Welcome to misalpav.com

मराठी शब्द हवा

लेखक: अविनाश ओगले | प्रसिद्ध:
पोथी खालच्या पाटाला, जो पोथी वाचताना उघडून ठेवतात व नंतर घडी घालून मिटता येतो त्याला मराठी अथवा संस्कृत शब्द कोणता?


शोलेच्या ठाकूरच्या हातांचा शोध

लेखक: नितीन बोरगे | प्रसिद्ध:
मित्रानो शोले हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३५ वर्ष लोटली आहेत. हा चित्रपट न पाहिलेली व्यक्ती शोधून सापडायची नाही. ह्या चित्रपटातील सर्व पात्रे लक्षात राहिली, पण सर्वात जास्त लक्षात राहतो तो हात नसलेला ठाकूर. "तेरे लिये मेरे पैर हि काफी है", अस म्हणत गब्बर वर तुटून पडणारा ठाकूर पहिला कि नुसता चेव चढायचा अंगात. हात कापलेल्या ठाकूरला लढताना बघताना मला लहानपणी जाम कौतुक वाटायचे. मग शाळेत खेळताना हात मागे बांधून मित्रांशी मारामाऱ्या देखील केल्या आहेत (आणि तोंडावर पडून नाक फोडून घेतली ते सांगायला नकोच,,). जाऊ देत, नमनालाच घडाभर तेल झाल.


रतनगड - एक सुखद अनुभव

लेखक: गणेशा | प्रसिद्ध:
मुंबईवरुन संध्याकाळी ६:३० ला गोदावरी गाडी ने नाशिक रोड ला उतरलो. सिन्नर चा माझा मित्र ह्रषिकेश यमाहा १३५ वर मला न्ह्यायला आलाच होता(मीच बोलावले होते, बिच्चारा मॅच सोडुन आला) .. नाशिक मधील जुने कलीग त्यांच्या फॅमीली बरोबर रात्री "छान" मध्ये जेवुन , जाताना मी चिकन खाल्ले म्हणुन २ शब्द मित्राकडुन उगाच ऐकुन आम्ही सिन्नर ला निघालो... रतनगड ला तसे नाशिक वरुन ही जाता आले असते पण सकाळी डबा घ्यायचा असल्याने नाशिक च्या मित्राला सोडुन आम्ही सिन्नर ला गेलो. रतनगड ला ही बाकीचे कॅन्सल झाल्याने आम्ही दोघेच जाणार होतो.. सकाळी लवकर उठुन .. २ ब्यागा भरण्यात आल्या.. डबा .. कांदे..


डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १०

लेखक: अवलिया | प्रसिद्ध:
मागील भाग - http://misalpav.com/node/16919 ***
कोनी एका ओळिचं धागं काडाया कायबी जुळिवतंय आनी पब्लिक त्येच्यावर येड्यावानी परतिक्रिया देतंय आमानी नाय कवा परतिसाद देयाचं वाटनांर तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !! लोकं लावत्यात कौल अन गाव म्हनतंय भारी आमी मात्र मनात हानतुय दगुड, फोड कौलं तिच्यामारी लावली तुमी कौलं सोन्याची तरी आमी फाट्याव मारनार तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!
अधिक वाचा - http://misalpav.com/node/8989 ***
खोकत खोकत पहाता पहाता उठते जेव्हा एक कळ मन माझे म्हणते तेव्हा म्हातार चळ म्हातार चळ एरंडाचं पान माझ्या टाळू वरुन ढळलं नाही


डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग ९

लेखक: अवलिया | प्रसिद्ध:
मागील भाग - http://misalpav.com/node/16898 ***
माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची. मग आमची वरात निघायची तिच्यामागे.


कान्हा

लेखक: कोमल | प्रसिद्ध:
श्रावणाच गाण तुझ्या ओठी सुरु होत, ऊन पावसाशी झिम्मा, मन खेळत बसतं॥ इन्द्रधनुच्या कमानीत तुझी कमनीय काया, माझ्या मनाला मोहते,तुझी सप्तरंगी छाया॥ ओठी बासरी तुझ्या, तिचे वेडे खुले सुर, चिंब पावसात भिजे, मन बनून मयूर॥ माथ्यावरी सजे मोरपिसं, जणू पाचूचा खड़ा, आला बघा गं सयांनो, माझा कान्हा-सावला॥ त्याच्या सोनेरी देहाची, सोन्या सारखी किरणे, तशी सोनेरी शेवंती, गाते पहाटेचे गाणे॥ माझ्या सावल्या देहात, "सावल्या"चेच चैतन्य, दर्पणात पाहे मी, माझ्या सावल्या चे बिंब॥ नाही मी राधा, अन मीरा ही नाही तरी तुझीच आस कान्हा धरून मी राही... तरी तुझीच वाट कान्हा पाहत मी राही॥


[ज्योतिष] दिनांक ५ मार्च २०११ रोजी होणारी मिश्र फलदायी अमावस्या

लेखक: युयुत्सु | प्रसिद्ध:
दिनांक ५ मार्च २०११ रोजी सायन मीन राशीत १४ अंश ०० मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या मंगळाशी सात अंशात युती करते. ही युती फार तीव्र म्हणता येणार नाही. पण गोचर मंगळाचा गोचर प्लुटोशी लाभ योग होत असल्याने अडकून पडलेली कामे मार्गी लावायला जी ऊर्जा लागते ती या अमावस्यामुळे बर्‍याच जणाना मिळू शकेल. पण काही जणाना गोचर शनीशी अमावस्येने केलेल्या quincunx (मला याचे मराठी नाव माहित नाही) या योगामुळे काही जणाना अमावस्या त्रासदायक ठरायची शक्यता आहे अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com


मासे २१) कोलिम

लेखक: जागु | प्रसिद्ध:
कोलीम समुद्रात तसेच खाडीत मिळतो. समुद्रातील कोलीम पांढरट असतो तर खाडीतला काळा असतो. खाडीतल्या कोलमाला जास्त चव असते. कोलीम म्हणजे कोलंबीच्या जन्माची पहिली स्टेप. कोलिमाचे कालवण मी अजुन ऐकले नाही पण कोलिमाची वडी करतात. सुक्या कोलमाच्या पापडासारख्या पण थोड्या जाड वड्या बाजारात विकत मिळतात. त्यांना पेंडी म्हणतात. त्या पेंडी तव्यावर किंवा चुलीत भाजुन खायला मजा येते. पहिला कोलीम निवडून घ्यायचा. एक माचिसची/अगरबत्तीची काडी घेउन किंवा बोटाने थोडे थोडे कोलीम सारुन (तांदूळ निवडतो तसे) कोलीम निवडावा लागतो. त्यात कधी कधी पाखर असतात किंवा काही प्लास्टिक वगैरे मिक्स झालेले असतात म्हणून.


सार्‍या जातींना खड्यात जावूद्या

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||धृ|| नका कुणी हो जातपात मानू नव्या कल्पना अंमलात आणू जुने विचार मसणात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||१|| ह्या जातींनी काय नाय केलं माणसामाणसात भांडन लावून दिलं सख्खेशेजारी वैरी होती एकमेकांचे गळे कापती मी उच्च तू निच ते म्हणती असलं वाईट वागणं तुम्ही थांबवा या जातींना खड्यात जावूद्या ||२|| ब्राम्हण, मराठा, शिंपी, सोनार तेली तांबोळी कुणगर, महार कोळी कोष्टी कोकणा भामटा भिल्ल रामोशी मातंग बेमटा किती जात


सिंहगडवरचा सुर्यास्त

लेखक: फ्रॅक्चर बंड्या | प्रसिद्ध:
शिवजयंतीला सिंहगडावर गेलो होतो . तिथे सुर्यास्ताला घेतलेली काही छायाचित्रे .. गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले.