Welcome to misalpav.com

येसर आमटी

लेखक: मितान | प्रसिद्ध:
बर्‍याच दिवसांपासून ही पाककृती लिहायची राहून गेली होती. मागे महालक्ष्म्यांच्या लेखात उल्लेख केलेल्या येसर आमटीची ही पाकृ. मराठवाड्यातली पारंपारिक आमटी. बर्‍याच लग्न कार्यात पाहुण्यांना जाताना शिदोरी म्हणून मसाला नि मेतकूट देतात. मराठवाड्यात येसर नि मेतकूट देतात. खूप भाज्यांची रेलचेल मराठवाड्यातल्या जेवणात अजूनही नसते. ग्रामीण भागात तर असेल ती पालेभाजी, घट्ट वरण आणि भाकरी हे जेवणच कॉमन आहे. अशा भागात चवबदल, चमचमीत झणझणीत काही खायचं असेल तर येसर करतात. लग्नकार्यात घरी पाहुण्यांची खूप गर्दी असे. आठ आठ दिवस आधी नि नंतर वर्‍हाडी मंडळी कामाला जुंपलेली असत.