Welcome to misalpav.com

पालक आणि कोबी पराठा

लेखक: Mrunalini | प्रसिद्ध:
साहित्यः कोबी - दिड कप (किसुन) पालक - १ कप (बारीक चिरुन) बेसन पीठ - ३ चमचे गव्हाचे पीठ - १ कप ओवा - १/२ चमचा आले लसुण पेस्ट - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा हळद - १/२ चमचा तेल - २-३ चमचे मिठ चवीनुसार बटर किंवा तुप - भाजण्यासाठी कॄती: १. एका बाउल मधे किसलेला कोबी, बारीक चिरलेला पालक घ्यावा. त्यात ओवा, आले लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, बेसन पीठ, तेल व मिठ टाकुन मिक्स करावे. हे बाउल १० मिनिटे झाकुन ठेवावे. २. १० मिनिटां नंतर कोबी व पालकला मिठा मुळे पाणी सुटलेले असेल. ह्या मधे बसेल एवढे गव्हाचे पीठ टाकुन, घट्ट गोळा मळुन घ्यावा. ३.


आगरी भयकथा

लेखक: आगरी बाणा | प्रसिद्ध:
भाल्या त्याचेच तंद्रीन् बिरी वरत बांधावरशी घरा चालला होता. येलेची न् आजुबाजूला काय चाल्ललाय याची त्याला अजाबात जानीव पुन व्हत नव्हती. तवर्यान मंगारशी आवाज आयला... "ये भाल्या! थांब तखरच... मी पुन यतय". मंग ते दोघ पुन सोबतीनुच चालाला लागल... "बिरी दे र" भाल्याचे बरब व्हता तो बोलला... भाल्यान मंग त्याला बिरी दिली... बरबचा "च्याला... ३० नबंर!!!... मी पुन यीच रोजचे ईच वरत..." आखरून तख्रूनच्या बाता मारत दोघा चालत व्हत... तवर्यान..."बिरी दे र" बरबचा परत बोलला... ती पुन संपली... मंग परत त्यान बिरी मांगली... भाल्या आजून पयलीच बिरी वरत होता... त्याला बिरी दिली न भाल्या जरासा टरकलाच...


रंगोत्सव अंतर्गत कुसुमांजली - काव्य, चित्र, अक्षर रेखाटने स्पर्धा + सांस्कृतिक कार्यक्रम

लेखक: कलंत्री | प्रसिद्ध:
२०११-१२ हे कुसुमाग्रज ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष! २६ फेब्रु. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, २७ फेब्रु कुसुमाग्रजांचा जन्मदिवस व आपला सर्वांचा लाडका मराठी भाषा दिन! ह्या दोन्ही सुवर्णदिनांचे औचित्य साधून " थर्ड बेल एंंटरटेनमेंट " (Third Bell Entertainment) सादर करीत आहे " रंगोत्सव " (पर्व पहिले) - कविवर्य कुसुमाग्रजांवर आधारित साहित्य, काव्य, नाट्य, कला, चित्र, संगीत, नृत्य यांचा संमिश्र आविष्कार " कुसुमांजली " - २ दिवसांचा आनंदोत्सव!!! प्रदर्शनाचे ठिकाण : दि. २६ फेब्रु., दि. २७ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे महोत्सवाचे ठिकाण : दि. २६ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे दि.


गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

लेखक: चिंतातुर जंतू | प्रसिद्ध:
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता.


डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ८

लेखक: अवलिया | प्रसिद्ध:
मागील भाग - http://misalpav.com/node/16883 *** अनेक कथा कादंबर्‍या आपण वाचतो. काही आवडतात, काही आवडत नाहीत. काहींचा काही भाग आवडतो. कुणाला त्याबद्दल सांगायला जावे तर आवडली किंवा आवडली नाही किंवा ठिक आहे.. पण या दोन तीन ठराविक प्रतिक्रियांपलीकडे आपली सहसा मजल जात नाही. जाईलच कशी? जे काय कळले आहे, जे काही समजले आहे त्याला शब्दांचे रुप तर देता आले पाहीजे ! हे काही सहजसाध्य नसते. मग कुणीतरी कधीतरी असंच आपण वाचलेल्या कथा कादंबर्‍यांबद्दल काहीतरी लिहीतो आणि आपल्याला असे वाटते की अरे हे तर मला मांडायचे होते तसेच आहे.


ब्लॅकबेरीचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी मदत करण्याचा नकार ?

लेखक: टारझन | प्रसिद्ध:
णमस्कार्स , http://www.esakal.com/esakal/20100804/4795822777043890252.htm आज ऑनलाईन बातम्या वाचताना ह्या बातमीवर नजर पडली .. ब्लॅकबेरी नामक कंपनी ने ब्लॅकबेरी थ्रु जाणार्‍या एसेमेस आणि इमेल्स वर पाळत ठेवण्याची गृहखात्याची मागणी धुडकावुन लावली आहे , ह्याचे आश्चर्य वाटले . ह्यात नक्की काय खाचाखोचा आहेत , झोल आहेत हे जाणुन घेण्यासाठी हा काथ्याकुट आहे. ब्लॅकबेरी म्हणते आमच्या कडुन ह्या प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही त्याला तांत्रिक अडचणी आहेत ( आणि हेच सर्वांत हस्यास्पद विधान आहे ) जर मेसेज इन्क्रिप्ट करता येतो तर तो डिक्रिप्ट करता येतोच येतो .


संपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम

लेखक: मस्त कलंदर | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी, औचित्य आहे दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्‍या मराठी भाषा दिवसाचं. त्या निमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली आहे. या दिवशी अधिकाधिक संपादने करून आपला सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी विकिपीडियाकडून सर्व मराठी भाषिकांना यात सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. विकिपीडियाच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणं सर्व भारतीय भाषांमध्ये मराठीतील लेखांचा तिसरा क्रमांक आहे.