Welcome to misalpav.com

लेखकु

लेखक: मंदार दिलीप जोशी | प्रसिद्ध:
कविता माझी वाच, कथा माझी वाच लेख नक्की वाच, लेखकु म्हणे आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि आव पिडीताचा, सात्विक संतापाचा वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट इतरांची लावू वाट, दिसता क्षणी ओलावले डोळे, भारावले मन शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद वर आणण्याचा नाद, लेखनाला इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान काढी फेसबुकी पान, स्वत:चे नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा || --------------------------


पुढच्यासाठी

लेखक: अमेय६३७७ | प्रसिद्ध:
कुणास ठाउक बाग कुणाची कुणी शिंपली हिरवी झाडे तारुण्याचे मोल, कुणाच्या हाडांची अन झाली काडे हिरवळ दिसते, पानोपानी मंजुळ किलबिल मंद स्वरांची जागोजागी खूण सापडे चराचरातिल अद्वैताची विश्वाचा हा जरी कोपरा कोप-यातले विश्व सुखाचे भय- क्रोधाला इथे न थारा इथे न वाढे तण्य फुकाचे आनंदाने भोग दान हे घाल तशी भर अपुली काही किंवा केवळ पाही इतुके कीड- वाळवी लागत नाही ठेव आठवण त्या पहिल्याची झाड लावले येथे ज्याने आपसूक मग सुचेल तुजला पुढच्यासाठी ठेवुन जाणे -- अमेय


घनन-घन घनगड

लेखक: सुज्ञ माणुस | प्रसिद्ध:
कैलासगड, घनगड, तैल-बैला, कोरीगड पावसाळ्याची सुरवात,मस्त वातावरण, त्यात रविवार आणि ट्रेक प्लान. यावेळी सकाळी ५ वाजता उठून सिंहगड पकडून कर्जतला जायचा जाम कंटाळा आलेला. बाइक पण बऱ्यांचं दिवसात पिदडवली नव्हती. म्हणून मग मुळशी जवळचे किल्ले करायचा प्लान झाला. भूषण मुंबई वरून पहाटे चारची गाडी पकडून पुण्यात ९ वाजता हजर.


धुसरिका - व्युत्क्रम

लेखक: जातवेद | प्रसिद्ध:
कधितरी झाडांवर सावली पडेल पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो विषयांतर करू नकोस विकासाच्या गतीची ऐशी तैशी चहा पिताना कपात बसली माशी नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली कालची फ़ॅटल एरर कोण काढली? सरता सरता काळ सरेना काय मस्त खेळती ही सेरेना मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय टाटा माझा स्वीकार करा