासु | प्रसिद्ध:
काल रविवार होता आणि काहितरी चटक-मटक खाण्याचा मूड होता. मग मूग भजीची आठवण आली. मूग हे कडधान्य आहे आणि ते पौष्टिक पण आहे. घरात मिरची, कोथिंबीर, अदरक-लसूण, बेसन हे होतच. मग पटकन जाऊन भिजलेले हिरवे मूग घेउन आले.(भिजलेले हिरवे मूग नसल्यास मूगाची डाळ ३-४ तास भिजत घालावे) आता लगेच तयारीला लागले. साहित्य : २५० ग्राम भिजलेले मूग ४-५ हिरव्या मिरच्या (तिखट) आर्धी गड्डी चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा अदरक-लसूणची पेस्ट हळद जीरे बेसन मीठ आणि लाल तिखट तेल सौस / हिरव्या चटणी किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणी आता कृती: भिजलेले हिरवे मूग असल्यास बारीक वाटून घ्यावे.


तू रे पल्याड गोविंदा!

लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
चाल चालले मी श्वास राहिला पेटता पाणी उसळले किती गूढ डोहाने जपता. जाणत्याला सारे भय तण माजताना रानी मस्तवाल झाले मी त्याने तुला काय हानी? वाया गेले एक तप पुढे चालू राही धंदा तुला नाही सुख दु:ख तू रे पल्याड गोविंदा! *अन्यत्र पूर्वप्रकाशित


थोडं थोडं जगून घे

लेखक: वैभवकुमारन | प्रसिद्ध:
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) "गड्या थोडं थोडं जगून घे" किती पळशी पैश्यामागे नको पैश्याचे अरण हे पैश्यावाचून गरीबाची तू शांत झोप ती बघून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. बघ आकाशी निळे रंग हे बघ पक्ष्यांचे खुले छंद हे एकच पक्षी थव्यातला तो डोळ्यात तुझ्या भरून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. नकोच विचार वयाचा तो नकोच विचार भयाचा तो उरात बालपण भरूनिया तू मनात दंगा करून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं जगून घे. येतील दु:ख असंख्य कधी वाहील डोळी नीर नदी कधीतरी मग अथांग सागर उधाणलेला बघून घे थोडं थोडं जगून घे..गड्या थोडं थोडं