Welcome to misalpav.com

दिवस आठवले आपल्या जुन्या मैफिलीचे.....

लेखक: पंडित मयुरेश न… | प्रसिद्ध:

सुर पडता कानावर बासरीचे
ढवळुन निघते भावविश्व अंतरीचे
लेखणीतुनी मांडतो दु।ख मनीचे
आठवती दिवस आपुल्या मैफिलीचे.......

नवखे होतो आपण सारेच येथे
धडपडत होतो आपण सारेच येथे
नवनिर्मीतीची होती कास मनी
खुप यश मिलवण्याचा ध्यास मनी

कधी भेट झाली कधी मित्र झालो
कधी सुर जुळले कधी एक झालो
काही होते खास तुझ्यात काही मझ्यात
काही होते खास आपल्यात

रियाज झाले, बैठका झाल्या
कागदावरी काही कविता आल्या
सुराला शब्द शब्दाला सुर भेटले
पहिल्या मैफिलीचे तेथेच ठरले



आयुष्य

लेखक: हेमान्गी | प्रसिद्ध:
आयुष्याच्या वाटा थोडे खळगे थोड्या लाटा जपून चालावे तर लाटांबरोबर वाहत जाण्याची भीती धावत जावे तर खळग्यात पडण्याची भीती तरीही मन होते फुलपाखरू स्वप्नगंधी फुलांनी लागते बहरू आसमन्ताच्या जादूने रंगांची उधळण अंगणात जणू प्राजक्ताची पखरण वृक्षवल्लींना चढतो फुलांचा साज कधी गंभीर होते मन ऐकून समुद्राची गाज बहर ओसरू लागताच तुटतात स्वप्न साखळ्या कागदावर उतरू लागतात शब्द चारोळ्या


चिर अनंत

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
पुन्हा सुखे परतून न येती पानांवर जैसे दंव मोती ओघळल्या स्वप्नांचे अंती व्रण कांचेचे उरती परा शरांचे ढंग निराळे छटा उमलुनिया वावरती विमल कोवळे पराग गंधित माल्य फुलांवर लवलवती परम अलौकिक सण नियतीचे दरवळती वाटेवरती क्षणभंगुर वैभव हे पण अस्वाद कुणी घेती ना घेती पसा असू दे याचकसम आमंत्रक सदा नयन भरती आसपास चिर अनंत कोटी अमृतमय कण भिरभिरती धुंद सरोवर कुंद सभोवर शकुनांचे मेणे अवती माया ईश वराची अवघी चराचरावर ओघवती ……………… अज्ञात