Welcome to misalpav.com

हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं?

लेखक: चिंतातुर जंतू | प्रसिद्ध:
एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा गटाच्या (उदा: मराठी संकेतस्थळांचे संपादक! सं.मं: ;-) ह. घ्या. बरंका!) विषयी पसरणारे विनोद हे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या रागाचं द्योतक असतीलच असं नाही. उदा: बेल्जिअन लोक मूर्ख असतात असं दाखवणारे पुष्कळ फ्रेंच विनोद लोकप्रिय असूनही बेल्जिअन लोकांविषयी फ्रेंचांना विशेष राग आहे असं दिसत नाही. आपल्याकडेही ‘संता-बंता’सारखे विनोद शीख लोकांना मूर्ख दाखवतात, पण शिखांविषयी फार राग जनमानसात आढळत नाही. उलट एखाद्या व्यक्ती/गटाविषयी असणाऱ्या द्वेषाचं रुपांतर विनोदांमध्ये होईलच असंही नाही.


आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा.

लेखक: नीलकांत | प्रसिद्ध:
नमस्कार, मिसळपाववरील नवीन सदस्यांसाठी उपयोगास येतील अशी मदत पाने सध्या मी बनवतोय. याच वेळी नवीन सदस्यांना जुणे सदस्यं जे लघुरूपे वापरतात त्याची एका जागी माहिती दिली तर योग्यं होईल अशी कल्पना आली. मात्र माझ्याजवळ अशी यादी तयार नाही. मला येथे तुम्हाला माहिती असेल ती मराठी आंतरजालावर वापरली जाणारी मराठी लघुरूपे द्यावीत ही विनंती. माझे योगदान :- प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे. पुलेशु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा कलोअ - कळावे लोभ असावा. मग तुम्ही काय सुचवताय? :) - नीलकांत


उजाडलेच नाही आज...

लेखक: निनाव | प्रसिद्ध:
उजाडलेच नाही आज दिवस होते झोपून रात्री ने सोडले नाही हात तिच्या गोड कुशीतून मी राहिलो पाहत वाट होते तिला भेटायचे दिवस कुठे उजाडे कधी त्यास कळायचे जेंव्हा होते प्रेम होतात दिवस छोटे विरह भेदते मनाला सरता न रात्र सरते शोधू लागलो वाटा अंधारातच तिच्या ओढी कुठे होते ठाऊक वाट ही थेट स्वप्नात तिच्या पोहोचते उजाडलेच नाही आज दिवस होते झोपून रात्री ने सोडले नाही हात तिच्या गोड कुशीतून


समुद्र किनारा आणि मी..

लेखक: निनाव | प्रसिद्ध:
सकाळी सकाळी समुद्र किनार्या वर उघड्या पायांनी चालतांना उडणाऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकतांना आणि डुलणार्या होडी पाहतांना तुझीच आठवण येते दूर नभात उजाड्तांना थंड लाटा भिजवतांना पायात शिंपले टोचतांना तुझीच आठवण येते किनाऱ्याची मिठी मारतांना लाटांचे फेस जवळ येतांना सुसाट वारा केस उडवतांना तुझीच आठवण येते एका हातात चपला धरूनी चालतो आहे मी काही शोधत खाली बघत पण खंर तर काहीच दिसत नाही मला आणिक काहीच ऐकू येत नाही सगळे जसे थांबले आहे ...आणि ... भासते अचानक मला... त्या लाटा आत्ता पाण्या च्या नाहीत त्या तुझ्या बरोबर जगलेल्या प्रत्येक क्षणाच्या आ


आमचेही क्रिकेट

लेखक: हरिप्रिया_ | प्रसिद्ध:
क्रिकेटचे सुरु झालेले महासंग्राम आणि त्या निमित्ताने मिपाने दिलेल व्यासपीठ..त्या निमित्ताने माझ्याकडून हा प्रयत्न... आम्ही BE ला असतानाची ही गोष्ट. आमच्या D.Y.Patil College Of Engg,कोल्हापूरला २५ वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने कॉलेज मध्ये अनेक नवीन गोष्टी सुरु होत्या. २५ वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वगैरे दणक्यात साजरा करून झाल होत.


मामा च्या गावाला जाऊ या....

लेखक: चिप्लुन्कर | प्रसिद्ध:
मामा च्या गावाला जाऊ या.... नमस्कार मंडळी , या मे महिन्यात मी व माझा मित्र दि. १० मे २०११ ते १५ मे २०११ या दरम्यान कोकणात संगमेश्वर नजीक लोवले या गावात " मामाच्या गावाला जाऊया " अश्या एका ट्रीप चे आयोजन करत आहोत. या ट्रीप मध्ये कोकणातील एका छोट्याश्या गावात घरच्या खेळीमेळीच्या वातावरणात राहायला तसेच मनसोक्त आंबे , फणस आणि इतर रानमेवा चाखायला मिळणार आहेत. तसेच घराजवळील रानात हुंदडायला आणि नदीतील डबक्यात डुंबायला मिळणार आहे. कोकणातील आढळणारे पक्षी , फुलपाखरे आणि साप यांच्याविषयी माहिती शिबीर तसेच जवळील काही पर्यटन स्थळे पाहणे असे आयोजन आम्ही करत आहोत.


एक निवेदन [पोलिओ ड्रोप्स लसीकरण - २७ फेब्रुवारी २०११]

लेखक: Pearl | प्रसिद्ध:
श्रोतेहो, एक निवेदन: रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०११ रोजी सरकारतर्फे देशभरात सर्वत्र पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाच वर्षाखालील सर्व बालकांना या कार्यक्रमाअंतर्गत मोफत लस देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. आणि आसपासच्या लोकांना याबाबत माहिती द्यावी / आठवण करावी. निवेदन संपलं :-) [आकाशवाणी स्टाइल ;-)]


खुलासा

लेखक: मिसळलेला काव्यप्रेमी | प्रसिद्ध:
नमस्कार मिपा करांनो, माझ्या आय. डी. वरून बराच गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून हा खुलासा. माझा आणि "परीकथेतिल राजकुमार" यांचा दुरयान्वहेही काही संबंध नाही. मी हा आय.डी. निव्वळ माझ्या आवडी नुसार निवडलेला आहे. यात "परीकथेतिल राजकुमार" यांना चिडवण्याचा, कुठलीही स्पर्धा करण्याचा अथवा खोडसाळपणा करण्याचा हेतु नाही. गेले १ वर्ष मि मिपा वरिल लिखाण वाचत आहे. मला हे संस्थळ प्रचंड आवडते. म्हणुन मि इथे येउन दाखल झालो. मिपा चा उद्देश आणि एकुणच वाटचाल पाहुन थक्क व्हायला होते. आणि म्हणुनच मला या परीवाराचा सदस्य व्हावेसे वाटले. आय.डी. काय घ्यावा या विचारात असतांना "परीकथेतिल राजकुमार" हा आय.डी.